एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम Sanket Gawande द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम

 

         ऑफिसनंतर आम्ही चार मित्र चहा पित बसलो होतो मी(संकेत) आणि बाकी तिघे तनय, यश आणि वेदांत. दिवसभराच्या कामाच्या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी कुठे तरी एक छोटा ट्रेक आणि कॅम्प करायचा असा विचार आला. चहाच्या वाफा हवेत मिसळत होत्या, आणि त्या क्षणी आमच्या मनात हा नवा विचार आला. "या आठवड्यात आपण बाहेर ट्रेक ला जायचं का?" मी विचारलं.

 

"विसापूर कसा वाटतो?" तनयनि सुचवलं.

 

सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह उमटला, फिरायला तर तस सगळ्यांना आवडायचं. ठरलं, मग काय! विसापूर किल्ल्यावर जायचं. लगेचच आम्ही प्रवासाची योजना आखली शुक्रवारी सकाळी निघायचं आप आपल्या बाईक घेऊन. कसे जायचे, काय न्यावे लागेल, आणि कोणते मार्ग निवडायचे, या सर्व गोष्टींची चर्चा झाली.

योजनेंत आम्ही काही महत्वाच्या गोष्टी ठरविल्या.

 

आम्ही पुण्याहून सकाळी लवकर निघायचं ठरवलं, कारण ट्रेकिंगसाठी पुरेसा वेळ मिळावा. प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली, आम्ही लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली - पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ, रेनकोट, टेंट, उबदार कपडे, लायटर आणि तसाच काही.

दुसऱ्या दिवशीच आप आपल्या ऑफिस ला जाताच आम्ही सुटीचा अर्ज टाकला काम संपवलं आणि सायंकाळी रूम ला निघून आलोत.

त्या रात्री आम्ही सगळे लवकर झोपी गेलो, कि सकाळी लवकर उठायचं आहे या मुडे, रात्री पाहुस तितका नव्हता, वाटल उद्याचा दिवस बरा जाणार मस्त मजा येणार याच विचारात आम्ही झोपी गेलोत.

 

................................

 

        शुक्रवारचा दिवस उजाडला सगळे आम्ही चार लाच उठलो तयारी करायला तर बगतो तर बाहेर पाऊस पडतच होता, आम्ही पट पट तयारी करून चहा घेतला आणि पहाटे ५ वाजता आम्ही पुण्याहून निघालो. आदी वाटल नाही कि इतका पाऊस असेल पण तो मात्र खूपच जोरात होता, आणि रस्त्यावरच्या त्या पावसाच्या आवाजात आम्हाला गाडी चालवायला अजूनच मजा येत होती . रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या हिरवळीने मन मोहून टाकले. पुण्याहून लोनावळ्याच्या दिशेने जाताना रस्त्यातले दृश्य खूपच सुंदर होते दोनी बाजूनी शेती, मदातच पहाडा मधून वाहणारे धबधबे, शेतीचा बाजूनी वाहणारी नहर त्या वर असणारे ते पूल, डोंगर रांगा ते सगळे कशे मन मोहून घेत होते. पहाटेच्या त्या वातावरणात पावसाच्या थेंबांन सगळ वातावरण थंड गार केल होत पानांची शोभा काही औरच होती.

 

साधारण ७ वाजता आम्ही एका गावी थांबलो. पावसात भिजलेले आम्ही गरमागरम चहा घेत होतो. तिथेच एक फलक दिसला, "राजमाची किल्ला". अचानकच माझ्या मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात राजमाची हा नाव आठवला, आपण हे नाव भटकंतीच्या पुस्तकात वाचले होते त्यातील सांगितलेले राजमाचीचे सौंदर्य आठवले आणि त्या सोबतच जुन्या गोष्टी सुद्धा आणि एक मंद हसू गालावर आला.

 

खर सांगायला गेल तर त्याच पुस्तकांनी मला फिरण्याची आवड तयार केली. जगण्याची, आनंद मिळवण्याची प्रेरणा दिली, कुठे काही सुमारे चार वर्षा आदी एका जागी जुन्या गोष्टीन मध्ये अडकलो होतो, स्वतःचा परीस्तीतीत गुंतलो होतो त्यातूनच बाहेर निघायला मदत केली, आज कुठल्या बंधनात नाही आणि परीस्तीती पण ठीक झाली तर आता कुठे  मन मोकळे पनांनी जगन जणू त्या पुस्तकातून शिकलो, स्वतः मधील एक फार मोठ जग ओडखल छोटा छोटा गोष्टीन मध्ये खुश राहाण स्वभोवताली असणारा सुंदर तो निसर्घ आणि त्यात मिळनारा आनंद घेण.

 

मग विचार आला आपण "राजमाची किल्ल्यावर का जाऊ नये?" मी तस सगळ्यांना विचारलं.

 

माझ्या मित्रांनी आश्चर्याने पाहिलं, "विसापूर सोडून तिथे का जायचं तुला” यश म्हणाला

 

वेदांत मन्हाला “अस काय आहे तिते आणि हे आहे तरी कुठे ही राजमाची?”

 

मी त्यांना मन्हालो “मला माहिती नाही, मी या आदी इथे कधीच गेलो नाही , इथे दिल्या प्रमाणे साधारण २७ कि.मी. अंतरावर आहे लोणावळा पार करावा लागेल आपल्याला.” पण हा मी त्या जागे बद्दल एका पुस्तकात वाचलेल आहे, जर त्यात दिल्या सारखी जर ती जागा असेल तर खर सांगू ती खूप सुंदर असेल. आपण जाऊयात कि तिथे तस पण उद्या आणि परवा सुठी आहे तर करूयात तिते मुक्काम.

