7.मला जगायचे आहे.....🥺
माझी मुक्ता वेडी नाही वेडे तर तुम्ही आहात... वेडे कसले कसाई आहात तुम्ही कसाई नीच पातळीचे लोक आहात तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या लेकीच काय हाल केलं तूम्ही मरणाच्या दारात उभे केलं तिला आणि आता तिला वेडे ठरवताय. लांब रहा तिच्यापासून नाहीतर गाठ माझ्याशी आहे...... कळलं 😡😡😡😡😡😡😡 ते गरजले.
त्यांचा राग पाहून तीची सासु घाबरली 😟 आणि दोन पाऊले मागे सरकली. पण.... पण.. पण...
म्हणतात ना "विनाश काले विपरीत बुद्धी 👿🤦"
विकास धावतच तिच्या बाबांच्या अंगावर धावून गेला आणि त्याची कॉलर धरून ओरडला😠...... ये म्हाताऱ्या माझ्या आईवर ओरडणार तू ..... आ sss तुझी लायकीतरी आहे का इतकी....🤬(******) तुझ्या आवाज खाली ठेवून बोलायचं. तुझी पोरगी जिवंत ठेवले ना , तेच तुझं नशीब समझ चल माझ्या घरातून निघ बाहेर...... तो त्यांना खेचून बाहेर काढतच होता की,
इतक्यात सटाक ssss साट ss 💥 😱 😱 😱
विकास च्या कानाखाली जाळ निघाला. लागोपाठ तीन चार कानफाडीत बसल्या त्याच्या.
विकास sss त्याची आई ओरडली.
"ये तूझ्या तर खूप माज आलाय तुला तूझ्या तर!" ....तो धावून मुक्ताच्या अंगावर धावून जात होताच की पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली वाजवली तीने......
"मला हात लावायची हिंमत ही करू नकोस..... पाहिली कमजोर मुक्ता नाही मी आत्ता हात लावलास तर तोच हात मोडून हातात देईन तुझ्या !" मुक्ता विजेसारखी कडाडली.⚡⚡⚡😡
तो गालावर हात ठेऊन आश्चर्याने समोर पाहत होता . लालभडक डोळे घेऊन रागाने थरथरत उभी असणारी मुक्ता😡 त्याला दुर्गादेवीचे रूप भासली . तो पहिल्यांदा तिला इतक्या रागात पाहत होता तिचे नवे रूप त्याच्याही नकळत त्याला भीती दाखवून गेले.
तुझ्या आयला म**** शिवी हासडत , माझ्यावर हात उचलला तु तुला जिवंत नाही सोडणार मी तो धावला आणि तिला मागे भिंतीवर दाबत तिचा गळा आवळला..... बोल ss आता.... बोल.... खूप तोंड आलय तुला.... तुझा माज उतरवतो सारा रागात बडबडत तो पुर्ण ताकतीने तिचा गळा दाबत होता.
मुक्ताचे आई बाबा आणि ते पाहुणे त्याला पाठीमागे ओढत होते. पण ती ऐकतच नव्हता. मुक्ताचे डोळे पांढरे होऊ लागले. तिचा श्वास फुलू लागला.
इतक्यात......... आई sss चिकू ची आर्त हाक तिच्या काळजाला भिडली. सारा धीर एकवटुन तिने विकास ला मागे ढकलले.
खो ss खो ss ती खोकतच खाली बसली. तिच्या कपाळावर घाम फुटला होता. श्वास फुलला होता. तिच्या आई ने तिला पाणी पाजले तिचे बाबा विकास ला काही बोलणार इतक्यात 😲😲😲😲😲😲
आई मी केना विलिओ..... बग आता पप्पा तूना कदीच नाय मालू शकणार. आजी पण नाय तलास देणार तुला आत तू पण रोज हसणाल.... आलव आणि माया फेन्द च्या मम्मी सारकी ...... ये माजी मम्मी आता खुश राहणार.... आता तिला गालावर हातावर ते लाक्षस मच्छल नाही चावणार ये माझी मम्मी हॅप्पी होणारं........... तो भोळा भाबडा छोटा जीव आपल्या जगात खुश होता. आपली मम्मी खुश राहणार तो यातच जग जिंकला होता. चिकू मुक्ता ल मिठी मारत खुश होत होता.
पण चिकू चे बोलणे ऐकून, आलेल्या पाहुण्यांनी विकास च्या कानाखाली वाजवली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःला सुशिक्षित म्हणवता .आणि सोन्यासारख्या सुनेवर इतका अत्याचार करता. अरे लाज वाटली पाहिजे .तुम्हाला तुमची जागा इथे नाही .जेलमध्ये आहे आणि आमच्या लेकीचा आयुष्य बरबाद करायला निघालात. तुम्हाला असंच नाही सोडणार मी तुम्हा दोघा मायलेकांना ना चांगलंच जेलमध्ये आयुष्यभर सडायला लावणार मी... मुलीचे वडील रागात बोलले. आणि फोन शोधू लागले .
