धार्मिकता! devgan द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धार्मिकता!

आपले तारण हे आपल्या चांगल्या कार्यामुळे ( कर्म) नव्हे किंवा आपण किती धार्मिक आणि चांगले आहोत ह्यामुळे झालेले नाही तर , ते प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामुळे झालेय.
तुमच्यातील बहुतेकांना हे सर्व आठवण करून देण्याची गरजच नाही . पापाची क्षमा ही फक्त एकाच गोष्टीने होते , आपल्याला बर्फासारखे शुभ्र म्हणजेच शुद्ध आणि पवित्र करणारी एकच गोष्ट आहे .
ते म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे रक्त.....
देवाच्या दयेमुळे आणि त्याच्या अनुग्रहामुळे आपले तारण झालेय, नाही की आपली धार्मिकता, आपले चांगले कृत्य किंवा दान पुण्य....
जर आपल्या धार्मिकतेमुळे किंवा चांगल्या कृत्यामुळे, दाण धर्मामुळे आपले तारण झाले असते तर,...
प्रभू येशूला क्रुशावरती आपले प्राण अर्पण करण्याची काहीच गरज नसती...
लोक आपल्या कृत्यांनी आणि धार्मिकतेने स्वर्गात गेली असती . कोणी मळलेली कपडे न बदलता एखाद्या सभेत वा मंदिरात असो किंवा इतर कोणतेही महत्वपूर्ण ठिकाण असो तो आपल्या अंगाला लागलेला मळ धुतल्या शिवाय तिथे जात नाही .
जर तो असाच तिथे गेला तर किती लाजिरवाणे मग मालक येईल आणि त्याला त्याच्या घाणेरड्या पणामुळे बाहेर ढकलून देईल....
हा मळ आपण पाप म्हणून घेतला आहे . आपले पाप हे सोने, चांदी पैसाने धुतले जात नाहीत . किंवा आपली चांगली कृत्य ती धुतण्यास असमर्थ आहेत.

संपूर्ण पवित्र शास्त्रात पापासाठी रक्त सांडले गेल्याच्या घटना तुम्हाला पाहायला भेटतील आणि प्रभू येशू पर्यंत येऊन संपलेल्या पाहायला भेटतील...
मग ते आदम आणि हव्वेने एदेन बागेत केलेले पहिले पाप असो आणि त्याच वेळी देवाने काही पशूस मारून सांडलेले रक्त असो ‌....
खरे सांगता  त्यांची नग्नता त्यांच्या पापाचे  प्रतिक झाली होती आणि त्यांनी आपली नग्नता म्हणजेच आपले पाप झाकण्यासाठी अंजीराच्या पाणांचा वापर केला होता पण , ते पुरेसे नव्हते ....
पवित्र शास्त्र सांगते की जिवाचे प्रायश्चित्त हे रक्ताने केले जाते ( जिवाचे म्हणजे पापाचे असाही त्याचा अर्थ होतो.) म्हणून त्यांच्या पापांसाठी देवाने काही निर्दोष पशूंचे रक्त सांडले होते व त्यांच्या कातडीने म्हणजेच त्या रक्ताने त्यांचे पाप झाकले तरी , प्रभूने म्हंटल्या प्रमाणे त्यांचा मृत्यू आता निश्चित होता. म्हणून की , काय त्यांनी जिवनाच्या झाडावरून फळ घेऊन खाऊ नये म्हणून प्रभूने त्यांना बाहेर घालवले. 
त्यांना चांगले वाईट कळू लागले होते आणि वाईटानेच त्यांच्यावर अधिक ताबा मिळवला होता असे पवित्र शास्त्र सांगते.
आणि अस्यात मानसाने अमर होऊन आपल्या वाईटात कायमचे जगने कसे असते.... जर जगातील क्रुर तानाशाहा व वाईटातील वाईट माणसे कधिही न मरता कायमचीच जिवंत राहिली असती तर कसे असते ?

