तारणाचा एकच मार्ग.... devgan द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तारणाचा एकच मार्ग....

अवकाशाखाली दुसरे नाव दिले नाही ज्याच्याने मनुष्याचे तारण होईल. पवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगते. 
आपण विश्वास ठेवतो आणि मानतो की देव एकच आहे. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे, देश आणि सर्व लोकांचा एकच देव आहे.
ज्याने अवकाश पसरवीले , ज्याने पृथ्वी आणि त्यावरील जिवन निर्माण केले. ज्याने सगळी सृष्टी रचली . तो ज्ञानाने  , सामर्थ्याने , गौरवाने संपन्न देव व स्तुती योग्य देव एकच आहे.

तो दृश्य आणि अदृश्य असा दोन्ही गोष्टी निर्माण करू शकतो. अग्नी आपल्याला दिसतो पण वारा दिसत नाही. तसेच नर्क आणि स्वर्गही आहेत.
देवदुत आणि अंधाऱ्या शक्त्याही आहेत. ज्या मानसाचा नाश करण्यासाठी टपून बसलेल्या आहेत.
शैतानाला एकच गोष्टीचा राग येत असावा की , देवाने माणसाला आपल्या प्रतिरूपाचा असा निर्माण केले आणि सर्व पृथ्वी व त्यावरील सर्व काही त्याच्या हातात दिले.

बायबल आपल्याला सांगते की , शैतान देवासारखा होऊ इच्छित होता. जरी देवाने त्याची निर्मिती एका सुंदर आणि सामर्थी देवदुताच्या रुपात केली व त्यास प्रभात पुत्र म्हटले तरी ....
सैतान नक्कीच माणसाला का नष्ट करू इच्छित आहे ते मी सांगू शकत नाही पण , तो देवाने निर्माण केलेल्या ह्या सुंदर सृष्टीचा विनाश करू पाहतो इतके निश्चित आहे.....

आणि पहिल्या यूगाचा, पहिल्या पृथ्वी आणि अवकाशाचा महापुराने विनाश झाला तो मनुष्याच्या पातकामुळेच आणि त्याला ठाऊक आहे की , देव नितिमान आणि न्यायी आहे .
तो पाप खपवून घेत नाही. म्हणूनच तो पृथ्वीवर इतके पाप पसरवायला पाहतो की देवाचा क्रोध पेटावा व सर्व नष्ट व्हावे....
तरीही पवित्र शास्त्र सांगते की , नक्कीच पाप वाढेल व देवाचा क्रोधही ओतला जाईल व पहिल्या पृथ्वी आणि अवकाशा प्रमाणे ही पृथ्वी व अवकाशाही नाहिसे होईल. पण , पुढेही देवाची योजना आहे आणि त्याने ती आपल्या पासून लपवून ठेवलेली नाही आणि म्हणून आपल्याला मोठी आसा आहे.
तरी हे जिवन फक्त एक परिक्षा आहे आणि ह्यावरून आपले न्यायाच्या दिवशी परिक्षण होईल आणि एक तर अनंत जिवन किंवा अनंत नरकयातना ह्या दोन गोष्टीतील एक आपल्याला मिळेल...
मी जास्ती बोलणार नाही , उद्धार त्याचाच होईल जो प्रभूच्या नावावरती विश्वास ठेवेल. प्रभू आला होता आणि त्याने आपल्या पापांसाठी रक्त सांडले होते ह्याचा साक्षी इतिहासही आहे.
जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवेल त्याचेच तारण होईल आणि अनंत जिवनाविषयी विचारल तर पवित्र शास्त्र सांगते " जग आणि त्यातील वासना ह्या नाहिसा होत चालल्या आहेत परंतू जो देवाचा इच्छेनुसार करतो तो सर्वकाळ जगेल."
प्रभू म्हणतो ," मी इथे नितिमांनासाठी नाही तर , पाप्यांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलोय."

मला वाटते इथे नितिमानही असतील . प्रभू हे अस्यांसाठी सांगत असेल जे आपल्याच नजरेत नितिमान असतील कारण , असे पुष्कळ आहेत....
पण , माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नाही जो‌ पापविरहीत असेल...
जर कोणी असेल तर , त्याने पुढे यावे व तसे सांगावे एक मसिहच पाप विरहीत होता. तो जरी देव होता तरी आपल्यासाठी तो आपल्याच सारखा हाडा मांसाचा रक्त पाण्याचा मनुष्य बनला होता.
एकच विचार करा ना की , ज्याने सगळी सृष्टी निर्माण केली आणि जे दिसते किंवा अदृश्य व ह्या पृथ्वीवरील सर्व संपती ज्याची आहे. 
जो स्वर्गाचा मालक आहे आणि अगन्य देवदुत ज्याची सेवा करतात . अस्या देवाला पृथ्वीवर येऊन मानव होऊन एक गरीब कष्टकरी व अगदी आपल्या सारखे आयुष्य जगण्याची काय गरज होती?
किंवा ज्याच्या इशारावर सृष्टी स्थिर उभी आहे व सर्व सुरळीत चालते त्याला क्रुशावरती आपले प्राण अर्पण करण्याची काय गरज होती ?
कारण तो तुम्हा आम्हा सर्वांवर‌ पुष्कळ प्रिती करतो ज्याची मोजनी कोणी कस्यानेही करू शकत नाही . पवित्र शास्त्र सांगते की देव‌ प्रिती आहे. त्याने असे केले कारण आपले पाप क्षमा व्हावे आणि आपला उद्धार व्हावा. आणि हे सर्व फक्त त्याच्या रक्तानेच शक्य होते.
जर इस्त्राइलांच्या पापक्षमेसाठी बकऱ्याचे रक्त वेदीवर ओतले जात होते तर हे तर देवाचे,  मसिहाचे, ख्रिस्ताचे रक्त जे कितीतरी पवित्र ते आपले पाप का धुवू शकत नाही.
नरकाग्नी हा माणसासाठी नव्हे तर शैतान आणि त्याच्या दुतांसाठी निर्माण केला होता . स्वतः देवाची इच्छा आहे की, कोणीही नरकात जाऊ नये , कोणाचाही नाश होऊ नये तर , सर्व वाचवले जावेत, सर्वांचे तारण व्हावे.

पण , तारण हे फक्त देवाकडून आणि ख्रिस्ताकडून आहे. 
देवाने तारणाचा झेंडा ख्रिस्त रुपाने उभारला आहे . आता जितके त्याच्यावरती विश्वास ठेवतील त्यांचे तारण होईल. पवित्र शास्त्र ह्या बाबतीत स्पष्ट आहे.
दुसरा कोणताच मार्ग नाही किंवा दुसरा कोणीच नाही किंवा ह्या पृथ्वीवर दुसरे नाव नाही की , ज्याच्याने तुमचे तारण होईल....
तुम्ही कोणत्याही जातीचे वा धर्माचे किंवा राष्ट्र व देशाचे व्यक्ती का ना असेणा पण , तुमचा न्याय निश्चित आहे. पण जो प्रभू येशूवरती विश्वास ठेवेल तो आपली सुटका न्याय ,नरक आणि मृत्यू पासून करून घेईल....
आताच स्वर्गाच्या राज्याने सर्व जग हादरवून सोडले आहे तर विचार करा की , ते जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेव्हा सर्व मनुष्यांची गत काय होईल....

मी तर माणतो की , प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा खऱ्या देवाकडे फिरण्याची शंधी येतेच येते आणि ह्या लेख रुपी आज तुमच्याजवळी आली आहे. 
तुम्ही स्विकारा अगर नकारा ही तुमची निवड कारण , देवाने निवड करण्याचा अधिकार माणसास दिला आहे मात्र , देवाचा न्याय निश्चित आहे . आणि देव न्यायी आहे व तो पुर्ण न्याय करेल पाप्याची गय केली जाणार नाही.
ख्रिस्त तर फक्त त्याचा लोकांस वाचवण्यासंबंधी एक निमित्त आहे.
होय हे खरे आहे की , देवाने हे इतके सोपे केले आहे की , माणूस ह्याच्या सहजतेवरच अडखळून पडतो पण , निर्गम मधिल त्या इस्त्राइलांची आठवण ठेवा ज्यांना साप चावले होते आणि देवाने फक्त एक पितळ्याचा साप उंच करण्यास मोशेला सांगितले होते. 
ह्याकरीता की , जो कोणी त्याकडे पाहिल तो वाचेल आणि ज्यांनी त्या सापाकडे पाहिले ते वाचले व काहिंनी उपहास केला व  त्यांनी मन कठीण करून सापास पाहिले नाही आणि ते मेले ....
गोष्ट सोपी आहे पण , उपहास करण्याजोग कधिच नाही कारण , ही एकच गोष्ट तुमचे जिवन मरण निश्चित करते , होय ही एकच गोष्ट तुमचा स्वर्ग , नर्क निश्चित करते आणि तारणाचा दुसरा कोणताच मार्ग नाही.

तर आसा करतो तुम्ही समजला असाल तर , आता आव्हानही करतो प्रभू कडे फिरा आणि आपला जिव वाचवा. नंतर तुम्हाला सबब सांगण्यास कारण , भेटणार नाही की , आम्हाला हे कधिच ठाऊक नव्हते म्हणून.....

धन्यवाद 🙏🙏👍👍💐💐💐💐💐 

Praise the lord 🙏🙏 
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 🙏🙏 

Glory to the God 🙏 

Thanks...