रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते.
मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे.
आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता.
आरव समोर टेबलवर एक काळ्या रंगाची डायरी उघडी होती.
डायरी फार महागडी नव्हती आणि नवीन सुद्धा नव्हती. जुनीच होती ती. काळं कवर , कोपरे थोडे झिजले होते आणि पहिल्या पानाच्या आत आरवणे पेनाने लिहिलेलं एक वाक्य होतं ..
" माझा कोपरा" - इथे खोटं बोलायचं नाही!
तो बराच वेळ त्या वाक्याकडे बघत बसला होता, हातात पेन फिरवत होता,
काहीतरी लिहायच आहे पण काय लिहायचं ? हा प्रश्नच होता
पण काय ?
आजचा दिवस काही खास नव्हता .
कॉलेज ..
लेक्चर..
कॅंटीन..
समीर ची नेहमीची बंद न होणारी बडबड ..
असाईनमेंट
घरी आईसोबतच जेवण.
बस इतकंच. हो एवढंच तो विचार करत टकमक बघत होता फक्त.
त्याच्या मानत काही तरी चालू होतं जे त्याला डायरी मध्ये उतरवायच होत पण काय?
आरवणे शेवटी पेन उघडलं .
पानाच्या वरती तारीख लिहिली.
१४ जुलै.
तारीख च्या खाली दिवस लिहिला आणि बाजूला त्याची त्याने मराठीत बनवली होती ती सही केली.
डायरी लिहिताना सगळे फक्त तारीख टाकतात पण आपला आरव तारीख सोबत दिवस आणि त्याची सही पण टाकायचा.
बस असंच .. असं काही खास कारण ?
थोडा वेळ तो पेन हवेत धरून विचार करत होता.
मग लिहायला सुरुवात केली.
"आज एक मुलगी भेटली ."
तो थांबला .. एकदा वाचलं ..
मग तो हसला ..
काय फालतू लिहितोय मी. स्वत: म्हणाला
त्याने ते लिहिलेलं खोडून टाकलं ..
पुन्हा लिहायला सुरू केलं ..
आज कॉलेज मध्ये एक मुलगी पाहिली ..
पुन्हा थांबला आणि म्हणाला पाहिली ?
म्हणजे नक्की काय केलं? तो स्वतःशीच पुटपुटला ..
पुन्हा पेनाने डोक्यावर टकटक केलं.
मग पुन्हा त्याने लिहायला सुरुवात केली.
आज मी एक मुलीशी बोललो . तिच नाव अजून माहिती नाही पण ती खूप घाईत होती , एवढी घाईत की तिच्या हातातला कॉफी चा कप तिला सांभाळता नाही आला .
त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं .
त्याला तो तीन दिवसपूर्वीचा प्रसंग पुनः आठवला.
तीन दिवस आधी ...
आरव .. तू येतोय ना?
कुठे?
अरे welcome party आहे ना आज
आरवणे लॅपटॉप च्या स्क्रीन वरून नजर वर केली.
समोर समीर उभा होता. त्याच्या हातात कॅंटीन च्या वडापाव होता.
चेहऱ्यावर नेहमीसारखे आत्मविश्वासाचे expression होते.
कुठली पार्टी? आरव ने प्रश्नार्थ भाव दाखवून समीर ल विचारले.
समीर दोन सेकंड त्याच्याकडे बघत राहीला.
काय बोलतोय?
बोल..
तू कॉलेज मध्ये असतोस की फक्त एटेंडेंस साठी येतोस..
आरव हसला ..
दोन्ही साठी .. हसतच त्याने उत्तर दिले.
उद्या नवीन बॅच ची welcome पार्टी आहे आपल्या डिपार्टमेंट ची..
हा मग? आरव बोलला.
मग काय साल्या ? मुली येणार आहेत .
गुड
गुड? समीर आत्ता वैतगात म्हणाला.
हो .. आरवने ही त्याचा उत्तर दिल
तुला काही excitement नाही?
आरवणे लॅपटॉप बंद केला ..
