सानिका - 4 manasvi Manu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सानिका - 4

भाग ४ 

आपण बघितलं :- सानिका आणि तिचे मित्र खूप धमाल करतात . आपल्या येणाऱ्या आयुष्या विषयी च्या योजना एकमेकांना सांगतात. 

आता पुढे :- सानिका CAT च्या तयारीत लागून गेली . अधूनमधून मित्रांशी फोन वर गप्पा व्हायच्या , पण भेटायला कोणालाही वेळ नव्हता . सगळे आपल्या भविष्याकडे वाटचाल करण्यात व्यस्त होते . दिवस व्यस्ततेत जात होते . सानिका ने पूर्णपणे स्वतः ला अभ्यासात गुंतवून घेतलं होते . ती रात्रंदिवस नुसता अभ्यास करत असायची . 

हळूहळू परीक्षेचे दिवस जवळ येत होते . सानिका ची तयारी जोरदार सुरू होते . शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी सानिका ची परिक्षा होती . सानिका आणि तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणी ची परीक्षा खूप छान झाली . आता फक्त रिझल्ट ची वाट बघायची होती . परीक्षा संपल्यावर पुन्हा सगळे भेटणार होते .

" झाली यार एकदा ची परीक्षा . वैतागलो होतो मी तर . असं वाटत होतं की माहित नाही किती जन्मापासून फक्त अभ्यासच करून राहिलोय मी ..." कौशल  वैतागून बोलला . 

" हो यार जाम दमायला झालं आहे . असं वाटतंय कुठे तरी फिरायला जाऊन यावं ..." चिन्मय ने कौशल च्या बोलण्यावर समर्थन करत म्हटलं . 

" ऐ आयडिया मस्त आहे .... जाऊयात का कुठेतरी फिरायला ... ?? " कविता ने सुद्धा त्या दोघांना तिचं मत दिलं . 

" सानू... तू गप्प का आहेस . तुझं काय म्हणणं आहे . " रूची ने सानिका ला विचारलं . 

" I am sorry guys . आपली परीक्षा नोव्हेंबरमध्ये झाली आहे . त्या हिशोबाने रिझल्ट डिसेंबर शेवटी किंवा फार फार तर जानेवारी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे . तर आता कसं आहे ना की डिसेंबर मधे आत्या च्या मुलाच लग्न आहे पहिल्या आठवड्यात आणि . शेवटच्या आठवड्यात काकांच्या मुली चा साखरपुडा आहे . हे झालं डिसेंबर आणि जानेवारी पहिल्या आठवड्यात मावशी च्या नातवाची मुंज आहे ...त्या मुळे मी तर अगदी पैक आहे . मला नाही जमणार ..." सानिका तोंड पाडून बोलली . 

" ऐ काय यार सानू ...." रूची आणि कविता एका सुरात बोलल्या . 

" अरे पण तुम्ही सगळे जा ना . त्यात काय एवढं . जिथे जाल तिथून मला VC करा मी असेन तुमच्या सोबत . " सानिका ने सुचवू पाहिलं .

" काहीही ....?? तू आपल्या ग्रूप चा रूल विसरलीस का ... जो एकाच निर्णय तो सगळ्यांचा . तू नाही तर कोणी नाही . या चारा पाच वर्षांत असं कधी झालेलं आठवतंय का तुला ....?? " अनिरुद्ध जरा चिडून च बोलला . 

" अरे यार !! पण मी काय करू सांगा सगळे event सख्या नात्यात आहेत . चुलत वगैरे असते तर मी आपला प्लॅन  कधीच मोडला नसता . " सानिका तोंड पाडून बोलली . 

" It's okay !!!! आपण पुढे कधीतरी जाऊ ,  त्यात काय एवढं . असं नाही ना की आता आपण भेटणारच नाही कधी . ठरवून भेटूया . Don't worry .... relax. " अनिरुद्ध ने सानिका ची समजूत काढली . त्या वर सगळ्यांनी सहमती दर्शविली .

सानिका तिच्या ग्रूप चा निरोप घेऊन येते आणि मग घरातल्या सगळ्या कार्यक्रमांत गुंतून जाते . तिच्या कडे एका नंतर एक बरेच कार्यक्रम असतात .... लग्न , साखरपुडा , मुंज ....ति प्रत्येक function खूप enjoy करत होती . 

