नियती - भाग 34 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 34







भाग 34





बाबाराव.....
"हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीपासून इच्छा होती.... आणि तिची इच्छा मी पूर्ण करू इच्छितो... जेव्हा तुम्ही लग्न तिकडे कराल तेव्हा कोणत्याही पद्धतीने करा पण हे मंगळसूत्र मोहितच्या हाताने घाल. तिचा
आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील."


असे म्हणून ते मायराच्या डोक्यावरून केसांवरून कुरवाळंत उठले आणि बेडरूम मध्ये निघून गेले..

मायराच्या तोंडून एकही शब्द निघाले नाही. निव्वळ डोळ्यांतून टप टप अश्रू पडत राहिले.

.... तसे मग मोहित... त्यालाही....

कसेतरी वाटू लागले होते... त्याचेही हृदय भरून आले होते एका बापाची व्यथा समजून..... पण त्याच्याजवळ तरी कुठे पर्याय होता...??

नियती आपले काम करत होती सुरळीतपणे... आणि तिच्या तालावर सगळे चालले होते...

........






इकडे उद्या निवडणुकीचा रिझल्ट होता.



कालच निवडणुकीच्या दिवशी परत आलेला सुंदर त्याच्या कानावर गावातल्या गोष्टी आल्या..


आपण जिच्यासाठी दिवस रात्र तळमळलो ती मायरा आपल्या डोळ्यांसमोर मोहितच्या कपाळाला बाशिंग बांधणार हे ज्यावेळी... सुंदरला समजले ....त्यावेळी त्याच्या मेंदूला झिणझिण्या आल्या आणि आपले कुळ एवढे उच्च असूनही आपल्याच गावातील हलके कूळ असणाऱ्या मोहितशी ही मायरा लग्न करते म्हणून त्याची पित्त खवळले....

चांगली शेकली ......जिरली होती तरी... त्याची आतून तडतड होत होती..





दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू झाली...
सर्वांनाच माहीत होते जिंकून कोण येणार आहे...???
सगळीच जय्यत तयारी झाली होती...
पण त्याचबरोबर गावात एका भागात कुजबूज वाढली होती.....आणी ही  कुजबूज पसरत गेली.


इकडे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला...
आणि तिकडे ....त्याच वेळेला मोहितच्या घराजवळच्या एरियात... त्या दोघांचे लग्नं.. लहानशा मंडपात... जास्त गाजावाजा न करता.... अगदी शांतपणे घराजवळचे पन्नास लोकांच्या आशीर्वादाने..
पार पडले... दोघेही लग्न बंधनात बांधले गेले..

चर्चा होऊ लागली.... कुजबुज आणि चर्चेतून बाबारावांना काय झाले ....ते कळले...





बाबाराव निवडणूक जिंकले होते.... तरीपण गावातल्या या चर्चेमुळे वातावरणात एक प्रकारे तणाव निर्माण झाला होता.



इकडे बाबारावांचा बंगला अवघडला होता...
आणि तिकडे बाबाराव स्वतः अवघडून गेले होते...
राम होता तिकडे त्यांच्यासोबत...
पण तो काय करणार होता...??



तेवढ्यात न्यूज कॅच करणारा एक वयस्कर वार्ताहर
बाहेर असलेली ,....तर त्यांचे लक्ष रामकडे गेले.... राम 
त्यांच्या परिचयाचा होता दूरच्या नातलगांमधला कुणीतरी...
तर एकमेकांची विचारपूस करताना चर्चेमध्ये बोलण्याच्या ओघात राम बोलून गेला.
आणि तो वार्ताहर आपल्याला काहीतरी न्युज सापडली आगळी वेगळी... तर लोकांसमोर बोलून वेगळा झाला...




वार्ताहर.........
"मित्रहो... आज जे येथे या गावात सामाजिक आणि राजकीय वातावरण आहे... ते मूल्यांची संस्कृती जपते आहे...असेच म्हणावे लागेल.
एकीकडे आधुनिकता येत असताना काही कालबाह्य संस्कृती आणि प्रतिगामी विचारधारेचा पुरस्कार केला जातो आहे. पण आज.,.. 
तेही निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी.....
अशावेळी ...ही विचारधारा मोडकळीस काढण्याचं काम आजची निवडणूक जिंकणारे श्री बाबाराव यांच्या पुरोगामी विचारांनी केलेले आहे. 
ही पुरोगामी चळवळ जी त्यांनी आता सुरू केली आहे.
ती प्रयत्नपूर्वक एकजुटीने पुढे कसे नेता येईल हे ते बघणारच यात शंका नाही. 
तर आपण त्यांना........ निवडणूक जिंकले याकरिता अभिनंदन करूया ....तसेच त्यांनी पुरोगामी विचारशक्तीचा अंगीकार कसा करावा ....याची जी सुरुवात स्वतःच्या घरूनच केलेली आहे त्यासाठीही त्यांना अभिनंदन करूया...."

