अनुबंध बंधनाचे. - भाग 27 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 27


अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २७ )
हॉटेल मधुन बाहेर पडल्यावर अंजली प्रेमला एका शॉपिंग सेंटर मधे घेऊन येते. तिथे एका स्टोअर मधे त्याच्यासाठी टि शर्ट चॉईस करत असते. तेवढ्यात प्रेम तिला बोलतो....

प्रेम : अंजली... काय चाललंय तुझं...? 

अंजली : काय म्हणजे... 🤔 बर्थ डे बॉय साठी शॉपिंग करतेय....😊 
प्रेम : अरे पण झालं ना आता...( तिला बोटातील अंगठी दाखवत ) गिफ्ट मिळालं मला....बर्थ डे चे...😊

अंजली : अरे हो... ते माझ्याकडून होते... आणि हे मॉम कडून तुझ्यासाठी आहे.....कळलं....😊

प्रेम : अरे... पण काय गरज आहे का याची....?

अंजली : हो... नक्कीच आहे.... कारण काय आहे ना... मिस्टर प्रेम.... मॉम ने तुला गिफ्ट घेण्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत. आणि जर मी त्याचे काही घेतले ना तर....घरी गेल्यावर मलाच तिचा ओरडा खावा लागेल... त्यामुळे शांतपणे आपण याचा स्विकार करावा.... समजलं....😊

प्रेम : बरं बाई घे.... पण लवकर जरा... उशीर होतोय ना आपल्याला....😊

अंजली : हो...हो... लगेच होईल... 

* असं बोलुन ती एक स्काय ब्लू कलर चा टी शर्ट चॉईस करते, आणि त्याला चेंजिंग रूम मधे जाऊन घालायला सांगते. प्रेम पण पटकन जाऊन तो टी शर्ट घालुन बाहेर येतो.

प्रेम : कसा आहे....😊

अंजली : एकदम मस्त... 👌🏻 तुला आवडला ना....?

प्रेम : हो... छान आहे...पण... प्राइज जरा जास्तच वाटते... आपण दुसरा बघू ना....?

अंजली : नाही... मला हाच घ्यायचा आहे. किती क्युट दिसतोय माझा चॉकलेट हिरो....,😘

प्रेम : बरं ओके... घे हाच... आता झालं ना... चल मग मी चेंज करून येतो.

अंजली : नको... राहूदे...मस्त दिसतोय. 😊

प्रेम : अरे पण, ते कपडे...🤔

अंजली : ते आपण बॅग मधे घेऊन जाऊ, पण आता हाच राहूदे...😊

* असं बोलत तिने घेतलेली डार्क ब्लू कलर ची जिन्स त्याच्या हातात देते.

अंजली : जा आता... हि पण ट्राय कर...😊

प्रेम : काय हे... बस झालं ना, टी शर्ट घेतला ना....,🤔

अंजली : तुला सांगितलं ना जा आधी चेंज करून बघ होतेय का...😊

प्रेम : बरं ओके... जातो... पण येईपर्यंत अजुन काही काढू नको... प्लिज....🙏🏻

अंजली : नाही काढत... बस्.... तु जा लवकर....😊

* प्रेम जिन्स घालून बाहेर येतो, त्याला पाहून अंजली बोलते...

अंजली : एकदम परफेक्ट मॅचींग...👌🏻 मस्त दिसतेय... फिटिंग बरोबर आहे ना...😊

प्रेम : हो... बरोबर झालीय....👍🏻

अंजली : ओके...आता ते कपडे या बॅग मधे घेऊ, तु हेच घाल ...,😊

प्रेम : बरं ठिक आहे... 😊

* अंजली बिल पे करते, त्याचे कपडे एका बॅग मधे घेऊन दोघे शॉप मधुन बाहेर पडतात. संध्याकाळ झाली होती. अंजली एका हातात बॅग घेऊन दुसऱ्या हाताने प्रेमच्या हाताला कवेत घेऊन, त्याला बिलगुन चालली होती. ते दोघे थोड्याच अंतरावर असलेल्या बँड स्टँड वर पोचतात. समोर असलेला अथांग सागर, आणि त्याच्या लाटांचा आवाज अंजलीला पुन्हा रोमँटिक करून टाकतो. चालता चालता प्रेम कडे पहात ती बोलते.

