मुक्ता....??️ - 6 sabdhpriyaa द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • मनाचा आरसा

    मनाचा आरसा आणि प्रतिमेचा खेळ:एक सखोल चिंतनमाणूस हा सामाजिक प...

  • Mr. Money - भाग 7

    मुखीने मिस्टर मनीच्या साम्राज्यात पाऊल ठेवल्याला आता दोन महि...

  • Ruthless Love - 8

    त्याने तिला झिडकारलं,.. "Dont toch me " तुझी लायकी राहिली ना...

  • तोतया वारसदार - भाग 60

     तोतया वारसदार पात्र रचना बबन                       - सारंग...

  • टापुओं पर पिकनिक - भाग 98

    ९८.पृथ्वी गोल आहे.आणि कोणतीही गोल वस्तू कितीही मोठी असली तरी...

श्रेणी
शेयर करा

मुक्ता....??️ - 6

         6.मला जगायचे आहे.....🥺




आ ssss विकास sss अरे विकास sss.. आ ssss भूत भूत ssss विकू sss इकडे ये लवकर 😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫 विकास ची आई ओरडत धापा टाकतच हॉल मध्ये पळत आल्या. 





तिचा आरडा -ओरडा ऐकुन विकास दचकून जागचा उठला तो बाहेर यायला आणि त्याची आई आत यायला एकच वेळ झाला. आणि जे दोघांची जबरदस्त टक्कर झाली. की तिथं बसलेले पाहुणे मंडळी अवाक होऊन नुसते टकामका बघत होते. 






"आ आई ग मेलो ss!" आई काय अग बघून चाल ना .... नाक फोडलस माझं देवा रे sss 🥺☹️ नाक चोळत रडक्या सुरात विकास बडबडत होता. आणि त्याची आई खुर्ची वर बसली... नाही म्हणता येणार पडलीच होती. 😁 त्या एकटक बाहेर पाहत होत्या.





अग अस काय बाहेर बघतेस काय बोलतोय मी आई sss तो त्यांना  खांद्याला धरून गदागदा हलवत ओरडला.😠😤







भ.... भु... त... भूत..... त्या इतकंच बोलत बाहेर इशारा केला. का ss य...... आ sss विकास ओरडतच सॅल्यूट केल्यासारखा ताट उभा राहिला.🥶






त...त.....तु.......❓





हा मैं....!




🎶 तुमने बुलाया और हम चले आये......😎





गाणे गात 🎶🎶 मोठ्या स्टाईल मध्ये चालत मुक्ता रुबाबात दरवाजा मधून आत आली. आत येऊन थाटातच सोफ्यावर बसली . तिच्या मागून तिचे आई-बाबा ही आत आले . या सगळ्यांना बघून विकास आणि त्याच्या आईला जोरात धक्का बसला होता. दोघेही भूत पाहिल्यासारखे एकमेकांचा हात पकडून भीतीने थरथरत उभे होते .





का घाबरले होते तेवढे ते दोघे ❓🤔मुक्ता ला बघून की आपण  गोळ्या पाजून बेशुद्ध पडलेली  व्यक्ती अचानक शुद्धीत  आलेली .... समोर  उभी राहिलेय ? म्हणून 🤔 की होणारी नवरी स्त्री शक्ती संघटनेचा भाग आहे म्हणून ?😁😁😁😁😁 

मला काही समजेना तुम्हाला कळले असेल तर मला नक्की सांगा हं.......✍️








काय झालं सासूबाई माझे काही चुकल का ... ओ हो..... सॉरी 🙁सॉरी मला माफ करा... प्लीज मला मारू नका 😧अहो तुम्ही तरी सांगा ना आईंना sss 🥺प्लीज मला मारू नका. 






हात जोडते मी तुमच्यापुढे 🙏पुन्हा माझ्याकडून अशी चूक नाही होणार .पण मी काय करू ....तुम्ही ज्या मला दुधातून बेशुद्ध पडण्याच्या गोळ्या दिल्या होत्या ना. ते दूध तर सांडल्यामुळे मी पिलेच नाही.  ते चिकूचा धक्का लागला ना ग्लास ला . सगळा ग्लास फरशीवर सांडला .





