अनुबंध बंधनाचे. - भाग 58 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 58

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५८ )
त्या दोघांचा हा प्रवास असाच पुढे चालु होता. अंजली सांगेल त्याप्रमाणे प्रेम गाडी चालवत होता. जवळपास तासभर हा अविस्मरणीय प्रवास करून ती त्याला वांद्र्याच्या त्याच हॉटेल जवळ घेऊन येते, त्या हॉटेलच्या पार्किंग मधे गाडी पार्क करून ते दोघे बाईक वरून उतरतात. हे तेच हॉटेल होते जिथे काही वर्षापूर्वी तिने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. 
ते हॉटेल पाहून प्रेम थोडासा विचारात पडतो, त्याला असं पाहून अंजली बोलते...
अंजली : प्रेम...! काय झालं...? नको जायला का आत...? 
प्रेम : असं काही नाही... चल...!
अंजली : प्रेम...! नक्की ना...? तुझी इच्छा नसेल तर, कॅन्सल करू, आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी, तुला आवडेल तिथे. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला फक्त हा दिवस तुझ्या सहवासात घालवायचा आहे बस्.... बाकी तुझी मर्जी, तु कुठेही घेऊन चल, मी यायला तयार आहे. मी फक्त आपल्याला थोडा एकांत मिळावा म्हणुन हा विचार केला होता. 
प्रेम : ठिक आहे ना...! तसंही आता बाहेर ऊन वाढत चाललं आहे, अशामधे कुठे बाहेर फिरत बसायचं, त्यापेक्षा हे ठिक आहे. 
अंजली : थँक्यु सो मच...! 
* असं बोलुन ती त्याचा हात पकडून त्याच्या गालावर अलगद किस करून तिथून त्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटर कडे जाते. त्यांच्याशी काही वेळ बोलुन ती प्रेमला तिकडे यायचा इशारा करते.
प्रेम तिथे जातो, तिथून ते दोघे हॉटेलच्या त्याच रूम मधे येतात ज्या रूम मधे प्रेमचा वाढदिवस साजरा केला होता. 
डोअर ओपन करून ते दोघे आत येतात. अंजली डोअर लॉक करते आणि प्रेमचे दोन्ही हात पकडुन त्याला बाजुच्या बेडवर बसवते. ती तिथेच त्याच्या समोर त्याच्याकडे पहात उभी असते. तिला असं पाहून प्रेम बोलतो...
प्रेम : काय झालं...! अशी का बघतेय...?
अंजली : काही नाही....! तुला या डोळ्यात मन भरून साठवुन ठेवण्याचा प्रयत्न करतेय. माहित नाही पुढील आयुष्यात काय लिहून ठेवले आहे.
प्रेम : अच्छा....! मग थांब जरा, थोडा फ्रेश होऊन येतो....😊
* असं बोलुन तो बेडवरील टॉवेल घेऊन बाथरूम मधे निघुन जातो. अंजली ती रूम न्याहाळत होती. तिला त्यांची या रूम मधील आधीची भेट आठवत होती. ते आठवून ती मनातच हसत होती. तेवढ्यात प्रेम बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर येतो आणि तिला बोलतो...
प्रेम : जा तु पण जरा फ्रेश हो, एवढा प्रवास करून आलोय आपण... तसं तुझ्याकडे पाहून तुला फ्रेश व्हायची गरज तर वाटत नाही. पण तरीही...
अंजली : बरं ओके....! मी आलेच,
 * असं बोलुन ती त्याच्या हातातील टॉवेल घेते आणि पटकन त्याच्या गालावर किस करून बाथरूम कडे जायला निघते पण प्रेम ने त्या टॉवेल चे दुसरे टोक घट्ट धरून ठेवले होते. 
ती मागे वळून त्याच्याकडे बघते...
