कथानक्षत्रपेटी - 2 Vaishali Sanjay Kamble द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथानक्षत्रपेटी - 2




2.सावज अडकलंय...

.

.

.

.

.

‌.

.

.

.

.




पुण्याच्या एका सुखवस्तु बंगल्यात एक यंग लेडी  जवळपास 65 वय वर्षे असलेल्या स्त्रीला बेल्ट ने मारत होती.


त्या दोघी होत्या ती रूम साऊंड प्रुफ होती त्याच्यामुळे बाहेर आवाज ऐकायला येत नव्हता.




त्या यंग लेडीचे नाव होते रैना आणि त्या स्त्रीचे नाव जिला बेल्ट ने मारलं जात होतं त्यांचं नाव जया कारखानीस .

जया  मार खाण्यामुळे त्यांचं रडणं सुरू होतं. त्यावेळी घरी कोणी नसल्यामुळे बेडरूमचे दार बंद होतं म्हणून हॉलकडील आवाज आतमध्ये येत होता.





मारणारी रैना त्यावेळी एवढी क्रूर वाटत होती की जयाच्या अंगावरील वळ पाहून सुद्धा तिला पाझर फुटत नव्हता.




एवढ्यात दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे रैनाचा हात थांबला आणि 
ती जयाला म्हणाली...
"कुणीतरी बेल वाजवत आहे म्हणून तू वाचलीस अन्यथा तू मेली तरी मी मारत राहिले असते .एका कोपऱ्यात चुपचाप पडून बस . फक्त दोन दिवस झाले उपाशी आहेस .
पण हे लक्षात ठेव...जोपर्यंत तू माझं ऐकणार नाही तोपर्यंत तुला जेवण भेटणार नाही."






हातातला बेल्ट रैना जोऱ्याने बाजूला टाकते आणि
रूमच्या बाहेर येताना दरवाजा लावून घेते.

हॉलमध्ये येऊन मेन डोअर उघडल्यानंतर दारावर तिला इन्स्पेक्टर आणि तीन पोलीस शिपाई दिसतात.


रैना..."पोलीस."





ऑफिसर...
"आम्ही तुमच्या घरची तलाशी घ्यायला आलेलो आहे."





रैना..
"पण माझ्या घरची तलाशि का??? सर."
"सर !!! आपण  कोणाच्या घरी असं कसं आत मध्ये येऊ शकता??? तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का???"





ऑफिसर...
" हे बघा सर्च वॉरंट!!!"
असं सांगून ऑफिसर शिपायांसोबत घरात प्रवेश करतो. घरात प्रवेश केल्या केल्या पोलीस इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागतात.


रैना..
"सर  पण तलाशि का घ्यायची आहे???
मी केलं काय आहे???"





रैनाचे काही ना ऐकता ऑफिसर आत येऊन .....तो सुद्धा तपासणी करायला लागतो हे बघून...





रैना.. 
"सर ....समजून घेण्याचा प्रयत्न करा... प्रथम मला सांगा.
मी केलं काय आहे??? मी काहीही केलेले नाही."





ऑफिसर...
"मॅडम .....तुम्ही जर काही केलं नाहीये तर तुम्हाला परेशान होण्याची काय गरज नाही.... आम्ही आमची तलाशी घेऊन चालले जाऊ!!!
फार फार तर अर्ध्या तासाची गोष्ट आहे."




रैना.. 
"सर ...पण माझी काही चुकीच नाहीये तर
माझ्या घरची तर तलाशी  का घेत आहात???"




ऑफिसर...
" ठीक आहे.... मानलं की... तुम्ही काही केलं नाही.
तर प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला ...
बस !! तलाशी तर घेत आहे... तुमच्या घरची ....जर सर्च
वॉरंट तुमच्या घरचा निघाला आहे तर  प्रॉब्लेम काय आहे????"




रैना.. 
"पण मला रिजन माहित पाहिजे ना !!!!
काही प्रॉब्लेम झालाय का???"





ऑफिसर...
"हे बघा !! मॅडम ....आम्ही ते सांगू शकत नाही .फक्त थोड्यावेळाची गोष्ट आहे."




