Chatur Vhya 6 books and stories free download online pdf in Marathi

चतुर व्हा 6

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही

भोजराजाकडे एक पोपट होता. तो फक्त ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही' हे एकच वाक्य म्हणे. राजा एकदा त्या पोपटाला घेऊन राजसभेत आला. सवयीप्रमाणे तिथेही पोपटाने त्या वाक्याचा स्पष्टपणे उच्चार केला. त्याचं ते विधान कून राजसभेतील प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला.

राजसभेतील विद्वान मंडळीना भोजराजानं विचारलं, ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही' असं जे पोपट म्हणतो, ते कोणत्या गोष्टीला उद्देशून आहे?श्यावर प्रत्येकान आपापल्या परीनं उत्तर दिलं, पण कुणाच्याच उत्तराने राजाचं समाधान झालं नाही. अखेर तो म्हणाला, श्हे पाहा, सहा महिन्यांच्या आत मला या विधानाचा पुराव्यासह समाधानकारक खुलासा हवाय अन्यथा मी तुम्हा सवार्ंना नोकरीवरून काढून टाकीन. हे स्पष्टीकरण तुम्ही स्वतरू द्या किंवा दुर्सया कुणाकडून द्या, त्या गोष्टीला माझी हरकत नाही.

राजानं दिलेली ही तंबी कून, दरबारी मंडळींच्या तोंडाचं पाणी पळालं. राजसभेतील ‘अभिलाषानंद'

या नावाचा पंडित गावात रहार्णाया श्चरवाहश् या नावाच्या एका अतिशय हुशार पंडिताकडे गेला व त्याने त्याला आपल्यापुढे राजानं उभ्या केलेल्या समस्येची माहिती दिली.ती कून पंडित चरवाह म्हणाले, श्पंडित अभिलाषानंद ! घाबरु नका, पोपटाच्या तोंडच्या त्या वाक्याचा पुराव्यासह अगदी समाधानकारक अर्थ मी राजाला सांगतो. फक्त तुम्ही मला तुमच्याबरोबर राजाकडे न्या. मात्र राजाकडे जाताना हा समोरच्या अंगणात बसलेला कुत्राही राजाकडे घेऊन जाण्याची ताकद मजमध्ये नाही. त्यामुळे त्या कुर्त्याला तुम्ही उचललं पाहिजे, आहे मान्य? त्या कुर्त्याला पाहून पंडित अभिलाषानंदाला किळस वाटली.

लूत भरल्यामूळे तो कुत्रा नुसता गलिच्छ झालेला नव्हता, तर अंगात ठिकठिकाणी खरे पडल्यामुळे त्याच्या अंगाला दुगर्ंधी येत होती. पण ‘राजसभेतील मोठया वेतनाची नोकरी टिकविण्यासाठी अभिलाषानंदाने पंडित चरवाहांची ती अट मान्य केली, आणि दुर्सयाच दिवशी तो त्या गलिच्छ कुर्त्याला उचलून व पंडित चरवाहांना बरोबर घेऊन राजसभेत गेला.

त्याला तशा र्तहेने आलेला पाहून भोजराजानं विचारलं, ‘पंडित अभिलाषानंद ! चरवाहांना घेऊन

येण्याचा हेतू काय?'पंडित अभिलाषानंद म्हणाला, ‘महाराज ! ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही', असं जे आपले पोपटराव म्हणतात, त्याचा समाधानकारक खुलासा पंडित चरवाह हे अगदी पुराव्यासह करायला तयार आहेत.

राजानं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच पंडित चरवाह त्याला म्हणाले, ‘महाराज ! लोभाएवढी वाईट गोष्ट या जगात दुसरी नाही.'आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळाल्यामुळं अंतरी समाधान पावलेल्या राजानं विचारलं, ‘पण याला पुरावा काय ?'यावर पंडित चरवाह म्हणाले, श्वास्तविक या पंडित अभिलाषानंदाची घ् ारची परिस्थिती फार चांगली आहे. राजसभेतील नोकरी सुटली, तरी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ

येणार नाही.

तरीसुध्दा मी घातलेल्या अटीप्रमाणे ते या लूत भरलेल्या व खरे पडलेल्या कुर्त्याला उचलून, त्याला आपल्यासमोर घेऊन येण्याचे जे लाजिरवाणे कृत्य करायला तयार झाले, ते नोकरी टिकवण्याच्या लोभापायीच ना?पंडित चरवाहांनी केलेल्या या खुलाशांनं राजाचे पूर्ण समाधान झाले. त्याने त्याला इनाम दिले व दिलेल्या शब्दाप्रमाणे पंडित अभिलाषानंदाला नोकरीवर राहू दिले.

