आई चा जागर LOTUS द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आई चा जागर

या कथेत, एका छोट्या गावात नवरात्रीच्या उत्सवाची तयारी चालू होती. गावातील लोक मोठ्या उत्साहाने जगदंबेची स्थापना करणार होते. प्रत्येक घरात देवीच्या आगमनाची तयारी जोरात सुरू होती. मात्र, या सणाच्या मागे असलेल्या काही सत्यांची आणि समाजातील विरोधाभासांची चर्चा केली जात होती.

गावातील काही सुशिक्षित लोक, ज्यांनी आपल्या घरातील महिलांना सतत कमी लेखलं, आज देवीचा जयघोष करत होते. त्यांच्या चेहऱ्यांवर असलेला उत्साह आणि त्यांच्या कृतींमध्ये असलेला दुरावा लपवला जात नव्हता. ज्या लोकांनी स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांनी त्रास दिला, तेच आज स्त्रीशक्तीची पूजा करत होते.

एका घरात, शांता नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी काही लाखांसाठी छळलं होतं. मात्र, आज त्याच घरात देवीची स्थापना करण्यात येत होती. शांता मनातल्या मनात विचार करत होती, "आई, तुझ्या नावाने तूझी घटस्थापना होणार, पण माझ्या दुःखाचं काय?" 
गावातील चौकात काही तरुण मुलींची छेड काढणारे सत्ताधारी, "बेटी बचाओ" च्या घोषणा देत होते. त्यांचं वर्तन आणि घोषणा यांच्यातील विरोधाभास स्पष्ट दिसत होता. अंकिता नावाच्या एका मुलीच्या हत्येचा आवाज अद्यापही गावात घुमत होता.

नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस चप्पल न घालणारे भक्त, घरात आपल्या पत्नीला गुलामासारखं वागवत होते. त्यांची देवीभक्ती आणि घरातील वर्तन यात तफावत होती.

यात आणखी एक घटना होती, जिथे एका गर्भवती स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला निर्दोष सोडण्यात आलं होतं. गावातील लोक विचार करू लागले होते, "सांग आई, असे कितीदिवस चालणार? खरच अश्याना तू पावणार की कोपणार?"

गावातील महिलांनी एकत्र येऊन ठरवलं की, या विरोधाभासांवर प्रकाश टाकायचा. त्यांनी नवरात्रीच्या उत्सवाचं खरं सार समजून घेतलं आणि ठरवलं की, देवीची पूजा करायची तर तिच्या रूपातील प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या ह + मागणी केली.
उत्सवाचा शेवट झाला तरी गावातील महिलांचा हा लढा सुरूच राहिला. त्यांनी ठरवलं होतं, "देवी फक्त देव्हा-यात नाही, मनातही बसवा." त्यामुळेच त्या वर्षीचा नवरात्री उत्सव खऱ्या अर्थाने सफल ठरला.

आई तुझी घटस्थापना होणार

पोटात मूली मारणारे सुशिक्षित लोक जगदंबेची स्थापना करणार आई तुझ्या नावाने तूझी घटस्थापना होणार

काही लाखासाठी सुनेला जिवंत जाळणारे नाहक सुनेला छळणारे आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजणार आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार

भर चौकात सोडलेल्या सांडासारखे उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या मूलीबाळींची छेड काढणारे बेटी बचाओ म्हणणारेच सत्ताधारी ऊत्तराखंडात अंकिताला मारणार नऊ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार
नवरा म्हणुन बायकोला रोज गुलामासारखे वागवणारे रोज सकाळी शीलवान बनून मंदिरात जाणार आई तुझ्या नावाने घटस्थापना होणार

गरोदर स्री वर बलात्कार करणा-यांना निर्दोष सोडणार सांग आई असे कितीदिवस चालणार ? खरच अश्याना तू पावणार की कोपणार मातृत्वाची हेळसांड स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या पाखंडी भक्तांमुळे हे खड्गधारी काली हे करवीर निवासिनी अंबे हे जगदंबे तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार

मणिपूर अन ऑलिंपीक मेडल विजेत्या मूलींचा लैंगिक छळ करणार छळ करणारा राजरोस अजून मोकाट फिरणार अन कूणीच तीथे नाही फिरकणार आई तूझ्या नावाने तूझी घटस्थापना होणार

कूणाच्या प्रभावात जगू नका की, कूणाच्या अभ जगू नका. हे जीवन तुमचे आहे. तुमच्याच स्वभ जगा. 
प्रेम बालपणी फुकट मिळते. तरूणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे.

आपल्या प्रत्येक व्यक्तिच्या घरात एक चालती बोलती

लक्ष्मी पाणी भरती आहे. अन्नपूर्णा होऊन भोजन बनवते आहे. गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे दुर्गा होऊन संकटांशी सामना करते आहे ... कालिका, चंडिका होऊन घरांचे रक्षण करते आहे

तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा देवी फक्त देव्हा-यात नाही मनातही बसवा ... मुर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार आपण सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा.

तूमचा आजचा दिवस सूखसमाधानात आनंदात जावो