रैना..
"पण जर मी केलंच नाही काही तर तुम्ही माझ्या घरी का आला आहात???"





ऑफिसर...
"मॅडम हे बघा !!!सर्च वॉरंट.... मी तुम्हाला दाखवला आहे तेव्हा आता जास्त अडचण आणली ना!!!
तर तुमच्या विरोधात लीगल ॲक्शन घ्यावी लागेल."






तेव्हा एका खोलीतून एक शिपाई आवाज देतो....
" सर !!! या खोलीतील ही अलमारी लॉक आहे.
खुलत नाही."


मग हॉल मधून ऑफिसर आणि  रैना त्या खोलीत येतात.
तर तीनही शिपाई ते अलमारी जवळ उभे दिसतात.




ऑफिसर...
"तर ...हे लॉक आहे.... मॅडम ह्याची की मिळेल??"


रैना.. ड्रेसच्या गळ्याजवळून हात टाकून चाबी काढून देते.


चाबी दिल्यानंतर वॉर्डरोब खोलतात पण काही आढळत नाही.






ऑफिसर...
"याच्यात तर काही विशेष नाही ."
"बाकीचे रूम्स चेक केले काय???",शिपयांकडे पाहून ऑफिसर विचारतात...





रैना..
"सर ....तुम्ही शोधत काय आहे ते मला सांगा तर खरं!!!"




ऑफिसर...
"मॅडम,    जे आम्ही शोधत आहोत ना ते सांगितलं तर तुमचे होश उडतील आणि  तुम्हाला खरं तर माहिती आहे की आम्ही काय शोधत आहोत तेव्हा तुम्ही कॉपरेट कराल तर बर असेल."





रैना..
"अशी कोणती वस्तू आहे सर???"





ऑफिसर...
" सही आहे !!! एक्टिंग खूप छान करता तुम्ही!!!
एकट्या राहता तुम्ही इथे???"



रैना..
"हो सर ...मी एकटीच राहते इथे!!!"





ऑफिसर...
"आई वडील??"





रैना..
" गावाला असतात."





ऑफिसर...
"शिकण्यासाठी राहता तुम्ही??"





रैना.. 
" सर !! मी डॉक्टर आहे."





ऑफिसर...
" छान आह हे!! अरे आपल्या पैकी कुणी.."





रैना..
"मी एमबीबीएसच्या लास्ट वर्षाला शिकत आहे."



ऑफिसर...
" अरे !!! आता तर तूम्ही म्हणाला डॉक्टर आहे आणि आता तर खोटं बोलता!!!"



रैना..
"म्हणजे आता मी बनणारच आहे . बस!!! मी लवकरच पास आऊट होईल... संपलंच आहे .."






ऑफिसर...
" चला ..ही चांगली गोष्ट आहे.
चला रे ....दुसऱ्या रूम पहा."






रैना..
" सर तुम्ही घरची तलाशी का घेत आहात ते सांगा ना!! प्लीज , तुमच्या पोलिसांना थांबवा.
त्यांनी माझ्या घरात पूर्ण पसारा केलाय ....
आता सगळं घर असतं व्यस्त करत आहेत"







ऑफिसर...
," मॅडम शांत बसा तुम्ही.... सर्च वॉरंट दाखवल्यावरही तुम्ही कोआपरेट करत नाहीयेत .....आमचे काम करू द्या .
जर तुमच्या घरी काही मिळालं नाही  तर काय प्रॉब्लेम नाही ना!!!"



ऑफिसर.....
"तसे तुम्हाला बघून असं वाटतं की
तुम्ही घाबरल्या आहात.
काय लपवत आहेत सांगा तुम्ही???"





रैना..
"सर  , मला समजत नाहीये ...तुम्हाला काय
म्हणायचं आहे ???? मी एक सभ्य घरातील मुलगी आहे.
अशी काम करत नाही जे तुम्ही तलाशी घेत आहात."






