अनुबंध बंधनाचे. - भाग 29 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 29

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २९ )

खुप वेळ झाला प्रेम तिथेच त्या गर्दीमधे तिच्या एका नजरेची वाट बघत होता. 
त्यांची प्रेयर झाल्यावर लगेच तिचे लक्ष दरवाज्याकडे गेले,,,,,,,
प्रेमला वाटले आता तरी आपण तिला दिसू, पण त्याच क्षणी कोणीतरी एक मोठा फुलांचा बुके हातात घेऊन पुढे जात होते. त्यामुळे प्रेमचा चेहरा काही तिला नीटसा दिसला नाही.
तो बुके घेऊन जाणारा सुटाबुटातील मुलगा आपल्या फॅमिली सोबत सरळ तिच्यापर्यंत पोचला. अंजलीच्या हातात तो फुलांचा बुके देऊन त्याने तिला हलकीशी मिठी मारत बर्थ डे विश केलं. त्याच्या आईने सोबत आणलेल्या एका छोट्याश्या बॅग मधुन एक गिफ्ट बाहेर काढले आणि तिला दिले. त्या मुलाने तिथेच ते गिफ्ट तिला ओपन करायला लावले. तिने ते ओपन केले, तो बॉक्स खोलून त्याने त्यात असलेले सुंदर असे घड्याळ काढून तिच्या हातात घातले. अंजलीला सुद्धा कदाचित ते गिफ्ट आवडले असावे, म्हणून पुन्हा तिने अलगद त्या मुलाला मिठी मारली. 
ती पुन्हा पुन्हा त्या हातातील घड्याळाकडे पहात. त्या मुलाशी व त्याच्या आई - बाबा सोबत हसुन हसुन बोलत होती. तिचे इकडे तिकडे लक्ष नव्हते. 
प्रेम लांबुनच हे सर्व पहात होता. मधेच त्याचे लक्ष सोबत आणलेल्या त्या गिफ्टच्या पिशवी कडे जाते. पेपरची बॅग असल्यामुळे त्या गर्दीत कोणाच्या तरी हलगर्जीमुळे ती फाटून गेली होती. त्यामधील गिफ्ट चा बॉक्स पण खाली पडला होता. आणि कोणीतरी त्यावर पाय देऊन गेलं होतं. 
ते पाहताच त्याने कसेबसे खाली वाकून ते गिफ्ट उचलले,,,,अशा वेळी त्याला काय करावं ते काहीच सुचत नव्हतं... मान खाली घालुन तो त्या तुटलेल्या बॉक्स कडे खुप वेळ पहात राहिला होता,.....
एवढ्या गर्दीत तो आता एकटा झाला होता, त्याला सर्व काही शांत झाल्यासारखे वाटत होते,
एवढ्यात त्याच्या कानावर मोठ्या आवाजात काही शब्द पडले...
हॅप्पी बर्थ डे.... टु... यु...,
 हॅप्पी बर्थ डे.... टु... यु...,
हॅप्पी बर्थ डे.... टु... डिअर एंजल....,
हॅप्पी बर्थ डे.... टु... यु......👏👏👏👏👏
टाळ्यांच्या आवाजाने प्रेम थोडा भानावर येतो. घाईघाईत तो गिफ्टचा बॉक्स त्या फाटलेल्या पेपरच्या बॅग मधे टाकत ती बॅग फोल्ड करून हातात घेतो. 
एव्हाना सर्व हॉल लोकांनी भरलेला असतो. त्या गर्दीतून तो समोर बघत उभा असतो. 
अंजली तिच्या मॉम डॅड सोबत केक कापून त्यांना भरवत असते. 
तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते, ती सुध्दा काहीतरी मिस् करत होती.
पण ती वेळच अशी होती की, त्या गर्दीत तिला प्रेम कुठेही दिसत नव्हता. आणि त्यामुळे ती अपसेट झाली होती, पण ते चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हती. तरीही पुन्हा पुन्हा तिची नजर त्यालाच शोधत होती. 
तिच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक, तिला भेटून बर्थ डे विश करत होते. गिफ्ट देत होते. ती हसून त्यांच्याशी बोलत होती. पण मनात मात्र एकच गोष्ट होती,,,, "प्रेम अजुन कसा आला नाही...?

