गोष्टी
© COPYRIGHTS
This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti
Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.
Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.
Matrubharti Pride can challenge such illegal distribution / copies / usage in court.
चतुर व्हा
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा, या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र—मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
परंतु चातुर्य म्हणजे काय, हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा, मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.
माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतोय थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,
अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सवार्ंवर मात करु शकतो. आगर्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फुलादखानाच्या पहार्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात..
लग्नातली देणी—घेणी
उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसर्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वतरूचं मरण स्वतरूच ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, श्कोन तुम्ही ?
प्रधान म्हणाला, श्मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.
ते एकुण गोसाव्यान विचारलं, श्राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसर्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ श्राम रामश् म्हणत राहून स्वतरूचीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, श्प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?श् तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसर्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, श्महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, श्महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.
राजा प्रधानाला म्हणाला, श्प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फिरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.श् राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या—जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फिरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक कल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, श् महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, श्महाराज ! त्या फांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, श्तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर स्त्रीधन म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?
राजा आश्चर्यानं म्हणाला, श्अरे वारू ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?
गोसावी म्हणाला, नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फरक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन—पोषण करु लागला.
अग्रपूजा
यज्ञ, विवाह, इत्यादी धार्मिक विधींचे वेळी पूअग्रपूजेचा—म्हणजे प्रथम —पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवाकडे गेला असता, ते म्हणाले, आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.श्सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला.
मग प्रत्येकजण आपापल्या वाहनावर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर ! श्री गणपतीनं विचार केला श्आपलं वाहन उंदीर ! एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य ! हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली.
त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, श्आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? पार्वती म्हणाली, ही रे काय थट्टा आरंभलीस? श्यावर गणपती म्हणाला, आई ! वडिलाधार्यांचं लहानांनी कावं, पण वडिलधार्यांनी मात्र लहानांच कू नये असा काही नियम आहे का? मी काही तुझी थट्टा करण्याच्या हेतूनं तुला बाबांजवळ बसायला सांगत नाही. तसं सांगण्यामागे माझा काही हेतू आहे. श्गणपतीचे हे उदगार कून भगवान शंकर म्हणाले, पार्वती, गणपती म्हणतो आहे ते खरं आहे. तो कारण असेल तेव्हाच बोलतो व योग्य असेल तीच कृती करतो. तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ?
पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणपतीनं त्या दोघांना सात पृथ्वीप्रदक्षिणेला निघून गेले असता, हा स्थूलदेही गणपती ती प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणपतीनं आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच म्हणणं मान्य करावं लागलं.त्यानंतर कमी अधिक कालांतरानं इतर सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करुन ब्रम्हदेवांकडे परत आले व विजयी स्पर्धक कोण, याबद्दलच्या निकालाची उत्कंठेनं वाट पाहू लागले.
तोच ब्रम्हदेव सवार्ंपूढे उभे राहून म्हणाले, श्आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणपतीनं त्याच्या आई—वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सवार्ंच्या आधी मजकडे आलाय म्हणून अग्रपूजेचा अधिकारी तो असल्याचा निर्णय मी देत आहे.
मोहिनी
एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं आपल्याला सिध्दी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली.खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, श् हे राक्षसा ! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहेय तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देइन.श्यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, श् हे शंकरा ! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल, अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे तिसरे काही नको.श्या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करुन सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी श्तथाऽस्तुश् म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले.
परंतु त्या वरामुळं तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की, जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. जग त्याला श्भस्मासूरश् या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं.
एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणार्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्यासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले.सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरांपुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनींच ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला.
आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवलाय त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले. आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वतरूच स्वतरूचे भस्म करुन घेतले !
अक्काबाईची आराधना
एका गृहस्थाची परिस्थिती अगदीच बेताची होती. त्याला एका अधिकारी सत्पुरुषाकडून लक्ष्मीला, त्याचप्रमाणे दारिद्रयाची देवता अवदसा हिला प्रसन्न करुन घेण्याचे, असे दोन प्रभावी मंत्र मिळाले.
तो गृहस्थ लक्ष्मीच्या मंदिरात गेला, पण तिला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिची प्रार्थणा करायला आलेल्या लोकांची तिथे एवढी झुंबड उडाली होती की, बराच प्रयत्न करुनही त्याला त्या मंदिरात प्रवेश मिळेना.तितक्यात त्याचं लक्ष जवळच असलेल्या अवदसेच्या मंदिराकडे गेलं ते मंदीर पाहताच त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकली व त्याची पावले त्या मंदिराकडे वळली.
त्या मंदीरात शुकशुकाट होता. गाभार्यात असलेल्या मुर्तीपुढे त्याने अनुष्ठान सुरु केले व ते संपताच त्याने तिला प्रसन्न करुन घेण्याचा प्रभावी मंत्र म्हटला. त्याबरोबर प्रकट होऊन तिनं त्याला विचारलं, श्ओळखलंस का तू मला? मी अवदसा उर्फ अक्काबाई आहे. माझी आराधना करुन, मला प्रसन्न करु पाहणारा तू पहिलाच माणूस आहेस. बोल, तुला काय हवंय ? आहे त्यापेक्षा अधिक दारिद्रय हवं ? की दुर्बुध्दी हवी ? की व्यसनाधीनता हवी ? यापैकी तू मागशील ते मी देइन.श्
यावर तो गरीब चतूर माणूस हात जोडून तिला म्हणाला, हे अवदसे! तुझी किंचीतही दॄष्टी माझ्यावर किंवा माझ्या वंशजावर पडू नये, एवढेच माझे तुजकडे मागणे आहे.श्अवदसा शब्दात अडकून गेली होती, तिला त्या गृहस्थाचं मागणं मान्य कराव लागलं. पण त्यामुळे त्या गॄहस्थाच्या घरातलं दारिद्रय जाऊन त्याची परिस्थिती भराभर सुधारु लागली.
शंकराचं उत्तर
सबंध वर्षभर उनाडक्या करण्यात घालविलेला एक विद्यार्थी परीक्षा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरच्या शंकराच्या देवळात गेला, आणि गाभार्याच्या तोंडाशी उभा राहून व शिवलिंगाकडे तोंड करुन नमस्कार करीत म्हणाला,
भगवन, शेर हजारोंकी किस्मत तेरे हाथ में है ध्तो मुझे पास करना, क्या तेरे लिये बडी बात है ?त्याची ती विनंती पूर्ण होताच गाभार्यातून आवाज निघाला — शेर किताबोंकी किल्ली तेरे हात में है ?
पाचशे साक्षीदार
एका लबाड सावकाराने एका शेतकर्याचे झोपडीवजा घर भाडयाने घेतले. पंधरावीस वर्षे त्याने ते आपल्या नोकरांना रहाण्यासाठी वापरले व त्याचे त्या शेतकर्याला भाडेही दिले. पण पुढे त्या शेतकर्याला भाडे दयायचे बंद केले व ते घर आपलेच आहे, असे तो म्हणू लागला. हा व्यवहार विश्वासावर झाल्याने, त्या शेतकर्यापाशी लेखी पुरावा नव्हता. तरीही त्याने ते घर आपल्याला मिळावे म्हणून त्या सावकाराविरुध्द न्यायालयात दावा केला.
न्यायालयात दावा सुनावणीला निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री तो लुच्चा सावकार पाचशे रुपयांची थैली घेऊन न्यायमुर्तीकडे गेला. त्यांना म्हणाला, श्साहेब ! ती झोपडी जरी त्या शेतकर्याची असली, तरी मी त्याला तिचं गेली वीस वर्षे भाडं दिलेलं आहे. ती जर माझ्या मालकीची झाली, तर ती पाडून मी तिच्या जागी माझ्या दुसर्या मुलासाठी बंगला बांधीन. तेव्हा हे पाचशे रुपये घ्या आणि उद्या न्यायालयात माझ्या बाजूनं निकाल द्या.श् त्या न्यायाधीशाने काहीएक न बोलता ती पाचशे रुपयांची थैली घेतली.
सावकार मोठया खुषीत आपल्या घरी निघून गेला.दुसर्या दिवशी न्यायालयात दावा सुनावणीला निघाला असता न्यायमूतीर्ंनी त्या सावकाराला विचारले, श् ईश्वराला स्मरून सांगा की, ती झोपडी खरी कुणाची आहे? कारण या शेतकर्यांच म्हणणं असं आहे की, ती त्याची आहे.श्
सावकार ईश्वराची शपथ घेऊन म्हणाला, श्साहेब ! ती झोपडी माझीच होती आणि आजही माझीच आहे. म्हणून तर ती माझ्या ताब्यात आहे. या गावातले एक दोनच नव्हे, तर शंभर साक्षीदार ती झोपडी माझी आहे, सांगण्यासाठी मी न्यायालयात उभे करु शकेन.श्न्यायमुतीर्ंनी त्या शेतकर्याला विचारलं, श्काय रे बाबा, ती झोपडी तुझी आहे, हे सिध्द करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्यापाशी ? निदान श्ती झोपडी तुझी आहे.श् असं सांगणारा, या गावातला एकादा साक्षीदार तरी तू इथे आणू शकशील का?
दुरूखी स्वरात शेतकरी म्हणाला, श्नाही साहेब. सावकार श्रीमंत असल्याने, जेव्हा त्याने त्याच्या गडी माणसांना रहाण्यासाठी ती झोपडी माझ्याकडे मागितली, तेव्हा तो माझी गरीबाची झोपडी गडप करणार नाही अशा विश्वासाने मी ती त्याच्याकडून काहीएक लिहून न घेता त्याच्या स्वाधीन केली. गेली बरीच वर्षे त्याने मला त्या झोपडीचे भाडेही दिले. पण जेव्हा त्याने भाडे देण्यास नकार दिला व ती झोपडी आपलीच असल्याचे सांगू लागला, तेव्हा मला न्यायालयात यावे लागले.
