नियती - भाग 16 Vaishali Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 16






भाग 16



बाबाराव विचार करू लागले की....

कवडूला आपण जाणीव करून द्यावी का मायरा आणि मोहित बद्दल एकदा का कवडू आणि पार्वती यांच्या मनाची तयारी झाली .....की ते मोहितला आठ दिवसाच्या आत दिल्लीला पाठवू शकत होते ...आणि तो परत येईपर्यंत मायराचे लग्न उरकून घेऊ शकत होते. भरपूर अवधी मिळणार होता त्यांना...

यावेळी त्यांनी...
राजू च्या वेळी विचार केला होता त्याप्रमाणे .......





यावेळी बाबाराव यांनी तसा विचार केला नव्हता. यावेळी त्यांना काही वाईट करण्यापेक्षा चांगलं करून घराण्याची जाऊ पाहणारी इज्जत आपण वाचवावी आणि असं जर झालं तर आपल्या नशिबी एक पुण्य पडेल..
यावेळेस त्यांनी असा विचार केलेला होता.

आणि इकडे कवडू च्या वागण्यातून काहीच कळत नव्हते.
आता त्यांनी पक्का विचार केला की कवडूला याची जाणीव द्यावी.




ते बराच वेळ वाट पाहत बसले की कवडू काहीतरी बोलेल. कवडू काही बोलत नव्हता तो निव्वळ उभा होता.


बाबाराव...
"काय विचार केला आहेस कवडू मग..??"





कवडू हळव्या शब्दात म्हणाला....
"मालक ....पाठवू शकत नाही जी आता. मनच नाही होत आता.. पारुला तर ते नकोच आहे.. पण मला पण आता पोराला सोडून राहू नाही वाटत."






आता बाबाराव यांनी ओळखले की समजावून सांगून काहीही फायदा होत नाही आहे. आता ते मनातून खडबडले होते. पण अजूनही त्यांनी आपल्या चेहऱ्यावर राग दिसू दिला नव्हता.. असं त्यांना वाटत होते. पण कडू ने ओळखले होते त्यांचे डोळे पाहून.. त्यांच्या डोळ्यातून लाल अंगार बरसत होते.






मोहितला पाठवायला दोघेही आता तयार होणार नाही याची खात्री त्यांना झाली.





बाबाराव आता मात्र कठोर आवाजात....
"तुला माहित आहे का मी कशाला बोलवलं आहे...??"





त्यांचे डोळे लाल होते त्याच्यापेक्षा जास्त लाल भडक झाले.. आवाजातला आणि डोळ्यांतला फरक कवडूला लगेच समजला.
"नाही... मालक..."




"तुझा पोरगा कोणते धंदे करते माहिती तरी आहे का..??"





"नाही..."

बोलताना कवडूचा आवाज गडबडला होता.




कितीही नाही म्हटलं तरी तो घाबरलेला आहे हे चेहऱ्यावरून दिसत होतं स्पष्ट....





बाबाराव...
"तुझा पोरगा माझ्या पोरीशी लग्न करतो म्हणाला तर तू त्याला काय म्हणशील...??"




हे बोलताना बाबारावांचा आवाज हळू पण तलवारीच्या धारेसारखा धारदार होता.





"नाही ...असं होणार नाही.."




बाबाराव...
"हे सत्य आहे कवडू... शहरातून आल्यापासून रोज ते चोरून एकमेकांना भेटत असतं. माझ्या कारभार्याने चार दिवस पाळत ठेवली तेव्हा आता सांगत आहे मी तुला."





कवडू..
"पण असं कसं होईल मालक.. तो माझ्या शब्दावर नाही. तसा फार शहाणा आहे तो... मी त्याला सांगेन समजवून."





बाबाराव...
"तसं असेल तर तुझ्या दृष्टीने चांगलं होईल. हे बघ आपण आता जुनी माणसं .. पोरं ऐकतीलच असं गृहीत धरून चालतो... पण त्यांचे विचार फार वेगळे असतात आणि आपले वेगळे.."




कवडू...
"हो मालक.."





बाबाराव...
"तो शिकलेला आहे.बरीच वर्षे बाहेर राहिलेला आहे. त्यांने हट्टच धरला तर तू त्याच्या मनासारखं ही करशील तुमच्या दोघांचेही त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे...
मला तर असं वाटतंय एकच पर्याय आहे. त्याला दिल्लीला परीक्षेच्या तयारीसाठी पाठवून द्यायचं आणि इकडे मायराचे लग्न करून घ्यायचं."


बाबारावांचं संपूर्ण ऐकत कवडू केवळ हूंकार भरत होता.
त्याला धक्का हा सामान्य नव्हता... तो स्वतःला सावरु शकला नव्हता.




जे सत्य त्याच्या समोर होते ते त्याने स्वप्नातही विचार केले नव्हते. स्वतःच्या कानावरच त्याचा विश्वास बसत नव्हता आतापर्यंत.




कवडू...
"मालक ....मी त्याला सांगून पाहतो... दिल्लीला जाण्याविषयी... नाहीतर त्याला शहरात पाठवून देतो त्याच्या मामाकडे..."





बाबाराव...
"ते ठीक आहे.... पण शहरापेक्षा दिल्लीला जाणे बरे राहील.. त्याचं पुढचं शिक्षण ही होईल... शहरात त्याच्या मामाकडे ठेवला म्हणजे धोकाच आहे.... इथं जवळजवळ झालं ना ते... शहरामध्ये जायला कितीसा वेळ लागतो..
समजाव त्याला ...नाही समजला तर माझ्याकडे पाठव."





कवडू...
"कशासाठी मालक मी समजावण्याचा त्याला आटोकाट प्रयत्न करीन."




बाबाराव....
"त्या राजूचं काय झालं माहित आहे ना तुला..!! मोहित बद्दल तसं काही नाही झालं म्हणजे मिळवलं."





हे ऐकताच कवडू चरकला... भेदरून तो बाबाराव यांच्या तोंडाकडे पाहत राहिला कारण राजू बद्दल त्याला सर्व माहीत होते. कवडूच्या हृदयाचा थरकाप उडाला होता.





बाबाराव...
"आता जा तू... आपल्या परीने पोराला समजवण्याचा प्रयत्न कर.. आणि जसे माहित झाले की तो तयार आहे तसं लगेच मला कळव."





जड पावलांनी तो परत निघाला. फार मोठे ओझे त्याच्या मनावर होते. आपला पोरगा बहुतेक प्रेमात पडला आहे याची त्याला भनक लागली होती पण तो एवढ्या मोठ्या हस्तीच्या पोरीच्या प्रेमात पडेल असे त्याला वाटले नव्हते.





त्याचे मन पूर्णपणे खचून गेले होते. तो स्मशानाजवळ आला आणि त्याने आपल्या घराच्या दाराच्या जवळच खाटेवर भेटून मोहित पुस्तक वाचत असताना पहिले.
आणि त्याला खूप खूप गलबलून आले.





मोहितचे लक्ष त्याच्याकडे गेले तर 
मोहित ने विचारले...
"बाबा.. इतक्या वेळ कुठे होता तुम्ही..??"





कवडू...
" गावात गेलो होतो.."





मोहित...
"बाबा तुम्हाला बरं नाही आहे का...??"





थरथरत्या अंगाने कवडू खाटेवर एका बाजूने बसला आणि खांद्यावरच्या पंचाने चेहरा पुसून घेतला..
तर मोहितने ओळखून आपल्या बाबासाठी एक ग्लास पाणी आणून दिले.




पाणी प्यायला नंतर थोडेसे हायसे वाटले कवडूला.




आता हळूच कवडू म्हणाला मोहितला...
"मोहित ..ये इथं बस.."




मोहित बाजूला खाटेवर बसल्यानंतर कवडूने त्याचा एक हात डाव्या हातात घेतला. आणि मोहितकडे पाहून थरथरत्या आवाजात बोलू लागला..
"मोहित ..मी जे गावात ऐकले ते खरे आहे का..???"





मोहित....
" काय ऐकले बाबा तुम्ही...??"






कवडू...
"हेच की ओढ्याकडे तू बाबारावच्या मुलीसोबत हूंदळत असतो."





मोहितच्या तोंडून काहीही शब्द फुटले नाही. तो फक्त आपल्या बाबांकडे पाहत राहिला. त्याला वाटलेच नव्हते की इतक्या लवकर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. 





त्याला फक्त एवढेच वाटत होते की आतापर्यंत त्या दोघांची गोष्ट बाबारावापर्यंत नक्कीच पोहोचली असेल.





कवडू...
"मोहित... आपण स्वतःच्या मर्यादा ओळखायला हव्या. कोणताही बाबारावसारखा माणूस आपल्या पोरीचं लग्न तुझ्याबरोबर लावून देऊ शकणार नाही. 
ते आपले मालक आहेत या गावात आणि मालकाच्या पोरीसोबत जर आपल्यासारखे हिंडत फिरत राहिले ...प्रेमात पडत राहिले ....तर बापू !!..
ते आपल्याला जिवंत सोडत नाहीत."






