भाग - ६
(मिशन >> शाणपत 👿👽)
.
.
.
.
.
सावी - पिंकीsss ए पिंकीsss
कुठे गेलीय ही? पिंकेssss 😡
(सावी ओरडतच खाली आली...)
सतीश - काय ग काय झालं? चिऊ एवढी का तापलेस?
सावी - पिंकी कुठेय बाबा?
सतीश - अग ते तीच कॉलेजच काम आहे म्हणून....
सावी - हा आजकाल रोज हीच कारण देते ना ती बाबा, माझा साखरपुडा काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि ही कशातच नाही....शॉपिंग चा वेळी तेवढी होती....
सतीश - तीच एडुकेशन पन महत्वाचं आहे ना चिऊ जरा समज ना...असं चिडायचे नाही ग.. शांत हो...तुला राग भारी येतो हा...पन तुझ्या रागाची व्याख्या जरा वेगळी असते....
सावी - म्हणजे?
सतीश - म्हणजे तू फक्त तुझ्या वयाच्या बरोबरीच्या माणसांवर चिडतेस वाद घालतेस...मोठ्यांच नेहमी आदर करतेस...हो!!
सावी - बाबा चिडवताय आता तुम्ही पन 🙂
सतीश - नाही ग नहीं...
सावी - 😂😂❤️
*******************
ठरल्याप्रमाणे साची आणि अपूर्व कामाला लागतात....साची गनपत च्या ऑफिस मध्ये आणि अपूर्व शांतीच्या घरी जातो..
(बेल वाजते...)
शांती - कोण?
अरे अपूर्व भाऊजी.... या ना...
अपूर्व - नमस्कार नमस्कार क्रांती...अअअअ श शांती वहिनीसाहेब.....
शांती - काय तुम्ही पन वहिनीसाहेब म्हणता... 😆या बसा...
अपूर्व - आज मला खूपच वेळ होता मग म्हंटल कि एक प्लॅन करावा आपण सगळे फिरायला बाहेर जावं....तुम्ही दादा मी..मुव्ही ला..म्हणून दादाने तुम्हाला घेऊन यायला सांगितलं मला....
शांती - अच्छा!! असं होय..तयार होऊन येतेच...
अपूर्व - हो हो... अअअ पन काय झालंय का वहिनी तुम्ही एकदम उदास दिसतंय तेजस्वी चेहरा कोमेजलाय..
शांती - अअअ काही नाही ते असच...
अपूर्व - अच्छा! त्यादिवशी ते गणपत भेटले होते त्यांचा पन चेहरा असच.......
शांती - असच त्यांचा काय...?
अपूर्व - त्यादिवशी त्यांचा चेहरा पडला होता, आज तुमचा.... काय होतंय सगळ्यांना कुणास ठाऊक... ते गणपत राव बोलत होते.....
शांती - काय काय? काय बोलत होते...
अपूर्व - वहिनी ते सांगत होते त्यांचं ही एका मुलीवर प्रेम होत म्हणे.....कॉलेज पासून अजून पन ते त्याच मुलीवर प्रेम करतात.....आणि आता तर ती मुलगी त्यांना भेटलेली म्हणे....तर ते म्हणत होते लग्न करतानाच ती भेटली नेमकी....हे लग्न करणं आता जड जातंय म्हणे त्यांना......मी तर तिच्यासाठी लग्न पन मोडेन.... पन ती तयार हवी ना....असं म्हणत होते......खूप प्रेम करतात हो ते....बिचारे वाईट वाटतं मला त्यांचं...मनात नसताना जिजा सोबत लग्न होतंय त्यांचा....🥺
शांती - काय सांगता 🥺एवढं बोलें ते...
अअअ त त्यांनी तीच नाव सांगितलं का तुम्हाला?
अपूर्व - नाही ना....पन त्यादिवशी ते खूप रडले माहिते...ज्याच्यावर आपल प्रेम असत त्याच्याशीच लग्न करायच आयुष्य सुखाचं होत, मनाविरुद्ध करून काय उपयोग....
शांती - हो ना...... 🥺
अपूर्व - बर चला आवरून या तुम्ही मी आहेच बाहेर वहिनी...
