नियती - भाग 24 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 24

    भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न क...

  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 24





भाग -24


पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला....
"मिरा.... आपण लग्न करू ....माझ्या घरातल्या माणसांना हे नाही आवडलं ....तर आपण पळून जाऊन लग्न करूया ...
आयुष्यात मी लग्न करणार तर ते तुझ्याशीच ...
नाही तर जन्मभर ब्रह्मचारी राहणार ......मीरा....
तुझी माझी ताटातूट करण्याची ताकद माणसात काय ???....पण देवात सुद्धा नाही...."







वगैरे वगैरे.... झालं ....या शब्दांवर मिरा भाळली.. भूलली... आणि इथेच चुकली.
फार मोठी तिच्या हाताने चूक झाली आणि तिच्या आईला यातले काहीही माहीत नव्हते.

आणि मग मिरा नावाच्या फुलाच्या भोवती.... सुंदर नावाचा  भुंगा... गुणगूणत गुंजारव करत राहिला. आणि फुल फुलतच राहिले.








आणि मग एक दिवस....... मग एक दिवस समजले
की मिराला दिवस गेले आहेत.
ती घाबरली... तिला समजत नव्हते आता काय करावे..??

मग शांतपणे तिने विचार केला. आणि ठरविले की आता गप्प बसून चालणार नाही.. लपण्यासारखी गोष्ट नाही. 
पुढे मागे ही गोष्ट उघड होणारच.. 









मिरा (मनात)....
"आता आपल्याला सुंदरला ही गोष्ट सांगावी लागेल.
ते तर आपल्यावर खूप खूप प्रेम करतात. मग मला चिंता करण्याचे काही काम नाही. पण ते खरच माझ्याशी लग्न करतील ना...?? नाही... नाही... हा विचार चुकीचा आहे ते माझ्यासोबत लग्न करणारच.
पण त्यांच्या घरच्यांनी स्वीकारले नाही तर...???
पण तरीही आता आपल्याला सुंदर सोबत लवकर लग्न उरकवावे लागेल.. 
आणि सहजासहजी होत नसेल तर त्याच्या सोबत दूर पळून जाऊन सुद्धा लग्न करावे लागेल तरी ते हरकत नाही. तेच तर म्हणाले होते ना..
आपण त्यांच्या घरच्यांनी स्वीकारले नाही तर पळून जाऊन लग्न करूया."







मग तिने आपली अवस्था सुंदरला लवकरात लवकर सांगायचे ठरवले. पण...
सारख्या सारख्या एकाच  फुलावर बसून त्याचा मकरंद
चाखून सुंदर सारख्या भुंग्याचे मन भरून गेले होते...
आणि आता त्याने हे फुल सोडून दिले होते...
फुलाकडे त्या पाठ फिरवली होती......








खूप सार्‍या भूलथापा देऊन एक न उमललेली कळी त्याने अगोदर फुलवून कुस्करून टाकली... आणि आता पाठ फिरवून निघून गेला होता. त्याच्या मते आता मीराची किंमत शून्य झाली होती.







मीरा रोज वाट पाहून पाहून थकून जायची पण आता सुंदर काही पिंपळगावला जात नव्हता..

(कारण या दरम्यान त्याला मंदिराच्या पायऱ्यांवर मायरा दिसली होती...)







एक दिवस पिंपळगावला...
" सुंदर चे लग्न जूळले"
असे मीराच्या कानी कुजबूज आली होती.





बाबाराव कुलकर्णी यांची कन्या मायरा ....तिच्याशी सुंदर चे लग्न जूळले आहे हेही तिच्या कानावर आले...

दिवस कितीतरी निघून गेले होते.. आता मीराच्या लक्षात
येत होते की  सुंदर ने तिला... त्याच्या "वासनेची बळी "
...हो...हो...असेच तर म्हणावे लागेल..






मिरा.....
"काय आपण वासनेचे बळी ठरलो...??
अजूनही सात आठ दिवस बाकी आहे साखरपुडा व्हायला..."
असा विचार करून ...
सुंदर च्या वाड्यात जाऊन सर्वांसमोर त्याला जाब विचारावा.. आणि नाही ऐकला तर जीव देऊन द्यावा..






मिरा...पक्का निर्धार करून याप्रमाणे ती सुंदर च्या वाड्याकडे  जाण्यास निघाली...






तिला आता तिथे जाऊन त्याच्याशी बोलणे भागच होते नाहीतर तिच्या अब्रूचे धिंडवळे निघाले असते....

ती निर्लज्ज बनून स्वतः ......सुंदरच्या घराकडे निघाली होती तर ....सुंदर ने तिला बाहेर रस्त्यातंच पाहिले आणि अडविले..
आणि तिला धमकी दिली की.....

