अनुबंध बंधनाचे. - भाग 31 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 31

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३१ )

शिल्पाच्या घरी सर्वांची तयारी चालु असते. मेघा सॅड्रिक चा मेकअप करत असते. शिल्पा तिच्या भावाचा मेकअप करत असते. 
हे दोघे आल्यावर त्यांच्याकडे पाहून मेघा बोलते.

मेघा : प्रभू राम आणि माता सीतेचे आगमन झाले आहे. सर्वांनी त्यांना नमस्कार करावा. 🙏🏻

*तिचे बोलणे ऐकून सर्वजण त्या दोघांकडे पाहून हात जोडतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

अंजली : झालं चालु तुझं....? तुला तर आता बघतेच मी....!

*असं बोलुन ती मेघाच्या अंगावर धाऊन जाते, तोवर प्रेम तिचा हात पकडुन तिला थांबवतो.

प्रेम : काय चाललंय तुझं...? नुसती भांडत असते. 

मेघा : बघा ना प्रभू...? वाचवा आम्हाला...!🙏🏻 😊

सॅड्रिक : ओय...! बस् झाले तुमचे...!. चला आवरा आता, अजुन या दोघांची तयारी पण करायची आहे. 

अंजली : हो...ना...! मग हिला सांग ना...! सारखी मला चिडवत असते. 😔

मेघा : बरं बाई सॉरी....!🙏🏻 करायची का आता तयारी. 😊

अंजली : हो...! पण माझी साडी इस्त्री करायची होती ना. 🤔

मेघा : माते...! त्या काळात इस्त्री हा प्रकार अस्तित्वात नव्हता. 😀

अंजली : हो... ग... माझे आई....!🙏🏻 मग मी आत्ता तशीच साडी नेसू का....? चुरगळलेली. 

प्रेम : ठिक आहे...! भांडू नका, मी इस्त्री करून देतो... ओ्के.....!😊

मेघा : ओ.. हो...! चक्क प्रभु श्रीराम सिता मातेच्या साडीला इस्त्री करून देणार आहेत. क्या बात है....!😋

सॅड्रिक : अरे आता पुरे यार....! पट पट आवराल का आता...! 🤨

*सॅड्रिकच्या बोलण्याने सर्व शांत बसले....

प्रेम आतमध्ये जाऊन अंजलीच्या साडीला इस्त्री करू लागला होता. तेवढ्यात अंजली तिथे येते...

अंजली : अरे व्वा...! छान इस्त्री जमतेय तुला, बरं झालं, मला नंतर टेन्शन नाही. 😊

प्रेम : अच्छा...!. तु जर रोज साडी नेसनार असशील तर मी रोज साडी इस्त्री करून द्यायला तयार आहे.😊

अंजली : हो...का...! तुला आवडणार असेल तर मी रोजच काय, दिवसा आणि रात्री पण साडी नेसायला तयार आहे. 😊

प्रेम : हा...! मला तर आवडतं....! स्त्रीचे खरे सौंदर्य हे साडी मधेच खुलून दिसते. असं मला तरी वाटतं. 😊

अंजली : अच्छा....! मग तर बघच आता यापुढे,😊

प्रेम : म्हणजे काय....?

अंजली : काही नाही....! तु लवकर साडीला इस्त्री करून दे. मी घेऊन जाते..... 😊

प्रेम : हो...! थांब होईलच ५ मिनिटात .😊

* दोघे बोलत असतात तेवढ्यात बाहेरून मेघाचा आवाज येतो....

मेघा : आज होईल ना....? अजुन खुप तयारी बाकी आहे. आवरा लवकर....!😊

अंजली : हो...हो....! झालंय आमचं. एवढं बोलायची गरज नाही कळलं...!😏

* अंजली साडी घेऊन बाहेर येते. आणि शिल्पाच्या रूम मधे जाऊन तिची तयारी करू लागते.
बाकी सर्वजण आपापल्या पद्धतीने आवरत असतात. 
एकमेकांना हवी तशी मदत करून फायानली सर्व आपापल्या वेशात तयार झालेले असतात.
थोडंसं अवघड होते सर्वांसाठीच, पण उत्सुकता होती काहीतरी वेगळं करण्याची, म्हणुन सर्वजण मन लाऊन ते करत होते.
प्रेम आणि सॅड्रिक पण त्यांचा वेश परिधान करून बाहेर आले होते. प्रेमला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. कारण वेशभुषा अशी होती की, वरती फक्त ओढणी सारखे एक भगवे वस्त्र होते. बाकी शरीर उघडे दिसत होते. अगदी तसाच वेश सॅड्रिकचा पण होता. 
सर्वजण एकमेकांकडे पाहून हसत होते. पण आनंदाने एकमेकांचे कौतुक पण करत होते. 
अंजली अजुन आतच होती, तिची साडी नेसुन झाली होती. मेकअप चालु होता. तेवढ्यात मेघा तिला बोलते.

