नियती - भाग 4 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 4







भाग 4




बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.


स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..




लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.



आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून  तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये.



.....जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत निघाला .परत निघाला तो गुदमरलेल्या अवस्थेत.मनातून तो अधिकच दडपणाखाली आलेला होता आता.एवढे कौतुक त्याने बंगल्यात प्रथमच अनुभवले होते तर त्याला एकाही गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्याला सर्व स्वप्नवत वाटत होते.



कधी कधी तेथून उठून बाहेर येतो असे झाले होते त्याला.काय करणार तो....??? एवढे कौतुक ऐकण्याची त्याला सवयच नव्हती कधी.यांच्या  घरामध्ये या गावातल्या त्याच्यासारख्या  मुलाचे इतके कौतुक होणे ही घटनाच मुळात त्याच्या मेंदूत शिरणारी नव्हती.




गाव त्याचे अगदी शहरा बाजूला असले तरी पुढारलेले नव्हते. जाती व्यवस्था... मनामनांमध्ये कुठून कुठून भरलेली होती गाव खेड्यातल्या त्याच्या गावात.





अजूनही त्या गावांमध्ये राजकारणामुळे विदारक परिस्थिती होती गावातली. एकाच गावात जाती व्यवस्थेनुसार घर बांधलेली होती.त्याप्रमाणे त्या गावात घरांच्या बांधलेल्या वस्त्या होत्या.




मोहित चे वडील कवडू  त्यांचे घर (म्हणजे झोपडी) स्मशानाच्या दाराच्या बाजूला होते.आजही गावातल्या राजकारण्यांनी स्मशानाला वतनदार म्हणून कवडू  ला नेमून ठेवले होते.




लोकशाहीतही त्या गावात राजकारण्यांमुळे त्या गावचे लोक स्वतःला पारतंत्र्यात समजत होते. स्वतःच्या मनाने कोणतेही काम स्वतः करता येत नव्हते तिथे.



पायऱ्या उतरताना मायराने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनातला सारा गोंधळ ओळखला होता.कोणत्या आणि किती दडपणाखाली आहे हे तिला समजले होते त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच.




सात ते आठ पायऱ्या उतरले असतील दोघे. भुयारी जीना असल्यामुळे तेथे सतत लाईट लावून राहत असे मंद असे.तो समोर समोर पायऱ्या उतरत होता आणि मायरा त्याच्या मागे मागे उतरत होती...विचारात असलेल्या मायराला काहीतरी सुचले आणि तिने हात वरती करून स्विच ऑफ केला.



लाईट बंद होताच जिन्यावर गडद अंधार पसरला.तो आता गडबडून धडपडणार तर मायराने पटकन त्याचा मागून शर्टचा कॉलर पकडला.


तसा त्याचा जीव घाबरा घुबरा झाला. त्याच्या तोंडून काहीतरी बोलायला निघणार तर मायराने डाव्या हाताने त्याच्या तोंडावर झाकले.तो एका पायरीने खाली होता. त्यामुळे जवळपास त्यांची दोघांची उंची सारखी झाली होती आता.




त्याला वळवून तिने जिन्याच्या भिंतीला टेकवले.

आणि त्याच्या अगदी जवळ येऊन कानाजवळ कुजबुजत म्हणाली.."शूsss एकही शब्द बोलू नकोस आता.दोन क्षण एकांतात तर घालवू आपण. तरसून गेलेय मी.तुला भेटण्यासाठी."असे म्हणत म्हणत तिने दातात किंचित कानाची पाळी पकडून त्याच्या गालाला गाल आपला घासला प्रेमळपणे.



तसे शाहरून  त्याचे लव आणि लव ताठ झाले.ओठांवर मंद स्मित झळकले कले त्याच्या... तिचे असे हक्काने वागणे त्याला आवडत होते नेहमीच. पुढाकारही तीच तर नेहमी घेत असायची.अंधारात तिला चेहरा तर दिसत नव्हता त्याचा.पण मुलायम हातांच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्याची ठेवण तीचपापत होती. आणि तिला जे पाहिजे ते गवसले होते आता.



