नियती - भाग 31 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 31



भाग 31




मोहित.....

"मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...
तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???
तीन वर्ष थांब फक्त... तुला मी मग.... बंगल्याची राणी आणि बाबांना बंगल्याचा राजा बनवेल."
असं म्हणून मोहितने पार्वतीच्या माथ्यावर ओठ ठेवले.




......

तिकडे कुलकर्णी बंगल्यासमोर...
रात्री साडेनऊच्या दरम्यान ..... कारचा करकचून ब्रेक दाबल्यामुळे जोराने आवाज झाला.,... आणि आरामशीर बसून असलेला वॉचमन दचकून उभा झाला ....



आणि.....
एक आलिशान काळ्या रंगाची कार गेट समोर उभी राहिली... वॉचमन ने गेट खोलले.... कार आत मध्ये बंगल्यात एका साईडने घेतली आणि पुन्हा नियंत्रण सुटून  मग गचकन ब्रेक दाबल्यामुळे  ती पोर्चच्या खांबाला जिथे झोपाळा होता तेथे धडक देता देता थांबली....






त्यातून जी व्यक्ती उतरली ती झिंगलेल्या अवस्थेत होती.
तो व्यक्ती म्हणजे धवल होता.,. एरवी दिवसा असणारा धवल आणि रात्री दिसणारा धवल नेहमी वेगळा राहायचा.
सहा फुट उंचीचा... अंगाने पिळदार व्यक्तिमत्व....
रंग गोरा... पण सतत तोंडात घाणेरडा खर्रा.....
आताही आलेला तर चेहऱ्यावर बेफिकीर भाव... झिंगलेल्या अवस्थेत तोल साधता येत नसल्यामुळे इकडे तिकडे डोलत... स्वतःला सावरत पायऱ्या चढू लागला पण एका साईटच्या रॅलींगला पकडून..

त्याची वाट पाहत असलेल्या.. लीला... ह्या लागबगीने बाहेर आल्या..... आणि त्याच्याजवळ गेल्या. त्याच्या डाव्या बाहुला पकडून आत मध्ये घेऊन आल्या...






तो आला तेव्हा... मायराने वरच्या बाल्कनीतून डोकावून बघून... याचे नेहमीप्रमाणेच आहे अजूनही तसेच...
केव्हा दारू सोडणार माहित नाही... आणि केव्हा तो त्याच्या तोंडातला खर्रा बंद होणार हे माहित नाही...
हा विचार करत.... आपल्या रूममध्ये निघून गेलेली...
कारण तिला माहीत होते आता थोड्यावेळाने मोहितचा कॉल येईल... त्याचा पण ती वेट करत होती...

..............,.




..... धवल आपल्या मामीला म्हणाला...
"तू माझी वाट पाहत होतीस...???"... व्हिस्की ने पुरेपूर झिंगलेले शब्द त्या तोंडातून कसेबसे उड्या घेत बाहेर येत होते. थरथरंत....... त्यावर लीला बोलणार होत्या...
पण...







समोरच्याच सोफ्यावर... बाबाराव शेरूला जवळ घेऊन कूरवाळत बसलेले होते.... 
त्यांची नजर त्यांच्याकडे गेल्यावर ......
त्यांनी फक्त हुंकारापलीकडे शब्दही ....त्यांनी उच्चारलाच नाही...
त्यांच्या मनात धडकी भरली... बाबाराव यांच्या चेहऱ्याकडे बघून... 

कारण ते शेरूला जरी कुरवाळत हळूहळू त्याच्याशी बोलत लाड करत असले तरीही त्यांचे संपूर्ण लक्ष धवल आणि आपल्याकडे आहे हे लीला जाणत होत्या.





तरी धवलचे पुन्हा सुरू.... लीला यांच्याकडे पाहून....
"तू माझी वाट पाहत होतीस....???"
स्वतःचा तोल सावरीत धवल कडून आलेले शब्द लीलांनी ऐकले.






तसे लीला यांनी... आतल्या आत घाबरल्यागंत पण आलेला राग घशात गिळण्याचा प्रयत्न केला....