 

आम्ही अजून त्या जागे बधल थोडी फार माहिती मिळवण्या साठी बाहेर पडलोत.

आम्हीं  तिथे एका काकांना विचारला त्या बधल ते मन्हालेत खूप आदी गेलो होते तीथे, तिकडे बघण्या सारखा  खूप काही आहे पण या पाऊस मध्ये तिथे जान काही बर नाही रोड नाहीत ना तिथे आणि १४- १५ कि.मी चा आत कुठला गाव नाही नुसता जंगल आहे आणि लाईट सुद्धा नाही त्या गावात .तुम्हाला सांगतो तिते चालतच जाव लागेल नुसता चिकल आणि पाणी अस करत ते आम्हाला त्या बधल सांगत होते, मग आम्ही पुरे पूर माहिती घेतली आणि निघालोत तिकडे जायला पाऊस आता मात्र कमी झाला होता.

 

................................................... 

 

               लोणावळा पोचत पर्यंत ८ वाजलेत परत आम्हाला पाऊस लागला तरी आम्ही याला त्याला विचारत राजमाची चा रस्त्याला लागलो , इकडे थंडी फार जाणवत होती , जसे जसे पुढे जात होतो रस्ता तस तसा संपत गेला गाव सुद्धा मागे सुटल. आता तर नुस्ता खडक आणि चीकलानि माखलेल रोडच लागल, आज शुक्रवार असल्या मुळे आणि पाऊस फार असल्या मुळे इथे तितके लोक दिसत नव्हते राजमाची कडे जाताना मधातच मस्त छोटासा धबधबा बगायला मिळाला, आम्ही पुडे निघालो कि लवकर गडाच्गा पायथ्याची पोचुबा म्हणून, आम्ही जस जसे पुढे जात होतो तस तसा पाऊस वेग पकडत होता. आता तर संपुर्ण रस्त्यावर आम्हाला कुणीच दिसत नव्हत, पाण्याला वेग इतका होता कि समोरचा काही दिसत नव्हता आणि त्या वर गाड्या बाईक चालवन अजूनच कठीण, आम्ही चौघे पण एका जागेवर येऊन थांबलो, इथे सपाट जागा होती आमचा गाड्यांची हालत फारच खराब झाली कितेगदा तर आम्ही पडता पडता वाचलो कसे तरी इथ पर्यंत पोचलो पण आता मात्र समोर गाडी घेऊन जाण्यची हिम्मत राहिली नाही, तितेच आम्हाला काही दुरिवर एक ग्रूप दिसला ते सुद्धा तिते थांबले होते. आम्ही त्यांचा जवड गेलो.

 

“हाय मी संकेत” मन्हालो त्यांचा तील एक मुलगा पुढे आला

“हाय मी अजय” अस त्याने त्याच नाव सांगितल .

 

कुठून आलेत विचारलं तर तो मन्हाला पुणेहून आलोत इकडे राजमाचीला चालोत . पण गाड्या तिकडे नेण्याची हिम्मत राहिली नाहीत म्हणून इथे थांबलो.

 

मी म्हनालो “ आम्ही सुद्धा आमचा बाईक इथेच लाऊन पुढे चालत जाणार आहोत सुमारे ८-१० कि.मी असेल राजमाची अजून.तुम्ही चलत असणार तर चला सोबत.”

तो ग्रुप तयार झाला सोबत यायला, सुमारे ६ लोकांचा तो ग्रुप होता दोन मुल चार मुली.

आम्ही सुद्धा आमचा गाड्या तिते लाऊन सोबतच पुढे निघालोत.

 

पाऊस फार जोरात होता आणि पाणी रस्त्यांनी वाहत होत , जागो जागी सगळे झन घसरत पडत हसत समोर चालत होते, आजू बाजूचा परीसर "राजमाचीचं सौंदर्य, धबधबे, जंगल, हे सर्व अनुभवत होते, एक मेकांचा हात पकडून बोलत आम्ही सगळे झन पुढे जात होतो.

 

अजय सोबत बोलताना कडल, तो सुद्धा पुणे मध्ये जोब करत होता एका आई.टी कंपनी मध्ये आणि हे त्या सोबत असले ले सगळे सुद्धा त्यांचाच ऑफिसचे.

 

आम्ही चालत चालत एका खुल्या जागेवर येऊन पोचलो तिते एक गेट आणि एक छोटीसी झोपडी दिसली त्यात आत मध्ये  बसायला लाकडाचा टेबल केलेलं होत आणि समोर समान ठेवायला एक ओठा सुटीचा दिवशी कदाचित सुरु राहत असेल हे दुकान . आम्ही सगळे आत मध्ये गेलो पाऊस अजून पण जोरातच पडत होता घडी बगितली तर ११ वाजून गेलेत होते आता भूक पण लागायला लागली आम्ही आणलेले खायचा गोष्टी काढल्या आणि सगळे तिते नास्ता करायला सोबत बसलो आणि एक मेकान सोबत ओळखी करू लागलोत, पाऊसा मुळे ते राहून गेल होत. सगळ्यांनी एक मेकांचा नाव माहिती केल कुठे काम करतात वगरे वगेरे, आम्ही नास्ता मध्ये बस चिवडा आणि काही खायचे चिप्स आणि बिस्कीट आणलेत होते पण समोर त्या मुलीनी मस्त पैकी पोहे , पराठे आणले होते आम्ही सगळ्यांनी ते खालेत. आणि सगळे थोडा वेड गप्पा मारत बसलेत.

 

मी तीतून उठून बाहेर दरवाजा कडे आलो पाऊसाचा अन्दाचा घ्याला , जर कमि झाला असेल तर निघुया मनुन.

 

मी बाहेर बघत होतो आणि मागून कुणी तरी आवाज दिल  “ हाय, काय बघतो आहे ”

 

मी बघितल तर ती अन्वी होती त्या ग्रुप मध्ये असणारी .

 

पाउस बघतो आहे “ जर कमी असेल तर निघायला बर होईल म्हणून.

 

ती मन्हाली “ तू फार फिरत असतो का?”

 

मी तिचा कडे बघतच बसलो का तिने अस विचारल असेल म्हणून?

 

ती म्हणाली नाही म्हणजे तू मगाशी किती चांग्ल्यानी सगळ्यांना सोबत घेऊन आला कुणी पडला तर हात पकडून एक एकाला इथ पर्यंत घेऊन आला आणि आता पण पुढे कस जायचा ते बघतो आहे म्हणून विचारल.

 

मी म्हटलं हा तस भटकत असतो मी सुट्या मिळाल्यात की, पण इकडे पहिल्यांदाच आलो. खर तर आम्ही जाणार दुसरी कडेच होतो पण मग हे राजमाचीच नाव दिसल तर आठवल एका पुस्तकात वाचल होत या बधल तर इकडे चालले आलोत. आणि बगना ही जागा आहे पण किती सुंदर.

 

ती म्हणाली “ ती म्हणाली हो हे तर आहे , आणि बग तु पूस्तकात वाचल म्हणून इकडे आला, आम्ही सुद्धा इकडे पहिल्यांदाच आलोत आमचे सर आले होते इकडे मागील वर्षी ते सांगत होते कि जाऊन या म्हणून एकदा, तर आलोत इतकाच काय मनाला शांती मिळेल म्हणून.”

आपल्या विधर्भात असल फिरायला काही नाही .

मी म्हणालो तू सुद्धा विधर्भातीलच का “ मी नागपूर पलीकडे नागभीड म्हणून गाव आहे तिकडला , तू कुठली”

ती म्हणाली मी तर मुडची नागपूर मधीलच , २ वर्ष झालेत पुणे मध्ये आली.

मग असच बोलता बोलता कडल कि ही तर माजाच कॉलेजला होती बस एक क्लास जुनिअर.

पण तिनी फार काही सांगितल नाही पुढे,मला विचारलं किती वर्षा पासुन इकडे आहे तर मी म्हटलं झाले असेल किमान पाच वर्ष.

मग काय तिचा गप्पा तस्याच सुरु राहिल्यात.........

 

थोडा वेदात पाऊस कमी झाला होत, पण रस्त्या वरून वाहणारा पाणी अजून पण तितकाच’ होता

सगळ्यांना आवाज देऊन आम्ही पुढे चालायला लागलो .

आता रस्ता स्पष्ट दिसत होता, पण पाण्याचा ओहोळ अजूनही जोरात होता, सगळे एक मेकाशी बोलत पुढे पुढे चालत होते. आता काही कि.मी चालून झालच असेल कि अन्वी परत जवळ आली काय मग अजून किती कि. मी चालायचं आहे साहेब आमचे पाय दुखलेत कि म्हणली.

 

मला तर आदी कडल नाही कि ही का मला सतत येऊन विचारात असते मी यायला सांगितला का यांना म्हणून?

मी म्हणालो येईल काही वेडातच, अर्ध्या पेक्षा जास्ती रस्ता तर आपण पार केलाय.

 

सगळे आम्ही चालत होतो आणि अन्वी सतत काही ना काही बोलत होती माघे तिची मैत्रीण सुप्रिया मधातच तिला चिडवत होती चिकल उडवत होती . मधूनच तिचा पाय चिखलात पडला की, "संकेत, हात दे कि रे तिला म्हणत होती!".

यश मला म्हणाला काय सुरु आहे रे तुज खूप जवळीक होत चाल्ली

मी मान्हालो काही नाही रे आणि तो हसून पुडे गेला तनय आणि वेदांत सोबत.

 

इकडे अन्वी आणि सुप्रिया दोघे पण छोटे मोठे धबधबे दिसले की खूश व्हायची आणि फुलपाखरं दिसली की अजूनच खुश व्हायची. आम्ही चालत राहिलो आणि साधारण एक तासात एका मोठ्या धबधब्याजवळ पोचलो.

 

धबधब्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, पावसाचा रिमझिम आणि झाडांची सळसळ या सर्वांनी परिसर अद्भुत बनला होता. सगळेजण फोटो काढत होते. अन्वी मात्र थोडी दूर एकटीच एका खडकावर बसून  होती समोरील दृश बघत होती. पाऊस अजूनही थोडा थोडा पडत होता आणि मी तिचा एक फोटो काढला. त्यात ती कुठल्यातरी आठवणीत गुंतली आहे असं जाणवलं.

 

मी जवळ गेलो आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतंय की काय, असं वाटलं. पण पावसाच्या पाण्यामुळे ते स्पष्ट कळत नव्हतं. मी तिला विचारलं, "आठवणी त्रास देत आहेत का कसल्या?"

 

ती माझ्याकडे पाहून हलकेच हसली. आम्ही दोघे काही वेळ शांत राहिलो. मग ती म्हणाली, " कधीकधी आपण त्या काँक्रिटच्या जगात जगायचं विसरतो. पण जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतं. काही गोष्टी कदी काडी हरवून जातात आणि अचानक अपेक्षा नसतांना ते समोर आल कि आपल्याला कडत नाही आपण हसाव कि रडावं, सगळ्या आठवणी अश्या एक एक करत पुढे येतात आणि मन त्यात इतक गुंतून जाते कि कडतच नाही आपण स्वप्न बगतो आहे कि ही हकीगत आहे.