"घरी गेलीस किंवा बाहेरही कुठे तोंड उघडले तर जीव
घेईन तूझा..." ...
........धमकीवजा सुंदर म्हणाला.







मीराला हे सुंदर चे रूप अगदी नवीन होते. तिच्यासाठी 
ते एक विक्षिप्त आश्चर्य होते.....धक्का देणारे हृदयाला आणि जीवघेणी वेदना होती... ती तिच्या हृदयासाठी....







त्याच्या धमकीने मीराच्या नजरेभोवती अंधार आला. तिला आपण चक्कर येऊन पडू की काय...???
असे वाटू लागले.
जेवढा पण तिच्या मनात धीर होता तेवढाही आता खचू लागला होता.....








मनातून कासावीस होऊन ती आक्रंदन करत होती.
तिची पावले उचलली गेली ती तिरमीरीत.. सुंदर साठी चीड घेऊन..... आणी
विचारांच्या ओघात ती बाबाराव यांच्या बंगल्याच्या 
दारावर पोहचली.
.....
.....








बाबाराव यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मिरा मुसमुसत होती.
मिराने सर्व कर्म कहानी  सांगून टाकली.
तिची ही कहाणी ऐकताना मायराचा चेहरा संतापाने फुलत होता आणि बाबाराव चे मनंही तेवढ्यापुरते पेटून उठले होते.









मायराचे मन पेटून उठले होते
सुंदर... सारखी गावात व्यक्ती असतात ...यांना तर...
या कारस्थानासाठी त्यांच्या डोक्याचं टक्कलं करून गाढवावर बसवून चपलीचे गळ्यात हार घालून धिंड काढली पाहिजे....
आणि गावातल्या सर्वांना बोलवून त्याची पूजा करून घ्यायला पाहिजे....
पण....


पण.... आता त्याचा काही उपयोग नव्हता.
असा संताप संताप करण्यापेक्षा....
काळीमा फासणारे व्यक्तीला शिव्या देण्यापेक्षा...
ते पुन्हा काही अधिक करू शकत नव्हते.
असे सर्व तिच्या मनात आले...








मिराचे कर्म कहाणी ऐकून .....
बाबाराव यांच्या घरातले वातावरण बदलून गेले होते.






बाबाराव  यांना तर संधीच मिळाली होती सुंदरला नकार देण्यासाठी. आपोआप चालून आलेली संधी ते नाकारणार नव्हते.

समोर मिरा रडत होती तेव्हा संतापाचा आव आणून नव्हे तर खरोखरच बाबाराव यांचा संताप संताप होऊन त्यांना काय बोलावे आणि काय करावे सुचत नव्हते....???







खरं पाहता मीराला सांत्वनाची गरज नव्हती... तिला न्यायाची गरज होती. तिच्या पोटच्या गोळ्याला योग्य अधिकाराची गरज होती. इथे कोरड्या शब्दांनी काय होणार होते...??








बाबाराव  यांनी निर्णय घेतला होता आता.
चार-पाच दिवस अशीच निघून गेले. 

आणि दोन दिवस बाकी आहे म्हणताना .....
बाबाराव यांनी नानाजी यांच्याकडे निरोप पाठवला.....







"साखरपुड्याला येऊ नका कारण मुलीच्या आईची तब्येत फार बिघडलेली आहे ...तिने अंथरून धरलेले आहे."

आणि यात खोटे कोणतेही नव्हते कारण लीला खरंच आजारी  झाल्या होत्या..







आपल्या मुलीचे लग्न मोडलेले कोणत्या आईला चांगले वाटणार...???
याचा लीलाच्या मनावर आघात झाला होता.
पण मनातून मात्र त्याही सुखावल्या होत्या...
मिराची झालेली घोर फसवणूक त्यांच्या मनाला फार फार लागली होती.
ती आली म्हणून नाहीतर सुंदर सारख्या बदलफैली नवऱ्याचा संसार करून मायरासारखी तडफदार मुलगी कधीच सुखी झाली नसती. 







येणारे संकट टळले म्हणून त्यांनी कुलदैवते पुढे मस्तक टेकले.
....
...






पण तिकडे पिंपळगाव मध्ये
मीरा कडे सर्वजण बदकर्म रूपाने बघू लागला.
समाज तिला हीणवू लागला. समाजाच्या डोळ्यांमध्ये  ती ठसठसू लागली...


आणि एके दिवशी सुंदरचे भूत तिच्यावर बसून..
गळा आवळू लागलं... मीरा तडफडत होती...





