Kadambari Suni books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी सुनी


कादम्बरी सुनी


© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti.


Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.


Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.


Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

अनुक्रम

हैप्पी गो अनलकी

आभाळ कोसळलं

वर्ल्‌ड अंडर अंडरवर्ल्‌ड

ती कुठे गेली?

स्पंदन

ब्लैंक मेल

मन वढाय वढाय

अजुन एक

पहिली चुक

माय गॉड

विश्वासघात

फर्स्‌ट डेट

चित्र

पाठलाग

काय झालं?

मधुर मिलन

बॉसचा फोन

कमांड 2चा डाव

डाव फसला?

बॉसचा मेसेज

जॉनच्या बॉसची व्हीजीट

डिटेक्टीव्ह

हॅपी बर्थ डे

मिस उटीन हॉपर

वेळेचा घात?

ऋषी

खुनाचा तपास

धाड

बॉसचा पुन्हा फोन

प्रेस कॉन्फरन्स

पॉलीटीक्स

व्हॅकेशन

सुगावा

फिशींग

चार तासांचा अवधी

प्रपोज

चांदन्या रात्री

डिटेक्टव्हचा फोन

सुटीत व्यत्यय

ठोका चूकला

अचानक मेडीयाशी सामना

शून्याचा शोध कुणी लावला?

पुन्हा प्रेस कॉन्फरन्स

एका दगडात दोन पक्षी

आय एम सॉरी बॉस

गुगल सर्च

यस्स

ओ के देन कॉल द मिटींग

मिटींग

अॉडीओ

वनवा

ब्रम्ह हे परीपूर्ण

वाय स्टार

हिलव्ह्यू अपार्टमेंट

भिंतीवरचा शेवटचा

शेवटचे सावज

जशास तसे

आठवणी

आर्यभट्ट

रात्री बेरात्री

आठवणी

आर्यभट्ट

रात्री बेरात्री

कंपाऊंडच्या आत

बहरलेली वेल

रेकॉर्ड डिटेल्स

डॉ. कयूम खान

कागदाची पुंगळी

झीरो मिस्ट्री

शुन्यातून शुन्याकडे

हैप्पी गो अनलकी

हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते.

उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य. वातावरणावरून तरी कोणता काळ असावा हे ओळखणं अशक्यच. हजारो, लाखो र्वाापासूनच्या अशा वातावरणात मानवाच्या प्रगतीचं प्रतीक असलेल्या गोटींचं जर अतिक्रमण नसेल तर जुना काळ काय आणि आधुनिक काळ काय, सारखाच. अशा या जागी डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या शेजारी एक दुर्गम गुहा होती. गुहेभोवतीचे उंच हिरवेगार सळसळते गवत हवेच्या झुळकेसोबत मधून मधून डोलत होते. त्या प्राचीन गुहेत एक ऋषी ध्यानमग्न बसलेला होता. डोक्यावर जटांचे बुचडे बांधलेले. दाढी मिशा वाढून वाढून थकलेल्या. कितीतरी र्वााच्या साधनेने, एक तेज, एक गांभीर्य ऋषीच्या चेहर्‌यावर आलेलं होतं. आजूबाजूच्या परिसरापासून अनभिज्ञ. नव्हे काळ, जागा आणि शरीरापासून अनभिज्ञ त्याचे विचरण कालत्रयी युगे युगे चाललेले असावे. अनादि अनंत सनातन काळातून विचरण करता करता या आधुनिक काळात त्या ऋषीच्या सूक्ष्म जाणीवेने प्रवेश केला...

अमेरिकेतील एका शहरातील रस्त्याच्या फुटपाथवर संध्याकाळच्या वेळी लोक आपल्या आधुनिकतेच्या रूबाबात चालत होते. रस्त्यावरून वाहने धावत होती. लोक आपापल्यातच एवढे अंतर्मुख होते की एकमेकांकडे लक्ष द्यायलासुध्दा त्यांना वेळ नव्हता. सगळं कसं सुरळीत , पूर्वनियोजित असल्यासारखं एखाद्या स्वयंचलित यंत्रागत. सवार्ंची नजर कशी नाकाच्या दिशेने सरळ. कदाचित ते लोक इकडे तिकडे बघणंं म्हणजे बावळटपणा किंवा शिटाचाराच्या विरुध्द मानत असावेत. अशा या लोकांच्या समूहातील एक सुंदर स्त्री अँजीनी आपल्या हातात शॉपिंगची बॅग घेऊन एका दुकानात जायला निघाली होती. अँजेनी एक बावीस तेवीस र्वााची लाघवी , रेखीव चेहर्‌याची, सदा हसतमुख अशी तरुणी होती. एका हाताने आपल्या कपाळावर येणार्‌या केसांच्या बटा सावरत आणि दुसर्‌या हातात शॉपिंगची बॅग सांभाळत ती दुकानात जात होती. तिच्या काठोकाठ भरलेल्या शॉपिंग बॅगवरून तरी असे जाणवत होते की तिची जवळपास खरेदी पूर्ण झाली असावी, फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या असाव्यात. अचानक एक पोलीस व्हॅन सायरन वाजवीत रस्त्यावरून धावायला लागली. लोकांचा सुरळीतपणा जसा भंग झाला. अँजेनी दरवाजातच थांबून काय झालं ते बघायला लागली. कुणी चालता चालता थांबून, कुणी चालता चालता वळून काय झालं ते बघायला लागले. जणू कितीतरी दिवसानंतर त्यांच्या भावशून्य यांत्रिक मख्ख चेहर्‌यावर भीतीचे भाव उमटायला लागले. काही जण तर तसेच भावशून्य मख्ख चेहर्‌यांनी काय झालं ते बघायला लागले चेहर्‌यांवर कोणतेही भाव दाखवणं कदाचित त्यांच्या शिटाचारात बसत नसावं. पोलीस व्हॅन आली तशी भरधाव वेगाने निघून गेली. रस्ता थोडा वेळ पाण्यात दगड पडून तरंग उठावेत तसा विचलित झाल्यासारखा झाला. आणि पुन्हा पूर्ववत, स्वयंचलित यंत्रागत, जसे काही झालेच नाही असा झाला. अँजेनी दरवाजातून वळून दुकानात गेली. तिला काय माहित होते की आता रस्त्यावरून गेलेल्या पोलीस व्हॅनचा तिच्या जीवनाशी पण काहीतरी संबंध असावा.

पोलीस व्हॅन एका गजबजलेल्या वस्तीत एका अपार्टमेंटच्या खाली थांबली. वस्तीत एक अनैसर्गिक शांतता पसरली. गाडीतून घाईघाईने पोलीस अॉफिसर जॉन आणि त्याची टीम उतरली. काही जण अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसलेले होते ते वाकून खाली पोलीस व्हॅनकडे बघायला लागले. उतरल्याबरोबर जॉन आणि त्याच्या टीमने अपार्टमेंटच्या लिफ्टकडे धाव घेतली. ड्रायव्हरने गाडी आत नेवून पाकिर्ंगमध्ये पार्क केली. जॉन आणि त्याचे सहकारी लिफ्टजवळ आले. लिफ्ट जागेवर नव्हती. जॉनने लिफ्टचे बटन दाबले. बराच वेळ वाट पाहूनही लिफ्ट यायला तयार नव्हती.

शिट चिडून जॉनच्या तोंडून निघाले.

जॉन अस्वस्थतेने लिफ्टचे बटन पुन्हा पुन्हा दाबायला लागला. थोड्या वेळाने लिफ्ट खाली आली. जॉनने लिफ्टचे बटन पुन्हा एकदा दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला. आत एकच माणूस होता, काळं टी शर्ट घातलेला. त्याही परिस्थितीत त्याच्या टी शर्टवर लिहिलेल्या अक्षराने जॉनचे लक्ष आकर्िात केले. त्याच्या काळ्‌या टी शर्टवर पांढर्‌या अक्षराने लिहिलेले होते

झीरो.

तो माणूस बाहेर येताच जॉन आणि त्याचे साथीदार लिफ्टमध्ये घुसले. जॉनने 10 नं. च्या फ्लोअर चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

10 नं. फ्लोअरला लिफ्ट थांबली. जॉनसहित सगळे जण भराभर बाहेर आले. त्यांनी बघितले तो समोरच एक फ्लॅट सताड उघडा होता. ते सगळे जण उघड्या फ्लॅटच्या दिशेने धावले. ते एकमेकांना कव्हर करीत हळू हळू फ्लॅटमध्ये जायला लागले. हॉलमध्ये कुणीच नव्हते. जॉन आणि अजून दोन जण बेडरूमकडे वळले. बाकीचे कुणी किचन , स्टडी रूम आणि बाकीच्या रूम्स बघू लागले. किचन आणि स्टडी रूम रिकामीच होती. जॉनला बेडरूमध्ये जातांनाच बेडरूममधले सामान अस्ताव्यस्त झालेले दिसले. त्याने आपल्या साथीदारांपैकी दोघांना खुणावले. जॉन आणि त्याचे दोन साथीदार हळू हळू बेडरूममध्ये जाऊ लागले. ते एकमेकांना कव्हर करीत आत घुसताच, समोर एक विदारक दृय त्यांच्यापुढे वाढून ठेवलेले त्यांना दिसले. एक रक्तबंबाळ माणूस बेडवर पडलेला होता. त्याचे शरीर निश्चल होते, एकतर त्याचा जीव गेलेला असावा किंवा तो बेशुध्द झालेला असावा. जॉनने समोर जाऊन त्याची नाडी बघितली. त्याचे प्राणपाखरू केव्हाच उडून गेलेले होते.

इकडे आहे ... इकडे

जॉनच्या सोबत असलेला एक साथीदार ओरडला.

आता जॉनच्या मागे त्याचे बाकीचे साथीदारसुध्दा आत आले. जॉनने आजूबाजूला न्याहाळून बघितले. अचानक त्याचे लक्ष ज्या भिंतीला बेड लागून होता त्या भिंतीने आकर्िात केले. भिंतीवर रक्त उडाले होते किंवा रक्ताने काहीतरी लिहिलेले होते. जॉनने लक्ष देऊन बघितले. ते लिहिलेलेच असावे कारण भिंतीवर रक्ताने एक गोल काढण्यात आला होता.

गोलचा अर्थ काय असावा?

जॉनचे विचारचक्र फिरायला लागले. आणि ते रक्त या शवाचेच आहे की अजून कुणाचे? ते खुन्याने काढलेले असावे की मग जो मेला त्याने मरायच्या आधी काढले असावे?

यू पिपल कॅरी अॉन जॉनने त्याच्या साथीदारांना त्यांची इन्वेस्टीगेशन प्रोसीजर सुरू करण्यास सांगितले.

त्याचे साथीदार आपापल्या ठरवून दिलेल्या कामात गुंतून गेले. जॉनने बेडरूममध्ये एकदा पुन्हा आपली नजर सगळ्‌या गोटींकडे बारकाईने न्याहाळत फिरविली. बेडरूममध्ये कोपर्‌यात एक टेबल ठेवले होते. टेबलवर एक फोटो होता. फोटोच्या बाजूला काही पाकिटे पडलेली होती. जॉनने एक पाकिट उचलले. त्यावर लिहिलेले होते

प्रति — सानी कार्टर.

कदाचित मृतकाचं नाव सानी कार्टर होतं आणि ही पाकिटं त्याला डाकेतून आली होती. जॉनने बाकीची पाकिटं उचलून बघितली. पाकिटं चाळीत जॉन खिडकीजवळ गेला. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर नयनरम्य तलावाचं दृय होतं. फ्लॅटला बाहेर किती सुंदर व्ह्यू होता. काही क्षणांकरीता का होईना जॉन स्वतरूला आणि सभोवतालच्या परिस्थितीला विसरून गेला. गोल तलावाला वेढणारी हिरवीगार हिरवळ पाहून जॉनचं मन जणू अंतर्मुख झालं होतं. तलावाकडे पाहता पाहता तलावाच्या आकाराने त्याचे विचार त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जोडले गेले. तलावाचा आकार जवळपास गोलाकारच होता. जॉनची विचारचक्रे पुन्हा धावू लागली...

