फक्त तुझ्याच साठी - 2 Reshma द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फक्त तुझ्याच साठी - 2

❤️फक्त तुझ्याचसाठी....❤️


रात्र...

मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर...

एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं.

आकाशात काळे ढग जमा झाले होते.

पावसाचे छोटे छोटे थेंब काळ्या रस्त्यावर पडत होते.

त्या शांततेला भेदत एक काळी आलिशान कार वेगाने पुढे जात होती.

कारच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण लॅपटॉपवर काही फाईल्स पाहत होता.

चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता...

डोळ्यांत तीक्ष्ण नजर...

आणि हातात ब्लॅक कॉफीचा कप.

आर्यवीर खुराणा.

खुराणा ग्रुपचा मालक.

ज्याच्या नावाने शेअर मार्केटमध्ये हालचाल व्हायची.

ज्याच्यासोबत व्यवसाय करणे म्हणजे अनेकांसाठी स्वप्न होतं...

आणि ज्याच्याशी शत्रुत्व घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं.

"Sir..."

समोर बसलेल्या बॉडीगार्डने अचानक आरशातून मागे पाहिलं.

"Something feels wrong."

आर्यवीरने लॅपटॉप बंद केला नाही.

फक्त शांत आवाजात विचारलं,

"Wrong?"

"Yes sir... आपला रस्ता बदललेला आहे...
आणि मागची गाडी गेल्या दहा मिनिटांपासून आपला पाठलाग करत आहे."

आर्यवीरने खिडकीबाहेर पाहिलं.

पावसाच्या थेंबांमधून त्याची नजर अजून तीक्ष्ण झाली.

पण चेहऱ्यावर भीती नव्हती.

फक्त एक हलकं स्मित होतं...

'आपले बॉडी गार्ड ही खूप माघे राहिलेत... 

"हम्म "..
तो निर्वीकार पणे म्हणाला...


बॉडीगार्ड आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला.

"Sir?"

आर्यवीरने फाईल बंद केली...

'डोन्ट वरी आय हॅन्डल ईट '..
त्यांच्या गाडीचा कोणी तरी पाठलाग करत आहे म्हणजे त्यांच्या जीवावर बेतल आहे... तरी तो शांत होता...


आर्यवीरच्या त्या एका शब्दाने बॉडीगार्ड क्षणभर शांत झाला.

त्याला माहीत होतं...

ज्या माणसासमोर जगातील मोठमोठे लोक बोलताना विचार करतात, त्या माणसाला आज कुणीतरी घेरण्याचा प्रयत्न करत होतं.म्हणजे ही साधी गोष्ट न्हवती... तरी ही तो माणुस शांत होता...
कारण भय हा शब्द त्याच्या डिक्शनरीत न्हवता...

कार वेगाने पुढे जात होती.

बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता.

रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती.

अचानक...

समोर एक काळी गाडी आडवी येऊन थांबली.

ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला.

कार काही अंतरावर घसरत थांबली.

क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.

आर्यवीरने खिडकीतून बाहेर पाहिलं.

काळे कपडे घातलेले काही लोक हळूहळू त्यांच्या कारभोवती जमा झाले.

बॉडीगार्ड लगेच सावध झाला.

"Sir, stay inside."

पण आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं.

त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती.

"कोण आहेत हे?"

बॉडीगार्डने आजूबाजूला नजर फिरवली.

"माहित नाही सर... पण हे साधे गुंड दिसत नाहीत."
त्यांच्या हातातील आधुनिक हत्यारे पाहून ड्रायव्हर म्हणाला...

तशी कीबोर्ड झरjhr फिरणारी त्याची बोट थोडी हळू झालीत कॉफीचा कप खाली ठेवला.

"Interesting..."

त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं.

जणू हा धोका नसून एखादा खेळ होता.


---

बाहेरून एक आवाज आला.

"ए बाहेर निघ चल "..

तो आवाज रस्त्यावर घुमला.

"आज तुझं साम्राज्य संपणार आहे."

कारच्या आत बसलेला आर्यवीर शांतपणे ऐकत होता...

'जर दम असेल तर बाहेर निघ नाहीतर ya गाडी सकट उडवून देवू तुला '...
त्या गुंडाच्या बोलण्यावर बाकीचे फिदि फीदि हसले...

"बाहेर येतोस की नाही..."

"शेवटची धमकी देत त्यांनी काचेवर काहीतरी लावले ऐक असे ग्रेनाईट ज्याने त्या बुलट फ्रुफ कारच्या ही चिथड्या चिथड्या उडणार होत्या...

"आत समाधी घ्यायची नसेल तर बाहेर "..

या वेळेस दरवाजा उघडला गेला...


बॉडीगार्ड दचकला.

"Sir..तूम्ही नकात बाहेर जाऊ ."
त्याच्या अगोदर त्याचा ड्रायव्हर बाहेर आला..

"कोण आहात तूम्ही आणी तुम्हाला काय हवंय?"..
त्याने प्रश्न केला..


"आम्हांला आत बसलेल्या माणसांची डेड बॉडी हवी आहे..
म्हणजे आत मध्ये जी जिवंत बॉडी आहे नां आम्हाला तिला डेड बॉडी करायची आहे..

'त्या फालतू जोक वर त्याची माणसे पुन्हा फिदी फिदी हसलीत..

"हे पहा तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेत आहात... तुम्हाला जितके पैसें भेटले आहेत त्याच्या दुप्पट आम्ही देवु..

"ए आपण व्यवसायात बेईमानी करत नाही.. गपगुमान तुज्या बॉसला बाहेर यायला सांग नाहीतर... बोलता बोलता.. त्याने सरळ गोळी झाडली जी ड्रायव्हरच्यां खांद्याला लागली..

आपला निशाणा चुकला नाही... आपण तो चुकवलाय.. आत्ता गप गुमान त्याला उतरायला सांगतो की घालू छातीच्या आरपार...

"ते ऐकून आत बसलेल्या त्याच्या कपाळावर 
आठ्यांच जाळ पसरल... 
आणी जेव्हा ते पसरत असायच कोणाची नां कोणाची शामत आलेली असायची...

गाडीचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला सोबत ऐक पाय दरवाजा बाहेर आला त्याच्यापायात चक चक करणारा बुट होता...


तो शांत पणे खाली उतरला.

पावसाचे थेंब त्याच्या सूटवर पडत होते.

समोर उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहत राहिले.

कारण त्यांना अपेक्षा होती...

एक घाबरलेला उद्योगपती.भेदरून त्यांच्या कडे जीवनाची भिक मागेल...

पण त्यांना माहिती न्हवते त्यांच्या समोर उभ होत....

एक शांत वादळ.

त्याने समोरच्या माणसाकडे पाहिलं.

"तुला खरंच वाटतं..."

तो थांबला.

"...की मला घाबरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे?"

समोरचा माणूस काही बोलणार इतक्यात...

आर्यवीरची नजर त्याच्यावर स्थिर झाली.