प्रिय सोना
कधी कधी मला फक्त आमटी भात लोणचे कोशिंबीर खायची लहर यायची मी करू का विचारले की तू तेव्हा हो म्हणायचा पण दुपारी झोप झाली कीपोहे कर म्हणायचामग मी म्हणायचे अरेच्या आता कशी भूक लागली एकदमतेव्हा तुझं वाक्य असायचं...."नुसता भात खाल्ला की पॉट पोकाळ होतय..."तसेच तुला वरण फळे फारशी आवडायची नाहीतत्याला तू अश्वखाद्य म्हणायचाते खाल्ले की तासाभरात माझ्या पेटात खड्डा पडतो म्हणायचा 😃खुप हसू यायचं तुझ्या या वाक्याच..😃कधीतरी एखाद्या रोमँटिक क्षणी.मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले....हे गाणे मो म्हणायचेतू मात्र या गाण्यात मिठीत ऐवजी मुठीत शब्द वापरायचामी म्हणायचे किती अरसिक आहेस रे .एखादे दिवशी अचानक म्हणायचा आज मी फक्त अर्धी पोळी आणि भाजी खाणारकारण विचारलं की उत्तर असायचं.."पोटाचा टोंगु झालाय कमी करायला हवे.."सकाळी पाणी भरताना पहिले पाणी ओतून देणे ही तुझी सवयकारण पहिल्या धारेत माती गाळ असलेले लाल पाणी यायचंतेव्हा तुझं वाक्य असायचं"लई ऱ्याड पाणी येतं पयल वतायला लागतंय"😃कधी कधी एक दोन दिवस ट्रिप असली तरी मी तीन चार कपडे वेगवेगळ्या वेळी घालायचे म्हणून बॅगेत भरायला द्यायचेतुला ते पसंत पडायचं नाही"तिथं काय फॅशन परेड करायची आहे"असे म्हणून तू त्यातले कपडे काढून ठेवायला सांगायचा😊कित्येक वेळा अनेक लोक असे भेटायचे की आपण म्हणजे मी त्यांच्यासाठी बरेच काही करायचेपण त्यांचे वागणे मात्र आपल्यासाठी कोरडेच असायचेहे जाणवले की माझे मन जरा खट्टू व्हायचे..अशा वेळी तू म्हणायचा कशाला गाव गोळा करून त्यांना मदत करीत असतेस"तुम्ही जितक्या कमी लोकांच्या संपर्कात राहाल तितके सुखी राहाल"हे तुझं वाक्य खरेच कोणाच्याही आयुष्याच्या दृष्टीने खरोखर माईलस्टोन होतेतुला कुठेही पसारा करून ठेवलेला आवडतच नव्हताघर कायम नीट नेटके लागत असेअशात कधी कधी मी कपाटातले काहीतरी शोधताना मी त्यातल्या सगळ्याच वस्तू बाहेर काढून कॉट वर पसरून ठेवायचे आणि अशा वेळी जर तुझी एंट्री तिथे झाली तर लगेच तुझा रिमार्क असायचा .."काय हे पसारेश्वर महामंडळ करून ठेवले आहे 😃"मला पाव खूप आवडायचातू फार पाव प्रेमी नव्हतासमी आवडीने पाव खायला लागले की तुझं वाक्य असायचं"आज तुम्ही पाव खाताय हाच पाव उद्या तुम्हाला खाईल"पाव आणला की अगदी नेहेमी हे आपले कायमचे डायलॉग असायचे 😊तेव्हा मी पण हसून म्हणायचे उद्या खाणार ना खाऊ दे खाल्ला तर..कोण काय बोलते कोण काय सांगते याला तू फार कमी महत्त्व द्यायचात्यात काय ऐकायचं अस तुझं मत असायचंयाबाबतीत तू तात्यांचे म्हणजे तुझ्या वडिलांचं उदाहरण द्यायचातुझ्या आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना ऐकू येत नव्हतेतुझ्या जन्मानंतर त्यांची ऐकायची शक्ती कमी झाली होतीआजूबाजूचे लोक बोलायला लागले की त्या कान देत आणि त्यांच्या पतींना म्हणजे तात्यांना विचारत की हे लोक काय बोलताततेंव्हा तात्या म्हणत" तुला ऐकू येत नाही ते बरेच आहे जगात ऐकण्या सारखे काहीच नसते"तुला गाडी चालवताना आजूबाजूचे लोक जे बेपर्वाईने वाहने चालवत असायचे त्याचा तुला फार राग यायचा"अशा लोकांना पोकळ बांबूचे फटके द्यायला हवेत"😃असे तुझे नेहेमीचे वाक्य असायचेकधी कधी व्यवहारात किंवा माझ्या बँकेच्या कामात खूप त्रास व्हायचा कामे थोडी जमायची थोडी बिघडायचीअशा वेळेस माझ्या स्वभावानुसार मला मनस्ताप व्हायचातू मात्र नेहेमी सारखा कूल असायचाअशा वेळी तुझे वाक्य असायचे "फिकर मत..Somthing gain something loss"घरातले काही सदस्य अत्यंत चमत्कारिक वागायचे किती सांगितले तरी अजिबात स्वतः मध्ये सुधारणा करायला तयार नसायचेअशा वेळेस तू नेहेमी म्हणायचा "आता आपल्याला बदलायला लागेलतो बदलणार नाही कारण "ज्याला बदलायचे आहे तो पहिल्यांदाच बदलतो"कोणतेही काम करणे तुला खुप आवडायचंघरकाम असो वा बागकाम ते कितीही जास्त असले तरी तुला त्याचे ओझे वाटायचे नाहीकधी कधी पाहुणे जेवायला आले असताभरपूर भांडी पडायचीआज भरपूर भांडी होती घासायला मी मदत करू का लावायला असे म्हणले असतातू म्हणायचा"ह्या ...शून्य मिनिटाच काम आहे लगेच करून टाकतो "तुझ्या दृष्टीने कोणतेही काम शून्य मिनिटांचे असायचे 😊