शांती - हो भाऊजी आलेच.. 🙂
अपूर्व - yesss बाण घुसला....ते ही थेट काळजावर..... 👽😼काम फत्ते 👿
.
.
.
.
.
साची - गणपत जीजू, मला एक सांगाल का?
गणपत - बोला ना..
साची - तुमचं कोणावर प्रेम होत का कधी?
गणपत- अअअअ त हं म्हणजे असं अचानक का विचारलेत?
साची - सहजच..जर असेल तर सांगा.... अजून वेळ नाही गेली ना तुमच्याकडे नाहीतर नंतर वेळ निघून गेली कि पश्चाताप होतो खूप.....त्यादिवशी त्या शांती ताईच ऐकलं ना मी खूप वाईट वाटलं मला....
गणपत- तीच... आ i mean त्यांचं काय ऐकलं? काय सांगितलं त्यांनी?
साची - त्या सांगत होत्या कि कॉलेज मध्ये एका मुलावर प्रेम होत त्यांचं, पन दोघ ही कधी व्यक्त झालेच नाहीत....ती पन नाही बोली आणि तो पन....नंतर दोघ लांब झाले...आणि आता कुठे ती बिचारी मूव ऑन झाली तर तो समोर उभा येऊन ठेपला तिच्या वर्तमानात.....आता तिला भूतकाळ आठवून त्रास होतोय....त्यादिवशी खूप रडत होती.....आता वेळ निघून गेली? मी लग्न पन मोडेन जर त्याने येऊन एकदा तरी प्रपोज केल मला तर..लग्नाची मागणी घातली तर....असं म्हणाली शांती ताई...
गणपत- काय सांगताय..... त्यांचं पन प्रेम आहे ते ही एवढं 🥺मला नव्हतं माहिती....
साची - तुम्ही का असं बोलताय...... ती त्या मुलाबद्दल बोली......पन काय करणार कारण तिने मुलाचं काय नाव गाव तर सांगितलं नाही...आपण कायतरी हेल्प केलीच असती....
गणपत - अअअअ त हं हो ना...
साची - कस आहे ना जीजू, एकदा वेळ निघून गेली कि गेली.....पुन्हा मागे नाही येतायेत....जे घडलं ते घडलं.... आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी थोडस दुःख, दुरावा सहन करावाच लागतो....सगळ्या गोष्टी आपल्यला मिळत नाहीत..... त्या मिळवाव्या लागतात....
गणपत - खरय तुमचं....
शांती - बर असो चला चला उशीर होईल ताई तिकडे वाट बघते आपली मुव्ही ला लेट होईल....
गणपत - आ हो मी आलोच हू..थांबा..
साची - हो हो... 🙂
Yesss प्लॅन सक्सेस.....
******************
साची आणि अपूर्व दोघांना घेऊन मॉल मध्ये येतात.....अपूर्व - साची मुळे शांती आणि गणपत च्या मनात विचारांचा वादळ निर्माण झाला होता....दोघांचे चेहरे बघूनच कळत होत की ते काय विचार करत आहेत....
शांती - अअअ अपूर्व भाऊजी अजून अर्जुन आले नाहीत....??
अपूर्व - अरे हो की.. दादा बोला होता इकडेच येणार आहे तो...थांबा मी कॉल करून आलो तिकडून इकडे नेटवर्क नाही..... तुम्ही इकडेच थांबा हा वहिनी...
शांती - हो हो.. या..
अपूर्व - हॅलो.....हॅलो..... दादूस....आवाज येतोय का?
(फोनवर बोलायचं नाटक करताना....)
शांती - बापरे हे काय होतंय मला....? अस्वस्थच झालेय मी तर....असं का? पन हे खरं आहे ना की मला गनपत ची आठवण येतेय....गनू कॉलेज मध्ये असताना किती मागे मागे फिरायचा माझ्या..... मी खूप भाव खाल्ला.....नंतर कॉलेजच बदललं आमचं....किती वर्ष फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शोधलं कुठेच संपर्क नाही झाला......आज भेटलो ते ही आशा वेळी.....जस अपूर्व भाऊजी बोलले तस खरच मनाच्या व्यक्ती सोबतच लग्न झालं तरच सुख मिळत नाहीतर दोन जीवांचा बळी......आपण ही दुःखात आणि समोरचा ही...... मनात एक आणि जीवनात एक......? नाही.....