....भिंतीवर गोलाकार काय काढले असावे?

अचानक जॉनच्या डोक्यात विचार चमकला.

गोल म्हणजे श्झीरोश् तर नसावा.... हो नक्कीच गोल म्हणजे झीरोच असावा.

त्याने आवाज दिला सॅम आणि तू डॅन

यस सर सॅम आणि डॅन समोर येत म्हणाले.

आपण लिफ्टमध्ये चढतांना आपल्याला एक काळ्‌या टी शर्टवाला माणूस दिसला होता... आणि त्याच्या टी शर्टवर श्झीरोश् असं लिहिलेलं होतं ...लक्ष होतं ना तुमचं? जॉनने त्यांना विचारलं.

हो सर, माझ्या लक्षात आहे त्याचा चेहरा सॅम म्हणाला.

हो सर, माझ्या पण लक्षात आहे डॅन म्हणाला.

गुड... लवकरात लवकर खाली जा आणि बघा तो खाली सापडतो का ते?... जा लवकर तो अजूनही जास्त दूर गेलेला नसावा.

जॉनचे साथीदार सॅम आणि डॅन जवळजवळ धावतच निघाले.

आभाळ कोसळलं

अँजेनीने तिची कार अपार्टमेंटच्या पाकिर्ंगच्या जागेकडे वळविली तेव्हा समोर तिला मगाशी दिसलेली पोलीस व्हॅन पार्क केलेली दिसली. तिला धडधडायला लागलं. काय झालं असावं? ती कारमधून उतरून आपल्या शॉपींग बॅग्ज सांभाळत घाईघाईने लिफ्टकडे गेली. लिफ्ट उघडून दोन पोलीस बाहेर येत होते. पोलीसांना पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. तिने लिफ्टमध्ये जाऊन बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10. लिफ्टमधून बाहेर आल्या आल्या जेव्हा अँजेनीने आपल्या सताड उघड्या फ्लॅटसमोर गर्दी बघितली, तिला हातपाय गळाल्यासारखे झाले. तिच्या हातातल्या शॉपींग बॅग्ज गळून पडल्या. ती तशीच गर्दीकडे धावत निघाली. काय झालं? तिने कसबसं जमलेल्या लोकांना विचारलं. सगळे जण गंभीर होऊन फक्त तिच्याकडे बघायला लागले. कुणीही बोलायला तयार नव्हता. ती घरात गेली. बेडरूमकडे सगळ्‌या पोलिसांचा रोख पाहून ती बेडरूमकडे गेली. जाता जाता तिने पुन्हा एका पोलिसाला विचारले काय झालं? तो फक्त बेडरूमच्या दिशेने बघायला लागला. ती घाईघाईने बेडरूममध्ये गेली. समोरचे दृय पाहून तिचे राहिलेलेे अवसानसुध्दा गळून गेले. समोर तिच्या नवर्‌याचे रक्तबंबाळ मृत शरीर पाहून ती जागेवरच कोसळली. कसेबसे तिच्या तोंडून निघाले—सानी... तिची ती स्थिती पाहून तिला सावरण्यासाठी जॉन तिच्याजवळ गेला. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण हे काय? जॉनच्या लक्षात आले की तिचा श्वासोश्वास बंद पडला होता. जॉनने पटकन आदेश दिला अलेक्स कॉल द डॉक्टर इमीडीएटली... आय थींक शी हॅज गॉट अ ट्रिमेंडस शॉक. अलेक्स पटकन फोनकडे गेला. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. सर शी नीड्‌स आर्टिफिशीअल ब्रीदिंग कुणीतरी सुचविले. जॉनने आपल्या तोंडातून तिच्या तोंडात हवा भरली आणि तिचे हृदय सुरू होण्यासाठी तिच्या छातीवर जोर देऊन दाब द्यायला लागला 101, 102, 103. मोजून त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडात हवा भरली आणि तिच्या छातीवर जोर देऊन दबाव द्यायला लागला 101, 102, 103. असे अजून एकदोन वेळ करून जॉनने तिचा श्वास बघितला. एकदा गेलेला श्वास पुन्हा परत यायला तयार नव्हता. एव्हाना त्याचे साथीदार जवळ येऊन जमा झाले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून तो तिच्या तोंडात हवा भरून मोजायला लागला 101, 102, 103. हॉस्पिटल मध्ये अँजेनीला इंटेसीव्ह केअर युनिट मध्ये हलविण्यात आले होते. बाहेर दरवाजाजवळ जॉन आणि त्याचा एक साथीदार उभा होता. तेवढ्यात आय.सी.यू मधून डॉक्टर बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी त्यांच्या तोंडावरचे हिरवे कापड बाजूला सारले. जॉन त्यांच्या जवळ येऊन ते काय म्हणतात याची आतुरतेने वाट पाहू लागला. शी इज आऊट अॉफ डेंजर.... नथींग टू वरी डॉक्टर म्हणाले. तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची घंटी वाजली. जॉनने मोबाईलचे एक बटन दाबून कानाला लावला, यस सॅम तिकडून आवाज आला सर, आम्ही त्याला सगळीकडे शोधलं पण तो आम्हाला सापडला नाही. नाही सापडला?... आपण येण्यात आणि तो जाण्यात असे किती वेळाचे अंतर होते?... तो जवळपासच कुठेतरी असायला पाहिजे होता.जॉन म्हणाला. नाही सर.... कदाचित त्याने नंतर त्याचा टी शर्ट बदलला असावा कारण आम्ही जवळपासच्या सर्व पोलीस चौकींवर माहिती देऊन सुध्दा तो सापडला नाही तिकडून आवाज आला. बर त्याचं स्केच तयार करायला लागा.... आपल्याला त्याला पकडलंच पाहिजेजॉनने आदेश दिला. यस सर तिकडून आवाज आला. जॉनने मोबाईल बंद केला आणि तो डॉक्टरांना म्हणाला, अच्छा, आम्ही आता निघतो... टेक केअर अॉफ हर... आणि जर काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला कळवा. ओके डॉक्टर म्हणाले. जाता जाता जॉन त्याच्या सहकार्‌याला म्हणाला, तिचे नातेवाईक असतील तर माहित करा आणि त्यांना इन्फॉर्म करा यस सर जॉनचा सहकारी म्हणाला.

वर्ल्‌ड अंडर अंडरवर्ल्‌ड

एका कॉलनीत एक टुमदार घर. बाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरून एकजण घराच्या आवारात शिरला. तो जवळपास पंचविशीच्या आसपास असावा. त्याने काळा गॉगल घातला होता. चालता चालता आवारातील गार्डनवर नजर फिरवीत तो दरवाज्यापाशी पोहोचला. आपल्या कारकडे एक नजर टाकीत त्याने दारावरची बेल वाजवली. दार उघडण्याची वाट पाहत तो कॉलनीतल्या इतर घरांकडे बघायला लागला. दार उघडण्यासाठी बराच वेळ लागत होता. दारासमोर शतपावली केल्यासारखे फिरत तो दार उघडण्याची वाट पाहू लागला. आतून चाहूल लागताच तो आत जाण्याच्या पाविर्त्यात दारासमोर थांबला. दार उघडले. समोर दारात त्याच्याच वयाचा एकजण उभा राहिला. आतला दारातून बाजूला झाला आणि बाहेरचा घरात शिरला. ना बोलण्याची ना हावभावांची काहीच देवाणघेवाण नाही. बाहेरचा आत गेल्यावर आतून दार बंद झालं. त्यांचं राहाणीमान ,पेहराव आणि शरीराची ठेवण यावरून दोघांचंही मूळ अमेरिकन तर नक्कीच वाटत नव्हतं. दोघंही चुपचाप चालत घराच्या तळघरात येऊन पोहोचले. घराच्या रचनेवरून या घरास तळघर असावं असं बिलकुल वाटत नव्हतं.

जो बाहेरून आला होता त्याने विचारले, बॉसचा मेसेज आला का?

अजून नाही.... कधी काय करायचं बॉस सगळं मुहूर्त बघून करतो दुसरा म्हणाला.

पहिला गालातल्या गालात हसत म्हणाला एकेकाचं एक एक खूळ असतं

दुसरा गंभीर होऊन म्हणाला कमांड 2 तुला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर सगळं कसं समजून घ्यावं लागेल. इथं सगळ्‌या गोटी तोलून मोलून प्रिकॅलक्यूलेटेड असतात

कमांड 2 नुसता त्याच्याकडे बघायला लागला.

कोणतीही गोट करायच्या आधी बॉसला त्याचा रिझल्ट माहित असतो कमांड 1 म्हणाला.

एव्हाना ते अंधार्‌या तळघरात येऊन पोहोचले. तिथे मध्यभागी एका टेबलवर एक कॉम्प्यूटर ठेवलेला होता. दोघंही काम्प्यूटरच्या समोर जावून उभे राहिले . कमांड 1ने कॉम्प्यूटरच्या समोरच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरू केला. कमांड 2 त्याच्या बाजूला एका स्टूलवर बसला. कॉम्प्यूटरवर लिनक्स अॉपरेटींग सिस्टीम सुरू होतांना दिसायला लागली.

तुला माहित आहे मी लिनक्स का वापरतो?कमांड 1 म्हणाला.

आश्चर्याने बघत कमांड 2 ने फक्त नकारार्थी आपलं डोकं हलविलं.

कॉम्प्यूटरच्या जवळपास सगळ्‌या अॉपरेटींग सिस्टीम ज्यांचा कोड दिला जात नाही कुठल्या कंपन्या बनवितात?कमांड 1 ने विचारले.

अमेरिकेतल्या कमांड 2ने उत्तर दिले.

तुला माहित असेलच की ज्या सॉफ्टवेअर च कोड कस्टमरला दिलं जातं त्यांना श्ओपन सोर्सश् सॉफ्टवेअर म्हणतात... म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं हे कस्टमरला कळू शकतं... आणि ज्या सॉफ्टवेअरचा कोडच कस्टमरला दिला नसेल त्या सॉफ्टवेअरमध्ये दुसरं असं बरंच काही होऊ शकतं जे व्हायला नको.कमांड 1 सांगत होता.

म्हणजे? कमांड 2 ने मध्येच विचारले.

म्हणजे तुला माहित असेलच की मायक्रोसॉफ्टने एकदा जाहिर केले होते की ते त्यांच्या प्रतिर्स्‌पध्यांना शह देण्यासाठी त्यांच्या विंन्डोज अॉपरेटींग सीस्टीममध्ये टॅग्ज वापरणार आहेत कमांड 1 म्हणाला.

हो ... तर? कमांड 2 पुढे ऐकू लागला.

आणि त्या टॅग्ज मुळे कंपनीला जे पाहिजेत तेच प्रोग्रॅम व्यवस्थित चालतील आणि दुसरे एकतर स्लो किंवा बरोबर चालणार नाहीतकमांड 1 म्हणाला.

त्याचा लिनक्स वापरण्याशी काय संबंध?कमांड 2 ने विचारले.

आहे ना... अगदी जवळचा संबंध आहे... हे बघ जर ते आपल्या प्रतिर्स्‌पध्यांना शह देण्यासाठी असे टॅग्ज वापरू शकतात की जेणे करून त्यांच्या प्रतिर्स्‌पध्यांचा एकदम खातमा होऊन जाईल... असंही शक्य आहे की ते त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये असे काही टॅग्ज टाकतील की ज्याच्यामुळे सगळ्‌या जगातली महत्वाची माहिती इंटरनेटद्वारा त्यांच्यापयर्ंत पोहोचू शकेल... त्यात आपल्यासारख्या लोकांच्या कारवायासुध्दा आल्या ... विशेातरू 9—11 नंतर हे त्यांना फार महत्वाचे झाले आहे कमांड 1 कमांड 2कडे बघत त्याची प्रतिक्रिया घेत म्हणाला.

हो तू बरोबर बोलतो आहेस ... असं होऊ शकतं कमांड 2 ने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

म्हणून मी काय केलं माहित आहे?... लिनक्सचं सोर्स कोड घेऊन त्याला कंपाइल केलं आणि मग या कॉम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल केलं ... आपल्याला सर्वेतोपरी काळजी घेणं फार आवश्यक आहेकमांड 1 सांगत होता.

त्याच्या शब्दात गर्व आणि स्वतरूची शेखी स्पटपणे जाणवत होती.

अरे ही अमेरिका काय चीज आहे हे तुला माहितच नाही... जगावर राज्य करण्याचा त्यांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात कमांड 1 पुढे सांगायला लागला.

कमांड 2ने कमांड 1 कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.

चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल केव्हा पडले ?... तू शाळेत शिकला असशील नं? कमांड 1 ने प्रश्न केला.

अमेरिकेने चंद्रावर पाठविलेल्या यानातून 1969 साली नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेकमांड 2 ने चटदिशी उत्तर दिले.

सगळ्‌या शाळकरी विद्यार्थ्‌यांच्या डोक्यात हेच कोंबलं जात आहे... पण लोकांनी सत्य काय आहे याचा कधी विचार केला?... जो व्हीडीओ अमेरिकेने टी व्ही वर दाखविला होता त्यात अमेरिकेचा झेंडा फडफडतांना दिसत होता... जर चंद्रावर हवाच नसेल तर झेंडा फडफडणार तरी कसा... लोक चंद्रावर उतरले त्यांच्या सावल्या ... यानाची बदललेली जागा... असे कितीतरी पुरावे आहेत जे दर्शवितात की अमेरिकेचे यान चंद्रावर गेलेच नव्हतेकमांड 1 आवेशात बोलत होता.

काय बोलतोस तू ... मग काय सगळं खोटं आहे?... पण हे सगळं खोटं कशासाठी? कमांड 2 ने आश्चर्याने विचारले.

खोटं... निखालस खोटं... एवढंच काय त्याच वेळी अवकाशातून सॅटेलाईटमधून जमिनीच्या घेतलेल्या चित्रात जो सेट त्यांनी तयार केला होता त्याचं चित्रसुध्दा मिळालं आहे... आणि हो तू बरोबर विचारलंस ... हे खोटं कशासाठी... हा एवढा खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?... ज्यावेळी अमेरिकेने चंद्रावर मानव गेल्याचं जाहीर केलं तेव्हा रशिया हा अमेरिकेचा सगळ्‌यात मोठा प्रतिस्पर्धी होता... आपण रशियापेक्षा वरचढ आहोत हे दाखविण्यासाठी हा सगळा अट्टाहास अमेरिकेने केला होता... आणि त्यात ते सफलसुध्दा झाले होते.कमांड 1चा आवेश शब्दागणिक वाढत होता.

बापरे ! म्हणजे एवढा मोठा धोका आणि तो पण संपूर्ण जगाला... कमांड 2 च्या तोंडातून निघाले.

अमेरिका सध्या ब्रिटिशांच्या मार्गाने जात आहे. दुसर्‌या महायुध्दापूर्वी ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं. त्यावेळी त्यांच्या राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नसे. आता अमेरिका ते करू पाहत आहे. फरक एवढाच की ते प्रत्यक्षपणे राज्य न करता अप्रत्यक्षपणे राज्य करीत आहेत म्हणजे श्प्रॉक्सी रूलींगश्. अफगाणिस्थान, इराक, कुवेत, साऊथ कोरिया इथे ते काय करीत आहेत प्रॉक्सी रूलींगच की हो बरोबर आहे तुझं कमांड 2ने दुजोरा दिला.

आणि हेच अमेरिकेचं वर्चस्व नाहीसं करणं हे आपलं परम उद्देश्य आहे.. कमांड 1 जोशात म्हणाला.

कमांड 2 च्या चेहर्‌यावरून असं दिसत होतं की तो कमांड 1 च्या बोलण्याने अतिशय प्रभावित झाला आहे. आणि कमांड 1 च्या चेहर्‌यावर आपण कमांड 2 च ब्रेन वॉश करण्यात सफल झालो आहोत याचं विजयी हास्य तरळत होतं.

तेवढ्यात सुरू झालेल्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. कमांड 1ला मेल आलेली होती. कमांड 1ने मेलबॉक्स उघडला. बॉसची मेल होती.

हा बॉस आहे तरी कोण? कमांड 2ने उत्सुकतेने विचारले.

हे कुणालाच माहित नाही... आणि ते महत्वाचंसुध्दा नाही की तो कोण आहे?... आपल्या सगळ्‌यांना जोडलं आहे ते एका विचारधारेने... आणि ती विचारधाराच महत्वाची... आज बॉस असेल उद्या नसणार... पण त्याची विचारधारा ही नेहमी जिवंत राहिली पाहिजे.कमांड 1 ने मेल उघडता उघडता सांगितले.

मेलमध्ये फक्त हाय असे लिहिलेले होते आणि मेलला काहीतरी अटॅच केलेले होते. कमांड 1 ने अटॅचमेंट ओपन केली. ते एक मॅडोनाचे बोल्ड चित्र होते.

बॉसने हे चित्र पाठविलं? कमांड 2 ने आश्चर्याने विचारले.

तू अजून नवीन आहेस तुला कळायला अजून वेळ लागेल की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात कमांड 1 चित्राकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणाला.

कमांड 1 ने पटापट कॉम्प्यूटरच्या कीबोर्डची चार पाच बटने दाबली. समोर मॉनिटरवर एक सॉफ्टवेअर उघडले. कमांड 1ने त्या मॅडोनाच्या चित्राला डबल क्लीक केले. एक निळा प्रोग्रेस बार हळू हळू सरकायला लागला. कमांड 1 ने कमांड 2 कडे गूढतेने बघितले.

पण हे काय करतो आहेस स... कमांड 2 म्हणाला.

कमांड 1ने चटकन कमांड 2च्या तोंडावर हात ठेऊन त्याचे तोंड दाबले.

चुकूनही तुझ्या तोंडात माझं नाव येता कामा नयेे ... तुला माहित आहे? ... भिंतीलासुध्दा कान असतात.

सॉरी कमांड 2 ओशाळून म्हणाला.

इथे चुकांना क्षमा नाही कमांड 1 दृढतेने म्हणाला.

तोपयर्ंत प्रोग्रेस बार सरकून पूर्णपणे निळा झाला होता.

याला म्हणतात स्टेग्नोग्राफी... म्हणजे चित्रामध्ये माहिती लपविणे... बघणार्‌याला फक्त चित्र दिसेल... पण या चित्रातसुध्दा बरीच महत्वाची माहिती लपविली जाऊ शकते कमांड 1 त्याला समजावून सांगू लागला.

पण चित्र इथे यायच्या आधी कुणाच्या हाती जर लागले तर? कमांड 2 प्रश्न उपस्थित केला.

ती माहिती फक्त या सॉफ्टवेअरनेच बाहेर काढता येते ... आणि त्याला पासवर्ड लागतो... हे सॉफ्टवेअर बॉसने स्वतरू लिहिलेले आहे... त्यामुळे ते दुसर्‌या कुणाकडे असण्याची अजिबात शक्यता नाही. कमांड 1ने त्याच्या प्रश्नाला समर्पक असे उत्तर दिले.

काय माहिती लपविली आहे त्यात? कमांड 2 ने उत्सुकतेने विचारले.

तेवढ्यात मॉनिटरवर एक मेसेज दिसायला लागला श्पुढच्या कामाला लाग... त्याची वेळ मागाहून कळविण्यात येईल.

(क्रमशः ...)

ती कुठे गेली?

हॉस्पिटलच्या समोर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून जॉन उतरला. आज तो त्याच्या नेहमीच्या युनिफार्ममध्ये नव्हता. त्याच्या हातात एक पांढर्‌या फुलांचा गुच्छ पण होता. सरळ लिफ्टकडे जाऊन त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टमध्ये जाऊन त्याने फ्लोअर नं. 12 चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वर जायला लागली. त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांची गर्दी व्हायला लागली...

भिंतीवर रक्ताने गोल का काढले असावे?...

मेडीकल चेकींगमध्ये रक्त सानीचेच होते....

नक्कीच गोल ज्याने काढले तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असावा....

खून कोणी केला असावा याची कल्पना अँजेनीला असेल का?...

लिफ्ट थांबली व लिफ्टची बेल वाजली. जॉनचे विचारचक्र थांबले. समोर इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेमध्ये 12 हा आकडा आला होता. लिफ्टचे दार उघडले आणि जॉन लिफ्टच्या बाहेर पडला. लांब लांब पाऊले टाकीत सरळ तो बी वार्डमध्ये गेला.

जॉनने एकदा आपल्या हातातल्या पांढर्‌या फुलांच्या गुच्छाकडे बघितले आणि त्याने बी2 रूमचा दरवाजा ठोठावला. थोडा वेळ त्याने वाट बघितली. आत काहीच चाहूल नव्हती. त्याने दार पुन्हा वाजविले. काहीच प्रतिसाद नाही. त्याने आपली गोंधळलेली नजर व्हरंड्यात इकडे तिकडे फिरविली. त्याला आता काळजी वाटायला लागली होती. तो दार जोर जोराने ठोठावयाला लागला.

काय झाले असेल?...

इथेच तर होती ती....

आज तर तिला डिस्चार्ज करणार नव्हते...

मग कुठे गेली असेल ती?...

काही अघटित तर घडले नसावे...

त्याला धडधडायला लागले. त्याने पुन्हा आजूबाजूला बघितले. वार्डाच्या शेवटी एक काऊंटर होते. काऊंटरवर माहिती मिळेल — असा विचार करून तो काऊंटरकडे घाई घाई जायला लागला.

एक्सक्यूजमी त्याने काऊंटरवरच्या नर्सचे लक्ष आकर्िात करण्याचा प्रयत्न केला.

नर्सला हे रोजचेच असावे, जॉनकडे लक्ष न देता तिने आपले काम चालूच ठेवले.

बी2 ला एक पेशंट होता अँजेनी कार्टर... कुठं आहे ती?... तिला काय डिस्चार्ज दिला का?... पण तिचा डिस्चार्ज तर आज नव्हता... मग कुठे गेली ती?... तिथे तर कोणीच नाही जॉनने प्रश्नांची सरबत्ती लावली.

एक मिनिट... एक मिनिट... कोणती रूम म्हणालात तुम्ही? नर्सने त्याला थांबवित विचारले.

बी2 जॉन श्वास घेत म्हणाला.

नर्सने एक फाईल काढली. फाईल उघडून बी2... बी2 म्हणत तिने फाईलच्या इंडेक्सवरुन बोट फिरविले. मग इंडेक्सवर लिहिलेले पेज नंबर बघण्यासाठी तिने फाईलचे काही कागद चाळले.

बी2... मिसेस अँजेनी कार्टर... नर्स खात्री करण्यासाठी म्हणाली.

हो... अँजेनी कार्टर जॉनने कंन्फर्म केले.

जॉनने उत्कंठेने तिच्याकडे बघितले. पण ती अगदी शांत होती. जॉनची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. त्याला तिच्या शांतपणाचा रागही येत होता.

सॉरी... मिस्टर..? नर्स जॉनकडे बघत म्हणाली.

जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

मिस्टर.. जॉन जॉनने स्वतरूला सावरत आपले नाव सांगितले.

सॉरी... मिस्टर जॉन... सॉरी फॉर इनकन्व्हीनियंस... तिला दुसर्‌या रूममध्ये... बी23 मध्ये हलविले आहे... नर्स बोलत होती.

जॉनच्या जिवात जीव आला.

ॲक्चूूअली... बी2 फार कंजेस्टेड होत होती ना ... म्हणून त्यांच्याच...नर्स सविस्तर सांगत होती.

पण जॉनला कुठे ऐकण्याची सवड होती? नर्स तिचे सांगणे पूर्ण करायच्या आधीच जॉन निघाला होता... बी23 कडे.

क्रमशः ... )

स्पंदन...

बी 23 कडे जाता जाता जॉनला त्याचं त्यालाच आश्चर्य वाटायला लागलं.

ही कसली ओढ?...

असं तर पूर्वी कधी झालं नव्हतं...

आतापयर्ंत कितीतरी केसेस त्याने हाताळल्या होत्या पण एका स्त्री विायी अशी ओढ...

आणि काही अनपेक्षित तर नसेल घडलेे अशी काळजी त्याला इतक्या तीव्रतेने कधीच वाटली नव्हती....

त्याने बी23 चे दार ठोठावले. दार उघडेच होते. दार ढकलून तो आत जायला लागला. आत बेडवर अँजेनी पडलेली होती. ती खिडकीतून बाहेर शून्यात बघत होती. चाहूल लागताच तिने दरवाज्याकडे बघितले. जॉनला पाहून तिच्या चेहर्‌यावर एक फिकं हास्य झळकलं. ती अजूनही धक्यातून सावरलेली जाणवत नव्हती. तो तिच्याजवळ जावून उभा राहिला. तिने त्याला जवळच्याच स्टूलवर बसण्याचा इशारा केला. जॉन तिच्या जवळ जाऊन स्टूलवर बसला.

त्याने फुलांचा गुच्छ तिच्या बाजूला ठेवीत म्हटले, कशी आहेस?

ती पुन्हा त्याच्याकडे पाहून नुसती हसली. हसण्यासाठीही जणू तिला कट करावे लागत होते.

संकट ज्याच्यावर कोसळते त्यालाच त्या पीडेची जाणीव असते... तू कोणत्या मनस्थितीतून जात असशील ते मी समजू शकतो... जॉन बोलत होता.

अँजेनीच्या डोळ्‌यात अश्रू तरळायला लागले. जॉन बोलायचा थांबला. त्याने धीराचा हात तिच्या खांद्यावर ठेवला. आता तर तिला जास्तच गहिवरून यायला लागले. तिने आत्तापयर्ंत रोखून धरलेला बांध तुटला आणि ती जॉनला बिलगून ओक्साबोक्शी रडायला लागली. जॉन तिला थोपटून धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. तिला कसे समजवावे हे त्याला कळेनासे झाले होते.

आता ती थोडी नॉर्मल झाली होती. जॉनने ताडले की अँजेनीला आता खुनाच्या संदर्भात प्रश्न विचारायला काही हरकत नाही.

कुणी खून केला असावा? ... तुला काही माहिती ... अंदाज? जॉनने हळूच प्रश्न विचारला.

अँजेनीने नकारार्थी फक्त मान हलविली आणिती खिडकीच्या बाहेर शून्यात बघायला लागली. जॉनने त्याच्या खिशातून एक फोटो काढला.

हे बघ इथे भिंतीवर... रक्ताने काहीतरी गोल असे काढण्यात आले आहे... हे काय असावे... काही कल्पना?... किंवा कुणी काढले असावे? जॉनने विचारले.

अँजेनीने फोटोत बघितले. भिंतीवर दिसणार्‌या गोल आकृतीच्या खाली बेडवर पडलेल्या तिच्या मृत नवर्‌याला पाहून तिला अजून भरून यायला लागले होते. जॉनने फोटो पुन्हा खिशात ठेवला.

नाही म्हणजे त्या गोल आकाराचा कशाशी काही संबंध जोडता येतो का?... तो एबीसीडीतला ओ असू शकतो... किंवा ते शून्यही असू शकते... जॉन म्हणाला.

मी समजू शकतो की... तुला खुनाबद्दल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही... पण जितकी जास्त, आणि जितकी लवकर माहिती मिळेल तेवढ्या लवकर आपण खुन्याला पकडू शकू... जॉन पुढे म्हणाला.

अँजेनी आता व्यवस्थित बसून आपल्या भावना आवरीत खंबीरपणे हणाली, विचार... तुला जे विचारायचे आहे ते विचार जॉनसुध्दा आता सर्व माहिती काढून घेण्याची ही योग्य वेळ आहे हे जाणून ताठ बसला.

सानी काय करत होता ?... म्हणजे बाय प्रोफेशन जॉनने पहिला प्रश्न विचारला.

तो इंपोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा... मेनली गारमेंटस्‌... इंडीयन कॉन्टीनेंट मध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला होता अँजेनी सांगत होती.

कुणी प्रोफेशनल रायव्हल? जॉनने विचारले.

नाही... त्याचा डोमेन एकदम वेगळा असल्याने त्याला जवळपास कुणी प्रोफेशनल रायव्हल्स नव्हते अँजेनी म्हणाली.

बरं तू काय करतेस? जॉनने पुढचा प्रश्न विचारला.

मी एक फॅशन डिझायनर आहे अँजेनीने सांगितले.

बराच वेळ अँजेनीचा जाब जबाब सुरू होता. शेवटी स्टूलवरून उठत जॉन म्हणाला, ठीक आहे सध्यापुरती एवढी माहिती पुरेशी आहे... आता तू थकली असशील ... म्हणजे मानसिकरित्या... आराम कर... पुन्हा काही वाटलं तर आम्ही तुला विचारूच

जॉन जायला निघाला.

अँजेनी उठायला लागली तर जॉन म्हणाला, तू पडून राहा... तुला आरामाची गरज आहे

तरीपण त्याला दरवाज्यापयर्ंत सोडायला अँजेनी उठलीच. जॉन दरवाज्यापयर्ंत पोहोचत नाही तोच त्याला मागून अँजेनीचा आवाज आला—

थँक यू ...

जॉन एकदम थांबला आणि वळून म्हणाला कशासाठी?

माझा जीव वाचविण्यासाठी... डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं की जर तू मला वेळेवर कृत्रिम श्वास नसता दिलास तर कदाचित मी आता जिवंत नसते... अँजेनी त्याच्याकडे डोळे भरून बघत म्हणाली.

त्यात काय... मी माझं कर्तव्य केल जॉन म्हणाला.

तो तुझा मोठेपणा आहे अँजेनी दरवाजापाशी जात म्हणाली.

एव्हाना जॉन जायला निघाला होता. तो झपाझप पावले टाकीत चालू लागला, कदाचित आपल्या अनावर झालेल्या भावना लपविण्यासाठी. तो थोड्या वेळातच वार्डच्या शेवटी जाऊन पोहोचला. उजवीकडे वळण्याच्या आधी त्याने एकदा मागे वळून अँजेनीच्या रूमकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती.

जॉन पॅसेजमधून लिफ्टच्या दिशेने जात होता. अँजेनीला सोडून जातांना त्याला उगीचच हूरहूर लागून गेली होती. अचानक जॉनचं लक्ष लिफ्टकडे गेलं. लिफ्ट अजूनही त्याच्यापासून बरीच दूर होती. लिफ्टच्या पलीकडच्या बाजूने एक युवक आला. त्याने काळं टी शर्ट घातलं होतं आणि त्याच्या टी शर्टवर अगदी तसाच झीरो काढला होता जसा त्याने पूर्वी खुनाच्या दिवशी बघितला होता. जॉन लगेच लिफ्टच्या दिशेनं धावायला लागला.

त्याने आवाज दिला, हॅलो

पण त्याचा आवाज पोहोचण्याच्या आधीच तो युवक लिफ्टमध्ये शिरला होता. जॉन अजून जोराने धावायला लागला. लिफ्ट बंद झाली होती पण अजून खाली किंवा वर गेली नव्हती. जॉन धावता धावता लिफ्टच्या जवळ गेला. त्याने लिफ्टचे बटन दाबले. पण व्यर्थ. लिफ्ट खाली जाण्यास सुरवात झाली होती. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. युवक त्या दिवशीच्या युवकासारखा नव्हता. पण का कोण जाणे जॉनला वाटत होते की खुनाचे काहीतरी रहस्य त्या झीरो त दडले होते. जॉन बाजूच्या पायर्‌यांनी भराभर खाली उतरायला लागला. अधून मधून तो लिफ्ट पण बघत होता. लिफ्ट मध्ये कुठेच थांबायला तयार नव्हती. कदाचित ती एकदम ग्राऊंड फ्लोअरलाच थांबणार असावी. जॉनने बघितले तर लिफ्ट त्याच्यापेक्षा दोन मजले पुढे निघून गेली होती. तो अजून जोराने पायर्‌या उतरण्याचा प्रयत्न करायला लागला.

शेवटी दम लागलेल्या अवस्थेत जोर जोराने श्वास घेत तो ग्राऊंड फ्लोअरला पोहोचला. त्याने लिफ्टकडे बघितले. लिफ्टमधले लोक कधीच बाहेर पडले होते आणि लिफ्टवरचा डिस्प्ले लिफ्ट वरच्या दिशेने चाललेली आहे असं दर्शवित होता. जॉन धावतच दवाखान्याच्या बिल्डींगच्या बाहेर आला. त्याने सगळीकडे नजर फिरविली. पार्कीगमध्ये जाऊन बघितले. दवाखान्याच्या आवारातून बाहेर येऊन रस्त्यावर बघितले. तो काळ्‌या टी शर्टवाला युवक त्याला कुठेही दिसत नव्हता.

क्रमश : ...

ब्लैंक मेल...

मंद चंद्राच्या प्रकाशात टेरेसवर कमांड 1 आणि कमांड 2 बसले होते. त्यांच्या समोर लॅपटॉप ठेवलेला होता. मधून मधून मजेत ते व्हिस्कीचे घोट घेत होते. कमांड 1 कॉम्प्यूटरला भराभर कमांड देत होता. एका क्षणात तो की बोर्डवर कितीतरी बटनं दाबत होता.

हे तू काय करीत आहेस?कमांड 2ने उत्सुकतेने विचारले. अरे हा पोलीस अॉफीसर जॉन आपल्या केसवर काम करीत आहे कमांड 1 ने की बोर्डवरची बटनं भराभर दाबता दाबता म्हटले.

मग? कमांड 2 ने विचारले.

त्याच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला कळायला नको का? कमांड 1 म्हणाला.

त्याच्या मनात काय चालले हे आपल्याला कसे कळणार? कमांड 2ने अविश्वासाने म्हटले.

हे बघ आता तो अॉनलाईनच आहे... आणि ही मेल मी त्याला पाठवितो आहे.... ही मेल त्याचा पासवर्ड ब्रेक करेलकमांड 1 आत्मविश्वासाने सांगत होता.पण... कसा काय ब्रेक करणार?कमांड 2 आश्चर्याने म्हणाला.

सांगतो सांगतो कमांड 1 ने मेलचे सेंड बटण दाबले आणि पुढे म्हणाला, हे बघ, ही मेल जेव्हा तो उघडेल तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरवर सेशन एक्सपायर्ड असा मेसेज येईल. मग तो पुन्हा जेव्हा त्याचा पासवर्ड टाकायला जाईल तेव्हा तो आपल्या प्रोग्रॅम मध्ये टाकलेला असेल. मग तो आपला प्रोग्रॅम तो पासवर्ड आपल्यापयर्ंत सुखरुप पोहोचता करेल.