पैसा व दरारा यांच्या जोरावर सावकार शंभरच नव्हे तर पाचशे साक्षीदारसुध्दा त्याच्या बाजूने उभे करील, पण मज गरीबाची बाजू घेऊन, या सावकाराला दुखविण्याचं धारिष्ट या गावात कोण करील ? सावकार म्हणाला, कलतं ना साहेब, किती खोटं बोलतो आहे हा ? ती झोपडी याचे आहे असं सांगणारा एकही लेखी पुरावा याच्यापाशी नाही, आणि एकही साक्षीदार हा इथे आणू शकत नाही, तेव्हा ती झोपडी माझी आहे, हे आपल्याला पटले ना ? न्यायमुर्ती सावकाराला म्हणाले, श्तुझी बाजू सत्याची आहे, असं सांगणारे शंभर साक्षीदार तू माझ्यापुढे आणायला तयार आहेस, पण ती झोपडी या शेतकर्याची आहे असं सांगणारे पाचशे साक्षीदार अगोदरच माझ्याकडे आलेले आहेत. याप्रमाणे बोलून व आदल्या दिवशी सावकाराने लाच म्हणून दिलेले पाचशे रुपये टेबलावर ठेवून, न्यायमुर्ती त्याला म्हणाले, ती झोपडी त्या शेतकर्याची असूनही ती गिळंकृत करण्यासाठी काल तू माझ्या घरी आणून लाचेखातर मला दिलेले हे पाचशे रुपये या शेतकर्याची बाजू न्यायाची आहे, असं ठणकून सांगणारे पाचशे साक्षीदार आहेत. तेव्हा तू आज संध्याकाळपयर्ंत ती झोपडी या शेतकर्याला द्यावीस . तू मला लाच देण्याचा प्रयत्न केलास म्हणून तू सरकारात १००० रुपये दंड भरावा, आणि लाच म्हणून तू मला देऊ केलेले हे पाचशे रुपये तू या शेतकर्याला त्या झोपडीची डागडुजी करण्यासाठी द्यावे, असा मी निर्णय देत आहे.?
हंस कोणाचा?
भगवान गौतमबुध्दांच्या बालपणीची गोष्ट. दहा अकरा वर्षाचं वय होतं त्या वेळी त्यांचं आणि ते तेव्हा त्यांच्या मूळ श्सिध्दार्थश् या नावानंच ओळखले जात होते. एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता—बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजलं, आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नतंर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडं बरं वाटू लागलं.
तेवढ्यात सिध्दार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, सिध्दार्था, या हंसाला बाण मारुन मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर.श्सिध्दार्थ म्हणाला, श्देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जिवाचं रक्षण करणार्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, तेव्हा हा हंस आता माझाच आहे..
अखेर देवदत्त हा सिध्दार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्था विरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही कून घेतलं. त्यानंतर ते सिध्दार्थला म्हणाले, बाळ ! एकून धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलसं म्हणून हा हंस तुझा आहे हे खरं असलं, तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पुर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होता. या हंसाला देवदत्तानं घायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो.
यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, श्महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणानं अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्या नाही काय ?श्बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दीतेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मलाच कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ.
न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले, आणि तिथून परस्परविरुध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तानं टाळी वाजवून श्ये,ये,श् म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं, पण त्या हंसानं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच श्येश् म्हणताच, तो जखमी हंस मोठया कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला! तो प्रकार पाहून न्यायमुर्ती म्हणाले, हंस कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्न उरत नाही.
आई ती आई
मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खर्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागलीय पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुतीर्ंनाही या दोघींतली खरी आई कोण ? हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तर्हेनं मुद्दाम म्हणाले, श्ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.
न्यायमुतीर्ंचा हा कठोर निर्णय कून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुतीर्ंना म्हणाली, श्महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं. महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला? त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, श्हे बालक या बाईचंच आहे. श्त्याला कापण्यात यावं, श्असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खर्या आईला देण्यात येऊन, न्यायमुतीर्ंनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
तर मी तुझा मुलगा उठवीन
लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले. त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुलं मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, श्भगवन! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.
चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन. बुध्ददेवांचे हे आश्वासन कून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रतेक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !
एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, श्दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुसर्या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली! कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.
या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, श्भगवन! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तर्हेचे गहू मी आणू शकले नाही. बुध्ददेव म्हणाले, श्माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्यावजी आज मृत्यू आला, म्हणून असं दुरूख करीत बसणं योग्य आहे का? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दुरूख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दुरूखी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.
तुला हवं, ते त्याला दे
एका श्रीमंत माणसाने मरण्यापूर्वी मृत्युपत्र केले. त्यात त्याने, आपला एकुलता एक मुलगा अजून श्सज्ञानश् झाला नसल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्थलावर व जंगम मालमत्तेची देखरेख आपला परम मित्र देवेंद्र आधाशे याने करावी, आणी आपला मुलगा सज्ञान होताच, आपल्या मित्राने एकूण मालमत्तेतील त्याला हवा तो भाग माझ्या मुलाला दयावा व उरलेला भाग त्याने स्वतरूला घ्यावा, असे लिहिले. हे मृत्युपत्र करुन झाल्यावर तो गृहस्थ मरण पावला.
चार वषार्ंनी त्या मृत मनुष्याचा मुलगा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे अठरा वषार्ंचा झाल्यावर, त्याने त्या देवेंद्र आधाशेकडे आपल्या वडिलांच्या मालमत्तेवरील ताबा मागितला. तेव्हा त्या अधाशी आधाशेने मृत मित्राच्या चाळीस शेतांपैकी फक्त एक शेत, चार घरापैंकी फक्त एक घर आणि बॅंकेतील एक लाख रुपयांपैकी केवळ पाच हजार रुपये त्याच्या मुलाला देऊ केले. या दगलबाजीमुळे भडकून गेलेल्या त्या मुलाला आधाशे म्हणाला, श्तुझ्या वडिलांनी मृत्युपत्रात मला हवं ते मी तुला द्यावं व उरलेलं मी घ्यावं, असं स्पष्ट लिहिलं असल्यामुळे, माझ्या मर्जीनुसार मी जे तुला देतो आहे, ते तू निमुटपणे घेय नाहीतर मी तेही तुला देणार नाही.
आपल्या वडिलांच्या मित्राने केलेल्या फसवणुकीबद्दल त्या मुलाने त्याच्याविरुध्द न्यायालयात दावा केला. दाव्याची सुनावणी सुरु होताच न्यायमुतीर्ंनी त्या लुच्च्या गृहस्थाला विचारलं, देवेंद्र आधाशे! तुझ्या मित्रान मृत्युपुर्वी जे मृत्युपत्र केलं, त्यात काय लिहिलं आहे? आधाशे म्हणाला, श्हे पहा ते मृत्यूपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे, की माझ्या मित्राला हवं ते त्याने माझ्या मुलाला द्यावे व बाकीचे त्याने घ्यावे.
न्यायमुतीर्ंनी पुन्हा विचारलं, मग आधाशे! तुझ्या तुझ्या मित्राच्या स्थावर—जंगम मालमत्तेपैकी तुला काय काय हवे? आधाशे म्हणाला, श् माझ्या दिवंगत मित्राच्या चाळीस शेतांपैकी ३५ शेते, चार घरांपैकी तीन घरे, आणि बँकेतील त्याच्या खाती असलेल्या एक लाख रुपयांपैकी पंच्याण्णव हजार एवढे मला हवे.? यावर न्यायमुर्ती म्हणाले, तुझ्या मुत्राने मृत्युपुर्वी केलेल्या मृत्युपत्रात ज्या अर्थी तुला हवे ते तू त्याच्या मुलाला द्यावे असे लिहिले आहे, आणि ज्याअर्थी तुला पस्तीस शेते, तीन घरे व पंच्च्याण्णव हजार रुपये हवे आहेत, त्याअर्थी तुला हवे असलेले हे सर्व तू या मुलाला दे आणि उरलेली पाच शेते व एक घर आणि पाच हजार रुपये तू स्वतरूकडे ठेव. मृत्युपत्रातील भाषेचा न्यायमुतीर्ंनी जो चातुर्यपूर्ण अर्थ लावला, त्यामुळे त्या अधाशी आधाशेचा आवाज बंद झाला आणि निर्णयानुसार त्याने त्या मुलाला त्याचा योग्य वाटा देऊन टाकला.
तू मला मिठासारखी
सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते? गोपालकृष्ण म्हणाले, श्सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस. लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस.
आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे कून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर श्पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, श्असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा—निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड करायला सांगितले. स्वयंपाक तयार झाला.
अगदी सुचनेनुसार पुर्णपणे आळणी. गोपालकृष्ण जराही कुरबुर न करता नेहमीप्रमाणे पोटभर जेवले. त्यांच्यानंतर रुक्मिणी व सत्यभामा या जेवायला बसल्या. वरणभाताचा पहिला घास तोंडात घालतात, तो वरणाला मीठ नाही. आमटी व भाजी चाखून बघितली, तर त्यांचीही तीच गत ! अगोदरच रागावलेली रुक्मिणी स्वयंपाक्यावर खेकसून म्हणाली, श्आज स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे दुसरीकडे होतं का? स्वयंपाक पार आळणी झालाय !श् भगवंताच्या सुचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, श्आज मीठ संपल होत म्हणून स्वयंपाक आळणी करणं भाग पडलं. अर्थातच श्रीखंड होतंय तेव्हा बाकीच स्वयंपाक आळणी असला तरी निभावून नेता येइल, असं मला वाटलं.
