मुक्ता....??️ - 4 Priyaa द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुक्ता....??️ - 4

         4.मला जगायचे आहे.....🥺








मागील भागात आपण पाहिलं की, 


जबरदस्ती झालेल्या लग्नानंतर मुक्ता खुश तर नव्हतीच पण आता तिच्या सासरच्या लोकांची पैश्याची हाव अजूनच वाढली होती.  माहेरहून पैसे आणण्यासाठी तीला त्रास देणे ...... मारहाण करून ...... दिवस दिवस उपाशी ठेवणे..... बाळंतपणात केलेल्या छळा मुळे ती  कमजोर झाली होती. तिच्या अंगात ताकद अशी उरलीच नव्हती. त्यामूळे ती सतत आजारी असायची..... लोकांना दाखवण्या साठी ते तिला दवाखान्यात न्यायचे पण आजपर्यंत तिने कधी डॉक्टर ला पहिलेच नव्हते.... कसे पाहणार हॉस्पीटल मध्ये समोरच्या दराने जायचे आणि सरळ मागच्या दराने बाहेर पडायचं....... हेचं तर चालले होते आजपर्यंत त्यांचे....🥺


अचानक दारावर थाप पडली...... मुक्ता ने भीतीने थरथरत दार उघडले तेव्हा...........


मम्मीsssss चिकू घाबरून तिच्या कुशीत शिरला.....🥶🥺

तिने स्वतःला सावरत डोळे कोरडे केले.... चिकू sss बाळा काय झालं त्याचे डोळे पुसत तिने त्याला जवळ घेत विचारलं..... भिती वाटली का कशाची सोन्या ❓ हम्म.... काय झाल... सांग ना रे पाल दिसली का कुठे...... चल आपण घालवू तिला..... रात्र झाली ना चल झोपायच नाही का तुला..... तिने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत विचारले.

चिकू ने तिच्याकडे पाहत आपला छोटा छोटा हात कपाळावर मारून घेतला.....

ओ ss प्पो मम्मी सकाल तर आली ना.... मी झोपून उठला आताच तु नाही दिसलीस मना.... आजी होती..... तू मना कुते सोलुन  गेलीस..... त्याच्या बोबड्या बोलात तो तिला बोलला आणि तिला बिलगून बसला.

सकाळ झाली म्हणजे रात्र भर मी इथेच आहे. आणि विकास का रूम मध्ये आले नाहीत ... देवाsss इतक विचीत्र का जाणवतेय 🤔काही तरी वाईट घटणार आहे असं का वाटतेय... का....❓तिने देवाला मनातच साद घातली.


" मम्मी sss मम्मी ssss.......!" चिकू तिच्या हाताला हलवत हाक मारत होता.

"आ ss हा sss काय झालं ?" 

पप्पा आणि आजी मी नाही बोलणार त्यांच्याबल...😒 तो नाराजीत बोलला आणि गाल फुगवून बसला 

तिला जरा हसूच आले... काय झालं चिकू ला ....? का रागवलाय त्याच्यावर....? तिने त्याला प्रेमाने विचारलं.....🙂


पप्पा बोलले की नवीन मम्मी आणायची ती मला खाऊ देनाल..... मला तूप सारा प्याल कलनार..... तो हात लांब करत बोलला. मम्मी ssss त्याने सुर लावला.. मना तु पाहिजे.... तूच मानी मम्मी हाये.... तू प्यार कल ना मना नवी नतो..... मम्मी ssss इतकं बोलुन तो मुक्ता ला बिलगतो.


त्याच ऐकुन मुक्तावर आभाळ कोसळत......" नवीन मम्मी?" हे एकच वाक्य तिच्या डोक्यात घुमत. तिच्या आत प्रश्नच वादळ धुमसत असत. त्या निष्पाप बाळा ला याचा अर्थ नसला कळत तरी ती लहान नसते.

