भिकारी ( भाग 3) suchitra gaikwad Sadawarte द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भिकारी ( भाग 3)

सुहा, जुई आणि इतर दोघी काही वेळातच मंदिरामध्ये प्रवेश करतात . सुहा सगळ्यांना एकदा एकत्र करून सांगते ,"आपण इथे का आलो आहोत किंवा आपण इथे का थांबलो आहोत ? हे फक्त आपल्यामध्येच राहणार हे लक्षात ठेवा !" सर्वांनी तिच्या बोलण्याला होकार दिला ..
चौघी आतमध्ये जाऊन दर्शन घेतात आणि तिथेच मंदिरामध्ये बसतात. तिथे बरेच भक्त बसलेले होते .त्यांच्याप्रमाणे या ही तिथे बसल्या . तिथे आतमध्ये ओम चे वडील त्यांना दिसत होते . पण ओम नव्हता . सुहा तिच्या मैत्रिणींना म्हणाली , तुम्ही इथेच बसा ...मी ओम कुठे आहे हे बघते.. त्याच्यासोबत बोलायच आहे ...काही संशयास्पद वाटल तर मला आवाज द्या ! आणि ती तिथून निघून गेली.
सुहा हळू हळू पुढे पुढे जात होती . ती प्रत्येक गोष्ट निरखून आणि संशयाने पाहत होती . मंदिरामध्ये दिसणारी प्रत्येक खोली ही तिच्यासाठी नवीन होती म्हणून ती प्रत्येक खोली मध्ये डोकावत होती . प्रत्येक खोली मध्ये काही ना काही होते . पण ओम कुठे दिसला नाही .
      आता शेवटची खोली होती ...तिथे ती डोकवणार तितक्यात तिला रडण्याचा आवाज आला . तिला वाटल हा आवाज या खोली मधून येत आहे म्हणून ती धावत आतमध्ये गेली . पण तिथे कोणीच नव्हत . तो रडण्याचा आवाज आतमध्ये आल्यानंतर कमी झाला होता . ती बाहेर आली आणि आवाज पुन्हा सुरू झाला . ती आवाजाच्या दिशेने पुढे जात होती . ती जस जशी पुढे जात होती .. तस तशी घाबरत होती .. भीती ही वाटत होती ... कारण हे सगळ तिच्यासाठी नवीन अनोळखी होतं !
पुढे चालत गेल्यानंतर मंदिरांच्या मागच्या बाजूला एक मोठ झाड तिला दिसले..त्या झाडाभोवती कट्टा होता...आणि त्या कट्ट्यावर बसून ओम रडत होता . एकटाच आणि मन व्यक्त करत .. अगदी ..ओरडून काहीतरी बोलत होता ... ते बघून सुहाला खूप वाईट वाटले . तिला त्याच्या सोबत झालेली पहिली भेट आठवली ....तिथे तो तिला भिकारी वाटला होता...पण तो आनंदी होता ...आणि आता तो एक चांगल्या घरचा मुलगा दिसतोय पण आनंदी नाही तर रडताना दिसतोय . कदाचित तेव्हा त्याच्या सोबत आई होती आणि आता आई सोबत नाही हाच फरक असावा....एकटीच विचार करत उभी होती . तिच्या डोळ्यामध्ये ओम साठी काळजी, प्रेम होतं!
      तितक्यात ओमची नजर तिच्यावर येते. तो स्वतः ला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो . हे सुहाच्या लक्षात येत . ती त्याच्या जवळ जाते . तो तर खूप मोठा मुलगा असल्यासारखं तिला विचारतो ..काय झाल ? तुम्हाला काही हवं आहे का ? तुम्ही मंदिराच्या बाहेर आला आहात .. 
सुहा त्याच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाली ...ओम तू बरा आहेस का बाळा ? मी तुलाच शोधत इथे आली आहे . हे ऐकल्यावर ओम ला काही समजलं नाही . तो म्हणाला..मला ? मला का शोधत आहात ? काही काम आहे का ? 
ती म्हणाली ...हो ! काम आहे ! मदत हवी आहे ...
तो म्हणाला..मदत ? कसली मदत ? मी कोणती मदत करू तुम्हाला ?
ती म्हणाली ...हो मदत ...आणि ही मदत फक्त तूच करू शकतोस बाळा ! ओम थोडा गोंधळून जातो . ती म्हणते मला एक सांग बरं...तुझी आई कुठे आहे ? तू इथे असा रडत का होतास ?
तिचे हे प्रश्न.... ओम साठी खूप कठीण प्रश्नावली होती ती ही त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या विषयावरील !!! तो म्हणाला ..." ताई तू कोण आहेस? तू सतत माझ्या मम्मी बद्दल का विचारत आहेस ? तू माझ्या मम्मीला कसं ओळखते ?
 सुहा थोडावेळ थांबली आणि विचार करून म्हणाली , बाळा मी मम्मीची मैत्रिण आहे. माझं खूप महत्वाच काम आहे तुझ्या मम्मीकडे ! 
ओम म्हणाला ...पण... मम्मी तर इथे नाही ! तुम्हाला नाही भेटू शकत ती .. त्याला रडू आलं .
 सुहा त्याला जवळ घेते . त्याचे डोळे पुसते . म्हणते " बेटा तुझे पप्पा कुठे आहेत ...तुला त्यांना भेटायचं आहे का ? तुला बरं वाटेल !" तुला एक सेकंदमध्ये म्हणाला..नाही बिलकुल नाही ...मला पप्पा नाही आवडत ..ते खूप वाईट आहेत ...
सुहा मुद्दामहून पुढे म्हणाली , अरे!! सकाळी तर तुला तुझी मम्मी आली होती ना सोडवायला? मी बघितल तुला ! ओम थोडा रागात म्हणाला ...." ती माझी मम्मी नाही आणि कधीच नाही होणार .." ती त्याला पुढे विचारते ..मम्मी घरी असते का ? आणखी कुठे ?
ओम म्हणाला...मला माहित नाही ताई खरंच! जर मला मम्मी कुठे आहे माहित असत तर मी पण तिच्या सोबत असतो ना ? तिला तर पप्पा त्यादिवशी जबरदस्तीने कुठे तरी घेऊन गेले आणि ती पुन्हा मला दिसलीच नाही !
ती म्हणाली ....'त्यादिवशी म्हणजे ? कधी ? जबरदस्तीने का ? मला सांगू शकतोस का तू ..काय घडल आहे ते ? '

तितक्यात सुहाला जुई चा फोन येतो. अगं.. सुहा कुठे आहेस ? तु पण इतका वेळ झाला दिसत नाहीस आणि...
सुहा म्हणाली ..मी पण म्हणजे ..अजून कोण ? जुई म्हणाली , अगं! ओम चे पप्पा अचानक गायब झाले . कुठे दिसेना ! आम्ही इकडे तिकडे बघितल आणि तुला फोन केला ...
सुहा थोडा वेळ शांत झाली पण म्हणाली , "ठीक आहे ...मी इथे ओम सोबत आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला ! तुम्ही ही इकडे या आणि हो जर कुठे त्याचे पप्पा दिसले तर थोड अडवून ठेवा ".
ओम ने हे सगळ ऐकल होत पण न ऐकल्याचा किंवा काहीही न समजल्याचे दाखवले . पण त्याला इतक समजलं ही कोणीही असो पण त्याला आणि त्याच्या मम्मीला मदत करण्यासाठी आली आहे .
तिने फोन ठेवताच , ओम ने तिला काय झाल होत ते सांगण्यास सुरुवात केली . " मम्मी पप्पांची रोज सतत भांडण होत होती . आधी खूप चांगले राहायचे दोघे पण नंतर दोघे सारखं भांडण करायला लागले .एकदा त्यांच भांडण खूप झालं आणि पप्पांनी मम्मीला मारलं...ती खूप रडत होती पण ते घरातून निघून गेले . मम्मीला मी खूप समजावलं ..तिला शांत केलं आणि ती अचानक उठली तिची बाग घेतली आणि मला एक हाताला पकडलं. जी बस मिळाली तिच्या मध्ये चढलो आणि एका ठिकाणी उतरलो . पूर्ण प्रवासामध्ये ती माझ्यासोबत काही बोलली नाही . फक्त रडत होती आणि मला जवळ घेत होती .
बऱ्याच वेळाने बस एका ठिकाणी थांबली . बस मधून एक माणसाचा आवाज आला ....ताई हा शेवटचा स्टॉप आहे . कुठे उतरायचं आहे तुम्हाला ? मम्मीने त्यांना काहीही न उत्तर देता , मला हाताला पकडलं आणि बस मधून खाली उतरलो . तिथे आम्ही एका ठिकाणी मोठ्या जीन्यावर जाऊन बसलो . पुढे बोलत होताच तितक्यात सुहा तितक्यात म्हणाली ...आणि तिथे मला तुम्ही भेटलात !
नंतर तुम्ही कुठे गेलात ? तो म्हणाला ..मी जिथे मम्मी फिरवेल तिथे फिरत होतो . इकडे तिकडे भटकत असताना अचानक पोलिस आले आणि आम्हाला दोघांना लवकर गाडीत बसा बोलून तिथून घेऊन गेले .
पोलिस स्टेशनला आम्हाला बसवून ठेवलं होत. काही वेळात माझे पप्पा तिथे आले आणि सोबत कोणत्या तरी 2-3 लेडीज ना सोबत घेऊन आले . ते माझ्या जवळ आले ..मला जवळ केलं..माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलले ..आणि मला बाहेर घेऊन गेले .
त्यानंतर बाहेर आमची गाडी होती त्यात मला बसवलं आणि घरी घेऊन आले .
त्या दिवसापासून मला मम्मी कधीच दिसली नाही .मी बऱ्याच वेळा विचारलं मम्मी कुठे आहे ? कधी येणार आहे ? मला ते काहीच व्यवस्थित सांगत नाही .
मला मम्मी ची खूप आठवण येते . तो रडू लागतो आणि सुहा ही ...
सुहाकडे वेळ कमी होता. तिला आणि तिच्या मैत्रिणींना ओमच्या मम्मीला शोधायचं आहे पण आता कुठून सुरुवात करणार .....
तितक्यात कोणीतरी जोरजोरात पाय आपटत येत आहे अस सुहाला जाणवले आणि लगेचच ओम.. ओम अशी एक पुरुषाची हाक आली .ओम सुहाला kehi बोलणार तितक्यात सुहा कुठेतरी गायब झाली होती . कदाचित लपून बसली होती ...