किती चतूर बायका

एक गृहस्थ सकाळी सकाळीच आपल्या बायकोवर अत्यंत शुल्लक अशा कारणास्तव रागावला. अगदी तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. दुपारचं जेवणसुध्दा त्यानं मिटल्या तोंडानं

घेतलंदिवस अशा र्तहेने सरला. संध्याकाळ झाली नव्हे रात्रही झाली आणि चूपचाप जेवून तो झोपायच्या खोलीत गेला व दिवा न लावता अंथरुणावर आडवा झाला.

राग असो वा लोभ असो, तो मर्यादेनंच शोभून दिसतो. सुंदर दिसणारं बाळसेदार शरीरसुद्धा अति बाळसेदार झालं की बेढब दिसू लागत. ‘ह्यांच'श् वागणसुध्दा असंच मर्यादा सोडून नाही का ? भांडणाचं कारण ते क्षुल्लक, आणि त्याकरिता यांनी दिवसभर रागावून रहावं ? ते काही नाहीय यांच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे, असा विचार करुन त्या गृहस्थाच्या चतूर बायकोनं एक मेणबत्ती पेटविली आणि ज्या खोलीत तो झोपला होता, त्या खोलीचा कानाकोपरा ती त्या मेणबत्तीच्या प्रकाशात

धुंडाळू लागली.

बराच वेळ झाला तरी आपल्या बायकोचं धुंडाळणं संपत नाहिसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या गृहस्थानं तिला विचारलं, ‘काय गं? काय शोधते आहेस?'यावर ती म्हणाली, ‘सकाळपासून तुमची वाचा कुठे गडप झाली, ती शोधत होते पण अखेर सापडली “तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं त्या गहस्थाला एकदम हसू फुटलं व बायकोवरचा त्याचा राग कुठल्याकुठे निघून गेला !

अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा

भोजराजाच्या दरबारात असलेला महाकवी कालिदास याच्यापुढं आपलं तेज पडत नसल्यामुळे, त्याच्यावर आतून जळणारे बरेच विद्वान व कवी होते. त्यात शतंजय हाही एक कवी होता. एकदा त्यानं आपलं महत्त्व वाढविण्यासाठी व विशेषकरुन कालीदासाला बदनाम करण्यासाठी भूर्जपत्रावर एक श्लोक लिहिला व ते भूर्जपत्र आपल्या शिष्याला भोजराजाकडे पोहोचतं करायला सांगितलं.

गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्याचा शिष्य ते भूर्जपत्र हाती घेऊन राजाकडे चालला असता वाटेत त्याची व कालीदासाची भेट झाली, ‘हा शतंजय शिष्य राजाकडे चालला असावा' असं वाटल्यावरुन कालिदासानं त्याला मुद्दाम विचारलं, काय रे वत्सा ? किती लांब चालला आहेस?

शतंजय कवीच्या शिष्याला श्लोक काय आहे, याची कल्पना नसल्यामुळं तो सहज बोलून गेला, माझ्या गुरुंनी या भूर्जपत्रावर लिहिलेला एक श्लोक, त्यांच्या आज्ञेवरुन मी भोजमहाराजांना द्यायला चाललो आहे.'

कालीदासाने ते भूर्जपत्र आपल्या हाती घेऊन तो श्लोक वाचला. तो पुढीलप्रमाणे होता रू

श्लोक

अपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम । कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजयरू ।

(भावार्थ रू माघ कवीच्या काव्यात शंभर, भारता त तिनशे तर कालिदासाच्या काव्यांत किती अपशब्द (शिव्या) आहेत, त्याला गणनाच नाही, शतंजय कवीला मात्र ( त्या कवीचे हे दोष दाखवून देण्यासाठी) एकदाच अपशब्द (शिवी) वापरावा लागलो.)

शतंजय कवीने हा श्लोक आपली बदनामी करण्यासाठी लिहिला असल्याचे पाहून कालिदास त्या शतंजय शिष्याला मुद्दाम म्हणाला, श्अरे वारू ! फारच छान लिहिलाय श्लोक तुझ्या गुरुंनी ! फक्त नजरचुकीनं एका शब्दाला काना द्यायचा राहून गेलाय, देऊ का मी तो काना ?

