कथानक्षत्रपेटी - 3 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथानक्षत्रपेटी - 3



3...  बबी, तू फक्त माझी आहेस 




उद्या राहुल आणि बबीता च्या लग्नाला दहा वर्षे होणार होती .बबीता राहुल साठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला गेली होती.

संसार वेलीवर अजूनही फुल उमलले नव्हते तरीही त्या दोघांचे आपसातले प्रेम कमी झाले नव्हते .



आता दोघांनीही मुल दत्तक घ्यायचे ठरविले होते .
आणि ते उद्या त्यांच्या एनिवर्सरी ला अनाथ आश्रमात बाळ दत्तक घेणार होते.


लग्नाला एवढे वर्ष होऊनही राहुल ने तिचे लाड करून तिचा अल्लडपणा जपला होता.




कारमधून उतरल्यावर आपल्या हॅन्ड बॅग ला हातामध्ये घुमवत घुमवत ती घरात आली. हॉलमध्ये एन्ट्री केल्यावर हातातल्या घड्याळाकडे पाहिले आणि तिला राहुल यायच्या  आधी आपण घरी आलो म्हणून हायसे वाटले.




पाच वाजायला अजून एक तास बाकी होता.





आजही राहुल आल्यावर तिला एका बर्थडे पार्टीला त्याच्यासोबत जायचे होते. पार्टीला त्याच्यासोबत जायचे होते म्हणून तिने लवकर लवकर कामे उरकायला घेतली. या बर्थडे पार्टीची तयारी ती मागील हप्त्या पासून करत होती.
ही पार्टी खास व्यक्तीच्या घरी होती.




ती स्वतःच्याच  विचारात आनंदी होत होती.






तिला बाजूच्या अतिथी कक्षाचे दार खुले दिसले.
घरी कोणी नातेवाईकाशिवाय दुसरे पाहुणे आले तर त्यांना बसविण्यासाठी तो हॉल तयार केलेला होता.





त्याचा दरवाजा खुला दिसताच बबीता ने कमलाबाईला आवाज दिला आणि विचारले,
" कुणी पाहुणे आले का?" 





कमला ने सांगितले ,
" हो  , कुणीतरी तुम्हाला भेटायला आले?"





बबीता ने विचार केला..... होऊ शकते राहुलचे कोणी ओळखीचे असेल....??

मग ती फ्रेश न होता त्याच कपड्यावर अतिथी कक्षाकडे निघाली.




तिच्या मनात तेव्हा हाही विचार सुरू होता की
महिन्याच्या एक तारखेला बरोबर अनाथ आश्रमासाठी चंदा मागायला येतात ते काका आले असतील कदाचित.
असा विचार करत ती अतिथी कक्षात पोहोचली.

अतिथी कक्षामध्ये दाखल होताच समोरच्या व्यक्तीला पाहून ती मनातून घाबरली.




तेथे सोफ्यावर आरामदायक बसून राधेय सिगारेट ओढत   हवेत धूर सोडत होता.





बबीता ला पाहून त्याचे चेहऱ्यावर हसू झळकले 
आणि तो उभा होऊन तिला म्हणाला
"हाय! मला ओळखतेस काय? की विसरलीस?"





बबीता चा त्याला पाहून मेंदू चक्रावरला.
ती मनातून घाबरली .तिच्या शरीराला आतून कंप सुटल्यासारखे वाटत होते , तरीही ती त्याला स्वतःच्या चेहऱ्यावर कोणतेही भावना दिसू न देता म्हणाली..




" राधेय  , तू का आला आहेस इथे? तू माझा पिच्छा करत आहेस का? तुला माझे आयुष्य खराब 
करायचे आहे का?"



राधेय म्हणाला..
" आपल्या जुन्या मित्राचे स्वागत या प्रकारचे करणे . ही एक वाईट गंमत नाही का ? आपण सोबत कितीतरी काळ एकत्र घालवलेला आहे."




बबीता ......
" पण... माझी लग्न झालेले  आहे , राधेय."

हे सांगताना तिचा आवाज थरथर कापत होता.