कमांड 1च्या चेहर्‌यावर एक छद्‌मी हास्य तरळले.

कमांड 2ने कॉम्प्यूटरकडे पाहात अंतर्मुख झाल्यागत आपला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला.

काय दिमाख आहे !कमांड 2 त्याला प्रशंसेने म्हणाला.

हळू हळू तू पण शिकशील हे सगळंकमांड 1 त्याला आश्वासन देत म्हणाला.

तुझ्यासारखा गुरू मिळाल्यावर मला काळजी करण्याचं काय कारण?कमांड 1कडे उत्साहाने आणि अभिमानाने बघत कमांड 2 म्हणाला.

कमांड 1ची जास्तीत जास्त प्रशंसा करण्याच्या नादात कमांड 2चा धक्का त्याने बाजूला ठेवलेल्या व्हिस्कीच्या ग्लासला लागला आणि तो ग्लास खाली फरशीवर पडून फुटला. त्याचे 4—5 तुकडे झाले. कमांड 2 ते ग्लासचे तुकडे उचलू लागला.

कमांड 1ने कॉम्प्यूटरवर काम करता करता एक धावता नेत्रकटाक्ष काच उचलणार्‌या कमांड 2कडे टाकला आणि पुन्हा तो आपल्या कामात गुंतून गेला.

इऽऽ कमांड 2 ओरडला.

काय झालं? कमांड 1ने विचारले.

अरे या काचेने बोट कापलं कमांड 2ने आपल्या वेदना लपविण्याचा प्रयत्न करीत कापलेल्या बोटाकडे निरखून बघत म्हटले.

बी ब्रेव्ह... डोन्ट ॲक्ट लाइक अ किड कमांड 1 म्हणाला आणि मॉनिटरकडे बघत पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

कमांड 2ने तशाच रक्ताळलेल्या हाताने बाकीचे ग्लासचे तुकडे उचलले. तिथे एक पॉलीथीन बॅग पडलेली होती त्यात टाकले आणि त्या पॉलीथीनच्या बॅगला गाठ मारून ती बॅग घराच्या मागच्या बाजूला झाडीत टाकून दिली.

तेवढ्यात त्यांना एक मेल आलेली दिसली.

उघडली वाटतं त्यानं आपली मेल.... याला तर भलती घाई दिसते आपला पासवर्ड ब्रेक करुन घेण्याची म्हणत कमांड 1ने ती मेल उघडली. मेल ब्लँक होती. मेलमध्ये पासवर्ड आला नव्हता. अचानक कमांड 1ने विद्युत गतीने कॉम्प्यूटर बंद केला.

काय झालं? कमांड 2 ने विचारले.

साला आपण विचार केला तेवढा हा येडा नाही.... त्याला शंका आलेली दिसतेकमांड 1 म्हणाला.

मेल ब्लँक होती... म्हणजे असं असू शकते की त्याचा पासवर्डसुध्दा ब्लँक असावाकमाड2ने आपला अंदाज सांगितला.

मि. कमांड 2 ... इमेल पासवर्ड हा कधी ही ब्लँक नसतो कमांड 1 आपल्या विशिट शैलीत म्हणाला. पण... तू मग एवढ्या तडकाफडकी कॉम्प्यूटर का बंद केलास?कमांड 2 ने उत्सुकतेने विचारले.

अरे, जर त्याला शंका आली असेल तर तो आपल्याला ट्रेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार कमांड 2 म्हणाला.

अच्छा अच्छा कमांड 2 समजल्याचा आव आणीत म्हणाला.

कमांड 1 व्हिस्कीचा ग्लास घेऊन त्याच्या जागेवरून उठला.

आपण इथे असं उघड्यावर बसायला नको कमांड 2 काळजी व्यक्त करीत म्हणाला.

का बरं? कमांड 1 ने ग्लास घेऊन एकीकडे जात म्हटलं.

नाही,... मी असं ऐकलं आहे की अमेरिकन सॅटेलाईटचे कॅमेरे जमिनीवरचं 10 बाय 10 इंच पयर्ंत स्पट बघू शकतात. त्यात आपण पण दिसू शकतो. कमांड 2 काळजी दाखवित म्हणाला.

कमांड 1 ग्लास घेऊन जाता जाता थांबला आणि मग हसायला लागला.

काय झालं? कमांड 2 ने आश्चर्याने विचारले.

अरे, हे अमेरिकन लोक की नाही प्रोपॅगँन्डा मध्ये फार एक्सपर्ट आहेत... अरे, ते जर 10 बाय 10 इंच पयर्ंत स्पट बघू शकतात तर मग तो ओसामा बीन लादेन किती दिवसापासनं त्यांच्या नाकी नऊ आणतो आहे त्याला का ते पकडू शकत नाहीत?... हं हे खरं आहे की काही बाबतीत अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीला तोड नाही... पण एका खर्‌या गोटी बरोबर 10 खोट्या गोटीसुध्दा ठोकून द्यायच्या ही अमेरिकेची स्टाईलच आहे... एका खर्‌या गोटी बरोबर 10 खोट्या गोटी ठोकण्याला काय म्हणतात माहित आहे?

काय? कमांड 2 ने उत्सुकतेने विचारले.

शुगरकोटींग... तुला माहित आहे?... र्वल्ड वार 2 मध्ये हिटलरची फौज शेवटच्या क्षणापयर्ंत का लढली? कमांड 1 म्हणाला.

कमांड 2 कमांड 1 कडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागला.

हिटलरने प्रोपॅगॅन्डा केला होता की त्यांच्या सैन्यात लवकरच व्ही 2 मिसाईल दाखल होणार आहे ... आणि जर ते मिसाईल त्यांच्या सैन्यात दाखल झाले तर ते जगावरसुध्दा राज्य करू शकणार होते कमांड 1 म्हणाला.

मग झालं होतं का दाखल ते मिसाईल? कमांड 2 ने विचारले.

कशाचं डोंबलाचं होते?... असेल तर होईल ना कमांड 1 म्हणाला.

आता कमांड 1 कॉम्प्यूटर पुन्हा सुरू करायला लागला होता.

आता कशाला सुरू करतोस?... तो पुन्हा ट्रेस करेल ना कमांड 2 ने आपली चिंता व्यक्त करीत म्हटले.

नाही... आता सुरू केल्यावर आपल्याला वेगळा आय. पी. ॲड्रेस मिळेल... त्यामुळे तो आपल्याला ट्रेस नाही करू शकणार कमांड 1 कॉम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत म्हणाला.

एव्हाना कॉम्प्यूटर सुरू झाला होता आणि मॉनिटरच्या उजव्या कॉर्नरला मेल आल्याचा मेसेजसुध्दा आला होता.

बॉसची मेल आहे मेल उघडत कमांड 1 म्हणाला.

त्याने मेल उघडली आणि मेल वाचायला लागला.

कमांड 2... कमांड 1 ने आवाज दिला.

काय? कमांड 2 ने त्याला प्रतिसाद देत म्हटले.

आपल्याला पुढच्या कारवाईचे आदेश मिळाले आहेत कमांड 1 मेल वाचत म्हणाला.

कमांड 2 कमांड 1 च्या खांद्यावरून मेलमध्ये काय लिहिले आहे ते वाचायचा प्रयत्न करू लागला.

मन वढाय वढाय...

जॉन कारमध्ये जात होता. हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी त्याला कळविले होते की अँजेनीला डिस्चार्ज केले आहे आणि ती तिच्या घरी गेलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेडीकली ती पूर्णपणे सावरलेली होती. फक्त मेंटली आणि इमोशनली सावरायला तिला थोडा वेळ लागेल. सानीच्या पोस्टमार्टमचे रिपोर्टसुध्दा आले होते. जॉनला त्या संदर्भात अँजेनीशी थोडी चर्चा करायची होती. चर्चा तो फोनवर पण करू शकला असता. पण कितीही मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे मन ऐकत नव्हते. तिला भेटण्याची त्याची इच्छा बळावत होती. त्याने तिला तोंडाने कृत्रिम श्वासोश्वास दिला तेव्हा त्याला काही विशेा वाटले नव्हते. पण आता वारंवार त्याला तिच्या ओठांचा त्याच्या ओठांना झालेला स्पर्श आठवत होता. त्याने कर्र ऽऽ... ब्रेक दाबले. गाडीला वळविले आणि तो निघाला — अँजेनीच्या घराकडे.

जॉनची कार अँजेनीच्या अपार्टमेंटखाली येऊन थांबली. त्याने गाडी पाकिर्ंगमध्ये वळविली. पाकिर्ंगमध्ये बराच वेळ तो नुसताच गाडीत बसून होता. आपल्या मनाशी संर्घा करीत शेवटी तो गाडीतून उतरला. मोठी मोठी पावलं टाकीत तो लिफ्टकडे गेला. लिफ्ट उघडीच होती. निर्धाराने तो लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

लिफ्ट थांबली. लिफ्टमध्ये डिस्प्लेवर 10 आकडा आला होता. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि जॉन बाहेर पडला. अँजेनीच्या फ्लॅटचे दार आतून बंद होते. तो दारापाशी गेला. पुन्हा तिथे थोडा वेळ घुटमळला. तो डोअर बेल दाबणार तेवढ्यात समोरचा दरवाजा उघडला. दरवाज्यात अँजेनी उभी होती. जॉन एकदम गोरा मोरा होऊन ओशाळल्यासारखा झाला.

काय झालं? अँजेनी अगदी मोकळं खदखदून हसत म्हणाली.

इतकं मोकळं हसतांना त्याने तिला पहिल्यांदा बघितले होते.

कुठं काय?... काही नाही.... मला तुझ्याकडे केस च्या संदर्भात थोडी चौकशी करायची होती... नाही म्हणजे करायची आहे जॉन कसाबसा बोलला.

ये की मग आत .... असा बोलतो आहेस जसं मी तुला चोरी करताना पकडलं आहेअँजेनी हसत म्हणाली.

अँजेनीने त्याला आत घेऊन दार बंद केले.

जॉन आणि अँजेनी ड्रॉईंग रूममध्ये बसले होते.

पोस्टमार्टम रिपोर्टच्या अनुसार... सानीला बंदुकीची गोळी छातीत डाव्या बाजूला अगदी हृदयात लागली होती... त्यामुळे जो गोल भिंतीवर काढला होता तो सानीने काढण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे जॉन आपला तर्क प्रस्तुत करीत होता.

म्हणजे मग तो आकार नक्कीच खुन्याने काढला असणार अँजेनी म्हणाली.

थोडा विचार करुन ती पुढे म्हणाली पण तो आकार काढून त्याला काय सुचवायचे असावे?

तोच तर सगळ्‌यात मोठा प्रश्न सध्या आपल्यापुढे उभा आहे जॉन म्हणाला.

जर आपण अशाप्रकारे यापूर्वीही एखादा खून झाला आहे का... हे बघितले तर? अँजेनीने आपले मत मांडले.

ते सगळे शोधून झाले आहे... रेकॉर्डला तशा प्रकारचा एकही खून नाही.... जॉन म्हणाला.

तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची बेल वाजली. त्याने मोबाईलचे बटन दाबून तो कानाला लावला, यस ...सॅम

जॉनने सॅमचे बोलणे ऐकले आणि तो एकदम उठून उभा राहत म्हणाला, काय?

अँजेनी काय झाले म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागली.

मी लगेच येतो जॉन म्हणाला आणि दरवाज्याकडे जायला निघाला.