इकडे प्रेम मात्र झालेल्या प्रकारामुळे खुप दुःखी झाला होता. आता तिला भेटायला तरी पुढे कसं जायचं....? आणि तिला गिफ्ट काय द्यायचं...? हे फुटलेले घड्याळ......
तो अशा विचारांनी गोंधळून गेला होता, तेवढ्यात कोणीतरी त्याच्यासमोर ड्रिंक चा ग्लास पुढे केला. त्याने पटकन तो उचलला आणि तोंडाला लावला. एक घोट पिल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्या ग्लास मधे वेगळीच ड्रिंक होती. 
परत ठेवावा म्हटलं तरी तो ठेऊ शकत नव्हता. आधीच टेन्शन मधे असल्यामुळे त्याने कसाबसा तो ग्लास पूर्ण रिकामा केला. 
त्या गर्दीतून पुन्हा एकदा त्याने अंजलिकडे पाहिले. ती तिच्या मैत्रिणीसोबत फोटो काढण्यात मग्न होती. 
तिचा मुड पाहून प्रेम थोडा वेळ तिच्याकडे पहात असतो. पण तिची नजर आपल्यावर पडते असे वाटताच तो पाठमोरा होऊन उभा राहतो.
आता काय करावं या विचाराने तो तसाच घरातुन बाहेर पडतो. पायऱ्या उतरून खाली येतो. सोसायटीच्या गेट कडे जातानाच त्याला मनात असं वाटू लागतं.....
अंजलीला न भेटताच कसं जायचं.....!
पण आता नको.... आज तिचा दिवस आहे, ती खुप खुश आहे. आणि तसंही सकाळी ती मला भेटली पण आहे. मग जाऊ दे.... आता घरीच जाऊ.... असं मनाला समजावत तो गेटकडे जायला निघतो. 
योगायोगाने अंजली आणि तिच्या मैत्रिणी त्यांच्या गॅलरी मधे आलेल्या असतात. 
प्रेम गेट मधुन बाहेर पडतच होता तेवढ्यात अंजलीची नजर त्याच्यावरच पडली. प्रेम ने पण तिला गॅलरी मधे पाहिले.... अंतर तसे दूर होते, त्यामुळे प्रेमला वाटले तिने त्याला पाहिलं नसेल.
थोड्या वेळात प्रेम तिच्यावरून नजर हटवतो, आणि पुढे चालु लागतो. 
थोड्याच अंतरावर असलेल्या बसस्टॉप वर येऊन तो थांबतो. मनात येतं सरळ रिक्षा करून आता घरी निघुन जावं.... पण आता रिक्षापुरते पैसेही खिशात नव्हते, हे त्याला माहीत होतं.
आता बस शिवाय पर्याय नाही म्हणून, बसस्टॉप वरील बाकावर बसुन तो बसची वाट बघत होता.
घडलेल्या गोष्टीचे दुःख तर होतेच, पण ती खुश होती, आणि तिला एवढं आनंदी पाहता आलं... यातच समाधान मानुन तो त्या गिफ्ट च्या बॅग कडे पहात होता. 
बस काही अजुन आली नव्हती. म्हणुन त्याने ती बॅग ओपन केली, आतुन ते गिफ्ट बाहेर काढले. आणि त्यावरील पॅकिंग चा पेपर काढून त्याने पाहिले, त्या घड्याळाला जे प्लास्टिक बॉक्स होते ते फुटलेले होते. पण घड्याळाला मात्र काहीच झाले नव्हते. 
त्याने फुटलेल्या त्या बॉक्स मधुन ते बाहेर काढत दोन्ही हातात घेतले आणि खुप वेळ त्याच्याकडेच पहात बसला....
थोडा वेळ तो तिथेच विचार करत बसला असता,
इतक्यात एका गोरासा हात त्याच्या समोर आला, आणि त्याच्या कानावर एक गोड आवाज पडला...." आता ते पाहतच राहणार आहेस की, जिच्यासाठी हे आणलं आहेस तिला देणार आहेस....?"
तो एकदम दचकला, त्याने समोर पाहिलं तर चक्क अंजली त्याच्यासमोर हात धरून त्याच्याकडे पहात उभी होती. तिला असं अचानक समोर पाहून प्रेम बोलतो....

प्रेम : तु....! तु इथे काय करतेय....?

अंजली : खरं तर हा प्रश्न, मी तुला विचारायला हवा... असं नाही का वाटत तुला. 😊

प्रेम : ते... मी.... तुझ्याकडेच येत होतो. 😊

अंजली : अच्छा.... खरच का....?

प्रेम : हो.... हे काय आत्ताच आलो. आणि येतच होतो घरी, तेवढ्यात तूच इथे....

अंजली : अच्छा.... खरं बोलतोय का तु...?

प्रेम : हो... अगं... खरच....😊

अंजली : मला तर असं वाटलं की, तु घरी येत नव्हता,,,, तर तु तुझ्या घरी परत जात होता.... बरोबर ना....? हेच खरं आहे ना....?

प्रेम : अगं....असं काही नाही...😊

अंजली : (थोडी रागातच) मग कसं आहे तर... ? तुला मी गेट मधुन बाहेर पडताना पाहिलं होतं. म्हणूनच इथे आले ना...? काय झालं प्रेम... तु घरी येऊन मला न भेटता असं परत जायला निघाला आहेस.... काय समजू मी.... माझं काही चुकलं आहे का....? 😢

प्रेम : अरे... तु का असा विचार करतेय, असं काहीच नाही....😊

अंजली : म्हणजे मी खोटं बोलतेय का ?

प्रेम : मी तसं नाही बोलत....!

अंजली : मग काय झालं आहे ते सांगशील का प्लिज....का असा वागतोय तु....?😢

*प्रेम हातातील ते घड्याळ तिच्या नकळत खिशात ठेवत बोलतो.

प्रेम : अरे...हो....! घरी आलो होतो मी...! पण खुप गर्दी होती ना, म्हणुन विचार केला की, थोड्या वेळाने जाऊ गर्दी कमी झाल्यावर.....!

अंजली : प्रेम...! खरं सांग मला... नक्की, हेच कारण होतं, की तु घरी येऊन, परत इथे येऊन बसला आहेस...! की अजुन काही.....🤔 तु खोटं बोलतोय ना माझ्याशी....?😢

प्रेम : अगं...! खरच बोलतोय... 😊

अंजली : अच्छा....! मग घे माझी शपथ आणि बोल... की आत्ता तु जे बोलतोय ते खरं आहे म्हणुन.....😢

प्रेम : अरे...! असं काय करतेय...! मी खरच बोलतोय ना....! शपथ वगैरे काय....?

अंजली : म्हणजे तु नक्की खोटं बोलत आहेस...!😢

* असं बोलुन ती तिथेच रडायला लागली. तिचा हात पकडुन, तिच्या डोळ्यातील पाणी पुसत तो बोलतो....

प्रेम : अंजु....! सॉरी...! 😞 मी खोटं बोललो तुझ्याशी....! पण माहित नाही असं का वाटलं....! पण नाही थांबावंस वाटलं....! थोड्या वेळासाठी असं वाटलं की, मी आलोच नसतो तर बरं झालं असतं....!😞

अंजली : प्रेम...! पण का...? का असा विचार करतोय तु....?🤔

प्रेम : माहित नाही का...! पण मला तसं फील झालं....!😞

अंजली : तु... ना...! खरच वेडा आहेस...! मी तिथे वेड्यासारखी फक्त तुझी वाट बघत होते. तु येणार हे मला माहीत पण होतं....! त्या विचारानेच मी खुश होते. आणि तु इथे असा विचार करत बसला आहेस. असा कसा आहेस तू.....? असं कोण करतं....?