प्रेम तिच्याकडे पहात आपल्या हातातील टॉवेल हळू हळू खेचुन घेत होता तशी अंजली त्या टॉवेल चे दुसरे टोक पकडुन त्याच्याजवळ येत होती. ती समोर येताच तो हातातील टॉवेल मागे बेडवर फेकून देतो आणि अंजलीला आपल्या मिठीत घेऊन तिच्या नजरेत नजर घालुन तिच्याकडे एकटक पहात असतो. अंजली पण त्यांच्या डोळ्यात कधीची हरवून गेली होती. तिने आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले होते. खुप वेळ दोघे तसेच उभे होते. एकमेकांच्या नजरेत नजर घालुन... दोघांपैकी कोणीही आपली पापणी पण मिटत नव्हते. अखेरीस का कोण जाणे पण अचानक अंजलीचे दोन्ही डोळे पाण्यानी भरले आणि जशा तिने पापण्या बंद केल्या तसे ते डोळ्यातील पाणी तिच्या गालावरून खाली ओघळत येऊ लागले. तिने लगेच आपले डोके प्रेमच्या छातीवर टेकवले आणि ते अश्रु पुसण्याचा प्रयत्न केला. प्रेमने आपल्या मिठीचे हात सोडवत तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिचा चेहरा वरती करून आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी तिचे डोळे पुसले आणि तिला बोलला...
प्रेम : काय झालं....?
अंजली : काही नाही...!
प्रेम : मग हे काय आहे...!
अंजली : ते....! ते तुला नाही कळणार...! 
प्रेम : अच्छा...! पण अशा वेळी डोळ्यात पाणी का बरं....?
अंजली : बोलले ना...! जाऊदे, तुला खरच नाही कळणार ते...!
प्रेम : बरं...! मग तु मला कळेल असं सांग....!
अंजली : प्रेम....! कसं सांगु तुला....!
प्रेम : तोंडानेच सांग....!😊
अंजली : पागल...!😊
प्रेम : बरं... मी पागल...! आता सांग...?
अंजली : काय सांगू.....? 😊
प्रेम : हेच...! जे मला कळत नाही ते...!
अंजली : खरच...! वेडा आहेस तु...! 😊
प्रेम : बरं...! मी आहे वेडा...! आता सांग बरं या वेड्याला....?
अंजली : अरे यार...! एवढं काही नाही, ते तर आनंदाश्रु होते. खुप दिवस आतमधेच साठून होते ते, आज बाहेर पडले. 
प्रेम : अच्छा...! असं आहे का...? मग आता कसं वाटतंय....?😊
अंजली : अगदी रिलॅक्स, आणि खुप छान वाटतंय....!😊
प्रेम : अच्छा....!
अंजली : बरं आता जाऊ फ्रेश व्हायला...?
प्रेम : एवढा ग्लो करतोय चेहरा...! तशी गरज तर वाटत नाही, उगाच हा ग्लो निघुन जायचा....!
अंजली : तो फक्त तुझ्यामुळे आला आहे, निदान आज तरी नाही जाणार...!😊
प्रेम : हो का....! 😊
* अंजली त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवून बेडवरील टॉवेल घेऊन बाथरूम मधे फ्रेश व्हायला जाते.
तेवढ्यात डोअर बेल वाजते...
प्रेम डोअर ओपन करतो. हॉटेलचा वेटर एक ट्रॉली मधुन ब्रेकफास्ट आणि ज्युस घेऊन आला होता. तो वेटर ती ट्रॉली आतमधे सोडुन निघुन जातो. 
तोपर्यंत अंजली फ्रेश होऊन बाहेर आली होती. 
तिने लगेच त्या ट्रॉली मधील बाऊलचे झाकण उघडले आणि प्रेमला बोलली...
अंजली : काय आहे हे, ओळख बघू...?
* प्रेम त्या बाऊल मधील एक पीस चमच्याने उचलुन बघतो, पण ते काय आहे हे त्याला काही समजत नव्हते. 
प्रेम : काही कळत नाही हे काय आहे ते, काय मागवलं आहेस...?
अंजली : एक मिनिट थांब...!
* असं बोलुन त्याला त्यामधील एक घास चमच्याने भरवते. प्रेम तो घास खातो, तरीही प्रेमला ते नक्की काय आहे ते कळत नव्हतं. 
अंजली : कशी आहे टेस्ट....?
प्रेम : टेस्ट तर छान आहे पण, थोडं सँडविच सारखे वाटते, पण हे नक्की आहे तरी काय...?
अंजली : ते जाऊदे, तुला आवडलं का ते आधी सांग, का दुसरं काही मागवायचं....?
प्रेम : नको...! हे जे आहे ते छानच आहे, बघ तू खाऊन...!
* असं बोलुन त्याने पण एक पीस काढून तिला भरवला. तिनेही तो घास आनंदाने खाल्ला...!
