नियती - भाग 2 Vaishali Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 2





भाग 2


मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.

अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात आणि  हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.



सर्वांग घामाने डबडबले त्याचे...
फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.
कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.
शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...




उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.
तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले...

"तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..
सो... मिस्टर मोहित....!!!"



आणि हे ऐकूनच त्याचे पाय......
त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...😨🙀
आणि......

.......


.
.

आणि आता याचे अवसान गळून पडले आणखी.
त्याच्या हातात जे शाल श्रीफळ आणि डिग्री होती.
ते सर्व हातात धरुन तो उभा राहिला.

आता त्याला विचार आला की हातातले हे सर्व सामान कुठे ठेवावे.
घाबरगुंडी उडाल्यामुळे त्याच्या पोटात लव्हाळी सुटली होती संपूर्ण... 

खरे पाहता त्याचे हात दोन्हीपण थरथर कापू लागले होते.. पण ते इतरांना दिसू नये म्हणून त्याने ते ...शाल जी त्याच्या हातात होती तिला गच्च पकडून ठेवले होते...



त्याला आता अशा प्रसंगी सर्वात जास्त तिची आठवण येऊ लागली. 



जीव अगदी कासावीस व्हायला आला होता.
आतापर्यंत स्टेजवर मारे डान्स करत होती ना !!!



आणि... नेमकी मला गरज आहे तेव्हा आता कुठे गेली ही...???

काहीच न समजून त्याने.... जिथून ती गेली होती पडद्याच्या मागे .....त्या दिशेने भिरभिर नजर फिरवली.





खरे पाहता... पडद्याच्या मागून केव्हाच निसटली होती ती.

त्याच्या कौतुक समारंभाला पाहण्यासाठी.
पण ती सावली ज्या ठिकाणी आहे. जिथे लाईट पोहोचत नाही अशा आडोशाला उभी राहून सर्व पाहत होती.



कौतुक त्याचे होत होते आणि गर्वाने छाती तिची फुलत होती तेथे.
तिला माहीत होते.... त्याला स्टेज डेरिंग नाही आहे.

गाव खेड्यात कितीही डेरिंग दाखवेल पण येथे मात्र शहरी रंगबिरंगी बाजारात त्याचे डोके काम करत नाही. 


आता तिला विचार पडला की आपण काय करावे असे की जेणेकरून त्याची हिंमत वाढेल माईकवर बोलण्यास.



जेव्हा तो हाती सर्वसामान घेऊन उभा पडद्याच्या दिशेने बघत होता ....तेव्हाच तिच्या लक्षात आले की आता आपण जर त्याला दिसलो तर त्याच्या अंगी बळ येईल बोलण्याचे.

बस!!
बस.... क्षणभरच तिने विचार केला आणि लगेच आली स्टेजवर...


स्टेज वर येऊन मंदस्मित करत त्याच्या हाती असणारे शाल श्रीफळ आणि डिग्री स्वतःच्या हातात घेतली.

आणि जेव्हा घेत होती तेव्हा हळूच कुजबुजत मान झुकवत त्याला म्हणाली...
"अरे बोलू नकोस.... पण प्लीज तिकडे जाऊन माईकवर माझ्यासाठी एक कविता बोल किंवा शायरी बोल. तेवढं कर माझ्यासाठी आणि खाली ये." 💕


तिचे हे शब्द ऐकताच खरंच त्याच्या अंगी बळ आले.
ज्या आधाराची त्याला गरज होती ती त्याला मिळाली जणू.
आणि तो त्या माईकच्या दिशेने जेथे डायस होता तेथे गेला.


त्या दोनही विद्यार्थिनी संचालन करणाऱ्या बाजूला उभ्या राहिल्या. आणि हा माईक समोर उभा राहून समोर बघू लागला.
तर अगदी समोर जिथे तो बसला होता ....मगाशी ...
तेथेच ती आता बसली होती.
याची नजर तिच्या नजरेत मिसळली आणि आपोआप त्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडू लागले.


इस प्रज्ञा मंच पर बैठे हुए मेरे सभी गुरुजनोंको....
सादर प्रणाम..🙏🙏
पहली बात यह है...
मै आप सभी लोगो का अत्यंत आभारी हूं ।
मैंने जो आज यह उपलब्धि प्राप्त की है। इसके लिए सभी का कुछ ना कुछ योगदान मिला है मुझे। किसी न किसी प्रकार की मदद प्राप्त हुई है मुझे। पुन: धन्यवाद सबको🙏🙏
और दूसरी बात यह है....
मेरा एक्सपीरियंस अगर मुझे बताना है। तो मैं यहां चंद लफ्जों में बताना चाहूंगा।


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
"विकल्प बहुत मिलेंगे यारों,
मार्ग भड़काने के लिए हमारा,
दृढ़ संकल्प एक ही काफी होता है,
यारों ,मंजिल तक पहुंचाने के लिए ।"
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅


मोहितने ही शायरी बोलताच टाळ्यांच्या कडकडाटाने हॉल पूर्णपणे भरून गेला.


तरुण मुलींनी मुलांनी शिट्ट्याही वाजवल्या काही विद्यार्थ्यांनी. दोन मिनिटे हॉल मध्ये टाळ्या गुंजत राहिल्या.



तिथे स्टेज समोर बसलेली ती ...ती सुद्धा त्याची शायरी ऐकून मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे बघत होती. आनंदाश्रू तरळले तिच्या डोळ्यांत.



साश्रू नयनांनी मंदस्मित करत ती सुद्धा टाळ्या वाजवत होती आता. आणि तिथे स्टेजवर मोहितच्याही चेहऱ्यावर मंद स्मित झळकले मिशीमध्ये.



आता त्याच्या तोंडून पुढे एकही शब्द निघणार नव्हता.
कसाबसा तो बोलला पुढे.....

"मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. इथे असलेले आणि नसलेले ज्यांनी ज्यांनी मला मदत केली कुठल्या ना कुठल्या रूपाने त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो."




आणखी त्याला आता बोलता येणार नाही याची खात्री सर्वांना झाली आणि त्याला स्टेजवरून जाण्यास अनुमती मिळाली.



त्याच्यानंतर ही आणखी काही अवार्ड्स मिळाले होते
...वेगळ्या शाखेतल्या विद्यार्थ्यांना. त्यांचीही भाषण झाली.
समारंभ संपला.

तेथे असलेली गर्दी आता जेवणाची स्टॉल लावलेले होते तिकडे पांगू लागली.

जो तो येऊन मोहितचे अभिनंदन करू लागला.



आजपर्यंत त्याला जरी चष्मा नव्हता तरीही कॉलेजमधले विद्यार्थी त्याला चार्जिंग बॅटरी असे म्हणायचे.
कोणीही त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते.


पण आज कॉलेजमधल्या बहुतेक विद्यार्थिनी ज्या कधीही त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हत्या.

त्या काँग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी पुढे येऊन त्याच्या हातात हात मिळवत होत्या आणि दोन मिनिटे हात तसाच रेंगाळत ठेवत होत्या.
आणि इकडे तिची बारीक नजर होती त्याच्यावर. 



तिला त्याला फेविकॉल सारखे चिपकणाऱ्या त्या मुलींचा राग राग येत होता.
हेही दिसत होते की त्याला त्या मुलींचे असे करणे अनकम्फर्टेबल वाटत होते.... तरीही मंदस्मित खोटे ठेवून चेहऱ्यावर तो त्या मुलींची हात मिळवत होता.
आणि मग न रहावून तीच उठली आपण होऊन आणि त्याच्याजवळ गेली. 

जवळ जाऊन तिने सुद्धा त्याला विश केले.

हँडशेक करताना मात्र तिने त्याच्या तळहाताला चिमटा काढला. तसे त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. तर तिचे डोळे अंगार बरसवत होते. पण त्याला तर हेही समजले नाही की आपले चुकले काय...??



आणि त्याच्या वेंधळेपणामुळे अजून अजून तिला राग येत होता. थोडा त्याच्या हातात हात तिने रेंगाळत धरून ठेवला
आणि कुजबुजत दातावर दात खाऊन त्याला म्हणाली ....

"बाबू शोना.... भुऱ्या मांजरांमध्ये जास्त राहू नकोस....
अजून पुन्हा थोड्या वेळ जास्त राहिलास ना...!!!!
तर ही काळी मांजर पंजा मारून ओरबाडून ठेवीन तुला घराकडे गेल्यावर. समजलं ना मी काय म्हणत आहे!!!"


तिचा तो स्वर आणि गुरकावणं ऐकून त्याच्या छातीत तर धडकीच भरली...

आणि ती तेथेच उभी राहिली मैत्रिणींसोबत बोलत डोळ्यात अंगार घेऊन.
आणि मग तो ...
तिच्या नजरेतील अंगार ....त्याची भाषा लक्षात आल्यामुळे... आता कोणतीही विद्यार्थिनी काँग्रॅच्युलेशन्स करायला आली की मोहित हात जोडून काँग्रॅच्युलेशन स्वीकारू लागला..

आणि मग नाईलाजाने समोरच्या मुली ह्या बाजूला निघून आपल्या मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये मिसळून जायच्या...


पण त्यामुळे आता हेही लक्षात आले मोहितच्या की आतापर्यंत असणारे त्याच्या मनावरचे दडपण कमी झाले आणि मोकळेपणा वाटत असल्याने तो आता बोलू लागला आणि हसू लागला.


त्याच्याजवळ तो भला सिल्वर ट्रॉफी (मोठा चांदीचा कप) होता.त्यालाही सांभाळावे लागत होते.


कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात कॉलेजने त्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी निमित्त सिल्वर ट्रॉफी (चांदीचा मोठा कप) देऊन त्याचा सन्मान केला होता.


आता तो थोडा वैतागल्यासारखा झाला होता. हे त्याच्या सभोवताली जमलेले मित्र केव्हा एकदा निघून जातात असे त्याला होऊन गेले होते. आणि शेवटी त्याने इकडे तिकडे भिरभिर नजर फिरवली..
तर ती त्याला कुठेही दिसत नव्हती.



तेवढ्यात त्याच्या मित्राने एका विषयावर बोलता बोलता
त्याच्याकडून ती घरी निघून गेली हे समजले.
आता त्यालाही तेथे एक मिनिट थांबू वाटत नव्हते.
शेवटी त्याने कसाबसा कॉलेजच्या आवारातून पाय काढला.

त्याला आता खूप घाई झाली होती घरी जाण्याची.
झपाझप पावले टाकत तो निघाला.

सारे काही तो विसरला होता आता. त्याला आता फक्त आणि फक्त घरी जाऊन सर्वांना... तो सिल्वर कप मिळालेला...
तो दाखवायचा होता.घरच्यांच्या तोंडून कौतुक ऐकण्याची भरभरून इच्छा होती त्याची.


केव्हा एकदा हातातील तो सिल्वर कप मामाला दाखवीतो असे त्याला होऊन गेले होते.

बस मध्येही तो उभ्या उभ्या आज त्याचे मामा काय म्हणेल..??? किती आनंद होईल त्याला...???
कसा जो भेटेल त्याला भाच्याचे कौतुक सांगत फिरेल...???
हाच विचार त्याच्या डोक्यात सारखा घोळत होता..
आणि मंद मंद हसत होता.





नाक्यावर बसमधून उतरला आणि झपाझप पावले टाकायला सुरुवात केली कारण आता बराच अंधार पडला होता. तो आता प्रशस्त एरियातून निघून घाणेरड्या झोपडपट्टीच्या एरियात आला. जिथे तो लहानाचा मोठा झाला होता तिथे.

येताच त्याने जोरात आवाज दिला.."मामा."
आणि समोरच्या झोपडीतून त्याच्या मामाने त्याला ओ दिली.





घाणेरडे मळकटी कपडे अंगावर असलेले काळाकुट्ट चेहरा,
अंगाला कसला तरी कुबट घाण स्मेल येत असलेला म्हातारा बाहेर आला.

मोहित....
"मामा .....हे पाहिलं...??"



.
नशे मध्ये असलेल्या मामाने विचारले....
"काय आहे???"





तेथे असलेल्या मंद प्रकाशात मोहितला त्याच्या मामाचे डोळे नशेमध्ये असलेले लक्षात आले. आजूबाजूच्या परिसरामध्ये तेथे गुरांच्या कातड्यांचा ढिग पडला होता.




मोहित....
"मामा ....मला हे बक्षीस मिळालं."




मामा....
"कसलं बक्षीस...???"




मोहित....
"मी बीएससी मध्ये पहिला क्रमांक पटकावला ना ...!!! त्याचे बक्षीस आहे."




मामा.....
"बीस्सी .... भिशी.....हां.....कसली भिशी....???
कुठली भिशी...???तुला कोणी सांगितले भिशीत पैसे टाकायला...???. मुळात म्हणजे तुझ्याकडे आले कुठून पैसे एवढे भिशीत टाकायला...???"



तारवटलेल्या डोळ्यांनी त्याचे मामा प्रश्नांवर प्रश्न विचारत होते निरर्थक असे... त्यांच्या तोंडातून दारूची दुर्गंधी येत होती सारखी..... आता मोहितलाच कसेसे होऊ लागले त्या वासाने.





त्याहीपेक्षा त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले. की आपण एवढ्या ओढीने.... उमेदीने... झपाझप पावले टाकत मारे येथ पर्यंत आलो... ही सिल्वर ट्रॉफी दाखवायला मामाला... आणि इकडे पालथ्या घड्यावर पाणी.... आता त्याची उमेद खलास झाली होती.


जेवढा आनंद झाला होता त्याच्यापेक्षाही दुप्पटीने निराश वाटू लागले.


आपल्या या बेवड्या मामाला कोणत्याही शब्दांनी समजावून सांगू शकणार नाही याची त्याला खात्री पटली.

आता विषन्न मनाने मोहित चुपचाप झोपडीत शिरला. तर बाहेरच्याहीपेक्षा आत ती घाणेरडी दुर्गंधी चामड्याची जरा जास्तच पसरली होती. पण या दुर्गंधीची त्याला सवय होती त्यामुळे त्याला काहीच वाटले नाही.





आणि त्याची नजर गेली त्याच्या मामाकडे... तर मामा त्याचा एका दिशेने बारीक नजर घेऊन टकमक पाहत होता.




मोहितनेही त्या दिशेने पाहिले की मामा काय पाहत आहे...??
आणि मोहितचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तो पटकन पुढे गेला....




🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