बबीता...
"माझे पती माझ्यावर खूप विश्वास करतात .माझ्यावर त्यांचे खूप प्रेम आहे  . जर तुझे बोलणे त्यांनी ऐकले ना तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल.
प्रेम ही खूप नाजूक भावना आहे तिला तडा गेला तर नष्ट होते. राहुल ना माझ्यापासून अलग करून तुला काही मिळणार नाही, राधेय."






राधेय आरामात बसून म्हणाला....
"माझा बदला तर पूर्ण होणार आणि मला शांती मिळेल."





तो पुढे म्हणाला...
" तू माझ्याशी प्रतारणा केलीस .तू माझ्यासोबत प्रेम करत होती परंतु माझ्यासोबत लग्न न  करता राहुल सोबत लग्न केलं."





बबीता.....
" मी तुझ्यासोबत प्रेम करत नव्हती. मी फक्त तुझी क्लास मेट होती आणि त्यामुळे मैत्रीच्या नात्याने मी तुझ्यासोबत चांगला काळ घालविला आणि हा चांगला काळ मला आज पर्यंत चांगला लक्षात  आहे. 
पण  हा चांगला काळ लक्षात ठेवणे हा मूर्खपणा होता असे आता मला वाटत आहे."



राधेय....
" पण माझ्यासाठी ते मैत्रीच्या पलीकडचं होतं 
मी तुझ्यासोबत लग्न करणार होतो."






"लग्न लहान मुलांचा खेळ नाही आहे  , राधेय. आयुष्यातले ते एक खूप कठीण आणि गंभीर पाऊल आहे."


राधेय सोफ्यावर आरामात बसून बोलत होता आणि पुन्हा सिगरेट ओढायला लागला आणि  हवेत धूर सोडून म्हणाला....
"पण माझ्याकडे खूप सारे प्रूफ आहे.
जसं ह्या सिग्रेटच घे ....त्या कॉलेजच्या दिवसात मी सिगरेट पीत होतो तू माझ्या तोंडातील सिगरेट काढून म्हणाली होतीस याच्याने कॅन्सर होतो ...फुफ्फुस खराब होतात."





बबीता....
" हो ....कारण मला तुझी काळजी होती . तू क्लास मधील सर्वात हुशार मुलगा होता आणि तुझ्या घरातही तू एकटा होतास म्हणून तुझ्या परिस्थितीवर मला दया यात येत होती."







राधेय....
"तुला माहित असेल ....मी सिगरेट तेव्हाच सोडली जेव्हा तू माझी एक अट पूर्ण केली होती.
आठवला तो प्रसंग....
तू म्हणतेस तर मी सिगरेट पिणार नाही आणि  मला कॅन्सरही होणार नाही पण त्या बदल्यांमध्ये तू मला प्रेम करू दिलं पाहिजे आणि तू माझी ही अट पूर्ण केली. त्यानंतर मी कधीही सिगरेट घेतली नाही पण आता.... आताची गोष्ट वेगळी आहे. आता मला कॅन्सर ही झाला तरी मला काही परवा नाही कारण तू माझं प्रेम सोडून निघून गेलीस"





बबीता....
" मी तुझी अट पूर्ण केली नव्हती . तू एकटेपणाचा फायदा  घेतला होतास . तू मला फिरायला चालण्याच्या बहाण्याने कॉलेजच्या मागे सुनसान जागेवर घेऊन गेला होता .
......आणि असेही आता ह्या गोष्टींची आठवण करून काही फायदा नाही. तू पण विसरून जा  , राधेय."







राधेय....
"तू तर माझं आयुष्य बरबाद केलं ना!"







बबीता.....
" प्लीज ...असं म्हणू नकोस . राहुल घरी येण्याचा वेळ झाला आहे. तुझ्या बोलण्यामुळे त्यांना संशय आला ना तर मी .....माझे आयुष्य बरबाद होईल."







राधेय....
" इतकी घाबरतेस तर राहुल सोबत का लग्न केलास?"







बबीता.....
" राहुल ने त्यावेळी मला मदत केली जेव्हा मला मदतीची अत्यंत गरज होती आणि माझ्या चारही 
बाजूने अंधारच अंधार होता.
आणि जेव्हा मला वाटले की आता  राहुलला माझी गरज आहे तर मी स्वतःला त्याच्या सेवेसाठी  त्याला अर्पण केलं. आणि हाच आमच्या प्रेमाचा मजबूत पाया आहे."






