नागपूरचा निळा बंगला someshwar gitte द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नागपूरचा निळा बंगला

नागपूरचा निळा बंगला - एक भयानक सत्य घटना

नागपूरच्या वर्धा रोडला एक जुना निळा बंगला आहे. लोक त्याला भुताचा बंगला म्हणतात. मी स्वतः त्या बंगल्यात एक रात्र काढली आहे आणि जे पाहिले ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ही माझी खरी गोष्ट आहे.

मी नागपूरला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आलो होतो. आम्ही तिघे मित्र एकत्र रूम शोधत होतो. आम्हाला स्वस्तात जागा हवी होती. माझा मित्र राहुल म्हणाला की वर्धा रोडला एक खूप मोठा बंगला खूप स्वस्तात भाड्याने मिळतोय. आम्हाला आश्चर्य वाटले कारण त्या एरियात भाडे खूप जास्त असते.

आम्ही तो बंगला पाहायला गेलो. बंगला बाहेरून खूप सुंदर दिसत होता. निळ्या रंगाचा, मोठे गेट, मोठे अंगण. पण आतून तो पूर्ण पडक्या अवस्थेत होता. भिंतीवर बुरशी आली होती. खिडक्या तुटलेल्या होत्या.

आम्ही बाजूच्या चहा टपरीवर विचारले तर तो चहावाला आम्हाला म्हणाला की तुम्ही तो बंगला घेऊ नका. त्या बंगल्यात कोणीच टिकत नाही. गेल्या दहा वर्षात दहा भाडेकरू आले आणि दुसऱ्याच दिवशी पळून गेले. रात्री तिथून एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो. आम्हाला वाटले तो आम्हाला घाबरवत आहे.

पण स्वस्त भाड्यामुळे आम्ही तो बंगला घेतला. पाच हजार रुपयात एवढा मोठा बंगला मिळत होता.

पहिल्या दिवशी काहीच झाले नाही. आम्ही मस्त जेवलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता वरच्या मजल्यावरून कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. जसे कोणीतरी चपला घालून चालत आहे.

आम्ही तिघेही जागे झालो. राहुल म्हणाला की उंदीर असेल. पण आवाज खूप मोठा होता. आम्ही टॉर्च घेऊन वर गेलो. वर तीन खोल्या होत्या. दोन खोल्या उघड्या होत्या आणि रिकाम्या होत्या. पण तिसऱ्या खोलीचा दरवाजा बंद होता आणि आतून पिवळा प्रकाश येत होता.

आम्ही हळू हळू दरवाजा उघडला. आत एक मोठा जुनाट आरसा होता. आरशासमोर एक लाकडी खुर्ची होती. भिंतीवर एका सुंदर बाईचा फोटो होता. त्या फोटोला ताजे फुलांचे हार घातलेले होते. आश्चर्य म्हणजे त्या खोलीत कोणीच राहत नसूनही हार ताजा कसा?

तेवढ्यात मागचा दरवाजा जोरात आपटून बंद झाला. घरातील सगळी लाईट गेली. आम्ही तिघेही खूप घाबरलो. राहुल जोरात ओरडला.

मी मोबाईलचा टॉर्च लावला आणि आरशात पाहिले. आरशात आमच्या मागे एक पांढऱ्या साडीतील बाई उभी होती. तिचे केस मोकळे होते. तिचे डोळे पूर्ण लाल होते आणि ती जोरजोरात रडत होती. तिच्या गळ्यावर काळे निशाण होते.

मी मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते. परत आरशात पाहिले तर ती बाई आमच्या अगदी जवळ आली होती.

आम्ही तिघांनी जीवाच्या आकांताने दरवाजा उघडला आणि खाली पळालो. आम्ही तसेच रात्री दोन वाजता बंगल्याच्या बाहेर आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावातील एका आजोबांना ही गोष्ट सांगितली. ते आजोबा म्हणाले की बारा वर्षांपूर्वी या बंगल्यात एका नवविवाहित जोडप्याचा खून झाला होता. नवऱ्याला दारूचे व्यसन होते. त्याने बायकोचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून त्या बाईचा आत्मा त्या आरशात अडकला आहे.

आम्ही त्याच दिवशी बंगला सोडला. आमचे सामानही तिथेच राहिले. आम्ही ते दुसऱ्या दिवशी दिवसा जाऊन आणले.

आजही तो निळा बंगला वर्धा रोडला तसाच बंद आहे. रात्री तिथून जाताना वरच्या खोलीत लाईट चालू दिसते आणि रडण्याचा आवाज येतो. नागपूरचे लोक आजही रात्री त्या रस्त्याने जायला घाबरतात.

जर तुम्ही कधी नागपूरला वर्धा रोडला गेलात तर तो निळा बंगला तुम्हाला दिसेल, पण चुकूनही मित्रांनो ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच भयकथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. तुमचा एक लाईक मला नवी गोष्ट लिहायला प्रेरणा देतो. धन्यवाद.रात्री तिथे जाऊ नका. ही माझी विनंती आहे.