पाप! devgan द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाप!

मी पापी नाही , मी नितीमान आहे . मी आयुष्यात कधीच पाप केला नाही . असे म्हणणारा तुम्हाला कधी आढळेल काय?
जेव्हा प्रभू येशू ने त्या घोळक्यास म्हटले की, ज्याने कधी पाप केले नसेल अस्याने दगड उचलावा पण , तो संपूर्ण घोळका निघून गेला . 
ज्यात परूशी, नियम शास्त्राचे शिक्षक आणि याजकही होते . ते आठवड्यातून दोनदा उपवास करत असत , दशमांश‌ देत असतं, दहा आज्ञा पाळत असतं.
अस्यातील कोणीच पुढे आला नाही .
तर तुम्ही स्वतः विषयी निश्चित असू शकता काय ?

दावीद राजा म्हणतो माझ्या आईने पापाने माझी गर्भधारणा केली होती . म्हणजे गर्भातच पापी बीज पेरले गेले होते .
ह्याची सुरवात ऐदेन बागेतून झाली होती . देवाची अवाज्ञा करून मनुष्याने जे पाप केले , जो विद्रोह केला. त्याच पापाचे बीज पिढोणपिढ्या मानव आपल्या आत घेऊन चालत आहे . ही एक अनुवांशिक रोगराई म्हंटली तरी चालेले .
ह्याची बदौलत माणूस चांगले नाकारून वाईट आणि नाश निवडतो. अधिक सुख सुविधाही नाशाकडे घेऊन जातात.

जसे त्या गरीब भिकारी लाजर आणि श्रिमंत मनुष्याची गोष्ट होती .
तुम्ही आधीच सर्व सुखसुविधा उपभोगल्या तर नंतर काही उरत नाही पण , जर तुम्ही वंचित राहलात तर तुम्हाला मिळेल.
प्रभू म्हणतो जे आता शोक करतात ते नंतर आनंद पावतील , जे रडतात ते हसतील .
तसेच जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण ते नंतर रडतील आणि जे आता आनंद करतात ते दुःखी होवोत कारण नंतर ते दुःखी होतील.

लाजर आणि त्या श्रिमंत मनुष्याची गोष्ट ह्या विषयापासून फार दूर नव्हती .

पाप मनुष्याला देवापासून दूर करतो , जसे ऐदेन बागेत मनुष्याने पाप केले आणि त्याला देवाच्या सहवासापासून दूर केले , आज्ञा भंग करणाऱ्या देवदुतांना स्वर्गातून काढण्यात आले .
पाप मृत्यूस कारणीभूत होतो . पापाचे फळ मृत्यू आहे . प्रभू म्हणतो जर तुम्ही पच्छताप केला नाही तर तुम्ही मराल पण , जर कोणी पच्छताप केला आणि आपले वाईट मार्ग बदलले तर तो जगेल.
पाप दुःखास‌कारणीभुत‌ होते. देवाचा क्रोध अस्यावर पेटतो. 
पापापासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे . मग मार्ग शोधावा तर , कोणता ?
प्रभू येशू , हा एकमेव मार्ग आहे..
मार्ग, सत्य आणि जिवण मीच आहे असे प्रभू म्हणतो.
पापापासून मुक्त होण्याचा मार्ग, देव पित्याकडे जाण्याचा मार्ग , मुक्ती मिळवण्याचा मार्ग , स्वर्ग मिळवण्याचा मार्ग, अनंत जिवण मिळवण्याचा मार्ग , नरकातून सुटका मिळवण्याचा मार्ग , देवाचा क्रोध ,न्यायापासून वाचण्याचा मार्ग ....
प्रभू हा एकच मार्ग आहे .
ही वाट सरळ नाही .
पवित्र शास्त्र सांगते नशाकडे जाण्याचा मार्ग हा रुंद , प्रशस्त आणि आरामदायी आहे पण जिवणाकडे  जाणारा मार्ग अरूंद आणि कष्टमय आहे .
प्रभूला स्विकारने म्हणजे स्वतःला नाकारणे . जगाच्या वासनांना नाकारणे . ज्यांचे जग आज आनंद घेत आहे . डोळ्यांच्या वासना पुष्कळ आहेत , प्रत्येक गोष्ट आता फक्त वासना बनुन उरली आहे , इथपर्यंत की , ज्याला मनोरंजन म्हणतात ते ही .
जिवणाकडे जाणारा मार्ग तुमच्यावर दुःख आणू शकतो कारण , जेव्हा आपण प्रभूच्या नावाचा स्विकार करतो तेव्हा जग आणि त्याचे नियम व त्याच्या वासनांना नाकारतो मग , जगही आपला तिरस्कार करते . ह्यामुळे आपणावर दुःख सहन करण्याची पाळी येते .
अंततः जो शेवटपर्यंत ह्यात टिकून राहतो तो आपला मुकूट आणि अनंत जिवन मिळवतो .

फक्त विश्वास ठेवा आणि उद्धार पावा . किती सोपे आहे ना ?
पण मार्ग अरूंद आणि दुःखाने भरलेला आहे हे लक्षात ठेवा तरीही , दुःख सहनात देवाची शांती ,दया , आनंद तुमच्यावर पाखर करून असते .

प्रभू म्हणतो जे देहाचा नाश करू शकतात त्यांना घाबरू नका . त्यांना त्यापलीकडे काहीच करता येत नाही . पण जो तुमच्या शरीराचाही आणि नरकाच्या अग्नीत आत्म्याचा ही नाश‌ करू  शकतो त्याचे भय बाळगा.

पाप ज्याची मजदूरी मृत्यू व न्याय आहे . ह्यापासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे प्रभू येशू . खरे सांगतो ह्या अवकाशाखाली उद्धार मिळवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही .
उशीर आहे तर फक्त निवडण्याचा, जर सध्या नाकारले तर , कुणास ठाऊक नंतर असी वेळ येईल किंवा नाही कारण उद्या काय घेऊन येईल कोणास काहीच ठाऊक नाही.

तर हे आव्हान आहे  आजच मार्ग निवडा जरी थोडे दुःख आले ह्या जिवनात तरी , नंतर तुम्हाला न्याय , नरक हे सर्व अनुभवावे लागणार नाही . 
होय थोड्यासा दुःख सहानंतर मोठा आनंद आहे .

धन्यवाद 🙏 👍 💐 💐 

Praise the lord 🙏 

Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 🙏