एकापेक्षा - 17 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 17

तिकड़े तशीच स्थिती ही त्या दोन पुरुषांची सुद्धा होती. त्यांनी अंगात कमरेचा वर सदरा आणि खाली पैजामा घातलेला होता. त्यांचे ते दोन्हीही वस्त्र हे घामाने चिंब ओले होऊन गेलेले होते. त्यातल्या त्यात एक एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा घाम हा जे संबंधित व्यंजन होते त्यात मिसळू लागले होते, ज्या स्त्रिया कणिक भिजवत होत्या त्यांचा डोक्याचा टप टप टपकणारा घाम हा त्या कणिक मध्ये मिसळून एकमेव होऊन गेलेला होता. त्याचप्रमाणे बूंदी गाळणारे ते दोन पुरुष त्यांचाही घाम हा बूंदी मध्ये मिसळून एकमेव झालेला होता. त्याबाबत मी त्या लोकांना
म्हटले तर त्या स्त्रिया सरळ म्हणाल्या, "आम्ही काय करू तुम्ही व्यवस्था अशा ठिकाणी केली आहे की जेथे हवा सुद्धा येत नाही. वरून ऊनामुळे  एवढे गरम होऊन राहिले का आता एकच पर्याय उरला तो म्हणजे आम्ही आमचे सगळे कपड़े काढून नागडे होतो आणि हे काम करतो.
" त्या स्त्रिया तशा बोलल्या आणि पुरुर्षांनी तशी सुरुवात केली सुद्धा, त्यांनी आधी त्यांचा सदरा काढला नंतर पैजामा काढला आणि चक्क ते त्यांचा अंडर वियर वर आले. ते आचारी भैयाजी होते तर त्यांचा तशा वागण्याचा त्या स्त्रीयांना अनुभव आणि सवय होती. म्हणून ते पुरुष त्याचा समोर फक्त आणि फक्त अंडर वीयरवर काम करत असतांना त्या निर्लज्ज होऊन त्यांचा समक्ष कामे करत होती. असे करता करता साढे चार
वाजले होते आणि मग त्यांचा मुख्य आचारी आणि मालक तेथे आला. त्याने आल्या आल्या त्याचे सगळे वस्त्र स्वतःच काढले आणि तो सुद्धा अंडर  वीयरवर तयार होऊन जीलेबीसाठी मैदा भिजवायला लागला. त्या आचारीची सुद्धा मेहनत म्हणजे त्याचा घाम हा त्या जीलेबीचा मैदयात मिसळून एकमेव होऊन गेलेले होते. ते त्यांचे हेन्दळेपण बघून माझी तर संपूर्ण भूखच मरुन गेलेली होती. माझ्या बरोबर आशीषचे मामा होते त्यांनी सुद्धा ते बघीतले तर ते
सुद्धा म्हणाले की मी जेवणार नाही.
   