 

त्या भव्य भडक जगात आपण किती स्वतःला हरवून जातो ना खूप काही मागे सोडून देतो खूप काही विसरून जातो . आठवणीना मागे सोडून इथे आली थोड मोकळ स्वास घ्याला तर त्या आठवणीच इथे इतक्या वर्स्यानी पुढे आल्यात .

 

इथे सगळी कडे मोकळी हवा, पक्षी आणि हा अद्भुत दिसणारा दृश्य आहे आणि या स्वर्गात माजी ती आठवण आहे . इकडे आल्यावर स्वतःला कुठेतरी ओळखायला लागली.  मनाला इतके वर्षा ज्याची हूर हूर होती ते मिडाल या वातावरणात या जागी येऊन .

 

ती शांत झाली, तिच्या डोळ्यांत काहीतरी दडलेलं होतं. मी थोड्या वेळानंतर म्हणालो, " आठवणी आहेत, येणारच. काही चांगल्या असतील तर काही वाईट. त्या सोबत इथे येतील सुद्धा आणि इथल्या शांत वातावरणात कदाचित आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. वेड दे, आठवणी स्वतः तुला खूप काही समजून जातील. ते तुझ्या कामीचं येणार पुढे. सध्या इथे आहोत, याचा अनुभव घे. जुन्या गोष्टी आधीच निघून गेल्यात ना, बस त्यातून आता जे अनुभव काढायचे तेवढे काढ, आणि बाकी सगळं देवावर सोड, तो वेळ आली कि सगळ ठीक करेल. तो जो पण करतो त्या मागे आपलच हित दडलेलं असते.

 

ती शांतच होती. आम्ही दोघेही तिथे थोडा वेड बसून राहून समोरचं दृश्य पाहत होतो.

 

त्या क्षणात मला असं वाटलं की, आम्ही सगळे या निसर्गाच्या सौंदर्यात एकत्र आलो होतो आणि आपल्या अनुभवांमधून काहीतरी नवीन शिकत होतो. पावसाची थेंबं, धबधब्याचा आवाज, आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला आपले स्वताचेच विचार आणि भावना समजून घेता येत होते. गुंतलेल्या गोष्टी हडु हडु सुटत होत्या ,आता मनातील समोरील वाट दिसायला लागल्या होत्या .

 

तेवढ्यात अन्वी हलकेच हसत म्हणाली, "थँक्स संकेत. कधी कधी फक्त कोणीतरी ऐकणारं असणं सोबत असन खूप महत्वाचं असतं."

 

मी फक्त तिच्याकडे पाहून हसलो. आम्ही तिथेच थोडा वेळ बसलो आणि मग पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आम्हाला राजमाची गाव जवळ येत होतं, आणि या प्रवासाने आम्हा सर्वांन मध्ये एक नवी उर्जा भरली होती .

 

............................

 

 

              सुमारे ९-१० किलोमीटर चालल्यानंतर आम्ही किल्ल्याजवळील गावात पोचलो सगळ गाव जुन्या घरांनी भरलेलं होत तस बगितल तर फार मोठा नाही थोडी फार वस्ती असलेला हा गाव. त्यातील एका दुकानात आम्ही सगडे तातपुरता चहा घ्याला गेलो थंडी फार जाणवत होती, सगळ्यांनी चहा आणि गरम गरम कांदा भजी घेतली थोडा वेड थांबून आम्ही सगळे गड चढायला लागलो, गड तसा फार मोठा नाही पण चार ही बाजूनी जंगले आणि डोंगरांनी वेढला असल्या मुडे तशी सुंदरता त्याला प्राप्त झाली होती, वर जात असताना आम्हाला लक्षात आल इथे दोन गड आहेत समोरा समोर आणि यांचे नाव श्रीवर्धन किल्ला आणि मनरंजन किल्ला राजमाची ही बुरुजाच नाव जिथून समोर बघितल तर तो मोठा असा कोंडाणे धबधबा स्पष्टपणे दिसतो. आम्ही पुढे पुढे गड चडत होतो एकदाचे वर चढलो आणि किल्याचा दर्वाजात आम्हाला कमरे इतका पाणी लागल त्यात उतरून आम्ही किल्याचा आत मध्ये गेलो .किल्ल्यावरून दिसणारं निसर्गाचं अप्रतिम दृश्य, धुक्यात हरवलेले पर्वत, आणि पाण्याचे झरे पाहून आम्ही थक्क झालो. किल्ल्यावरून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वतांच्या रांगा आणि तिथली हिरवाई मनाला भारावून टाकणारी होती.

 

किल्ल्याच्या भव्यतेने आणि तिथल्या इतिहासाने आम्हाला थक्क केलं. राजमाची किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आणि तिथलं सांस्कृतिक वैभव पाहून मन भरून आलं. किल्ल्यावरून दिसणाऱ्या परिसराने आम्हाला निसर्गाच्या जवळ नेलं. पावसाने ओलसर झालेल्या किल्ल्याच्या मातीतून चालताना आम्हाला छत्रपतींचा स्वराजात या मराठी मातीत जन्म झाल्याचा गर्व आणि अभिमान जाणवला, त्यांनी जो वारसा आम्हा आणि आपल्या सगळ्या मराठी बांधवाना आणि छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांची शिकवण मान्यार्या सगळ्या जाती, सगळ्या जमातीतील लोकांना दिला तो जपण्याचा.

 

भटकता भटकता आम्ही राजमाची बुरुजावर पोहचलो पाऊस वाढल असल्या मुडे समोर काही दिसत नव्हत आम्ही थोडा वेड तितेच थांबलोत सगडे झन त्या हिरवं अथांग समुद्र पसरलेल्या डोंगररांगा बगत होते, त्या समोरील असलेल्या धबधब्याचा आवाज इथवर येत होता, बाकी सगळे पुढे निघून गेलेत मी आणि अन्वी तिते थोडा वेड वाट बगत बसलो कि जरा पाऊस कमी होईल आणि तो समोरील दृश आपल्याला दिसेल .

 

थोडा वेदांनी पाऊस कमी झाला आणि अति वेगाचा वार्यांनी जमा असलेले ढग सुद्धा निगुन गेले, तात पुरता का असे ना आम्हाला तो समोरील दृश्य दिसून आला, मी अन्वी कडे बगितल तिचा चेहर्या वर एक आलगच आनंद होता. मगाशी पडलेला चेहरा आता मात्र थोडा खुश दिसत होता, मी तिचा तो फोटो काढला. परत समोरील येणाऱ्या ढगांनी त्या अथांग अस्या धबधब्याला स्वतात सामाऊन घेतलं आणि परत ते ढगांची चादर सगडी कडे पसरली .

 

आम्ही सुद्धा आता बाकी जिकडे थांबले होते तीकडे जायला निघालो, ते एकाआदी बांधलेल्या रूम खाली सगडे बसून होते गप्पा गोष्टी करत, पाऊस अजूनही जोरात होता आणि अंधार पडू लागला होता. आम्ही परतीचा विचार केला होता, पण पाऊस आणि खराब हवामानामुळे रात्रीचा प्रवास कठीण होता. आम्ही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.

आता थांबायचं कुठे यावर चर्चा सुरु झाली होती, अन्वी सुप्रिया कडे जाऊन तिचा सोबत परत बड बड करायला लागली, त्यांचा मध्ये काही तरी बोलन होत होता हे कढल सुप्रिया माजा कडे बघत होती .

मी सुद्धा माजा मित्राण यांचा कडे जाऊन बसलो.

 

यश म्हणाला तुज खरच काय सुरु आहे रे कोण आहे ती तू भेटला त्यांना तेव्हा पासून ती तुजा सोबत सोबत फिरते आहे, तीकडने वेदांत बोलला “कूच तो गडबड है भाई म्हणून.”

 

मी म्हटलं तस काही नाही कॉलेज ला सोबत होती ती एक क्लास जुनिअर माजी इतकच आता म्हणून ती सोबत आहे.

 

 वेळ होत होता राहायला जागा सोदायची होती त्या मुडे आम्ही खाली उतरायला लागलो घड्यालीत ६ वाजत होते पण पाऊसाने अजून वेग पकडला होता. सगळ्यांनी रेनकोट घातले असून सुद्धा आत मध्ये सगळे ओले झाले होतेत आणि थंडी ने कुडकुडत होतेत. कसे तरी आम्ही सगळे खाली पोचलो आणि मगाशी थांबलेल्या दुकानात गेलो . आज गावात कसली पण रहदारी नव्हती पाऊस खूप असल्या मुडे कुणीच इकडे भरकटल नाही आम्हीही चहा घेत बसलो, मी काकांना राहण्याचा विचारलं तर त्यांनी सांगितल पुढे एक घर आहे समोर त्यांचा मोठा वरांडा आहे ते राहू देतील तुम्हाला तिथे विचारून बगा काय म्हणतात ते.

 

बाहेर पाऊस जोरात होता. मी सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून पुढे विचारपूस करायला निघालो. थोडं दूर गेलो होतो, तेवढ्यात मागून अन्वी सुद्धा आली.

 

"ओ साहेब, थांबा!" म्हणून तिने आवाज दिला. मी मनात म्हटलं, 'हिला कसली हौस आहे इतक्या पावसात यायची?' अन्वी आली आणि म्हणाली, "चल लवकर, आता राहायला जागा शोदावी लागेल."

 

आम्ही दोघं राहायला जागा मिळेल का ते पाहत होतो. थोडं पुढे गेल्यावर एक घर दिसलं. त्याचा व्हरांडा मोठा होता आणि जागा कोरडी होती. ती थोडी उंचावर होती आणि चारही बाजूंनी तारांचं कुंपण घातलेलं होतं. मी इकडे तिकडे पाहिलं, तर त्या घराचा मालक दिसला. त्याचा घरा कडे जाताच त्याला तिथे राहण्याची परवानगी विचारली आणि त्याने होकार दिला. तसेच रात्रीच्या जेवणाचं सुद्धा बोलून आलो. त्याने त्याच्या कडून तीन तंबू दिले राहण्यासाठी. ते घेऊन आम्ही बाकीच्यांना बोलवायला गेलो. इतक्यात ७ वाजले होते आणि अंधार पडला होता. गावात लाईट नसल्याने गाव अंधारात होतं, फक्त काही सोलार दिवे लागलेले होते तितकेच.

