Hello friends....कसे आहात तुम्ही .... हे ना मी माझ्या ताई कडून शिकलो . ती असंच बोलते . ती सारखी इथे काहीतरी लिहीत असते , वाचत असते म्हणून मी विचार केला आपण ही इथे येऊन बोलावं ..... म्हणून मी इथे आलो . Oops.... चुकलो मी ...ताई नेहमी स्वतः च introduction देत असते आणि मग बोलत असते . मी माझा intro द्यायला विसरलोच ....
... माझं नाव आहे मायलो ....हे नाव मला माझ्या ताई ने दिले आहे ...माझी ताई ... तुम्ही ओळखले नाही ...?? अरे ती इथे मनस्वी "मनु" म्हणून आहे ना तिने . ती माझी ताई आहे तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. माझा जन्म कुठे झाला आणि माझे खरे आई वडील कोण होते हे काही मला माहित नाही कारण मी कधीच त्यांना बघितलं नाही ...पण मी माझ्या इकडच्या आई ला सगळ्यांना सांगताना ऐकलं आहे की मी जेव्हा तीस दिवसांचा होतो ना तेव्हा आई ने मला पहिल्यांदा तिच्या कुशीत घेतलं होतं . आई इतक्या प्रेमाने सांगते हे सगळ्यांना की काय सांगू ... तर मी तीस दिवसांचा असल्या पासून या कुटुंबाचा भाग झालो . मला इतकं मात्र आठवतंय मी लहानपणापासून माझ्या ताई सोबत च तिच्या अंथरूणात झोपतो ती मला घट्ट कुशीत घेऊन झोपते मला दुसरीकडे कुठे झोपच येत नाही ....
माझ्या घरातला प्रत्येक सदस्य ... दादा, बाबा, आई , ताई सगळे माझे खूप लाड करतात आई इतक्या छान छान वस्तू खायला करते ना की काय सांगू . दादा कामावरून आल्यावर आधी माझ्या सोबत खेळतो आणि मग त्याचं आवरायला जातो . ताई आधी खेळायची माझ्याशी दिवसभर पण आता तिला माहित नाही काय झालं तिला तसं खेळता येत नाही जशी आधी खेळायची . तिला बरं नसतं असं आई बोलते ...
असो.... मला आज सांगायचं आहे ते माया आणि मृगजळा बद्दल .... माझ्या घरात मला कुठलाही त्रास नाही . सगळे मला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचे . मी रोज सकाळी दादा सोबत बाहेर फिरायला जात होतो तिथे आम्ही खूप खेळायचो . तिथे मला माझ्या सारखेच बरेच कुत्रे दिसायचे . त्यांना बघून मला सारखं वाटायचं ...
" हे कसे independent आहे . कधी ही उठा , कधी ही झोपा , कुठेही फिरा , जे मनाला आवडेल ते खा , कोणासोबत ही मैत्री करा ... कधीच कोणी कुठल्याही गोष्टीला थांबवत नाही . "
मला त्या जगाचं खूप आकर्षण होतं . मला सारखं वाटायचं आपलं आयुष्य असं का नाही . आपण दिवसभर या घराच्या चार भिंतीत बंदी असतो . हे खरंय की मला कधीच माझ्या घरच्यांनी बांधून ठेवले नाही , पण तरीही मोकळं आभाळ मला खुणवायचं ... मी घरात बसून त्या मायावी जगाची कल्पना करायचो जिथे मी माझ्या सारख्या कुत्र्यां सोबत स्वच्छंदपणे फिरताना , खेळताना बागडताना बघायचो स्वतः ला ....
