अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १८ )
एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्याला मॉम चा कॉल येतो. मॉम त्याला गावी जायची तारीख कळवतात.
प्रेम ऑफिस मधे बॉस ना सुट्टीबद्दल बोलतो. आणि त्याला चार दिवसांची सुट्टी मिळते. प्रेम हि गोष्ट मॉम ना सांगतो. मॉम पण खुश होतात. पण या दोघांचा प्लॅन अंजलीला माहीत नसतो.
एक दिवस अंजलीचा कॉल येतो,
अंजली : प्रेम... मी पुढच्या आठवड्यात मॉम सोबत तिच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी चालली आहे. आपण भेटूया ना त्याआधी.
प्रेम : अरे हो पण...काम खुप आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ऑफिसच्या वेळेत तर नाही भेटता येणार. 😊
अंजली : प्रेम... असं काय रे करतोय...😔 गेले पाच महिने आपण भेटलेलो नाही. त्या दिवशी घरी आलास तेवढच...आधी तु बोलला होतास, भेटण्याचा हट्ट नाही करायचा. अभ्यासावर लक्ष दे म्हणुन.... मी ऐकलं ना तुझं... मग आता का टाळतोय...😔
प्रेम : अरे... मी टाळत वगैरे नाही ग... जे खरं आहे तेच सांगतोय ना...😊
अंजली : मग एवढ्या दिवसात तु एक दिवस सुट्टी नाही घेऊ शकत का माझ्यासाठी...😔
प्रेम : अरे हो... पण मी आधीच पुढच्या आठवड्यात सुट्टी टाकलेली आहे. त्यामुळे आता मला सुट्टी नाही मिळणार. 😊
अंजली : तु का सुट्टी टाकली आहेस ? 🤔
प्रेम : तु गावी चाललीय ना...मग म्हटलं मी पण माझ्या गावी जावून येतो. 😊
अंजली : अच्छा... खरच चाललाय गावी तु ?🤨
प्रेम : खरच चाललोय...😊
अंजली : मग बोलला नाहीस आधी ?🤔
प्रेम : अरे सांगणारच होतो तुला...😊
अंजली : हो का... आत्ता मी विषय काढला तेव्हा...🤔
प्रेम : अरे असं काही नाही, तु पण नाहीस इथे, मग म्हटलं आपण पण जाऊन यावं गावी. 😊
अंजली : अच्छा... म्हणजे मी इथे असते तर गेला नसता का...?🤨 जसं काय रोज मला भेटतो ना ?😏 काहीही कारण नको देऊ, कळतं मला. 😔 जाऊ दे... तुलाच इच्छा नाही होत, मला भेटायची, हो ना...?😔
प्रेम : अरे हो... किती बोलते हि पोरगी...😊 लगेच नाराज होते.😊
अंजली : माहीत आहे मला, तु मुद्दाम करतोय, एवढे दिवस बोललो नाही, भेटलो नाही, मग तुझं माझ्यावरचं प्रेम पण कमी झालं, असच वाटतं...😔
प्रेम : अगं वेडे... असं कुठे असतं का ? खुप दिवस बोललो नाही, भेटलो नाही म्हणुन काय प्रेम कमी होतं का...? उलट जास्त वाढतं...😊
अंजली : काही नाही, असच आहे... मग तुला का वाटत नाही, की आपण भेटाव म्हणुन...?😔
प्रेम : अरे सोन्या... मी असं कुठे बोललो का की, मला तुला भेटाव असं वाटत नाही म्हणुन, मलाही खुप वाटतं... पण खरच सुट्टी नाही मिळणार, हेच सांगतोय ना...,😊
अंजली : हो का... ठिक आहे, नको भेटू, मी जाते माझ्या गावी आणि तिकडेच राहते मामाकडे, म्हणजे तुला टेन्शन नाही राहणार मला भेटण्याचे...😔
प्रेम : अरे बाप रे... राग आला वाटतं...😊