आज खुप दिवसांनी प्रेम ने त्याच्या हातून भरवलं होतं. तो घास खाताना ती थोडीशी भाऊक झाली होती. 
ते दोघे सोबत ब्रेकफास्ट करत होते. अंजलीने ट्रॉली मधुन ज्युसचा एक ग्लास उचलुन त्याला दिला, आणि एक स्वतः घेतला. चिअर्स करत दोघेही एकमेकांकडे पहात होते. 
त्या वेळेत प्रेम मधे मधे ज्युस पित होता पण अंजली मात्र तो ग्लास हातातच पकडून त्याच्याकडे एकटक पहात होती. प्रेमने आपला ग्लास संपवुन ट्रॉली मधे ठेवला, आणि तिच्या हातातील ग्लास घेत तिला बोलला...
प्रेम : काय झालं नाही आवडला का ज्युस....? 
अंजली : आवडला ना...! छान आहे...! 
प्रेम : मग पिणार कोण...? 
अंजली : मी...!😊
* प्रेम तो ज्यूसचा ग्लासमधील एक सिप पिऊन तिला देतो...
प्रेम : घे...! संपव पटकन...!
अंजली : आता अजुन गोड लागेल तो...!😊
* असं बोलुन ती ग्लासमधील सर्व ज्युस पिऊन टाकते. तो रिकामा ग्लास ट्रॉली मधे ठेऊन ती हात धुवायला बेसिन कडे जाते. हात धुऊन ती समोरील आरशात बघते. प्रेम तिच्या मागे उभा असतो. तो अजुन तिच्या जवळ येऊन तिला पाठीमागून मिठी मारतो. त्याच्या अशा जवळ येण्याने ती अगदी शहारून गेली होती. ती स्वतःला प्रेमसोबत आरशात पहात होती. 
ती प्रेमच्या मिठीत आहे हे तिला स्वप्नवत वाटत होते. 
प्रेमने तिच्या कानात हळूच फुंकर मारली आणि बोलला....
प्रेम : काय झालं....?
* अंजली त्याच्या गालावर ठेवत बोलते...
अंजली : प्रेम...! मला अजुनही विश्वास बसत नाही की, हे सर्व खरं आहे.
* ती असं बोलल्यावर प्रेम हळुच तिच्या कानाला अलगद चावा घेतो आणि तिला बोलतो...
प्रेम : आता खरं वाटलं...?
* अंजली मागे वळून त्याच्या मानेभोवती हात घालून त्याच्याकडे पहात बोलते...
अंजली : हो.....! तुझ्यासोबतचे हे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहेत. आणि ते मला असेच जपुन ठेवायचे आहेत....!😊
* असं बोलुन ती त्याच्या ओठांवर ओठ ठेवते....
पुढील काही वेळ ते दोघे एकमेकात विलीन होऊन जातात. 
दुपारचे दोन वाजले होते...
अंजली : प्रेम...! तुला भुक लागली असेल ना, खायला काय मागवायचे...?
प्रेम : का...? तुला नाही का भुक लागली...?
अंजली : माझं तर पोट भरलं...!😊
प्रेम : अच्छा....! असंही पोट भरतं का...?
अंजली : हो...! माझं तरी भरतं, पण तु काय खाणार आहेस ते सांग, मी ऑर्डर करते. 
प्रेम : मागव तुला आवडेल ते...!
अंजली : तु सांग ना...! तुला काय खायची इच्छा आहे. 
प्रेम : व्हेज बिर्याणी मागवूयात...?
अंजली : चालेल...! मी ऑर्डर करते.
* तिने कॉल करून लंच ऑर्डर केला.
दोघेही फ्रेश झाले. थोड्याच वेळात वेटर बिर्याणी घेऊन आला. 
दोघे एकमेकांना भरवत ती बिर्याणी खात होते. मधेच अंजली बोलते...
अंजली : तु चीटिंग करतोय, एक तर स्वतः छोटा घास घेतोय आणि मला मोठा घास भरवतोय.
प्रेम : अरे असं काही नाही...! सेम सेम तर आहे...!
अंजली : नाही...! तु मलाच जास्त भरवली आहेस. 
प्रेम : खा...गं....! तिकडे गेल्यावर अशी बिर्याणी मिळेल की नाही माहित नाही. 
