कोण? - 21 Gajendra Kudmate द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 21

सावली मग तातडीने घराकडे जाण्यास नीघाली होती. ती लगबगीने घरी पोहोचली आणि गाडी ठेवून घरात जाऊन शिरली. तीची आई आणि कोमल हि सोफ्यावर बसून कसले तरी रीपोर्ट बघत होत्या. तीचा आईने तीला जीतक्या तातडीने घरी येण्यास सांगीतले होते, ती घाई तीचा चेहरयावर दिसत नव्हती सावलीला. उलट एक समाधान आणि आनंद दिसत होता. ते बघून मात्र सावली आधी आश्चर्यचकित झाली आणि नंतर रागावली होती. ती सरळ जाऊन आईला म्हणाली, “ आई इतकी कसली महत्वाची गोष्ट होती ग तुला सांगायची कि तू मला इतक्या तातडीने येण्यास सांगीतले. तुझा तो आवाज आणि बोलने ऐकून एका क्षणाला मला वाटले होते कि काही मोठे संकट आलेले आहे. परंतु मी येऊन बघते तर तुम्ही दोघीही नीवांत आणि आनंदात बसून आहात. माझे तर मात्र प्राण कंठाशी आले होते.” तेव्हा आई म्हणाली, “ बाळा शांत हो, त्यासाठी मी तुझी माफी मागते. अग ती गोष्टच इतकी आनंदाची आहे कि मला रहावलं नाही गेल. शिवाय मागील काही काळापासून आपण तीघांनी किती संकटे झेलली आहेत. अतोनात दुख आपल्या पदरात येऊन पडली आहेत. आनंदाचा क्षण जणू आपल्या घरचा मार्गच वीसरला आहे असे वाटू लागले होते. तेवढ्यात हि आनंदाची बातमी आज मला प्राप्त झाली होती म्हणून मला वाटले तुझ्याही ओठांवर थोडं हसू येऊ दे.” असे म्हणता म्हणता आईचा डोळ्यांत पाणी आले. 
   ते बघून मात्र सावलीचा राग शांत झाला होता आणि तीला आईसोबत तसे बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला होता. ती मग आईजवळ गेली आणि म्हणाली, “ आई मला माफ कर मी तुला त्याप्रकारे बोलली म्हणून. अग मी सावंत साहेबांचा सोबत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. त्यांनी मला जे काही सांगीतले त्याने मी आधीच खूप टेन्शनमध्ये आलेले होते आणि तेवढ्यात तुझा फोन आला आणि तू.....” असे म्हणून सावली थोडी उदास होऊन गेली. तेव्हा तीचा आईने तिला विचारले, “ काय झाले बाळा साहेबांनी असे काय सांगीतले कि तू टेन्शनमध्ये आलीस.” तेव्हा सावली म्हणाली, “ ते मरू देत सगळ्यात ती आनंदाची गोष्ट सांग मला ज्याकरीता मी इतक्या तातडीने आलेली आहे.” मग आई सांगू लागली, “ अग मी घरीच काम करत असतांना मला डॉक्टरांचा फोन आला त्यांनी काही महत्वाचे सांगायचे आहे म्हणून मला आणि कोमलला इस्पितळात येण्यासाठी सांगीतले होते. तू घरी नव्हतीस म्हणून आम्ही दोघींनी जाण्याचा निर्णय घेतला. तर आंम्ही तेथे गेलेलो असतांना डॉक्टरांनी आम्हाला सांगीतले कि आपली कोमल हि अपंग नाही आहे. ती पूर्वीसारखी चालू शकते फक्त यासाठी आपल्याला एक ऑपरेशन करावे लागेल. कारण कि त्या अपघातात तिचा पायाचा सोबत डोक्याला सुद्धा थोडा मार होता. त्यामुळे ती फार काळ अचेत अवस्थेत राहिली होती. ते तीचा डोक्याला धक्का लागलेला होता आणि शरीराचे अवयव संचालीत करणारी नस दबलेली आहे म्हणून ती काही हालचाल करू शकत नव्हती.”
 सावली मग उत्साहाने मधेच बोलली, “ मग पुढे काय सांगीतले.” तेव्हा आई म्हणाली, “ अग ऐकून तर घे, तर डॉक्टर म्हणाले आपल्याला ते ऑपरेशन करावे लागेल जेणेकरून कोमल पूर्वीसारखी सामान्य जीवन जगू शकेल.” हे सर्व आई सांगत होती तेव्हा सावलीने कोमलकडे बघीतले तर तीचा हिरमुसलेला चेहरा आता त्या आनंदाचा बातमीने खुलला होता. ते बघून सावलीचा मनाला सुद्धा समाधान मीळाले होते. तर मग आईने पुढे विचारले, “ आता साहेब काय म्हणत होते ते सांग.” तेव्हा सावलीने या आनंदात व्यत्यय येईल म्हणून आईला सहज म्हटले, “ असे काही नाही ग वीशेष तेच पूर्वीच प्रकरण ते अजूनही सुरूच आहे असे म्हटले ते.” ती पुढे म्हणाली, “ ते जाऊ दे मग सांग डॉक्टर केव्हा ऑपरेशन करण्यास सांगतील.” आई म्हणाली, “ याबद्दल डॉक्टर त्या दुसऱ्या डॉक्टरांशी वीचार वीमश करतील आणि आपल्याला सांगतील. तोपर्यंत आपल्याला पैशांची व्यवस्था करून ठेवावी लागेल.” मग सावली म्हणाली, “ पैशांची तू काहीच काळजी करू नकोस त्यांची व्यवस्था होऊन जाईल.” मग सावली कोमल जवळ गेली आणि तीला मीठी मारून बोलली, “ माझ्यामुळे आपल्या कोमलला इतका त्रास सहन करावा लागत आहे. माझ्यावरचे संकट बीचारीचा अंगावर ओढवले होते. ईश्वराचा कृपेने आधी तीचे प्राण वाचले आणि आता ती पूर्वीसारखी चालायला आणि धावायला लागेल, हो कि नाही कोमल.” असे म्हणून तीने कोमलला एकदा पुन्हा मीठी मारली. 
 तेव्हा कोमल म्हणाली, “ हो न ताई हे अपंगत्वाचे दिवस फारच कठीण होते. मी तर माझ्या जगण्याची आसच सोडून दिलेली होती. माझ्या मनाला जे आयुष्य एका फार मोठ्या ओझा सारखे वाटू लागले होते. देवाला मी क्षणोक्षणी प्रार्थान करत असायची कि मला लवकरात लवकर जगातून घेऊन जा आणि मला आणि तुम्हा दोघांना माझ्या या त्रासातून मुक्ती मिळू दे. आज जेव्हा डॉक्टरांनी हि गोष्ट सांगीतली तर ती ऐकून माझा कानाला विश्वास बसत नव्हता. ते ऐकून माझ्या नीष्प्राण शरीरात जसे एकदा पुन्हा प्राण आले असे मला वाटले. त्यानंतर मला जीवन जगण्याची एक नवीन आशा दिसू लागली होती.” असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली. सावलीने तीला आणखी मोठ्याने मीठी मारली. शेष पुढील भागात..........