    मग संध्याकाळ झाली आणि साडे सहा वाजले होते स्वयंपाक हा बनुन तयार झालेला होता. म्हणून मला तेथून
सुट्टी मिळाली होती. मी मग माझ्या घरी गेलो तयारी करण्यासाठी आणि परत येतांना घरी सांगुन आलो की मी घरी येऊन जेवण करणार. तेव्हा माझी आई बोलली, " अरे तेथे रिसेप्शन मध्ये का बर जेवणार नाही." तेव्हा मी घडलेला सगळा प्रकार घरी सांगीतला आणि घरुन बाहेर पडलो. आता साढ़े सात वाजले होते नवरदेव आणि नवरी हे त्यांचा निश्चित ठिकाणी स्थानापत्न झालेले होते. कार्यक्रम सुरु झाला लोक येऊ लागली आणि नवीन जोडप्पाला भेटून जेवण करायला जाऊ लागली. अशाप्रकारे कार्यक्रम व्यवस्थीत सुरु होता लोक जेवण करून जाता जाता जेवणाची स्तुती म्हणा की तारीफ करून जाऊ लागले. मी तेव्हा तेथेच उभा होतो येणारे जाणारे आशीषचा आई बाबांना भेटायचे आणि म्हणायचे, " बागडे साहेब जेवण फार उत्तम आणि रुचकर झाले आहे." मग ते काका आणि काकू माझ्याकडे बघू लागले. तेव्हा मी म्हणालो, " असणार का नाही कारण की त्यात त्या आचारी आणि त्याचा संपूर्ण टीमची मेहनत मिसळलेली आहे." तर असे करता करता कार्यक्रम त्याचा अंतिम पड़ावावर येऊन पोहोचला आणि मंगेश भाऊ आणि नवीन वहीनी या जेवण करण्यासाठी बसले. त्याच वेळेस मामा आणि मी तेथून सटकुन गेलो. मामा त्यांचा घरी गेले आणि मी सुद्धा माझ्या घरी गेलो. दोघेही आपापल्या घरी जाऊन जेवण करून आलो. आता कार्यक्रम संपला होता आणि आम्ही सगळे आपल्या घरी जाऊन निवांत झोपलो.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मित्र उरलेले कार्य करण्यासाठी म्हणजे बिछायतचे साहित्य जे आणले होते ते परत करण्यासाठी गेलेलो होतो. तेव्हा आमच्यातील एक दोन मुले नवीन वहिनी आणि मंगेश भाऊ याची गंमत करू लागले होते. तेवढ्यात एकाने म्हटले, " तर मग वहिनी कालचे जेवण कसे वाटले." तेव्हा वहिनी म्हणल्या, "जेवण सुपर होते विशेष करुण जीलेबी ती तर मला आधीपासून आवडते परन्तु कालचा जीलेबित काही औरच चव होती. माझ्या मैत्रीणी आलेल्या होत्या त्या सुद्धा जीलेबिची प्रशंसा करुन गेल्या." असे म्हणता म्हणता वहिनी थकल्या नाही. तेथेही माझे तेच उत्तर होते, " असणार का नाही कारण की त्यात त्या आचारी आणि त्याचा संपूर्ण टीमरची मेहनत मिसळलेली होती." परन्तु मामाला रहावल्या नाही गेल आणि त्यांनी त्यांचा तोंडाचे झाकण उघडले. त्यांनी म्हणून दिले की त्या संपूर्ण जेवणात त्या आचारी आणि त्याचा सोबत आलेल्या पाच स्त्रिया आणि दोन पुरुर्षांचा संपूर्ण अंगाचा घाम मिसळलेला होता. मामाचा तोंडून ते शब्द ऐकून वहिनीचा चेहरयावर जो आनंद होता आणि ओठांवर जी प्रशंसा स्तुती होती. ती आता ओकारीत बदलून गेलेली होती. त्यांना राहून राहून उलट्या येऊ लागल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघीतले तर मग मलाही सत्य ते संगावे लागले. त्यांची तशी अवस्था बघून तेथे उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या  लोकांसाठी तो क्षण एका हास्याचा होऊन गेलेला होता, आम्ही सुद्धा फारच मन मोकळेपणाने हसलो,

    तर मित्रांनो, हा प्रसंग तुम्हाला किळसवाना वाटला असेल तरीही काही गोष्ट नाही आहे. त्यावेळेस तो क्षण असा होता की मी सूद्धा काहीच करू शकत नव्हतो. मित्रांनो, आता मी तुमची पुन्हा रजा घेतो पुन्हा काही निवडक क्षण प्रसंग आठवून पुन्हा तुमचा पुढ़े उपस्थित
होण्यासाठी. तेंव्हा पर्यंत आनंदीत रहा आणि माझ्या लेखनाचा आनंद घेत रहा. माझा लीखाणाबद्दल आपले चांगले किवा वाईट विचार नक्कीच
कळवा तुमचा कमेंट्सचा स्वरूपात.

           धन्यवाद

      गजेन्द्र गोविंदराव कुडमाते