गनपत - शांती?.... शांती ना?
(मागून येताना...)
शांती - अ गनू...? नाही नाही भास होतोय.... 😆
गनपत - अग शांती मी खरच आलोय...
शांती - काय तू?? तू इकडे कसा आलास? कधी? का?
गनपत - अग हो हो....मी ते साची आणि सावी सोबत आलेलो..... सावी ऑन दि वे आहेत आणि साची रेस्ट रूम ला..... सो.... तोवर तू दिसलीस....
शांती - अच्छा! माझा पन सेम सिन..... 😆
गनपत - अजून आल्या नाहीत त्या...
शांती - हो ना ते पन....
गनपत- अच्छा! मग खुश आहेस का??
शांती - हा आणि तू??
गनपत - तू आहेस तर मी पन..
शांती - माझा काय प्रश्न..लग्न तुझं होतंय ते ही दुसरी सोबत....
गनपत - काश! ती तू असतीस....
शांती - हं????
गणपत - म्हंटल की...काश तू ही माझ्या लग्नात असतीस....
शांती - हम्म..हे दोघ आले कसे नाहीत..
गणपत - बराच वेळ झाला ना...
शांती - हो ना...
गणपत- तुझी काही हरकत नसेल तर आपण कॉफ़ी?
शांती - अअअ पण..
गणपत - नाही म्हणू नकोस..
शांती - ओके.
साची - yes....प्लॅन नुसार सगळं होतंय....😂
अपूर्व - हो ना..... 🙈
बरं पिंकी तुला माहिती आहे ना आता पुढे काय करायचंय...
साची - हो 😈
*********************
गणपत - आता एकमेकांसमोर आहोतच तर जरा जुन्या गप्पा मारूयात का?
शांती - हा काय बोल ना?
गणपत- मी म्हणत होतो की तू विसरलीस का? आपले ते क्षण???
शांती - अअअ?
साची - अरे देवा यांचे क्षण पण आहेत वाटतं 😂
अपूर्व - ए पिंकी गप्प बस...
(लपून बघताना...)
गणपत - अग म्हणजे... एकत्र कॅन्टीन ला जेवण...बुक्स रीड करायला जण...घरी जाण येन.... ते म्हणत होतो...
शांती - ते कस विसरू मी... बेस्ट मेमरीज..तुझ्यासोबतचे क्षण खास आहेत...मनात जपून ठेवलेत अजून.....
गणपत- खोटं असं असत तर मग का गेलीस निघून? का गेलीस 🥺
शांती - मी... मी नाही गेले.... 🥺बाबांची ट्रान्सफर झाली इकडे गनू.... म्हणून मला यावं लागलं....तुला सांगायलाच नाही भेटलं....चुकलं माझं पण...🥺ते मला सुद्धा अचानक समजलं...
गणपत - ओह अचछा आणि इतके वर्ष मी समजलो की तू लांब गेलीस.... सोडून गेलीस...
शांती - नाही...मी का जाऊ सोडून....उलट मी तर... अअअ
गनपत - काय... काय बोल ना....? उलट मी तर काय....? बोल शांती..... 🥺
शांती - कही नाही..
गनपत - बोल तुला माझी शपथ आहे...... 🥺
सगळीकडे वातावरण शांत झालं.....अपूर्व आणि साची एक नजर ठेवून त्या दोघांकडे पाहत होते......आता उत्सुकता होती ती फक्त शांती काय बोलते याची.......?????
शांती - उलट माझं तर तुमच्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे....... 🥺
गनपत - काय सांगतेस..... खरं? खरं शांती 🥺
शांती - हो गनू... हो 😭 मी बोलें नाही कारण बाबांची ट्रान्सफर..... आणि आपलं आडनाव सारखं आहे.....
गनपत - मग?
शांती - आपण बहीण भाऊ तर नाही ना लागत?
गनपत - ए गप्प बस.... असं कही नसतं... आडनाव सारखं असल्याने...... आणि ते मी बघून घेईन... तू सांग करतेस ना प्रेम?