मोहित...
"पण बाबा ते...."





कवडू.....
"खरं.. काय आहे ते ऐकायचे मला"
कवडूचा आज आवाज चढला होता.. डोळे लाल लाल निखाऱ्यासारखे झाले होते.. एवढा आवाज वाढला त्याचा की त्याच्या आवाजाने आतमध्ये काम करत असलेली पार्वतीही त्यांच्या जवळ आली.





मोहित.....
"हो बाबा... आमच्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. आणि बाबा मी काही तिच्या मागे लागलेलो नव्हतो.. तीच माझ्या मागे लागली होती.. पण मग नंतर मला ती आवडू लागली.. आणि आता खरंच आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे हो..!!"






पार्वती आश्चर्याने पाहू लागल्या मोहितकडे... त्यांच्या मनात विचार आला... दादू कडे शब्द दिला आहे लग्नाबद्दल त्याचं काय....?? तो किती किती आकांत तांडव करेल...??.. सर्व हे असं ....त्यांच्या मनात येत होते पण आज पहिल्यांदा कवडू रागात असल्यामुळे त्यांनी आपले शब्द गिळून घेतले.. आणि चुपचाप पाहत राहिल्या आणि दोघांचे संभाषण ऐकत राहिल्या.





कवडू....
"पण तू तर हे परीक्षा का का ते देणार होता ना...!!"





मोहित...
"बाबा...!!!  अहो ....मला परीक्षा तर द्यायची आहेच. त्याचाच तर अभ्यास... अभ्यास करत असतो मी सारखा."





कवडू....
"बापू.. तू असं काय.. करतो..... 
हे पाहा.. मी तुझ्या शिक्षणाखातर  पूर्ण पैशाची तडजोड केली आहे. तुला मार्गदर्शन चांगले मिळावे म्हणून मी चांगल्या ठिकाणी तुझं नाव घालत आहे... म्हणजे तुझा तेथे अभ्यास चांगला होईल आणि मग तू साहेब बनशील."





मोहित....
"बाबा ....ते ठीक आहे हो...!! पण मला जायला लागलं तर सहा महिने तरी जावे लागतील निदान.. आणि मग इकडे मायराच्या वडिलांनी काही केलं तर..."






इकडे मोहितनी असे म्हणताच कवडू मनातून चुकचुकला
त्याचं खरंच तर होतं... बाबारांवांचा प्लॅन तोच तर होता.
तो तिकडे गेला की हे इकडे मायराचं लग्न उरकून टाकणार होते...
त्यांनी मायरासाठी मुलगा पाहूनच ठेवला होता सहा महिन्याच्या अगोदरच. बोलणी पण करून ठेवली होती बाबारावांनी...





.....
मोहित विचार करत होता सारखा. बाबांच्या बोलण्यावरून त्याला अंदाज आला होता की बाबाराव यांना सर्व माहीत झालेले आहे.





आता बाबांशी बोलणं झालं तेव्हापासून मोहितचे वाचनात मन लागत नव्हते. इकडे कवडू ला सुद्धा धास्तावल्यामुळे हात पाय अंग ढिले पडल्यासारखे वाटत होते... 



पार्वतीही विचारांमध्ये गुंग झाल्या ...एवढे वर्ष आपल्या दादूने मोहितला सांभाळले ...त्याला शिकवले आणि त्याने आपल्या पोरीचं लग्न न करता.... याच्यासाठी थांबवून ठेवली. आणि तो तर मुलुखाचा हेकड आहे.. करावं तर काय करावे..?? पोरांनं पंचायत आणली बाबा आता..??
आणि पार्वतीला तशीही आपल्या भावाची पोरगी आवडत नव्हती... पण कवडू यांनी शब्द दिल्यामुळे त्या तयार होत्या...
पण आता त्यांना हे माहित झाले की दादूची पोरगी तर मोहितने बादच केली... आणि आवडली कोण..??
तर बाबाराव ची पोरगी.....???





तेवढ्यात मोहित चा फोन व्हायब्रेट झाला....
तसा तो आपल्या जवळचे पुस्तक त्याने ठेवून दिले आणि तो उठला...





फोन त्याच्या पॅन्टच्या खिशात व्हायब्रेट होत होता.. पण ती व्हायब्रेशन मोड वरची गुणगुण ऐकू जाऊ नये म्हणून तो ताडताड बाहेर निघाला....
आणि....
🌹🌹🌹🌹🌹