रुक्मिणी म्हणाली, श्श्रीखंडाशिवाय जेवण अडून रहात नाही. इतर सर्व स्वयंपाक चांगला असला की झालं, आणि इतर सर्व स्वयंपाक मिठाशिवाय चांगला होणं शक्य आहे का? रुक्मिणीन पानात प्रथम वाढलेलं अन्न कसंबसं संपवलं, आणि ती आणि ती अर्धपोटीच उठून आपल्या महालात जाऊन फुरंगटून बसली. तिच्या पाठोपाठ गोपालकृष्ण तिच्या महालात गेले आणि मुद्दाम म्हणाले, श्रुक्मिणी आज तुझं जेवण एवढ्या लवकर कसं झालं ? मला वाटलं, आज जेवणात श्रीखंडाचा बेत आहे, तेव्हा जेवण सावकाशीन आस्वाद घेत घेत होणार.
रुक्मिणी रागानं म्हणाली, श्रीखंडाचं कौतुक तुम्हालाय मला नाही. बाकीचा स्वयंपाक नुसता आळणी होताय आणि कारण विचारलं तर बल्लवाचार्य म्हणतो, मीठ संपून गेलंय ! मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव येईल का?श् यावर गोपालकृष्ण पटकन म्हणाले, मीठ नाही म्हणजे स्वयंपाकाला चव नाही, हे तुच म्हणतेस ना ? मग मी मघाशी म्हणालो की तू मला मिठासारखी प्रिय आहेस. अग, तुझ्याशिवाय माझं जीवन बेचव होईल जाईल. पतीच्या बोलण्यातली ही खोच लक्षात येताच रुक्मिणी कळी एकदम खुलुन गेली.
भीमटोला
एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. धर्मराजांचं ते अश्वासन कुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं कलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.
दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्ल्याही तर्हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चयार्ंची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता.
नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज? कुन ‘काय आनंददायी घडले?' हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास? भीम म्हणाला, श्दादा, आजपयर्ंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा श्वरचं आमंत्रण येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढ्कलु नये.
पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.श्या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.
यात माझा काय अपराध ?
श्री पांडूरंगाला अलंकार वस्त्रे अर्पण करण्यासाठी एक श्रीमंत मनुष्य बर्याच दूरच्या गावाहून पंढरपूरास गेला. परंतू मंदिरापाशी जातो, तर त्याला मंदिराचा पुढला दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. मंदिराच्या पायरीवर बसलेला एक पुजारी म्हणाला, देव झोपलाय.
त्या धनवानाला थांबवायला वेळ नव्हता, पण त्याचबरोबर ते वस्त्रालंकार तर त्याला स्वतरूच पांडूरंगाच्या अंगावर चढवायचे होते. त्याने सभामंडपात असलेल्या बर्याच बडव्यांनी भेट घेऊन विनवणी केली, पण कुणीच त्याला दाद देईना. एका व्यवहारी बडव्याने मात्र त्या धनिकाला त्याने किती वस्त्रे व अलंकार आणले आहेत ते दाखवायला सांगितले व ते बरेच असल्याची खात्री होताच, तो त्या श्रीमंताला म्हणाला. शेट, ठीक आहे. मी दरवाजा उघडतो, तुम्ही माझ्याबरोबर गाभार्यात चला आणि स्वतरू पांडूरंगाच्या देहावर पोषाख व अलंकार चढवा.
त्या बडव्याने त्याप्रमाणे केल्यावर, बाकीचे बडवे त्याच्यावर भडकले. त्यांनी त्या मंदिराच्या विश्वस्तांकडे त्याच्याविरुध्द तक्रार केली. सर्वत्र एकच गहजब सुरु झाला श्या भिकंभटाने देवाची झोपमोड केली !
अखेर त्या बंडखोर बडव्याच्या नियमबाहय वागण्याबद्दल विचार करुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी, मंदिराच्या समस्त विश्वस्त व बडवे मंडळीची संयुक्त सभा भरली व तिच्यात त्या अपराधी बडव्याला उपस्थित होण्याचा हुकुम सोडला गेला.
सभेस आलेल्या त्या बडव्याला प्रमुख विश्वस्ताने विचारले, श्पांडुरंग झोपला असताना तू गाभार्याचं दार उघडून त्या धनिकाला आत नेलेस व पांडुरंगाला अलंकार वगैरे अर्पण करण्याची तू त्याला मुभा दिलीस, हे खरे आहे का?श्त्या बडव्यानं उत्तर दिलं, श्खरं आहे.श् विश्वस्तानं विचारलं, श्तू असं का केलसं?श्बडवा — सोन्यारत्नांचे अलंकार ही लक्ष्मी आहे, हे आपल्याला मान्य आहे.विश्वस्त — होय.
बडवा — पांडुरंग हा मूळचा विष्णू आहे, हे आपल्याला मान्य आहे ? विश्वस्त — मान्य केलंच पाहिजे.
बडवा — मग आता तुम्हीच सांगा, की पती झोपेत असला तरी त्याच्याकडे जाण्याचा पत्नीला अधिकार असल्यामुळे, मी त्या अलंकाररुपी लक्ष्मीला तिच्या पतीकडे जाऊ दिले, यात माझा काय अपराध ?या बिनतोड युक्तीवादामुळे ती सभा निरुत्तर झाली आणि भिकभंटाची स्वारी सर्वानुमते निरपराध ठरली.
त्यांचा त्रास तू असा चुकव
गुरुगृही अध्ययन करुन घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला, गुरुदेव ! मला रिकामटेकडया आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतातय तास्नतास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात, आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू?
गुरु म्हणाले, श्वत्सा ! तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील, त्यांच्याकडे तू पैसे उसने मागू लाग. असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील.
शिष्य म्हणाला, गुरुदेव ! ही युक्ती मोठी नामी सांगितलीत, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील, तो कसा चुकवू ? गुरु म्हणाले, त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा. म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावेत, या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील.
मृत्यूपुर्वीचे मागणे
राजा सत्येंद्र याच्या राज्यावर स्वारी करुन त्याचा काही प्रदेश जिंकण्यासाठी, राजा बहुसायास याने आपला पराक्रमी व चतुर सेनापती अभंगधैर्य याला प्रचंड सैन्यानिशी पाठविले. पण राजा सत्येंद्र याच्या सैन्यानं पराक्रमाची शर्थ करुन शत्रुसैन्याचा दारुण पराभव केला, आणि त्यांचा सेनापती अभंगधैर्य याला पकडून, आपला राजा सत्येंद्र याच्याकडे नेले. त्या राजाने आपल्या एका सैनिकाला त्या सेनापतीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली.
प्रत्यक्षात शिरच्छेद करण्यापूर्वी राजा सत्येंद्राने त्या शत्रूसेनापतीला विचारलं, तुझं मस्तक आता उडविलं जाणार आहे, तत्पुर्वी तुझी काही खायची वा प्यायची इच्छा असली, तर तू ती मला सांग. तुझी ती इच्छा पूर्ण केली जाईल, आणि मगच तुझा शिरच्छेद केला जाईल.
सेनापती अभंगधैर्य म्हणाला, श्महाराज ! माझा मृत्यू समोर ठाकला असताना, मला खाण्या—पिण्याची इच्छा कशी होणार? तरीसुध्दा मला अत्यंत तहान लागली असल्याने व अशा स्थितीत मृत्यू येणे मला योग्य वाटत नसल्याने, मला फक्त एक प्यालाभर पाणी दिले जावे. राजानं सेवकाकरवी त्या सेनापतीला पाण्यानं भरलेला प्याला दिला. प्याला हाती आला असतानाही शत्रू—सेनापती तो प्याला नुसताच हाती धरुन स्वस्थ उभा राहिला असल्याचं पाहून, राजानं त्याला विचारलं, तुझ्या अंतिम इच्छेप्रमाणे, तुला पाण्यानं भरलेला प्याला देण्यात आला आहे, मग आता ते पाणी तू पीत का नाहीस? अभंगधैर्य म्हणाला, मी हे पाणी पीत असतानाच शिरच्छेद करुन माझा प्राण घेतला जाईल, अशी मला भीती वाटते.
राजा सत्येंद्र म्हणाला, श्हे पहा, हे पाणी पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे मी तुला वचन देतो. मग तर झालं?श् राजाने याप्रमाणे वचन देताच, अभंगधैर्यानं त्या प्याल्यातलं सर्व पाणी जमिनीवर ओतलं. ते पाणी जमिनीवर ओतलं जाताच, क्षणार्धात ते तिथल्या तिथे जिरुन गेलं. तो प्रकार पाहून राजा सेवकाला म्हणाला, शत्रूचा हा सेनापती, विनाकरण वेळकाढूपणा करीत आहे. याचं मस्तक उडव पाहू ?
यावर शत्रू—सेनापती अभंगधैर्य म्हणाला, महाराज ! श्शब्दाला जागणारा राजा अशी आपली ख्याती आहे. अशा स्थितीत श्हे पाणी तू पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. असं जे आपण मला नुकतंच वचन दिलं होतं, ते आपण मोडणार का? खरं पाहता माझ्या हातातलं ते पाणी आता भुमीनेच पिऊन टाकलं असल्याने, मला ते कधीच पिता येणार नाही, आणि त्यामुळे दिलेल्या वचनाप्रमाणे आपण माझा शिरच्छेद यापुढे कधीही करणे योग्य ठरणार नाही, शत्रूचा असला, तरी हा सेनापती अतिशय चतुर आहे हे पाहून राजा सत्येंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला, आणि कोणत्याही राजाच्या सैन्याचं सेनापतीत्व वा अन्य अधिकारपद स्वीकारुन आपल्या राज्यावर कधीही चालून न येण्याचं त्याच्याकडून वचन घेऊन, राजा सत्येंद्राने त्याला सोडून दिले.