मेघा : बस झाला मेक अप आता मॅडम....! सिता वनवासातून परत येतेय असं दाखवायचं आहे आपल्याला. 😋

अंजली : हो... हो...! महितिय मला....! फक्त थोडं मॅच करत होते. 😊

मेघा : अच्छा...! मग थोडासा मेक अप श्री. प्रभु रामचंद्र यांना पण करायला हवा ना, तुम्हाला मॅच करण्यासाठी. 😊 

अंजली : अच्छा...! झाली का त्याची तयारी. ?

मेघा : कधीच....! बाहेर येऊन बसलेत दोघेही, 

अंजली : हो...का...! चल बघु.....!😊

मेघा : ओय...! कुठे चाललीय...? आधी नीट आवर तुझं, मग या बाहेर....!😊

* मेघा तिथून मेक अप किट घेऊन बाहेर येते, आणि प्रेम आणि सॅड्रिक दोघांचाही हलकासा मेकअप करते. सोबत शिल्पाचा भाऊ हनुमान ही असतो. त्याच्या पण चेहऱ्यावर मेक् अप करते.
सर्वांची तयारी झालेली असते, अंजली अजुन शिल्पाच्या रूम मधेच असते. ती बाहेर यायला थोडी लाजत असते. तेवढ्यात मेघा आत येते. ती अंजली कडे पाहून,... आपल्या डोळ्यातील काजळ एका बोटाने काढून तिच्या कानामागे एक टिका लावत तिला हलकेच मिठी मारून बोलते....

मेघा : नजर नको लागायला माझ्या लाडक्या परीला, तु खुप छान दिसतेय अंजु....!😊👌🏻

अंजली : अच्छा...! तु असताना मला कोणाची नजर लागणार आहे सांग बरं....?😊

* दोघी बोलत असतात तेवढ्यात बाहेरून सॅड्रिक चा आवाज येतो. 

सॅड्रिक : आवरलं का तुमचं....? वाजले किती बघा..? 🤔

मेघा : हो... हो...! आवरले आहे कधीच....! पण मॅडम बाहेर यायला लाजतायत...!😊

अंजली : मी नाही लाजत, आलेच थांब...!

* असं बोलुन ती शिल्पाच्या बेडरूम मधुन बाहेर येते. सर्वजण तिच्याकडे पाहून हसत असतात, प्रेम पण तिच्याकडे एकटक पहात राहिलेला असतो. अंजली पण त्याच्याकडे पाहून थोडी लाजून हसू लागते. त्याला प्रभू श्री. रामाच्या अवतरामध्ये बघून ती पण त्याच्याकडे पाहतच राहिली होती. सर्वजण आता तयार झाले होते. तेवढ्यात मेघा बोलली.

मेघा : चला फायनली आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. आता तुम्ही सर्वजण असे एकत्र या म्हणजे कळेल तरी आपल्याला कसे दिसतायत सर्वजण.