जॉनने मोबाईल बंद करून खिशात ठेवला.

जाता जाता तो अँजेनीला फक्त एवढंच म्हणाला, मी तुला नंतर भेटतो ... मला आता लवकरात लवकर गेलेच पाहिजे...

अँजेनी काही बोलणार त्याआधीच जॉन गेलेला होता.

क्रमशः ...

अजुन एक..

जॉनची गाडी एका भर रहदारीच्या रस्त्यावरून धावू लागली. नंतर बरीच वळणे घेऊन त्याची गाडी एका पॉश वस्तीतल्या एका अपार्टमेंटजवळ आली. जॉन तिथे यायच्या आधीच पोलीस तिथे येऊन पोहोचलेले होते. यावळेस पोलिसांच्या व्यतिरिक्त मिडीयाची पण लक्षणीय उपस्थिती होती. गर्दीमुळे रस्त्यावर सगळी रहदारी विस्कळीत झालेली होती. जॉनने गाडी पार्क केली आणि तो गाडीतून बाहेर येताच मिडीयावाल्यांनी त्याच्या भोवती गर्दी करणं सुरू केलं. जरी तो त्याच्या प्राईव्हेट गाडीतून आला होता आणि युनिफॉर्ममध्ये नव्हता तरीही मिडीयावाल्यांना तो या केसशी संबंधित असल्याची कशी कुणकुण लागली कुणास ठाऊक?

मि. जॉन वुई वुड लाईक टू हिअर यूअर कमेंट अॉन द केस प्लीज कुणीतरी त्याच्यासमोर कॅमेरा आणि माईक्रोफोन घेऊन गेला.

प्लीज बाजूला व्हा.... मला आत जाऊ द्या... मला आधी इन्व्हेस्टीगेशन पूर्ण करू द्या... मगच मी माझे मत मांडू शकेन जॉन गर्दीतून आपला रस्ता काढीत म्हणाला.

तरी कुणीही बाजूला व्हायला आणि जॉनला रस्ता देण्यास तयार नव्हते. मोठया मुश्कीलीने जॉन त्या गर्दीतून रस्ता काढीत अपार्टमेंटच्या दिशेने निघाला. दुसरे काही पोलीस त्याला जाण्यासाठी रस्ता तयार करण्यास मदत करू लागले.

जॉन लिफ्टने अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर पोहोचला. समोरच्याच फ्लॅटमध्ये पोलिसांची गर्दी होती. जॉन फ्लॅटमध्ये शिरताच सॅम समोर आला.

सर, इकडे सॅमने जॉनला बेडरूमकडे नेले.

बेडरूममध्ये बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत एका स्त्रीचे मृत शरीर होते. आणि समोर भिंतीवर रक्ताने एक मोठा गोल काढला होता. यावेळी त्या गोलाच्या आत रक्ताने 0़6=6 आणि 0•6=0 असे लिहिलेले होते. जॉन समोर जाऊन भिंतीकडे निरखून पाहू लागला.

कोण आहे ही ? जॉनने सॅमला विचारले.

हुयाना फिलीकिन्स ... टी व्ही आर्टीस्ट आहे सॅम म्हणाला.

एकटीच राहत होती का? जॉनने विचारले.

हो सर, ... शेजार्‌यांचं तरी असंच म्हणणं आहे... त्यांच्या म्हणण्यानूसार अधून मधून कुणी येत असे तिच्याकडे ... पण प्रत्येक वेळी कुणी तरी वेगळाच असतो असं शेजारी सांगतात. सॅम त्याने काढलेल्या माहितीचा सारांश सांगत होता.

खुन्याने भिंतीवर 0़6=6 आणि 0•6=0 असं लिहिलं आहे ... यावरून कमीत कमी एवढं तर स्पट होतं की हा गोल म्हणजे शून्यच असला पाहिजे... पण 0़6=6 आणि 0•6=0 म्हणजे काय? ... की तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे? जॉन आपला तर्क लढवित होता.

ॲडीटीव्ह आयडेंटीटी प्रॉपर्टी आणि झीरो मल्टीप्लीकेशन प्रॉपर्टी ... गणितात शिकविलेलं आठवतं थोडं थोडं... सॅम म्हणाला.

ते ठीक आहे... पण त्या खुन्याला म्हणायचं तरी काय? जॉनने जणू स्वतरूलाच प्रश्न विचारला.

दोघंही विचार करू लागले. त्या प्रश्नाचं उत्तर दोघांजवळही नव्हतं.

बाकीच्या रूम्स तपासल्या का? जॉनने विचारलं.

हो, तपास सुरू आहे सॅम म्हणाला.

फोटोग्राफर फोटो घेऊ लागला. फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट काही हाताचे, बोटांचे ठसे मिळतात का ते शोधत होते.

मोटीव्ह बद्दल काही ? जॉनने बेडरूमधून बाहेर येत सॅमला विचारले.

नाही सर ... पण एवढं नक्की आहे की तो पहिला खून ज्याने केला होता त्यानेच हाही खून केला असावा सॅम आपला तर्क सांगत होता.

हो ... तुझं बरोबर आहे ... हा सिरियल किलरचाच मामला दिसतो. जॉन सॅमला दुजोरा देत म्हणाला.

क्रमशः...

पहिली चुक...

कमांड आणि कमांड 2 खुर्चीवर आरामात बसले होते. बॉसने त्यांच्यावर सोपविलेलं काम व्यवस्थित पार पडल्यामुळे ते खुा आणि समाधानी दिसत होते. त्यांची पूर्ण रात्र धावपळीत गेली होती. बसल्या बसल्या कमांड ला तंद्री लागल्यागत होत होतं. त्याच्या समोरुन रात्रीचा एक एक प्रसंग जणू चलचित्राप्रमाणे सरकत होता....

... रात्रीचे 3—3.15 वाजले असतील. बाहेर बोचरी थंडी अंगाला झोंबत होती. इकडची तिकडची चाहूल घेत कमांड आणि कमांड 2 एका अपार्टमेंटमध्ये घुसले. आपर्टमेंटमध्ये सगळीकडे भयाण शांतता होती. तिथे जी सेक्यूरीटी तैनात होती, त्याचा त्यांनी आधीच बंदोबस्त लावला होता. तरीही सावधगीरीने, पावलांचा आवाज न होवू देता ते लिफ्टजवळ आले. आजूबाजूला आपली तिक्ष्ण नजर फिरवीत कमांड ने हलकेच लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्ट उघडताच इकडे तिकडे बघत कमांड आणि कमांड 2 दोघंही लिफ्टमध्ये घुसले. दोघांच्याही हातात पांढरे सॉक्स घातलेले होते. त्यांचा चेहरा कुणालाही व्यवस्थित दिसू नये म्हणून त्यांनी ओव्हरकोट घालून ओव्हरकोटची कॉलर उभी केली होती. लिफ्टचा दरवाजा बंद झाला. कमांड ने समोर येऊन लिफ्टचे बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10.

लिफ्ट दहाव्या फ्लोअरवर येऊन थांबली. लिफ्ट उघडली. कमांड आणि कमांड 2 इकडे तिकडे बघत हळूच बाहेर आले. कुणी नाही असं बघून ते पॅसेजमध्ये चालू लागले. त्यांच्या शूजच्या तळाशी रबर लावलेलं असावं, कारण ते जरी झपाझप चालत होते तरी त्यांच्या शूजचा बिलकुल आवाज येत नव्हता. ते 103 नंबरच्या फ्लॅटसमोर येऊन थांबले. पुन्हा दोघांनी इकडे तिकडे बघितले. कोणीही नव्हतं. आपल्या ओव्हरकोटच्या खिशातून काहीतरी काढून कमांड ने ते समोरच्या फ्लॅटच्या दाराच्या की होलमध्ये घातलं. दोन तीन झटके देऊन त्याने ते की होलमध्ये फिरविलं आणि दरवाज्याच्या हॅडलला एक हलकासा खाली दाबून झटका दिला. दार उघडलं . दोघांच्याही चेहर्‌यावर हास्य तरळलं. आंत गडद अंधार होता. दोघेही हळूच फ्लॅटमध्ये घुसले. त्यांनी त्यांच्या हातातले पांढरे सॉक्स काढून ओव्हरकोटच्या खिशात ठेवले. सॉक्सच्या आत त्यांच्या हातात रबराचे हॅन्डग्लोव्हज घातलेले होते. त्यांनी हळूच आवाज न करता आतून दरवाजा लाऊन घेतला.

हॉलमध्ये अंधारात कमांड आणि कमांड 2 चाचपडू लागले. अंधारातच त्यांनी बेडरूमच्या दिशेचा अंदाज बांधला आणि त्या दिशेने चालू लागले. अचानक कमांड मधे ठेवलेल्या टी पॉयला अडखळला. त्याने पडता पडता बाजूला ठेवलेल्या एका वस्तूला धरले आणि स्वतरूला सांभाळले. कमांड 2ने पण त्याला पडण्यापासून वाचविण्यासाठी आधार दिला. तो पडायचा तर वाचला पण या गडबडीत बाजूला ठेवलेला एक गोल काचेचा पेपर वेट त्याच्या धक्याने घरंगळायला लागला. कमांड ने पेपरवेटला मोठया शिताफीने पकडले आणि पुन्हा पूर्वीच्या जागेवर व्यवस्थित ठेवले.

अरे यार लायटर लाव ... सालं इथं काहीच दिसत नाही आहे कमांड हळू आवाजात पण चिडून बोलला.

कमांड 2ने आपल्या खिशातून लायटर काढून पेटविले. आता अंधूक प्रकाशात थोडेफार दिसायला लागले होते. त्यांच्या अगदी समोर एक उघडा दरवाजा होता.

बेडरूम इकडेच असायला पाहिजे...

कमांड ने विचार केला. कमांड हळू हळू त्या दरवाज्याकडे निघाला. मागेमागे कमांड 2 चालू लागला. दरवाज्यातून आत गेल्यावर एका बेडवर कुणीतरी झोपलेले असल्याची आकृती त्यांना दिसली. कमांड ने तोंडावर बोट ठेऊन कमांड 2ला श्बिलकुल आवाज करू नकोश् असे खुणावले. कमांड ने अंधारात चाचपडून बेडरूमचा लाईट लावला. जे कोणी झोपलेलं होतं ते बहूधा गाढ झोपलं असावं कारण काहीही हालचाल नव्हती. कोण होतं ते समाजायला काही मार्ग नव्हता कारण त्याने तोंडावरून पांघरूण घेतले होते. कमांड ने आपल्या ओवरकोटच्या उजव्या खिशातून बंदूक काढली. झोपलेल्या आकृतीकडे बंदूक रोखत त्याने त्या आकृतीच्या चेहर्‌यावरचे पांघरूण काढले. ती एक सुंदर स्त्री होती. ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच असावी कारण क्षणाचाही विलंब न लावता कमांड ने सायलेंसर लावलेल्या बंदुकीने तिच्यावर गोळ्‌यांची बरसात करणे सुरू केले. तिच्या शरीरात हालचाल झाली पण ती फक्त मृत्यूपूर्वीची तडफड होती. पुन्हा तिचे शरीर ढिले पडून तिची हालचाल थांबली. झोपेतून उठायची पण उसंत कमांड ने तिला दिली नव्हती. ती रक्ताच्या थारोळ्‌यात निश्चल अशी मृत अवेस्थेत पडली होती.

ए, तुझ्याजवळचा चाकू जरा इकडे दे कमांड कमांड 2ला म्हणाला.

आता त्याच्या आवाजातला हळूपणा जाऊन त्याला एक वेगळीच धार आली होती. कमांड 2 ने त्याच्या ओवरकोटच्या खिशातला चाकू काढून कमांड च्या हातात दिला. कमांड तो चाकू मृत शरीराच्या रक्तात बुडवून भिंतीवर रक्ताने लिहायला लागला.

