निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 3 manasvi Manu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 3

भाग ३ 

आपण बघितले : नितीन फोन वर शुभेच्छा ऐकून वैतागून जातो. आणि अर्णव ला सुध्दा थोडं बोलतो पण अर्णव ऐकत नाही आणि आपल्या यशाचे श्रेय तिला देतो. 

आता पुढे : अर्णव  studio ला पोहोचतो . तिथे सगळा सेट तयार असतो . तो बारकाईने निरीक्षण करून काही किरकोळ बदल करण्यासाठी आपल्या assistant ला सांगतो आणि जागेवर येऊन बसतो . हीरो तयार असतो पण हिरोईन अजून सेट वर आलेली नसते . वेळ वाया जात असतो आणि अर्णव चा पारा वाढत असतो . तेवढ्यात हिरोईन तिथे पोहोचते. ती अर्णव जवळ जाऊन त्याला wish  करते पण अर्णव लक्ष देत नाही आणि ... 

" चला पटकन सुरुवात करा .. मेकअप दादा यांचा टच अप करा ... मॅडम  spot वर या थोडं इकडे .. डाव्या बाजूला ...हां बास .. अविनाश .. come closer...yes ...yes... okay perfect.. role camera... sound..... action... आणि shooting सुरू होते . Shot व्यवस्थित होतो. सगळे आपापल्या कामाला लागले असताना अर्णव सुद्धा आपल्या assistant सोबत चर्चा करत असतो . 

" Sir !!! जर इथून केलं तर .... म्हणजे हा frame पूर्ण मिळू शकतो ना ... ?? "  Assistant.

" yes ... yes... u r right निकीता ... Good job ... " अर्णव आणि निकिता ( assistant ) बोलत असताना तिथे movie ची heroine येते आणि .... 

" Hii Arnav !!! सकाळ पासून अजिबात बोललाच नाहीस तू ... काय हे किती  shy आहेस रे तू ... जरा तरी आयुष्य जगायला शीक ... 

" look ... shalaka... I m doing very important work here right now....so please

" काय रे ..सतत ...काम ..काम ... कधीतरी निवांत वेळ सुध्दा काढत जा की स्वतः साठी ..." शलाका अर्णव च्या अगदी जवळ जात बोलते . 

" शलाका ... मी जेव्हा कामात असतो ना तेव्हा च निवांत असतो . आणि मला वाटतं आपण सगळे इथे कामासाठी च जमलो आहोत . आणि तुला हे कळायला हवं की कोणाचा तरी भरपूर पैसा लागला आहे आपल्या मागे ..so please concentrate on your job ... 

" अर्णव तुला नाही वाटत .. तू माझी  insult करतोय ... ते सुद्धा .. तुझ्या junior समोर ..." शलाका रागात अर्णव कडे बघते पण त्याचा अर्णव वर काहीच असर होत नाही . 

" बरं ठीके मी जाते पण एक दिवस नक्कीच मी तुला आपलं करेन ..." आणि इतकं बोलून शकला रागात पाय आपटत तिथून निघून जाते . 

" Sir .... बहुतेक ma'am थोड्या चिडल्या वाटतंय" निकीता हा प्रकार बघून थोडी घाबरते .

" U don't worry.... तू लक्ष नको देऊस मी बघेन ते you just focus on your work " अर्णव आपल्या कामात लक्ष घालत बोलतो .

" Okay sir ..." निकीता च्या चेहर्यावर एक गोड smile  येते आणि ती आणि अर्णव त्यांच्या कामाला लागतात. 

Shooting संपल्यावर सगळे एका टेबलावर बसलेले असतात. अर्णव त्याच्या जागेवर बसून त्याचं काम करत असतो . तेवढ्यात नितीन तिथे येतो जिथे सगळे बसले असतात . 

" काय !! कसल्या गप्पा रंगल्या आहेत इथे ..." नितिन 

" नाही !! काही विशेष नाही अर्णव सरां बद्दल बोलणे होतो खरंच त्यांच्या सारखा दूसरा माणूस बघितला नाही मी आज पर्यंत कुठल्याही  director ला इतकं निडर नाही बघितलं . ते जुमानतच नाही कोणाला . कामापुढे ते कोणाचंही ऐकून घेत नाही . आणि नखरे तर अजिबात उचलत नाही कोणाचे . त्यांचं काम अगदी चोख असतं आणि स्वभाव .... वाह क्या बात है... !! सर्वगुणसंपन्न आहेत अर्णव सर . ती कोण भाग्यवान असणार जिला सर पसंत करतील आणि जी त्यांची बायको असेल ." 

