चतुर व्हा 3 MB (Official) द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चतुर व्हा 3

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

तू मला मिठासारखी

सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते? गोपालकृष्ण म्हणाले, श्सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस. लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस.

आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे कून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर श्पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, श्असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा—निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड करायला सांगितले. स्वयंपाक तयार झाला.

अगदी सुचनेनुसार पुर्णपणे आळणी. गोपालकृष्ण जराही कुरबुर न करता नेहमीप्रमाणे पोटभर जेवले. त्यांच्यानंतर रुक्मिणी व सत्यभामा या जेवायला बसल्या. वरणभाताचा पहिला घास तोंडात घालतात, तो वरणाला मीठ नाही. आमटी व भाजी चाखून बघितली, तर त्यांचीही तीच गत ! अगोदरच रागावलेली रुक्मिणी स्वयंपाक्यावर खेकसून म्हणाली, श्आज स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे दुसरीकडे होतं का? स्वयंपाक पार आळणी झालाय !श् भगवंताच्या सुचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, श्आज मीठ संपल होत म्हणून स्वयंपाक आळणी करणं भाग पडलं. अर्थातच श्रीखंड होतंय तेव्हा बाकीच स्वयंपाक आळणी असला तरी निभावून नेता येइल, असं मला वाटलं.

रुक्मिणी म्हणाली, श्श्रीखंडाशिवाय जेवण अडून रहात नाही. इतर सर्व स्वयंपाक चांगला असला की झालं, आणि इतर सर्व स्वयंपाक मिठाशिवाय चांगला होणं शक्य आहे का? रुक्मिणीन पानात प्रथम वाढलेलं अन्न कसंबसं संपवलं, आणि ती आणि ती अर्धपोटीच उठून आपल्या महालात जाऊन फुरंगटून बसली. तिच्या पाठोपाठ गोपालकृष्ण तिच्या महालात गेले आणि मुद्दाम म्हणाले, श्रुक्मिणी आज तुझं जेवण

एवढ्या लवकर कसं झालं ? मला वाटलं, आज जेवणात श्रीखंडाचा बेत आहे, तेव्हा जेवण सावकाशीन आस्वाद घेत घेत होणार.

रुक्मिणी रागानं म्हणाली, श्रीखंडाचं कौतुक तुम्हालाय मला नाही. बाकीचा स्वयंपाक नुसता आळणी होताय आणि कारण विचारलं तर बल्लवाचार्य म्हणतो, मीठ संपून गेलंय ! मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव येईल का?श् यावर गोपालकृष्ण पटकन म्हणाले, मीठ नाही म्हणजे स्वयंपाकाला चव नाही, हे तुच म्हणतेस ना ? मग मी मघाशी म्हणालो की तू मला मिठासारखी प्रिय आहेस. अग, तुझ्याशिवाय माझं जीवन बेचव होईल जाईल. पतीच्या बोलण्यातली ही खोच लक्षात येताच रुक्मिणी कळी एकदम खुलुन गेली.

भीमटोला

एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला.

धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. धर्मराजांचं ते अश्वासन कुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं कलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.

दरबारातून बाहेर पड्‌ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्‌ल्याही र्तहेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चयार्ंची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता.

नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज? कुन ‘काय आनंददायी घडले?' हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास? भीम म्हणाला, श्दादा, आजपयर्ंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा श्वरचं आमंत्रण येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढ्‌कलु नये.

पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.श्या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघ् ाडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.

यात माझा काय अपराध ?

श्री पांडूरंगाला अलंकार वस्त्रे अर्पण करण्यासाठी एक श्रीमंत मनुष्य बर्‌याच दूरच्या गावाहून पंढरपूरास गेला. परंतू मंदिरापाशी जातो, तर त्याला मंदिराचा पुढला दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. मंदिराच्या पायरीवर बसलेला एक पुजारी म्हणाला, देव झोपलाय.

त्या धनवानाला थांबवायला वेळ नव्हता, पण त्याचबरोबर ते वस्त्रालंकार तर त्याला स्वतरूच पांडूरंगाच्या अंगावर चढवायचे होते. त्याने सभामंडपात असलेल्या र्बयाच बडव्यांनी भेट घेऊन विनवणी केली, पण कुणीच त्याला दाद देईना. एका व्यवहारी बडव्याने मात्र त्या धनिकाला त्याने किती वस्त्रे व अलंकार आणले आहेत ते दाखवायला सांगितले व ते बरेच असल्याची खात्री होताच, तो त्या श्रीमंताला म्हणाला. शेट, ठीक आहे. मी दरवाजा उघडतो, तुम्ही माझ्याबरोबर गार्भायात चला आणि स्वतरू पांडूरंगाच्या देहावर पोषाख व अलंकार चढवा.

त्या बडव्याने त्याप्रमाणे केल्यावर, बाकीचे बडवे त्याच्यावर भडकले. त्यांनी त्या मंदिराच्या विश्वस्तांकडे त्याच्याविरुध्द तक्रार केली. सर्वत्र एकच गहजब सुरु झाला श्या भिकंभटाने देवाची झोपमोड केली !

अखेर त्या बंडखोर बडव्याच्या नियमबाहय वागण्याबद्दल विचार करुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी, मंदिराच्या समस्त विश्वस्त व बडवे मंडळीची संयुक्त सभा भरली व तिच्यात त्या अपराधी बडव्याला उपस्थित होण्याचा हुकुम सोडला गेला.

सभेस आलेल्या त्या बडव्याला प्रमुख विश्वस्ताने विचारले, श्पांडुरंग झोपला असताना तू गाभार्‌याचं दार उघडून त्या धनिकाला आत नेलेस व पांडुरंगाला अलंकार वगैरे अर्पण करण्याची तू त्याला मुभा दिलीस, हे खरे आहे का?श्त्या बडव्यानं उत्तर दिलं, श्खरं आहे.श् विश्वस्तानं विचारलं, श्तू असं का केलसं?श्बडवा — सोन्यारत्नांचे अलंकार ही लक्ष्मी आहे, हे आपल्याला मान्य आहे.विश्वस्त — होय.

बडवा — पांडुरंग हा मूळचा विष्णू आहे, हे आपल्याला मान्य आहे ? विश्वस्त — मान्य केलंच

पाहिजे.

बडवा — मग आता तुम्हीच सांगा, की पती झोपेत असला तरी त्याच्याकडे जाण्याचा पत्नीला

अधिकार असल्यामुळे, मी त्या अलंकाररुपी लक्ष्मीला तिच्या पतीकडे जाऊ दिले, यात माझा काय अपराध

?या बिनतोड युक्तीवादामुळे ती सभा निरुत्तर झाली आणि भिकभंटाची स्वारी सर्वानुमते निरपराध ठरली.

त्यांचा त्रास तू असा चुकव

गुरुगृही अध्ययन करुन घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला, गुरुदेव ! मला रिकामटेकडया आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी

येतातय तास्नतास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात, आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू?

गुरु म्हणाले, श्वत्सा ! तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील, त्यांच्याकडे तू पैसे उसने मागू लाग. असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील.

शिष्य म्हणाला, गुरुदेव ! ही युक्ती मोठी नामी सांगितलीत, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील, तो कसा चुकवू ? गुरु म्हणाले, त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा. म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावेत, या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील.

मृत्यूपुर्वीचे मागणे

राजा सत्येंद्र याच्या राज्यावर स्वारी करुन त्याचा काही प्रदेश जिंकण्यासाठी, राजा बहुसायास याने आपला पराक्रमी व चतुर सेनापती अभंगधैर्य याला प्रचंड सैन्यानिशी पाठविले. पण राजा सत्येंद्र याच्या सैन्यानं पराक्रमाची शर्थ करुन शत्रुसैन्याचा दारुण पराभव केला, आणि त्यांचा सेनापती अभंगधैर्य याला पकडून, आपला राजा सत्येंद्र याच्याकडे नेले. त्या राजाने आपल्या एका सैनिकाला त्या सेनापतीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली.

प्रत्यक्षात शिरच्छेद करण्यापूर्वी राजा सत्येंद्राने त्या शत्रूसेनापतीला विचारलं, तुझं मस्तक आता उडविलं जाणार आहे, तत्पुर्वी तुझी काही खायची वा प्यायची इच्छा असली, तर तू ती मला सांग. तुझी ती इच्छा पूर्ण केली जाईल, आणि मगच तुझा शिरच्छेद केला जाईल.

सेनापती अभंगधैर्य म्हणाला, श्महाराज ! माझा मृत्यू समोर ठाकला असताना, मला खाण्या—पिण्याची इच्छा कशी होणार? तरीसुध्दा मला अत्यंत तहान लागली असल्याने व अशा स्थितीत मृत्यू येणे मला योग्य वाटत नसल्याने, मला फक्त एक प्यालाभर पाणी दिले जावे. राजानं सेवकाकरवी त्या सेनापतीला पाण्यानं भरलेला प्याला दिला. प्याला हाती आला असतानाही शत्रू—सेनापती तो प्याला नुसताच हाती धरुन स्वस्थ उभा राहिला असल्याचं पाहून, राजानं त्याला विचारलं, तुझ्या अंतिम इच्छेप्रमाणे, तुला पाण्यानं भरलेला प्याला देण्यात आला आहे, मग आता ते पाणी तू पीत का नाहीस? अभंगधैर्य म्हणाला, मी हे पाणी पीत असतानाच शिरच्छेद करुन माझा प्राण घेतला जाईल, अशी मला भीती वाटते.

राजा सत्येंद्र म्हणाला, श्हे पहा, हे पाणी पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे मी तुला वचन देतो. मग तर झालं?श् राजाने याप्रमाणे वचन देताच, अभंगधैर्यानं त्या प्याल्यातलं सर्व पाणी जमिनीवर ओतलं. ते पाणी जमिनीवर ओतलं जाताच,

क्षणार्धात ते तिथल्या तिथे जिरुन गेलं. तो प्रकार पाहून राजा सेवकाला म्हणाला, शत्रूचा हा सेनापती, विनाकरण वेळकाढूपणा करीत आहे. याचं मस्तक उडव पाहू ?

यावर शत्रू—सेनापती अभंगधैर्य म्हणाला, महाराज ! श्शब्दाला जागणारा राजा अशी आपली ख्याती आहे. अशा स्थितीत श्हे पाणी तू पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. असं जे आपण मला नुकतंच वचन दिलं होतं, ते आपण मोडणार का? खरं पाहता माझ्या हातातलं ते पाणी आता भुमीनेच पिऊन टाकलं असल्याने, मला ते कधीच पिता

येणार नाही, आणि त्यामुळे दिलेल्या वचनाप्रमाणे आपण माझा शिरच्छेद यापुढे कधीही करणे योग्य ठरणार नाही, शत्रूचा असला, तरी हा सेनापती अतिशय चतुर आहे हे पाहून राजा सत्येंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला, आणि कोणत्याही राजाच्या सैन्याचं सेनापतीत्व वा अन्य अधिकारपद स्वीकारुन आपल्या राज्यावर कधीही चालून न येण्याचं त्याच्याकडून वचन घेऊन, राजा सत्येंद्राने त्याला सोडून दिले.