नियती - भाग 15 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 15






भाग 15


आणि त्याला थोडासा मोहित बद्दल... आपल्या मुलाचे वागणे हेही थोडे ...त्याला शंकाग्रस्त वाटत होते... मोहित आल्यापासून कवडूला थोडे वाटत होते की आपला मुलगा प्रेमात पडला आहे कोणाच्यातरी...






हा विचार येताच... कवडूच्या अंगावर भीतीचे शहारे उमटले..
धडधडते अंतकरण घेऊन कवडू.... बाबाराव यांच्या बंगल्याच्या गेट जवळ आला.... आणि....






वॉचमन जवळ कवडूने सांगितले की त्यांच्या मालकांनी त्याला बोलावले आहे. तर दोन वॉचमन पैकी एक वॉचमन बंगल्याच्या आत मध्ये निरोप घेऊन गेला.


तेव्हापर्यंत त्याला तिथेच बाहेर उभे राहावे लागले.

कवडू ला त्याचे विशेष काही वाटले नाही. त्याला आताही वागणूक तिथे सगळीकडे तशी मिळत असल्यामुळे अंगवळणी पडले होते.






आतून वॉचमन निरोप घेऊन आला.

कवडू ने तेथेच थांबावे बाहेर.... बाबारावच बाहेर येत आहेत त्याला भेटायला...

ऐकल्यानंतर कवडू तेथेच थांबून वाट पाहू लागला.








निरोप  दिल्यानंतर ही बाबाराव यांनी येण्यासाठी जवळपास एक तास लावला..




कवडू समजून गेला काहीतरी गडबड आहे अशी की ज्यामुळे आपल्याला ते सध्या तरी प्रत्यक्ष छळ नाही पण अप्रत्यक्ष त्रास देत आहेत.






बाबारावांच्या दराऱ्याला आधीच घाबरत असणारा कवडू....
ऊन अतिशय रखरखत होते तरी..... सर्वांग पूर्ण घामाने थबथबून गेले होते तरी ....खांद्यावरच्या फडक्याने घाम पुसत उभा होता.






संपूर्ण एक तास उलटून गेल्यावर भल्या मोठ्या त्या गेटमधून बाबाराव दमदार पावले टाकत तर चालत त्याच्या दिशेने येऊ लागले तर दुरूनच त्यांना पाहून कवडूचे अंतर्मन घाबरघूबर होऊ लागले.





गेटमधून बाहेर निघाल्यानंतर तसेच...ते तरतर पुढे चालत
निघालेल्या बाबारावांच्या मागे ....कवडूही निघाला...





मागे मागे गेल्यानंतर जेथे बाबाराव बसलेले होते तेथून आठ एक पावलांवर आपली मर्यादा ओळखून कवडू थांबला.



बाबारावांची एक जमीन होती.
तेथे एक झाड वडाचे होते आणि त्याच्याभोवती पार होती.
त्या पारीवर बाबाराव आता बसले होते.




गावातल्या नेमून दिलेल्या रीतीरीवाजानुसार कवडूने
त्रिवार मुजरा केला.
आता यावेळी बाबाराव त्याच्याकडे शांत पाहत होते.
हे लक्षात आल्यावर कवडूचे काळीज धडधडू लागले.






त्याच्या मनात सन्न विचार चालू होते.
तो.... तो बाबाराव आता काय विचारतील याचा विचार करत होता. आणि आपण काय बोलावे ....हेच त्याच्या डोक्यात शिरत नव्हते. 





त्यात कहर म्हणजे बाबाराव त्याच्याकडे एकटक जवळपास पाच मिनिट पाहत होते निव्वळ.







त्यांच्या त्या एकटक पाहण्यामुळे त्याच्या लक्षात येत नव्हते नेमके काय झाले आहे.. आणि बाबाराव असे आपल्याकडे का पाहत आहेत...??






बाबाराव शांत आवाजात म्हणाले...
"कवडू असा आणखी जवळ घे..??"






कवडू बिचकला.. एवढ्या मोठ्या माणसासमोर आणखी पुढे कसं जायचं...?? याच मोठ्या लोकांनी या गावात 
रीतीरिवाज लावलेली आहे.. 





आपण जर यांच्या जवळ गेलो आणि यांनी मग पुन्हा माझ्याजवळ का आलास...???
म्हणून गावच्या नियमाप्रमाणे शिक्षा ठोठावली तर..





या सर्व प्रश्नांमुळे .........कवडू समोर काही गेला नाही..
तो जेथे उभा आहे तेथेच उभा राहिला.




त्याला त्याचे पाय उचलण्याची अजिबात हिम्मत झाली नाही.. गोठल्यासारखा एकाच ठिकाणी उभा होता..







बाबाराव...
"घाबरू नकोस रे कवडू... इकडे ये."






कवडू....
"पण मालक..
तुम्ही आमचे मालक आहात... मी इथेच ठीक आहे.."