अंजली : प्रेम... किती छान वाटतं ना असं... तुझ्या सहवासात पुर्ण वेळ, आणि ही छान संध्याकाळ...😍

प्रेम : हो... का... पण इथेच रात्र व्हायच्या आधी आपल्याला घरी पोचायला हवं ना....😊

अंजली : काय रे तु असा.... मी एवढी रोमँटिक मूडमध्ये बोलतेय, आणि तुला घरी जायची घाई लागलीय.....😔

प्रेम : अच्छा... मग नाही जायचं का घरी...? इथेच राहूया का....😊

अंजली : हो....😍 मला चालेल. किती मस्त रोमँटिक वातावरण आहे इथे... 😊

प्रेम : अच्छा... तुला रोमँटिक व्हायला वेळ लागत नाही. 😊

अंजली : हो... ना... तु सोबत असल्यावर मग एव्हरी टाईम मुड ऑन....😍

प्रेम : पागल....😊 चल निघुया ना आता, खरच उशीर होतोय अंजु....,😊

अंजली : ( तिच्या हातातील बॅग खाली ठेवत ) बरं ठिक आहे, आधी मला एकदा टाईट हग कर....😊

प्रेम : अरे... काय हे... इथे पब्लिक मधे....🤨

अंजली : ओय... मी फक्त मिठीत घे बोलले, अजुन काही नाही... कळलं.
आणि जरा आजूबाजूला पण लक्ष देऊन बघितलं तर कळेल आपण कुठे आहोत. आणि इथे हे सर्व नॉर्मल आहे... समजलं मिस्टर प्रेम....😊

* प्रेम इकडे तिकडे पहात हळूच तिला मिठीत घेतो. अंजली पण त्याच्या घट्ट मिठीत सामावून जाते. तिच्या कपाळावर किस करत तो तिला बोलतो.

प्रेम : थँक यु... डिअर, हा दिवस माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही.😊

 *अंजली वरती मान करून गोड हसत त्याला बोलते.

अंजली : आणि मी विसरू पण देणार नाही... कळलं... आणि असे दिवस इथुन पुढे तुझ्या आणि माझ्या आयुष्यात कायमचे असतील. आय लव यू... प्रेम....😍

प्रेम : आय लव यू... टू....😊. 

*असे बोलत दोघेही एकमेकांना अलगद मिठी मारतात. थोड्या वेळाने दोघेही टॅक्सी पकडुन तिथून घरी यायला निघतात. टॅक्सी मधे अंजली त्याला बिलगुन त्याच्या कुशीत झोपलेली असते. कधी तिचा डोळा लागतो. तिलाही कळत नाही. विंडो मधून येणाऱ्या हलक्याशा प्रकाशात प्रेम तिच्या निरागस चेहऱ्याकडे पहात राहतो.
हवेने उडणारे तिचे केस सावरत तिच्या कपाळावर अलगद किस करतो. आणि पुन्हा एकदा तो त्याच्या विचारांच्या गर्तेत गुंग होऊन जातो. 
अंजलीच्या घरापासून काही अंतरावर तो टॅक्सी थांबवतो. आणि तिला जागे करतो. 

अंजली : अरे... का उठवलं मला, किती मस्त झोप लागली होती. 😔

प्रेम : अंजली मॅडम.... घर आले आपले, जायचा विचार आहे ना घरी...,😊

अंजली : काय.....? एवढ्या लवकर कसे आलो आपण...? 🤔 

प्रेम : कसे म्हणजे.... टॅक्सी मधे झोपून....😴

अंजली : (घड्याळाकडे पहात) खूपच लवकर आलो, अजुन आठ पण नाही वाजले. अजुन थोडा वेळ थांबायला हवं होतं तिकडेच. ,😊

प्रेम : हो... का... उठा आता खुप झालं. चला मॉम घरी वाट बघत असेल.

* दोघे उठून खाली उतरतात, प्रेम टॅक्सीचे पैसे देतो. अंजली प्रेमचा मोबाईल घेऊन घरी मॉम ला कॉल लावते. 

अंजली : हाय... मॉम... आम्ही आलोय एकडे... पण मला एक सांग ना, डॅड किती वाजता येणार आहेत... ?

मॉम : अरे आला आहात तर मग घरी घेऊन ये त्याला डॅड ना अजुन वेळ आहे यायला. 

अंजली : बरं ओके... मी आलेच दहा मिनिटात. 😊

प्रेम : काय झालं काय बोलल्या मॉम....😊

अंजली : काही नाही... चल सांगते.😊

* असं बोलुन तिथूनच ऑटो मधून ते दोघे अंजलीच्या घरी येतात. 

प्रेम : आता घरी कशाला आलोय आपण, डॅड आले तर....🤔

अंजली : त्यांना अजुन वेळ आहे. आणि मासाहेबांचा आदेश आहे, होणाऱ्या जावयांना घरी घेऊन ये म्हणून .....😊

प्रेम : जरा जास्त होतंय ना हे....😊

अंजली : (दारावरची बेल वाजवत) हो...का... बघू ते, आधी आत तर जाऊ, तुमच्या सासूबाईंना पण भेटायचं आहे तुम्हाला. 😊

* तेवढ्यात मॉम दरवाजा उघडतात, दोघेही आत जाऊन कोच वर बसतात. मॉम आतून पाणी घेऊन येतात. दोघांना पाण्याचे ग्लास हातात देत बोलतात.