अंजली : काही राग वगैरे नाही आलाय, तु पण जा तुझ्या गावी, मस्त एन्जॉय कर तिकडे. तुला काय तिकडे माझी आठवण येण्याचं कारण असं नाही ना...😔 मस्त जुने मित्र मैत्रिणी भेटतील गावच्या... जा तू...😔
प्रेम : अरे... शांत हो जरा... नाक लाल झालय बघ...😊
अंजली : होऊ दे... माझं झालंय ना, ते माझं मी बघुन घेईन. 😠
प्रेम : अच्छा... हो का...खरच बघ मग एकदा, आरसा आहे का तिथे जवळ...😊
अंजली : ते मला नको सांगु... तु तुझं बघ काय ते...😔
प्रेम : हा... ते पण आहेच, आता फोनमधून तर तु दिसणार नाहीस, मला स्वतःलाच बघावं लागेल. 😊
अंजली : बघ मग, मला कशाला सांगतोय...😠
प्रेम : अरे तुच तर बोलली ना, तुझं तु बघ म्हणुन... 😊
अंजली : झालं का मग बघुन...😠
प्रेम : हो... झालं ना... हा काय... आरसा समोरच आहे, छान हँडसम दिसतोय मी...😊
अंजली : हो का... मग मी काय करू...😠
प्रेम : त्या दिवशी लिफ्ट मधे काय केलं होतं, तसं काहीतरी कर ना...😋
अंजली : प्रेम... खुप होतंय आता...😔
प्रेम : अच्छा... खरच का... हो पण आता ते फोनमधून कसं होणार ना...🤔 त्यासाठी समोर भेटाव लागेल. 🤔
अंजली : काही गरज नाही त्याची... 😔
प्रेम : मला आहे ना पण...😊
अंजली : चाललाय ना गावी आता... बघ तिकडे भेटेल कोणीतरी वाट बघत असतील.😠
प्रेम : अरे...माझी वाट बघणारी तर इथेच आहे. त्यासाठी गावी जायची गरज नाही. 😊
अंजली : फक्त वाटच बघत बसायची ना...😠
प्रेम : अंजु.... बरं सॉरी ना आता...रिलॅक्स होशील जरा. 😊
अंजली : तु का सॉरी बोलतोय...? मीच सॉरी बोलते...😔 सॉरी, उगाच तुला भेटायला बोलवते, तुझा इंपॉर्टन्ट वेळ वाया नको जायला. राहू दे नको भेटू. ठेवते मी फोन बाय...😠
प्रेम : अरे... अरे...ऐक ना सोन्या... प्लिज 🙏🏻
बरं सॉरी, एक काम करु, आपण ऑफिस सुटल्यावर भेटू आज ओके...😊
अंजली : खरं बोलतोय तु... नक्की भेटणार आहेस ना...?🤨
प्रेम : अगं हो बाई... खरच भेटू...😊
अंजली : हेच आधी बोलला असता तर काय झालं असतं...🤔
प्रेम : एवढी मजा नसती आली ना मग...😊
अंजली : म्हणजे तु माझी मजा घेतोय...😔
प्रेम : अरे म्हणजे.... असच थोडीशी...,😊
अंजली : हो का... तु भेट संध्याकाळी... मग बघते तुझ्याकडे...😏
प्रेम : तु फक्त माझ्याकडेच बघावं, म्हणुन तर भेटतोय ना...😊
अंजली : आता मस्का नको मारू, मला नाही आवडत,,, मस्का...😋
प्रेम : मग काय आवडतं बरं...?🤔
अंजली : खरं सांगु.... 😊
प्रेम : हो खरच सांग...😊
अंजली : प्रेम.... अगदी मनापासून बोलतेय मी, तुझ्या इतकं मला या जगात काहीच आवडत नाही. कळलं....आय लव यू... प्रेम...😘
प्रेम : 😊 आय लव्ह यू डिअर...😘
अंजली : बरं सांग आता, किती वाजता सुटणार आहेस ऑफिस मधुन ? आणि कुठे भेटणार आहेस ? 🤔
प्रेम : मी साडेपाच ला निघेल ऑफिस मधुन, तु कुठे भेटशील ?🤔
अंजली : तुझ्या ऑफिस जवळ पुढे एक हिंदुस्तान हॉटेल आहे तिथे येते मी, तु लवकर ये.😊