कशाची? त्याने विचारले.
नवीन मुली आणि कशाची?
समीर .. आरव त्याला बोलला
मी इथे डिग्री घ्यायला आलो आहे मुलीना बघायला नाही.
समिर हसला..
हो आणि मी इथे नासा ला जायला आलो आहे....
तू नासा ला गेल्यास तर एलियन तुला वापस पाठवतील
आणि ते का?
त्यांना वाटेल तू एक्सपिरेमेन्ट च्या रिजल्ट आहेस म्हणून..
समिरत ने हातातला वडापाव खाली ठेवला.
तुझा प्रॉब्लेम माहिती आहे काय आहे?
काय ..? आरव ने विचारलं
तू मस्तिखोर आहेस पण तुला ते मान्य करायच नाही आहे.
आरव काही बोलला नाही.
तो पुन्हा लॅपटॉप खाली ठेवणार तेवढ्यात समीर च्या नजरेत काहीतरी दिसलं.
अरे .. समीर आरवच्या मागे तोंड उघड करून जोरात बोलला
काय झाला?
तिकडे बघ .. समीर ने आरवला मागे वळून बघायला सांगितलं.
आरवा ने सहज मागे वळून पाहिलं ..
कँटिन च्या एंट्रेन्स जवळ एक मुलगी उभी होती.
पांढरा साधा कुर्ता
निळ्या कलरची जीन्स
खांद्यावरती लटकती बॅग.
केस थोडे ओले होते बहुतेक, पावसातून भिजत आली होती म्हणून कदाचित.
एका हातात फोन तर दुसऱ्या हातामध्ये तिच वॉलेट होता.
ती आजूबाजूला बघत होती. जणू तिला कोणालातरी शोधायच होतं.
ही नवीन आहे बहुतेक .. समीर तिला बघत म्हणाला..
आरवणे पुन्हा लॅपटॉप कडे बघितलं आणि म्हणला..
हम्म ....
हम्म काय करतोय? समीर ने विचारलं
काही नाही असंच ..
तुला सुंदर वाटली ना? समीर ने चेष्टा करत आरवला म्हटलं.
आरवणे त्याच्याकडे बघितलं आणि म्हणला..
तू प्रतेक मुली बद्दल असंच विचार करत बसतो का?
हो..
मग ?
मग काय?
ती सुंदर आहे .. सुशील पण वाटते.. समीर बोलण्याच्या ओघात बोलुन गेला आणि हसू लागला..
ohh ..
काय ?
काही नाही .. आज कोणाच्या तरी डायरी मध्ये नवीन एंट्री होणार वाटत..
आरव ने समीरला रागातच बघितलं.
माझी डायरी जर तू घेऊन बसलास तर पहिल्या पानावर तुझ नाव पहिलं बदनाम करेल .. आरव म्हणाला..
ते तर अगोदरच असेल .. समीर हसतच म्हणाला..
आणि ते का बर ? आरव ने कुतुहलाने विचारल
कारण मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून .
आरव काही बोलणार इतक्यात .. एक्सक्यूज मी ..
असा आवाज आला ..
त्या दोघंनीही आवजाच्या दिशेने पहिलं ..
तिच मुलगी.
ती त्यांच्या समोर उभी होती.
तुमच्या कडे पेन आहे का?
आरवच्या हातामधला पेन बघून तिने त्याला विचारलं
हो आहे ना..
मला दोन मिनिटांसाठी भेटेल का?
हो भेटेल ना..
आरव ने पेन तिच्याकडे दिला..
थॅंक यू ..
ती बाजूच्या टेबल वर गेली आणि काहीतरी लिहू लागली .
समीर ने आरवच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हटलं..
मला दिला असतास का रे एवढ्या प्रेमाने पेन? आणि हसू लागला..
आरव ने त्याला कोपर मारला
शांत बस जरा तू..
मी फक्त विचारतोय ..
शांत म्हणजे शांत बस.. लटक्या रागात आरव म्हणाला.