लिहिणे झाल्यावर कमांड तिथे जवळच असलेल्या फोन जवळ गेला. त्याच्या ओवरकोटच्या डाव्या खिशातून त्याने एक उपकरण काढले. फोन नंबर डायल केला आणि त्या उपकरणातून फोनमध्ये बोलायला लागला, ... अजून एकजण ...हयूयाना फिलीकींन्स ...शून्यात विलीन झाली आहे...

तिकडून काही आवाज येण्याच्या आधीच त्याने फोन ठेऊन दिला. कदाचित त्याने पोलीस स्टेशनला फोन केला होता. फोन ठेवल्यानंतर अचानक कमांड चे लक्ष त्याच्या हाताकडे गेले.

माय गॉड! त्याच्या तोंडातून भीतीयुक्त आश्चर्याने निघाले.

काय झालं? कमांड 2 कमांड च्या हाताकडे बघत म्हणाला.

काय गडबड झाली ते आता कमांड 2च्यासुध्दा लक्षात आलं होतं. कमांड च्या उजव्या हातातला रबराचा हॅन्डग्लोव्ह फाटला होता. मघाशी हॉलमध्ये अडखळून पडण्याच्या गडबडीत कशाला तरी अडकून तो फाटला असावा.

माझ्या हाताचे ठसे इथे सगळीकडे उमटले असतील ... आपल्याला इथून जाण्याच्या आधी ते सर्व साफ केले पाहिजे कमांड आपल्या खिशातून रुमाल काढत म्हणाला.

जास्त ठसे नसतील ... आपण पोलीस येण्याच्या आत पटापट साफ करू शकतो कमांड 2 आपल्या खिशातून रुमाल काढत म्हणाला.

दोघेही रुमालाने खोलीतल्या सगळ्‌या जागा लाईटचा स्वीच, बेडचा काठ, बाजूचा टेबल सर्व घाई घाईने साफ करायला लागले.

बेडरूममध्ये कुठेही त्याच्या हाताचे ठसे राहिले नसावेत याची खात्री करून ते हॉलमध्ये गेले. तिथे त्यांनी टी पॉय, दरवाज्याचे हॅन्डल, खालची फरशी , जिथे हात लागल्याची शक्यता होती ते सर्व कपड्याने साफ केले. अचानक त्यांना पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐेकायला येऊ लागला. दोघांनी घाईघाईने एकदा पुन्हा बेडरूममध्ये जाऊन नजर फिरविली. जसा पोलिसांच्या गाडीचा आवाज जवळजवळ येऊ लागला तसे ते धावतच समोरच्या दरवाज्याजवळ आले. दरवाजा हळूच उघडून बाहेरची चाहूल घेत ते दोघे तिथून पसार झाले....

.... अचानक कमांड विचाराच्या तंद्रीतून जागा होत आपल्या खुर्चीतून ताडकन उठला.

काय झालं? कमांड 2 ने विचारले.

गडबड झाली ... एक मोठी चूक झाली कमांड म्हणाला.

कमांड ची नशा पूर्णपणे उतरली होती.

चूक? ... कोणती कमांड 2 ने विचारले.

कमांड च्या चेहर्‌यावरचे भाव पाहून कमांड 2ची नशा पण उतरायला लागली होती.

माझ्या बोटाचे ठसे तिथे राहिले आहेत कमांड म्हणाला.

आपण तर सर्व जागी नाहिसे केले होते कमांड 2 म्हणाला.

नाही ... एका जागी आपण साफ करायचे विसरलोे आहोत कमांड म्हणाला.

कुठे? कमांड 2 म्हणाला.

एव्हाना कमांड 2पण उठून उभा राहिला होता.

तुला आठवत असेल ... जेव्हा मी हॉलमध्ये अडखळून पडलो होतो ... तेव्हा तिथे टी पॉयवर ठेवलेला एक काचेचा पेपरवेट घरंगळायला लागला होता ... कमांड सांगत होता.

कमांड 2 कमांड कडे काळजीने बघत ऐकत होता.

आवाज होऊ नये म्हणून मी तो पेपरवेट उचलून पुन्हा पूर्वीच्या जागेवर ठेवला होता कमांड म्हणाला.

माय गॉड ... त्याच्यावर तुझ्या हाताचे ठसे तर साफ करायचे राहूनच गेले

कमांड गहन विचार करायला लागला.

आता काय करायचं? कमांड 2 ने विचारले.

कमांड काहीच बोलला नाही. खिडकीजवळ जाऊन खिडकीच्या बाहेर बघत तो विचार करायला लागला. कमांड 2 ला काय करावे अन काय बोलावे काहीच सुचत नव्हते. तो नुसता कमांड च्या हालचाली बघत होता. कमांड पुन्हा खिडकीजवळून ते दोघे जिथे बसले होते तिथे परत आला. त्याने समोर ठेवलेला त्याचा व्हिस्कीचा रिकामा ग्लास पुन्हा भरला आणि एका घोटातच पूर्णपणे रिचविला. पुन्हा कमांड खिडकीजवळ गेला आणि विचारात मग्न झाला.

काही तर करता येईल आपल्याला कमांड 2 कमांड ला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होता.

कमांड काही वेळ स्तब्ध उभा राहिला आणि अचानक काही तरी सुचल्यासारखे ओरडला ,

यस्स ऽऽ

काय, काही मार्ग मिळाला? कमांड 2 ने आनंदाने विचारले.

पण कमांड कुठे सांगण्याच्या मनस्थितीत होता? त्याने कमांड 2 ला खुणावले,

चल लवकर ... चल माझ्यासोबत चल

कमांड घराच्या बाहेर पडला आणि त्याच्या मागे मागे कमांड 2 चालत होता.

क्रमशः ...

माय गॉड ...

हयूयानाच्या शवाभोवती तपास करणार्‌या टेक्नीकल लोकांची गर्दी झाली होती. त्यांना अडचण होवू नये म्हणून जॉन आणि सॅम बेडरूममधून बाहेर आले. बाहेर हॉलमध्येसुध्दा जॉनचे काही साथीदार होते. त्या साथीदारांपैकी डॅन बाकीच्या रूम्समध्ये काही पुरावा मिळतो का ते शोधत होता. एवढ्यात डॅनचा व्हायब्रेशन मोडमध्ये ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने फोन काढून नंबर बघितला. नंबर तर ओळखीचा वाटत नव्हता. डॅनने मोबाईल बंद करून खिशात ठेऊन दिला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

थोड्या वेळाने डॅनच्या फोनवर एस. एम. एस. आला. एस. एम. एस. त्याच फोन नंबरवरुन आला होता. त्याने मेसेज ओपन करुन बघितला—

डॅन फोन उचल... ते तुझ्यासाठी खूप फायद्याचे ठरेल.

डॅन विचारात पडला. हा असा कुणाचा एस. एम. एस. असू शकतो. फायदा म्हणजे कोणत्या फायद्याबद्द्‌ल बोलत असावा हा. आपल्या डोक्याला ताण देऊन डॅन तो नंबर कुणाचा असावा हे आठविण्याचा प्रयत्न करू लागला. कदाचित नंबर आपल्या डायरीत असू शकतो. डायरी काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला तोच पुन्हा डॅनचा मोबाईल व्हायब्रेट झाला. डॅनने मोबाईलचे बटण दाबून मोबाईल कानाला लावला.

तिकडून आवाज आला,

मला माहित आहे तू सध्या कुठे आहेस... हयूयाना फिलीकींन्स च्या फ्लॅटमध्ये... लवकरात लवकर कुणी ऐकणार नाही अशा जागी जा... मला तुझ्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे जॉन आणि अँजेनी हॉलमध्ये बसले होते.

या दोन्हीही खुनांवरून मी काही निर्का काढले आहेत... जॉन अँजेनीला सांगत होता.

कोणते? अँजेनीने विचारले.

पहिली गोट ही की खुनी ... इंटेलेक्च्यूअल्स या कॅटेगिरीत मोडायला पाहिजे जॉन म्हणाला.

म्हणजे? अँजेनीने विचारले

म्हणजे तो प्रोफेसर , वैज्ञानिक, मॅथेमॅटेशियन... यापैकीच काहीतरी त्याचे प्रोफेशन असले पाहिजे जॉनने आपला निर्का सांगितला.

कशावरून? अँजेनीने विचारले.

त्याच्या शून्याशी असलेल्या आर्काणावरून असं वाटतं ... पण 0़6=6 आणि 0•6 =0 असं लिहून त्याला काय सुचवायचे असेल? जॉन म्हणाला.

असं होवू शकतं की त्याला एकूण 6 खून करायचे असतील अँजेनी म्हणाली होवू शकतं जॉन विचार करीत एकटक तिच्याकडे बघत म्हणाला.

जॉनने खुनाच्या जागी काढलेले काही फोटो अँजेनी जवळ दिले.

बघ या फोटोंवरून विशेा असं काही तुझ्या लक्षात येतं का? जॉन म्हणाला.

एक गोट अजून माझ्या लक्षात आली आहे... जॉन म्हणाला.

कोणती? फोटो न्याहाळत अँजेनीने विचारले.

की दोन्हीही खून हे अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावरच झालेले आहेत... जॉन म्हणाला.

अँजेनीने फोटो बघता बघता जॉनकडे बघत म्हटले, हो बरोबर ... हे तर माझ्या लक्षातच आले नव्हते अँजेनी पुन्हा फोटो बघत होती. जॉन तिचे फोटो बघतानांचे हावभाव न्याहाळत होता. अचानक अँजेनीच्या चेहर्‌यावर आश्चर्याचे हावभाव उमटले.

जॉन हे बघ... अँजेनी दोन फोटो जॉनच्या समोर धरीत म्हणाली.

जॉनने ते दोन फोटो बघितले आणि त्याच्या तोंडातून निघाले, माय गॉड...

जॉन उठून उभा राहिला होता.

क्रमशः ...

विश्वासघात...

मध्यरात्रीनंतरची वेळ होती. अंगाला झोंबणारी थंडी. पुलावरून तुरळक गाड्यांची रहदारी चालू होती. एक गाडी पुलाच्या बाजूला येऊन थांबली. त्यातून एक आकृती बाहेर आली. अंगात जाड थंडीचा कोट. थंडीमुळे किंवा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात पण लोकरीचे काहीतरी घातलेले होते. ती आकृती हळू हळू पुलाच्या खाली उतरायला लागली. पुलाच्या खाली एका जागी थांबून त्या आकृतीने पुन्हा एकदा इकडे तिकडे आपली नजर फिरविली. मग जमिनीवर खाली वाकून ती आकृती जमिनीवरचे दगड बाजूला करून काहीतरी शोधत होती. एक मोठा दगड बाजूला सारल्यावर ती आकृती स्तब्ध झाली . दगडाखाली तिला काहीतरी दिसले असावे. त्या आकृतीने ते काय आहे ते चाचपडून पाहिले. तिने ती वस्तू उचलली. मग उभे राहून आपल्या कोटाच्या खिशातून कापडात गुंडाळलेले काहीतरी काढले. त्या आकृतीने जी वस्तू उचलली होती ती आपल्या कोटाच्या खिशात ठेवली आणि जी वस्तू आपल्या खिशातून काढली होती ती तिथेे ठेऊन त्याच्यावर दगड ठेवला. पुन्हा ती आकृती इकडे तिकडे बघत आपल्या गाडीजवळ जायला लागली. ती आकृती आपल्या गाडीजवळ येऊन पोहोचते, तोच समोरून एक गाडी भरधाव वेगाने पुलाकडे जाऊ लागली. त्या गाडीच्या हेडलाईटस्चा लख्ख प्रकाश आकृतीच्या चेहर्‌यावर पडला. ती आकृती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून जॉनचा जवळचा साथीदार डॅन होता.