 

आम्ही सगळ्यांना घेऊन त्या जागी पोहोचलो. तिथे असलेल्या झाडूने काही मुलांनी ती जागा साफ केली. दिलेले तंबू आम्ही लावायला लागलो. तिथल्या काकूंनी शेकोटीसाठी आम्हाला काही शेणाच्या गोवऱ्या आणि सुकी लाकडं आणून दिली. मुलांनी त्यांचे ओले कपडे बदलले आणि बाकीच्या मुली काकूंसोबत त्यांच्या घरी गेल्या. सोबत येताना त्यांनी मस्त चहा आणला. सगळ्यांनी तो प्यायला आणि शेकोटीपाशी बसले. आता कुठे सगळ्यांना बरं वाटत होतं. पुन्हा गप्पा गोष्टी रंगत होत्या, सगळे दिवसभराचा थकवा काढत होते.

 

................................................

 

 

           मी आणि माझे मित्र आमच्या जुन्या गोष्टींबद्दल बोलत होतो. इतक्यात यश बोलला, "अन्वी तुझ्याकडे बघते आहे रे." मला ते जाणवलं नाही. मी तिकडे पाहिलं, तर तिने दुसरीकडे पाहिलं.

 का माहित नाही, पण थोड्या वेळाने सुप्रिया माझ्या जवळ येऊन बसली.

 

ती म्हणाली, "तू खरं अन्वीला ओळखलंस नाही का?"

 

मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, "कोणाला?"

 

"अन्वी," ती म्हणाली. मला अजूनही कळलं नाही ती काय बोलते आहे. तिने मग सांगितलं, "तुला तुझ्या कॉलेजचा फायनल इयर आठवतो का? त्यात तुम्हाला भेटलेला शेंडऑफ."

 

मी "हो" इतकंच बोललो.

 

मग ती म्हणाली, "तुला अन्वी खरंच आठवत नाही कारे?"

 

मी तो दिवस आठवायचा प्रयत्न करत होतो. कॉलेजचा अखेरचा दिवस होता आम्ही सगळे धमाल करत होतो, माजा एका मैत्रिणीने माजी ओळक एका आमचा जुनिअर मुलीशी करून दिली होती, अन्वी फाले तीच नाव, खर तर तिला दोन तीन दाच बगितल होत मी, जॉब मुळे कॉलेज फार काही जात नव्हतो मी त्या नंतर आमी इंस्ताग्राम लाच बोलत सुद्धा होतो फार. मग आठवलं. मी अन्वीकडे पाहिलं. ती आज इथे इतक्या वर्षांनी भेटेल असं वाटलं नव्हतं.

 

मी म्हटलं "ही अन्वी फाले आहे का?"

सुप्रिया म्हणाली, "हो, तीच आहे. कॉलेज संपल्या पासून तू सोशल मीडियावर नाही ना कुठेच?"

 

मी म्हटलं, "नाही, मी कॉलेज संपताच माझं इंस्टा, फेसबुक सगळं डिलीट केलं होतं काही वैयक्तिक कारणामुळे मी सोशल मीडियापासून दूर झालो, माझा जुना नंबर सुद्धा बंद पडला.”

 

सुप्रिया म्हणाली “तिनी तुझ्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तू कुठेच सापडलाच नाहीस. तिने तिच्या बहिणीलाही विचारलं, तिनेही तुझा नंबर दिला, पण तो सुद्धा बंद निघाला. तुझ्याबद्दल कित्येकदा ती माझ्यासमोर बोलायची. 'माहिती नाही, तो कुठे असेल, कसा असेल, कधी भेटेल.

पण तिला कदी वाटल नव्हत तू परत कदी भेटशील, आणि आज अचानक, तू आम्हाला तिथे सापडलास. तेव्हा तीला आधी तर धक्का बसल्यासारख झाल तेव्हा ती मला म्हणाली सुद्धा.  पण वाटलं कोणीतरी दुसराच असेल. पण जेव्हा तू अजय ला तुज नाव सांगितलंस, तिला कळलंच नाही की खरोखर तूच आहेस की दुसराच कोणी.'

 

मग चालताना ती कित्येकदा तुझ्याकडे पाहत होती पण पाऊस मुडे तिला कडत नव्हत . आपण तिथे त्या झोपडीत नास्ता करायला थांबलो आणि जेव्हा तुने तुझ्या बधल नाव सांगितल, तेव्हा तिला थोडी खात्री झाली की तूच आहेस. म्हणून ती मगाशी तुझ्या मागे आली बाहेर, तुला कुठला आहे कुठे शिकला हे विचारायला. तिने तुला सांगितलं सुद्धा, 'आपण एका कॉलेजमधले आहोत.' पण तुला ती आठवली नाही, हो ना?

 

मला कळत नव्हतं मी काय बोलू. मी फक्त 'हंहह' म्हणत शांत राहिलो.

 

सुप्रिया म्हणाली, 'मगाशी आपण सगळे फोटो काढत होतो त्या मोठ्या धबधब्या कडे, इथे पोचायच्या आधी. ती त्यामुळंच एकटी बाजूला जाऊन उभी होती. ती म्हणाली ना, आठवणी आहेत सोबत आल्यात ते तुझ्याबद्दलच होत होत्या.'

मगाशी आपण गडावर जात होतो, तेव्हा मी तिला विचारलं, 'काय झालं होतं तुला?' तर तिने सगड सांगितलं, 'हा तोच आहे, म्हणून.”

तुला कडल नाही म्हणे कि ती तीच अन्वी आहे म्हणून जीचासी तू आदी फार बोलायचास, तू तिला ओळखल नाहीस म्हणाली त्या मुडेच मगाशी तिचा डोद्यात पाणी आल होत. मगाशी मीच तिला तुजा सोबत जा म्हणून इकडे पाठवल.