चतुर सुना
जपानमधील एका गावात राहणार्या फांग फू नावाच्या शेतकर्याला दोन मुलगे होते. दोघांचीही लग्न झाली होती. एकदा त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता, त्यांनी त्याला विचारलं, श्मामंजे ! आम्ही तुमच्यासाठी काय आणू? तो शेतकरी मोठया सुनेला म्हणाला, तु कागदातून अग्नी आण. तिन होकार देताच तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, तु कागदातून वारा आण. धाकटया सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले.
त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. पंधराएक दिवस माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतकर्याने मोठया सुनेला विचारलं, श्चिंगची ! आणलास का तू कागदातून अग्नी? यावर ती सून आतल्या खोलीत गेली, आणि थोड्याच वेळात, आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठया सुनेनं मोठया युक्तीनं आश्वासन पुर्ण केल्याचा त्याला आनंद झाला.
त्यानंतर त्या शेतकर्यानं धाकटया सुनेला विचारलं, मिंगजी ! कागदातून वारा आणलास का? कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सासर्याच्या हाती देऊन ती, त्याला म्हणाली, मांमजी ! हा पंखा हाती घेऊन हलवीत रहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे या गोष्टीची तुम्हाला प्रचीती येईल. दिलेलं आश्वासन धाकटया सुनेनही अशा तर्हेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी अंतरी संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला.
घर लहानच बरे
सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, ष्काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहेय मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत?
सॉक्रेटीस म्हणाला, बाबा रे! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं ! पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, श्अरे वा ! तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !
देवा, तुमचं कसं व्हायचं ?
एक लाकूडतोडया लाकूड तोडण्यासाठी नदीकाठच्या झाडावर चढला असता, त्याची लोखंडाची कुर्हाड खाली असलेल्या खोल डोहात पडली. त्याला पोहता येत नसल्याने, डोहात उडी मारुन कुर्हाड काढता येईना. साहजिकच तो नदीच्या काठी बसून रडू लागला.
त्याला रडताना पाहून देव तिथे प्रकट झाला व त्याने एकामागून एक सोन्याची—चांदीची—तांब्याची—पितळेची व शेवटी लोखंडाची अशा पाच कुर्हाडी त्या डोहातून काढून त्याला दाखविल्या. परंतू त्यापैकी लोखंडाची कुर्हाड हीच आपली असे त्याने सांगितल्यामुळे देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन, त्याला पाचही कुर्हाडी इनाम म्हणून दिल्या.
तिथून देवलोकी गेल्यावर देवाने ही गोष्ट आपल्या देवी ला सांगितली. ती कून देवी म्हणाली, सध्याच्या काळी एवढा प्रामाणिक माणूस मिळणं कठीण. मला तरी दाखवा तो माणूस. देवीच्या आग्रहाखातर, देव तिला घेऊन भूलोकी लाकूडतोडयाच्या गावाबाहेर आला आणि लाकूडतोडयाच्या प्रामाणिकपणाची थोडीशी झलक देवीला दाखविण्यासाठी त्याने एक युक्ती योजली.
त्या लाकूडतोडयाची बायको गावाबाहेरच्या शेतावर गेली असता, देवाने मायेच्या योगाने तिला नाहीशी केली व देवीसह तो एका झुडपाआड दडून बसला. बराच वेळ झाला तरी शेतावर गेलेली बायको घरी परतली नाही म्हणून तो लाकूडतोडया शेतावर गेला व तिचा शोध घेऊ लागला. बराच वेळ शोध घेऊनही जेव्हा ती सापडेना, तेव्हा त्यानं ढसढसा रडत तिला हाका मारायला सुरुवात केली.
त्याला रडताना पाहून देव देवीला म्हणाला, देवी ! हाच बरं का तो प्रामाणिक लाकूडतोडया. आता मी तुला त्याच्या प्रामाणिकपणाचा नमुना दाखवतो.श्याप्रमाणे बोलून देव देवीसह त्या लाकूडतोडयाजवळ गेला व त्याने त्याला विचारले, बा लाकूडतोडया! तू का बरं रडतोस ? माझी शेतावर आलेली बायको नाहीशी झाली म्हणूनश्, लाकूडतोडयानं उत्तर दिलं. यावर देव म्हणाला, थांब रडू नकोस. मी तुला एकामागून एक पाच बायका दाखवतो त्यातील तुझी कोणती ते खरं सांग, म्हणजे मी तिला तुझ्या स्वाधीन करीन.
याप्रमाणे बोलून देवानं तोंडानं कसलातरी मंत्र पुटपुटुन तिथे एक अप्सरेसारखी सुंदर व तरुण स्त्री निर्माण केली आणि तिच्याकडे बोट दाखवून त्यानं लाकूडतोड्याला विचारल, हिच का तुझी बायको? त्या स्त्रिचं रंगरुप पाहून मोहित झालेला तो लाकूडतोडया बेधडक म्हणाला, होय देवा ! हीच ती माझी हरवलेली माघारीण!श्त्याची ती लबाडी पाहून देवीनं आपल्या पतीकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.
त्याबरोबर देव भडकून त्या लाकूडतोडयाला म्हणाला, मी तुला प्रामाणिक समजत होतो, पण तु लुच्चा आहेस. ही तुझी बायको आहे काय? श्यावर तो लाकूडतोडया स्वतरूची बाजू सावरण्यासाठी म्हणाला, देवा, तुमचा गैरसमज होतोयं. मागच्यावेळी पाच कुर्हाडी दाखवून, अखेर माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही त्या पाचही कुर्हाडी मला बक्षीस दिल्यात. मग आताही पाच बाया दाखवून माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्या पाचही जणींना तुम्ही मला बक्षीस दिल्यात, तर त्यांच मी पोषण कसं करु? म्हणून मी ही पहिलीच बाई माझी बायको असल्याचे तुम्हाला सांगितले.
तुझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून देवानं ती स्त्री त्याच्या स्वाधीन केली आणि देवीसह तो देवलोकी जाऊ लागला. वाटेने जाताना देवी त्याला म्हणाली, देवा! बारीकसारीक गोष्टीत प्रामाणिकपणा दाखवणार्या माणसाचा तो प्रामाणिकपणा मोठया आणि महत्त्वाच्या गोष्टीत टिकत नाही. त्या लाकूडतोड्यानं चातूर्याच्या जोरावर तुम्हाला चक्क फसवलं देवा, तुमचं कसं व्हायचं?
पांडित्य सत्कारणी लावा
पांड्य राजाच्या पदरी असलेल्या पंडीत कोलाहल याची बुध्दी असामान्य होती. त्याच्याकडे येणार्या पंडिताने एखादे असत्यच नव्हे, तर सत्य विधान जरी केले, तरी पंडीत कोलाहल हा आपल्या तरल कल्पकतेच्या जोरावर ते विधान असत्य असल्याचे सिध्द करी. आपल्या पदरी असलेल्या या पंडिताचा पांड्य राजाला मोठा अभिमान वाटत होता, म्हणून त्याने एक पण जाहीर केला, जो कोणी माझ्या समक्ष या माझ्या पंडीत कोलाहलांचा बोलण्यात पराभव करील, त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा तर देण्यात येतीलच, पण त्याशिवाय त्याची दरबारात, पंडीत कोलाहल शास्त्यार्ंच्या जागी नेमणूक केली जाईल.
राजाने केलेला हा पण सर्वत्र जाहीर झाल्याने, देशोदेशीचे गाढे विद्वान त्याच्या दरबारी आले, पण पंडीत कोलाहल यांच्याकडून ते पराभूत झाल्याने, शरणागती लिहून देऊन परत गेले !एकदा भाष्याचार्य नावाचे पंडित आपला पट्टशिष्य यमुनाचार्य याच्यासह पांड्य राजाच्या दरबारी आले. भाष्याचार्य आपला पराभव करण्यासाठीच आले असल्याचे समजताच पंडीत कोलाहल पुढं आला आणि म्हणाला, भाष्याचार्य ! तुम्ही कोणतंही विधान कराय मी ते खोटं असल्याचं सिध्द करुन दाखवीन.श्श्खरं असलं, तरीही ते खोटं असल्याचं तुम्ही सिध्द कराल का? भाष्याचायार्ंनी प्रश्न केला.
पंडीत कोलाहल म्हणाला, अर्थात ! ते तर माझ्या अचाट बुध्दीचं वैशिष्ट्य आहे. भाष्याचायार्ंनी आव्हान दिलं, श्मग बाप हा अगोदर आणि नंतर मुलगा हे माझं विधान खोटं असल्याचं सिध्द करा पाहू? यावर पंडीत कोलाहल म्हणाला, तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे. श्मुलगा हा अगोदर आणि नंतर बापश् ही वस्तुस्थिती आहे. जोवर मुलगा झालेला नसतो, तोवर त्या माणसाला कुणी बाप म्हणत नाही. एखाद्याला मुलगा झाल्यानंतरच त्याला बाप म्हटल जातं म्हणजे अगोदर मुलगा आणि नंतर बाप. तेव्हा भाष्याचार्यजी ! तुम्ही मला निमूटपणे शरणागती लिहून द्या आणि इथून निघून जा.
