सानिका - 3 manasvi Manu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सानिका - 3

भाग ३ 

आपण बघितलं :- सानिका चा रिझल्ट लागल्यावर ती आदल्या दिवशी घरच्यांसोबत फिरायला जाते . दूसऱ्या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना भेटते . 

आता पुढे :- सगळ्या मित्रांनी मिळून नुसतं भटकायला जायचं असं ठरवलं . कुठेही एक ठिकाणी जाण्याऐवजी वेगवेगळ्या जागी जायचं . जिथे भूक लागली तिथे जे वाटेल ते खायचं आणि मस्त हिंडायचं .‌ तिन्ही मुलांकडे बाईक्स होत्या  . चिन्मय ने रूची ला , कौशल ने कविता ला आणि अनिरुद्ध ने सानिका ला आपल्या सोबत बसवलं आणि ते निघाले भटकायला . फिरता फिरता भूक लागली म्हणून एकेठिकाणी  एका रेस्टॉरंट मधे गेले . सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली आणि गप्पा मारत वाट बघू लागले . 

" Guys !!! आता  पुढे आपण सगळेच MBA  करणार आहोत . कोणाचा कुठे जायचा plan  आहे . " सानिका ने विषय सुरू केला .‌

" Plan काय .... मला तर फक्त PG degree पाहिजे . पिताश्रीं चा इतका मोठा business आहे . शेवटी तो मलाच सांभाळायचा आहे . पण कसं आहे ना जर मी PG नाही केलं तर कविता चे वडील तिचा हात माझ्या हातात नाही देणार . म्हणून मला MBA करायचं आहे . " कौशल ने सगळ्यात पहिले आणि अगदी प्राथमिक उत्तर दिले . 

त्याच्या उत्तराला सगळ्यांनी हसून प्रतिसाद दिला . कविता ने कौशल च्या हातावर चापट मारली आणि रागात कौशल ला बघू लागली.

" काय रे !! तू फक्त लग्ना साठी अभ्यास करतोय ...??? तुझी स्वतः ची इच्छा नाही पुढे शिकायची ...?? ." चिन्मय ने कौशल च्या पाठीवर एक धपाटा घालून विचारलं . 

" अनि !! तुझं काय ठरलंय .‌‌..?? " रुची ने अनिरुद्ध ला विचारलं . 

" CAT ची preparation  सुरू केली आहे . बघू पुढचं . मी असं ठरवलं वगैरे नाही . " अनिरुद्ध सानिका कडे बघत बोलतो. 

" या love birds  च मस्त आहे . सगळं ठरलेलं आहे . घरचे तयार आहेत . दोघांना एकत्र शिकायला बाहेर पाठवणार आणि मग दोन वर्षा नंतर .... लग्न . " कौशल रुची आणि चिन्मय ला चिडवत बोलतो . 

" सानू ... तुझं तर आधी पासून ठरलेलं आहे ना ... " कविता सानिका ला बोलते . 

" हो यार !!! मला चांगलं आठवतंय आपला ग्रुप होऊन जेमतेम एक महिना झाला असेल , तेव्हा कॅन्टीन मधे बसलो होतो आपण आणि या विषयावर च गोष्टी चालल्या होत्या . तेव्हा सानू बोलली होती . " माझं ठरलेलं आहे मी IIM Ahmedabad मधून MBA करणार..." . यार ग्रॅज्युएशन च्या पहिल्या च वर्षाला थेट future ठरवणारी म्हणजे एकमेव ... The great sanika Joshi " कौशल ने पुन्हा आपलं कौशल दाखवलं .

" ऐ ... Great वगैरे काही नाही हां . फक्त मी माझं स्वप्न बोलून दाखवलं तेव्हा . ते माझं स्वप्न आहे  आणि ते मला पूर्ण करायचं आहे . माझ्या आयुष्यात बाकी कुठल्याही गोष्टींना इतकं महत्व नाही जेवढं महत्त्व माझ्या ह्या स्वप्नाला आहे . " सानिका च्या. चेहऱ्यावर तिचा आत्मविश्वास दिसून येत होता . 

तेवढ्यात त्यांच्या ऑर्डर चा नंबर आला आणि तीघी मुली ते घ्यायला गेल्या . अनिरुद्ध पाठमोऱ्या सानिका कडे बघत होता . चिन्मय ने त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं ...

" अनि ... मागच्या तीन वर्षांपासून तू तिच्या वर इतकं प्रेम करतो , मग सांगून का टाकत नाही यार तिला . Just go and propose her man..." 

" नाही यार ....तू बघितलं ना ... ती तिचं स्वप्न सांगताना किती excited होती . मला तिचा focus disturb  नाही करायचा . ज्या दिवशी ती तिचं स्वप्न पूर्ण करेल त्या दिवशी मी तिला माझं स्वप्न सांगून टाकेन . " अनिरुद्ध तसंच सानिका ला बघत बोलतो . 