तेवढ्यात ती मुलगी पुन्हा तिथे आली
तिच्या हातात कॉफी च्या मग होता..
तुमचा पेन.. आरव समोर पेन धरत ती म्हणाली
थॅंक्स ..
आरव ने पेन घेतला.
ती मागे वळणार इतक्यात तिच्या फोन वर कॉल आला ..
Hello .. हो मी आलेय .. नाही , अजून क्लास सापडला नाही आहे तेच शोधत आहे. काय? दुसऱ्या फ्लोर वर .. ठीक आहे मी येते .
ती बोलता बोलता मागे सरकली आणि पुढच्या क्षणी ..
धप्प ..
कॉफी च्या आर्धा कप आरव च्या शर्ट वर खाली झाला.
एक सेकंड पूर्णपणे शांतता पसरली.
ती मुलगी फोन कानाला लाऊनच उभी होती
आरव आपल्या शर्ट कडे बघत होता
आणि समीर आरव कडे मग त्या मुलीकडे .. पुन्हा आरवकडे
आरव ने हळूच डोक वर केल..
sorry ! .. त्या मुलीने एकदम हलक्या आवाजात आरव कडे बघत म्हणाली.
आत्ता पुढे काय होणार म्हणून ती थोडी घाबरलीच होती.
sorry .. sorry .. माझ अजिबात लक्ष नव्हतं .. ती गडबडीत त्याला बोलू लागली
आरव ने शर्ट कडे बघितलं आणि म्हणाला ..
its okay .
नाही its not okay .. तुमचा शर्ट.. ती मुलगी बोलतच होती तर आरव म्हणाला
शर्ट आहे ..
पण कॉफी पडली.. ती बोलतच होती.
हो माहिती आहे .. आरव म्हणाला
म्हणजे .. ती थोडी अडखळत म्हणाली.
ती काहीतरी दुसरं expect करत होती.
आरवला हसू आला..
तुम्ही टेंशन घेऊ नका. आरव तिला म्हणाला ..
पण .. ती कॉफी सांडली ..
ती पुन्हा अडकळत बोलत होती.
मी घरी जाऊन धुवेण ..
काय? ती मुलगी मनातल्या मनात विचार करू लागली.
इथे दूसरा कोणी असतं तर सटाक करून कानाखाली मारली असती आणि हा चक्क घरी जाऊन धुवेण म्हणतो आहे.
समीर बाजूला उभा राहून हसू दाबत होता.
ती मुलगी त्याच्या कडे बघायला लागली.
तुम्ही हसताय ?
समीर ने लगेच चेहरा सिरियस केला.
नाही ! मी कुठे?
तुम्ही हसत होतात.
नाही मी नाही..
तुम्हाला मजा येते ना? तिने समीर ल विचारलं
समीर ने आरव कडे बघितलं आणि म्हणाला..
हो .. थोडी. आणि हळूच हसू लागलं ..
आरव ने डोळे मोठे केले.
समीर ..
ती मुलगी त्या दोघांकडे काही सेकंड बघू लागली
मग तिच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू आलं ..
okay sorry .. तिने पुन्हा माफी मागितली
its fine .
खरंच ? तिने पुन्हा विचारल
हो खरच ..
ती निघून गेली.
आरव तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.
समीर ने हळूच आरव च्या खांद्यावर हात ठेवला..
काय भाई ..
काय झालं ? आरव उतरला..
कॉफी....
हा मग? त्याच काय?
पहिल्याच भेटीत.. समीर थोडा मजेत बोलत होता .
हो मग .. त्यात काय झाला?
Romantic Begining..
तू जरा शांत बस.. आरव ओरडूनच म्हणाला
मी काही बोललोच नाही..
आरवने ही काही उत्तर दिल नाही.
तो फक्त त्या मुलीकडे बघत राहिला .
ती बाहेर गेली.
पाऊस अजूनही पडत होता ..
आरव खुर्चीवर बसून ही सगळं आठवून गालात हसू लागला.
त्याला तिच नावही माहिती नव्हतं.
To be continued..
@dipakringe05