प्रेम : तुला कसं माहिती ते ? आणि तु इकडे कशाला येतेय ? आपल्याला कुठे जायचं आहे ?🤔
अंजली : ते मी आल्यावर सांगेन.😊
प्रेम : बरं ओके... 👍🏻 आता ठेऊ फोन मी... कामं पण आहेत ऑफिस मधे...😊
अंजली : हो...हो... ठेव... आला मोठा काम करणारा, कर तु तुझं काम, मी वाट बघते. लवकर निघ पण....😊
प्रेम : हो...हो...हो... 😊
अंजली : ओके बाय...😊
प्रेम : बाय मेरी जान....😊
* असं बोलुन प्रेम फोन ठेऊन देतो, ठरल्याप्रमाणे अंजली आधीच हिंदुस्तान हॉटेल जवळ येऊन थांबलेली असते. प्रेम पण तिथे पोचतो. अंजली मॉम ची स्कुटी घेऊन आलेली असते. *
अंजली : हाय....✋🏻😊
प्रेम : अरे... हे काय... स्कुटी घेऊन आलीय तु ? लायसन आहे का ? पोलिसांनी पकडले तर...?😊
अंजली : ते मी बघेन, तु नको त्याचे टेन्शन घेऊ कळलं, आता निघुया का...?😊
प्रेम : म्हणजे तु चालवणार...? आणि मी मागे बसु...🤔
अंजली : हो... घाबरु नकोस, पडणार नाही आपण...😊 येते मला डबल सीट, मॉम ला घेऊन चालवली आहे मी, कळलं...🤨
प्रेम : बरं.... चल... नक्की बसु ना...?😋
अंजली : प्रेम... आता टाइम पास करू नको, बस ना पटकन...😊
प्रेम : अरे तसं काही नाही, पण जरा अवघडल्यासारखं वाटतं...😊 कधी असं बसलो नाही ना...😊
अंजली : हो... का... मग एक काम कर, तु चालव, मी मागे बसते, मग तरी ओके...😊
प्रेम : नाही नको... चालव तु... मी बसतो. 😊
* अंजली स्कुटी चालु करते, प्रेम हळुच तिच्या पाठीमागे बसतो. ती स्कुटीचा डाव्या बाजूचा आरसा असा सेट करते, जेणेकरून प्रेम चा चेहरा त्यामध्ये दिसेल. त्यातुन पहात ती त्याला बोलते....
अंजली : निघायचं का आता...? 😊
प्रेम : हो... चल... अजुन कोणी येणार आहे का मग...🤔
अंजली : बघ ना कोणी येत असेल तर लिफ्ट देईन मी, कारण अजुन एक जण बसेल आरामात, दोघांच्या मधे, एवढी जागा तर दिसतेय...😊
* प्रेम थोडा पुढे सरकून बसतो. *
प्रेम : चल आता... खुप बोलली. 😊
अंजली : अच्छा... असं बसतात का मग...?😏
प्रेम : मग कसं बसतात...🤔
अंजली : तु चालव मग, मी दाखवते, कसे बसतात बाईक वर....😊
प्रेम : काही नको... तु चल आता... उशीर होतोय. 😊
अंजली : अच्छा... पकडलं तरी चालेल मला. 😊
* प्रेम एक हात तिच्या खांद्यावर ठेवतो. तिथूनच जवळ असलेल्या एका तलावाजवळ दोघे पोचतात. अंजली गाडी पार्क करते. आणि दोघे पुढे जाऊन एका ठिकाणी बोलत बसतात.
प्रेम : बरं... बोल... कधी जाणार आहात आपण गावी...?🤔
अंजली : या फ्रायडे ला...😔
प्रेम : अरे व्वा... मस्तच 😊
अंजली : काय मस्त...🤨 म्हणजे तुला आनंद होतोय का मी गावी चालले म्हणुन...🤔
प्रेम : अरे पण... गावी तर मज्जा असते. तुला नाही आवडत का गावी ?😊
अंजली : तसं काही नाही रे... मला पण आवडतं, पण यावेळी माहीत नाही, ती गावी जायची नेहमीची ओढ जाणवत नाही.😔
प्रेम : का बरं असं...? 🤔
अंजली : खरं सांगु... मला तुझ्यापासुन दुर नाही जायचं आहे. 😔
* असं बोलुन ती त्याला मिठी मारते.