नितीन , निकिता च बोलणं ऐकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्रित भाव उमटतात. तो लांब बसलेल्या अर्णव कडे बघतो आणि एक गहिरा श्वास सोडतो . 

" माहित नाही तो दिवस कधी येणार जेव्हा त्याच्या आयुष्यात कोणती मुलगी येईल." नितिन.

" असं काय बोलतोय ! त्यांच्या आयुष्यात नक्कीच येणार कोणीतरी आणि ती खूप भाग्यवान असणार. " निकिता नितीन च्या हातावर हळूच मारत बोलते . नितिन फक्त तिच्या कडे बघून हसतो . 

संध्याकाळी एक press conference असते नितीन तिथे अर्णव ला जबरदस्ती ने घेउन जातो. अर्णव कसं बसं तिथे बसायला हो म्हणतो conference सुरू होते . अर्णव ला वाटत असतं " कधी संपवतो आणि घरी जायला निघतो"  तितक्यात सगळे पत्रकार एक एक करत त्याला प्रश्न  विचारला उभे राहतात आणि त्याला प्रश्न विचारतात. 

" अर्णव सर !!!  तुमच्या यशाच जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण पण हे सगळं तुम्ही कसं करता ..." पत्रकार

" मी , माझं काम पूर्ण इमानदारीने करतो . यश देणं , न देणं ते देवाच्या हातात आहे . " अर्णव.

" सर ... तुमचा देवावर विश्वास आहे ..??? " पत्रकार

" बहुतेक ..." अर्णव.

" सर !!  तुम्ही फारसे कुठे जात येत नाही ..का ..??? जेव्हा की ह्या  industry मधे भेटी गाठींना खूप महत्त्व आहे . " पत्रकार.

" No comments...."

" अर्णव सर ...!!  तुमच्या आयुष्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही . जर तुम्ही सांगितलं तर लोकांना आवडेल जाणून घ्यायला . लोकांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची " पत्रकार.

" माझ्या आयुष्यात जाणून घेण्यासारखं काहीच नाही . " अर्णव.

" सर ..!! असं म्हणतात की प्रत्येक सफल पुरूषाच्या मागे कोणी तरी एक स्त्री असते .. तुमच्या आयुष्यात " ती " कोण आहे . " पत्रकार. 

ह्या प्रश्नावर अर्णव च्या चेहर्यावर चे भाव बदलतात त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं . तो पटकन आपला गॉगल डोळ्यांवर चढवतो आणि.... 

" Sorry ... Ladies and gentleman .. .. it's over now .. I have to go ... thank you so much for coming ... thanks to all .." इतकं बोलून तो घाईत तिथून बाहेर पडतो . तो आपल्या गाडीत बसणार , तितक्यात एक मुलगी धावत - धावत त्याच्या जवळ येते आणि बोलते ... 

" Sir ...sir ..sir .. please wait .. " अर्णव तिच्या कडे बघतो . ती एक 25 - 26 वर्षांची ... मध्यम उंचीची , मध्यम बांध्याची . खूप सुरेख नाही पण आकर्षक चेहर्याची मुलगी असते . ती येऊन अर्णव जवळ थांबते . 

"  Yes ..??  मला वाटतं मी आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत . मला ह्या व्यतिरिक्त अजून काहीच सांगता येणार नाही . आणि मला सध्या वेळ ही नाही ... so .. I am sorry young lady... " आणि तो परत गाडी कडे वळतो . 

" सर !!! Please माझं ऐकून तरी घ्या .. मला तुमच्या life वर पुस्तक लिहायचे आहे . माझ्या career साठी हे खूप महत्त्वाचे ठरेल , कारण आज पर्यंत तुमच्या बद्दल कोणाला च काही माहीत नाही ... Please sir .. " ती मुलगी बोलते .

".  Look miss ... आयुष्य असं रस्त्यावर सांगण्यासारखी गोष्ट नाही .. आणि माझं आयुष्य काही खूप खास पण नाही जसे सगळे असतात तसाच मी सुध्दा आहे . मग तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे . " अर्णव

" सर तुमच्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल , तुमच्या प्रेरणाबद्दल असं बरंच काही आहे जे कोणालाच माहीत नाही ते मला जाणून घ्यायचं आहे " ती मुलगी. 

