भाग दोन
अनघा सध्या रिकामीच होती , कॉलेजची फायनल इयरची परीक्षा नुकतीच संपली होती. पेपर्स तर खूप छान गेले होते, पण आता रिझल्ट यायला अजून महिना-दीड महिन्याचा कालावधी बाकी होता. तोपर्यंत घरात बसून करायचं काय? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. रोजचा तोच तोच दिनक्रम आणि तोच कंटाळवाणा वेळेचा प्रवास! शेवटी या रिकाम्या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग करावा आणि मस्त एन्जॉय करावं . म्हणून अनघा आणि तिच्या मित्र मैत्रिणी ने फिरायला जायचं ठरवलं होतं . आज ती अमोल ला भेटून याच संदर्भात बोलणार होती .
सगळ्यांची संमती झाली होती, पण ग्रुपमधला महत्त्वाचा दुवा असलेला अमोल अजून या बेतात सामील झाला नव्हता. तो सध्या त्याच्या करिअर आणि पुढील ट्रेनिंगच्या विचारात खूप व्यस्त होता. म्हणूनच अनघाने आज अमोलला खास भेटायला बोलावलं होतं, जेणेकरून त्याला ट्रिपसाठी राजी करता येईल. अमोल आणि अनघा ठरलेल्या वेळी आणि त्यांच्या नेहमीच्या आवडत्या कॅफेमध्ये भेटतात...
" हां बोल काय बोलायचं आहे तुला ... इतक्या घाईघाईने का बोलावलंस?" " आल्या आल्या अमोल ने सरळ मुद्याला हात घातला .
" काय रे !! एकतर इतक्या दिवसांनी भेटलास आणि आल्या आल्या काय तू सरळ मुद्दा उचललास . " अनघा अमोल वर भडकते .
" अगं !!! पण आपण भेटलोच आहोत ना त्या साठीच . तुला काही तरी सांगायचे किंवा काय विचारायचे होते ना..?? " अमोल बोलला .
" म्हणजे आता काम असल्या शिवाय आपण भेटायचं च नाही का ... ?? " अनघा पुन्हा फणकारत बोलली .
" तू काय डोक्यावर पडलीस का गं . इथे मला टेन्शन आलंय ते ट्रेनिंग च आणि तुझं काही वेगळंच सुरू आहे . " अमोल जरा चिडून बोलला .
" तू काय वेडा आहेस का रे . परीक्षा पास झाल्यावर , ट्रेनिंग साठी call येणारच ना . त्यात इतकं चिरडण्या सारखं काय आहे तेच मला कळत नाहीये . " अनघा बोलली .
" बरं ते जाऊ दे , तू मला आज इथे का बोलावलं ते सांग . " अमोल विषय बदलत बोलला .
" अरे !!! आमची परीक्षा संपली ना तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की आपण कुठेतरी फिरायला जाऊयात . तर कुठे जायचं हा विचार चालू आहे . सगळे म्हणतात बाहेर जाऊ कुठेतरी आणि मी गेले तर तू तिथे असणारच ना . " अनघा ने सांगितले .
" ऐ मी नाही हां सध्या कुठेही जाणार माझ्या ट्रेनिंगसाठी कधीही लेटर येऊ शकतं . मला इथे राहणं गरजेचं आहे . " अमोल ने सांगितल .
" अरे असं काय करतोय , अजून वेळ आहे ना त्याला , आणि आपण काही महिनयाभरा साठी जाणार नाही आहोत फक्त चार पाच दिवस ...बास .. " अनघा ने समजावण्याचा प्रयत्न केला.
" नको यार !! तुम्ही जा ना सगळे . मी कशाला प्रत्येक वेळी ...?? " अमोल बोलला .
" ऐ अम्या !! ते फक्त माझेच नाही तर तुझे सुद्धा मित्र आहेत तू लाईन बदलली म्हणून आपण वेगळे झालो . तर आता भाव नको खाऊस... कळलं ना .
" बरं ठीके . कुठे जायचं , ते तरी ठरवलं आहे का .. ?? " अमोल ने माघार घेतली.
" नाही ना !!! तुझ्या शी बोलून ठरवू , असं ठरलं आहे . " अनघा ने सांगितले.
" म्हणजे .…??? अगं ऐ , सगळे इथे येत आहेत का ... ??" अमोल ने घाबरून विचारलं .
" येत आहोत नाही .... आम्ही आलोय ... " त्यांचा अख्खा ग्रूप तिथे आला . आणि मग त्यांनी एकत्र बसून फायनली पाच दिवस माऊंट अबू ला जायचं ठरवलं.