प्रेम : अरे... एवढी काय इमोशनल होतेय ?😊
अंजली : माहीत नाही मला, पण नाही जावस वाटत. 😔
प्रेम : अगं वेडे... अशी रिऍक्ट करतेय, जसं की, कायमची सोडुन चाललेय मला.🤔
अंजली : प्रेम...😠 प्लिज... पुन्हा कधी असं नको बोलु, मी तुला तेव्हाच सोडेन जेव्हा गॉड मला वरती बोलवतील कळलं. 😔
प्रेम : अरे हो... मी मस्करी केली. 😊
अंजली : पुन्हा अशी मस्करी नको करू... मला नाही आवडत. 😔
प्रेम : बरं... सॉरी... परत कधी असं नाही बोलणार... ओके. 😊
अंजली : इट्स ओके. 😔
प्रेम : आता जरा स्माइल करशील...? का असाच चेहरा बघत बसु मी... मग तु गावी गेल्यावर तशीच स्वप्नात येशील....😊
अंजली : 😊 प्रेम... काय हे पागल...?😊
प्रेम : काही नाही... 👉🏻😊 हेच परत आणायचं होतं... म्हणुन बोललो. 😊
अंजली : हो का...😊
प्रेम : हो... ना... 😊
अंजली : आय लव्ह यू प्रेम...😊
* असं बोलुन ती पुन्हा त्याला मिठी मारते.
प्रेम : आय लव्ह यू... मेरी जान... 😊
अंजली : अच्छा... बरं एक सांग मला...?
प्रेम : काय...? 🤨
अंजली : मी गावी गेल्यावर, मला मिस करशील...😊
प्रेम : आजिबात नाही...😊
अंजली : काय !!!!!! खरच का...?😔
प्रेम : हो... खरच...😊 का मिस करू..?🤔
अंजली : किती निर्दयी आहेस रे...? निदान खोटं तरी बोलायचं... हो करेन म्हणुन. 😔
प्रेम : अरे पण खोटं का बोलू मी...🤔
अंजली : मला बरं वाटावं म्हणुन बोलायचं ना...😔
प्रेम : अच्छा... 😊 खरं तर, मी पण गावी जाणार आहे ना, मग मी तिकडे खुप एन्जॉय करणार आहे. मग मिस करायला वेळ कुठे असणार...? 😊
अंजली : हो... का...🤨 हे बरं आहे ना तुझं... मी तिकडे गावी तुझ्या आठवणीत झुरायचं, आणि तु मस्त एन्जॉय करणार...😔
प्रेम : अरे..... तु पण गावीच चाललीय ना ? मग तिकडे जाऊन तु पण एन्जॉय कर. गावी कशाला जातो आपण...? इथल्या वातावरणातून थोडं फ्रेश व्हायला ना...?😊
अंजली : हो रे राजा... कळतंय मला ते, मी पण एंजॉय करते तिकडे, पण यावेळी जावसच वाटत नाही, मी काय करू...😔
प्रेम : अंजु... हे बघ... आपण परत आल्यावर भेटणारच आहोत ना, मग एवढं टेन्शन का घेतेय, मस्त जा तिकडे, मजा मस्ती करून ये.😊
अंजली : हो...हो...हो...चाललीय ना आता, मजा मस्ती चे माहीत नाही, पण खरच मिस करेन तुला खुप....😔
प्रेम : बघ आता...पुन्हा तेच...🤨
अंजली : हो... ना... कळतंय मला, पण काय करू मी...? 😔
प्रेम : हे बघ अंजु... असं नाही करायचं कधी, आपण तर भेटणारच ना, तु परत आल्यावर. मग तिकडे जातेय तर, मनापासून जा, तो पुर्ण वेळ त्यांना दे, आणि ते क्षण एन्जॉय कर त्यांच्यासोबत कळलं...😊
अंजली : हो... रे... करेन नक्की...😊
प्रेम : छान... आता कसं बोलली...😊
अंजली : तु पण चाललाय ना गावी, मग तु पण एन्जॉय कर. आणि लवकर परत ये, मग आपण भेटू...😊
प्रेम : हो...हो... आधी जाऊ दे तरी...😊
अंजली : कधी जाणार आहेस तु...आणि किती दिवस राहणार...?🤔
प्रेम : मी शनिवारी रात्री जाणार आहे, एक आठवडा तरी राहीन. 😊
अंजली : अच्छा... मग ठिक आहे. माझं मलाच माहीत नाही, मी किती दिवस राहणार आहे तिकडे, पण कळवते तुला. 😊
प्रेम : बरं ओके... आता निघुयात आपण. 😊
अंजली : काय रे घाई असते तुला एवढी...🤔 आत्ताच तर आलो ना, थांब ना थोडा वेळ...😊
