नियती - भाग 28 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 28







भाग 28




मायरा....
" नाही.... बाबा तो खरच माझ्यावर खूप प्रेम करतो..... मी त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहे.... तो माझ्यावर एवढा प्रेम करतो .....प्रसंगी माझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल ....मला थोडे दिवस कष्ट घ्यावे लागतील एवढेच...."


बाबाराव....
"बरं... चला..
आता मला एकांत हवा आहे...
आणि अटी लक्षात ठेवा...."

मोहित आणि मायरा बाहेर निघाले. रामला बाबाराव यांनी थांबवून घेतले...
मोहित समोर निघाला होता की मागून रामने पटापट येऊन आवाज दिला... आणि मग...




राम म्हणाला......
"मोहित राव  ...एक मिनिट"







जवळपास धावल्यागंत येऊन दोघांच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला......
"मालक म्हणत आहेत की तुम्हाला जर बोलायचं असेल तर ताई साहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बोलू शकता अर्धा एक तास..."






तसे मोहितने मायराकडे पाहिले.... मायराने होकारार्थी मान हलविली....
मग मायरा खोलीच्या दिशेने निघाली तिच्या मागे मागे मोहित चालू लागला......

......








इकडे शेलार वाड्यामध्ये....
नानाजी घरी येऊन शांतपणे बसले...





घरचे आणि त्यांच्या पत्नी रमा त्यांच्याकडे पाहून .......काहीतरी यांचे बिनसले आहे हे समजत होते पण त्यांनी काहीही विचारले नाही कारण ते जेव्हा शांत असतात तेव्हा ते भडकलेले असतात हे सर्वांना माहीत होते.






सुपारी फोडून जवळपास आता सोळा-सतरा दिवस झाले होते. शेलार वाड्याच्या आजूबाजूची मंडळी कुजबुजू लागली होती...





सुंदरचा सुद्धा आठ दिवस झाले अतापत्ता नाही हे सुद्धा त्यांच्या परिसरातील लोकांना समजून आले होते...






नानाजींच्या मनामध्ये आग भडकली होती बाबाराव यांच्या बद्दल.....







त्यांनाही स्वतःची इज्जत प्यारी होती ..
काय करावे ....कसं करावे... काही समजत नव्हतं...





नेमके त्यादिवशी त्यांच्याकडे त्यांचा मेव्हणा आला आणि म्हणाला.....
"व्हय दाजी...??... आता पुढं काय करायचं...??"






नानाजी.....
"कशाचं म्हणता पाव्हणं....???"






मेव्हणा....
"सुंदर च्या लग्नाचं ...??? आणि कशाचं....??"







नानाजी यांनी गड्याने आणलेला पाण्याचा ग्लास घेऊन
अगोदर गटागट पाणी प्यायले आणि स्वतःच्या श्वासावर तसेच रागावर नियंत्रण ठेवून म्हणाले....
" दुष्काळ पडला आहे का पोरींचा....??? त्यांचा काही अंदाज नाही दिसत लवकर ....तर दुसरी पोरगी पाहू म्हणतो सुंदर साठी..."






थोडा वेळ थांबून त्यावर मेव्हणा म्हणाला.....
"मी म्हणतो ....तसं केलं तर....???"


नानाजी....
"कसं म्हणता....???"






मेव्हणा....
"त्यांचा कारभारी राम.... त्याला विश्वासात घेऊन सगळे विचारलं तर...??"







नानाजी....
"आता काय विचारायचं राहिलं ....??? सारंच झाले विचारून आता......??"






मेव्हणा....
"नाही म्हणजे तसं नाही.... पण मी काय म्हणतो....???"








एकाएकी नानाजी आवाज चढवून मेव्हण्याला म्हणाले.....
"तुम्ही काय म्हणता ते समजलं मला.... आता मला त्या गोष्टीबद्दल काही एक चर्चा करायची नाही...."







मेव्हणा.....
"एकदम एवढं रागवायला काय झालं दाजी....??? मी काय म्हणतो ते तरी ऐकून घ्या..."