ऑफिसर...
"मॅडम... तुम्ही मला खूप अडचणीत आणत आहात. मघापासून...
जर तुम्ही कॉपरेट नाही ना केले आणि तुमच्या घरून असं काही मिळालं जे आम्ही शोधतोय तर पहा ....तुम्हाला पूर्ण जीवन जेलमध्ये राहावं लागेल."






ऑफिसर हॉलमध्ये येऊन तिथल्या सोप्यावर बसतो आणि शिपाई रूम्स मध्ये तपासणी करत असतात.
तेवढ्यात रैना ऑफिसर साठी पाणी पिण्याला घेऊन येते.





रैना ..."सर पाणी."





ऑफिसर..." थँक्यू ....सो मच."






रैना..
"सर काही सापडलं"






ऑफिसर...
"नाही आतापर्यंत नाही पण लवकरच मिळेल."





रैना..
"सर ...तुम्हाला तलाशी घेऊन कोणताही फायदा होणार नाही.माझ्या घरी तुम्हाला काही मिळणार नाही. मी सभ्य घरातली मुलगी आहे."






ऑफिसर...
"हो. मी कुठे म्हटलं की असभ्य घरातली मुलगी आहे.
प्लीज तुम्ही सुद्धा आम्हाला सभ्यपणे काम करू द्या."
"नाहीतर आमच्या जवळ खूप साऱ्या पद्धती आहेत माहिती करून घ्यायच्या...
प्लीज... तुम्ही आपलं काम करू शकता आम्ही आमचं काम करतो."






इन्स्पेक्टर ने असे म्हटल्यानंतर ती हळूच  स्वतःच्या बेडरूममध्ये जाते.





रैना.....
"हे म्हातारे ..तोंडातून आवाज बिलकुल काढायचं नाही सांगून ठेवते."





जया...
"मला जेवण देऊन दे. मला खूप भूक लागली आहे."






रैना..
"हे बघ ...जास्त आवाज काढू नकोस... बाहेर पोलिस आलेली आहे.."





जया...
"पोलीस.... पोलीस.."





रैना..
"तुला सांगितलं ना....जास्त चपडचपड करू नको ...
जास्त चलाखी केली ना तर मी मारून टाकेन आणि जर चुपचाप राहशील..  एका जागी पडून राहिली तर संध्याकाळी जेवण देईन."

असे म्हणून रैना जयाला कोपऱ्यात ढकलते  आणि बेड वरून डबल बेडची बेडशीट काढून तिच्या अंगावरून पूर्ण पांघरून देते जणू ते कपड्याचा ढीग पडलेला असावा असे दिसेल.





रैना..
"जर कुणी रूममध्ये आले ना तर !!! तू आवाज करायचा नाही सांगून ठेवते...चुपचाप एका ठिकाणी  चादर खाली 
रहायचं."




इन्स्पेक्टर....
" काय रे ??? झाले का सगळे रूम बघून???"








शिपाई ....
"एक रूम बाकी आहे."





ऑफिसर...
" त्या रूमचा का तपास केला नाही???"






शिपाई
"सर !!!! त्या रैना मॅडम म्हणत आहे की त्यांची ती पर्सनल रूम आहे."






ऑफिसर...
"असं म्हटलं त्यांनी ???पर्सनल रूम आहे???
चला माझ्यासोबत तपासणी करायला."



रैना..
" सर ...सर ..माझी ती पर्सनल रूम आहे.. तुम्ही त्याची तपासणी करू शकत नाही."






ऑफिसर...
"हे बघा मॅडम !!! कोआपरेट करा ....सर्च वॉरंट घरातल्या प्रत्येक रूमसाठी आहे आणि आम्ही आमचे काम करतोय."

सर्व रूम मध्ये आल्यानंतर डबल बेड वरील गाद्या अशाच ठेवून होते ....त्यांच्यावर बेडशीट नव्हती...






रैना कडे पाहून ऑफिसर.......
" ही रूम अशी का दिसतेय??? गाद्या वगैरे..."





रैना..
" सर ...या रूमची साफसफाई करत होती मी ...बेडशीट .. सगळे काढून मी ठेवतच होती..
एका जागी जमा करून ठेवले ....तेवढ्यात तुम्ही आले हे बघा या कोपऱ्यात..."