" हे बघा तुम्ही...अम्... नाव काय म्हणालात ...सॉरी मी विसरलो " अर्णव . 

" नाही सर ...मी अजून सांगितलेच नाही माझे नाव... माझं नाव "  शुभ्रा जोशी "  आहे . " ती मुलगी . 

अचानक अर्णव तिच्याकडे वळतो आणि तिला बघतो त्याच्या डोळ्यातील भाव दिसत नाही कारण गॉगल डोळ्यांवर असतो पण चेहऱ्यावरचे भाव काही वेगळेच असतात ... 

"  अम्.... नाव काय म्हणालात तुम्ही...?? " अर्णव 

" शुभ्रा .... शुभ्रा जोशी ..सर ... " शुभ्रा आपलं नाव परत सांगते . 

" Book writing is not that much easy it's time consuming affair... तुम्हाला कसं जमेल .. म्हणजे... तुम्हाला मला सारख भेटावं लागेल. एका बैठकीत मी माझं सगळं आयुष्य तर नाही सांगू शकत ना.. " अर्णव 

" सर तुम्ही जितके दिवस द्याल मी तुमच्याशी भेटायला तयार आहे फक्त मला तुमच्या आयुष्याबद्दल माहिती करून घ्यायचं आहे ...मला पुस्तक लिहायचे सर तुमच्या आयुष्यावर ...तुम्ही जेव्हा जितका वेळ द्याल मला चालेल. " शुभ्रा खुशीत बोलते . 

" बर ठीक आहे....!!  मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे.... तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये येऊ शकता...??  तुम्ही तिथे बसून आपलं पुस्तक लिहायचं काम करू शकता...??? ." अर्णव 

" मला चालेल सर... मी कुठेही यायला तयार आहे ." शुभ्रा

" बर ठीक आहे ...तुम्ही उद्या ऑफिसला या ...मी सुरुवात करतो तुम्हाला माहिती द्यायची..." अर्णव 

शुभ्रा खुशीत उड्या मारायला सुरुवात करते 

" Yes ....yes ....!!! so sorry sir but I am so excited right now... सर तुम्ही जसं म्हणाल तसं.... मी तुमच्या ऑफिसला रोज यायला तयार आहे सर .....thank you so much..." शुभ्रा

" अम्.... एक मिनिट .....एक मिनिट ....मला असं वाटतं की रोज तुमचं माझ्या ऑफिसला येणं बरोबर नाही तुम्ही एक काम करा नितीन तुम्हाला माझ्या घरचा पत्ता सांगेल तुम्ही घरी या and don't worry....घरात माझी आई ,माझा धाकटा भाऊ आणि आमचे माधव काका असतात , so it is safe to you..नितीन सांगेलच सगळं व्यवस्थित तर तुम्हाला जेव्हापासून वेळ असेल तुम्ही आणि नितीन ठरवून घ्या is it okay to you...??? " अर्णव . 

" Definitely sir ....I am 100% ok with it. you are so kind Sir... " शुभ्रा 

अर्णव तिच्याकडे बघून हसतो आणि गाडीत बसून निघून जातो .गाडी पुढे वाढत असते आणि ती मुलगी आनंदाने रस्त्यावर उड्या मारत असते .मिहीर डोळ्यावरून गॉगल काढतो ,त्याचे डोळे लाल झालेले असतात ,तो गाडीच्या मागच्या सीटवर मागे डोकं टेकवतो आणि....

" अर्णव....मला वचन दे.... माझे स्वप्न तू नक्की पूर्ण करणार मला ... तुला या क्षेत्रात खूप उंच शिखरावर बघायचं आहे मी जिथे कुठे असेल ,...तिथून तुला बघेन ....बोल ना ....बोल ना अर्णव .... करशील ना माझ्यासाठी ....मला मला वचन दे मला वचन दे.. अर्णव मला वचन दे...." .....

" हो ....हो शुभु ....मी तुला वचन देतो ....मी वचन देतो शुभु.... मी नक्की तुझं स्वप्न पूर्ण करीन ....मला सोडून जाऊ नकोस शुभु ‌... मला सोडून जाऊ नकोस...

" शुभ्रा.sssssss " अर्णव ओरडतो ...

क्रमशः

🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