पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ५


प्रिय सोना

आपल्या घरी सकाळचा चहा नेहेमी तुच करायचा

तू उठून चहाच्या तयारीला लागायचा मी मी मात्र थोडा  वेळ हात पाय लांब करून अख्ख्या बेड वर पडून रहायचे

चहा तयार झाला तरी मी का उठत नाही बघायला तू  बेडरूम च्या दारात यायचा आणि म्हणायचा "चला वृषाली बेन चहा झालाय

झोपू नको येशू ख्रिस्त सारखे..

उठूस वाटत नाही का"मग मी हसून लगेच उठत असे

आपण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना फक्त रविवारी आपल्याला सुटी असे तेव्हा आपण खास प्लॅन करीत असू

कामातून निवृत्त झालो मग आपल्यासाठी तर सगळेच सुटीचे वार असायचे.तरी sunday आपल्या साठी स्पेशल असायचा

दर Sunday साठी कधी बाहेर जेवायला जाणे, कधी पन्हाळा ट्रिप, ते कधी सिनेमा कधी आणखी कुठ फिरायला असे वेगवेगळे प्लॅन तू करायचा

अशा वेळी तुझे परवली चे वाक्य असायचे.."sunday is the best holiday you know"..😊😊

कुठल्याही कामाची तुला खूप हौस असायची

खाणे झाल्यावर लगेच मनात तू काहीतरी घरातले काम योजलेले असायचे ..

मी म्हणायचे बस निवांत ..

आता कुठे आपल्याला गडबड आहे

तेव्हा तू म्हणायचा"चला कामाला लागूया

बसून कुणाच भले झालेय"😊

आपल्या शेजारचे देशपांडे त्यांच्या कडेच्या चार फूट जागेत पाणी तापवायचे

कुठली तरी ओली वाळकी लाकडे, किडूक मीडूक गोळा करून चुलीत टाकायचे

अशा वेळी खूप धूर व्हायचा घाण वास पण यायचा

आपल्या बाथरूम च्या खिडकीतून ती धूर आपल्या स्वयंपाक घरात यायचा तुला खुप राग यायचा..तू म्हणायचा" या रिकामटेकड्या देशपांडू ने धुनी पेटवली वाटते"😀😀

आपण बाहेर जाताना कधी कधी मी फॅशन म्हणून दोन चार बटा उगाचच कपाळावर आणायची 😀

तशी खर तर तुला फॅशन आवडायची पॅन हे बटा काढलेले तुला नाही रुचायच

माझ्याकडे बघुन तू लगेच म्हणायचा"तुरा नको काढू"सार मागे ते केस "मी चुपचाप बटा आत घेत असे 😀😀

आपले घर दोन मजली होते

आजूबाजूची लोक घरावर मजले चढवून भाड्याने देत असत

मला पण वाटे आणखी एक मजला चढवून भाडेकरू ठेवावा

आपण दोघेच रहात असल्याने आपल्याला सोबत पण होइल

तुला हा प्रस्ताव कधीच मान्य नसे

अशा वेळी तुझे वाक्य असे.."भाड्या नको ठेवायला"ऐकल्यावर हसू आवरत नसे 😀😀

आपल्याकडे खूप वर्ष कुत्रा होता 

शेजारचा एक लहान मुलगा नेहेमी त्याच्याशी खेळायला यायचा 

कालांतराने तो मुलगा मोठा झाला आपल्याकडचा कुत्राही देवाघरी घरी गेला 

नोकरी निमित्त तो शेजारचा मुलगा परगावी गेला

तो घरी आला की नेहेमी आपल्याला भेटायला यायचा

 तो आला की तुझं नेहेमीच वाक्य असायचं "तुमत तुतल तूत हाय"(म्हणजे तुमचं कुत्र कुठे आहे तो लहानपणी बोबडा असल्याने हे वाक्य असे म्हणायचा )ही ऐकल की आपण सगळेच खो खो हसायचो 😀😀

आपल्या शेजाऱ्यानी शेड मारून त्यावर एक पत्रा टाकून दिला होता 

पण त्याची क्वालिटी हलकी असल्याने वारा आला तरी तो हेलकावे खायचा

 पावसाळ्यात पाऊस पडू लागला की ताड ताड असा आवाज यायचा

 रात्री झोपेत असले की समजायचे नाही की हा कसला आवाज आहे ...

आवाजाने जाग आली की शेजारी झोपलेला तू म्हणायचा 

"झोप काही नाही झालं शिंद्याचा पत्रा वाजतोय"झोपेत सुद्धा तुझ्या वाक्याच हसू यायचं 😀

कधी कधी एखाद बाहेरच काम माझ्या आटोक्या पलीकडचे असायचे तू आधी मला सावध केलेले असायचे ...

तरी देखील कड कहार करून मी ते काम करायला बघायचे आणि ते फसायचे अशा वेळी खूप नाराज व्हायला व्हायचे..

मग तू म्हणायचा ""कशाला अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करायला जातेस"😊

बेडरूम मध्ये मी काहीतरी वाचत बसले की मागे टेकायला तुझी उशी घ्यायचे

परत जागेवर ठेवायला मी विसरून जायचे

 तुला दोन उशा घेऊन झोपायची सवय.असायची

झोपायला तू बेडरूम मध्ये आला की लगेच म्हणायचा "तेआमच उसुस द्या की"😀😀

आपला एक मित्र सुरेश कडकडे नावाचा होता

तो खूप तक्रारखोर होता त्याला जगातली कोणतीच गोष्ट पसंत पडत नसे

 प्रत्येक गोष्टीत तो खोट काढत असे आणि येऊन तुला त्या तक्रारी सांगत असे

 तो आपल्या गेट मधून आत आला की लगेच तू म्हणायचा "तो बघ कडकडणारा सुरेश आला"😀