आपल्या गुरुचा शरणागती लिहून देण्याकडे कल झुकला असल्याचे पाहून शिष्य यमुनाचार्य पुढे सरसावून म्हणाला, श्पंडीत कोलाहल शास्त्रे ! बुध्दीच्या जोरावर ही तुम्ही केवळ शाब्दिक कसरत चालविली आहे. तरीही मी तीन विधाने करतो, ती खोट असल्याचं जर तुम्ही सिध्द केलतं, तर मी तुम्हाला नुसतीच शरणागती लिहून देणार नाही, तर मी तुमचा अजन्म सेवक होईन. मात्र तुम्ही माझे विधाने खोडू शकला नाहीत, तर राज दरबारातील ही वैभवशाली नोकरी सोडून आपलं पुढलं उर्वरीत आयुष्य तुम्ही अशिक्षीतांना व गोरगरिबांना शिक्षण देण्यात घालवाल का?
पंडीत कोलाहलांनी होकार देताच, पंडित यमुनाचार्य म्हणाला, माझं पहिलं विधान असं आहे की, तुम्ही ज्यांच्या आश्रयाला आहात ते पांड्य महाराज भरतखंडाचे भूषण आहेत,माझं दुसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराजांची राणी सुनीतीदेवी ही थोर पतिव्रता आहे, आणि माझं तिसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराज व राणी सुनीतीदेवी यांना देवानं शतायुषी करावं, अशी तुमची, माझीच नव्हे, तर सर्व प्रजेची मनोमन इच्छा आहे. यमुनाचार्य ही जी तीन विधाने केली, पांड्य महाराजांच्या समोर खोडून काढणं म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे. हे हेरुन पंडीत कोलाहलाने ती विधाने मान्य केलीय तरुण यमुनाचार्याला शरणागती लिहून दिली आणि राजदरबारातील नोकरी सोडून, तो अशिक्षित व गरीब लोकांना सुशिक्षित करण्यासाठी उरलेलं आयुष्य खर्च करण्यासाठी निघून गेला.
भुताला कामगिरी
एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरु केला, पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे, त्याच्यावर देवा वजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले.
ते भूत त्याला म्हणाला, श्तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन, पण जर का तू मजकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास, तर मात्र मी तुला खाऊन टाकीन. त्या माणसानं आंबे मागितले, भुतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले! त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली, भुतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली ! त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला, भुतानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करुन ठेवला ! दहा हजार रुपयांची मागणीही त्या भुतानं अशीच बघता बघता पूर्ण केली !
श्मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय ? या विचारात तो मनुष्य पडला असता, ते भूत त्याला म्हणालं, श्मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्या जवळ? मग मी आता तुला खाऊन टाकतो. भुताची एक धमकी कून त्या माणसाला एक युक्ती सुचली. तो त्या भुताला म्हणाला, श्एक मल्लखांब तयार करुन तो मागल्या अंगणात पूर पाहू ?श्मल्लखांब तयार करुन, तो पुरलादेखील, भूत म्हणालं. तो गृहस्थ त्या भुताला म्हणाला, श्बस्स ! आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं, आणि माझं काम झालं रे झालं, की या मल्लखांबाकडे जाऊन, त्याच्यावर चढत उतरत राहायचं.
अशा तर्हेने त्या मनुष्यानं त्या भुताकडून आयुष्यभर आपली कामे तर करुन घेतलीच, पण उरलेल्या वेळेत त्या भुतामागे त्या मल्लखांबावर चढण्या—उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम नसलेल्या वेळी येणार्या मृत्युची भीतीही टाळली.
ओले हात
एकदा जपानच्या बादशहाने आपल्या राजसभागृहात, आपल्या राज्यातील सर्व लहान— मोठया अधिकार्यांची सभा घेतली. सभेला उद्देशून तो म्हणाला, मी लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना, राज्याचा कायापालट का होत नाही ? बघावं, तर प्रजा त्याच दारिद्रयात, त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे. हे असं का व्हावं ?
बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहिना. अखेर स्पष्टवक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिध्द असलेल्या विंगचॅंग या आधिकार्याकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळविली. तेव्हा विंगचॅंग याने प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळाएवढा मोठा गोळा मागवून घेतला व तो बादशहाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला, श्महाराज ! हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे, पाहिलंत ना ? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुध्द बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहातो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकार्याकडून मागल्या रांगेतल्या अधिकार्याकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकार्याकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा, मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो. बादशहाने त्याप्रमाणे केले.
त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंर्त्याच्या हाती दिला. मंर्त्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारभार्याच्या हाती दिला. त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हाधिकार्याकडे, त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधीकार्याकडे, त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता, जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिकार्याचे हात ओले करीत करीत, सवार्ंत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारीएवढा होऊन गेला होता !
तो सुपारीएवढा खडा हाती येताच, तो स्पष्टवक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिध्द असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला, महाराज, आपण मंर्त्याच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता, आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला, हे प्रत्यक्ष पाहिलंच ना? तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोक कल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठया रकमा मंजूर करता, आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपयर्ंत प्रत्येक अधिकारी आपले हात ओले करुन घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे रहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा? आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा?
समस्या—पूर्ती
माळव्याचा राजा भोज अज धारानगरी या आपल्या राज्याच्या राजधानीत रहात होता. राजा असा प्रजाहितदक्ष व विद्वान होता, तसाच रसिक होता. त्यामुळे त्याच्या पदरी कालीदासासारखे कवी व महापंडित होते.
एकदा भोजराजाच्या राजवाड्यात पहिल्या मजल्यावरील आपल्या शयनमंदिरात राणीची वाट पहात बसला होता. त्याच वेळी राणी तळमजल्यावरून शयनमंदिराकडे जाण्यासाठी जिन्याच्या पायर्या चढू लागली. पायर्या चढत असता, पतीबद्दलच्या विचारांच्या तंद्रीत तिचं एक पाऊल चुकीचं पडून, तिचा तोल गेला, आणि तिच्या हातातील—चंदनलेप असलेली सोन्याची वाटी पडून तो ठण ठण ठण ठण असा आवाज करीत गडगडत जिन्याच्या तळापयर्ंत गेली.
भोजराजानं ही घटना लक्षात घेऊन दुसर्या दिवशी ‘नवरत्नांनी' म्हणजे नऊ कवी—पंडितांनी भरलेल्या आपल्या दरबारात एक श्समस्याश् पूर्ण करण्यासाठी मांडली. तो म्हणाला, असा एक अर्थपूर्ण श्लोक बनवा की ज्यात ‘ठाठं ठठं ठं, ठठठं ठठं ठम' ही ध्वनीवाचक अक्षरांची ओळ चपलखपणे बसेल.
इतर सवार्ंनी मेंदू शिणवले, पण कुणालाच ती समस्या पूर्ण करणे जमेना, तेव्हा महान प्रतिभासंपन्न कवी कालिदास उभा राहिला व म्हणाला —
लोकभोजस्य भार्या मदविव्हला या कराच्च्युतं चंदनहेमपात्रम।
सोपानमार्गे प्रकरोति शब्दम।
ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम
अभिप्रेत अर्थ — कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी चंदनलेपाने भरलेले भांडे घेऊन जिन्याच्या मार्गाने जात असता, तिच्या हातातील भांडे पडले व जिन्यातून गडगडत खाली जाताना त्यानी श्ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठमश् असा आवाज केला. कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीमुळे राजसभे प्रमाणेच भोजराजाही थक्क झाला आणि त्याने त्याला एक हजार सुवर्ण मोहरा देऊन त्याचा गौरव केला.
डोकेबाज यमदूत
एक मुर्तीकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहुब बनवी ज्याची मुर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई.त्याने खुर्चीवर बसलेल्या व हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता, त्या पुतळ्याला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढल्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहुब होता की खराखुराच रखवालदार पहार्यावर बसला असल्याचा चोर दरोडेखोरांचा समज होऊन, ते त्या मुर्तीकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत.
नामवंत कलावंत म्हणून, त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले. आता आपली शंभरी निमित्त जंगी सत्कार व्हावा एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होतीय म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदुताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वतरूचे नऊ पुतळे तयार केले होते. अगदी सही सही स्वतरूसारखे.
एकदा त्याला, आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळ्यात दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात तो तिथे एकासारखे एक, असे दहा मुर्तीकार! काही म्हणजे काही फरक नाही ! श्यातल्या कुणाला घेऊन जावं? हा त्यांच्यापुढे पेच पडला.
तेवढ्यात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्यांना मुद्दाम म्हणाला, बाबांनो ! असं गोंधळून जाण्यासारखं काय आहे? कारण खर्या मुर्तीकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळ्यात दाखवायचं राहून गेलं आहे.त्या बुद्धीवान यमदूताच्या या विधानानं अपमानित झालेला त मुर्तीकार पटकन उठून म्हणाला, श्उगाच जीभ आहे, म्हणून काहीतरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष, मी या पुतळ्यात दाखविलेला नाही?
यावर तो चतूर यमदूत म्हणाला, हे चित्रकारा ! तुझ्यात आणि तुझ्या या पुतळ्यात काहीएक फरक नाही. पण श्तुझ्याप्रमाणे हे तुझे पुतळे नाहीतश् असे म्हटले की, अपमान होऊन तू काहीतरी बोलू लागशील, असे मला वाटत होते. माझ्या अंदाजाप्रमाणे तू बोललास आणि या चित्रशाळेतील दहा पुतळ्यात मिसळून गेलेला खरा चित्रकार कोणता, हा आम्हांला पडलेला पेच तू स्वतरूच सोडविलास. चल आता आमच्या संगे.
हेही गेले, तेही गेले !
एक म्हातारी होती. एकटीच असली, तरी सुखवस्तू होती. ती काशीयात्रेला जायला निघाली. यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्यांचं डबोलं घेऊन, गावाबाहेर कुटीत रहाणार्या एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाला, श्गोसावीबुवा ! मी काशीहून घरी परत येईपयर्ंत हे दागिन्यांच गाठोडं तेवढं सांभाळून ठेवा.श्गोसावी तिला म्हणाला, आजीबाई ! मी दुसर्याच्या घनदैलतीला स्पर्श करीत नसतो. तू या माझ्या कुटीसमोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्यांच गाठोडं पुरुन, तो खड्डा बुजवून टाक. गोसाव्याच्या त्या निरिच्छपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या समक्षच त्या कुटीसमोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले.