मॉम : प्रेम... कंटाळला असशील ना हिच्या सोबत दिवसभर राहून....😊

अंजली : मॉम.....🤨 मी एवढी बोअर करते का....😔 मी आजिबात कसलाही त्रास दिलेला नाही त्याला, हवं तर विचार त्याला.... 😔

मॉम : बरं बाई... माझी गुणी बाय ती...,😘 आता फ्रेश होऊन येता दोघेही, दिवसभर बाहेरून फिरून आलात.

* प्रेम बाथरूम मधे फ्रेश व्हायला जातो, अंजली त्याच्या मागुन टॉवेल घेऊन जाते. त्याच झाल्यावर त्याला टॉवेल देत हलकीशी स्माईल 😊 करत स्वतः फ्रेश व्हायला जाते. प्रेम बाहेर येतो तर मॉम नी एक आरतीचे ताट तयार करून टी पॉय वरती ठेवलेले असते.

मॉम : (त्याला हात मिळवत) वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. प्रेम, औक्षवंत हो, खूप मोठा हो.

 ( प्रेम त्यांच्या पाया पडत बोलतो )
प्रेम : थँकयु मॉम..... तुमचा आशीर्वाद राहू दे बस्......😊

मॉम : माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा.....😊 बरं इथे बस आता समोर ओवाळते तुला. 

प्रेम : अहो पण नको... कशाला, ?

मॉम : आरतीच्या ताटाला कधी नाही बोलू नये. गप्प बैस समोर. 

* प्रेम समोरच्या खुर्चीवर बसतो. मॉम आरतीचे ताट घेऊन त्याचे औक्षण करत असतात. तेवढ्यात अंजली तिथे येते. ती सर्व पाहत तिथेच उभी राहते. औक्षण झाल्यावर प्रेम पुन्हा त्यांच्या पाया पडतो. मॉम त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला पेढा भरवतात. हे सर्व पाहून प्रेम आणि अंजली दोघे एकमेकांकडे पाहून भाऊक होतात. मॉम आरतीचे ताट घेऊन आतमधे जातात. तेवढ्यात अंजली प्रेमला बोलते.

अंजली : मजा आहे होणाऱ्या जावईबापुंची लग्नाआधीच एवढा मान सन्मान...😊

प्रेम : गप्प बस आता... घरी आहोत आपण....,,😊

अंजली : मग काय झालं... मी माझ्याच घरी आहे, मी का गप्प बसू....😊

प्रेम : हो...का... मग मॉम समोर बोल बघू....😊

अंजली : बोलेन मी बघ हा....😊

प्रेम : हा चल बोलून दाखव....,😊

अंजली : काय देशील बोलले तर....😊

प्रेम : तुला हवं ते.....😊  

अंजली : बरं ठिक आहे... आता बघच तु....😊

* असं बोलुन ती मॉम ला आवाज देते.

अंजली : मॉम !!!!!!! बाहेर ये जरा. 😊

* तिने मॉम ला आवाज देताच प्रेम तिला बोलतो.

प्रेम : अरे... वेडी आहेस का तु जरा, मी मस्करी करत होतो.

* तेवढ्यात मॉम बाहेर येतात.

अंजली : मी पण मस्करी करत होते.😊

मॉम : काय झालं... कसली मस्करी, दिवसभर त्याला सतावून सोडलं असशील आता तरी शांत हो....😊

अंजली : काही नाही... मी नाही, उलट त्यानेच मला.....😋

मॉम : बरं जाऊ दे, तुमची भांडण संपता संपणार नाहीत. आता त्याला शांतपणे घरी जाऊ दे. 😊

* मॉम प्रेमकडे एक पिशवी देत बोलतात.

प्रेम : मॉम....हे काय आहे...,,,,?

मॉम : अरे काही नाही, स्वीट आहे फक्त. घरी घेऊन जा.... 😊

* तेवढ्यात मधेच अंजली बोलते.

अंजली : मॉम तुझ्याकडून दिलेलं गिफ्ट कसं आहे....?

