“आईपण देऊया एकमेकींना…”
लग्न झाल्यावर मुलगा आईचा पल्लू धरून राहतो?की आईच मुलाला घट्ट धरून ठेवते… आणि मग सून एकटी पडते? स्वतःचा संसार उभा करू शकत नाही?
हा प्रश्न आजचा नाही… पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही एक न बोलली गेलेली लढाई आहे…
त्याबद्दलच थोडंसं…जे मला समजलं, जे मी जगले… त्यातून सांगते आहे.मी काही महान नाही… पण कदाचित एखाद्या स्त्रीला यातून मार्ग सापडेल…
खरंच… पण चूक त्या मुलाची नसते काय?नाही…चूक त्या मुलाची मुळातच नसते, नाही त्या आईची...चूक असते त्या न समजलेल्या स्त्रीची… जी त्या आईच्या आत दडलेली असते…
त्या आईला सगळं कळत असतं…पण तिच्या त्या स्त्रीत्वाचा हिस्सा तिच्या मुलावर दुसऱ्या कुणाचा हक्क सहन करू देत नाही…
कारण तिने स्वतःला कधी समजून घेतलेलं नसतं…स्वतःवर तितकं प्रेम केलेलं नसतं…
मुलगा जन्माला येतो… आणि ती स्वतःलाच त्या मुलात शोधत राहते…तिची स्वतःची ओळख म्हणजे फक्त “तो मुलगा” बनून जाते…
ती हे विसरते…की मुलगा मोठा झालाय…त्याला स्वतः उडायला शिकायचं आहे…एकटं चालायला शिकायचं आहे…
तिला भीती वाटत राहते…कुठे तिच्या मुलाला कुणामुळे त्रास होऊ नये…
आणि याच काळजीतून कधी ती स्वतःच त्याच्या त्रासाचं कारण बनते…हे तिलाही कळत असतं… पण ती ते पाहू इच्छित नाही…
कारण आईपेक्षा जास्त…ती स्वतःच त्याच्या प्रत्येक सुख-दुःखाचा भाग बनून राहू इच्छिते…
मी त्या आईला चुकीचं मानत नाही…कारण माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं…
तो मुलगा खूप नशीबवान आहे…ज्याला इतकं प्रेम करणारी आई मिळाली…
फक्त त्याची पत्नी असल्यामुळे मलाही त्याच्या आईसारखंच व्हावं लागलं…फक्त त्याचीच नाही… तर त्या सासूचीही आई बनावं लागलं…
आणि माझ्या मते… असंच करावं लागतं…तेव्हाच सासू-सून… आणि नवरा-बायको एकत्र आनंदात राहू शकतात…
हीच खरी वास्तविकता असते जीवनाची…
स्त्री म्हणून…आई, मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी…प्रत्येक रूपात स्त्री स्वतःला कुणासाठी ना कुणासाठी अर्पण करतच असते…
सलाम त्या आईला…जिला मुलगा कितीही मोठा झाला तरी तो लहानच वाटतो…
आणि स्त्री म्हणून…आपणच का नाही एका स्त्रीला समजून घ्यायचं?
प्रत्येक स्त्रीने एकदा असं जगून बघावं…हो… आयुष्य निघून जातं यात…पण शेवटी एक शांतता मिळते…एक असा आनंद… ज्यात निसर्गही नेहमी साथ देतो…
आज हे त्या दोन्ही स्त्रियांसाठी…ज्या आई आहेत…आणि ज्या सून म्हणून समजून घेत आहेत…
परिस्थिती आहे तशी जगा…कधी हसा…कधी रडा…भांडा हवं तर…
मान्य आहे… सून म्हणून वेदना आपल्याला होणारच…पण पर्याय नसतो…कारण ओढाताणीमध्ये हातात काहीच उरत नाही…
मग जेव्हा ती आई असते…तेव्हा ती अशी का वागते, हे जर आपण आपल्या आईसारखं समजून घेतलं… तर कदाचित काही गोष्टी हलक्या होतात…
हे सगळं सोपं नसतं…मान्य आहे मला…मीही हे जगले आहे… तेव्हाच सांगते…
फक्त मन मोठं करा…किंवा इतकं लहान बना की आपण त्यांचं बाळ आहोत…नाहीतर इतकं मोठं बना की त्या आपलं बाळ आहेत…
बस… प्रश्न तिथेच सुटतो…
हवं तेवढं खेळून घ्या प्रत्येक नात्यात…मी तर म्हणते… लोळून घ्या…
पण आईला शिव्या कधीच नकोत…कारण आई… ही शेवटी आईच असते…मग ती त्यांची असो किंवा आपली…
फक्त आई…असते. खूप नशीब लागत आईची आई बनण्यासाठी..सासूची आई बनण्यासाठी.सासुंच्या हक्कासाठी तीच्यापाठीशी उभ राहण्यासाठी..सासू नसते करत कधी सूनेसाठी पण आपण सासू सूना हा भेडच संपवून टाकायचा faqt एक स्त्री म्हणून बघायचं...काही कठीण नसत. मुळात रडत बसणे हे मला आवडलेच नाही,कधी आवडणार सुद्धा नाही...हवं तसं जगा.. जेव्हा समजले ना की इथे आपल्याला समोरच्याकडुन प्रेम, सपोर्ट नाही मिळणार. पटकन सावरायचं स्वतः ला..आणि खंबीर होऊन त्या घराची वास्तविकता बघायची,कसे जगत आलेत हे माणसे,मग त्यांच्याच हिशोबाने..स्वतःला न हरवता,त्यांनाही आणि स्वतः लाही सावरत जगायचं.. स्त्री हीच घराचा आधार असते..पण सासू म्हणून त्याचं स्त्रीला त्या घरात हवं ते मिळवता आलेलं नसत, म्हणुन ती त्या दुसऱ्या येणाऱ्या नवीन तिच्याच त्या सुनेला आपलस करावं वाटलं तरी करत नाही..तिलाच कधी कोणी ऐकलेल, समजलेलं नसते...तिला समजून घ्यावं आधी हो सर्वच मान्य आहे मला , आपण सुखी संसार करायला येतो..पण सुखी संसार म्हणजेच एकमेकांना समजून त्यांना त्याच्या अधुरेपणातून पूर्ण कसं बनवता येईल हा प्रयत्न ...त्यांना एकट्यालाच आनंदाने कसं जगता येईल, त्यांना त्यांची स्वतःची किंमत कशी करावी..त्यांनी स्वतःसाठी कसे असायला पाहिजे हे सारं आपण त्यांना अँड स्वतःला सुध्धा शिकवता शिकवता आयुष्य सुखी करायचं असत ह्यालाच तर सुखी संसार म्हणू शकतो...मग तुम्हाला कोण हरवणार....कोणीच नाही.....
चला तर मग…आपण सगळ्याच स्त्रिया… एकमेकींना “आईपण” देऊया…