शेवटी तो दिवस आला ज्याची वाट सगळे बऱ्याच दिवसांपासून बघत होते. शेवटी निकाला चा दिवस उजाडला. सानिका चे 95 percentile होते . तिच्या ग्रूप मधे सगळ्यांचे 80 ते 90 च्या मधे होते . सगळे खूप खूश होते . 
सानिका चे आई ,बाबा ,दीदी आणि दादा सगळेच खूप खुश होते . सानिका च स्वप्न पूर्ण होणार होतं . 

" अगं मनीषा !! आज इतकी गोड बातमी कळली आहे . आज काहीतरी विशेष बेत होऊन जाऊ दे .‌" जोशी साहेबांनी त्यांच्या बायको ला सांगितलं .

" हो आई !! खरंच आज सानू च्या आवडी चे बनव काहीतरी . नाही तरी काही दिवसांनी ती जाणार हॉस्टेल मध्ये रहायला . मग कुठे तिला घरचं मिळणार खायला . कधीतरी घरी येणार . " मंगेश बोलला . 

" अरे पण आपण जिच्यासाठी इतकं बोलतोय त्या मैडम कुठे आहेत .... ?? " तुलिका बोलली . 

" अगं रिझल्ट लागला ना ....तर सगळी गॅंग भेटणार आहे आज . ते त्यांचं नेहमी च असतं . मला सांगून गेली आहे ....." मनीषा ताई पुढे बोलणारच तेवढ्यात . 

" बोंबला !!! इथे तिच्या आवडीच काहीतरी कर म्हणून आपण बोलतोय आणि मैडम गेल्या ,  मित्र मैत्रिणी बरोबर मज्जा करायला . " मंगेश जरा चिडून बोलला . 

" अरे तेच तर सांगतेय ... ती भेटायला गेली आहे पण तिचा फोन आला होता मघाशी . सगळे घरीच येत आहेत त्यांना माझ्या हातची पाव भाजी खायची आहे . तर आता मी तुम्हाला यादी देते तुम्ही जरा मला तेवढं सामान आणून द्या....". मनीषा ताईंनी सांगितलं. 

" बरं .... असं ठरलंय तर ... म्हणजे आज घरात नुसता गोंधळ होणार .. " तुलिका हसत बोलली . 

" आता वानरसेना घरी येतेय म्हटल्यावर दुसरं काय होणार ...." जोशी साहेबांनी हसत उत्तर दिलं , त्या वर सगळे मनसोक्त हसले . 

" बरं मी जरा घर आवरायला घेते .. " तुलिका आई ला बोलली . 

" मनीषा मला यादी दे मी सगळं घेऊन येतो . " जोशी साहेब उठून उभं राहत बोलले . 

" माझं एक काम आहे मी ते करून येतो . " मंगेश इतकं बोलून गाडी ची किल्ली घेऊन बाहेर निघून गेला . 

त्या सोबतच सगळे आपापल्या कामाला निघून गेले , तुलिका आवराआवर करायला , जोशी साहेब यादी च सामान आणायला आणि मनीषा ताई स्वयंपाक घरात . 

थोड्या वेळाने जोशी साहेब बोलल्या प्रमाणे सानिका ची वानरसेना घरी पोहोचली , आणि सुरू झाली घरात नुसती दंगामस्ती .  हसणं , खिदळणं , चिडवाचिडवी , नुसता कल्ला होता घरात . मनीषा ताईंनी मस्त पाव भाजी आणि फ्रुट कस्टर्ड चा बेत केला होता . सगळ्यांना कडकडून भूक लागली होती . सगळे जेवायला बसले , आणि हसत खेळत आनंदी वातावरणात सगळ्यांची जेवणं आटोपली . 

" काकू !!! तुझ्या हातात काय मस्त चव आहे यार ... " रुची मनीषा ताईंना बोलली . 

" खरंय !! पावभाजी खावी तर काकू च्या च हाताची. " कविता बोलली . 

" काकू आता आम्ही सुट्यांमध्ये आलो ना की तू तुझ्या हाताची ती पिवळी बटाट्याची भाजी करतेस ना जी तू सानू ला डब्यात द्यायची , ती आणि पुरी करून खाऊ घालायची बरं का ..." कौशल बोलला . 

" हो , हो नक्की ... तुम्ही या तर , काय पाहिजे ते करून खायला घालेन . आणि हो तेव्हा च तेव्हा बघू आत्ता व्यवस्थित पोटभर जेवा ..." 

आणि सगळे त्या हसत्या खेळत्या  वातावरणात रमून गेले. 

क्रमशः 


(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→(⁠*⁠❛⁠‿⁠❛⁠)⁠→

मित्रांसोबत दिवस कसे जातात कळतंच नाही . त्यात जर मैत्री जुनी असेल तर सोन्याहून पिवळे.....