*असे बोलून ती सर्वांना एका ठिकाणी उभे राहायला सांगते. सगळे एका ठिकाणी उभे राहतात. प्रभू श्री. राम, सिता, लक्ष्मण आणि श्री. हनुमान. सर्वजण एकत्र खुप छान दिसत होते. अंजली प्रेमच्या बाजुला त्याला बिलगुन उभी होती. हा तिच्यासाठी काय तर सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव होता. 
थोड्या वेळात ते सर्वजण तिथून निघतात आणि खाली येऊन त्या ठिकाणी जातात जिथुन त्यांची एन्ट्री एका रथामधून होणार होती. हा प्लॅन फक्त सॅड्रिक ला माहीत होता. त्याने सर्वांसाठी सरप्राइज ठेवले होते.
सर्वजण एक एक करून रथामध्ये चढतात. रथ खुप छान फुलांनी आणि रंगबिरंगी लायटिंग ने सजवलेला असतो. त्यांना पाहून लोकांची आता हळू हळू तिथे गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. 
जिथे गरबा चालु होता तिथून काही अंतरावरच त्यांचा रथ उभा होता. 
 गरबा पहायला आलेली पब्लिक आता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा आनंद घेत होती. खुप मुला मुलींनी अगदी उत्साहाने या स्पर्धेत भाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभुषा करून आले होते.
आता ती वेळ आली होती. रथासमोर फटाके वाजवले जात होते. आणि हळू हळू रथ पुढे चालला होता. थोड्याच वेळात रथ जिथे गरबा चालू होता तिथे पोचल्यावर सर्व पब्लिक ओरडत होती.
प्रभू श्री. रामचंद्र की जय....!
सियावर रामचंद्र की जय....!
जय हनुमान....!
सर्वांसाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रत्येकाच्या मेहनतीचे हे फळ होते. सर्वजण त्यांचे कौतुक करत होते. बाजूच्या बिल्डिंग मधुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. सगळं वातावरण राममय झाले होते. 
अंजलीची नजर त्या गर्दिमधून तिच्या मॉम कडे जाते. ती खुप भाऊक झालेली असते. त्यांच्याकडे पाहून ती हळूच प्रेमचा हात दाबुन त्याला मॉम कडे पाहण्यासाठी इशारा करते. प्रेम पण त्यांच्याकडे पाहून हसत त्यांना प्रतिसाद देतो. 
रथ गरब्याजवळ पोचताच सर्वजण एक एक करून खाली उतरतात. आणि देवीच्या मंडपात जाऊन देवीच्या पाया पडुन बाहेर येतात. गरब्याच्या मध्यभागी त्यांच्यासाठी एक स्टेज उभे केलेले होते. तिथे जाऊन सर्वजण उभे राहतात. 
तिथे उपस्थित असलेल्या जवळ जवळ सर्वांच्या नजरा त्यांच्यावर भिडल्या होत्या. त्या सर्वांना ते हसतमुख चेहऱ्याने आनंद देत होते. मधेच हनुमानजी गरब्यामध्ये सामील होऊन आपली गदा गोल गोल फिरवत नाचत होते. 
खुप वेळ होऊन गेला होता. आता रात्रीचे बारा वाजत आले होते. देवीच्या आरतीची तयारी चालु झाली. आणि आजची आरती प्रभू श्री. रामचंद्र, माता सिता, लक्ष्मण आणि श्री. हनुमान यांच्या हस्ते झाली.
आरतीनंतर प्रसाद वाटप झाले आणि माईक वर घोषणा झाली. ' फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर करण्यात येत आहे. ' 
सर्वांची उत्सुकता वाढली होती. खुप मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांच्या मेहनतीचे फळ आता त्यांना बक्षिसाच्या स्वरूपात मिळणार होते.
सर्वात आधी ज्या ज्या मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्या सर्वांना एक आकर्षक ट्रॉफी देऊन एक एक करून त्यांचा सत्कार केला जात होता.
शेवटी तो क्षण जवळ आला ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते. स्पर्धेतील मुख्य पारितोषिक क्रमानुसार देण्यात येणार होते. सर्वप्रथम तीन नंबरचे नाव घेण्यात आले. ते एका मुलाला देण्यात आले होते जो आज जोकर बनला होता. पण चार्ली चॅप्लिन च्या रुपात. त्याने खुप सुंदर अभिनय करून सर्वांना खुप हसवलं होत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पण जाहीर झाले. एका मुलीने रुद्रावतार अशा कालीमातेचा अवतार धारण केला होता. पारितोषिक स्विकारल्यानंतर तिलाही सर्व लोकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिवादन केले.
शेवटी तो क्षण आला जेव्हा प्रथम पारितोषिक विजेत्याचे नाव घेण्यात येत होते. प्रेम आणि बाकी सर्वांनाच आता ही खात्री पटली होती की, आपलच नाव घेण्यात येईल. 
आणि तेच झालं...
माईक वर घोषणा झाली...
आणि आता ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पहात आहोत तो क्षण जवळ आला आहे. आणि या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येत आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे. ते म्हणजे प्रभू श्री. राम, लक्ष्मण, माता सिता आणि महाबली हनुमान.....
हे ऐकुन प्रेम आणि बाकी सर्व आनंदीत होऊन एकमेकाचे अभिनंदन करत होते. शिल्पा आणि मेघा पण खुप खुश झाल्या होत्या. सर्वांच्या मेहनतीचे फळ मिळाले होते. 
त्यांना स्टेज वर बोलावण्यात आले होते. सर्वजण पुढे स्टेज कडे जात होते. तसे सर्व लोक खुप जोरजोरात टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक करत होते. 
एक एक करून सर्वजण स्टेज वर चढतात. 
त्या मंडळातील सभासद तिथे उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांकडून एक एकाचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी खास अतिथी म्हणुन त्या प्रभागाचे मुख्य पोलीस अधिकारी म्हणजेच मेघाचे वडील उपस्थित होते. त्यांच्यासोबत अंजलीचे डॅड पण स्टेज वर होते. प्रेम त्यांना पाहून थोडासा टेन्शन मधे आला होता. पण तिचे डॅड आणि मेघाच्या वडिलांनी त्या दोघांनीही सर्वांचे कौतुक करत त्यांना सन्मान चिन्ह व बक्षिसाची रक्कम दिली. प्रेम आणि त्याच्या सर्व टीम ने त्याचा स्वीकार केला. 
उपस्थित सर्व लोक अजुनही टाळ्या वाजवत ' जय श्री राम, तसेच बजरंग बली की जय... असे बोलत त्यांचे कौतुक करत होते. 
थोड्या वेळाने ते सर्वजण स्टेज वरून उतरून शिल्पाच्या घरी जाऊन आपापला मेकअप उतरवून ड्रेस चेंज करून बसलेले असतात. तिथेच ते एकमेकांचे अभिनंदन करतात. 
रात्रीचे जवळजवळ दिड वाजलेले असतात. खाली गरबा अजुन चालुच होता. तिथे आता कोणाला राहवत नव्हते. एक एक करून सर्वजण खाली येऊन बेधुंद होऊन नाचत होते. आज त्या सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 
अजुन एक गाणं, अजुन एक गाणं, असं करत करत रात्री अडीच वाजता बँजो बंद झाला तसे सर्व रिलॅक्स होऊन तिथेच गप्पा मारत बसले होते.
बँजोचे सामान आवरून प्रेमचे मित्र निघायच्या तयारीत होते. त्यांच्यासोबत प्रेमही निघत होता.
सर्वांनी त्याला बाय केला... अंजलीला मात्र राहवत नव्हते, त्या गर्दीतच तिने प्रेमचा हात पकडुन त्याला जवळ ओढले आणि हलकीशी मिठी मारली. आणि त्याच्या कानात बोलली, "आज मी खुप खुश आहे, आय लव यू डियर... आणि गुड नाईट. नीट जा. भेटू उद्या विसर्जन ला."
प्रेम तिला बाजूला करत समोर बघतो तर काय....
तिचे डॅड तिथेच थोड्या अंतरावर उभे राहुन थोडे रागातच त्यांच्याकडे पहात होते. 
आता त्याची धडधड वाढली होती. तो पटकन तिला बाजूला करत त्याच्या मित्रांसोबत रिक्षामध्ये जाऊन बसतो. तो खुप घाबरलेला होता. त्या क्षणी त्याला काहीच सुचत नव्हते. अचानक वेगवेगळ्या वाईट विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी करायला सुरूवात केली होती. 
हे सर्व होत असताना अंजलीला पण काही कळले नाही की, प्रेम असा अचानक का निघुन गेला. ती थोडी मागे वळून पाहते तर तिला समोरच उभे असलेले तिचे डॅड दिसतात. ते तिच्याकडेच येत असतात. अंजली थोडीशी आतुन घाबरलेली होती. त्या अवस्थेतही ती डॅड कडे हसत पाहू लागते.
डॅड जवळ येऊन तिला बोलतात....

डॅड : झालं ना सर्व आता... जायचं का घरी...? 

* आज त्यांचा बोलण्याचा टोन जरा वेगळा वाटत होता. ती काहीच न बोलता त्यांचा हात पकडुन घरी जायला निघते. आता खरं तर तिच्या लक्षात येत होतं की प्रेम असा अचानक का निघुन गेला. कदाचित डॅड नी आम्हाला त्या अवस्थेत पाहिलं होतं....
 आता तिचीही धडधड वाढली होती, ती अजुन घाबरली होती. घरी गेल्यावर काय होणार होते याची कल्पनाही तिला करवत नव्हती. 
वाटेत चर्च दिसल्यावर तिने गॉड कडे मनातल्या मनात प्रे केली...' गॉड सर्व काही ठिक असु दे प्लिज...'
घरी पोहोचेपर्यंत डॅड तिच्याशी काहीच बोलले नव्हते, यावरून तिला अंदाज आला होता की, नक्कीच काहीतरी घडणार आहे. स्वतःला धीर देत ती घरी आली. 
डोअर उघडताच तिने समोर उभ्या असलेल्या तिच्या मॉमला घट्ट मिठी मारली. आणि मुसमुसत रडू लागली. डॅड सरळ बेडरूम मधे गेले होते. मॉम ला काही कळेनासे झाले होते. ही का रडतेय ते... शेवटी त्यांनी तिला तशीच मिठीत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारले....

मॉम : काय झालं बाळा...? काय होतंय...? एवढा छान आणि आनंदाचा क्षण आहे हा, आणि तुझ्या डोळ्यात पाणी...? काय झालं सांगशील का मला...?

अंजली : काही नाही ....!😞

मॉम : अच्छा...! काही नाही...! मग असं अचानक रडायला काय झालं...?

अंजली : काही नाही... असच...! 😞

मॉम : बरं ओके....! चल आधी फ्रेश हो. किती घाम आलाय बघ सर्व ड्रेस भिजलेला आहे.
* असं बोलुन मॉम तिला तशीच आत घेऊन तिच्या रूम मधे जातात. तिला थोडे बाजूला करत तिचे डोळे पुसतात आणि तिला टॉवेल देऊन बाथरूम मधे पाठवतात.
अंजली आत जाऊन शॉवर ऑन करते. घडलेल्या सर्व प्रकारामुळे तिच्या डोक्यात नको त्या विचारांची खुप गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. तिला खुप रडु येत होतं... पण ते ओघळते अश्रु शॉवर च्या पाण्यात वाहुन जात होते. चेहऱ्यावर आलेले ओले केस मागे सारत ती भिंतीला टेकुन तशीच रडत खाली बसते. 
थोड्या वेळाने मॉम बाहेरून दरवाजा ठोठावत तिला आवाज देतात. तशी ती ऊठुन उभी राहते.
फ्रेश होऊन ती बाहेर येते. अंघोळ करूनही तिचा चेहरा कोमेजलेल्या अवस्थेत होता... तिला अशा अवस्थेत पाहून मॉम तिच्या जवळ येऊन तिला विचारतात.

मॉम : काय झालंय बाळा...?, सांगशील का आता मला ?

अंजली : काही नाही...!😞

मॉम : असं कसं काही नाही...? एवढं सर्व छान पार पडलं, आणि मग शेवटी तुझा मुड का ऑफ झालाय ?

अंजली : मॉम...! खरच काही नाही झालेलं...!😞

मॉम : अच्छा...! मग मॅडम चा मुड का असा ...?

अंजली : काही नाही...! बोलले ना,,,,,,,,!

* असं बोलुन ती तिच्या बेडरूम मधे जाऊन डोअर बंद करून बेडवर बसुन पुन्हा त्याच विचारात गुंग होऊन जाते. 
तेवढ्यात मॉम बाहेरून दरवाजा ठोठावत तिला आवाज देतात. 

मॉम : अंजु...! अरे काहीतरी खाऊन तरी घे, रात्रीचे किती वाजलेत बघ, एवढं दमुन आलीय, मग भुक नाही लागलीय का...?

अंजली : नकोय मला काही, भुक नाही मला, तु झोप जा....!

मॉम : अरे...! पण थोडसं काहीतरी खाऊन घे, मग झोप हवं तर....!

अंजली : मॉम प्लिज...! मला आता खरंच भुक नाहीये. तु जा झोपायला.

मॉम : बरं ठिक आहे...! नको खाऊ...! पण दरवाजा तरी खोल.

अंजली : नाही...! मी झोपतेय आता...!

मॉम : बरं ओके...! झोप शांत.

*असं बोलुन मॉम त्यांच्या बेडरूम मधे जातात.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️