प्रेम : मी............! सॉरी...आजच्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी आलं....! ते ही माझ्यामुळे....! रियली सॉरी....!😞

अंजली : असं बोलुन अजुन रडवणार आहेस का तु मला....! सगळा मेक अप निघुन गेला, तुझ्यामुळे....! बघ जरा इकडे....😊

* असं बोलुन ती त्याला तिथेच मिठी मारते. प्रेम लगेच तिला बाजुला करत तिला बोलतो. 

प्रेम : अंजु....! काय करतेय...तु...? कुठे आहोत आपण...? आणि तु आत्ता घरी हवी होतीस. सगळे तिथे तुझ्यासाठी जमा झालेत. तु आता पटकन घरी जा...! आपण नंतर बोलू हे सर्व...! ओके....!😊

अंजली : तु पण माझ्यासाठीच आला आहेस ना...! मग....?

प्रेम : मग काय....?

अंजली : मग चल घरी मला घेऊन....!😊

प्रेम : वेडी आहेस का....?🤔

अंजली : हो....!. वेडी तर आहेच मी....! आणि ते तुलाही चांगलच माहीत आहे...! हो की नाही....! मग आता चल घरी लवकर, नाहीतर सर्व जण मला शोधत इथे येतील.....!
चालेल तुला....! मग थांबते इथेच....!😊

प्रेम : तु ना खरच....! वेडी आहेस...! चल जाऊ.😊

* असं बोलुन तो तिथून जायला निघतो. तेवढ्यात अंजली त्याला थांबवत त्याच्या समोर हात करत बोलते.

अंजली : खरच जाऊया...! पण आधी माझं गिफ्ट दे...! 😊 एवढा वेळ त्या गिफ्ट कडे पहात बसला होतास. नजर बिजर लागली असेल त्याला....! दे पटकन....!😊

* प्रेम बाजूच्या बाकावर ठेवलेली ती पेपर बॅग आणि तो बॉक्स उचलतो आणि तिच्या हातात देत बोलतो....

प्रेम : हे बघ काय झालं....! 😞

अंजली : इट्स ओके....! हा बॉक्स आहे ना...! मग ते मघाशी हळुच पॉकेट मधे जे ठेवलं आहेस ते गिफ्ट मला हवं आहे. माझ्यासाठीच आणलं आहेस ना...? मग दे...!😊

* प्रेम खिशातील ते घड्याळ बाहेर काढून तिला बोलतो....

प्रेम : पण तुझ्या हातात आधीच एक वॉच आहे...! आणि तेही खुप छान आहे. 😊

*अंजली आपल्या हातातील वॉच काढत बोलते...

अंजली : इथे फक्त आणि फक्त तु आणलेले वॉच असेल...! कळलं. बाकी काही नाही...!😊 आता घालशील ते माझ्या हातात....! का मुहूर्त बघुन मग घालणार आहेस....?

प्रेम : अंजु...! हे माझ्याकडून तुला छोटंसं गिफ्ट...! माहित नाही पण त्या गर्दीत कोणाचा तरी धक्का लागुन ते खाली पडले, आणि तेवढ्यात कोणीतरी त्यावर पाय देऊन गेलं, त्यामुळे त्याची हि अवस्था झाली....!😊

अंजली : अरे ठिक आहे ना...! पण बघ तु एवढ्या प्रेमाने आणलं आहेस म्हणुनच ते अजुनही सेफ राहिलं आहे...! आणि किती छान चॉईस आहे तुझी...! खुपच सुंदर वॉच आहे. अगदी मनापासून आवडलं मला...! 😊 आता हे पटकन घाल माझ्या हातात....😊

* प्रेम ते घड्याळ तिच्या हातात घालतो आणि बेल्ट लॉक करतो. अंजली त्या घड्याळाकडे पाहून बोलते....

अंजली : प्रेम....! थॅन्क्स फॉर धिस ब्युटीफूल गिफ्ट...!😘

प्रेम : खरच आवडलं ना...! का मला बरं वाटावं म्हणून बोलतेय...?