इतक्यात.... त्याची काही गरज नाही बाबा ss दारातून एक कणखर आणि खंबीर आवाज आला. समोर एक सुंदर अशी मुलगी येऊन थांबली. ती दुसरी तिसरी कोणी नसून ,विकास जिच्याशी लग्न करणार होता , ती तीच होती . मघापासून दारात उभे राहून तिने सारे काही ऐकले होते. सारा प्रकार तिच्या लक्षात आला होता .
विकास कडे रागाने पाहत ती मुक्ता कडे गेली .हीच हिम्मत तू आधी केली असतीस. तर तुझ्यावर इतकी वेळ आलीच नसती . मुली जर स्वतःच खंबीर झाल्या नाहीत, तर त्यांच्यावरच्या अन्यायाला कधी वाचाच फुटणार नाही . अनेक संस्था आहेत त्यांच्या मदतीला. पण तुम्ही बोललाच नाही तर आम्ही तुमची मदत कशी करणार .
"आज तुझी हिम्मत दाखवलीस ना .....ती हिम्मत खूप हिमतीनेच येते " 💯 मला खूप गर्व आहे तुझ्यावर मुक्ता. तू काळजी करू नको मी साथ देईन तुझी. तुझ्यामुळे समाजातील अनेक मुली या अत्याचारापासून वाचतील. सावध होतील. चांगुलपणाचा खेळ खेळणाऱ्या ह्या राक्षसांच्या तावडीतुन वाचतील.
आणि या दोघांना त्यांच्या कर्माची चांगली शिक्षा घडणार आहे. इतकं बोलून ती मुलगी विकास आणि त्याच्या आईकडे वळली ....काय इतकी वर्ष सुनेवर अत्याचार केला ना . आता मी तुमच्यावर अत्याचार करणार तेही अगदी हात धुवून.....चला हाड मोडून घ्यायला तयार व्हा. अशा कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला लावणार आहे ना तुम्हाला. कुठल्या मुलीला त्रास द्यायचा सोडा , तिच्याकडे बघतानाही तुमची नजर ना आपोआप गळून पडेल.
आता मी दाखवते तुम्हाला सुनेला कसा त्रास द्यायचा . सुनेवर अत्याचार कसा करायचा . आणि काय रे तू विकास ...ना खूप माज आहे ना तुला तुझ्या ताकतीचा सगळा माज उतरवणार आहे तुझा. तुला पण कळायला हवं ना स्त्री किती - किती ताकतवान आहे. मार खाणारी जेव्हा मार देते तेव्हा कसं वाटत कळेल तुला. ......ते...... चल येतच असतील आता , तुझ्या सासरचे तुला आदराने न्यायला .
इतक्यात पोलीस गाडीचा सायरन वाजला.🚔🚔🚔🚔 विकास ची आई मुक्ताच्या पाया पडू लागली. पण आता कमजोर पडणारी मुक्ता नव्हतीच.
थोड्या वेळात पोलिसांनी रीतसर कंप्लीट नोंदवून घेतली आणि विकास आणि त्याच्या आईला अटक केली. झालेला प्रकरणाला वाचा फुटली. हे प्रकरण बरंच गाजलं.✍️ . न्यूज चैनल मध्ये , न्यूज पेपर मध्ये सगळीकडे या प्रकाराची चर्चा होऊ लागली . मुक्ताच्या धाडसाचे लोक कौतुक करू लागले. समाजातील किती तरी मुक्ता ना न्याय मिळाला.
आणि एकदा शी मुक्ता त्या नरकातून सुटली . पुढे मुक्ता त्याच नारीशक्ती संघटनेत शामिल झाली . आणि अशा कितीतरी 'मुक्तां' ची ताकद बनली .
खरंच ही मुंगी आकाशी उंच उडली होती.🕊️🕊️🕊️🕊️ एक कडकडणारी वीज होऊन ......⚡⚡अखेर मुक्ता स्वतंत्र झाली..... तिच्या खऱ्या अस्तित्वाला मिळाली मुक्ता आज खऱ्या अर्थाने मुक्ता झाली.......😎⚡💯
एक आई जिंकली...... 🥰💯💯💯💯💯💯
एक स्त्री स्वाभिमान जिंकली.......💯💯💯💯💯
कशी वाटली मुक्ता ची कहाणी सांगायला विसरु नका . मुक्ताच्या हिमती बाबत आणि प्रसंगावधानते बाबत दोन शब्द होऊन जाऊ दे....... सांगायला विसरू नका मुक्ता ज्या पद्धतीने त्यांच्याशी लढली . तिने त्यांच्या शब्दांशी खेळत पुरावा मिळवला आणि स्वतःची सुटका करून घेतली. ही मुक्ता कशी वाटली मला नक्की सांगा......✍️ स्टिकर द्यायला 🥰, कॉमेंट्स 💭आणि रेटिं
ग ✴️✴️✴️✴️✴️द्यायला विसरू नका . आणि लाईक👍👍 करा ....अशाच नवनवीन कथेसाठी मला फॉलो करा......
bye-bye..
.....समाप्त.......