लग्न करशील माझ्याशी शांती 🥺❤️
शांती - हो, मला करायचंय लग्न तुझाशी.... पण आता कस शक्य आहे ते....🥺❤️
गनपत - मी बघतो ते..
अपूर्व - साची = वोहोsssss साची प्लॅन सक्सेस....🤩✌️
.
.
.
.
.
अर्जुन - गुड आफ्टरनून!!
विदुला - गुड आफ्टरनून सर
राहुल - गुड आफ्टरनून
सर्व - गुड आफ्टरनून सर!!!!
अर्जुन - तर आज आता आपण यासाठी जमलो आहोत....आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी..... आपल्या बँकेचं टार्गेट क्रॉस झालंय...आपल्या बँकेचा नफा झालाय...करोडोंचा......
सगळे - (एका सुरत ) वोहोsssssss 👏👏
अर्जुन - म्हणूनच आज छोटीशी पार्टी आहे...विजया सहकारी बँकेचे ओनर यांच्या तर्फे....जेवढ्या ब्रँच आहेत त्या सगळ्या असतील तिकडे.....सो आता सगळ्यांना घरी सोडतोय.....संध्याकाळी आठ वाजता....दिलेल्या पत्त्यावर या.... ओके.....
राहुल - हो हो नक्कीच....
विदुला - वाव मज्जा येणार....
अर्जुन - आणि हो हो....बेस्ट एम्प्लॉयी ऑफ दि इयर अवॉर्ड पण मिळणार आहे..... प्रत्येक ब्रँच मधून एका एकाला निवडणार..... सो बी रेडी....
विदुला - वाव किती भारी यार....एवढ्या सगळ्या गुड न्यूज एकत्र...आजचा दिवस खरच गुड न्यूज डे आहे...
राहुल - हो ना...
सावी - खरय... 😂
तेवढ्यात सावी - अर्जुन दोघांचे फोन वाजतात..📲
सावी - बोल पिंकी...? 📲
साची - तायडे ऐक ना.... अअअ ते गनपत भाऊजी आहेत ना त्यांनी मुवि प्लॅन केले तर तू ये लवकर....मी पण आले इकडे.... 📲
सावी - अग असं अचानक? माझं काम आहे संध्याकाळी.....आठ वाजता जायचंय..... जमणार नाही...... 📲
साची - त्या आधी मोकळी होशील......📲
सावी - अग पण मला न विचारता परस्पर कस ठरवलं तुम्ही........ 📲
साची - Xperiya Mall, Dombivali come in 20 min.....आणि हो येताना अर्जुन सरांसोबत ये.....ओके तायडे.....बाय 📲 कॉल ठेवताना...
सावी - अअअ पिंकी.. हॅलो....
सावी / अर्जुन - काय विचित्रपणा आहे लगेचच फोन ठेवला....... (एका सुरात)
*********************
ठरल्याप्रमाणे सावी अर्जुन मॉल ला आले.....ते दोघ आल्यावर शांती गनपत जरा सावरले.....पण साची अपूर्वचा प्लॅन काही वेगळाच होता....
सावी - आ हाय....!
गनपत - हाय..उशीर झाला तुम्हाला..
सावी - हो ते अचानक असं तुम्ही....
साची - अअअअ ताई.... आलीस का..? चला चला मुव्ही ला जाऊ.... स्टार्ट होईल आता मुवि....
सावी - हो..
अर्जुन - पण मला एक समजतं नाही...योगायोग एवढा असावा का.... की म्हणजे आपण सगळेच एकत्र एका मुवि ला???
सावी - आणि आम्हाला काहीच खबर न....
अपूर्व - अअअअ स सावी ताई..अर्जुन दादा चला ना आता....म्हणजे प्लॅन केलायचं तर.....
अर्जुन - संध्याकाळी आम्हाला लवकर जायचंय..
अपूर्व - अरे दादा... एका तासातच काम होईल.. 😂
साची / अपूर्व - तीर लागला की झालं..... 😂
सावी - तीर?
अर्जुन - काय?
शांती - म्हणजे....