 

मला आता हळूहळू सगळं कळायला लागलं. सगळ्या गोष्टी आता स्पष्ट समजायला लागल्या. का तिचं माज्या मागे येणं, का ती मगाशी आठवणींबद्दल आणि ते सगळ बोलली कडी काही गोष्टी अचानक समोर येतात , आणि ते 'साहेब' बोलणं. ती आधीही मजाक मध्ये 'साहेब'च बोलायची.

 

मला कळत नव्हतं मी तिला काय जाऊन बोलू. मी जणू स्वताचा लाइफ मध्ये इतका गुंतलो कि तिला विसरलोच होतो, आणि आज अचानक ती इथे भेटली. तिने तर मला एका नजरेत ओळखलं, पण मी तिला ओळखू शकलो नाही.

 

सुप्रिया उठून तिच्या जागी गेली. अन्वी माझ्याकडे बघत होती आणि मी  तिचा कडे यावेळी आमचातला कुणीच नजर चुकवण्याचा प्रयत्न करत नव्हता. तिचे डोळे पाणावले होते आणि माझ्या मनात जणू विचारांचे थैमान घर करत होते. सगळ्या जुन्या गोष्टी एक एक करत बाहेर पडत होत्या. आमचं बोलणं, आमच्या गोष्टी आणि इतर सगळ काही. इतक्या वर्षांनी सुद्धा त्या तशाच आहेत का? मला माझ्यावर प्रश्न पडत होता?

 

इतक्यात काका आणि काकू जेवण घेऊन आले. आम्ही सगळ्यांनी उचलवाचल केली. अन्वी मात्र आता शांतच होती. सगळ्यांनी दरी टाकली आणि गोलाकार बसून जेवण घेतलं. मस्त पैकी झुणका, भाकरी, कांद्याची चटणी आणि तोंडी लावायला मिरचीचा ठेचा. शेकोटीच्या भोवती सगळे बसून जेवण करत होते. बाहेर पाऊस पडतच होता आणि वातावरणात थंडी वाढत चालली होती.

सगळ्यांनी जेवण आटोपल, साफसफाई करून सगळे थोडावेळ परत शेकोटीपाशी बसले. १० वाजून गेले होते. सगळे थकले असल्यामुळे आपापल्या तंबूत झोपायला गेले.

 

.........................

 

         मी, यश, सुप्रिया आणि अन्वी थोडावेळ बाहेरच बसलो. अन्वी माजा बाजूलाच बसली होति कोणीच काही बोलत नव्हतं.

यश म्हणाला, "मी झोपायला जातो," आणि तोही तंबूमध्ये गेला.

अन्वी माझ्याकडे बघत होती. सुप्रिया तिला म्हणाली, "मी झोपते," म्हणून उठली आणि तिच्या तंबूकडे जायला निघाली. जाताना तिने मला इशारा केला की बोल तिच्याशी.

 

थोडावेळ सगळंच शांत होतं. सगळे आपआपल्या तंबूत झोपण्याचा प्रयत्न करत होते. काही झोपीही गेलेत.

 

मी तिच्याकडे न बघता "सॉरी" बोललो. ती अजूनही काहीच बोलली नाही.

थोडावेळाने ती म्हणाली, "कुठल्या गोष्टीसाठी बोलतोय ते सांगतो का?"

 

मी म्हटलं, "सगळ्यांसाठीच. तुला काही न सांगता सगळं बंद करून इकडे निघून आलो, स्वतःच्या गोष्टींमध्ये गुंतून राहलो आणि सगळं काही विसरण्याचा प्रयन्त करू लागलो. तू मला इतक्या वर्षानि बगितल आणि ओळकल सुद्धा पण मी तुला ओळखू शकलो नाही.”

 

मी अजून पण शेकोटी कडेच बघत होतो तिचा कडे बगायची हिम्मत माजा कडे नव्हती.

 

ती म्हणाली, "तू का अचानक सगळं बंद करून गेला, काहीही न सांगता किती प्रयन्त केले तुला हुडकायचे पण तू कुनाचा संपर्कात होताच नाही? कितेकदा ताईला विचारलं तिला सुद्धा माहिती नाही तू कुठे होता"

 

मी लांब श्वास घेतला आणि बोललो, "काही गोष्टी घडल्यात होत्या ज्या मुळे जावं लागलं. जुना नंबर बंद पडला त्या मुडे कुनाचा संपर्क नाही राहला. मग इकडे येऊन स्वतावर लक्ष दिल कामात व्यस्त राहलो,  लहान पणीचे हे तिघे मित्र असायचे सोबत, घरी सुद्धा वर्ष्यातून तीन चार दिवसा करिता दिवाळी मध्ये जायचो खूप काही झाल तर आई बाबा इकडे यायचे भेटीला अदा मदात. ना कुठले नातेवाईक ना कुठले मित्र खूप काही वाटल तर अस बाहेर भटकायला निघून येत हितो."

 

ती म्हणाली, “तुला माहिती नाही, तुझी किती आठवण यायची. वाटलं नव्हतं कधी परत भेटशील म्हणून. देवाकडे कित्येकदा तुझी एकदा भेट होऊ दे, इतकंच बोलायची. आणि आज त्यांनी ऐकलं सुद्धा.”

 

तिच्या डोळ्यातून पाणी पडत होतं, ते बघून माझे सुद्धा डोळे पाणावले. मला कळत नव्हतं की मी काय करू. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी बाहेर पडलो, सगळ्या गोष्टी मागे सोडल्या आणि आज अचानक जे घडलं, त्यावर शब्द नव्हते.

 

तिनं तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं, हात हातात घेतलं आणि तशीच पडून राहिली, काहीही न बोलता. तसंच थोडावेळ बसून म्हणाली, “परत जाणार नाहीस ना रे, न सांगता सोडून?”

