“आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”
या स्वार्थी जगामध्ये कधी कधी आपलं खरंच कोण असतं तर ते म्हणजे आपलं प्रेम.
जिथे आपण सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो… आणि सगळं मन मोकळं करून बोलतो.
जिथे आपण एकदम बिंदास असतो, कारण मनात एक विश्वास असतो –
माझं प्रेम माझ्या सोबत आहे.
ती मला समजून घेते… काहीही झालं तरी “तू आहेस माझ्या सोबत” असं मनात एक समाधान असतं.
खरं प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाहीत,
तर कधी आपण तिचा आधार असतो…
आणि कधी ती आपला आधार बनते.
अशाच एका अनोख्या आणि खऱ्या नात्याची ही कथा –
“आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”
भाग १ – पहिली नजर
पुण्याच्या एका गजबजलेल्या परिसरात संग्राम नावाचा मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याचं सगळं आयुष्य त्या भागात गेलं होतं. त्या गल्लीतील प्रत्येक माणूस त्याला ओळखायचा… आणि जवळजवळ सगळ्यांचाच तो लाडका होता.
पण संग्रामची खरी ओळख होती ती क्रिकेट.
टेनिस बॉल क्रिकेटचा तर तो जणू बादशाहच होता. परिसरात कुठेही मॅच असली की लोकांचा एकच आवाज असायचा —
“संग्राम आला का?”
कारण संग्रामची बॅट चालली की समोरच्या टीमची हालत खराब व्हायची.
त्याचे जिवाभावाचे मित्रही नेहमी त्याच्या सोबत असायचे —
सोन्या, अभ्या, दीप्या आणि गोट्या.
लहानपणापासून एकत्र वाढलेले…
एकत्र क्रिकेट खेळलेले…
आणि एकमेकांसाठी काहीही करायला तयार असलेले.
त्यांची एकच टीम होती.
एकच स्वप्न होतं — क्रिकेटमध्ये नाव कमवायचं.
दररोज संध्याकाळी परिसरातील मोठ्या मैदानावर त्यांचा सराव चालायचा. बॅट-बॉलचा आवाज, मित्रांची मस्ती आणि प्रेक्षकांचा उत्साह… त्या मैदानात नेहमीच जिवंतपणा असायचा.
अशाच एका संध्याकाळी संग्राम बॅटिंग प्रॅक्टिस करत होता.
बॉलरने टाकलेला बॉल त्याच्यासाठी अगदी सोपा होता. साधारणपणे असा बॉल असता तर तो सरळ सीमेपार गेला असता.
पण त्या दिवशी काहीतरी वेगळं झालं…
संग्रामचं लक्ष अचानक दुसरीकडे गेलं.
बॉल त्याच्या बॅटला लागलाच नाही…
आणि मागे स्टंप उडाले.
“अरे संग्राम… काय रे! आज काय झालं तुला?”
अभ्या हसत म्हणाला.
पण संग्राभाग २ – ती रात्र
त्या दिवसानंतर संग्राम आणि सोनाली रोज एकमेकांना पाहू लागले.
सोनाली नुकतीच त्या भागात राहायला आली होती. तिला श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून पोस्टिंग मिळाली होती. सकाळी ती स्कूटीवरून हॉस्पिटलला जायची… आणि संध्याकाळी परत यायची.
संग्रामचा क्रिकेट सराव चालू असायचा, पण आता त्याच्या दिवसात एक नवीन सवय झाली होती —
सोनालीला एकदा तरी पाहायचं.
दोघेही एकमेकांना पाहायचे…
पण बोलण्याची हिंमत मात्र कोणालाच होत नव्हती.
असेच अनेक दिवस गेले.
एक दिवस मात्र वेगळाच ठरला.
त्या दिवशी सोनालीची स्कूटी अचानक बंद पडली. तिला हॉस्पिटलला उशीर होऊ नये म्हणून ती बस आणि ऑटोने somehow पोहोचली.