ऑफिसर...
"फक्त बेडशीट असल्यावर एवढा मोठा ढीग...."





रैना..
"माझ्या पर्सनल गोष्टी आहेत ज्या फेकायचे असतात आणि गंदे कपडे धुवायचे आहे."


शिपाई अलमारी वगैरे चेक करतात आणि काहीही आढळत
नाही तर..





ऑफिसर.....
"चला रे ...सगळे झाले.... तपासणीत काहीही आढळले नाही."


  ते परत निघून हॉलकडे येतात.


रैना.. छातीवर हात ठेवून  समाधानाचा सुस्कारा घेते.







रैना..
"बरं झालं ...काही सापडलं नाही... मी वाचले. काय पाहिजे होतं ते समजलं नाही .
आणि सर्च वॉरंट कसं काय आला माझ्या नावाने??? कुणी कंप्लेंट केली असेल???  "
बेडशीटच्या जवळ त्याकडे पाहून.." थोडक्यात वाचले आज बरं झालं.... सगळे गेले."
असं म्हणून निष्काळजीपणे रूममधून दरवाजा तसाच ठेवून हॉल कडे येते.







दोन-तीन मिनिटानंतर ती हॉलमध्ये येते तर
हॉलमध्ये रैनाचा मित्र अनुज सोप्यावर बसलेला असतो आणि त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर ....सुद्धा हसत मजेदार गोष्टी करताना दिसतात.






रैना..
"अनुज... तु इन्स्पेक्टर सोबत काय करत आहे."





अनुज..
"अरे हा ......हा माझा मित्र आहे."





रैना..
"काय ??? हा काय फालतूपणा आहे??"
" काय ??? हा पोलीस मध्ये नाहीये..."





अनूज बोलण्याचा अगोदरच...





ऑफिसर...
"मॅडम!!! मॅडम !!! बघा आम्ही छोटासा प्रँक केला.
दोस्तीमध्ये चालतं तर..."



तो ऑफिसर पुढे म्हणाला....

" बाकी हे नकली पोलिस !!! मी कुणी ऑफिसर नाही...
आय एम सॉरी ...आम्ही तुमच्या घरी तपासणी करताना सगळे अस्ताव्यस्त केले ....ते  ....हसी मजाक मध्ये.."

त्यांनी असं म्हणताच आतापर्यंत सोज्वळपणाचा 
आव आणणारी रैनाचा चेहरा आता थोडा क्रूर दिसायला लागला होता ....अत्यंत लाल डोळे करून रागात...





रैना..
" हे तुम्हाला मजा वाटते ....तुम्ही माझं पूर्ण घर खराब करून ठेवले..."





ऑफिसर...
"अरे मॅडम ....प्रँक होता ना छोटासा ...जाऊ द्या आता!!
चला काही खायला देता की नाही ....मित्र आहोत आम्ही तुमच्या मित्राचे की असंच..."





रैना..
"हे काय लहान गोष्ट आहे. मी या घरात एकटी आहे आणि तुम्ही माझ्या पूर्ण घरातली तपासणी केली."




आता तिच्या डोळ्यातले लाल अंगार बघून इन्स्पेक्टर ला पक्का डाऊट झाला होता..पण काही हाती आले नव्हते...
म्हणून ते आता पुन्हा थोडा टाईमपास करत होते.
कान सतर्क होते तरी काहीच हालचाल आढळून येत नव्हती.






ऑफिसर...
"चला!!! मॅडम खूपच नाराज झालेल्या दिसतात .....चल अनुज आम्ही येतो..एक सेकंद.... एक सेकंद...आवाज????."





इन्स्पेक्टर आणि शिपायाच्या वेषातील तिघे जण उभे होतात.
तेवढ्यात इन्स्पेक्टर बेडरूमच्या दिशेने बोट दाखवून रैनाला म्हणतात.....
"मॅडम ....तुमच्या बेडरूम मधून आवाज येत आहे."