मॉम : म्हणजे... काय घेतलं तु... दाखव तरी... तर कळेल मला...😊

अंजली : अगं...ते तर तुझ्या समोरच आहे....😊 

मॉम : कुठे आहे.... नीट सांग जरा....😊

अंजली : अरे यार.... मॉम त्याने जो टी शर्ट आणि जिन्स घातली आहे ना तेच गिफ्ट घेतलं आहे. 😊

मॉम : अरे व्वा... छानच आहे. 😊 मला वाटलं त्याचे कपडे आहेत. 😊

प्रेम : माझे या बॅग मधे आहेत, मॅडम नी हेच घालण्याचा आग्रह केला. मग काय करणार....😊

मॉम : बरं झालं... पण छानच आहे, कलर स्काय ब्लू.... तुला आवडला ना...😊

अंजली : म्हणजे काय.... आवडणारच माझी चॉईस आहे. 😊

मॉम : हो... हे मात्र खरं आहे, तेवढ्या बाबतीत हुशार आहेस तू....😊

प्रेम : बरं मी निघू का आता... खुप उशीर होतोय. 😊

मॉम : हो... हो... निघ आता तु...घरीच जा आणि आता....😊

* मॉम चा निरोप घेत प्रेम घरातून निघतो, मॉम नी दिलेली बॅग कपड्यांच्या बॅग मधे टाकत तो बाहेर येऊन शूज घालत असतो.

प्रेम : मॉम... चला बाय... काळजी घ्या. 😊

मॉम : हो... तु पण काळजी घे, आणि येत जा कधीतरी असच...😊

प्रेम : हो.... येईन.... बाय...😊

अंजली : मॉम... मी याला खाली सोडून येते.... 😊

मॉम : हो पण लवकर ये वरती.... डॅड येतील आता....😊

अंजली : हो... हो... आलेच....😊

* असं बोलुन ती प्रेमच्या मागोमाग जिन्यावरून खाली येते. बाहेर येऊन प्रेम एका रिक्षा मधे बसतो. अंजली रिक्षा जवळच उभी असते. तिच्याकडे पाहून प्रेम बोलतो....

प्रेम : अंजु.... थॅन्क्स फॉर एवरीथिंग...😊 चल बाय... मी निघतो. 😊

अंजली : थँक टू... यू.... बिकॉज... यू मेक माय डे टुडे इज मोअर स्पेशल....😊
तुला पुन्हा एकदा... हॅप्पी बर्थडे.😊 नीट जा घरी, जेव आणि आराम कर. ,😊

प्रेम : हो... आता निघु का.....,😊

अंजली : नको....😊

प्रेम : काय..... 😊

अंजली : कधी भेटशील आता....,😊

प्रेम : ते बघू नंतर... आता मी निघतो. ओके....😊

अंजली : बरं ओके... बाय... नीट जा,. बाय... टेक केअर..... डिअर....😊

* तिच्या हातातून हात सोडवत प्रेम रिक्षावाल्याला काकांना चला म्हणून सांगतो. रिक्षा हळू हळू पुढे जात असते. अंजली मात्र ती रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभी राहून त्या दिशेला पहात राहते. नंतर ती घरी येते.
प्रेम पण घरी पोचतो. अंगावरील नवीन कपडे पाहून ताई विचारते, मित्रांनी गिफ्ट दिले असे तिला सांगुन फ्रेश व्हायला जातो.
रात्री ताईने छान श्रीखंड पुरी चा बेत केलेला असतो. तो जेवायला बसणार एवढ्यात त्याची सर्व गँग तिथे केक घेऊन हजर होते. ताईचे घर जरा छोटे असल्यामुळे काहींना बाहेरच उभं रहावं लागतं. त्या सर्वांच्या उपस्थित प्रेम केक कट करतो. आरव सोबत इतर सर्वजण त्याला केक भरवतात. एक छान असं ग्रीटिंग कार्ड त्याला देतात. थोडा वेळ थांबुन सर्व आपल्या घरी निघुन जातात.

 ताईने बनवलेली श्रीखंड पुरी पोटभर खाऊन थोडा वेळ टीव्ही पहात बसतो.
रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले असतात. सर्व झोपलेले असतात मात्र प्रेम ला काही झोप लागत नाही. आज दिवसभरात जे काही घडलं. ते सर्व डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होतं. 
अशीच काही स्थिती इकडे अंजलीची पण होती. दोघांचं काही वेगळं नव्हते. 
आजचा दिवस हा त्या दोघांच्याही आयुष्यातला अविस्मरणीय असा दिवस होता. आणि त्या गोड आणि सुंदर क्षणांना पुन्हा पुन्हा आठवत दोघेही ती रात्र जागत असतात....😊

दोघांचं सर्व काही छान चाललं होतं, अंजलीचे अकरावीचे कॉलेज चालु झाले होते, तीला एका चांगल्या कॉलेज मधे ॲडमिशन मिळाले होते. प्रेम पण थोडे दिवस सुट्टी काढून गावी जाऊन आला होता. 
पावसाळा सुरू झाला होता. दोघे अधुन मधुन भेटत होते. दोन तीन महिने असेच निघुन गेले होते.
अंजलीचा वाढदिवस जवळ आला होता. प्रेमला त्याच्या वाढदिवशी तिने दिलेल्या सरप्राइज गिफ्टचा विचार करता, आता तिला काय गिफ्ट द्यायचे या हा विचार प्रेमच्या मनात सारखा येत होता. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️