अंजली : अरे...! खरच बोलतेय...! तुझी शपथ. बस्..!

प्रेम : आणि तुझ्या हातात तर दुसरे वॉच होते ना, ते....?

अंजली : ते जाऊदे...! या हातात फक्त तुझेच वॉच असेल नेहमी, आणि त्यामध्ये दाखवणारा वेळही तुझाच असेल...! 😊 आता जाऊया का घरी...? नाहीतर खरच कोणीतरी नक्की येतील आता मला शोधत....!😊

*ते दोघे तिथून घरी जायला निघत होते तेवढ्यात समोरून सॅड्रिक तिथे येऊन पोचतो.

सॅड्रिक : अगं...! तु जरा डोक्यावर पडलीय का ? आणि इथे काय करताय तुम्ही, घरी सगळे तुला शोधत आहेत. (प्रेम कडे पहात) आणि तु इथे....🤔 काही झालंय का...?

अंजली : अरे हो....! जरा हळू...! किती बोलशील...! 😊

सॅड्रिक : मग काय करणार...! चला लवकर घरी. सगळे मलाच विचारत होते, कुठे गेली अंजु म्हणुन...! निदान सांगून तरी यायचं ना...? पण तु इकडे कधी आली तेच कळलं नाही...🤔

अंजली : हो...! सांगते...! (प्रेम कडे पहात) याच्यासाठी आले...!😊

सॅड्रिक : म्हणजे... ? 

अंजली : अरे बघ ना...! कसा वागतो हा...? घरी येऊन मला न भेटता परत चालला होता, नशीब मी पाहिले म्हणुन कळलं तरी...! नाहीतर आत्तापर्यंत साहेब पोचले असते त्यांच्या घरी असेच....!😔

सॅड्रिक : प्रेम....! काय रे...! काय बोलतेय हि...?

प्रेम : अरे तसं काही नाही...!😊

अंजली : अच्छा...! म्हणजे मी पुन्हा खोटं बोलतेय. हो ना....! 🤨

प्रेम : अरे...! मला तसं बोलायचं नव्हतं....!😊

अंजली : मग सांग ना खरं खरं....!😔

सॅड्रिक : अरे....! बाबांनो प्लिज आता भांडू नका....! आधी घरी जाऊ, मग नंतर बघू काय ते ओके.....!😊

अंजली : हो...! निघुया चल....! साहेबांना घे सोबत. नाहीतर इथुनच जातील परत घरी. 😔

प्रेम : बघ ना यार....! कशी बोलतेय ती, चाललोय ना आता घरी. 😊

अंजली : मी इथे आले म्हणून....!🤨

सॅड्रिक : अंजु प्लिज...! आता सोड ना ते...! येतोय ना तो घरी...! शांत हो आता आणि चल लवकर...!😊

अंजली : हो...! मी शांतच आहे...! मला काय झालंय....!😑

* तिघेही घरी पोचतात... घरी सर्व तिची वाट पहात असतात. त्या तिघांना घरात येताना डॅड त्यांच्याकडेच पहात असतात. अंजली तिच्या मित्रांची आणि प्रेम ची ओळख करून देत असते. 
प्रेमला पाहून मॉम पण खुश होतात. तो ही आता सॅड्रिक सोबत पार्टी एन्जॉय करत असतो. 
केक, 🍰 वेफर्स, स्नॅक्स, 🍟 कोल्ड्रिंक्स🍹 ड्रिंक्स 🍺🍷आणि त्यानंतर डिनर....🍲🍛
खुप काही खायला प्यायला होते, प्रेम कोल्ड्रिंक समजुन एक वाईन चा ग्लास हातात घेऊन सॅड्रिक सोबत बोलत असतो.

सॅड्रिक : प्रेम काय झालेलं...? तु निघुन का गेला होता ? अंजु खुप अपसेट झालीय. 

प्रेम : अरे...! असं काही नाही. घरी खुप लोक होते, आणि तसंही आम्ही सकाळी बाहेर भेटलो होतो. म्हणुन...!