नानाजी.....
"तुम्हाला म्हणायचं काय आहे....??? पोरगी कशी बी असल तरी सुंदरच लग्न तिच्या संगच लावावं.... एकुलता एक मुलगा आहे आपला.... तशी पण त्या पोरीबद्दल गावामध्ये चर्चा होतीच..... बरं झालं आपण पक्क केलं नाही.... साखरपुडा पण झाला नाही....
... आपली तर तयारी होती सर्व करायची.... मनाचा मोठेपणा घेतलं होतं ना आपण.... कदर नाही त्याच्या मागं का लागायचं आपण....??? असं म्हणतो मी."







मेव्हणा.....
"मी तसं कुठे म्हटलं ....दाजी....???"







नानाजी....
"मग काय... हाय तुमच्या मनात ते तरी सांगा.... अहो पाव्हणं.... त्या पोरीचे जे संबंध गावातल्या ज्या पोराशी आहे ना ....त्याची सगळीकडेच कुजबुज आहे.... आम्हालाही माहीत होतं पण आम्ही दुर्लक्ष करून मागणी घालायला गेलो होतो....
पण जाऊ द्या आता ...वाचलो आपण आणि आपला पोरगाही वाचला.... तुमच्या कानावर या गोष्टी आलेल्या दिसत नाही अजूनही...."





(खरं पाहता त्यांना लग्न जोडताना इस्टेटीचा लोभ होता. आणि त्यांना आपल्या पोराच्या सवयी ....त्याला लागलेलं गालबोट ....हे सुद्धा माहीत होतं म्हणूनच त्यांनी मायराशी लग्न जुळवताना विचार केला नव्हता कोणत्याच गोष्टीचा. पण आता जेव्हा बाबाराव यांनी तसे कडक  पाऊल उचलले.. तर आता ते विविध कारण सांगू लागले... आताही त्यांना लपवायचं होतं की सुंदरला कदाचित बाबाराव यांनी बंदिस्त करून ठेवलेलं कुठेतरी... हे त्यांना कुणालाच कळू द्यायचे नव्हते... ते चुपचापपणे शोधून काढणार आणि तोपर्यंत हे असंच चालू ठेवणार...??? असं त्यांनी ठरवलेलं होतं... तर आता ते मायरा...कशी ती बरोबर नाही सुंदर साठी .....हे सांगू लागले होते..
तिच्याबद्दल मनातील तसे बोलू लागले होते.)






नानाजी बोलत होते तेवढ्यात त्यांचा तो मेव्हणा झटकन उठला आणि त्याने तोंडातील पानाची पिंक दोन बोटातून ओसरीच्या खाली टाकली....







जेव्हा तो परत येऊन आपल्या जागेवर बसला तेव्हा नानाजी यांना पुढे काय बोलावे याचा विचार करत 
आपली डावी मांडी हलवत त्यांच्याकडे पाहत शांत बसला...






नानाजी......
"पाव्हणं.... एकतर त्या घरची पोरगी आता आणायची माझी इच्छा नाही आपल्या घरी.... हेच्या मारी.... अशा पोरी शहरातून शिकून आलेल्या काय माहिती ....तिकडे किती जणांना तिने आयुष्यातून असंच उठवलं असंल....
आणि कितीक तिचे आशिक असतील....???"






आता मात्र मेव्हना त्यावर काही बोलला नाही.
नानाजी यांच्या चेहऱ्यावरून त्याने कळले की...
मायराबद्दल त्यांच्या मनात ... एक आता तिडीक निर्माण झालेली आहे.





नानाजी पुढून उठून मेव्हना आता आत आपल्या बहिणीकडे गेला.
"अक्का.... अगं ...मला तर असं वाटतंय ..
हे जे गावचे.... मोठं स्थळ आहे ..
सुंदरच्या आवडीचं.. मायराचं हे स्थळ हात सोडून नाहीये."






नानाजींच्या पत्नी...रमा.........
"इतकं सगळं समजून ही असं कसं म्हणतोस तू....???
आणि काय रे तुला... आपल्या भाच्याची काळजी बिळजी काय ...आहे की नाही..??"



मेव्हणा....
"काहीही काय बोलते ग तू अक्का...?? सुंदरची काळजी मला नाही असं कधी होईल का...?? लहानपणापासून पोटच्या पोरासारखा माया करत आलोय मी त्याच्यावर...?? आणि तू असं म्हणतेस मला...?? जरा विचार करावा माणसांनं...
का आपलं उचलली जीभ लावली टाळायला...??? हां.."