तीनएक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटीसमोरील खड्डा उकरुन पाहू लागली, तेव्हा तिला ते दागिने नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं. तिने प्रथम त्या गोसाव्याची मनधरणी केली, आणि नंतर बरीच कान उघाडणीही केली, पण तो गोसावी मख्खपणे तिला एकच उत्तर देई. श्मी तुझ्या दागिन्यांना स्पर्शही केला नाही. नाइलाज होऊन ती म्हातारी चरफडत घरी गेली व दुरूख करु लागली, तिच्या दुरूखाचे कारण कळताच, शेजारी तिला धीर देऊन म्हणाला, आजी ! तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करु नका. तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो.
अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला, आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डाबे घेऊन याच गोसाव्याकडे गेला. ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून, तो त्याला म्हणाला, साधूमहाराज! दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलयं, तेव्हा घर बंद करुन, सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे. म्हणून माझी आपल्याला एकच विनंती, की आपण हे सर्व दागिने आपल्याजवळ जपून ठेवावे.
जवळजवळ शंभर सव्वाशे तोळ्यांचे ते दागिने पाहून, त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की, हे दागिने आपल्या ताब्यात देऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला, की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठे तरी दूर पळून जायचं.
याप्रमाणे विचार करुन तो भोंदू बैरागी त्या गृहस्थाला म्हणाला, मी बोलून चालून संन्यासी. मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करु? तुम्हीच या माझ्या कुटीसमोर खोल खड्डा खणा, आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डाबे पुरुन टाका. त्या बैराग्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला. तेवढ्यात त्या गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडाआड दडून राहिलेली म्हातारी तिथे आली.
‘आता या म्हातारीनं जर तिचे दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली, तर हा गृहस्थ बिथरेल व शेसव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल. तेव्हा आता या म्हातारीच्या वीस—पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेच शहाणपणाचे आहे,' असा विचार करुन तो लुच्चा बैरागी त्या म्हातारीला म्हणाला, अगं आजीबाई! मला वाटतं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी, आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोदलीस भलत्याच ठिकाणी. तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू? म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली, पण काही एक न बोलता तिने त्या जागी जमिन खोदताच, तिला तिथे पुरलेले तिचे दागिने मिळाले.
हा सर्व प्रकार त्या म्हातारीच्या—आता आपल्या दागिन्यांचे दोन डबे पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या—शेजार्याचा दहा बारा—वर्षाचा मुलगा एका झुडपाआडून बघत होता. आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून, तो बापाच्या पूर्वसुचनेनुसार तिथे आला हळूहळू खड्डा असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा! दिल्लीच्या काकांच पत्र आत्ताच डाकवाल्यानं आणून दिलयं. त्या पत्रात काकांनी लिहिलयं, माझी प्रकृती आता चांगली सुधारणा असल्यानं, तुम्ही सवार्ंनी दिल्लीस येण्याची आवश्यकता नाही.श्मुलानं याप्रमाणे सांगताच, त्या गृहस्थानं खणलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यासंह त्याने घरचा रस्ता सुधारला.
त्याच्या पाठोपाठ आपल्या दागिन्यांच्या गाठोड्यासह जाता जाता ती म्हातारी त्या नाराज झालेल्या लुच्च्या बैरग्याला उद्देशून म्हणाली, अरे, बोकेसंन्याशा ! ध्यानधारणेचा आणि बैराग्याचा आव आणून, दुसर्यांना लुबाडू पाहातोस काय? चार दोन दिवसात तू हे गाव सोडून इथून कायमचा नाहीसा होय नाहीतर तुला हाकलवून देण्याचे काम मला गावातल्या तडफदार तरुणांच्यावर सोपवावे लागेल.
खरी नक्कल
भोजराकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखाने आला, तशाच तर्हेने निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही.
त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, श्अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसचय पण मला मुजरा करण्याचं साधे सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.
बहुरुपी म्हणाला, श्महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांच घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.श् बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन—तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.
एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही
भोजराजाकडे एक पोपट होता. तो फक्त ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही' हे एकच वाक्य म्हणे. राजा एकदा त्या पोपटाला घेऊन राजसभेत आला. सवयीप्रमाणे तिथेही पोपटाने त्या वाक्याचा स्पष्टपणे उच्चार केला. त्याचं ते विधान कून राजसभेतील प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला.
राजसभेतील विद्वान मंडळीना भोजराजानं विचारलं, ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही' असं जे पोपट म्हणतो, ते कोणत्या गोष्टीला उद्देशून आहे?श्यावर प्रत्येकान आपापल्या परीनं उत्तर दिलं, पण कुणाच्याच उत्तराने राजाचं समाधान झालं नाही. अखेर तो म्हणाला, श्हे पाहा, सहा महिन्यांच्या आत मला या विधानाचा पुराव्यासह समाधानकारक खुलासा हवाय अन्यथा मी तुम्हा सवार्ंना नोकरीवरून काढून टाकीन. हे स्पष्टीकरण तुम्ही स्वतरू द्या किंवा दुसर्या कुणाकडून द्या, त्या गोष्टीला माझी हरकत नाही.
राजानं दिलेली ही तंबी कून, दरबारी मंडळींच्या तोंडाचं पाणी पळालं. राजसभेतील ‘अभिलाषानंद' या नावाचा पंडित गावात रहाणार्या श्चरवाहश् या नावाच्या एका अतिशय हुशार पंडिताकडे गेला व त्याने त्याला आपल्यापुढे राजानं उभ्या केलेल्या समस्येची माहिती दिली.ती ऎकून पंडित चरवाह म्हणाले, श्पंडित अभिलाषानंद ! घाबरु नका, पोपटाच्या तोंडच्या त्या वाक्याचा पुराव्यासह अगदी समाधानकारक अर्थ मी राजाला सांगतो. फक्त तुम्ही मला तुमच्याबरोबर राजाकडे न्या. मात्र राजाकडे जाताना हा समोरच्या अंगणात बसलेला कुत्राही राजाकडे घेऊन जाण्याची ताकद मजमध्ये नाही. त्यामुळे त्या कुर्त्याला तुम्ही उचललं पाहिजे, आहे मान्य? त्या कुर्त्याला पाहून पंडित अभिलाषानंदाला किळस वाटली.
लूत भरल्यामूळे तो कुत्रा नुसता गलिच्छ झालेला नव्हता, तर अंगात ठिकठिकाणी खरे पडल्यामुळे त्याच्या अंगाला दुगर्ंधी येत होती. पण ‘राजसभेतील मोठया वेतनाची नोकरी टिकविण्यासाठी अभिलाषानंदाने पंडित चरवाहांची ती अट मान्य केली, आणि दुसर्याच दिवशी तो त्या गलिच्छ कुर्त्याला उचलून व पंडित चरवाहांना बरोबर घेऊन राजसभेत गेला.
त्याला तशा र्तहेने आलेला पाहून भोजराजानं विचारलं, ‘पंडित अभिलाषानंद ! चरवाहांना घेऊन येण्याचा हेतू काय?'पंडित अभिलाषानंद म्हणाला, ‘महाराज ! ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही', असं जे आपले पोपटराव म्हणतात, त्याचा समाधानकारक खुलासा पंडित चरवाह हे अगदी पुराव्यासह करायला तयार आहेत.
राजानं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच पंडित चरवाह त्याला म्हणाले, ‘महाराज ! लोभाएवढी वाईट गोष्ट या जगात दुसरी नाही.'आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळाल्यामुळं अंतरी समाधान पावलेल्या राजानं विचारलं, ‘पण याला पुरावा काय ?'यावर पंडित चरवाह म्हणाले, श्वास्तविक या पंडित अभिलाषानंदाची घरची परिस्थिती फार चांगली आहे. राजसभेतील नोकरी सुटली, तरी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही.
तरीसुध्दा मी घातलेल्या अटीप्रमाणे ते या लूत भरलेल्या व खरे पडलेल्या कुर्त्याला उचलून, त्याला आपल्यासमोर घेऊन येण्याचे जे लाजिरवाणे कृत्य करायला तयार झाले, ते नोकरी टिकवण्याच्या लोभापायीच ना?पंडित चरवाहांनी केलेल्या या खुलाशांनं राजाचे पूर्ण समाधान झाले. त्याने त्याला इनाम दिले व दिलेल्या शब्दाप्रमाणे पंडित अभिलाषानंदाला नोकरीवर राहू दिले.
किती चतूर बायका
एक गृहस्थ सकाळी सकाळीच आपल्या बायकोवर अत्यंत शुल्लक अशा कारणास्तव रागावला. अगदी तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. दुपारचं जेवणसुध्दा त्यानं मिटल्या तोंडानं घेतलंदिवस अशा तर्हेने सरला. संध्याकाळ झाली नव्हे रात्रही झाली आणि चूपचाप जेवून तो झोपायच्या खोलीत गेला व दिवा न लावता अंथरुणावर आडवा झाला.
राग असो वा लोभ असो, तो मर्यादेनंच शोभून दिसतो. सुंदर दिसणारं बाळसेदार शरीरसुद्धा अति बाळसेदार झालं की बेढब दिसू लागत. ‘ह्यांच'श् वागणसुध्दा असंच मर्यादा सोडून नाही का ? भांडणाचं कारण ते क्षुल्लक, आणि त्याकरिता यांनी दिवसभर रागावून रहावं ? ते काही नाहीय यांच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे, असा विचार करुन त्या गृहस्थाच्या चतूर बायकोनं एक मेणबत्ती पेटविली आणि ज्या खोलीत तो झोपला होता, त्या खोलीचा कानाकोपरा ती त्या मेणबत्तीच्या प्रकाशात धुंडाळू लागली.
बराच वेळ झाला तरी आपल्या बायकोचं धुंडाळणं संपत नाहिसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या गृहस्थानं तिला विचारलं, ‘काय गं? काय शोधते आहेस?'यावर ती म्हणाली, ‘सकाळपासून तुमची वाचा कुठे गडप झाली, ती शोधत होते पण अखेर सापडली “तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं त्या गॄहस्थाला एकदम हसू फुटलं व बायकोवरचा त्याचा राग कुठल्याकुठे निघून गेला !
अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा
भोजराजाच्या दरबारात असलेला महाकवी कालिदास याच्यापुढं आपलं तेज पडत नसल्यामुळे, त्याच्यावर आतून जळणारे बरेच विद्वान व कवी होते. त्यात शतंजय हाही एक कवी होता. एकदा त्यानं आपलं महत्त्व वाढविण्यासाठी व विशेषकरुन कालीदासाला बदनाम करण्यासाठी भूर्जपत्रावर एक श्लोक लिहिला व ते भूर्जपत्र आपल्या शिष्याला भोजराजाकडे पोहोचतं करायला सांगितलं.
गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्याचा शिष्य ते भूर्जपत्र हाती घेऊन राजाकडे चालला असता वाटेत त्याची व कालीदासाची भेट झाली, ‘हा शतंजय शिष्य राजाकडे चालला असावा' असं वाटल्यावरुन कालिदासानं त्याला मुद्दाम विचारलं, काय रे वत्सा ? किती लांब चालला आहेस?
शतंजय कवीच्या शिष्याला श्लोक काय आहे, याची कल्पना नसल्यामुळं तो सहज बोलून गेला, माझ्या गुरुंनी या भूर्जपत्रावर लिहिलेला एक श्लोक, त्यांच्या आज्ञेवरुन मी भोजमहाराजांना द्यायला चाललो आहे.'
कालीदासाने ते भूर्जपत्र आपल्या हाती घेऊन तो श्लोक वाचला.
तो पुढीलप्रमाणे होता रू
श्लोक
अपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम ।
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजयरू ।
(भावार्थ रू माघ कवीच्या काव्यात शंभर, भारता त तिनशे तर कालिदासाच्या काव्यांत किती अपशब्द (शिव्या) आहेत, त्याला गणनाच नाही, शतंजय कवीला मात्र ( त्या कवीचे हे दोष दाखवून देण्यासाठी) एकदाच अपशब्द (शिवी) वापरावा लागलो.)
शतंजय कवीने हा श्लोक आपली बदनामी करण्यासाठी लिहिला असल्याचे पाहून कालिदास त्या शतंजय शिष्याला मुद्दाम म्हणाला, श्अरे वारू ! फारच छान लिहिलाय श्लोक तुझ्या गुरुंनी ! फक्त नजरचुकीनं एका शब्दाला काना द्यायचा राहून गेलाय, देऊ का मी तो काना ?
शतंजय शिष्य म्हणाला, ‘वारू ! हे काय विचारणं झालं? ती चूक जरुर दुरुस्त करा. माझ्या गुरुंना कमीपणा येता कामा नये.'
कालीदासाने श्लोकातील श्अपशब्दश् या शब्दातल्या श्अश् ला काना दिला, आणि त्याचा ‘आपशब्द' असा शब्द बनवला. त्यामुळे तो श्लोक पुढीलप्रमाणे बनून, त्याचा अर्थही पार बदलून गेला.
श्लोक
आपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम ।
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजयरू ।
(भावार्थ रू माघ कवीच्या एका श्आपश् म्हणजे पाणी या शब्दाला समानार्थी असे एकूण शंभर शब्द आहेत. भारतात त्यांची संख्या तिनशे आहे. कालिदासाच्या काव्यात तर एका पाण्याला समानार्थी असे किती शब्द आहेत, त्याला गणना नाही, फक्त (शब्दसंपत्तीच्या बाबतीत दरिद्री असलेल्या) शतंजय कवीच्या काव्यात आप म्हणजे पाणी हा एकच शब्द प्रत्येक ठिकाणी वापराला गेला आहे.)
शतंजय शिष्याने तो श्लोक भोज राजाकडे पोचता केला. राजाने भर दरबारात तो श्लोक वाचून दाखविताच कालिदासाची मान उंच झाली, तर शतंजय कवीची मान लज्जेने खाली गेली !
चोरावर मोर
रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.
हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोर्या करायला लावील,श् असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणार्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?श्
तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई—बाबा मला बेदम चोप देतील.श्
तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळय मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.'
त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलिसठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.
राजा शरमिंधा झाला
कवी गुरु कालीदास हा एका कलावंतिणीला गाणं शिकवायला जाई. राजा भोजही तिच्याकडे अधूनमधून तिचं नृत्य पाहायला जाई. आपण जिच्याकडे जातो, तिच्याकडे कालीदासही जातो, असं कळताच राजानं त्याची फजिती करायचं ठरवलं.
तो त्या कलावंतिणीकडे गेला असता तिला म्हणाला, श्हे पहा शुभानना, कालीदास आज तुझ्याकडे येईल तेव्हा त्याला सांग की, संपूर्ण हजामत केल्याशिवाय उद्या तुम्ही माझ्याकडे यायचं नाही.श्कलावंतिणीने कालीदासाला याप्रमाणं सांगताच याच्यामागे राजाचा हात असल्याचा त्याला संशय आला. तो तिला म्हणाला,‘ खरं सांग, तू मला हे जे हजामत करून यायला सांगितलंस, ते महाराजांच्या सांगण्यावरुन ना?'
तिनं ते मान्य करताच कालीदास तिला म्हणाला, श्महाराज या राज्याचे राजे असतील, पण मी तुझा गुरु आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा तू मलाच अधिक मानले पाहिजेस. म्हणून मी सांगतो तसं करायचं. मी तर तुझ्या इच्छेप्रमाणे उद्या रात्री संपूर्ण क्षौर करुन येतोच पण मी येऊन गेल्यानंतर महाराज तुझ्या घराचे पुढले दार ठोठावू लागले की त्यांना तू म्हण, महाराज ! गाढवासारखा आवाज काढल्याशिवाय मी आज आपल्याला आत घेणार नाही. तुझ्या भेटीसाठी आतूर झालेले महाराज तुझा हट्ट पुरविण्यासाठी तसे ओरडायला कमी करणार नाहीत.'
दुसर्या दिवशी राजा त्या कलावंतिणीकडे गेला व तिने हट्ट धरल्यामुळे गाढवासारखा ओरडला. त्याच्या दुसर्या दिवशी कालीदासाला हजामत करुन दरबारात आल्याचे पाहून भोजराजानं खवचटपणे त्याला विचारलं, ‘काय कविराज ! आपण आज संपूर्ण क्षौर का बरं केलयं ?'यावर कालीदासानं उत्तर दिलं, ‘काल रात्री मी गाढवाचा आवाज कला. गाढवाचा आवाज रात्री कानी पडला म्हणजे संकट ओढवतं, असं मानलं जातं. ते संकट येऊ नये म्हणून क्षौर करावं, असं शास्त्र सांगतं.' कालीदासाच्या या चपलख उत्तरानं राजा शरमिंधा झाला.
चतूर न्यायमुर्ती
एका गृहस्थाने आपली विहिर शेजार्याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, श्अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?श्जुना मालक म्हणाला, श्मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.श्या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला.
न्यायमुतीर्ंनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या मालकाला बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, श्तू तुझी विहीर या तुझ्या शेजार्याला विकलीस हे खरे आहे काय?श्
जुना मालक रू होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झालयं त्यात मी माझी फक्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजार्याचा बिलकूल हक्क नाही.
न्यायमुर्ती रू तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
जुना मालक रू (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना? वाटणारच. पण असं असुनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !
न्यायमुर्ती रू ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहिर विकून टाकली असतानाही, ज्या अर्थी तिचा वापर तू आतलं तुझ्या मालकीच पाणी ठेवण्यासाठी करीत आहेस, त्या अर्थी ती विहीर त्याला विकल्यामूळे, ते तू त्या विहिरीचा अशा तर्हेनं वापर करीत राहीपयर्ंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजार्याला दिले पाहिजेस.
न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजार्याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.
हा श्लोक मात्र नवीन आहे
श्नवा श्लोक कविणार्या कवीला एक हजार सुवर्ण मोहोरा इनामश् हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राम्हणाच्या कानी गेले. तो माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठया उत्साहाने आला.
परंतू राजधानी आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन, तो कालीदासाकडे गेला व त्याला म्हणाला, श्कवीराज ! मी भोजमहाराजांचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूनं, त्यांना कविण्यासाठी एक श्लोक घेऊन मुद्दाम मणिपूरहून इथे आलो आहे. परंतू इथे आल्यावर मला असं कळल की, भोजराजांच्या राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला, तरी दरबारात असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवितो. त्याच्यानंतर द्विपाठी पंडित त्याचापुनरुच्चार करतो. शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखविल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात, श्ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील तीन पंडितांनी जसाच्या तशा म्हणून दाखविला, त्या अर्थी तो जुना आहे सिध्दच होते, तेव्हा कवीराज ! दरबारात नवा श्लोक घेऊन येणार्यांना असेच जर बनवून परत पाठविले जात असेल, तर मी तरी तिथे कशाला जाऊ?
कालीदासाने त्या ब्राम्हणाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाण त्याने एक नवा श्लोक रचला व भोज राजाच्या दरबारात जाऊन कविला. त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडिल अत्यंत दानशूर. अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला. त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून एक लाख सुवर्ण मोहोरा कर्जाऊ घेतल्या. परंतू कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यु आल्याने, भोज महाराज माझे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागतात.
श्हा श्लोक नविन नाहीश् असं म्हणावं, तर आपले वडिल या ब्राम्हणांच्या वडिलांचे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहोरा याला द्याव्या लागतीलय त्यापेक्षा हा श्लोक एकदम नविन आहे. असे म्हणणे पत्करले, असा विचार करुन भोज राजाने त्या ब्राम्हणाचे नवीन श्लोक कविल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन वाटेला लावले.
कालीमातेला कौल
एक राजा दारुपान, घोडयांच्या शर्यती, जुगार, अशा अनेक दुर्व्यसनात पार बुडुन गेला होता. राज्यकारभाराकडे त्याचं लक्ष नव्हतचं. त्यामुळे राज्याची खरोखरच काळजी वाटणार्या त्याच्या प्रधानाने, त्याची एकदा कान उघडणी केली. प्रधानाने केलेया या अपमानामुळे, राजा रागावला त्याने त्याला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतला.श्प्रजेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या प्रधानाला आपण कारण नसता काढलं,श् असं होऊ नये, म्हणून राजा एकदा भरदरबारात म्हणाला, श्या प्रधानांना ताबडतोब नोकरीवरुन काढून टाक,श् असा कालीमातेनं काल माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला. तरीसुध्दा श्प्रधानांना काढण्यासाठी मी देवीच्या दृष्टांताची खोटीच सबब पुढे करीत आहेश् असं कुणी म्हणू नये, यासाठी श्काढावेश् व श्ठेवावेश् अशा दोन चिठ्ठ्या मी कालीमातेपुढे ठेवीन. नंतर त्या चिठ्ठ्यांपैकी कुणालाही एक चिठ्ठी स्वतरू प्रधानजींनी उचलावी. तिच्यात जे लिहिले असेल ते त्यांनी मान्य करावे.श्राजाचा हा कावा प्रधानाच्या लक्षात आला. राजा दोन्ही चिठ्ठ्यावर असे लिहिणार, आणि त्या दोन चिठ्ठ्यापैकी कुठलीही जरी चिठ्ठी आपण उचलली तरी त्या चिठ्ठीवर श्काढावेश् असेच असल्याने आपल्यावर नोकरी सोडण्याचा प्रसंग येणार, ही गोष्ट प्रधानाने ओळखली. म्हणून जेव्हा राजाने सर्व दरबारी मंडळी व न्यायमुर्ती यांच्या समक्ष मंदिरातील कालीमातेच्या मुर्तीसमोर अगोदरच घडी घातलेल्या दोन चिठ्ठ्या ठेवून, त्यांपैकी एक चिठ्ठी प्रधानाला उचलायला सांगितली, तेव्हा प्रधान मुद्दाम म्हणाला, राजेसाहेब ! कालीमातेसमोर ठेवलेल्या या दोन चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी मी उचलली आणि नेमकी त्याच चिठ्ठीवर जर श्काढावेश् असे लिहिलेले निघाले, तर मीच देवीकडून मला नोकरीतून काढून टाकण्याचा कौल घेतला, अशी माझी नाचक्की होईलय त्यापेक्षा या दोन चिठ्ठ्यांपैकी कुठलीही एक चिठ्ठी देवीच्या कौलाची चिठ्ठी म्हणून देवीजवळ तशीच मिटलेल्या स्थितीत राहू द्यावी, आणि देवीच्या कौलाच्या विरुध्द उरलेली चिठ्ठी न्यायमुतीर्ंनी स्वतरू उचलून व उघडून सवार्ंसमक्ष वाचून दाखवावी. कुठली चिठ्ठी देवीजवळ राहू द्यायची व कुठली चिठ्ठी वाचून दाखवायाचे हे सर्व न्यायमुतीर्ंच्या इच्छेवर सोपवावे. न्यायमुतीर्ंनी देवीला नको असलेल्या निर्णयाची चिठ्ठी उघडून वाचून दाखविली, की तिच्यात असलेल्या निर्णयाच्य विरुध्द निर्णय देवीजवळ ठेवलेल्या चिठ्ठीत असणार हे ठरलेले असल्याने, ती देवीजवळची चिठ्ठी न उघडताही आपल्याला तो निर्णय कळून येईल, आणि मी तो मान्य करीन.श्प्रधानाने सुचविलेला हा बिनतोड पर्याय राजाला नाकारता येईना. नाइलाजाने त्याने न्यायमुतीर्ंना एक चिठ्ठी देवीपुढे ठेवून दुसरी चिठ्ठी उचलून ती उघडायला व वाचायला सांगितले. न्यायमुतीर्ंनी त्याचप्रमाणे करताच त्या चिठ्ठीत श्काढावेश् असे लिहिले असल्याचे आढळले.अर्थात आता कालीमातेच्या मुर्तीसमोर उरलेल्या चिठ्ठीत श्ठेवावेश् हाच कौल असणार, असे राजाला मान्य करावे लागून, प्रधानजींनी नोकरीवरुन काढण्याचा बेत रद्द करावा लागला.
हजरजबाबी कालीदास
भोजराजाच्या पदरी असलेला कालीदास हा जसा अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होता तसाच तो प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नाला पटकन चपलख उत्तर देऊन, त्याला निरुत्तर करण्यात पटाईत होता.
या कालीदासाचा एका कलावंतीणीवर अतिशय लोभ होता. तिचं नृत्य व गायन कण्यासाठी तो बहुतेक दररोज तिच्याकडे जाई.एकदा सकाळी तो तिच्या घरावरुन जात असता तिन त्याला हाक मारली व त्याला बाजारातून चांगलासा मासा घेऊन येण्याची विनंती केली. तिला नाराज करणं जिवावर आल्यामुळं, त्यानं तिच्याकडून पिशवी घेतली आणि बाजाराची वाट धरली.
मासळीबाजारात मासे घेऊन बसलेल्या एका कोळ्याकडून एक ताजा मासा विकत घेऊन त्याने त्याच्याकडून त्या माशाचे सोयिस्कर खंड करुन घेतले. मग ते तुकडे त्या कोळ्याला पिशवीत घालायला सांगून, तो ती पिशवी हाती घेऊन कलावंतिणीच्या घराकडे जाऊ लागला.
कालीदासावर आतून जळणार्या एका माणसाने त्याच्या हातातली माशाच्या रक्तानं भरलेली ती पिशवी पाहून त्याला मुद्दाम विचारलं, ‘काय हो कवीराज ? थैलीत काय आहे?'
कालीदास रू थैलीत रामायण आहे.
चौकस गृहस्थ रू मग पिशवी ओली का दिसते?
कालीदास रू रामायणासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवलेला असताना, ती त्या रसांमुळे भिजून गेल्याशिवाय कशी राहील?
चौकस गृहस्थ रू पण मग रक्ताचे डाग का पडले आहेत त्या पिशवीला ?
कालीदास रू राम—रावण युध्दात जे राक्षस मारले गेले, त्यांच्या रक्ताचे आहेत ते डाग.
चौकस गृहस्थ रू तेही एक वेळ मान्य करायला हरकत नाहीय पण घाण कसली सुटली आहे ?
कालीदास रू राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांची.
कालीदासानं दिलेली उत्तर कून अधिक प्रश्न विचारून, आपली आधिक शोभा करुन घेण्या वजी निघून गेलेलं बरं, असा विचार त्या खवचट गृहस्थानं केला आणि त्याने आपला रस्ता सुधारला.
अख्खी म्हैस पाच रुपयात
एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, श्आपली म्हैस गावातल्याच दोन—तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस—चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.
मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, का हो का ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणार्यास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन. ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली.
तो मनात म्हणाला, श्आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा श्तुझी म्हैस मला रानात मिळाली,श् असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं. असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले.
यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, श्ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच—सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ? म्हशीचा मालक म्हणाला, छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.श्म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.
गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसर्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसर्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'
सिंह आणि गाढव
एका उन्मत्त झालेल्या गाढवाने एका सिंहास निष्कारण शिव्या दिल्या. त्या ऐकताच सिंहास मोठा संताप आला, परंतु शिव्या देणारा प्राणी गाढव आहे, हे पाहताच त्याने आपला संताप आवरला. त्या गाढवाकडे ढुंकूनही न पाहता किंवा त्याला एक शब्दही न बोलता तो सिंह आपल्या वाटेने चालता झाला.
तात्पर्य— जे खरे थोर आहेत, ते हलकट लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.
कोल्हा, रानमांजर आणि ससा
एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असेय त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, ृतुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.
तात्पर्य रू— एकमेकांशी शत्रुत्व करणार्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.
मुरलीवाला कोळी
एक कोळी, मासे धरण्याच्या कामापेक्षा मुरली वाजविण्याच्या कामात फार कुशल होता. एके दिवशी तो नदीकाठी जाऊन मुरली वाजवित बसला असता मुरलीच्या आवाजाने एकही मासा जवळ न आल्यामुळे त्याने आपली मुरली ठेवून दिली व जाळे घेऊन ते पाण्यात घातले. थोडयाच वेळात पुष्कळ मासे त्या जाळयात सापडले. ते पाहताच तो कोळी म्हणतो, ‘हे मासे किती अरसिक ! इतका वेळ मी मुरली वाजवित होतो, तिच्या सुरावर हे नाचले नाहीत आणि आता वाजविणे बंद होताच हे नाचू लागले !'