तिचं मन तिला बोलत.... काय नाही केलं या लोकांसाठी , माझे आई वडील कर्जात बुडून गेले . यांच्या मागण्या पूर्ण करता- करता. तरी यांना दुसरे लग्न करायच आहे . माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावली या लोकांनी , माझं शिक्षण, माझे स्वप्न , सगळं तर सोडवलं .तरी यांच्या इच्छा पूर्ण नाहीत . काय पाहिजेsss काय यांना?? त्यांच्या वंशाला दिवा मिळाला .तरी यांना मी नकोय?  कळतच नाहीये ...
काय हवंय त्यांना ?🥹 आणि आता हे , माझ्या  लहान बाळाची सुद्धा कदर नाही केली . त्याच्या देखत हे असल्या विषयावर बोलतात.
" नवीन मम्मी!" ...... छी sss नाही बस झाल आता बास आता अजून नाही. आता प्रश्न माझ्या बाळाचा आहे ! तिने डोळे पुसले यावेळी तिच्यात मुक्ता पेक्षा चिकू ची आई जास्त ठाम होती.💯 




चिकू ssss सोनुल्या ssss इकडे बघ मम्मी दोन मिनिटात आली ह... लगेच येते ....तू 🧸 🪀 हे घे तुझ्या खेळण्यासोबत खेळ हा. तिने त्याला खेळणी दिली आणि बाहेर जाणार इतक्यात 💥💥💥💥


मम्मी ssss त्याने मुक्ता चा पदर पकडून पाणी भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं 🥺🥺🥺

तिने मान हलवत त्याला " काय विचारलं?"


मम्मी तू मना सोलून जाउ नतो ना.... पिज 🥺

त्याच्या शब्दांनी तीच्या काळजात कालवाकालव झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने पटकन खाली झुकत चिकू ला घट्ट  मिठी मारली.  त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याचा किस घेत. त्याच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवत तिने त्यांचे डोळे पुसले . 

"आता तर नाहीच नाही चिकू!" तुझी मम्मी तुला सोडून कुठेच जाणार नाही कधीचं नाही.... आय प्रॉमिस चिकू 🫂🤝


समाजाने आणि तिच्या घरातल्यांनी तोडलेल्या मुक्ता ला आज तिच्या मुलाने पुन्हा जोडले होते.💯 
तिचा आत्मविश्वास आणि जगण्याची इच्छा आता तिला त्या छोट्या डोळ्यात दिसत होती. ते डोळे तिला जगायला सांगत होते. 

"मुक्ता च्या हरलेल्या जगात तिचं बाळ तिची ताकद होती. "

समाज्याच्या बंधनानी तिच्या शिक्षणाच्या स्वप्नाचा शेवट केला. बदनामी च्या भीतीने जबरदस्ती लग्न लावले. हंड्या साठी छळ केला. सासरच्या लोकांनी केलेली मारहाण आणि जनावरा सारखी वागणूक. स्त्री म्हणजे फक्त एक खेळणे आहे कस ही यूज करा.🥺 चुल आणि मूल यात आजही अडकवल गेलं. स्वतंत्र भारतात आजही ती रडतेय..... तिची घुसमट होतीय. पण कोणाला कळत कसं नाही.🤔 


जग आधुनिक झालं आणि तिच्या वरच्या अन्याय ही....... शारीरिक जरी छळ कुणाच्या डोळ्याला दिसत नसला तरी तिचा मानसिक छळ सुरूच आहे....... कधी संपणार हे सारं.....🥺( ह्या विषयावर बोलायला खूप आहे ... नंतर कधी तरी बोलू आता आपली कहाणी पाहुया)


"अंधारात गुडूप झालेल्या तिच्या भविष्यात चिकू साठी ती त्याच सारं जग होती."


आणि हेचं आता मुक्ता ला कळले होते. चिकू ला कडेवर उचलून रूम मधून बाहेर जाणारी मुक्ता आज वेगळीच भासत होती.


ये महारोगी sss तू कशाला आलीस ग बाहेर....जा पडून राहा तूझ्या खोलीत... जा म्हणतेय ना..... अपशकुनी कुठली... तीची सासु ओरडतच मान मोडतच बोलली...🤬


असं कस मी जाऊ सासूबाई (सासूबाई प्रत्येक शब्दावर जोर देत )🤔.....
माझ्या नवऱ्याच्या लग्नात मी नको.... असं कस चालेल. इतकं बोलून ती थाटातच सोफ्यावर बसली...... चिकू तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. तर सासूबाई पुर्ण पने कोमात .....😱🤭


दारात उभा असलेला विकास भूत बघितल्या सारखा थक्क होऊन स्टॅच्यू झाला होता.🙄





कशी वाटली आपली नवी मुक्ता ❓ चिकू ची मम्मी...🤔 सांगायला विसरु नका.....



क्रमशः