कथा एका इंजिनीयर ची choudhri jay द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथा एका इंजिनीयर ची

कथा एका इंजिनीयर ची

नमस्कार मित्रनो आणि मैत्रीण ना तर चला आज घेऊन येत आहे कथा एका इंजिनीयर ची.
नुकतेच इयत्ता दहावी चे पेपर संपले होते आणि १५ जून रोजी निकाल लागला. आणि संभाजी ला दहावी ला ८०% टक्के पडले, आणि संभाजी ला पाचवी पासून च इंजिनेर होयचे होते, त्याने माहिती गोळा करायला चालू केली. आणि त्याच्या गावातलाच एक मित्र डिप्लोमा करत होता हे त्याला समजलं त्याने त्याला सगळी प्रोसेस विचारून घेतली आणि गावापासून ८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन ला जाऊन डिप्लोमा साठी फॉर्म भरला. त्या नंतर मेरिट लिस्ट जाहीर झाली आणि त्याने पहिले कॉलेज जवळींल
शासकीय तंत्रनिकेतन सिलेक्ट केले होते आणि मार्क फर्स्ट क्लास असल्यामुळे त्याचा नंबर तिथेच लागला. नंतर ऍडमिशन प्रोसेस चालू झाली. ऍडमिशन झालं त्या नंतर कॉलेज च हॉस्टेल असल्या मुळे तिथे पण फॉर्म भरला व तिथे पण फॉर्म भरला व त्याची पण गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्यात त्याच सिलेक्टिव झालं. त्या नंतर त्याने ऍडमिशन केलं आणि हॉस्टेल ला राहायला आला. संभाजी तसा हुशार मुलगा आणि त्याला रूम मेथ पण चांगले भेटले आणि फर्स्ट इयर च कॉलेज चालू झालं, लगेच दोन महिन्याने सेमिस्टर चे पेपर आले संभाजी तसा एका खेड्यागावतून आलेला मुलगा आणि त्याच दहावी पर्यंत शिक्षण हे त्याचा आत्या कडे च झालं होत आणि फर्स्ट सेमिस्टर ला तास तो जास्त मुलात रमला नाही. फक्त्त कॉलेज चे तास , प्रतिक्षक आणि आपला अभ्यास भला एव्हडीच दिनचर्या होती. सेमिस्टर पेपर ची तारीख आली आणि डिप्लोमा ला पेपर च्या आधी एक महिना किंवा पंधरा दिवस सुट्ट्या असतात. सर्व सुट्ट्या मध्ये घरी गेले पण संभाजी आपला हॉस्टेल ला राऊन च अभ्यास करत असे जस जसे दिवस जात होते तशी पेपर ची तारीख जवळ येत होती. आणि एकदाचा चा पेपर चा दिवस उघडला आणि सगळे मित्र पेपर ला आले आणि पेपर ची वेळ जशी जशी जवळ जवळ येत होती तशी धाक धुकं चालू होती पेपर झाला सगळे बाहेर आले आणि गप्पा चालू झाल्या कुणी किती मार्कांचा सोडला प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगत होता संभाजी मात्र आपला चांगला गेला एवढाच बोलून रूम वर यऊन झोपी गेला , बगता बगता सगळे पेपर झाले. आता फक्त्त वेळ होती निकाल यायची. आला निकाल आला संभाजी ने सगळे विषय क्लिअर केले होते आणि जे बोलत होते मी इतका मार्क चा सोडला तितका सोडला सगळ्या चे विषय बॅक पडले होते. त्या नंतर संभाजी ला कॉन्फिडन्स आला होता कि मी करू शकतो म्हणून त्या वेळे पासून त्याने थोडं टेन्शन कमी घेतलं. त्या नंतर हळू हळू तो मुलं मध्ये मिसळू लागला, आणि बगता बगता दुसरं सेमिस्टर गेलं तिसरा सेमिस्टर गेलं आणि लास्ट सेमिस्टर ला संभाजी ला एक मुलगी आवडू लागली. संभाजी ने ठरवलं मला हिला बोलायचं आहे म्हणून त्याच जवळच्या मित्रांना सांगितलं काही करून हिला बोलायचं आहे तशी त्याची प्रोसेस चालू झाली पण संभाजी हा खूप लाजाळू आणि भित्रा होता पण त्याचे एक दोन खास मित्राने त्याला चांगलाच स्ट्रॉंग बनवलं होता. आणि ठरलं ह्या दिवशी आपण तिला बोलायचं म्हणून त्याच जवळच्या मित्रांना सांगितलं काही करून हिला बोलायचं आहे तशी त्याची प्रोसेस चालू झाली पण संभाजी हा खूप लाजाळू आणि भित्रा होता पण त्याचे एक दोन खास मित्राने त्याला चांगलाच स्ट्रॉंग बनवलं होता. आणि ठरलं ह्या दिवशी आपण तिला बोलायचं मंहून आणि प्लॅन ठरल्या प्रमाणे सगळं बरोबर झालं आणि संभाजी ने तिला प्रोपोस केला आणि तिने पण होकार दिला आणि गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि संभाजी तसा खूप विचार करणारा मुलगा आणि एक दिवस गप्पा गोष्टी झाल्या आणि आणि दुसऱ्या दिवशी त्याच मनात काय आला लगेच त्या मुली ला बोला आज पासून तू मला बोलायचं नाही, तसा तो खूप पुढचा विचार करणारा त्याला लगेच क्लिक झालं कि माझं स्टडी वर लक्ष कमी होईल.