मेहुण्याला हे समजत नव्हते की त्याची बहीण आणि दाजी मायराच्या रिश्त्यासाठी का नाही म्हणत आहेत ....???







पुन्हा थोडा शांत स्वरात मेव्हणा म्हणाला.....
"मला सुंदर बद्दल काहीतरी वाटतंय म्हणूनच हे 
सांगतो हे ध्यानात घे... मायरा कशी श्रीमंताची एकुलती एक पोरगी आहे.... बाहेर तिकडे तिने एकाला काय दहा जणाला फिरवले असेल... जवळ घरातला स्वतःचा नवरा येत नाही तोवर असंच असतं जवळपास समजून घ्यायचं.... आणि तसंही.... आपलं पोरगं कोणतं सुदं आहे...?? त्याने तर आजूबाजूच्या गावांतही कहर करून ठेवला आहे......
आणि माझे आई.... एक लक्षात घे.... सुंदरचं लग्नं जर तिच्या संग झालं..... तर तो त्या वाड्याचाही मालक होणार आणि त्यांच्या सात पिढीतल्या इस्टेटचाही मालक होणार. आहेच कोण तिच्या मागे पुढे ??.... समजते का बाई.??.."






असं म्हणून तो दोन क्षण थांबला तर...
त्या म्हणाल्या...
"ती इस्टेट घेऊन काय जाळायची का काय...?? हे बघ... बाईचा पदर आणि गड्याचे पाऊल ठिकाणावर पाहिजे रे बाबा.... इथे तर दोन्ही ठिकाणावर नाही ..राव...
ती तरी चांगली असती तर आमचे हे बेणं एका ठिकाणी टिकलं असतं असं वाटत होतं आम्हाले.... आम्हाला आमच्या घराण्याचा बाजार करायचा नाही.....
अन तसंही हे सुंदर ...जे मित्रासोबत गेलं चार दिवसासाठी म्हणून ....आज दहा दिवस होत आले तरी अजून परत आलं नाही.... मला तर काही समजेना..."






मेव्हणा...
"हो का ....दाजी नं ...तर मला काय सांगितलं नाही.."






तशा नानाजीच्या पत्नी रमा म्हणाल्या....
"येईन रे.... नेहमीप्रमाणे... अगोदरंही असाच करायचा तुला तर माहीतच आहे....दोन दिवस सांगून चार दिवस गायब.....जेव्हा धरणं या पोरीसोबत लग्न जूळलंहोतं .....
तेव्हापासून घरीच राहत होता... आणि त्याचे मित्र आले आणि त्याला घेऊन गेले चार दिवसाला... आता पत्ताच नाही त्याचा...."






नानाजीच्या पत्नी म्हणजे त्याची बहीण रमा त्या विषयावर अधिक काही बोलली नाही. तेव्हा त्यालाही वाटले...
हे सर्व या घरचे मायराबद्दल मनात तिडीक बाळगून आहेत.







मेव्हण्याने विचार केला होता की बाबाराव यांच्याशी सोयरीक जुळली तर जमीन जुमले तसंच आणखी बरीच काही इस्टेट सुंदरला मिळाली असती.... कारण तिकडे वारस कुणीच नव्हता मायराशिवाय....




सोयरीक जूळली तर त्यांच्या पुढची आयुष्याची वाट 
सोपी झाली असती त्याच्यासाठी... कारण तो मुलुखाचा आळशी माणूस... सुंदरच्या मागे मागे राहून ....तसेही लहानपणापासून सुंदर आपल्या मामाचा जास्त ऐकायचा.. तर त्याच्या मार्फत त्या घरात आपल्याला राहता येईल ....
सुख उपभोगता येईल....... धनाच्या समुद्रात उतरायचं आणि हळूच थोडंसं पाणी बाहेर काढायचं ...कुणाच्या लक्षातंही येत नाही... आणि त्यांना जाणवतंही नाही. फरक ही पडत नाही.... आणि आपले आरामशीर जीवन पुढचं जगत ....काढायचं मस्त अशा ऐषारामात.
पण त्याच्या मनसुब्यावर बहिणीने आणि दाजी नानाजीने पाणी फेरले......

....






इकडे रूम मध्ये आल्यानंतर मोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि  दाराला कडी घातली.....


तसा मोहित दचकला आणि....

🌹🌹🌹🌹🌹