चार दिवसांनी बातमी आली... पिंपळगावला मिराने अंगणातल्या विहिरीतंच..... उडी मारून जीव दिला.
प्रेत वर आले तेव्हा ती पोटूशी होती...हे सगळं
मिराच्या आईला अतिशय धक्कादायक होते... मिराचे प्रेत बघताच "मिरा..." म्हणून हंबरडा फूटला... आणि त्या सहन करू शकल्या नाही ...हृदयविकाराचा झटका येऊन तिथेच पडल्या... दोघींचीही अंतयात्रा एकाच वेळी काढावी लागली गाववाल्यांना....

....
.....





कवडू साठे पर्यंत बातमी पोहोचली मायराचे लग्न तुटले आहे...याची.....
एका क्षणाला मनातून त्याला तसा आनंद झाला...
पण दुसऱ्या क्षणी त्याने आपल्या मनातील विचार झटकले....



"ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा विचार कशाला करायचा....????"....असं कवडूचं एक मन त्याला वारंवार सांगत होतं त्याला.


पण दुसरं मन हेही बोलत होतं की आशा ठेवायला काय हरकत आहे...???... नशीब बदलायला काही वेळ लागत नाही कधी कधी...???
तशी पोरगी आहे ही खूप छान. शेवटी मोहितची पसंत आहे....





त्यादिवशी रात्री मायराने ही फोन करून 
मोहितला सर्व सर्व सांगितले होते ....इकडे जे जे घडले त्याबद्दल..
त्यामुळे त्याला पूर्वीपासूनच माहीत होतं की आता काही मायराचा आणि सुंदर चा साखरपुडा होणार नाही....
तेव्हापासून त्याच्या जीवाला थोडी शांती मिळत होती.





मायराचा साखरपुडा फिक्स झाला होता तेव्हापासून त्याचे अभ्यासात कसं म्हणून मन लागत नव्हते...
पण जेव्हापासून साखरपुडा तुटला हे माहित झाले तेव्हापासून त्याला हायसे आणि शांत वाटत होते आणि मायराने हे सांगण्यासाठी फोन केला त्या त्या रात्री शांत  झोप झाली होती......

.......





सुंदर नानाजी शेलार आता बेभान झाला होता. बाबाराव कुलकर्णी यांनी ठरलेले लग्न मोडले म्हणजे काय...????
त्याचे डोके तडकून गेले.... तो अगोदरंच मिरासाठी वेडा पिसा झाला होता.....






आजवर त्याचे आयुष्य असे होते की त्याने केलेली कोणतीही इच्छा त्याची अतृप्त राहिली नव्हती. 
मनात उगवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे 
असा त्याचा आजपर्यंतचा अनुभव होता.






यात तो आपली प्रतिष्ठा मानत होता आणि......
म्हणून बाबाराव यांनी
जेव्हा निरोप पाठवला की साखरपुडा होऊ शकत नाही मुलीच्या आईने अंथरून पकडले आहे.
त्यावेळीच तो समजून गेला की ते आता काही साखरपुडा होऊ देणार नाही....


आणि त्यालाही तर माहीत होते ...
गावातच तर राहत होता तो... बाबारावची मुलगी कोणती धुतल्या तांदळाची आहे ते.....???
तरीही... तरीही बाबाराव ने एवढी हिम्मत केली...???






पण तो तरीही त्यांना जाऊन बोलू शकत नव्हता. कारण बाबाराव यांनी स्पष्ट नकार दिला नव्हता... चतुराई केली होती..
पण त्याला उमगले होते की ते नकारंच आहे...
कारण मीरा गावात आलेली ...त्याला माहिती होती...
त्याने जरी तिला स्वतःच्या घरापर्यंत पोहोचू दिले नाही 
तरी तिच्याबद्दल माहिती नक्कीच बाबाराव यांच्या बंगल्यांपर्यंत पोहोचली आहे. हे तो चांगल्या रीतीने आता समजला होता.




म्हणजे... म्हणजे... आपली मुलगी मायरा त्याला द्यायला नकार ... खरंच नकार आहे बाबाराव  यांचा.


आता सुंदरला आपल्या प्रतिष्ठेला तडा गेल्यासारखे वाटले....
त्याचे दुःख दुहेरी होते. 





मायरा सारखी मुलगी हातची गेली हे एक दुःख आणि  आपली गावकऱ्यांमध्ये बेइज्जत झाली हे दुसरे दुःख.

असे दुहेरी दुःखाने सुंदरचे अंतकरण होरपळून गेले.
आणि त्याने आपल्या मित्रांसमोर एक शपथ घेतली...





""मायराला बायको म्हणून माझ्याच घरी आणिन.... तरच नावाचा सुंदर... नाहीतर डोक्यावरील केस आणि मिशी कापून ठेवीन. बाबाराव .... 
कुठला जावई पसंत करतोय तेच बघायचं आहे मलां....गाठ सुंदर नानाजी शेलार याच्याशी आहे...???""

आणि ही बातमी मग....
🌹🌹🌹🌹🌹

✍️©️D.Vaishali