Chatur Vhya 2 books and stories free download online pdf in Marathi

चतुर व्हा 2

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

पाचशे साक्षीदार

एका लबाड सावकाराने एका शेतर्कयाचे झोपडीवजा घर भाडयाने घेतले. पंधरावीस वर्षे त्याने ते आपल्या नोकरांना रहाण्यासाठी वापरले व त्याचे त्या शेतर्कयाला भाडेही दिले. पण पुढे त्या शेतर्कयाला भाडे दयायचे बंद केले व ते घर आपलेच आहे, असे तो म्हणू लागला. हा व्यवहार विश्वासावर झाल्याने, त्या शेतर्कयापाशी लेखी पुरावा नव्हता. तरीही त्याने ते घर आपल्याला मिळावे म्हणून त्या सावकाराविरुध्द न्यायालयात दावा केला.

न्यायालयात दावा सुनावणीला निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री तो लुच्चा सावकार पाचशे रुपयांची थैली घेऊन न्यायमुर्तीकडे गेला. त्यांना म्हणाला, श्साहेब ! ती झोपडी जरी त्या शेतर्कयाची असली, तरी मी त्याला तिचं गेली वीस वर्षे भाडं दिलेलं आहे. ती जर माझ्या मालकीची झाली, तर ती पाडून मी तिच्या जागी माझ्या दुर्सया मुलासाठी बंगला बांधीन. तेव्हा हे पाचशे रुपये घ्या आणि उद्या न्यायालयात माझ्या बाजूनं निकाल द्या.श् त्या न्यायाधीशाने काहीएक न बोलता ती पाचशे रुपयांची थैली घ् ोतली.

सावकार मोठया खुषीत आपल्या घरी निघून गेला.दुर्सया दिवशी न्यायालयात दावा सुनावणीला निघ् ााला असता न्यायमूतीर्ंनी त्या सावकाराला विचारले, श् ईश्वराला स्मरून सांगा की, ती झोपडी खरी कुणाची आहे? कारण या शेतर्कयांच म्हणणं असं आहे की, ती त्याची आहे.श्

सावकार ईश्वराची शपथ घेऊन म्हणाला, श्साहेब ! ती झोपडी माझीच होती आणि आजही माझीच आहे. म्हणून तर ती माझ्या ताब्यात आहे. या गावातले एक दोनच नव्हे, तर शंभर साक्षीदार ती झोपडी माझी आहे, सांगण्यासाठी मी न्यायालयात उभे करु शकेन.श्न्यायमुतीर्ंनी त्या शेतर्कयाला विचारलं, श्काय रे बाबा, ती झोपडी तुझी आहे, हे सिध्द करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्यापाशी ? निदान श्ती झोपडी तुझी आहे.श् असं सांगणारा, या गावातला एकादा साक्षीदार तरी तू इथे आणू शकशील का?

दुरूखी स्वरात शेतकरी म्हणाला, श्नाही साहेब. सावकार श्रीमंत असल्याने, जेव्हा त्याने त्याच्या गडी माणसांना रहाण्यासाठी ती झोपडी माझ्याकडे मागितली, तेव्हा तो माझी गरीबाची झोपडी गडप करणार नाही अशा विश्वासाने मी ती त्याच्याकडून काहीएक लिहून न घेता त्याच्या स्वाधीन केली. गेली बरीच वर्षे त्याने मला त्या झोपडीचे भाडेही दिले. पण जेव्हा त्याने भाडे देण्यास नकार दिला व ती झोपडी आपलीच असल्याचे सांगू लागला, तेव्हा मला न्यायालयात यावे लागले.

