भाग – २०
मग साहेब उत्तरले, “ हे बघ सावली आमचे कामच असते संशय करणे, त्या संशयाचा जोरावर आम्ही आमचा ध्येयाचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही तक्रार करणारा आणि अपराधी या दोघांवरही आधी संशय करतो आणि आपल्या तपास सुरु करतो. त्यानंतर जसजसा तपास पुढे पुढे वाढतो आणि आम्हाला पुरावे मिळत जातात. त्यानुसार आम्ही संबंधित व्यक्तीची उलट तपासणी करतो, तो मग तक्रार करणारा असोत कि मग अपराधी. त्याच अनुषंगाने माझा तपास सुरु होता. तुझावर संशय आम्हाला तेव्हा आला जेव्हा त्या घटना स्थळापासून निघालेला श्वान पथक इस्पितळाचा पायरीपर्यंत येऊन परत फिरला. परंतु नंतर तो इस्पितळाचा मागील बाजूस जाऊन तिथल्या तिथे थांबला. त्यावेळेस आम्ही हे गृहीत धरले होते कि अपराधी नक्की इस्पितळातील व्यक्ती आहे किंवा कोणी बाहेरील व्यक्ती आहे. त्याचा तपास लावण्यासाठी मग मी इस्पितळात तुला भेटण्यासाठी आलेलो होता. तेथे येऊन तुला मी बेडवर झोपलेलं बघितल आणि मग डॉक्टरांना परस्पर भेटून विचारले असता डॉक्टरांनी मला सांगितले होते कि त्यांनी काही वेळेपूर्वी तुला झोपेचे इंजेक्शन दिले होते, त्यामुळे तू झोपलेली आहे. त्यानंतर तू आमचा संशयाचा बाहेर झाली आणि आम्ही त्या तीसऱ्या व्यक्तीचा शोधात लागलो आणि आजवर लागलेलो आहोत. तो आम्हाला आजपर्यंत भेटलाच नाही. परंतु तुला याप्रकरणातून निरपराधी समजून आम्ही न्यायालयाकडून तुला सोडण्याचे आदेश पारित करून घेतले.”
मग सावली उत्तरली, “ साहेब निलेशचा मृत्यू खरच झालेला आहे काय किंवा होता.” तेव्हा साहेब उत्तरले, “ हो नक्कीच अग कसलाही अपराध झालेलाच नसेल तर आम्ही कशाला विनाकारण आपला घाम गाळणार.” मग साहेबांनी त्यांचा कॉम्पुटर वर निलेशचा मृत शरीराचे फोटो दाखवले जे घटना स्थळी त्यांना प्राप्त झाले होते. त्यात निलेशचा गळ्यावर कापल्याचे एकदम सूक्ष्म असे चिन्ह होते जे रक्ताचा धारेने लपलेले होते. मग सावलीने प्रश्न केला, “ साहेब याचा मृत्यू कसल्या हत्याराने झाला होता.” तर साहेब उत्तरले, “ खर सांगू तर आम्हाला ते हत्यार कुठेच भेटले नाही. आम्ही फक्त अंदाज लावून राहिलो आहे कि ते कसले आणि काय असेल. परंतु अजूनही काही निश्चित सांगू शकलेलो नाही आहे. साहेबांना मी त्याच प्रकरणाचा तपासाची रिपोर्ट फोनवर देत होतो.” मग सावली बोलली, “ मी तर अशीच सहज तुम्हाला भेटण्यासाठी आलेली होती आणि मला माहित पडले कि माझे प्रकरण अजूनही सुरूच आहे आणि मी अजूनही अपराधीच आहे.” आणि ती हसू लागली. तेव्हा साहेब म्हणाले, “ नाही तू अपराधी नाही आहेस आम्ही तुला तेव्हा आमचा लिस्ट मधून काढून टाकले आहे. फक्त आणि फक्त आमचा तपास हा सुरूच आहे आणि तो अपराधी पकडला जात नाही आणि त्याला शिक्षा जेव्हापर्यंत होत नाही तो पर्यंत सुरूच राहणार आहे.”
मग सावलीने साहेबांचा निरोप घेतला आणि तेथून ती निघाली. सावली गाडीने घराकडे जात असतांना तिने सहज गाडीचा आरशात बघितले तर तिला तिचा पाठलाग करतांना कुणीतरी दिसला. सावलीने तिची गाडी थांबवली आणि मागे वळून बघू लागली. तर ती गाडी सुद्धा तिचा गाडीचा भरपूर अशा अंतरावर जाऊन थांबली. मग अचानक सावलीचा फोन वाजला. सावलीने फोन बघितला तर तो फोटोचा मागचा नंबर होता. मग सावलीने फोन उचलला आणि बोलायला गेली तर समोरून आवाज आला,“ हेलो, मिस्स सावली काय पोलिसांना सांगायला गेली होतीस काय. ठीक आहे माझे काम आणखी सोप करून टाक तू. मला काही बोलायची आवश्यकता पडणार नाही जे काही सांगायचे आहे ते हे फोटोच सांगतील.” मग सावली बोलली, “ हो मी पोलीस स्टेशनला गेलेली होती, ते त्यांना सांगायला नाही तर माझ्या या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. म्हणून मला पोलिसांनी उलट तपासणी करीता बोलावले होते म्हणून. तुला काय वाटले मी तुझ्याबद्दल तक्रार करण्यासाठी गेलेली होते. याआधी मी असा मुर्खपणा केला होता आणि माझे फारच मोठे नुकसान करून बसले होते. तर तोच मुर्खपणा मी पुन्हा करणार नाही.”
मग तो पुढील व्यक्ती बोलला, “ फारच हुशार झालीस तू तर. आता अक्कल आलेली आहे वाटते तुला. तर अशीच हुशार बनून रहाशील तर तुझ्यासाठी बरे होईल अन्यथा तुझ्या अति हुशारीचे फळ हे तुलाच भोगावे लागतील.” तेव्हा सावली त्याला म्हणाली, “ तू हे सगळ कशासाठी करतो आहे. तुझ्या यामागील हेतू तरी काय आहे.” मग तो व्यक्ती बोलला, “ एवढी घाई काय आहे ग तुला जरा धीर धर. तुला तर माहित आहे ना गरम गरम जेवण जेवल्याने तोंड भाजते तर जेवण थोडं थंड होऊ दे मग जेव ना.” असे म्हणून त्याने फोन कापला. सावलीने बघितले तर तो व्यक्ती त्याची गाडी वळवून विरुद्ध दिशेने निघून गेला. सावलीने आता अंदाज लावला कि हा व्यक्ती निलेश नाही आहे आणि तो काहीतरी मोठ कर्मकांड करण्याचा संधीचा प्रतीक्षेत आहे. यासाठी आता मला सगळी वेळ सावध आणि सजग रहावे लागेल, हलगर्जीपणा करून बिलकुल चलणार नाही. मला आता स्वतः याचा प्रत्येक हालचालीवर अचूक अशी नजर ठेवावी लागेल. यासाठी कुणाची मदत घेता येईल काय, असे ती विचार करू लागली होती. तितक्यात तिचा आईचा फोन आला आणि तिला तातडीने घरी येण्यास सागितले.
शेष पुढील भागात..........