तुम्ही पुन्हा मला माराल म्हणून मी भीतीने घाबरून पटपट तो ग्लास खिडकी बाहेर फेकला . अन् फरशी पुसून घेतली . तुम्ही आल्यावर तुमच्या भीतीने ब्लॅंकेट तोंडावर घेऊन झोपले.  मला काय माहिती ते दूध पिऊन मला  बेशुद्ध पडायचं होतं. 🥺🙏





खोटे खोटे रडायचे नाटक करीत कधी विकास तर कधी त्याच्या आईचे पाय धरत भितीने थरथरत रडायचे नाटक करीत मुक्ता एका श्वासात बोलून रिकामी झाली. शाळेतील नाटकात काम केले होते तिने ते तिला ह्या नरकातून बाहेर पडायला मदत करत होते. 





भरभर बोलून ती  घाबरतच तिच्या बाबांच्या पाठीमागे लपली. "बाबा वाचवा मला हे लोक खूप मारतील मला!" हे बोलताना तिच्या डोळ्यातून खरचं पाणी आले. तिने धरलेल्या हातात भीतीची लकेर ही होती आणि विश्वास ही....... बाबा मला वाचवतील 🥺 तिची अवस्था पाहून तिच्या आई बाबाच्या  डोळ्यात टचकन पाणी आले. 







तिचे वर्ल्ड टॉप क्लास नाटक पाहून विकास आणि त्याच्या आई चे डोळे बाहेर आले.👀. त्याला नी त्याच्या आईला झटका लागला 🫨🫨 . ते दोघेही सैरभर झाले . विकासचा बीपी शूट झाला.😱😲😲😲






विकास हळूच त्याच्या आईच्या कानात कुजबुजला "काय खरं नाही आई आता ही बाई आपल्याला जेल मध्ये पाठवूनच दम खाणार!" आपल्याला जिवंत नाही सोडणार ही ....आता संपलं सगळं...... आई sss तो विव्हळत बोलत होता की, त्याची आई महाधीट बाई ती कसली हार मानतेय.





अग मुक्ता सूनबाई ...... अस काय बोलतेस ग अग माझी सुन नाही ग लेक आहेस ग तू..... पोरी जा आराम कर आजारी आहेस ना तु... जा त्या तिला बाबांन  पासुन बाजूला ओढत पाहुण्याकडे  पाहत उगाचच हसत तिला प्रेमाने बोलल्या. 





विकास ss तू काय बघतोस जा तिला रुम मध्ये घेउन जा आराम करायला लाव तीला जा ना..... त्या त्याच्याकडे पाहत डोळे मोठे करत त्याला खुणावत बोलल्या.




"अ... ह.... हो ...हो... चल मुक्ता... आराम कर ह !" 




विकास ने तिच्या मनगटावर आपल्या हाताची पकड मजबूत केली. आणि तिला घेऊन आत जाणार इतक्यात तिच्या सासूबाई चे बोलणे तिच्या कानावर पडले.





अरे पाहुणे मंडळी बसा ना तुम्ही... ते काय आहे सांगितलं होत ना तुम्हाला तिच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय ते... त्या हसत परिस्थीती सांभाळत बोलल्या.





पण पुढे जाणारे मुक्ताचे पाय थबकले ती काही बोलणार इतक्यात...." माझी मुलगी वेडी नाही ssss !" तिचे बाबा ओरडले 😡 आणि पुढे येत विकासच्या हातून तिचा हात सोडवला आणि तीच्या सासु कडे वळत रागाने थरथरत ओरडले.



आणि अचानक 💥💥💥💥💥💥💥💥💥😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱





काय झाले असेल पुढे ❓





क्रमशः 




जाणुन घेण्यासाठी वाचत रहा माझी स्टोरी...."मला जगायचे आहे....🥺" ... आणि हो मला फॉलो करायला विसरू नका..... कॉमेंट्स आणि रेटिंग द्यायला विसरू नका .



कहाणी वाचतात तरी सगळे पण ना कमेंट करतात ना

रेटिंग देतात, असे करत जाऊ नका. तुमचा प्रतिसाद जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत लिखाणाला चालना भेटत नाही.plz 🙏🙏🙏


©. Priyaa pujari 

           #_KiYa _