त्यावर बाबाराव प्रेमळ सुरात बोलले...
"अरे कवडू... आपण फार फार वर्षांनी एकमेकांशी बोलत आहोत... मला आठवते... माझी मोठी मुलगी वारली होती... तेव्हाच... माझं तुझ्याशी बोलणं झालं..... त्यानंतर आपले कधीही बोलणे होत नाही... आमचे तिकडे स्मशानाकडे येणे होत नाही... तरी इतका दूर राहून तू बोलणार का माझ्याशी...??"




आता तर त्यांचे बोलणे ऐकून कवडूचे पाय भीतीने लटपटू लागले.


बाबाराव एवढ्या प्रेमाने बोलतील त्याने कल्पनाच केली नव्हती. 






पण हे घडले होते मात्र .....
अगदीच वेगळे आज नवल वाटण्यालायक..
एवढा मृदू आणि गोड आवाज..




आयुष्यभर त्याने एवढे स्मशानात प्रेत जाळली..
प्रेतांसोबत आलेले मोठे मोठे लोक कधीही त्यांच्यासोबत बोलताना त्याला गोडवा जाणवला नव्हता..
आणि ......आज जिभेवर साखर घोळवली होती जणू याप्रमाणे बाबाराव बोलत होते.





घाबरत दबकत तो दोन पावले पुढे सरकला. पण तरीही त्याने ही खबरदारी घेतली की आपली सावली बाबाराव यांच्यावर पडू नये. कारण नेमके या गोडव्यामागे काय कारण आहे लक्षात येत नव्हते ....


कश्शा कश्शाचा बोध लागला नव्हता त्याला.... मग रिस्क कशी घेणार होता तो...????






बाबारावांनी विचारले.....
"कवडू... तुझा मुलगा काय करतो...???"





"सध्या घरी आहे जी.....!!!"





"कॉलेजात शिकला का रे तो...??"






"हो ..पंधरावी.. सतरावी का काय झाला..???...."





"तो आता घरी राहून काय करणार आहे मग...???"






"मालक... त्याला कोणतीतरी परीक्षा द्यायची आहे 
त्याचा अभ्यास करते तो..
ती परीक्षा झाल्यावर मग तो साहेब बनणार आहे...."






"नशीबवान आहेस रे बाबा तू.... चांगला मुलगा हुशार आहे तुझा.."

असे म्हणून भेदक नजरेने कवडू कडे बघू लागले बाबाराव.







कवडूच्या तोंडून उत्तर निघाले.. "हो"






बाबाराव डोळ्यात लाल अंगार घेऊन म्हणाले..
"किती पैसे हवेत तुला...??"






"जी ...मला पैसे कशापायी पाहिजे..??"

आत्ता कवडूचे लाईट लागायला लागले.... 






मोहित संबंधित काहीतरी गडबड आहे... 
तेव्हाच हा एवढा मोठा माणूस आपल्या शरीराचं बोटही आम्हाला दिसू देत नाही आणि आज माझ्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे तोही कडक बोलत..





"कवडू ...तुझ्या पोराला दिल्लीला पाठव..."






कवडू दचकला..
" दिल्लीला...?? काउन जी..??"






"त्याला पुढची परीक्षा द्यायची आहे ना..!! तेथे परीक्षेसाठी चांगले चांगले वर्ग असतात आणि त्यासाठी पैसा लागतो आणि मी तो पैसा त्याच्यासाठी पुरवणार..??"






"पण इतक्या दूर...??"








"आजपर्यंत तू कधी जवळ ठेवलं होता का त्याला..??..
दूरच नव्हता का तो आतापर्यंत..??"







"हो... हो...पण मी त्याला त्याच्या मामाजवळ ठेवलं होतं. मामाचा आधार होता त्याला..
दिल्ली म्हणजे फारंच दूर झाली जी..
तिथे तो एकटा कसा राहील...??"






"का ???....दिल्लीला पोरं जात नाहीत का? शिकायला.."





"जातात जी.. पण आमची घरवाली नाही जाऊ द्यायची."





"का..??"





"अहो मालक... लहानपणीच ती त्याला सोडून तिथे ठेवणार नव्हती..मीच जबरदस्ती त्याला बाहेर शिकायला ठेवलं होतं... काळजावर दगड ठेवून ठेवलं होतं आम्ही दोघांनी.. आता तो आलाय तर आमचं मन नाही होत.. आणि पारू तर.. तिचं तर काळज फाटून जाईन जी...
आता तर ती त्याच्या मामाजवळ सुद्धा पाठवायला तयार नाही... आणि तुम्ही दिल्लीची गोष्ट करता..."






"कवडू...तुला माहितीये कलेक्टर केवढा असतो..??."






कवडू परत गोंधळला.

"जी खूप खूप मोठा असतो असं म्हणतात जी..
म्हणजे आमचा मोहित सांगतो तसा.. की कलेक्टर म्हणजे राजासारखा असतो...."