असे बोलत बोलत ते वयस्कर वार्ताहर बाबाराव यांच्यासमोर उभे राहिले..
आणि...




आणि त्यांना म्हणाले...
"साहेब ...
आपण जे पुरोगामी तत्व वापरले आहे... ते सर्व गावकऱ्यांनाच नव्हे तर शहरी भागात राहणाऱ्या प्रतिगामी विचारधारेच्या लोकांनाही प्रेरणा ठरायला पाहिजे...आपल्याला काय वाटतं...??"



बोलून झाल्यानंतर त्यांनी स्वतः समोरचा माईक बाबाराव यांच्या चेहऱ्या पुढे धरला.
बाबाराव......
"सर्वप्रथम माझे तुम्ही अभिनंदन केले त्यासाठी मनस्वी आभार.🙏🙏
आमच्या गावात जास्तीत जास्त राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण कलूषीत राहिलेले आहे. 
मी पूर्वीपासून पाहत आलेलो आहे.. कुठेतरी हे थांबणं जरुरी होतं. पुरोगामी चळवळ आमच्या गावात मी सुरू केली आहे. आणि त्यासाठी आमच्या गावातले लोक एकजुटीने प्रयत्न करतील याच्यासाठी मी आशावादी आहे. जनतेच्या व्यापक एकजुटीने मी ही चळवळ पुढे नेणार. आणि ह्या अशा पुरोगामी विचारांवर त्या विषयावर जनतेचा एकत्रित हुंकार उमटला पाहिजे  यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे... 
आज पर्यंत चालत आलेली प्रतिगामी विचारधारा...
ती योग्य असावी आणि सोबत पूरोगामी विचारधारा ...तिचाही अंगिकार व्हावा  यासाठी....संस्कार अगदी बालपणापासूनच होणे आवश्यक आहे... असं तरी मला वाटतं..."



बाबाराव यांनी जोमामध्ये येऊन असं बोलल्यानंतर 
तेथील सर्व वार्ताहरांना आनंद झाला आणि पुढेही काही त्यांच्या न्युज पेपर मराठी बातमी मिळू शकते .......
खाद्य मिळू शकते म्हणून ते उत्साहात आले... 
आणि जे लोकं तेथे उपस्थित होते विशेषतः तरुण मुलं त्यांनी बाबाराव यांना आनंदाने खांद्यावर उचलून घेतले आणि जल्लोष केला...





चर्चेचा ऊत नानाजींच्या घरापर्यंत पोहोचला. 
त्याच्यामुळे नानाजींचे अंग संतापाने थरथरू लागले...
हा संताप जो आहे तो अपमानाचा होता..
गावापुढे झालेल्या बेईजत्तीचा होता....

.....




इकडे थोड्याशाच लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकल्यानंतर... मायरा.. आजपर्यंत कधीही घरी
न नेणारा मोहित... त्याच्यासोबत लाज लाजून गुलाबी पडलेली ती .......त्याच्या नाही ....तर ती आपल्या नवीनच झालेल्या घरी आली..... आता ते घर दोन खोलीचे तिचेच तर होते...
जेव्हा दोघेही घराच्या दारात उभे होते तेव्हा पार्वतीला 
ती अगदी कर्दळीच्या फुलासारखी... अंगअंग कर्दळीच्या
फुलासारखं उमलून आलेली टवटवीत अशी वाटली...





पार्वतीच्या घराजवळच्या बायांची नजर मायराच्या चेहऱ्यावरून बाजूला जात नव्हती. 
आपल्या या सुनेइतकं नाजूकपण आणि देखणेपण आपल्या साठ्यांच्या पंचक्रोशीतही सापडणार नाही पण आपल्या मोहितने मात्र माझ्या आवडत्या कर्दळीच्या फुलासारखी सून आणली. असे पार्वतीला वाटत होते.
आणि ती मन भरून मनातच मोहितचे आणि सुनेचे कौतुक करत होती.


आपल्या शेजारच्या... सर्वांच्या ...कौतुक नजरांची..... सावली जी सुनेच्या अंग अंगावर पडत होती... ते पाहून पार्वती आणि कवडू दोघांनाही... आतून भीती दाटून आली....
सारखा बायकांचा कलकलाट सुरू होता...
त्या कलकलाटातच एक दुसरीच्या कानाशी कुजबुजत होत्या...
"पार्वतीले सून बाकी सोन्यासारखी गावली बघ..."

हे कुजबुजनं पार्वतीच्या कानी पडलं... तिला धडकी भरली..... पुढचेही त्यांनी काही जास्त बोलू नये आणि आनंदी वातावरण कलूषीत करू नये...
म्हणून तिने मग बायांना... 
"चला ..चला ..आता थकून गेलोय सगळे... आपापल्या घरला जा आणि संध्याकाळी वाटल्यास पुन्हा या..."
असे म्हणून पिटाळून लावले.

कवडूला मात्र एकसारखी अनामिक भयाची भावना व्यापून राहिली होती. काहीतरी अमंगळ घडणार आहे.. असेच वाटत होते सारखे.
.....




