भाग १
आज शहरातील एका मोठ्या Auditorium मधे खूप गडबड चालली होती. मोठ्या प्रमाणात security ठेवण्यात आली होती तर त्याला कारण सुध्दा तसंच होतं . एका नामांकित चैनल ची Award Ceremony ची रात्र होती ती . विविध क्षेत्रातील Award साठी त्या - त्या विभागातल्या कलाकारांना नामांकित करण्यात आले होते. आजची रात्र ठरणार होती की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलावंत ते पारितोषिक मिळवणार .
फिल्म जगात चे सगळे सुप्रसिद्ध , नामवंत कलाकार तिथे आमंत्रित होते तसेच जे कलाकार नामांकित झाले होते ते सुद्धा तिथे उपस्थित होते . सगळ्यांना च उत्सुकता होती जाणून घेण्याची की कुठल्या क्षेत्रात कुठल्या कलाकाराने Award मिळवला आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्टेज वर येतात. तो भव्य सेट , तो देखावा डोळे दिपवून टाकत होता . इतक्या गर्दीत गोंधळात सुध्दा तो शांत बसून होता . त्याला बघुन असं वाटतं होतं की त्याला ह्या सोहळ्यात फारसा रस नाही . चारी कडे फक्त किलबिलाट होता . तिथे स्टेज वर एक एक कलाकार येऊन आपल्या आपल्या कले च सादरीकरण करत होते. प्रत्येक सादरीकरण नंतर टाळ्यांचा कडकडाट होत असे . मधुनच सूत्रसंचालक आपल्या joke वर सगळ्या उपस्थित लोकांना हसवण्याच काम सुध्दा व्यवस्थित करत होते . त्याच नामांकन तीन विभागांत झालं होतं . Best story, Best lyricist , आणि Best Director . तीन विभागांत नामांकित होणारा तो एकमेव व्यक्ती होता पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते . आणि तेवढ्यात पहिल्या विभागाची घोषणा झाली ...
" And The best story award goes to ... Arnav Kulkarni..... सगळी कडे टाळ्यांचा गडगडाट होतो .तो जो शांत बसून होता तो हळूच उठतो आणि हळुवार पावले टाकत स्टेजवर येतो ... त्याच्या हातात Award देण्यात येतो . तो ते घेउन परत जाण्यास वळतो तितक्यात ...
" अर्णव सर... please दोन शब्द ... " सूत्र संचालक
" Thanks to my all viewers . Who appreciated my story ... thanks .. thanks to all. " इतकं बोलून तो परत त्याच्या जागेवर जाऊन बसतो . कार्यक्रम परत पुढे वाढतो . थोड्या वेळाने पुन्हा त्याच्या नावाची announcement होते....
" And the best lyrics award goes to ... Arnav Kulkarni" पुन्हा तो स्टेज कडे जातो Award घेतो आणि ...
" अर्णव सर .. तुम्ही लिहिलेलं हे गाणं आज संपूर्ण महाराष्ट्रात च नव्हे तर भारतात गाजतय ... ह्या गाण्याच्या प्रेरणे बद्दल काही सांगू शकाल का ...??
" अंंम... प्रेरणा ही मनात असते आणि ती मनातच असलेली बरी .." चेहर्यावर एक मोहक हास्य ठेवून इतकं बोलून तो क जातो . आणि पुन्हा आपला तिसरा award घेण्यासाठी परत स्टेज वर येतो .
" हे असले आश्चर्य सिने इतिहासात फार कमी बघायला मिळतात एकाच कलावंता ला तीन वेगवेगळ्या category साठी नामांकन मिळणं आणि award सुध्दा..." एक प्रशंसक .
" खरंच खुप मोठी गोष्ट आहे ही आणि आनंदाची सुद्धा इतक्या कमी वयात इतकं यश मिळवणं ....खरंच कमाल आहे. " प्रशंसक.
" मला अश्या हुशार. Director च्या हाता खाली काम करायला नक्कीच आवडेल.."
" काय सुरेख गाणी लिहितो हा मुलगा . अप्रतिम शब्द असतात अगदी काळज्या ला वार करतात . "
अश्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया चारी बाजूंनी ऐकायला मिळत होत्या पण तो मात्र ह्या सगळ्या पासून अलिप्त कार्यक्रम संपल्यावर आयोजकांचे आभार मानून आपल्या घरी परत निघून गेला होता.
त्याच्या मागे त्याची ती यशोगाथा गाजत असते पण तो मात्र ते award घेऊन त्या खोलीत एका मोठ्या फोटो फ्रेम समोर उभा असतो . ते award त्या फ्रेम च्या समोर ठेवून भरल्या डोळ्यांनी पाहात असतो .
आता प्रश्न पडलाच असेल की शेवटी हा आहे तरी कोण..??
तर हा कथेचा नायक ... अर्णव कुलकर्णी . वय वर्षे ३५ . दिसायला आकर्षक .. उंच . गौरवर्ण... मजबूत आकर्षक बांधा चेहर्यावर सरस्वती च तेज ... पण डोळ्यात मात्र रितेपण...शांत सौम्य ...सागरा सारखा ..
" अर्णव ! बाळा .. परत इथे च ...??? . " ती व्यक्ती
" आई ! ये ना आत ... आज मी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे .ती मला बघत असेल ना आई . " बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आले.
" हो रे बाळा ! ती नक्कीच तुला बघत असेल आणि आज ती खूप आनंदात असेल . पण मला एक सांग ... तू कधी पर्यंत तिच्या आठवणीत झुरत राहणार. आता तरी आपल्या भविष्याचा विचार कर. मला नाही बघवत रे तुला असं . इतकं ऐश्वर्य , नाव , पैसा... सगळं असूनही असा वैराग्यासारखा राहतो . माझं काळीज तुटतं रे तुझ्या साठी. " आई अर्णव च्या डोक्यावर हात फिरवत बोलते .
" काय करू ग आई ...मी तिला नाही विसरू शकत . जितका प्रयत्न करतो विसरण्याचा ती तितकीच खोल , आत , मनात शिरत जाते . मी ज्या profession ला आहे तिथे कमी मुली असतात का माझ्या अवतीभोवती एकापेक्षा एक सुंदर ... पण तिची सर कोणाला च नाही ग . तिचा तो गोड आवाज , निरागस बोलणं खळखळून हसणं. ती हसायची तर असं वाटायचं की जणू जलतरंग वाजतोय. ती बोलायची तर हृदयाची स्पंदने एका लयीत चालायची आणि तुला सांगू ती जेव्हा गायची ना तर ... असं वाटायचं ... असं वाटायचं .. जसं जग थांबून गेलं आहे आणि तिच्या त्या गोड आवाजासाठी आतूर झाले आहे . तूच सांग कसा विसरू तिला. सांग ना आई .. कसा विसरू तिला . " अर्णव आई च्या कुशीत शिरून रडतो .
आपल्या उमद्या व्यक्तीमत्वा च्या मुलाला असं लहान मुला सारखं रडताना बघून त्या माऊलीच्या डोळ्यातले पाणी सुध्दा थांबत नाही. थोड्या वेळ आई त्या भावनांच्या भरती ला ओसरू देते आणि मग थोड्या वेळाने हळुवार त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलते ..
" चल बाळा पुरे झालं आता. तू fresh होऊन ये मी अन्न गरम करते मला माहित आहे तू तिथे काहीच खाल्लं नसणार.मी ताटं घेते तू ये आवरून. "
" होआई ... चालेल ... मला सुद्धा माहित आहे की तू सुद्धा नाही जेवली . तू हो पुढे मी आलोच . अर्णव स्वतः ला सावरत बोलतो .
" बरं ... चल पटकन ये ." आई
" आलोच .." अर्णव.
आई खाली निघून जाते .
" बघ ... आज तर तुझं समाधान नक्कीच झालं असणार मला माहित आहे ... तु मला इथे थांबू नाही देणार आणि मी सुद्धा तुला वचन दिले आहे की मी यशाची प्रत्येक पाहिरी चढेन . आणि तुझं स्वप्न पूर्ण करेन . तुझं स्वप्न आता माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे "
अर्णव इतकं बोलून त्या खोलीतून बाहेर येतो दार बंद करून आपल्या खोलीत निघून जातो . खोलीत आल्यावर तो अंघोळी साठी बाथरूम मध्ये शिरतो शाॅवर खाली उभा राहून आपल्या जिवाची तगमग शांत करण्याचा प्रयत्न करतो . खूप वेळ तसाच उभा राहून नंतर बाहेर येऊन आवरून खाली निघून जातो . आई ने ताटं घेतली असतात . अर्णव येताच दोघे जेवायला बसतात. तो आई ला आज च्या event बद्दल सांगत असतो . जेवण झाल्यावर अर्णव आपल्या खोलीत निघून जातो आणि आई पण मागच सगळं आवरून तिच्या खोलीत निघून झोपायला निघुन जाते.
क्रमशः
🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