बाबाराव.....
"धवल ...तू आजकाल हे फारच चालवलं आहेस.. असं वाटत नाही का तुला...??
... बाबाराव यांच्या अंतकरणात रागाने ज्वाला पेटत असताना सुद्धा मनाचा शांतपणा ढळू न देता .....आवाजात जरब आणून विचारले...






तो तिथे समोर महत्प्रयासाने स्वतःला सावरत उभा होता...
त्याची स्थिती बघून बाबाराव .......
यांनी लीला यांना म्हटले.....
"लीला...त्याला बेडरूम मध्ये घेऊन जा झोपण्यासाठी.."






तसे लीला धवलला बेडरूम कडे नेऊ लागल्या...
"आत्या... मी फक्त जराशी घेतली..."





तारवटलेल्या डोळ्यांनी बेडरूम मध्ये शिरता शिरता धवल लीला यांना म्हणाला...




लीला...."नशीब माझं...!!!"





होलपटत तो कसातरी कॉट जवळ आला...
लीला यांनी कसेतरी त्याला कॉटवर निजवले. आणि त्याच्या पायातील सॉक्स काढून घेतले.

दोन मिनिटे होत नाहीत तर धवल बेडवरून उठून म्हणाला...
"आत्या... मागच्या  वेळेस अर्धी ठेवलेली .."








आता मात्र लीला चिडल्या...
त्यांनी आतापर्यंत राग आवरून धरलेला होता पण यापुढे आपण मनावर ताबा ठेवू शकू यावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता...





धवल.....
"दे ना गं आत्या ....ती अर्धी ठेवलेली... अजूनही मला चढलेली नाही..."





लीला...
"हे बघ धवल... मी आता तुला पिऊ देणार नाही.... आणि तसेही तुझी अर्धी ठेवलेली होती ..ती यांनी केव्हाच फेकली.."






लीला यांनी असं म्हणताच... चिडलेला धवल धडपडत उठून उभा राहिला. आणि तसेच हेलपाट्या खात तरतरा दाराजवळ आला.
तो बाहेर कशासाठी चाललेला आहे हे लीला यांच्या लक्षात आले नाही लवकर.... पण लक्षात आल्यानंतर बाहेर जाणाऱ्या त्याला दंड पकडून थांबवले.






लीला... "धवल थांब."

तेवढ्यात तेथे "जेवण वाढायचे का धवलसाठी" ...हे विचारण्यासाठी एक गडी माणूस आला.




गडी माणूस...
."जेवण वाढायचे का..???"

उत्तराच्या अपेक्षेने गडी माणूस लीला यांच्याकडे पाहत होता.





तेथेच बाजू असलेला धवल तो आलेला बघून चवताळला. तरवटलेल्या डोळ्यांनी तो गडी माणसाकडे पाहत होता...

पण गडी माणसाने  धवल कडे लक्ष न देता त्या रूममध्ये बेडवर थोडा पसारा दिसला तर तो आवरू लागला.






तो गडी माणूस बिचारा काम करत असतानाच 
धवल त्याच्याजवळ गेला आणि डाव्या हाताची सणसणीत थप्पड त्याच्या उजव्या गालावर ठेवून दिली.



थप्पड एवढी जोरदार बसली की गडी माणसाला गालावर चुरचुर होऊ लागली आणि कानशील सून्न बद झाल्यासारखे वाटले.


धवल......
"या घरात तू मला पहिल्यांदा आहेस का...??? 
मी इथे आहे आणि तू स्वतःच्या मग्रुरी मध्ये काम करत आहेस..."



त्या गडी माणसाला हे सुद्धा समजले नाही की आपले कोणते चुकले...???




लीला यांनी त्याला इशारा केला. तसा तो
पटकन निघून गेला.





धवल हा स्वभावाने हट्टी तर होताच.. त्याच्यामध्ये सहनशीलता नावाचा गुण अजिबात नव्हता.

इथे बाबाराव .... धवल आला तेव्हापासून त्याच्यावर बारीक नजर लक्ष ठेवून होते....


धवल आला तेव्हापासून त्याच्या
वागणुकीमुळे लीला या नाराज झाल्या होत्या.