नानाजींच्या घरासमोर ताशांवर टिपरी कडकडू लागली... ती टिपरी बाबाराव यांच्या निवडणूक जिंकण्याची..... जल्लोषाच्या रूपातली होती........ हा टिपरीचा आवाज नानाजींच्या कानात भेसूर येत होता..... 





नानाजींना आणि सुंदरलाही असं वाटत होतं की जाणून बुजून हा जल्लोष त्यांच्या दारासमोर बाबाराव करत आहेत... पण खरं पाहता असं काही नव्हतं.......
त्या दोघांच्याही उरातला श्वास जोराने 
वर खाली होत होता चिडल्यामुळे संतापाने...




मिरवणुकीत समोर नाचणारे बाया माणसे पाहून बाबाराव मनी मानसी सुखावले.... धन्य झाले.
हे असे बेभान अवस्थेमध्ये जिंकल्याचा उत्साह जल्लोष साजरा करणे पाहून त्यांना हसूच आले.
आतापर्यंत त्यांच्या मनात जी नाराजगी होती ती इथे कुठेतरी अगदी मंदावल्यागत झाली.





बँड ही होता आणि लेझीमही होती..
गावातल्या प्रत्येक वाडीत त्यांची जिप्सी प्रत्येक गल्लीबोळातून फिरणार होती..
पण त्यांना सर्वात प्रथम शिवपार्वती मंदिरात जायचे 
होते दर्शनाला आशीर्वाद घ्यायला....
तर त्यांनी दर्शन घेतले आणि मग एकूण एक गल्लीबोळातून त्यांची जिप्सी फिरली.....





स्मशानाच्या एरियातूनही जिप्सी आता चाललेली...
लेझीम बँडच्या आवाजाने... मोहितच्या घरच्यांनी ओळखलेले... सर्वांचे हृदय धडधड करू लागले ‌.... विशेष म्हणजे मायराचे जास्तंच....
ती धावत बाहेर येऊन पाहू लागली....
जिप्सी मध्ये उभे असलेले बाबाराव... यांची नजर तिच्यावर पडली... मंगळसूत्र घातलेली ती.. एक क्षण तिच्याकडे बघून... झटकन त्यांनी नजर वळवली...

तशी एकमेकावर नजर पडताच खरंतर...
मायराच्या आणि बाबाराव यांच्या हृदयात एक सुखाबरोबर दुःखाची कळ गेली होती........

पण तेवढ्यात रामने जवळ येऊन बाबाराव यांना कानात काहीतरी सांगितले......
आणि मग जिप्सी तेथे जास्त काळ न थांबता... तिने वळण घेतले दुसरीकडे....
त्यांना महत्त्वाचे काम आलेले आहे असे सांगून त्यांनी सर्वांना आभार व्यक्त केले.. आणि निघाले.......


बंगल्याच्या दारावर लीला.. यांनी ओवाळून त्यांना आत घेतले...

बंगल्यात पटांगणामध्ये एका बाजूला सर्व कार्यकर्त्यांचे जेवणाची सोय केलेली होती.. सर्वांना बाबाराव यांनी जेवणाचा आग्रह केला..... रामने जातीने सर्वांची व्यवस्था पाहिली...




पाहता पाहता रात्र व्हायला आली.....
आज बाबाराव यांना जरी ते जिंकले होते.
जल्लोष जरी सर्वांनी केला होता तरीही ते आनंदी नव्हते... त्यांचे हृदय आतून तुटले होते त्यातून कळा येत होत्या... हीच अवस्था लीला यांची सुद्धा होती....


तिकडे मायरा तरी आनंदी होती काय...???




जेव्हापासून बाबाराव यांची निवडणुकीची जल्लोष यात्रा गेली तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावरचा... आनंद मावळला होता...




तिची मानसिकस्थिती मोहित आणि कवडू-पार्वती जाणत होते...... पण ते तरी काय करणार होते...???

मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे सकाळी लवकर उठून ट्रेन ने जाण्याची दोघांची तिकीटे दाखवली होती.


त्यासाठी स्टेशनवर पोहोचण्यास त्यांना अर्धा तास वगैरे लागणारच होता तर आताच महत्वाचे लागणारे सर्व सामान त्यांनी भरून ठेवले.. पार्वतीने दोघांनाही तिकडे गेल्यावर शिवपार्वतीचे मंदिर असेल तिथे त्यांचा आशीर्वाद घेऊन संसाराची सुरुवात करा असे सांगितले....





पहाटे पाच ची ट्रेन असल्यामुळे त्यांना तीन साडेतीन वाजता तरी पहाटेचे... या काळ्याकुट्ट अंधारातंच निघावे लागणार होते घरून......





इकडे बंगल्यात एकाएकी रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास बातमी आली आणि बाबाराव भयंकर संतापले आणि त्यांनी त्याभरातच एक कॉल केला......
आणि मग......



🌹🌹🌹🌹🌹