पण संध्याकाळी काम खूप वाढलं. रुग्णांची गर्दी होती. त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर पडायला तिला खूप उशीर झाला.
रात्र बरीच झाली होती.
ती बसने जवळच्या बस स्टॉपवर उतरली. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. ऑटोही मिळत नव्हता.
ती तिथे एकटीच उभी होती.
तेवढ्यात काही मुलं बाइकवरून तिथे फिरत होती. त्यांनी कदाचित दारू प्यायली होती. ते वारंवार तिच्या भोवती फेऱ्या मारत होते… आणि वाईट नजरेने पाहत होते.
सोनाली थोडी घाबरली.
त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर एक छोटंसं चहाचं हॉटेल होतं.
तिथे संग्राम आणि त्याचे मित्र — सोन्या, अभ्या, दीप्या आणि गोट्या — चहा पित बसले होते.
संग्रामचं लक्ष अचानक बस स्टॉपकडे गेलं.
त्याने ते सगळं पाहिलं…
आणि त्याला लगेच समजलं की ती मुलगी अडचणीत आहे.
तो पटकन उठला.
“मी येतो जरा,” एवढंच म्हणत त्याने बाइक घेतली आणि थेट बस स्टॉपकडे गेला.
जवळ गेल्यावर त्याला कळलं —
ती सोनाली होती.
तेव्हाच ती दारू प्यायलेली मुलं पुन्हा तिथे आली.
संग्राम शांतपणे तिच्या बाजूला उभा राहिला आणि मुद्दाम मोठ्याने म्हणाला —
“चल… उशीर झाला आहे. घरी जाऊया.”
त्या मुलांना क्षणात कळलं की ती एकटी नाही.
ते थोडे घाबरले… आणि तिथून निघून गेले.
सोनालीने हलकंसं सुटकेचा श्वास घेतला.
ती संग्रामच्या बाइकवर बसली.
थोडा वेळ दोघे शांत होते. मग संग्राम हसत म्हणाला —
“तू तर नेहमी स्कूटीवरून जातेस… आज बस स्टॉपवर कशी?”
सोनाली म्हणाली,
“स्कूटी बंद पडली आज. पप्पांनी बहुतेक रिपेअरला दिली असेल.”
संग्राम म्हणाला,
“ओह… बरं. आणि हो… माझं नाव संग्राम आहे. मी तुझ्या घराजवळच राहतो.”
सोनाली हसली.
“माहिती आहे मला.”
संग्राम थोडा आश्चर्यचकित झाला.
“कसं काय?”
ती हसत म्हणाली,
“अरे… तुझी इतकी बॅनर्स आणि फोटो लावले आहेत ना क्रिकेट चॅम्पियनशिपचे. आमच्या हॉस्पिटलजवळ स्टेडियम आहे… तिथे रोज दिसतात.”
“म्हणजे तू तर famous आहेस.”
दोघेही हसू लागले.
मग ती म्हणाली,
“माझं नाव… रुपाली.”
संग्राम क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला.
“मी श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे,” ती पुढे म्हणाली.
तेवढ्यात तिचं घर आलं.
ती बाइकवरून उतरली…
आणि हसत म्हणाली —
“Thank you… आज नसतास तर कदाचित खूप त्रास झाला असता.”
संग्राम फक्त हसला.
ती घरात गेली…
आणि संग्राम तिथेच काही क्षण उभा राहिला.
कारण त्याला जाणवत होतं —
आज काहीतरी बदललं आहे.
कदाचित ही फक्त ओळख नव्हती…
एका नवीन नात्याची सुरुवात होती..
भाग ३ – वाढत जाणारी ओळख
त्या रात्री सोनाली घरी पोहोचली तेव्हा तिच्या मनात अजूनही थोडी भीती आणि थोडं समाधान होतं.
घरात गेल्यावर तिच्या आई-वडिलांनी लगेच विचारलं,
“आज इतका उशीर कसा झाला?”
सोनालीने शांतपणे सगळं सांगितलं — बस स्टॉपवर काय झालं… आणि संग्राम कसा वेळेवर तिथे आला.
हे ऐकून तिची आई थोडी काळजीत पडली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती संग्रामच्या घरी गेली.
दरवाजा उघडला तेव्हा संग्रामची आई बाहेर आली.
सोनालीच्या आईने नम्रपणे सगळं सांगितलं आणि म्हणाली —
“काल तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीला खूप मदत झाली. म्हणून धन्यवाद म्हणायला आले.”
संग्रामची आई हसली.
“अगं त्यात धन्यवाद कसले? तो लहानपणापासूनच असा आहे… कोणाला अडचणीत पाहिलं की लगेच मदतीला धावतो.”
तेवढ्यात संग्रामचे वडीलही बाहेर आले.
ते पोलीस खात्यात होते, पण आता निवृत्त झाले होते.
थोड्या वेळात दोन्ही कुटुंबांमध्ये छान गप्पा झाल्या.
ओळख वाढली… आणि एक वेगळंच आपलेपण तयार झालं.
काही दिवसांनी सोनालीची स्कूटी अजूनही रिपेअर झाली नव्हती.
ती रोज सकाळी घरातून चालत ऑटो स्टॉपपर्यंत जायची.
एक दिवस संग्राम तिथून जात असताना त्याने तिला तिथे उभं पाहिलं.
तो लगेच बाइक थांबवून म्हणाला,
“अरे… अजून स्कूटी रिपेअर झाली नाही का?”
सोनाली हसली.
“नाही रे… अजून नाही. आणि आज तर ऑटोही मिळत नाहीये.”
संग्राम हसत म्हणाला,
“मग बस… मी तिकडेच जातोय. सोडतो तुला हॉस्पिटलला.”
सोनालीने क्षणाचाही विचार केला नाही.
ती लगेच बाइकवर बसली.
रस्त्यात दोघांच्या गप्पा सुरू झाल्या.
हॉस्पिटलसमोर उतरतानाच संग्राम म्हणाला,
“आणि हो… कधी उशीर झाला आणि बस मिळाली नाही तर मला कळव. मी येईन तुला घ्यायला.”
सोनालीने मान हलवली.
मग ती अचानक म्हणाली —
“अरे… पण माझ्याकडे तुझा नंबरच नाही.”
संग्राम हसला.
“अरे हो… हा घे.”
त्याने तिला आपला नंबर दिला.
त्या रात्री खरंच सोनालीला खूप उशीर झाला.
ती बस स्टॉपवर उभी होती… आणि फोनकडे पाहत होती.
कॉल करावा का?
नको… त्रास होईल.
पण काही वेळानंतर तिने धाडस केलं.
तिने संग्रामला फोन केला.
“हॅलो… संग्राम… थोडा उशीर झाला आहे. येऊ शकशील का?”
संग्रामने क्षणाचाही विचार केला नाही.
“थांब… पाच मिनिटात येतो.”
आणि खरंच… काही मिनिटांत तो तिच्यासमोर उभा होता.
त्या दिवसानंतर दोघांचं बोलणं वाढलं.
फोनवर…
मेसेजवर…
आणि कधी कधी भेटूनही.
त्यांची मैत्री आता खूप सुंदर होत चालली होती.
एक दिवस संग्रामने तिला मेसेज केला —
“उद्या माझी मॅच आहे.
नक्की ये बघायला.”
फोनच्या स्क्रीनकडे पाहताना सोनालीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं.
कदाचित आता ती फक्त मैत्री नव्हती…
काहीतरी खास बनत होतं.
पण त्यांना अजून माहिती नव्हतं —
पुढच्या मॅचमध्ये काहीतरी असं होणार होतं जे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणार होतं…