अनघा आणि तिच्या सगळ्या मित्रांचं सगळं ठरल्या नंतर अमोल ने तिला तिच्या बाबांच्या ऑफिस ला सोडलं आणि तो पुढे निघून गेला . अनघा ऑफिस मधे आली . बाहेर डेस्क वरती डिसुझा आंटी ज्या तिच्या बाबांच्या सेक्रेटरी होत्या त्यांच्या जागी कोणी वेगळीच मुलगी बसली होती . दिसायला एकदम स्मार्ट होती , तिचं वय अनघा च्या वयाच्या जवळपास च होतं . ती अनघाला आणि अनघा तिला ओळखत नव्हती . अनघा जेव्हा तिच्या बाबांच्या केबिनमध्ये जाऊ लागली तेव्हा त्या मुलीने अनघा ला अडवले .
" Excuse me ma'am . तुम्ही असं एकदम आत नाही जाऊ शकत . आधी मला तुम्ही तुमच्या बद्दल ह्या पेपर वर सगळं लिहून द्या , तुम्ही कुठून आलात , काय काम आहे सरां शी आणि तुमचा contact number . ते मी आत पाठवते , जर सरांनी बोलावलं तर तुम्ही आत जाऊ शकता ...." त्या मुलीचे बोलणे ऐकून अनघा ला जरा रागच आला . तिने त्या मुलीला विचारले ...
" Excuse me , तू कोण आहेस आणि इथे , या डेस्क वर काय करतेय , डिसुझा आंटी कुठे आहे . "
" ओह तर तुम्ही डिसुझा मॅम ना भेटायला आला आहात . त्याच काय आहे ना . मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही , पण तरीही तुम्ही इथवर आलाय म्हणून सांगते... डिसुझा मॅम ना बरं नाही आहे , त्या मुळे आता मी सरांची personal assistant म्हणजे ...PA आहे . कळलं ...??? आता जर विचारपूस झाली असेल तर तुम्ही येऊ शकता . " त्या मुलीने मोठ्या एटीट्यूड ने हे सगळं अनघा ला सांगितलं .
" अं.... तुझं नाव काय गं ..." अनघा ने हाताची घडी घालून विचारलं .
" माझं नाव... नंदिनी....पण तुम्हाला माझ्या नावाशी काय घेणं देणं ... " नंदिनी ने आश्चर्याने विचारले .
" नाही म्हणजे ... त्याच काय आहे ना .... मला बाबांना म्हणजे तुझ्या सरांना सांगावं लागेल ना की जिने मला अडवलं तिच नाव काय आहे . मग बाबा बघतील काय करायचं ते . " अनघा रागात त्या मुलीला बघू लागली .
" बाबा....??? म्हणजे... अजित सर ....तुमचे...बाबा...?? " ति मुलगी घाबरली .
" होय !!! आणि आता मी आत जातेय . " अनघा आत जायला निघाली .
तिला आत जाताना. बघून नंदिनी अजून घाबरली आणि अनघा ची वाट अडवत बोलली...
" I am sorry ma'am...मी इथे नवीन आहे आणि तुम्हाला कधी भेटले नाही की बघितलं नाही तर मला कसं कळणार की तुम्ही कोण आहात . मी फक्त माझी ड्युटी करत होते ... Please मला माफ करा . "
अनघा तिचा घाबरलेला चेहरा बघून जरा शांत झाली आणि तिला बोलली .
" बरोबर आहे तुझं ...तू तुझं काम करत होतीस आणि ते तू अगदी व्यवस्थित केलं ...पण एक चुकलं ..." अनघा तिच्यावर नजर रोखून बोलली .
" काय चुकलं माझं ma'am...?? " नंदिनी ने घाबरत विचारलं .
" तु ज्या जागेवर बसली आहेस ना तिथे इतका कमी कॉन्फिडन्स असून नाही चालत . तू मला ओळखत नव्हती आणि तू मला अडवले ते बरोबर होते . पण मी जरा आवाज चढवून सांगितले तर तू लगेच माझ्या गोष्टी वर विश्वास ठेवल , हे बरं नाही ... तुला जरा आत्मविश्वास वाढवायची गरज आहे . "
इतकं बोलून अनघा आत निघून गेली आणि मागे नंदिनी अनघा च्या पाठमोऱ्या आकृती कडे आश्चर्याने बघू लागली .
क्रमशः
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>