प्रेम : अरे... एक तास झाला येऊन, आणि घरी मॉम वाट बघत बसेल. एकतर स्कुटी घेऊन आलीय. तेही लायसन नसताना. 😊
अंजली : त्याचे टेन्शन तु नको घेऊ, मी बघेन ते, कळलं... उगाच घाई करू नको. बस जरा वेळ मग जाऊ. 🤨
प्रेम : बरं ओके... काय करायचं जरा वेळ बसून....😊
अंजली : अच्छा... ते पण मीच सांगु का...,?🤨
प्रेम : म्हणजे....🤔
अंजली : बरं एक काम कर, जरा आजूबाजूला नजर फिरव, खुप कपल आहेत ना ..., काय करत आहेत ते....😊
प्रेम : (इकडे तिकडे नजर फिरवत) हे भगवान...🙏🏻,,😋
अंजली : का रे...काय झालं...😊
प्रेम : काही नाही....😋
अंजली : हो... खरच का, काही नाही...😊
प्रेम : अंजु....😊
* प्रेम तिच्याकडे पहात असतो, तेवढ्यात अंजली त्याच्या जवळ येते आणि अलगद त्याच्या ओठांवर ओठ ठेवते. प्रेम पण प्रतिसाद देत तिला अजुन जवळ घेतो. दोघांच्या गप्पा रंगतात आणि काही वेळ ते दोघे एकमेकांमध्ये रमुन जातात.
संध्याकाळचे ७ वाजलेले असतात, प्रेम तिला उशीर होतोय याची जाणीव करून देत असतो, पण अंजली त्याला थांबवत असते.
थोड्या वेळाने दोघे तिथून जायला निघतात. अंजली त्याला स्कुटीची चावी देत बोलते.
अंजली : ही घे...तु चालव...😊
प्रेम : अच्छा... का बरं...😊
अंजली : असच...😊 मलाही तो अनुभव घ्यायचा आहे, तुझ्यासोबत गाडीवर पाठी बसुन.......😊
प्रेम : हो...का... 😊 बरं चल...😊
* असं बोलुन तो स्कुटी चालु करतो. अंजली त्याच्या पाठी बसते. थोडे पुढे गेल्यावर ती पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारते.
तिच्या अशा मिठीचा अनुभव प्रेमला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो.
गाडीवर जाताना मधेच ती थोडी मस्ती करू लागते. कधी मानेवर हलकासा किस करते,😘 तर कधी हळुच त्याच्या कानाला चावते. 😊
प्रेमला हे सर्व वेगळं वाटत होते, आणि आवडत ही होते, त्यामुळे तो फक्त आरशात तिला पाहून या सर्व सुखद गोष्टी अनुभवत होता. 😊
तिच्या घराच्या थोड्या अंतरावर आल्यावर प्रेम स्कुटी थांबवतो.
प्रेम : चल उतर आता...आणि काय चाललं होतं तुझं... असा डिस्टर्ब करतात का गाडी चालवताना. 😊
अंजली : अच्छा... नाही आवडलं का तुला, 😊
प्रेम : म्हणजे...तसं नाही...😊
अंजली : मग कसं....😊
प्रेम : अंजु.... काय हे....😊
अंजली : कुठे काय.... तुला कळांव म्हणून, 😊
प्रेम : अच्छा... जरा जास्त होतंय असं नाही वाटत का तुला...,😊
अंजली : मला तर नाही वाटत...😊
प्रेम : हे भगवान....🙏🏻 😊
अंजली : आता काय...🤨
प्रेम : काही नाही... आता जा घरी, खुप वेळ झाला. 😊
अंजली : अच्छा... चल ना मी तुला घरी सोडते, आणि मग जाते घरी. 😊
प्रेम : नको.... काही गरज नाही त्याची, ऑटो खुप आहेत इथे, मी जाईल ऑटो ने, ओके... आता तु जा लवकर घरी....,😊
अंजली : बरं हो.... जाते.... आणि थँकयु वेरी मच...😊 फॉर एवरीथिंग....😊
प्रेम : अच्छा...😊 बरं ओके, बाय...✋🏻
अंजली : बरं बाय... आणि मिस यु... उद्या बोलू .... बाय....✋🏻
* असं बोलून ती स्कुटी घेऊन तिथून घरी निघुन जाते. ती दिसेनाशी होईपर्यंत प्रेम तिला पाठमोरी पहात असतो. मग ऑटो पकडुन घरी येतो.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️