एक सुंदर भावना Monika Suryavanshi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सुंदर भावना

 प्रेम, प्यार ,लव किती तरी शब्द आहेत पण भावना मात्र एकच.कसा आला असेल ना हा शब्द ,किती सुंदर दिसतो शब्द .या शब्दात एवढी ताकद आहे कि युध्द ,भक्ती या पेक्षाही प्रेम हे श्रेष्ट आहे . प्रेम खुप छान आहे फक्त योग्य व्यक्ती सोबत व्हाव.प्रेमात माणुस एवढा बदलतो जस कि एक उदाहरण , खिडकी उघडुन बाहेरची फुल बघेल आणि बंद करेल. पण तीच प्रेमात पडलेली वैक्ती खिडकी उघडुन फुले,पक्षी,आभाळ सुध्दा टक लावुन बघेल आणि तासभर एकटाच रमेल हा होतो बदल .प्रेम माणसाला हुशार ही करत .प्रेमात खुप काही शिकतो माणुस . स्वता कडे जास्त लक्ष द्याला लागतो.प्रेमात काय मरायचय कोणत्या काल आलेल्या मुला ,मुली साठी अस बोलणारा पण जेव्हा प्रेम करतो आणि ती व्यक्ती जरा दुर्लक्ष्य कराय लागली कि कापुण घेतो . प्रेमात माणुस सुधारतो जरी ती भेटली नाही तरी आणि जर ती सोडुन गेली आणि व्यसण करु लागलात तर समजुन जा कि तुम्ही प्रेम केलच नाही . ते आकर्षण होत कारण खर प्रेम एक चागल माणुस बनवतो.आपण विचार ही करत नाही कि आपण हे करू शकतो का?तोच प्रेमातला माणुस मेहणत करायला लागतो त्या एका व्यक्ती ती साठी . आपले फोटो कमी पण त्याचे खुप वेळा बघेल फोटो .आपला विचार कमी पण त्याचा जेवली असेल का? काय करत असेल ? बरी असेल ना असे खुप विचार करत असतो .राग,मस्करी सगळ काही त्याच्या वर करतो . कितीही श्रीमंत असला किंवा कितीही सुंदर कोणी ही भेटल तरी ती व्यक्ती त्याच्यासाठी खासच असते .कितीही चागला मुलगा बघितला म्हणतो माझ्या माणसा पेक्षा कमीच आहे.कारण आपण त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेण बघत असतो ते इतर कोणाच्या त्या नजरेण बघण शक्य नसत.आपण त्या व्यक्ती ने दिलेली पत्र ,गिफ्ट,चोकलेट ची कागद किती सभांळुन ठेवतो.अगदी छोट्या छोट्या गोष्ठी तुन आपल प्रेम समजत .आपण काय बोलतोय हे कोणाला समजणार नाही पण त्या व्यक्तीला समजत .कुठे भिरायला गेलो आणि तुम्हाला काही आवढल तर ते बोलायला सुध्दा लागत नाही.लाइट गेली कि गरम होतय म्हणुन चिडचिड करणारे पण रात्रीच गोंधडी घेउन बोलत बसतात.त्या व्यक्ती चा विचार करत बसला कि किती वाजले हेही समजत नाही.आपण कसे होतो आणि आता कसे झालो याचा विचार करुन चेहऱ्यावर वेगळच हास्य येत.आपण कधी काळी सांगितलेल असत मला हे खायला आवढत ,मला या ठिकाणीं जायचय आणि ते लक्षात ठेवून आपली ती इच्छा पुर्ण करतात.आपल्याला त्रास होत असेल तर त्या व्यक्ती पासुन लांब जावा आणि योग्य व्यक्ती ची वाट बघा नक्कीच तुम्हाला आवढेल ते करेल आणि तुम्हच्या साठी खुष राहील जरी ते त्या व्यक्ती ला आवढल नसेल पण तुम्हच्या आनंदात तीचा आनंद असेल. नात्यात विश्वास, सम्मान महत्वाचा असतो.प्रेम एक वेळी कमी करा पण आदर असावा.त्या व्यक्ती च्या पाठी मागे सुध्दा आपण आदर ठेवून बोल पाहिजे. आयुष्यात एकदा तरी प्रेम करा कारण ती भावनाच वेगळी असते आणि युग्य जोडीदार असला तर आयुष्याच सोन च.संकटांत नातेवाईक ,मैत्र ,मैत्रीनी येणार नाहीत पण खर प्रेम येत . खरच कधी कधी आपले नातेवाईक आपल वाइट करतील कारण कोणाला आपल चांगल बघवत नाही पण आपल्या प्रेमाला वाटत आपण मोठ व्हाव.

 डोक टेकवायला मिळालेला खांदा जर चुकीचा मिळाला तर पुढे कुठेच डोक शांत विश्वासाने टेकवता येत नाही.नाती तुटली तर ती पुन्हां जोडली जावु शकते पण माणस तुटली तर ... काही माणस असतात जी परत जोडतात पण घाव राहतात . किती ही भांडण झाली तरी एकत्र येउ पण माणुस लांब गेल एकदा तर ते परत येण अशक्य असत.आहे तो पर्यत माणस जपा, नात जपा.