साची - अग म्हणजे ते...
अपूर्व - अरे चला चला..... मुवि स्टार्ट झाली.....
गनपत - हो हो चला...
सावी - ह्म्म्म 🤨
सगळे मुवि बघायला आत जातात....अपूर्व आणि साची मुद्दामच सावी अर्जुन ला मधे बसवतात आणि त्यांच्या शेजारी शांती गनपत ला.....आणि ते दोघे हीं त्यांच्या बाजूला बसतात....
मुव्ही स्टार्ट होतो.....अर्जुन आज पहिल्यांदा सावी सोबत बसून मुव्ही बघत होता......त्याच्यासाठी हीं फिलिंग वेगळीच होती.....तो खुश होताच...शांती आणि गनपत च्या मनात मात्र वादळ चालू होतं..
मुव्ही संपताच सावी - अर्जुन ताबडतोब संध्याकाळच्या इव्हेंट साठी जायला निघतात..
सावी - अअअ मी निघते मग.. तुम्ही पण सांभाळून जावा घरी....
गनपत - हो.. तुम्ही पण सावकाश जावा...
बाकी काम नीट चाललं आहे ना..
सावी - हो.. ते मी.....
अपूर्व - बघा बघा, कसे गप्पा मारतात...छान दिसतो जोडा नाही का....?
साची - अगदी तोंडात मारण्यासारखा....... 😂
अअअअ म्हणजे लोकांच्या...... 😅
अपूर्व - हम्म... असो असो... तस माझे दादा आणि शांती वहिनी पण कमी नाहीत हा... शांती वहिनी आणि अर्जुन दादा म्हणजे..... नदी - पाणी, ते दोघ म्हणजे झाड - फांदी, अंबा - बाटा, ते दोघ म्हणजे अअअअ अअअअअ अअअअअअअ
साची - अपूर्व राव..... असुद्या... 🙂खूप छान उदाहरण दिलीत असुदे....
शांती - हो हो आम्ही पण कमी नाहीच.. 😤
शांती खूप जेलीस फील करते......मग ती पण जाऊन अर्जुन सोबत गप्पा मारते.... हे बघून गनपत ला जेलीस फील होतं....
***********************
संध्याकाळी पार्टी साठी सगळे जमा होतात....विजया सहकारी बँकेचे ओनर सुद्धा आले होते.....अर्जुन वाट पाहत होता ती म्हणजे सावीची...तो तिला शोधत बाहेर एंट्री गेट जवळ आला...
समोरून स्कुटी वरुन सावी आली...स्कुटी पार्क करून....सावी अर्जुन कडे चालत येत होती...
अर्जुन तिच्याकडे पाहतच बसला.....
व्हाईट शॉर्ट वन पीस, केस मोकळी सोडलेली..हलकासा मेकअप...!!
अर्जुनच तिच्यावरून लक्षच हटत नव्हतं....
सावी - हाय सर!! चला.. जाऊया आत....
अर्जुन - ह्म्म्म 😍😍
सावी - सर, सरsss चला...
अर्जुन - अअअअ हं हो हो..चला जाऊया आत...
सावी - उशीर झाला का मला सर?
अर्जुन - नाही हो, इतका तर नाही...
चला मी तुमची सगळ्यांशी ओळख करून देतो..
सावी - हो..
अर्जुन सावीची ओळख सर्वांशी करून देतो......सगळेच मोठमोठे माणसं सावीच कौतुक ऐकून होते....या वर्षीचं एम्प्लॉयी ऑफ दि इयर हा अवॉर्ड सुद्धा सावीलाचं मिळाला....सावी खूप खुश होती.... सर्वानी तीच अभिनंदन केलं...भरभरून कौतुक केलं...
.
.
.
पार्टी संपवून सावी - अर्जुन एकत्रच घरी जायला निघाले...
.
.
.
रात्रीची वेळ, शांत असा रस्ता, गार येणारा वारा...
आणि सावी - अर्जुन यांच्या गप्पा चालूच होत्या..
अर्जुन - काय मग सावी... खुश आहात ना आता..एम्प्लॉयी ऑफ दि इयर हा....
सावी - हो सर....कोण खुश नसणार याने..थँक्यू तुम्हाला....