* त्याच्या अशा बोलण्यावर ती एकदम शांत होते, आणि ऊठुन बेसिन कडे जाते. प्रेम पण तिच्या मागे जातो. ती आरशासमोर उभी होती. प्रेम तिथे जाऊन तिला बोलतो...
प्रेम : सॉरी....! मी हे बोलायला नको होतं....!
अंजली : इट्स ओके...! 
* तो तिला मागे वळवून बोलतो...
प्रेम : पण काहीही बोल, टेस्टी होती बिर्याणी...! खुप दिवसांनी अशी टेस्टी बिर्याणी खाल्ली हो ना...!
अंजली : हो ना...! मग आपण पुन्हा येऊ कधीतरी... चालेल तुला...?
* प्रेम काहीच बोलत नाही... तो तिथून बेडवर जाऊन बसतो. अंजली त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याचा चेहरा आपल्या हाताने स्वतःकडे वळवून त्याला बोलते.
अंजली : प्रेम...! एक गोष्ट बोलू...!
प्रेम : बोल...!
अंजली : प्रेम...! कदाचित मी हे जे करत आहे ते चुकीचे असेल, म्हणजे तसं चुकीचं आहेच, आणि माझ्या सुखासाठी मी तुला हे करायला भाग पाडतेय, या गोष्टीचे मला वाईट पण वाटत आहे. मला माहित आहे, हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध आहे, तरीही तु आज हे सुख मला दिलं आहेस. त्याबद्दल खुप खुप थॅन्क्स....! आणि मला आत्ता तरी नाही विचार येत की, काय चुक आणि काय बरोबर याचा...! कारण मला माहित नाही की, पुढे आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे, म्हणुन मी हा हट्ट केला तुझ्याकडे... यात जर मी चुकीची आहे असं तुला वाटत असेल तर, मला माफ कर. 🙏🏻
 * प्रेम फक्त ती बोलत होती ते ऐकत होता. बोलता बोलता तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. हे पाहून त्याने काही न बोलता मिठीत घेतले. थोडा वेळ ते दोघे तसेच काही न बोलता एकमेकांच्या मिठीत होते. 
काही वेळाने प्रेम तिला बाजूला करून तिथून उठतो. टेबलवरील पाण्याची बॉटल घेऊन थोडे पाणी पितो आणि तिला ती बॉटल देतो. अंजली मागे सरकुन बेडला टेकुन बसते आणि थोडे पाणी पिऊन ती बॉटल त्याला देते. प्रेम ती बॉटल टेबल वर ठेऊन तिच्या जवळ येतो. तिच्या मांडीवर डोके ठेवून तो तिच्याकडे पहात असतो. अंजली त्याच्या केसातून हात फिरवत त्याला बोलते. 
अंजली : प्रेम....! एक विचारू....!
प्रेम : बोला...!
अंजली : तु रागावणार तर नाहीस ना...?
प्रेम : असं काय बोलणार आहात...?
अंजली : तु आधी बोल रागावणार नाही म्हणून...!
प्रेम : बरं...! नाही रागवत... बोल.
अंजली : बरं ऐक...! मी तिकडे गेल्यावर आपण कॉन्टॅक्ट मधे असु की नाही.
प्रेम : नाही....!
अंजली : अरे...! थोडा वेळ पण घेत नाही विचार करायला, पटकन नाही बोललास, असं कोण करतं....?
प्रेम : मी.....!
अंजली : बरं....! म्हणजे हे आधीच ठरवलं आहे.
प्रेम : हो... आपण मिळुन...!
अंजली : अच्छा....! हे बरं कधी...?
प्रेम : आत्ताच....!
अंजली : काय....!
प्रेम : आता मी काय बोलतोय ते नीट ऐक, हे तुझ्या आयुष्यातील एक नवीन पर्व आहे, त्यामधे यशस्वी व्हायचं असेल तर मागचे सर्व विसरायला हवं.
अंजली : असं कसं सर्व विसरायचं...? असं करता येतं का....?
प्रेम : मनापासून ठरवलं की, सर्व काही करता येतं...!
अंजली : अच्छा...! तु ठरवलं आहेस का मग...?
प्रेम : हो...! कधीच....!
अंजली : मग आज कसा आलास मला भेटायला....?
प्रेम : ते....! ते मी ठरवलं होतं म्हणुन, कारण तुझ्या या नवीन आयुष्याची सुरुवात चांगली व्हावी म्हणुन, बाकी काही नाही.
अंजली : प्रेम...! ठिक आहे. तु जे काही ठरवलं आहेस ते बरोबर असेल. पण माझी एक रिक्वेस्ट आहे ऐकशील.
प्रेम : बोल...! 
अंजली : तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण कॉन्टॅक्ट मधे राहणार नाही आहोत, ते मला मान्य आहे. पण माझी अशी इच्छा आहे की, निदान वर्षातुन एकदा जेव्हा मी ईकडे येईन तेव्हा तरी तु मला भेटशील ना...? 
प्रेम : ठिक आहे, ते बघु तेव्हा...!
अंजली : नाही...! मला आत्ताच सांग...!
प्रेम : बरं ओके, पण तेव्हा फक्त मित्र म्हणुन भेटू , तेही फक्त एकदाच...!
अंजली : ठिक आहे...! चालेल मला...! पण नक्की भेटणार ना...? प्रॉमिस....!😊 
प्रेम : हो....!
अंजली : नुसतं हो नाही, आधी प्रॉमिस कर...!
प्रेम : बरं...! प्रॉमिस...! 
* त्याचा होकार मिळाल्यावर ती आनंदाने त्याच्या गालावर किस करत त्याला बोलते...
अंजली : थँक्यु सो मच....! मला ती एक भेट ही पुरेशी आहे...!
प्रेम : पण तु तिकडे का चालली आहेस त्यावर फोकस कर...!
अंजली : हो...! नक्की करेन...! प्रॉमिस. 
* ती असं बोलल्यावर प्रेम ऊठुन तिच्या बाजुला बेडला टेकुन बसतो. दोघे काही वेळ गप्पा मारतात आणि मग पुढील वेळ ते दोघे एकमेकात विलीन होऊन जातात.
संध्याकाळचे पाच वाजले होते. अंजलीने प्रेमला घट्ट मिठीत कैद केलं होतं. प्रेम तिला ऊठुन आवरायला सांगतो. 
अंजली : थांब ना थोडा वेळ...! 
प्रेम : पाच वाजुन गेलेत, अजुन किती वेळ, घरी नाही जायचं का...? 
अंजली : जाऊ ना...! काय घाई आहे तुला...?
प्रेम : अजुन किती वेळ, बस् झालं चल फ्रेश हो, निघुया आपण...!
अंजली : बरं ठिक आहे....! चल आपण फ्रेश होऊ...!😊
* असं बोलुन ती बेडवर ऊठुन बसते. प्रेम बेडवरून खाली येत तिला बोलतो. 
प्रेम : चल....!
अंजली : अरे...! माझ्या पायाला मुंग्या आल्या आहेत, पाय एकदम जड झाला आहे हा...!
* प्रेम तिच्याकडे पहात तिला बेडवरून उचलुन बाथरूम मधे घेऊन जातो. त्या वेळेत अंजली त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्याकडेच पाहून गालात हसत होती. बाथरूम मधे येताच तीने पटकन शॉवरचा कॉक चालु केला. प्रेम तिला पटकन खाली ठेऊ पण शकत नव्हता. आणि तिला खाली ठेवेपर्यंत ते दोघेही पुर्ण भिजले होते. आजचा दिवस असा होता की, त्याने तिला रागवायचं नाही असं ठरवलं होतं. पण तरीही तो तिला बोलला...
प्रेम : काय आहे हे....? 
अंजली : पाणी....! फ्रेश व्हायचं आहे ना आपल्याला...!😊
प्रेम : वेडी आहेस का तु जरा...? 
अंजली : हो...! एवढी वर्ष सोबत आहोत, अजुन तुला माहीत नाही...!
😊
प्रेम : आता हे केस कसे सुकणार, कळत नाही का तुला...! घरी जायचं आहे ना...! असे ओले केस घेऊन घरी गेलीस तर मॉम काय बोलतील.
अंजली : किती विचार करतो....! अरे आपण घरी पोहोचेपर्यंत सुकतील ते, तु नको टेन्शन घेऊ. बघ ना किती फ्रेश वाटतंय पाण्यात...!😊
* असं बोलुन ती त्याला मिठी मारते. प्रेम पण ते हवे असलेले क्षण तिला देऊ करतो.
काही वेळानी दोघेही तिथून निघतात. निघताना अंजली हॉटेलचे बिल पे करते. तिथून निघून ते अंजलीच्या हट्टापायी बँड स्टँड ला येतात. 
प्रेम गाडी पार्क करतो. दोघे तिथेच सूर्य मावळेपर्यंत समुद्राच्या काठी हातात हात घेऊन गप्पा मारत असतात.
अंजली : प्रेम....! खुप खुप थॅन्क्स...! माझ्या आयुष्यात हा सुंदर दिवस पुन्हा येईल हि आशाच मी सोडुन दिली होती. पण तु ते क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा परत आणलेस. मला नाही माहित पुढे माझ्या उरलेल्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे ते, पण तुझ्यासोबतच्या या सुंदर आठवणी माझ्या पुढच्या आयुष्यभरासाठी पुरेशा आहेत आणि त्या मी मरेपर्यंत जपुन ठेवेन. आणि खरच मनापासून थॅन्क्स....! आता मी कुठेही जायला अगदी आनंदाने तयार आहे.
प्रेम : अच्छा...! कुठेही नाही...! यू एस ला, ते ही आपल्या करिअर साठी, आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जायचं आहे तुला. आणि माझी मनापासून हि इच्छा आहे की तिकडे गेल्यावर तूु फक्त अभ्यासावर आणि स्वतःच्या करिअर वर फोकस करशील. हा तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे असं समज, मागे जे काही झालं ते तिथेच सोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण भुतकाळ डोक्यात ठेवला तर वर्तमान आणि भविष्यकाळ नीट जगता येत नाही. 
अंजली : पण जर भूतकाळातील काही चांगल्या गोष्टी तर सोबत घेऊन जाऊ शकतो ना, जेणेकरून आपला वर्तमान आणि भविष्यकाळ पण मनासारखा जगता येईल. हो की नाही...!😊
प्रेम : तो ज्याचा त्याचा निर्णय आहे...!
अंजली : मग मी पण माझा हा काळ नेहमी सोबत ठेवेन. कारण कदाचित हाच काळ असेल जो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असेल. 
प्रेम : मी तुला सांगायचे काम केलं आहे, बाकी तुझी मर्जी, काय ठेवायचं आणि काय घेऊन जायचं हे सर्व तुझ्या हातात आहे. 
अंजली : हो...! हे सर्व जर माझ्या हातात असतं तर मी सर्वात आधी तुलाच घेऊन गेले असते....!
* तिच्या अशा बोलण्याने प्रेम काहीच बोलत नाही फक्त तिच्याकडे पहात असतो...! त्याला असं पाहून ती बोलते.
अंजली : मस्करीत बोलले ना....! मला माहितीये सर्व, मला पुढे आयुष्यात काय करायचं आहे ते, तुम्हा सर्वांच्या ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या सर्व पुर्ण करण्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न करेन. बस्... अजुन काही...!
प्रेम : बरं ठिक आहे...! आता निघुया का...? खुप उशीर झालाय. 
अंजली : फक्त थोडा वेळ, हा सुर्य मावळला की आपण निघू...!😊
प्रेम : अरे...! वेळ आहे त्याला अजून...!
अंजली : नाही वेळ लागणार...! आजचा दिवस तरी थांब...! माझ्यासाठी...!
प्रेम : बरं ओके...! पण अजुन दहा मिनिट फक्त....!
अंजली : चालेल...! मला तर आता असं वाटतं की, या क्षणी हे सर्व काही जसं च्या तसं थांबलं पाहिजे. 
* असं बोलुन ती त्याचा हात पकडून त्याला बिलगली. प्रेमने तिच्या खांद्यावर हात टाकला. तिचे केस ओले होते त्यामुळे तिचा ड्रेस पाठीवर पूर्णपणे भिजला होता. 
थोड्या वेळानंतर सूर्यास्त झाला...
प्रेम : चला...! आता तरी निघायचं का...?
अंजली : मन तर नको बोलतंय, पण जावं लागेल ना...!
* ते दोघे तिथुन निघतात आणि बाईक जवळ येतात. प्रेम पार्किंग मधुन बाईक बाहेर काढतो. तो बाईक चालु करतो. अंजली मागे बसते. आणि ते दोघे घरी जायला निघतात.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️