सॅड्रिक : नक्की एवढच कारण आहे की, अजुन काही...?

प्रेम : अरे बोललो ना...! काही नाही अजुन....!😊
सॅड्रिक : बरं...! तसं असेल तर ठिक आहे. तिला थोडा राग आलाय, पण इट्स ओके. होईल ती नॉर्मल. डोन्ट वरी....!😊

प्रेम : हा...! ते तर आहेच....!😊
प्रेम त्याच्या हातातील वाईन चा ग्लास पटकन पिऊन टाकतो. ते दोघे तिथे बोलत असतात तेवढ्यात अंजली तिथे येते.

अंजली : तुमचं झालं असेल तर काहीतरी खाऊन घ्याल का ? नाहीतर साहेब असेच निघुन जातील. 

प्रेम तिच्याकडे पाहत काही न बोलता तिच्यासोबत डिनर साठी निघुन जातो.

हे सर्व चालु असताना अंजलीच्या डॅडची नजर या सर्व गोष्टींकडे होती. ते दोघे निघुन गेल्यावर तिचे डॅड सॅड्रिक जवळ येऊन त्याला विचारतात.

डॅड : कोण आहे रे हा मुलगा...? तु ओळखतोस का याला ? 

सॅड्रिक : ( थोडा दचकून ) तो....! तो आमचा मित्र आहे. 

डॅड : अच्छा...! पण या आधी कधी पाहिलं नाही त्याला कधी...?

सॅड्रिक : ते...! आताच ओळख झाली ना, काही दिवसांपूर्वी. 

डॅड : बरं ठिक आहे...!

* ते अजुन काही विचारण्यापूर्वी सॅड्रिक डिनर चे निमित्त काढून तिथून निघुन प्रेम आणि अंजली जिथे असतात तिथे जातो. आणि त्यांना हे सर्व काही सांगतो.
ते सर्व ऐकुन प्रेम आणि अंजली ला अजुन टेन्शन येतं. प्रेम हातातील जेवणाची डिश सॅड्रिक जवळ देत बोलतो.

प्रेम : मला आता निघायला हवं....!

अंजली : हे काय चाललंय तुझं...? असं ताटात अन्न टाकून कोण निघुन जातं का...? 

प्रेम : नको आता...! बस् झालं. मी निघतो.

अंजली : अरे...! असं काय करतोय, डॅड चे बोलणे एवढे मनावर लाऊन घेऊ नको, त्यांनी असच सहज विचारपूस केली असेल. नॉर्मल आहे ते....! तु नको ना टेन्शन घेऊ. 

प्रेम : तसं काही नाही पण तरीही निघतो मी आता, उशीर होतोय आपण नंतर भेटू. चला बाय...!

अंजली : अरे...! ऐक ना...! सॅड्रिक तु तरी समजाव ना याला, काय वेडेपणा आहे हा...?

प्रेम : अंजली...! प्लिज...! आता मी निघतो, तुम्ही पार्टी एन्जॉय करा, आणि मी ओके आहे. मी खरच आत्ता निघतो.

* असं बोलुन तो तिथून निघुन जातो.....

प्रेम तिथून निघुन गेल्यावर अंजली सुध्दा बेचैन होते. तिच्याच वाढदिवसाची पार्टी असल्यामुळे मनात खुप वेगळे विचार असुन सुद्धा चेहऱ्यावर खोटं हसू ठेऊन ती तिथे वावरत होती.

रात्री खुप उशिरापर्यंत पार्टी चालू होती, रात्री उशिरा सर्व आवरून ती आपल्या रूम मधे जाऊन झालेल्या गोष्टीबद्दल विचार करत होती.
प्रेम ने का एवढं टेन्शन घेतलं आहे तेच तिला कळत नव्हतं. त्यात तो आज असा का वागला हेही तिला कळत नव्हते. 
त्याला भेटुन त्याच्याशी हे सर्व नीट बोलू, असा विचार करून ती झोपी जाते. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️