एक दिवस काय झालं ... मी दादा सोबत सकाळी आमच्या रोजच्या जागेवर खेळायला गेलो . मी आणि दादा खेळत असताना दादा माझी leash सोडून द्यायचा . त्या दिवशी पण त्याने leash सोडून दिली होती . आम्ही दोघे आमचा favourite game खेळत होतो throw and run ... दादा माझं खेळणं लांब फेकायचा आणि मी तो घेऊन पुन्हा दादा कडे धावत यायचो . हा खेळ खेळत असताना मला समोर बरेच कुत्रे त्यांच्या मर्जीनुसार खेळताना दिसत होते . माझं मन सारखं त्यांच्या कडे धाव घेत होतं . या वेळी दादा ने throw जरा जोरात दिला आणि मी माझं खेळणं घेण्यासाठी म्हणून जो धावलो तर सरळ धावतच सुटलो मला ऐकू येत होतं दादा माझ्या नावाने मोठ्या ने ओरडत माझ्या मागे धावत होता . मी पण जरा चंटपण केला आणि एका झुडपात लपून बसलो . दादा ने मला सगळीकडे शोधलं पण मी त्याला सापडलोच नाही . शेवटी दादा तिथून निघून गेला . मी त्या झुडपातून बाहेर निघालो आणि सरळ त्या दिशेने चालू लागलो जिथे मला ते कुत्रे दिसले होते .
मी त्यांच्या जवळ गेलो तर आधी तर ते माझ्या वर आणि मी त्यांच्या वर भुंकलो पण मग जर मला त्यांच्या जगात जायचं होतं तर मला त्यांच्याशी भांडून चालणार नव्हतं म्हणून मग मी त्याच्या पैकी जरा मोठ्या कुत्र्याला बोललो ...
" Hello !!! माझं नाव मायलो आहे मला तुमच्या सोबत रहायचं आहे . मला पण घ्या ना तुमच्यात ... "
" अरे पण तू तर त्या बंगल्यात राहतो ना , मग तुला आमच्या बरोबर का रहायचं आहे . " त्यांच्या पैकी एक बोलला .
" मला तुम्ही राहता तसं रहायचं आहे स्वच्छंदी ,स्वतंत्रपणे , म्हणून मी माझ्या दादा ला सोडून आलो . " मी सांगितलं
" ऐ !! तुझा दादा बिद्या ची भीती आम्हाला दाखवू नकोस ..आमचा एकच दादा आहे तो बघ तिथे बसला आहे ..शेरू दादा ... " त्यांच्या पैकी एक बोलला .
" अरे नाही रे माझा दादा वेगळा आहे . " मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागलो .
तेवढ्यात शेरू दादा तिथे आला आणि बोलला ...
" काय रे पंटर लोक ... काय भानगड आहे रे . "
" काही नाही दादा ...हा त्या बंगल्यात राहतो पण आता याला आपल्या सोबत रहायचं आहे . काय करुयात . " एक बोलला .
" Hmm , येऊ देत की मग . काय रे तुला काय काय येतं....." शेरू दादा ने मला विचारलं
" काय येत .... म्हणजे ...?? " मी विचारलं
" अरे म्हणजे चोरी येते...,??? " एक
" केविलवाणा चेहरा करता येतो ...?? " दुसरा
" मार खाऊन सुध्दा लोचटा सारखं पुन्हा त्याच ठिकाणी जाता येतं ...??? " तिसरा
" नाही रे मला तर यातलं काहीच येत नाही . " मी चेहरा पाडून बोललो .
" अबे !!! असं कसं ...??? कुठल्या प्रजाती चा तू ...?? एकाने विचारलं
" मला फारसं माहित नाही पण मी ऐकलं आहे बाबा कोणाला तरी सांगत होते जर्मन शेफर्ड आहे म्हणून . " मी बोललो
" बापरे !!! म्हणून तुला काही येत नाही , हरकत नाही आम्ही शिकवू तुला..." शेरू दादा बोलला .
मला खूप आनंद झाला . आम्ही दिवसभर इथे तिथे फिरत राहिलो . दंगा मस्ती केली . मग मला तहान लागली मी शेरू ला विचारलं ...
" ऐ तुम्ही पाणी कुठल्या भांड्यात पीता , मला खूप तहान लागली आहे . " माझं बोलणं ऐकून सगळे हसू लागते .
" येडा आहे का रे तू .. भांडं बिंड काही नसतं आम्ही तर कुठल्याही नळातून गळणार किंवा नाल्यात वाहणार पाणी पीतो . " शेरू बोलला
" शी ...!!! काहीही काय . किती अनहायजनिक आहे ते . " मी बढाई मारली .