उजव्या हातांचा अंगठा त्याच्या ओठांवरून हळूवार फिरू लागली... आणि तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाने त्याचे रोम रोम पुलकित होत होते.आता त्यानेही न राहावून आपले दोन्ही हात तिच्या कमरेत गुंफले. आणि तिला अलगद उचलून आपल्या पुढ्यात उभी केली.



आतापर्यंत दोघांची उंची सेम होती. पण आता समांतर पातळीवर उभे राहिल्यामुळे तो उंचीने वरती आणि ती थोडीशी किंचित त्याच्या मानेएवढ्या उंची मध्ये आली.

त्याने कमरेतील पकडलेले हात वर वर सरकवत नेऊन पाठीवर आणले आणि तिला जवळ ओढली. त्यामुळे तिचे उठावदार ऊरं किंचित त्याच्या भरदार छातीवर दबली गेली... तेव्हा त्याला तिच्याही हृदयामध्ये चाललेली ती जोरजोराने धडधड त्याला जाणवली... ऊरभात्याप्रमाणे धपापत होता...दोघांच्याही हृदयाची स्पंदना एकमेकांत मिसळून गेली.आणि त्याचबरोबर श्वासही त्यांचे एकमेकांत मिसळायला लागले.


मायराच्या करमाळा त्याच्या गळ्यात पडल्या. टाचा उंचावून ओठांत ओठ मिसळले मायराने.

दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम भावना होत्या. पण त्याने आजपर्यंत कधीही मर्यादा ओलांडली नव्हती. आणि तिलाही ओलांडू दिली नव्हती. कारण त्यांच्यामध्ये असलेली दरी तो जाणून होता. आणि परिस्थितीची जाणीव तिलाही असल्यामुळे तिनेही कधी मर्यादा ओलांडल्या नव्हत्या.



तो तर आज गोंधळलेला बिथरलेला होता. मायराला माहीत होते तो कधीच पुढाकार घेणार नाही आणि मर्यादा ओलांडणार नाही.एवढ्या जवळ येण्याची दोघांचीही पहिली वेळ होती. त्याला काहीही न सुचल्यामुळे तो एका जागेवर शांत उभा अनुभवत होता.



पहिला पहिला प्रणय अनुभव मोहित घेत होता. आणि मायरा अधिकार गाजवत होती त्याच्या ओठांवर.



त्याने नुकत्याच खाल्लेल्या गुलाबजामची चव सुद्धा मायराच्या जिभेने चाखली... जशी जिव्हा घोळायला लागली.. तशी मोहित च्या अंगावर सरसरून काटा आला.आपोआप त्याचे हात तिच्या मानेवर गेले आणि.. जीव्हांचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले...जेव्हा दोघांनाही श्वास घेणे कठीण होऊ लागले. तेव्हा ते एकमेकांच्या खांद्यावर मान ठेवून श्वास नियंत्रणात आणू लागले.



अत्यंत रोमरोमी आनंदित होऊन मायराने मोहितला आपल्या मिठीत गच्च आवळून घेतले...

मायरा कुजबुजत म्हणाली..."माही... आपण फर्स्ट किस घेतले आज.."

मोहित...."...हम्म "


मायरा..." हे फ्रेंच किस होतं.."


मोहित..."...हम्म "


मायरा..."पुढच्या वेळी इंडियन किस घेऊ."

मोहित..."...हम्म "


पुन्हा काही बोलणार... तर तिला समजले की..

तो फक्त " हम्म ...हम्म "...करतोय....तसा तिने त्याच्या पोटाला चिमटा काढला.

तो ओरडणार तर त्याच्या तोंडावर हाताने झाकले.

मायरा...

"मी केव्हाची बोलत आहे . तुझे लक्ष नाही."



तर तो हळूच म्हणाला...."

ओठांवरील चव रेंगाळत आहे ...अजूनही ती.. छान वाटत आहे म्हणून बोलत नाही आहे."



तशी ती लाजली आणि तिने स्विच ऑन केला.स्विच ऑन केल्यानंतर आता तिला आपला चेहरा त्याला दिसू द्यायचा नव्हता. तर तिने पुढच्या पायरीवर उतरत त्याच्याकडे पाठ करून आपला अवतार बरोबर केला.


तसा त्यानेही केसातून आपल्या हात फिरवला.ती पुढे पुढे पटापट पायर्या उतरू लागली. कारण जिन्यावरून थोडा उतरण्यास वेळ लागला तर कोणाला संशय येऊ शकतो.तोही बराबर तिच्यामागे जिना उतरू लागला. खालच्या पायऱ्या जवळ .....बाहेर  पोचल्यावर दोघांनीही आपला वेग मंदावला. आणि नॉर्मली चालतात तशी चालू लागले आता...



जिन्याच्या खाली उतरल्याबरोबर आजूबाजूला जेव्हा मोहितचे लक्ष गेले तेव्हा त्याला वास्तवाचे पुन्हा भान आलेआणि आता त्याला पुन्हा बेचैन वाटू लागले. आपण घाई तर नाही करत आहोत ना...!! आपल्यामुळे मायराचे आयुष्य उध्वस्त व्हायला नको...



आपण असं वाहवत जायला नको होतं मायरासोबत.तिला आपण थांबयला पाहिजे होते काय...??अगोदरच हिच्या घरचे लोक भारी डेंजर आहेत. राजकारण रक्ता रक्तात भरलेले आहे.बडेजावपणा भरपूर ठासून भरलेला आहे.



यानंतर पण आपण मात्र काळजी घ्यायची आता. परिस्थिती कोणतीही असो भावनांवर संयम बाळगायचा आता.

पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरील गोंधळल्याचे बेचैनीचे भाव पाहून मायरा म्हणाली....

"मोहित... तू असा गोंधळल्यासारखा का आहेस...???"



मोहित (गडबडून)..."

"नाही ...मी गोंधळलेलो नाही."

असे म्हणून तो तिच्या समोर केविलवाणे हसून दाखवू लागला. कारण तिला उत्तर देण्यासाठी त्याच्याजवळ उत्तर कोणतेच नव्हते...

काय उत्तर देणार होता तो...???😊


बंगल्याच्या बाहेरच्या परिसरात आल्यावर मोहितने मायराला हलक्या आवाजात प्रश्न विचारला...

."मायरा... एक विचारू...??"

"विचार."


"तुला खरंच माझा काहीही प्रॉब्लेम नाही. तू खरंच माझ्यासोबत आयुष्य घालवू इच्छिते."


त्याने असे म्हणताच तिच्या डोळ्यात अंगार फुलले.

आता एकांतात नव्हती म्हणून नाहीतर तिने त्याच्या कानाखाली जाळ काढला असता.

"तुझ्यासोबत मी आत्ताच माझं फर्स्ट कीस शेअर केलेय. तुला कळतोय का त्याचा अर्थ...??"


चालत चालत बोलताना एकदाच तिने त्याच्याकडे मान वळवून पाहिले तर त्या नेत्रांमध्ये लाली बरोबरच अश्रू तरळली होती....

ते अश्रू बघताच त्याच्या हृदयात धस्स झाले.....

आपण तिच्या प्रेमाचा न विचार करताच बोलून गेलो. तिच्या प्रेमावर आपण शंका घेतली.....असं कसं आपण बोलून गेलो... तिला जिव्हारी लागण्यागंत....

आता आपण तिला जवळंही घेऊ शकत नाही मनवण्यासाठी.. ते चालले होते तर त्याला जाणीव होत होती अगोदरच की त्यांच्यावर काही डोळे रोखलेले आहेत.


शांतपणे खाली मान घालून तो पुढे चालू लागला आता.


मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले शब्द सारखे बोचत असतात हृदयात.


त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर  समांतर पावले टाकू लागला...

गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....


🌹🌹🌹🌹🌹🌹