"बरोबर कवडू.. माझ्यापेक्षाही मोठा असतो कलेक्टर..
तुझा मोहित जर असा मोठा कलेक्टर झाला ....तर तू ...
या स्मशानाजवळच्या झोपडीत राहणार नाही असं आम्ही पाहू... तू आणि पार्वती ....आपल्या कलेक्टर मुलासोबत एका बंगल्यात राहशील.. असं होईल....बरोबर की नाही.."






"हो जी..पण.. आत्तापर्यंत त्याला त्याचं सत्य माहित नव्हतं ....आत्ताच आम्ही सांगितलं आहे... आतापर्यंत आम्ही दोघे बुचकाळ्यात होतो ....त्याला कसं सांगावं... ???
आणि सांगलं तर तो कसा राहील... ??
आम्हाला दोघांना स्वीकारणार की नाही स्वीकारणार.. ??
असं होतं की सगळं.... पण आता सगळं चांगलं झालं आहे ...त्याने आम्हाला स्वीकारलेलं आहे आई-बाबा म्हणून..
तर आता कसं... ??....मन मानत नाही..मालक...."






"हे बघ कवडू ....त्याला पाठवायसाठी लागण्याचे जे काही असेल ते... सर्व मी पाहून घेईन... तिकडे दिल्लीत कोणते वर्ग चांगले आहे ....??....कुठे प्रवेश घ्यायचा....?? तेही मी पाहून घेईन. तू फक्त पार्वतीचं मन तयार कर."






" ते कसं होणार मालक....??
...या गोष्टीसाठी जेव्हा मोहित लहान होता आणं त्याला बाहेर शहरात मामाकडे पाठवायचं होतं.....तेव्हाच आमच्या दोघांमध्ये वाद होत होते.लय भांडण भांडण व्हायचे आमचे .....दोघांचे सारखे...लय प्रयत्न करून तिला समजवावे लागले होते. मला तर समजलीच नव्हती पण तिच्या भावाला ही समजत नव्हती.. ......कसं वंसं तिच्या भावाने तिला समजावलं.. नंतर ही ...किती किती दिवस मला टोमणे मारत होती ती.. ?? आता मी कसं समजावू तिला...??
तुम्हीच सांगा मालक..!!"






"जसं तेव्हा समजवलं तसंच आताही समजव...
 इतके वर्ष तो शहरात राहिला..आता फक्त दोन-तीन 
वर्ष तर ठेवायचे आहेत..
एवढी कळ सोसली म्हणजे मोहित एक मोठा व्यक्ती होईल ....राजासारखा....तुला नको आहे का ते....??..."






"जी मालक पोरगा मोठा होईल ....राजासारखा बनल...
ते कोणाला नको असणार..???"





पण आता कवडू फारच गडबडला. त्याला बाबाराव यांना आता उत्तर काय द्यावे हेच मुळी समजत नव्हते.





बाबाराव अशा प्रकारचं काहीतरी आपल्या पुढ्यात मांडतील हे त्याच्या  ध्यानीमनीही नव्हते.....






इकडे त्याला नीट मान वर करून बाबाराव यांच्या नजरेत नजर मिळवणे हेच शक्य होत नव्हते आतापर्यंत.



आताही तर तो खालीच बघत होता किंवा इकडे तिकडे बघत होता. त्यांच्या नजरेत क्षणभर सुद्धा स्थिर पाहिले नव्हते.
त्याच्याने तेवढे धैर्य झाले नव्हते आतापर्यंत.
......आणि होणारही नव्हते..






त्याचवेळी नेमके बाबाराव यांच्या मनातही विचारांमध्ये संघर्ष सुरू होता.



आपण सांगतोय ते कवडूला कितपत पटेल.??...
जे घडलं आहे ते कवडूला किती माहीत आहे...?? याचाही थांगपत्ता लागत नव्हता त्यांना.




ते बोलण्या बोलण्यात कवडूच्या चेहऱ्याकडे एकटक बघत अंदाज घेत होते की कवडूला किती माहित आहे मायरा आणि मोहित बद्दल....???




पण काही एक त्यांच्या डोक्यात शिरत नव्हते .
कवडूच्या वागण्यातून काहीच कळत नव्हते.
त्याच्या चेहऱ्यावरूनही काही भेद ...बोध घेता येत नव्हता.






बाबाराव विचार करू लागले की....
कवडूला आपण जाणीव करून द्यावी का मायरा आणि मोहित बद्दल....??



एकदा का कवडू आणि पार्वती यांच्या मनाची तयारी झाली .....की ते मोहितला आठ दिवसाच्या आत दिल्लीला पाठवू शकत होते ...आणि तो परत येईपर्यंत मायराचे लग्न उरकून घेऊ शकत होते.



भरपूर अवधी मिळणार होता त्यांना...






यावेळी त्यांनी...
राजू च्या वेळी विचार केला होता त्याप्रमाणे .......




🌹🌹🌹🌹🌹