राधेय मोठ्याने म्हणाला .....
" नाही .....तू राहुल सोबत लग्न यासाठी केले की त्याच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि त्याच्या तुलनेत मी गरीब आहे."






बबीता .....
" नाही..... हा माझ्यावर आरोप आहे .मी राहुल सोबत लग्न  केले तेव्हा त्याच्याजवळ पैसा नव्हता, तो श्रीमंत नव्हता . तो एक पेशंट होता. त्याला सेवेसाठी 
माझी गरज होती आणि मी ती केली . त्या काळात मी त्यांच्या घरी काम करत होते . मला समजलं की
त्यांना माझी गरज आहे म्हणून मी त्यांची साथ देऊन त्यांच्याशी लग्न केले पण.... राधेय .....तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुली मिळू शकतात .माझ्यामध्ये विशेष असं काही नाही."









राधेय दात ओठ  खाऊन म्हणाला .....
"नाही .....तू माझ्यासोबत चिटिंग केलीस .
आता मी पण तुझ्यासोबत चॅटिंग करणार आहे
हा बघ..... मी एक अल्बम तयार केला आहे .
याच्यामध्ये आपल्या दोघांची कॉलेजमधील मस्त फोटो आहेत.
काही फोटोंमध्ये तू माझ्यासोबत नाचत आहेस,
एका फोटोमध्ये मी तुझ्या गालावर किस करत आहे,
एका फोटोमध्ये आपण हातात हात धरून चालत आहोत. अशी एकूण 25 एक फोटो आहे . काय किंमत देशील याची  ? की उद्या , तुमच्या एनिवर्सरी ला , तुम्हा दोघांना हा अल्बम गिफ्ट देऊ? तुला कशाला .....राहुलला गिफ्ट देऊ? काय म्हणतेस?"








बबीता....
" प्लीज , माझ्यावर कृपा कर , राधेय . जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर प्रेमा सोबत असा व्यवहार होत नसतो.  हे तुला माहीत नाही काय ? आता राहुलचा येण्याचा वेळ झालाय. जर आपल्या बोलण्याने त्यांना संशय आला तर माझे जीवन बरबाद होईल आणि मी आत्महत्या करेन."








राधेय .....
" मला माहिती आहे. राहुल पाच वाजन्याच्या अगोदर
येणार नाही आणि अजून वीस मिनिटे बाकी आहेत .
तू राहुल येण्याच्या अगोदर मला आत्ता चार लाख रुपये दे. मी तुला एल्बम देईल."







बबीता.....
" तू खूप निच आणि हलकट माणूस आहेस."





राधेय.....
" वीस मिनिटं पूर्ण झाली की मी हा अल्बम राहुल ला चार लाखात देईल."






बबीता रडून म्हणाली .....
" नको.....नको....पण माझ्याजवळ तेवढे पैसे नाही .
मी तुला हात जोडतो .माझ्यावर उपकार कर."







राधेय.......
" तुझ्या या गोष्टीमुळे..... माझं.... माझे हृदय पाझरले आहे. अच्छा ....असं कर .....मला तीन लाख रुपये दे फक्त."




बबीता......
" अरे ....तीन लाख रुपये सुद्धा भरपूर होतात. माझ्याजवळ एवढे पैसे नाही .मला माहित नव्हतं की कॉलेजमध्ये मी तुला मित्र समजत होते आणि तू मला जाळ्यात ओढण्यासाठी  कट करत होतास.
त्यावेळी माझे जीवन थोडे दुःखमय होते म्हणून मी  मित्रत्वाच्या नात्याने भावनेच्या आहारी गेले. आणि तू माझ्या कंडीशन चा फायदा उचलून मला आपल्या जाळ्यात फसवलंस."





राधेय.....
" परंतु .....तू  जर हा अल्बम विकत घेतलास तर आपण इथेच गोष्ट मिटवू .दहा मिनिट बाकी राहिले आहे आता.  शेवटचं ....तू आता मला एक लाख रुपये दे आणि बाकीचे दीड लाख रुपये नंतर दे.





बबीता धावत आत मध्ये गेली. अडीच लाखांमध्ये आपले आयुष्य जर सुरळीत होत असेल तर तिने करायचे ठरवले .





राहुल येण्याच्या अगोदर एक लाख रुपये देऊन द्यायचे..... असे ठरवून..... तिने स्वतःच्या अलमारीचे लाकर खोलले तर त्यामध्ये फक्त पन्नास हजार रुपये होते .आता तिला प्रश्न पडला .उरलेले पन्नास हजार रुपये कुठून द्यावे."





तर ती बाजूला राहुलच्या  स्टडी रूममध्ये.... तेथे त्याच्या लाकर मध्ये नेहमी डॉक्युमेंट्स आणि अजून महत्त्वाची... वाचण्याची पुस्तके आणि त्याचबरोबर केव्हा केव्हा ऑफिसचे पैसे सुद्धा राहायचे.......
म्हणून पटकन की घेऊन ती त्या रूममध्ये गेली.






रूम मध्ये गेल्या गेल्या तिच्यासमोर दुसरे संकट उभे दिसले.






स्टडी रूम मध्ये राहुल होता. त्याचा चेहरा एकदम शांत निर्विकार होता . आता बबीता घाबरली आणि थरथर कापत राहुल जवळ गेली 
आणि त्याला विचारले ...
"आलात तुम्ही ?.....केव्हा आलात?"






राहुल हळूच म्हणाला......
"  मी साडेतीन वाजताच आलो होतो . 
तुझा मित्र येण्याच्या अगोदर."






राहुल ने बबीताला जवळ बोलावले.
        " बबी ,  इकडे ये."







राहुल नेहमी बबीताला प्रेमाने बबी म्हणायचा आणि तिलाही ते खूप आवडत होते आताही त्याने......... ...राहुलने बबी म्हटलेले.







राहुलच्या तोंडून बबी हा शब्द ऐकताच , ती समजली की  राहुल रागावला नाही आहे . त्यामुळे तिला थोडेसे हायसे वाटले.

" राहुल.... तुम्ही आमचे बोलणे ऐकले असाल."

बबिला वाटले कदाचित राहुल आपल्याला आपण प्रेमात फसवले म्हणून हाकलूनही देईल .






"हो बबी ......मी सगळं ऐकलंय . मला तुझा डाऊट होताच आणि तो आज क्लिअर झाला."

राहुल बाहेर आवाज जाऊ नये या उद्देशाने हळूहळू बोलत होता.







बोलता बोलता राहुलने ........
आपले दोन्ही बाहू पसरविले आणि मानेने इशारा करून बबीला जवळ बोलावले..
हे बघताच बबी ....धावत जाऊन राहुलला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत हळूहळू मुसमुसून सांगू लागली.







बबीता......
" पण राहुल मी तुला फसवले नाही....
माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ....लग्नाच्या पहिले माझी एकच चुकी झाली की मी याच्याशी मैत्री केली पण माझ्या मनात असं काहीही नव्हतं."







राहुल ने तिला थोडं शांत होऊ दिले.आणि आपल्यासमोर घेऊन तिला म्हणाला......
" तू हे काय म्हणतेस?  काय बोलत आहेस ? अरे .........मी म्हटलं की माझ्या मनात जी शंका होती ती मिटली . याचा अर्थ असा आहे की .....मला आज समजलं की तू रात्री झोपेमध्ये का घाबरून उठतेस....  केव्हा केव्हा विचार करत असतेस .....मला नेहमी प्रश्न पडायचा की रात्री तुझ्या घाबरण्याचं नेमकं काय कारण असावं?  मला आज समजलं की तो राधेय ....जे फोटोज घेऊन आला आहे ....ते मेन कारण आहे.... तू मला एवढ्या दिवसात त्या फोटो विषयी  काही सुद्धा सांगितलं नाहीस.    तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का ? आपल्या प्रेमावर तुझा विश्वास नव्हता का?"






बबीता....
" ते....फोटोच्या उल्लेख केल्यावर तुम्ही माझ्याशी कसे वागणार याची मला भीती वाटत होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही."