शतंजय शिष्य म्हणाला, ‘वारू ! हे काय विचारणं झालं? ती चूक जरुर दुरुस्त करा. माझ्या गुरुंना कमीपणा येता कामा नये.'

कालीदासाने श्लोकातील श्अपशब्दश् या शब्दातल्या श्अश् ला काना दिला, आणि त्याचा ‘आपशब्द' असा शब्द बनवला. त्यामुळे तो श्लोक पुढीलप्रमाणे बनून, त्याचा अर्थही पार बदलून गेला.

श्लोक

आपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम । कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजयरू ।

(भावार्थ रू माघ कवीच्या एका श्आपश् म्हणजे पाणी या शब्दाला समानार्थी असे एकूण शंभर शब्द आहेत. भारतात त्यांची संख्या तिनशे आहे. कालिदासाच्या काव्यात तर एका पाण्याला समानार्थी असे किती शब्द आहेत, त्याला गणना नाही, फक्त (शब्दसंपत्तीच्या बाबतीत दरिद्री असलेल्या) शतंजय कवीच्या काव्यात आप म्हणजे पाणी हा एकच शब्द प्रत्येक ठिकाणी वापराला गेला आहे.)

शतंजय शिष्याने तो श्लोक भोज राजाकडे पोचता केला. राजाने भर दरबारात तो श्लोक वाचून दाखविताच कालिदासाची मान उंच झाली, तर शतंजय कवीची मान लज्जेने खाली गेली !

चोरावर मोर

रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.

हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन र्चोया करायला लावील,श् असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडर्णाया मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?श्

तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्‌यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई—बाबा मला बेदम चोप देतील.श्

तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळय मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.'

त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलिसठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.

राजा शरमिंधा झाला

कवी गुरु कालीदास हा एका कलावंतिणीला गाणं शिकवायला जाई. राजा भोजही तिच्याकडे अधूनमधून तिचं नृत्य पाहायला जाई. आपण जिच्याकडे जातो, तिच्याकडे कालीदासही जातो, असं कळताच राजानं त्याची फजिती करायचं ठरवलं.

तो त्या कलावंतिणीकडे गेला असता तिला म्हणाला, श्हे पहा शुभानना, कालीदास आज तुझ्याकडे

येईल तेव्हा त्याला सांग की, संपूर्ण हजामत केल्याशिवाय उद्या तुम्ही माझ्याकडे यायचं नाही. श्कलावंतिणीने कालीदासाला याप्रमाणं सांगताच याच्यामागे राजाचा हात असल्याचा त्याला संशय आला. तो तिला म्हणाला,‘ खरं सांग, तू मला हे जे हजामत करून यायला सांगितलंस, ते महाराजांच्या सांगण्यावरुन ना?'

तिनं ते मान्य करताच कालीदास तिला म्हणाला, श्महाराज या राज्याचे राजे असतील, पण मी तुझा गुरु आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा तू मलाच अधिक मानले पाहिजेस. म्हणून मी सांगतो तसं करायचं. मी तर तुझ्या इच्छेप्रमाणे उद्या रात्री संपूर्ण क्षौर करुन येतोच पण मी येऊन गेल्यानंतर महाराज तुझ्या घराचे पुढले दार ठोठावू लागले की त्यांना तू म्हण, महाराज ! गाढवासारखा आवाज काढल्याशिवाय मी आज आपल्याला आत घेणार नाही. तुझ्या भेटीसाठी आतूर झालेले महाराज तुझा हट्ट पुरविण्यासाठी तसे ओरडायला कमी करणार नाहीत.'

दुर्सया दिवशी राजा त्या कलावंतिणीकडे गेला व तिने हट्ट धरल्यामुळे गाढवासारखा ओरडला. त्याच्या दुर्सया दिवशी कालीदासाला हजामत करुन दरबारात आल्याचे पाहून भोजराजानं खवचटपणे त्याला विचारलं, ‘काय कविराज ! आपण आज संपूर्ण क्षौर का बरं केलयं ?'यावर कालीदासानं उत्तर दिलं, ‘काल रात्री मी गाढवाचा आवाज कला. गाढवाचा आवाज रात्री कानी पडला म्हणजे संकट ओढवतं, असं मानलं जातं. ते संकट येऊ नये म्हणून क्षौर करावं, असं शास्त्र सांगतं.' कालीदासाच्या या चपलख उत्तरानं राजा शरमिंधा झाला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED