लग्नगाठ - 2 Neha Kadam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तीन झुंजार सुना. - भाग 4

    तीन झुंजार सुना श्रेय मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्प...

  • म्युट नवरा

    "'म्युट' नवरा" “तो बोलतो… पण त्याच्या मौनात”कधी कधी...

  • विहीर आणि पोहरा

    गावाच्या शेवटच्या टोकाला एक साधी, पण खोल विहीर होती. विहिरीभ...

  • थर्ड डिग्री

                 थर्ड डीग्री            --------------         ...

  • मोबाईल

      रोजच्या सवयीप्रमाणेच आजही रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्...

श्रेणी
शेयर करा

लग्नगाठ - 2

संध्याकाळी अनय घरी आला तशी आर्वी धावतच अनय जवळ गेली... अनय ने तिला वार उचलेले एक पापा घेतला... त्याने डोक्याला लागेल पहिलं तास विचारलं हे काय झालं .?? मनीषा ताई म्हणाल्या खेळता खेळता पडली ..... मग मनिषताईनी अनघाने कस काळजी घेतली ते सांगितला...अनघा आतमध्ये बसलेली म्हणून तिला काही ऐकू येत नव्हत.... 
             थोड्या वेळानं अनघा बाहेर आली तिने पाहिलं की आर्वी आणि अनय एकमेकांशी खेळत मस्ती करतं होतें.... तिला खूप छान वाटत होतं... अनघा ल बघून ती तीच्या जवळ आली आणि तिला खुणेनेच खाली बसायला लावल .... नंतर ती खेळणी काडून तिला खेळायला सांगत होती .... अनघा ही तिच्या सोबात खेळत होती अनय त्या दोघींना पाहत होता ....नंतर उठून तो फ्रेश व्हायला गेला तो फ्रेश होऊन आला तरी ह्या खेळतच होतंय...
               त्याने मनातच म्हंटला अनघाला ला खेळायला भेटली तीचेसारखच कोणतरी लहान .....आणि स्वतशिच हसला.... नंतर अचानक परत कसल्यातरी विचारत गेला .... 
                 इकडे जेवण तयार होतं म्हणून मनिशताईनी जेवण घेतलं..... अनघा ताट घेत होती तेव्हाच अनघा गरम जेवण जवळ जाताना अनघाने पहिलं तास लगेच ती तीच्या पाठी गेली सर्व इतकं अचानक झालं को अनघाने आर्विला तर बाजूला घेतला पण गरम डाळ मात्र अनघाच्या हातावर सांडली तिला खूप पोळल होत.... मनिषताईने लगेच तिचा हात पाण्याखाली धरला तेव्हा थोडा बर वाटलं... नेमकं उजव्या हाताला लागलेलं म्हणून तिला आता जेवता ही येणार नव्हत.... 
                   अनय रूम मधून बाहेर आला त्याने आर्वी ला उचल आणि अनघाला  विचारले जास्तं लागलं असेल तर डॉक्टर कडे जाऊ... तिला आज पर्यंत एवढा वेळ काकुकडे भाजल वैगरे असे तरी कोणी साधा विचारपूस ही करत नव्हते.... आणि आज तिला अनय ने अस विचारल्यावर खूप छान वाटत होते.... काकूंची काळजी बघून तिला आई च आठवली..... 
                     अनय ल काहीच उत्तर ना आल्याने त्याने परत एकदा तिला विचारलं तेव्हा ती विचारातून बाहेर येत नको म्हणाली पण तिचा हात बघता मनीषा ताई नी डॉक्टर कडे घेऊन जायलाच लावल. 
                     अनय ने २w घेऊन निघाला तिला मात्र बसताना जरा त्रास झालं पण अखेर मनिशताईन तिला मदत केली.... डॉक्टर कडून आल्यावर त्यानी लावलेलं मलम हाताला लावला तास अनघाला बर वाटलं.... मलम लावून झाल्यावर मनिषटई जेवण घेऊन अल्या आणि तिला जेवण भरवल...तिला एकदम धक्काच बसला लहानपनपासून तिला कोणी जेवलीस का ही विचारलं नव्हतं आणि आज मनीषा ताई परिस्थीती बघता आणि आपण काहीच ना बोलता जेवण घेऊन आलाय.... त्यांच्या हातून घास खाऊन तिला पहिल्यांाच जेवण पोटभर झाला अस झाला.... तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.....
                       रात्री सगळ्याची जेवण वैगरे आटोपली तशी अनय आणि आर्वी खेळत होते मग झोपायला जाताना अनय ने अनघाला हात बद्दल विचारले तेव्हा तिने ठीक असल्याचे सांगितले..... इकडे आर्वी पाठी मागून घरत आली आणि धावत अनघा कडे गेली.. आणि बेड वर आडवी झाली आणि अनय ला ही ती झोपायला बोलवत होती.... तास अनघा ल थोडी धकीच भरली.... मग अनय ने आर्वीला समजावत सांगितलं तो तिला पण बाहेर झोपायला घेऊन जाणार होता पण ती ऐकायला तयार नव्हती म्हणून अनघाने च त्याला सांगितले आणि आर्वी ला आपल्या बाजूला झोपवले .... अनय बाहेर हॉल मध्ये बेड वर आडवा झाला ..... त्याला लगेच झोप लागली तशी....
                          इकडे आर्वी ल अनघा गोष्टी सांगत होती तर मनीषा ताई आर्वी ल झोपल्या सांगत होत्या पण आर्वी झोपायच नावच घेत नव्हती...ती अनघा सोबत खेळत होती..... मनीषा ताईचा डोळा लागला तशा त्या झोपी गेल्या मग काही वेळाने कंटाळून आर्वी ही झोपली झोपल्यावर खूप शांत दिसत होती.... आर्वी झोपेतच अनघाक्या कुशीत झोपली होती ... अनघाला खूप छान वाटत होतं....
                          अनघाला पाणी पिण्यासाठी किचन मधे गेली बाहेर अनय बेड वर असच झोपलेला.... तिने त्याच्या अंगावर पांघरून टाकल आणि पाणी घेऊन परत आतमध्ये गेली...
                         दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा उठली तेव्हा आर्वी बाजूलाच होती अजुनही तिला कवटाळून ... तिने हळूच तिला बाजूला केला आणि फ्रेश होऊन मग बाहेर आली .. अनय केवहच ऑफिस ल गेलेला .... अनघा किचन मध्ये आली.. मनीषा ताईंनी तिला हता बद्दल विचारले.... अनघाने बरा असल्याचे सांगितले तास त्या तिला बसायला सांगून तिच्या साठी चहा आणयला गेल्या.... ती ही त्यांच्या पाठून गेली 
                    अहो नको आई... मी घेते तीच्या तोंडून पहिल्यांदाच मनीषा ताई साठी आई आलेला... ते तिलाही जाणवला आणि त्यानं ही .... मनीषा ताई पटकन म्हणाल्या बघ तू आई बोलतेस ना मला?? मग पोरीला लागलेला असताना कोणती आई तिला काम करायला देईल..?? आज आराम कर मग नंतर हात बरा झाला का बघू....त्यांचं बोलणं ऐकून तिला खूप छान वाटला आज पर्यंत आपल्यासाठी कोणीच नाही अस वाटत होतं तिला जे खर पण होता ... पण आता तिला मनीषा ताईच बोलणं ऐकून आईचं भेटली अस वाटत होतं... तिने मनीषा ताईंना मिठी मारली तास त्यानिंही तिला डोक्यावरून हात फिरवत शांत केले...
                    त्यानी तिला शांत करून बसवले आणि चहा आणून दिला.... चहा पिऊन झाल्यावर अनघा रूम मध्ये गेली रूम आवरली तो पर्यंत आर्वि ही उठलेली होती.... अनघाने आरविला कडेवर उचलून घेतले आणि अंघोळीला घेऊन गेली... अंघोळ करून आल्यावर तिला चहा बिस्कीट भरवल मग थोडावेळ त्यातच गेला....
                    मग नेहमीची सर्व कामं उरकून अनघा आरवीला घेऊन झोपायला गेली.....
                     संध्याकाळी अनय घरी आला तसा नेहमीपेक्षा जास्तं थकलेला दिसत होता.. आणि थोडा फार  विचारत होता कसल्यातरी अस पण आता अनघा आल्या पासुन त्याला पैशाचं टेन्शन तर होताच 
कारण खरचं वाढलेला शिवाय लग्नात ही थोडा फार पैसे खरचं झालेले तो एकटा कमवणारा होता त्या मुळे त्याला बाकी लोकांकडून घेतलेले पैसे ही द्याचे होते...आज खूपच टेन्शन मध्ये दिसत होता तो. 
                     मनीषा ताई नी त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत त्याला मामा च्या मुलीचे लग्नासाठी दोन दिवसांनी निघायचं असल्याचे सांगितले... तसा त्याचा चेहरा अजूनच पडला ... कारण एकतर आई नाही तर आर्वी साठी त्याला सुट्टी टाकावी लागणार होती आणि दुसरा म्हणजे मामाच्या मुलीच्या लग्नासाठी पैसा लागणारच होता आहेर वैगरे साठी.....तरी आई ला त्याने अस दाखवून दिलं नाही...
                        काही वेळा नंतर सगळ्याची जेवण वैगरे झाले आणि सर्व झोपायला गेले ... आर्वी आज पण अनघा जवळच झोपलेली. त्यामुळें अनय बाहेर एकटाच होता त्याला झोप येत नव्हती.... पैशाचं कस करायच सुट्टी कशी घ्यायची कारण लास्ट मोंथ मधेच लग्नासाठी टाकलेली परत घ्यायची म्हंजे खूप ताण होता डोक्यावर. शिवाय पैसे कट झाले तर हिशोब पण गडबडणार 
तो ह्या कुशी वरून त्या कुशीवर करत होता... 
                         थोड्या वेळाने अनघा पाणी पिण्या साठी बाहेर आली तिने पाहिलं अनय एकटाच बाहेर फेऱ्या मारत आहे ... तिने त्याच्या कडे जात विचारलं काय झालं ?? त्याने मागे वळून पाहिलं अनघा होती त्याने चेहऱ्यावर वार smile करत काही नाही म्हंटला तसा ... अनघा बोली टेन्शन आहे का कसलं?? न नाही तो अडखळत म्हणाला ..... मग झोप नाही का आली तुम्हाला?? हो नाही ते झोप नाही येत होती म्हणूनच फेऱ्या मारत होतो ..
                         मला माहितेय मी आल्या पासुन तुमचा खर्च वाढला आहे थोडा ... तिच्या अशा बोलण्याने तो थक्क च झाला ..... नाही तास नाही काही.... तो म्हणाला.... मला माहितेय अनय पण मी एक सांगू का  माझ्या कडे आहेत 5000 मी ते आईनं देते गावाला जाताना . आणि राहिला प्रश्न सुट्टी च तर तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर मी सांभाळते आर्विल... तिच्या अस बोलण्याने त्याला धक्काच बसला. तो नाही बोलत होता पण तिने काहीच ऐकून ना घेता... त्याला खेचत आणून हॉल मध्ये बेडवर झोपवलं... आणि रूम मध्ये निघून गेली. तिच्या अस बोलण्याने मात्र त्याचा थोडा टेन्शन कमी झालं.. पण तरी तिच्या बाबतीत एवढा सर्व चुकीचं झालेला असताना ही तिचे पैसे कसं घायच अस त्याला वाटत होता..
                          त्याचा विचार करता करता तो केव्हा झोपला हे त्याला च समजल नाही ...