पैसा व दरारा यांच्या जोरावर सावकार शंभरच नव्हे तर पाचशे साक्षीदारसुध्दा त्याच्या बाजूने उभे करील, पण मज गरीबाची बाजू घेऊन, या सावकाराला दुखविण्याचं धारिष्ट या गावात कोण करील ? सावकार म्हणाला, कलतं ना साहेब, किती खोटं बोलतो आहे हा ? ती झोपडी याचे आहे असं सांगणारा

एकही लेखी पुरावा याच्यापाशी नाही, आणि एकही साक्षीदार हा इथे आणू शकत नाही, तेव्हा ती झोपडी माझी आहे, हे आपल्याला पटले ना ? न्यायमुर्ती सावकाराला म्हणाले, श्तुझी बाजू सत्याची आहे, असं सांगणारे शंभर साक्षीदार तू माझ्यापुढे आणायला तयार आहेस, पण ती झोपडी या शेतर्कयाची आहे असं सांगणारे पाचशे साक्षीदार अगोदरच माझ्याकडे आलेले आहेत. याप्रमाणे बोलून व आदल्या दिवशी सावकाराने लाच म्हणून दिलेले पाचशे रुपये टेबलावर ठेवून, न्यायमुर्ती त्याला म्हणाले, ती झोपडी त्या शेतर्कयाची असूनही ती गिळंकृत करण्यासाठी काल तू माझ्या घरी आणून लाचेखातर मला दिलेले हे पाचशे रुपये या शेतकर्‌याची बाजू न्यायाची आहे, असं ठणकून सांगणारे पाचशे साक्षीदार आहेत. तेव्हा तू आज संध्याकाळपयर्ंत ती झोपडी या शेतकर्‌याला द्यावीस . तू मला लाच देण्याचा प्रयत्न केलास म्हणून तू सरकारात १००० रुपये दंड भरावा, आणि लाच म्हणून तू मला देऊ केलेले हे पाचशे रुपये तू या

शेतर्कयाला त्या झोपडीची डागडुजी करण्यासाठी द्यावे, असा मी निर्णय देत आहे.?

हंस कोणाचा ?

भगवान गौतमबुध्दांच्या बालपणीची गोष्ट. दहा अकरा वर्षाचं वय होतं त्या वेळी त्यांचं आणि ते तेव्हा त्यांच्या मूळ श्सिध्दार्थश् या नावानंच ओळखले जात होते. एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता—बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजलं, आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नतंर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली.

एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडं बरं वाटू लागलं.

तेवढ्यात सिध्दार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, सिध्दार्था,

या हंसाला बाण मारुन मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर. श्सिध्दार्थ म्हणाला, श्देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जिवाचं रक्षण करणार्‌याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, तेव्हा हा हंस आता माझाच आहे..

अखेर देवदत्त हा सिध्दार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्था विरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही कून घेतलं. त्यानंतर ते सिध्दार्थला म्हणाले, बाळ ! एकून धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलसं म्हणून हा हंस तुझा आहे हे खरं असलं, तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पुर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होता. या हंसाला देवदत्तानं घ् ाायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो.

यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, श्महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणानं अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्या नाही काय ?श्बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दीतेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मलाच कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ.

न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले, आणि तिथून परस्परविरुध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तानं टाळी वाजवून श्ये,ये,श् म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं, पण त्या हंसानं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच श्येश् म्हणताच, तो जखमी हंस मोठया कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला! तो प्रकार पाहून न्यायमुर्ती म्हणाले, हंस कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्न उरत नाही.

आई ती आई

मूल होत नसलेल्या एका बाईने दुर्सया एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खर्‌या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागलीय पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुतीर्ंनाही या दोघींतली खरी आई कोण ? हा प्रश्न पडला.

अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तर्‌हेनं मुद्दाम म्हणाले, श्ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी

या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.

न्यायमुतीर्ंचा हा कठोर निर्णय कून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुतीर्ंना म्हणाली, श्महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं. महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला? त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, श्हे बालक या बाईचंच आहे. श्त्याला कापण्यात यावं, श्असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.

अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खर्‌या आईला देण्यात येऊन, न्यायमुतीर्ंनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

तर मी तुझा मुलगा उठवीन

लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले. त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुलं मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, श्भगवन! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.

चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्‌यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन. बुध्ददेवांचे हे आश्वासन कून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रतेक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्‌ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !

एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, श्दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या

धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुर्सया घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली! कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.

या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, श्भगवन! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तर्‌हेचे गहू मी आणू शकले नाही. बुध्ददेव म्हणाले, श्माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्यावजी आज मृत्यू आला, म्हणून असं दुरूख करीत बसणं योग्य आहे का? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दुरूख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दुरूखी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.

तुला हवं, ते त्याला दे

एका श्रीमंत माणसाने मरण्यापूर्वी मृत्युपत्र केले. त्यात त्याने, आपला एकुलता एक मुलगा अजून श्सज्ञानश् झाला नसल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्थलावर व जंगम मालमत्तेची देखरेख आपला परम मित्र देवेंद्र आधाशे याने करावी, आणी आपला मुलगा सज्ञान होताच, आपल्या मित्राने एकूण मालमत्तेतील त्याला हवा तो भाग माझ्या मुलाला दयावा व उरलेला भाग त्याने स्वतरूला घ्यावा, असे लिहिले. हे मृत्युपत्र करुन झाल्यावर तो गृहस्थ मरण पावला.

चार वषार्ंनी त्या मृत मनुष्याचा मुलगा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे अठरा वषार्ंचा झाल्यावर, त्याने त्या देवेंद्र आधाशेकडे आपल्या वडिलांच्या मालमत्तेवरील ताबा मागितला. तेव्हा त्या अधाशी आधाशेने मृत मित्राच्या चाळीस शेतांपैकी फक्त एक शेत, चार घरापैंकी फक्त एक घर आणि बॅंकेतील एक लाख रुपयांपैकी केवळ पाच हजार रुपये त्याच्या मुलाला देऊ केले. या दगलबाजीमुळे भडकून गेलेल्या त्या मुलाला आधाशे म्हणाला, श्तुझ्या वडिलांनी मृत्युपत्रात मला हवं ते मी तुला द्यावं व उरलेलं मी घ्यावं, असं स्पष्ट लिहिलं असल्यामुळे, माझ्या मर्जीनुसार मी जे तुला देतो आहे, ते तू निमुटपणे घेय नाहीतर मी तेही तुला देणार नाही.

आपल्या वडिलांच्या मित्राने केलेल्या फसवणुकीबद्दल त्या मुलाने त्याच्याविरुध्द न्यायालयात दावा केला. दाव्याची सुनावणी सुरु होताच न्यायमुतीर्ंनी त्या लुच्च्या गृहस्थाला विचारलं, देवेंद्र आधाशे! तुझ्या मित्रान मृत्युपुर्वी जे मृत्युपत्र केलं, त्यात काय लिहिलं आहे? आधाशे म्हणाला, श्हे पहा ते मृत्यूपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे, की माझ्या मित्राला हवं ते त्याने माझ्या मुलाला द्यावे व बाकीचे त्याने घ्यावे.

न्यायमुतीर्ंनी पुन्हा विचारलं, मग आधाशे! तुझ्या तुझ्या मित्राच्या स्थावर—जंगम मालमत्तेपैकी तुला काय काय हवे? आधाशे म्हणाला, श् माझ्या दिवंगत मित्राच्या चाळीस शेतांपैकी ३५ शेते, चार घरांपैकी तीन घरे, आणि बँकेतील त्याच्या खाती असलेल्या एक लाख रुपयांपैकी पंच्याण्णव हजार एवढे मला हवे.?

यावर न्यायमुर्ती म्हणाले, तुझ्या मुत्राने मृत्युपुर्वी केलेल्या मृत्युपत्रात ज्या अर्थी तुला हवे ते तू त्याच्या मुलाला द्यावे असे लिहिले आहे, आणि ज्याअर्थी तुला पस्तीस शेते, तीन घरे व पंच्च्याण्णव हजार रुपये हवे आहेत, त्याअर्थी तुला हवे असलेले हे सर्व तू या मुलाला दे आणि उरलेली पाच शेते व एक घर आणि पाच हजार रुपये तू स्वतरूकडे ठेव. मृत्युपत्रातील भाषेचा न्यायमुतीर्ंनी जो चातुर्यपूर्ण अर्थ लावला, त्यामुळे त्या अधाशी आधाशेचा आवाज बंद झाला आणि निर्णयानुसार त्याने त्या मुलाला त्याचा योग्य वाटा देऊन टाकला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED