भिकारी ( भाग ४) suchitra gaikwad Sadawarte द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भिकारी ( भाग ४)

ओम ? इथे काय करतोयस तू ? ते ही एकटाच ? 
ओम थोडा गोंधळून गेला होता , कदाचित घाबरला ही होता . त्याला इतका अंदाज होता सुहा ताई इकडेच कुठेतरी लपून बसली आहे . हा आवाज त्याच्या पप्पाचा होता . म्हणून तो स्वतःहून धावत पुढे गेला . म्हणाला,' काही नाही पप्पा ! मला इथे छान वाटतं! इथे खूप छान छान पक्षी दिसतात ...मला खूप आवडतात...' अस बोलता बोलता पप्पाला हाताला पकडून बाहेर खेचत घेऊन जातो .
       तितक्यात एक झाडाच्या मागे लपून बसलेली सुहा बाहेर आली . तितक्यात जुई आणि तीच्या मैत्रिणीही तिथे आल्या .
 सुहा म्हणाली , ओम ची मम्मी कुठे तरी संकटात आहे . कस शोधणार आपण तिला ? ती अस्वस्थ होऊन निराश होऊन खाली झाडाच्या कट्ट्यावर बसते . जुई आणि इतर मैत्रिणी ही तिला अस पाहून निराश होतात .
    जुई म्हणाली , काहीतरी नक्की सापडेल आपल्याला... ज्याच्यामुळे आपण ओम च्या मम्मीला शोधू शकतो . जुई तिच्या बाकी मैत्रिणींना म्हणाली , आपण काय करूया सगळ्याजणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया. ... आणि आपण ओम ला किंवा त्याच्या मम्मीला ओळखतो अस भासवून हे जे आजुबाजूला मंदिराच्या बाहेर लोक दिसतायत, त्यांच्याकडे चौकशी करूया ! फक्त इतकंच कोणाला ही या सर्व गोष्टीवर संशय नको यायला ...याची काळजी घ्या !
[
तितक्यात सुहा म्हणाली , हो आपण अस भासवू शकतो ... नकळत मुद्दाम काही इतर गोष्टीबद्दल बोलता बोलता आपण ओम किंवा त्याच्या मम्मीचा विषय मध्ये घेऊ शकता ...काहीतरी नक्की कळणार .. फक्त थोड कोणी संशयास्पद वाटल तर थोड जपून !
त्या चौघी काही दुकानं , काही फेरीवाले असे भाग विभागून घेतात आणि त्यांच्या कामासाठी सुरुवात करतात
चौघीही त्यांना जमेल आणि विशेष म्हणजे जिथे काही धोका आहे अस वाटेल, अशा ठिकाणी त्या जातच नव्हत्या . संध्याकाळ होण्याआधी आणि विशेष म्हणजे त्यांना सात वाजण्याआधी रूम वर पोहचायचे असते. त्या ठरल्याप्रमाणे आपली विचारपूस पूर्ण करून गाडी जवळ भेटतात.
त्या गाडी चालकासमोर त्या काही विषय ही काढत नाही . रूम वर जातात . थोड आवरून एकत्र बसतात . कोणाकडे काही विशेष माहिती आहे का याची एकमेकांना विचारपूस करतात .
 सुहा काही फारशी आनंदी नव्हती कारण तिला जी माहिती मिळाली होती ती... जी माहिती तिला आधीच माहीत होती. ओम च्या मम्मी पप्पाचे एकमेकांसोबत पटत नव्हते आणि का ते ही तिने बघितले होते . म्हणून ती एकदा घर सोडून गेली होती हे ही तिला समजल. जुईला समजल की ओम च्या वडिलांचं बाहेर एक बाई सोबत अफेयर होत म्हणून ते घरामध्ये रोज रोज भांडणं करत असत तर कधी बऱ्याच लेट येत होते तर कधी कधी घरीच येत नव्हते ..
दोघींनी जे जे समजलं ते सांगितलं पण त्यांना काही नवीन सापडलं नाही याचा त्रास होत होता . तितक्यात अपर्णा त्यांच्या ग्रुप मधील एक मुलगी म्हणाली , पण मला काहीतरी वेगळं समजलं आहे . सगळ्या तिच्याकडे उत्साहाने आणि आशेने बघू लागल्या.

सगळ्या तिला एकसाथ म्हणाल्या , काय समजल तुला ? लवकर सांग ?
ती म्हणाली ,मला त्या काकी म्हणाल्या , इतक चांगलं संसार चालू होता...सोन्यासारखी बायको होती .. नालायकाला कुठून ती औदासा भेटली काय माहिती ..एक वर्षामध्ये सगळ संसार उध्वस्त केल नालायक माणसाने ! बिचारी निघून ही गेली होती याला सोडून ...याला तिला सोडावस ही वाटत नाही ....त्याने तिला पुन्हा जवळ आणून ठेवले...
जवळ आणून ठेवले ? ओम ची मम्मी पण त्यांच्यासोबत राहते का ?
 मी हे विचारलं ही पण... काकूंनी मला इग्नोर केलं आणि म्हणाल्या ये पोरी जा जा चल तू पण जा रूम वर ... अंधार होत चालला आहे ! आणि हे कोणाला बोलू नको हा तो माणूस खूप खराब आहे !
हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला ! ती बाई खोट बोलत असेल का ? ओम तर म्हणाला, मम्मी त्याच्यासोबत नाही आणि त्याला खूप गरज ही आहे त्याच्या मम्मीची ! आणि हि बाई तर अस बोलतेय ? काय खर आहे ?

अपर्णा म्हणाली ,पण अस वाटत नव्हतं त्या काकी काही खोट बोलत आहेत ...कारण त्यांना ओम आणि ओमच्या मम्मीची खूप दया येत होती . कारण त्यांच्या रोज बघण्यामध्ये येत होत्या त्या ! कधी कधी ओम ची मम्मी येता जाता बोलत ही असायची सगळ्यांशी ! आणि त्यांना खोट बोलून काय भेटणार ?
जुई म्हणाली , हे तर बरोबर आहे ! त्या खोट का बोलतील ? काहीतरी आहे जे आपल्या शोधावं लागेल सुहा ....
सगळ्या शांत बसून विचार करत बसतात ... त्यांची चौथी मैत्री प्रेरणा चहा बनवून घेऊन येते ..
चहा पिऊन घ्या ..काहीतरी डोकं चालेल...
सर्व शांतता होती ...तितक्यात प्रेरणा म्हणाली ...कदाचित ओम ची मम्मी कुठे तरी जवळच आहे ! पण मुद्दामहून ओम पासून लांब केल असेल तर ?
हे ऐकल्यानंतर सगळ्याच एकमेकींकडे बघू लागल्या ...आणि हे बरोबर असू शकते अस त्यांना वाटत . काहीतरी महत्त्वाचं आहे जे आपल्याला शोधायचं आहे हे ...
अपर्णा म्हणाली उद्या आपण चौघी फक्त त्याच काकूंकडे जाऊया ! अस बोलून जेवणाची तयारी सुरू करतात .