संपूर्ण पवित्र शास्त्र फक्त ख्रिस्ताच्या क्रुशावरील बलिदानाच्या  गोष्टीकडे लक्ष केंद्रित करते.
पाप हे देवापासून आपल्याला दुर करते आणि शेवटी पापांचे फळ मृत्यू आहे. साधे खोटे बोलणे, दुर्भाषण करणे , इर्षा करणे हे लहान सहान गोष्टींही पाप आहेत तर इतर गोष्टींविषयी न बोललेलेच बरे...
असे पापाचा मळ माखलेल्या अवस्थेत आपण प्रभू प्रमेश्वरच्या घरात प्रवेश करू शकत नाही ( इथे ह्याचा अर्थ स्वर्ग आहे.)
कारण देव नितीमान आहे , पवित्र आहे , न्यायी आहे आणि पाप्यास तो नितीमान ठरवणार नाही . 
तर असे असता त्याने पापांची क्षमा प्राप्त व्हावी व उध्दार प्राप्त व्हावा ह्यासाठी एकच मार्ग मोकळा केला आहे, तो म्हणजे ख्रिस्ताचा क्रुश , त्याने स्वतःला आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी , आपल्या शिक्षा व न्यासाठी केलेल्या अर्पणाचा मार्ग.... त्याचे रक्त....
म्हणून पवित्र शास्त्र सांगते ," देवाने जगावर एवढी प्रिती केली की , त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर , त्यास अनंत जिवन प्राप्त व्हावे."

देवाला आपला पुत्र अर्पण करण्याची वेळ आली कारण पापापासून मनुष्य मात्राला सोडवण्याचा दुसरा मार्ग, दुसरा पर्याय नव्हता . ते हेच की , मानसाचे कोणतेही कृत्य, त्याची धार्मिकता असो ती त्याचे तारण करण्यास असमर्थ आहे .
मग धार्मिकता महत्वाची नाही काय? 
तर प्रभूत विश्वाने केलेले कृत्य व त्याला मान्य होईल असे जगणे वागणे योग्य आहे व ह्याचे तो प्रतिफळ देईल पण पाप्यास तो नितीमान ठरवणार नाही....
पापी लोकांची कृत्येच त्यांचा न्याय करतील म्हणून म्हणतो  , विश्वास करा शुध्द व पवित्र व्हा आपली लज्जा उघडी होऊ नये म्हणून प्रभूकडून शुभ्र वस्त्र विकत घ्या....
अंजिराची पाने तुमची नग्नाता झाकण्यास असमर्थ आहेत म्हणून प्रभू जे शुभ्र वस्त्र पुरवत आहे ते विकत घ्या!

विकत घ्या असे का म्हटले माहित आहे का ?
आपण ख्रिस्ताजवळ आल्यावर आपल्याला एक विशिष्ट किंमत चुकवावी लागते. आपले आयुष्य बदलावे लागते. मग काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील तर , काही आयुष्यात जोडावे लागेल....
तुम्हाला प्रभू ख्रिस्ताचा क्रुश उचलून चालावे लागेल जसे जगाने ख्रिस्ताला सतावले , त्याची निंदा केली तसेच ते तुमच्याही बाबतीत करेल असा ह्याचा अर्थ होता.

पवित्र शास्त्र पुढे सांगते......

"कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत,
आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
यश 64:6 ", असे जे पवित्र शास्त्र सांगते ते तुम्ही विसरता...  आपली पापे आपले कर्म पुसून टाकू शकत नाही फक्त एकच पर्याय देवाने अवकाशाखाली दिलेला आहे तो म्हणजे ख्रिस्ताचे रक्त...
प्रभूत असल्यावाचून आपल्याला फळ देता येत नाही . त्याला मान्य असी आपण त्याची सेवा करावी असो....

आता ख्रिस्ताचे रक्त आपण कुठे शोधत फिरणार तो जिवंत आहे आणि हजारो वर्षांपूर्वीच त्याने एकदाच युगाच्या सर्व विश्वासनाऱ्यांसाठी आपले रक्त अर्पण केले आहे मग ते विश्वासाद्वारे नितीमान ठरवला गेलेला अब्राहम असो किंवा आता सध्या जे आपण त्या प्रभू येशूवर त्याने जे काही आपल्या उद्धारासाठी क्रुशावर केले त्यावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे आपण सर्व असोत .....
रक्त एकदाच सर्व जिवांच्या खंडणीसाठी सांडले गेले . उशीर आहे तर , तो फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याचा.

कायमचा उशिर होण्याआधीच आपल्या उद्धारासाठी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास त्याच्या जवळ या...
बाकी मार्ग तो तुम्हाला दाखवेलच....
कारण मार्ग, सत्य आणि जिवन मिच आहे असे प्रभू म्हणतो...‌
" कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 
1 करिं 1:18"

Praise the lord 🙏 🙏 🙏💓💓💓💖💖💖
Aameen.....
God bless you 😇 
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