तो जर चांगला वागला असता तर आत्ताच त्या बाबाराव यांच्याशी गोष्ट करणार होता...


धवलने आता त्या रूममध्ये लपवून ठेवलेली तिथेच... एक व्हिस्की ची बॉटल काढून घेतली......

धवल...." आत्या तू आता झोपायला जा."


लीला....."तू जेवणार नाहीस...???"






धवल...."माझ्यासारखी शहाणी माणसं.. जेवत नाहीत. स्वर्गातला आनंद घेतात. 
..............................आणि नरकातली दुःख सांगायची नसतात."






लीला.....
"अरे ...माणसात ये ना...!!!"

मग त्याने स्वतःला सावरून टी पाय वर संपलेली बाटली.... ठेवली... सरळ झाला आणि बेडवर ताणून दिली....







लीला..... बराच वेळ उभे राहून विचार करत होत्या.



त्यांना आज धवलच्या या अवतारात काहीतरी गवसलं होतं...





बऱ्याच वेळानंतर त्या भानावर आल्या.. टिपायवरची संपलेल्या बाटलीकडे त्यांनी कोरड्या नजरेने पाहिले.

......







सकाळी सकाळी धवल लवकर उठला... आळोखे पिळोखे  देत बेडरूम मधून बाहेर आला तर त्याला लीलाही उठून दिसल्या.

धवल त्यांच्याजवळ गेला तर लीला यांनी त्याला प्रश्न विचारला....
"तू आता शुद्धीत आहेस...???"




"हो"




"माझं बोलणं तुला समजत आहे...???"




"हो"





"तू इथे येण्या अगोदर एका पोरीबरोबर गेला होतास..??"




"हो"





"तुला लाज वाटली नाही...???"




"हो"

लीला प्रश्न विचारत होत्या आणि धवल निव्वळ "हो हो " करत होता.





फक्त हुंकारच त्याच्या तोंडून ऐकू येत असल्यामुळे लीला भडकल्या आणि धवल समोर उभे राहून सणसणीत त्याच्या थोबाडीत ठेवून दिल्या.... दोन-तीन थप्पड.

आता धवलचे तारवाटलेले डोळे पटकन उघडले.

कसेबसे त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले...
"काय???"





लीला यांनी आणखीन काही विचारण्याऐवजी त्याच्या थोबाडीत आणखी दोन सणकावून दिले.
"आत्या...??"





"तू त्या पोरीबरोबर कुठे गेला होतास... शेण खायला.."




कालपासून लीला यांची सहनशक्ती संपली होती.




"मी ...??? हो गेलो होतो.   तर....???"

आता लीला यांनी इकडे तिकडे पाहिले.... कोणी आजूबाजूला दिसत नाही तर हळू आवाजात पण जरब
विचारले....
"तिला खाली घेतली होती...???"

"हो."





"तुला लाज वाटली नाही...???"





"..हूं.."

हे ऐकल्यानंतर लीला यांचे  डोके आणखीन भडकले आणि त्या स्वतःला विसरल्या.




आपण काय करत आहोत याचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही. दोन्ही हातांनी त्यांनी धवल ला बदडायला सुरुवात केली....
तसेच त्याच्या हाताला पकडून खेचत 
"निघून जा... माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता..."

असे म्हणून त्यांनी ढकलत ढकलत बाहेर दाराच्या घेऊन गेल्या...




घराच्या बाहेर काढून टाकले आणि दार आत मधून लॉक केले.... दाराला टेकून आतमधून त्या उभ्या राहिल्या ..
तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला आणि....




त्या दिशेने त्या बघू लागल्या तर बाबाराव हे बेडरूम मधून बाहेर शेराला घेऊन येत होते ........




ते विचारू लागले...
"लीला ....दार का बंद केले आहे... खोल.."

त्यांचे ऐकूनही त्यांनी दार न खोलता तसेच टेकून उभे राहिल्या....
तेवढ्यात शेराचा आवाज आला त्यांना....




तसे त्या भानावर आल्या आणि....

🌹🌹🌹🌹🌹