तेवढ्यात मुली त्यांचं ऑर्डर घेऊन टेबलावर येतात आणि मग सगळे हसत खेळत गप्पा मारत खाण्याकडे लक्ष केंद्रित करतात . दिवसभर दंगामस्ती ,भटकंती करून सगळे दमले असतात . एकमेकांना पुन्हा भेटीचं promise देऊन सगळे परत घराकडे निघतात . अनिरुद्ध च्या बाईक वर सानिका बसलेली असते . अनिरुद्ध सानिका ला विचारतो.... 

" सानू ....घरी जायची घाई आहे का तुला .. ?? " 

" का रे .... काय झालं ..." सानिका विचारते . 

" सिंहगडावर जाऊया ...?? " अनिरुद्ध ने विचारले . 

" आं..... बरं ठीके अजून आहे थोडा वेळ माझ्याकडे . चल जाऊया . " सानिका बोलली . 

अनिरुद्ध ने गाडी सिंहगडाच्या दिशेने वळवली . ते गडावर पोहोचले . गाडी पार्किंग मध्ये ठेवून दोघांनी चढायला सुरुवात केली . बसायला छान जागा बघून दोघे बसले . मस्त वारा सुटलेला होता . दोघे समोर खोल दरीत बघत शांत बसले होते . आकाशात रंग छटा खूप सुंदर दिसत होत्या . दोघांपैकी कोणीही काहीच बोलत नव्हतं . सानिका ने त्या दोघांमधलं मौन तोडत म्हटलं .... 

" किती सुंदर आहे ना हे आभाळ . जरी खूप लांब असलं तरी किती आपलं वाटतं . " 

" Hmmm .... पण फक्त आपलं वाटतं ...आपलं आहे ... असं नाही म्हणू शकत ना . कारण कितीही जवळ भासत असलं तरी तो फक्त भासच आहे " . 

अनिरुद्ध एकटक आभाळाकडे बघत बोलतो . सानिका अनिरुद्ध कडे बघते पण तो त्याच्या तंद्रीत च असतो . थोड्या वेळ तिथे बसून अनिरुद्ध सानिका ला घेऊन खाली येतो . दोघे पुन्हा सानिका च्या घरच्या दिशेने निघतात . या वेळी दोघेही अगदी शांत असतात . दोघांना च माहित नसतं एकमेकांच्या मनात काय चालू आहे . पण तरीही दोघे एकमेकांच्या शांततेचा सन्मान करत स्वतः सुद्धा शांत असतात . 

अनिरुद्ध सानिका ला तिच्या घरी सोडतो . थोड्या वेळ घरच्यांशी गप्पा मारून तो निघतो . सानिका त्याला बाहेर सोडायला येते . 

" So ... Now ... पुन्हा अभ्यासाला सुरुवात करुया . पण आता आपल्या वाटा वेगळ्या होणार ...." अनिरुद्ध एकदम गंभीर होऊन बोलतो . 

" काहीही ...अरे एक दोन दिवसांची फक्त ओळख आहे का आपली ...चांगली चार पाच वर्षांपासून ची मुरलेली मैत्री आहे . मान्य आधी सारखं रोज भेट नाही होणार पण ठरवून वेळ काढून तर भेटता येईल ना. आणि काय माहीत आपल्याला एकच institute मिळालं तर ...." सानिका अनिरुद्ध ला समजवण्याचा प्रयत्न करत बोलली . 

" जाऊ दे ना ... कशाला खोटी आशा ठेवायची . या... जर , तर.... च्या गोष्टी नाही आवडत मला . सत्य परिस्थिती स्विकारण्याची हिम्मत पाहिजे , आणि सत्य परिस्थिती हीच आहे की ....ही अशी भरपूर वेळ असलेली , ही आपली शेवटची च भेट आहे . मला चांगलं च माहित आहे की आता तू जी पुस्तकांच्या दुनियेत जाशील ती IIM Ahmedabad मिळवूनच बाहेर येशील . " अनिरुद्ध च्या बोलण्यावर दोघे हसायला लागतात . 

" बरं चल ....मी निघतो खूप उशीर झाला आहे . आता भेटू ते CAT  clear झाल्यावर च ... Bye ....TC ... good night . " 

अनिरुद्ध त्याची गाडी घेऊन त्याच्या घराकडे निघतो . सानिका थोडावेळ अनिरुद्ध गेला त्या दिशेने बघत तिथेच उभी राहते . मग आतून तिच्या नावाची हाक आल्यावर ती आत निघुन जाते . 

क्रमशः 

(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→

शाळा आणि कॉलेज ची मैत्री जगात सगळ्यात भारी असते कारण तिथे प्रतिस्पर्धा जरी असली तरी स्वार्थ नसतो .