रैना..
"आवाज??? कसला आवाज ??काही आवाज येत नाही"
"हे हे तुम्ही कुठे चालले आहात ???तुम्ही माझ्या घरची तपासणी घेऊ शकत नाही. तुम्ही पोलिस नाही.. चला निघा !!!! माझ्या घरातून बाहेर."



शिपाई आणि इन्स्पेक्टर आवाजाच्या दिशेने जातात तर तेथे जया कन्हत पडून असते. तिच्या बाजूने बेडशीट पडलेली असते.


कॉन्स्टेबल मिळून जयाला हाताला धरून आणून सोप्यावर बसवतात.




ऑफिसर...
"ऑंटीजी... तुम्ही कोण आहात???"




जया...
"मी  जया कारखाणीस ...रैनाची सासू आहे."






ऑफिसर...
"आणि तुमचे पतीदेव???"





जया...
"माझे पतीदेव नाही आहेत .ते मरण पावले."






ऑफिसर...
"हे तुमचे.... असे हाल कोणी केले??"


जया...
"साहेब... ही माझी सून ....मला रोज मारते. 
जेवण देत नाही .मला कागदपत्रांवर सारखी सही कर म्हणते. मला वाचवा हिच्यापासून .
नाहीतर मारून टाकेल."



ऑफिसर...
"कोणत्या कागदपत्रांवर सही करायला म्हणते???"





जया...
"साहेब हा  बंगला आहे ना!!! हा माझा नावावर आहे.
माझा मुलगा गावी गेला आहे त्याच्या कामाने .
तो निदान दोन महिने तरी येणार नाही आहे.
ही त्या संधीचा फायदा घेऊन....
मला रोज टॉर्चर करत आहे  ....मला रोज बेल्टने मारत आहे. हा बंगला माझ्या नावावर चा तिच्या नावावर ट्रान्सफर करायला जबरदस्ती करत आहे."





जया...
"आणि साहेब तिचा काहीतरी दुसरा प्लॅन आहे. मी तिला फोनवर बोलताना ऐकलं आहे .....माझ्या मुलगा येतपर्यंत ही मला जिवंत ठेवणार नाही आणि तो आल्यावर ....ही त्याला सांगणार आहे की मी माझ्या मिस्टरांच्या आठवणीत आत्महत्या केली ."





जया...
"साहेब !!! मला वाचवा!!! मला जगायचं आहे माझ्या मुलासाठी....  तो खूप साधा आहे हो!!!! हिला पकडा ..... माझ्या पोराचं आयुष्य उध्वस्त करून बॉयफ्रेंड सोबत पुढचं आयुष्य घालवणार आहे..."





जया...
"काल हिला मी फोनवर बोलताना ऐकलं आहे...
शिकाऱ्याने त्याचं सावज जाळ्यात अगदी एकटं अडकवलं आहे आता फक्त... एक दिवस .....दुसऱ्या दिवशी कागदपत्रे घेऊन मी तुझ्याकडे चालली येणार मग आपण बाहेर देशात निघून जाऊ...."




रैना....
"  ही बाई खोटं बोलत आहे... आणि तुम्ही कोण आमच्या घरात बोलणारे .???....तुम्ही निघा आमच्या घरातून."





ऑफिसर....
"मॅडम ...हे बघा माझे आयडेंटी कार्ड.
मघाशी शोधूनही काही सापडलं नाही म्हणून मी थोडा टाईमपास करत बसलो होतो की थोड्या वेळात काहीतरी गवसेल आणि बघा !!!  ...सापडलं मला ....
....जे मी शोधत आलो होतो.
आणि हां.... अनुज खरंच माझा मित्र आहे. त्यानेच मला .......माझ्याकडे कंप्लेंट केली होती की तुम्ही ... जया कारखानीस मॅडमला मारहाण करत आहे काहीतरी गंभीर असा तुमचा प्लॅन आहे आणि तेच आम्ही शोधत आलो होतो."
"चला रे !!!!  मॅडमला घ्या सोबत."





ऑफिसर आणि शिपाई रैनाला बेड्या घालून सोबत घेऊन
जातात.



🌹🌹🌹🌹🌹
©️✍️ D.Vaishali