अर्जुन - मला का?
सावी - अहो म्हणजे तुम्ही आमच्या ब्रँच मध्ये आलात काय, आपली ओळख काय झाली आणि तुम्ही मला कामात अजून एक्सपर्ट केलेत..... बस त्याचा हे फळ...
अर्जुन - सावी हे तुमच्या कष्टाचं फळ आहे... सो क्रेडिट तुम्हाला जात..
सावी - बरं बाबा... 😂
अर्जुन - ओके आई 😂
सावी - काय सर तुम्ही 😂
अर्जुन - बरं सहज वाटलं म्हणूंन एक प्रश्न विचारू का तुम्हाला..?
सावी - हो.. बोला ना
अर्जुन - तुम्ही लग्न करताय पण खुश तर आहात ना?
सावी - अअअ हं हं हो.. आहेच त्याशिवाय का हो बोलले....बाबा पण खुश आहेत हे महत्वाचं..लग्न काय..मला करणं मनात नव्हतं म्हणजे फारस कही ठरवलं नव्हतं...
अर्जुन - अच्छा तर वडिलांसाठी हा घाट घातलाय तर तुम्ही.....
सावी - अअअअ पण असं का सर? म्हणजे का विचारलेत?
अर्जुन - असच विचारलं.... राहून राहून वाटतं होतं की नाही आहात तुम्ही खुश... माफ करा हा जरा खासगी बोललो...
सावी - असुद्या सर... एवढं काय त्यात...आणि अअअ त तुम्ही खुश आहात?
अर्जुन - अअअ तस खरं सांगायचं झालं तर... नाही....मी खुश नाही आहे सावी.... याच कारण अजून मला कळलं नाही.... विचार करतोय पण समजतच नाही....कदाचित हृदयाला कळली आहे हीं गोष्ट, पण मेंदू पर्यन्त अजून आली नाही........ आणि खरतर मला वाटतं मी तुमच्या....... 👀👁️ (चालता चालता मधेच सावीच्या नजरेला नजर देत थांबला)
अर्जुन बोलता बोलताच थांबला......अचानक सावी - अर्जुन ची नजरानजर झाली....नकळतच झालेली नजरानजर पण आज नव्याने भेटल्यासारखं दोघेही एकमेकांना पाहत होते...... 👀
अर्जुनची नजर तर बरच काही व्यक्त करत होती...🥀
तेवढ्यात कुठेतरी शेजारीच ऑटो मध्ये रेडिओ वर गाणं वाजत होतं.....त्या शांततेत दोघांना कुणीही अडवणार नव्हतं....नजरेला नजर देताना अर्जुन कधी सावीच्या जवळ आला, आणि तिचा हात पकडला यालाच नाही समजलं...
सावी सुद्धा त्याच्याकडे बघण्यात गुंग होती....
जणू, काय आज पहिल्यांदाच अर्जुनला भेटली.....
📻🎶🎼🎵
सुर्ख वाला, सौज वाला, फैज वाला लव.....
होता है जो, लव से ज्यादा, वैसे वाला लव...
इश्क वाला लव.... ❤️
हुआ जो दर्द भी तो हमको आज कुछ ज्यादा हुआ..
इश्क वाला लव.....
ये क्या हुआ है क्या खबर येही पता है ज्यादा हुआ...
इश्क वाला लव... ❤️
अगर ये उसको भी हुआ है फिर भी मुझको ज्यादा हुआ....
इश्क वाला लव..... ❤️
मेरी नींद जैसे पहली बार टूटी है.....
आँखें मलके देखी है मैंने सुबह..
हुई धुप ज्यादा लेके तेरी रोशनी दिन चढ़ा.....
इश्क वाला लव.... ❤️
तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती रस्त्यावरून जात असतो...... या दोघांना मधेच उभा असलेलं पाहून..... त्यालाही विचित्र वाटतं......
अनोळखी व्यक्ती - एक्सक्युज मी????
सावी / अर्जुन - अअअअ हं हं सं सॉरी....
(दोघ बाजूला होतात..... तो व्यक्ती निघून जातो )
अर्जुन - अअअ स सॉरी....