इतकं ऐकून सगळे हसू लागले कोणी माझ्या कडे लक्ष दिले नाही आणि मला एका गळक्या नळाजवळ घेऊन गेले . तिथे मी कसं बसं पाणी प्यायलो . मग पुन्हा आमची टोळी निघाली हुडदंगायला . खेळून खेळून दमलो होतो मी . सपाटून भूक लागली होती . मी पुन्हा तोच प्रश्न विचारला ...
" आपण जेवायचं कधी आणि कुठे ... "
सगळे एका घरा समोर बसलो होतो . शेरू बोलला ...
" आवाज करू नकोस . थांब जरा त्या समोरच्या घरातून एक बाई बाहेर अन्न टाकून जाईल मग आपण जेवू . "
मी चाटच पडलो . फेकलेले अन्न ...??? . माझ्या डोळ्यासमोर आई च्या हाताच्या पोळ्या आणि दूध फिरू लागलं . मी जेवायला नकार दिला की बाबा लगेच अंडी उकडून मला स्वतःच्या हाताने मला भरवत असायचे . माझ्या डोळ्यात पाणी आलं मला माझी चूक कळू लागली होती . तेवढ्यात ती बाई अन्न टाकून गेली . ती आत जाताच हे सगळे त्या जेवणासाठी भांडू लागले . त्यात एक कुत्री होती ती बोलली ...
" मायलो... मागे उभा राहिला तर उपाशी राहशील ये आपला वाटा भांडून हिसकावून घे . "
मी बधीर झालो होतो मला काही सुचत नव्हतं . मी माझ्या जागी उभा राहिलो . ते सगळे जेवले आणि तिथेच आडवे पडले . मी त्या कुत्री ला विचारलं ..
" निदान झोपायला तरी गादी आहे का ... "
तिने नाही म्हणून मान डोलावली आणि तिच्या शेजारी झोपण्यासाठी खुणावलं . आता तर माझे पेशंस संपले होते मी पुन्हा माझ्या घरी जाण्यासाठी पळायला सुरुवात केली. मला शेरु चा आवाज ऐकू आला ...
" अबे ऐ ..कुठे चालला . " पण मला त्याला उत्तर देऊ पण वाटत नव्हतं मी धावत धावत त्या जागी आलो जिथे दादा आणि मी खेळत होतो . मी एका जागी बसलो खूप रडू येत होतं ... सारखं घर आठवत होतं ...आई , बाबा , दादा , ताई .सगळ्यांची आठवण येत होती . तेवढ्यात मला बाबांचा आवाज ऐकू आला ...
" शिशिर ...तू मूर्ख आहेस का रे एक छोटं कुत्रं तुझ्या कडून सांभाळलं गेलं नाही . आता काय माहीत कुठे असेल तो अरे लहान आहे तो अजून त्याला घरी यायला जमेल की नाही माहीत नाही . कुठे शोधायचं आता त्याला . "
मी तो आवाज ऐकून मोठमोठ्याने भुंकू लागलो . बहुतेक माझा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचला असावा . दादा ओरडला ..
" बाबा !!! मायलो ...."
ते दोघे माझ्या दिशेने आणि मी त्यांच्या दिशेने पळत सुटलो .
दादा ने मला कवटाळून घेतलं . बाबा ने डोक्यावरुन हात फिरवला आणि मला गाडीत बसवून घरी घेऊन आले . घरी आई आणि ताई रडून रडून बेहाल झाल्या होत्या . मी घरी पोहोचलो आणि दोघींनी मला कडकडून मिठी मारली . खूप लाड केले . दादा ने मला स्वच्छ अंघोळ घातली आणि आई ने गरम गरम पोळ्या दुधात कुस्करून माझ्या पुढ्यात ठेवल्या . मी पोटभर जेवलो . आणि माझ्या गादी वर जाऊन झोपलो .
आज मला एक गोष्ट कळली होती बाहेर च जग हे एक मृगजळ आहे . त्यात सगळं किती ही सुंदर दिसत असलं तरी घर हे घरच असतं . माया , प्रेम , आपलेपणा आणि सुरक्षितता हे फक्त या चार भिंतीत च आहे . चला आता मला झोप आली मी झोपतो .दमलो ना खूप . भेटून नंतर .... bye bye ...
समाप्त
(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)(◔‿◔)