 

माझ्या तोंडून बस, “नाही, कधीच नाही,” इतकंच निघालं.

 

थोडावेळ आम्ही तिथेच बसून होतो. मग मी तिला झोपी जाण्यास सांगितलं कारण सकाळी लवकर उठून परतीचा रस्ता पकडायचा होता.

आम्ही दोघंही उठलो. शेकोटीतील काड्या आता विजत आल्या होत्या.

मी तिच्याकडे बघत होतो, तितक्यात तिनं मला घट्ट मिठीत घेतलं. जणू त्या थंड हवेत, रातकिड्यांच्या आवाजात त्या पाऊसा मध्ये आम्ही दोघंच होतो ज्यात अनेक आठवणी आमचा मनातून बाहेर येत होत्या. इतकी वर्षं ज्या आपुलकीपासून दूर राहिलो, ज्या प्रेमापासून दूर राहिलो, आज ते कुठे मिळालं. मनात असलेल्या वेदना कुठे शांत झाल्या. डोळ्यांतून नकळत पाणी आलं. थोडावेळ तसाच राहून ती तिच्या तंबूत गेली आणि मी राहिलेल्या शेकोटीमध्ये काळ्या विझवून माझ्या तंबूत गेलो.

त्या रात्री खूप वेळपर्यंत मला झोप आली नाही. कुठेतरी दोन वाजता झोप लागली.

 

 

.............................

 

              सकाळी पहाटेच्या कोंबड्यांच्या कुकू डू कूने जाग आली. घड्याळ बघितलं तर ६:३० वाजून गेले होते. मी माझ्या तंबूतून बाहेर आलो आणि बघतो तर पाऊस आता बऱ्याच पैकी थांबला होता थोड्या प्रमाणात. बघतो तर सगळे अजून झोपलेच होते. गावातील थोडी फार वडीलधारी मंडळी जागी झाली होती. मी बाहेर पडलो आणि रस्त्याने चालत चालत शिव मंदिराकडे गेलो. मंदिर गावाच्या मागेच होतं. त्या समोर छोटासा तलाव होता. तिथे हात पाय धुवून मंदिरात दर्शन घेतलं. देवाचे आभार मानले ज्याने हे सगळ घडऊन आणल. गाभाऱ्यातून बाहेर पडून, आजूबाजूला थोडी भटकंती करत बसलो. थोडे फोटो काढत बसलो.

 

पक्षांचा किलबिल सुरूच होता. आकाशात ढग अजूनही होते, पण पाऊस मात्र नव्हता. थोडावेळ त्या शांत वातावरणात बसून परत तंबूकडे जायला निघालो. इकडे आलो तर आता मात्र सगळे उठले होते. तंबू वगैरे काढत होते. आवराआवर सुरू असताना मी अन्वीला शोधत होतो पण ती तिथे नव्हती. मी माझ्या तंबूकडे वाढलो. यश, तनय, वेदांतला मदत करू लागलो. सुप्रिया माझ्याकडे आली आणि अभिनंदन म्हणाली. यश आणि वेदांत माझ्याकडे बघत होते की हे काय सुरु आहे.

 

मी धन्यवाद म्हणून परत कामाला लागलो. सगळे तंबू बांधून घेतलेत. इतक्यात काकू आणि अन्वी चहा घेऊन आल्या. सगळे चहा घेत होते. अन्वी माझ्या बाजूला येऊन बसली. कुठे गेला होता साहेब सकाळी सकाळी, म्हणाली.

 

मी म्हटलं, “मागे इकडे एक शिव मंदिर आहे. लवकर जाग आली तर जाऊन आलो तिकडे देवाचे आभार मानायला.”

 

ती हलकीसी हसली. मी पण आली असती म्हणाली आणि आम्ही चहा पिऊ लागलो. सुप्रिया तिकडे तिला चिडवायला लागली. मी तिकडे जाऊन काका काकूंना भेटून आलो, त्यांना राहण्याचे आणि जेवणाचे पैसे देऊन त्यांचा आभार मानला. जाताना सगळ्यांनी त्यांना धन्यवाद म्हटलं. आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर लागलो.

 

आज मात्र परत जाताना पाऊस फार जोरात नव्हता, त्या मुळे सगळे मस्ती करत गप्पा गोष्टी करत जात होतो. अन्वी पूर्णवेळ माझ्या सोबत होती आणि या वेळी सुप्रिया सुद्धा. काही वेळाने आम्ही आमच्या गाड्यांजवळ पोचलो. एकमेकांचे नंबर आणि पत्ते घेतले. पुण्यात सगळे सोबत असल्यामुळे आम्ही सोबतच परत जायला निघालो.

 

पण हा प्रवास मात्र मनात कोरून राहिला. इथलं निसर्ग वातावरण, अनुभवलंले साहस, यामध्ये झालेली सगळ्यांची मैत्री आणि आणि जूनि मैत्रीच नव्याने सुरू झालेलं प्रेम, अशा अनेक आठवणी मनात घेऊन आम्ही सगळे परतीच्या मार्गावर लागलो. स्वतःला हे समजावत की परत या निसर्गाशी भेट होणार. परत याला भेटायला येणार. तोच साहस, तोच उत्साह घेऊन परत अनेक आठवणींनी गुंतलेल्या मनाला, मुक्त श्वासान या हवेत स्वच्छंद भटकायला परत एका नव्या मार्गावर, एका नव्या प्रवासाला.

 

 

 

 

..............समाप्त…………