सावी - सॉरी टू सर...
या प्रकरा नंतर बराच वेळ दोघ शांतच बसतात....अर्जुन सावीला घरी ड्रॉप करतो....कार मध्ये बसून, दोघेही एकमेकांशी बोलत नसतात, शांतता खूप होती.....सावीला राहावेनाच....
सावी - अअअअ if u don't mind, सर मी रेडिओ प्ले करू का?? या वेळी छान जुनी गाणी लागतात..
(शांतता भंग kkrt म्हणाली )
अर्जुन- हो लावा ना... हरकत नाही, मलाही आवडतात जुनी गाणी....
दोघ हीं गाणी लावतात खरी पण येणार प्रत्येक गाणं दोघांच्या मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या होत्या...... ते ऐकून दोघ अजूनच हरवून जातात....
📻🎵🎶🎼
जैसे परबत पे घटा झुकती हैं,
जैसे सागर से लेहेर उठती हैं,
ऐसे किसी चेहरे पे निगाह रुकती हैं
रोक नहीं सकती नजरो को दुनिया भर की रसमे..
ना कुछ तेरे बस में, ना कुछ मेरे बस में....
दिल क्या करे जब......... ❤️
********
चाहे कुछ ना केहना
भले चूप टू रेहना
मुझे हैं पता तेरे प्यार का
खामोश चेहरा आँखो पे पेहरा
खुद हैं गवाह तेरे प्यार का
'तेरी झूकी नजर, 'तेरी हर अदा मुझे केह रही हैं ये दास्तान.... कोई शक्स हैं जो तेरे......
******
सावी सारखं सारखं गाणं चेंज करत होती.... हे बघून अर्जुनला खूप हसायला आलं....अर्जुन सविला घरी सोडून.....त्याच्या घरी निघून गेला...
आज सावी आणि अर्जुनच मन भलतंच खुश होतं.....कारण नव्हतं माहिती तरीही....आज दोघांना हीं प्रत्येक प्ले होणार गाणं फील होतं होता....अर्जुन ने तर ब्लु थुथ कानात लावल....आणि सॉंग्स ऐकत घरी गेला..... समोर फक्त सावीचा चेहरा होता..
छुआ तुने बेह गया मैं हिरीये......
जो अब तक किसी ने कभी ना किया.....
इश्क ऐसा इश्क ऐसा चाहिये.....
ऐसी दिवानगी से मैं चाहू तुझे,
जैसे पेहली दफा कोई पागल हुआ...
हुआ मैं.... हुआ मैं.... हुआ मैं रांझना...
अर्जुन घरी पोहोचला......त्याच्या कानात कॉड्स होते....हॉल मध्ये सगळेच बसले होते....आई आणि आज्जी त्याला आवाज देत होत्या..... पण तो मात्र हसत हसत चालला होता....
देखा नहीं तूने अभी, जादू हुआ क्या....
दोनों जहाँ, जहाँ, जहाँ गए ठहर
तेरे बदन की रोशनी मेरे बदन में
अभी, अभी, अभी, अभी गई उतर
कोई दूरी नहीं बाक़ी, पिया रे
बे-ख़बर होके बाँहों में सो जा
तू हवा और मैं तेरा बादल हुआ....
हवा में, हवा में मैं उड़ा, दुआ से मैं उठा
जो तेरा हुआ मैं,
अर्जुन आज्जीच्या जवळ आला तिच्या गालावर किस करून गाणं बोलत निघून गेला....
अर्जुन - हवा मैं....हवा मैं....
संगीता - आई बाबा याला काय झालं?? 🤨
भाऊसाहेब - काय माहिती ग संगीता.. असं काय करतोय हा हरवल्या सारखा 🤨
भागीरथी - गालावर किस करून गेला हा... 🤨तस हे काय नवीन नाही म्हणा... पण 🤨गाणं म्हणत होता नाचत होता.....
संगीता - हवा मैं हवा मैं असं काय तरी...