राहुल.....
" आता मला सांग..... त्याला पैसे देऊन प्रश्न सुटणार का?..... नाही .......कारण त्याच्याजवळ त्याची निगेटिव्ह असेल . तो पुन्हा त्याचे पुन्हा फोटो बनवेल आणि जीवनभर त्रास देणार.
चल ....आपण राधेय जवळ जाऊ आणि त्याला फोटोज आपल्या एनिवर्सरी ची गिफ्ट म्हणून मागू."






बबीता.......
"  तुम्ही राधेय ला  भेटता काय?"







राहुल....
"हो.... तू परिचय करून दे."








राहुल बबीताला अतिथी कक्षाकडे घेऊन गेला.
बबिताला समजत नव्हते .....हे काय चालू आहे ?
राहुल तिचा हात पकडून तिला नेत होता आणि राहुलच्या मागे मागे ती अतिथी कक्षाकडे चालली होती.






नेहमीच असं व्हायचं ..
जेव्हा पण राहुल तिचा हात धरून तिला कुठे नेत असेल तर ती काहीही न विचारता त्याचे मागे मागे जायची.
हे सुद्धा विचार करत नव्हती की हा रस्ता कुठे चाललाय इतका तिचा त्याच्यावर विश्वास होता.







अतिथी कक्षात गेल्यावरही बबीता शांत उभी होती .
तेव्हा मग राहुल ने स्वतःच म्हटले .....
" राधेय... मी राहुल आहे "
आणि राधेय सोबत त्याने हस्तांदोलनाकरिता  हात पुढे केला .




राधेयने सुद्धा त्याच्या हातात हात मिळवला.

हे करीत असताना बारीक नजरेने बबीता कडे पाहू लागला जी राहुलच्या अगदी बाजूला त्याला चिपकून बसली होती.

राहुल.......
" राधेय ,  तुला भेटून आनंद झाला .पण एक तक्रार  आहे माझी?"

बबीता ने घाबरून राहुल कडे पाहिले.





राहुल पुढे म्हणाला....
" आमच्या लग्नाला तू आला नव्हतास आणि आम्हाला कोणतेही गिफ्ट दिले नव्हते. आता हे खूप चांगले झाले की तू आज आला आहेस आणि आमच्यासाठी हा फोटोजचा अल्बम आणला आहेस. हा अल्बम  आम्हाला गिफ्ट दे."





राधेय झटकन म्हणाला 
"नाही.... नाही .... याच्याशी तुझा काही संबंध नाही . तुला पाहिजे आहे तर मी दुसरे गिफ्ट आणून देईल."






राहुलला राग आला .त्याचे डोळे रागाने लाल झाले .
तो म्हणाला....
" मिस्टर राधेय.... तू आमच्या घरी अतिथी म्हणून आला आहेस आणि इथे येऊन माझ्या बायकोला ब्लॅकमेल करतो आहेस. जर आता तू हा अल्बम टेबलवर ठेवून गेला नाहीस तर मी आत्ता माझ्या घराबाहेर जेवढे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना बोलवेल....."




परिस्थिती पाहून राधेय ने अल्बम तिथेच ठेवला आणि हळूच बाहेर निघून गेला.

राधेय निघून गेल्यावर राहुलने बबीताला जवळ  घेऊन आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत म्हणाला ....
"बबी ....बबी तू माझी आहेस. माझे तुझ्यावर पहिले पेक्षा दिवसेंदिवस प्रेम वाढत आहे . तू मला फक्त खूप नाही..... तर खूप खूप खूप खूप आवडतेस."
बबीता ला  दोन्ही हातात राहुलने उचलून घेतले आणि बेडरूम कडे घेऊन निघाला . हळूच तिच्या कानाशी कुजबुजून म्हणाला ...." रात्री पार्टीला जायचे आहे..
माहितीये ना !.पार्टी वरून आल्यावर एनिवर्सरी साजरी करू."
बबीता ने लाजून राहुलच्या छातीशी आपला चेहरा लपविला.


समाप्त....

🌹🌹🌹🌹🌹🌹
✍️✍️✍️D.Vaishali