********************
शांती - हाय मी शांती........💬
गणपत - हाय, हा तुझा नंबर आहे का? 💬
शांती - हो 💬
गणपत - मी तुझाच विचार करत होतो आता..नंबर कसा मिळवू ह्याच विचारात होतो....तुझाकडे नंबर कसा आला....💬
शांती - मी तुझा नंबर सोशल मीडिया वरुन शोधून काढला..... कसा आहेस गनू... 🥺💬
गणपत - काय विचारूच नकोस..मनाची अवस्था नको अशी झाले...तुझाच विचार मनात आहे, त्यात भीती अशी वाटते की.. साखरपुडा जवळ येईल आता.... 💬
शांती - गनू... 😭मला हे लग्न आता नाही करायचंय 💬
गणपत - शांती मला पण नाही करायचंय आता माझ्याशी लग्न करशील का टू? 💬
शांती - हो माझं हीं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे रे मूर्ख, पण आपण कधी बोललोच नाही..... 💬
गणपत - आता नाही राहू शकत तुझ्याविना..काहीही झालं तरी.... 📲
शांती - हो मी सुद्धा 📲
गणपत - पण आता कस करायच म्हणजे, घरचे आता विरोधात जातील...आणि लग्न नाही मोडणार माझे बाबा... आता आपल्याला यात मदत कोण करेल.....? 💬
शांती - मला माहित आहे...... 💬
**********====************
अपूर्व - तू बघच पिंकी माझ्या प्लॅन नुसार त्यांचा आजच फोन येईल.....📲
साची - हो आलाच पाहिजे, आपण त्यांच्या मनात भरवलच तस आहे....... 📲
अपूर्व - हो मी, ए पिंकी मला त्या क्रांतीचा फोन येतोय,...थांब थांब... 📲
शांती - हॅलो, अपूर्व भाऊ...मी आणि गणपत कॉंफ्रन्स ला आहोत, आम्हाला जरा बोलायचं होता....साची ला सुद्धा घेता का कॉन्फरन्स ला? 📲
अपूर्व - हो वहिनी लगेचच... थांबा हा 📲
साची - हॅलो...... 📲
अपूर्व - बोला आता सगळे कॉन्फरन्स ला आहेत....📲
साची - काय झालं...गणपत जीजू शांती ताई तुम्ही असं अचानक फोन केलात..... 📲
गणपत - खरतर आम्हाला तुमची ते म्हणणं पटल आहे, मनात नसताना एखादी गोष्ट केली तर एकसाथ दोघांची आयुष्य बरबाद होतात....पण इकडे तर चार आयुष्य बरबाद होतील.....📲
साची / अपूर्व - म्हणजे.....???📲
शांती - आम्हाला तुमची मदत हवी आहे.... 📲
साची - कसली मदत ताई..... 📲
गणपत - सांगतोच..... 📲
.
.
.
.
.
सावी - काय हो बाबा, पिंकी आज का नाही आली..?
सतीश - अग तिची कोण मैत्रीण आहे, तिच्या घरी आज राहते म्हणाली....तिच्यासोबतीला कोणी नाही म्हणे...
सावी - ह्म्म्म बाबा फार लाडवू नका.. बाहेर पाठवू नका पिंकी ला...
सतीश - ह्म्म्म,पण मला माझ्या मुलींवर विश्वास आहे..माझा भरोसा नाही तोडणार अंदाज आहे मला...
सावी - चला बाबा मी झोपायला जाते..गुड नाईट!"
सतीश - बरं बाळा... गुड नाईट...
आज पून्हा मध्यरात्री सावी घाबरूनच उठली...मध्यरात्रीचे दोन वाजले होते....तिला खूपच घाम फुटला होता...सावी उठून पाणी प्यायली...बाल्कनी मध्ये येऊन थोडस शांत बसली..
सावी - आज पुन्हा तेच स्वप्न, तेच भास....
का विसरत नाही आहे मी ते सगळं.? अशक्य आहे विसरणं पण....रोज असे स्वप्न, हृदयचं बंद होतो माझं तर.....पिंकी म्हणते तेच खरं असेल कदाचित माझ्या आयुष्यात कुणी चांगली व्यक्ती आली तर मी सगळं विसरेन....पण असा समजून घेणारा मला मिळेल का?? म्हणजे ते गणपत तसे असतील का??
क्रमश :)
~Pratiksha Wagoskar