आज सकाळी आल्याबरोबर अॉफीसच्या लोकांना हॉलमध्ये ताबडतोब जमण्याचा आदेश मिळाला. असं फार क्वचितच होत असे. असं काय झालं असावं की जॉनने त्याच्या साथीदारांना हॉलमध्ये जमण्यास सांगितले. आता सुरू असलेल्या सिरीयल किलरच्या केससंदर्भातच काहीतरी महत्वाचे असावेय सॅम ने विचार केला. सॅम जॉनच्या अगदी जवळचा मानला जात होता. असं काही जरी असलं तरी त्याला त्याची पूर्वकल्पना जॉन देत असे. पण आज असं काहीच झालं नव्हतं. सॅमला पण काहीही कल्पना नव्हती की कशाची मिटींग आहे.

सॅम जेव्हा हॉलमध्ये आला तेव्हा तो तिथेे एकटाच होता. हळू हळू सर्वजण कुजबूज करीत येऊ लागले. बर्‌याच जणांनी सॅमला विचारलंसुध्दा. सॅमला पण माहित नसल्याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. अजून जॉन हॉलमध्ये आला नव्हता. सगळ्‌यात शेवटी डॅन चोरट्या पावलांनी हॉलमध्ये शिरला आणि एका कोपर्‌यात जाऊन बसला. त्याचा चेहरा चिंतित दिसत होता. जॉनला कळलं तर नसेल आपण काय कारस्थान केलं ते. पण माहित होण्याचा काही प्रश्नच नव्हता. तो स्वतरूची समजूत घालू लागला. आपण कुणाचं काम केलं हे आपल्यालाच जर माहित नव्हतं तर जॉनला माहित होण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्याला कुणीतरी अज्ञात इसमाचा फोन आला. त्याने आपल्याला एक काम सांगितलं आणि त्याच्या मोबदल्यात भरपूर पैसे दिले. पैसे पण आपण परस्पर एका जागी ठेवले होते तिथून उचलले. डॅन आता थोडा रिलॅक्स झाला. त्याच्या चेहर्‌यावरचे चिंतेचे भाव आता दिसेनासे झाले. एवढ्यात भराभर मोठी मोठी पावलं टाकीत जॉन हॉलमध्ये आला. सरळ पोडीयमवर जाऊन त्याने त्याच्या हातातली फाईल टेबलवर ठेवली. साधारणतरू नेहमी त्याची फाईल त्याच्या मागोमाग कुणीतरी आणत असे. पण आज त्याच्या मागे तर कुणीच नव्हते. त्याची फाईल त्याने स्वतरूच आणली होती.

आज एक वाईट आणि तेवढीच धक्कादायक बातमी देण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलाविले आहे जॉन म्हणाला.

इकडे डॅनच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. जॉनने आपली नजर सर्वत्र हॉलमध्ये फिरविली. प्रत्येकाच्या चेहर्‌यावरचे भाव जणू तो टिपत होता.

त्याने त्याच्या फाईलमधील दोन फोटो काढले आणि समोरच्या त्याच्या साथीदारांजवळ देऊन पूर्ण हॉलमध्ये फिरविण्यास सांगितले. फोटो एकाजवळून दुसर्‌याजवळ जायला लागले. कुणाच्या चेहर्‌यावर असंमजस आणि गोंधळलेले भाव होते. तर कुणाच्या चेहर्‌यावर आश्चर्याचे भाव होते.

दोन्हीही फोटो लक्ष देऊन बघा.. जॉन म्हणाला.

हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली.

व्यवस्थित बघा... दोन्हीही फोटोत एक टी पॉय आहे... एका फोटोत टीपॉयवर पेपरवेट ठेवलेला आहे तर ... दुसर्‌या फोटोत तो तिथून गायब झालेला आहे... आपल्याला सवार्ंना घटनेच्या जागी कोणत्याही वस्तूला हलविण्याचे आदेश नसतात... जॉनने एकदा पुन्हा आपली तीक्ष्ण नजर हॉलमध्ये फिरविली.

मग तो पेपरवेट गेला कुठे.... पेपरवेट नाहीसा होतो याचा अर्थ काय?... की त्या पेपरवेटमध्ये अशी काही गोट होती की ज्यामुळे खुनी पकडला जाण्याची शक्यता होती ... जसे हाताचे ठसे .. रक्ताचा अंश इत्यादि ...

इकडे डॅन आपल्या भावना लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला.

मग पेपरवेट नाहीसा होतो याचा अर्थ काय?...की आपल्यातलाच कुणीतरी ... विश्वासघातकी आहे आणि तो खुन्याला फितूर झालेला आहे.. जॉन म्हणाला.

हॉलमध्ये स्मशानवत शांतता पसरली. डॅनच्या डोळ्‌यात विश्वासघाताचे भाव तरळले. पण ते जॉनने हेरले होते का?

क्रमशः ...

फर्स्‌ट डेट ...

जॉनचं डोकं विचार करून करून गरगरायला लागलं होतं. दोन खून झाले होते आणि खुन्याचा सुगावा काही लागत नव्हता. कुठं थोडं चौकशीसाठी बाहेर जावं तर प्रेसवाले बाहेर दबा धरून बसले होते. जॉन दिसताच सगळे त्याच्यावर तुटून पडत. बरं काही केसमध्ये प्रगती असेल तरच काहीतरी सांगणार. प्रगती नसतांना प्रेसवाल्यांना फेस करणं मोठं कठीण होऊन बसलं होतं. बाहेर प्रेसवाले आणि आत एकजण कुणीतरी सगळी माहिती बाहेर फोडत होता. आतल्या कुणाजवळही काही बोलायची सोय नव्हती. न जाणो ज्याच्याशी चर्चा करावी तोच काफर असावा. आता कुणीतरी एका पोलीसवाल्याने गद्दारी केल्याची बातमी थेट प्रेसपयर्ंत जाऊन पोहोचली.

क्रमशः ...

प्रेसवाल्यांनी

पुढचा कोण?

पोलिसवाले स्वतरूच बेईमान तर खुन्याला काय पकडणार?

अजून किती जणांचा मुडदा पडणार?

अशा वेगवेगळ्‌या मथळ्‌याखाली वेगवेगळी माहिती पसरवून सगळ्‌या शहरात अक्षरशरू दशहत पसरविली होती. आता लोक पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न विचारायला लागले होते. आणि हे एवढं टेन्शन अपूरं होतं म्हणून की काय वरून वरीठांनी पण जाब विचारायला सुरवात केली होती. विचार करून करून जॉनचं डोकं अगदी शिणलं होतं. जॉननं खिडकीतून बाहेर डोकाऊन बघितलं. संध्याकाळ झाली होती. अंधार पसरायला थोडाच अवकाश होता. अचानक जॉनला काय सुचलं कुणास ठाऊक त्याने समोरच्या फोनचा रीसीव्हर उचलला आणि तो एक नंबर डायल करायला लागला.

काय करते आहेस? ... तो फोनमध्ये म्हणाला

कोण? ... जॉन! तिकडून अँजेनीचा उत्साहाने भरलेला आवाज आला.

कशी आहेस... तो म्हणाला.

आपला आवाज ओळखल्याचं समाधान जॉनच्या चेहर्‌यावर झळकत होतं.

आहे आपली बरी... तिचा खोल आवाज आला.

तिला हा प्रश्न विचारुन उगीच दुरूखी केल्याचं जॉनच्या चेहर्‌यावर दिसत होतं. तिला काय बोलावं की ती पुन्हा उत्साहीत होईल. जॉनला काही सुचत नव्हतं.

... काय, काही माहिती मिळाली का खुन्याची ? तिकडून अँजेनीने विचारले.

याच प्रश्नांना कंटाळून मी तुला फोन केला आणि तू पण हेच विचार... जॉन म्हणाला.

नाही ....बर्‌याच दिवसांनी तुझा अचानक फोन आला ... म्हटलं काहीतरी प्रगती असेल अँजेनी म्हणाली.

नाही ... विशेा अशी काहीच प्रगती नाही ... बरं ... मी फोन याच्यासाठी केला की ... आज संध्याकाळी तुझा काय प्रोग्रॅम आहे? जॉनने मूळ मुद्याला हात घालीत विचारले.

काही नाही अँजेनी तिकडून म्हणाली.

मग असं कर ... तयार हो ... मी अर्ध्‌या तासात तुला घ्यायला येतो... आपण डीनरला जाऊया जॉन हक्काने म्हणाला.

पण...

पण ... बिण काही नाही ... काही एक बहाणा चालणार नाही ... मी अर्ध्‌या तासात तुझ्याकडे पोहोचतो आहे जॉन म्हणाला.

आणि ती काही बोलण्याच्या आधीच फोन ठेऊन उठून तो निघाला पण.

इकडे इतक्या लवकर तयारी करायची म्हणजे अँजेनीचा गोंधळ उडाला होता. तिलाही पुकळ दिवसापासनं एकटं एकटं राहून गुदमरल्यासारखं होत होतं. तिलाही आता श्चेंजश्ची आवश्यकता वाटत होती. तिने भराभर आपले कपडे बदलले आणि ड्रेसींग टेबलसमोर आरश्यात बघत मेकअप करीत बसली. तिला आठवत होतं आज जवळपास एक महिना होऊन गेला होता. ती बाहेर कुठे गेली नव्हती. सानीच्या खुनानंतर तिचे जीवन कसे नीरस होऊन गेले होते. सानी सोबत ती नेहमीच अशी नटूनथटून बाहेर, कधी शॉपींगला, कधी फिरायला तर कधी डिनरसाठी जात असे. सानीचा विचार येताच जरी मेकअप केला होता तरी तिचा चेहरा कोमेजल्यासारखा दिसू लागला. तेवढ्यात डोअर बेल वाजली. डोअर बेल वाजल्याबरोबर तिच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत असं तिला जाणवत होतं. पण का? काही कळत नव्हतं. ती उठून दरवाज्याकडे गेली. दरवाजा उघडला. समोर जॉन उभा होता.

रेडी? जॉनने आत यायच्या आधीच विचारलं.

अॉलमोस्ट... जस्ट वेट अ मिनिट त्याला आत घेत ती म्हणाली.

दरवाजा आतून लाऊन जॉनला तिने हॉलमध्ये बसायला सांगितले व ती आतमध्ये आवराआवर करायला निघून गेली. जॉन हॉलमध्ये बसून तिचा हॉल निरखून पाहत होता. जॉन उठून खिडकीजवळ गेला. खिडकीच्या बाहेर गोल आकाराचा तलाव त्याला दिसला. त्याने तो पूर्वी तपासासाठी आला होता तेव्हा पण पाहिला होता. त्यावेळी त्या तलावाबद्द्‌ल बरेच प्रश्न त्याच्या मनात आले होते. पण ते कुणाला विचारायचे? आणि ती वेळ ते प्रश्न विचारण्यास योग्य नव्हती म्हणून अनुत्तरीतच राहिले होते.

हा तलाव नॅचरल आहे की कृत्रिम ? त्याने उत्सुकतेने मोठया आवाजात आत अँजेनीला विचारले.

हो ... एक मिनिट ... आलेच आतून अँजेनी मोठ्याने म्हणाली.

त्याच्या प्रश्नाचे हे अनपेक्षित उत्तर आलेले ऐकून तो नुसता गालातल्या गालात हसला.

थोड्या वेळाने त्याच्यासमोर मेकअप करून, नटून थटून तयार अशी अँजेनी उभी होती. यापूर्वी त्याने तिला अशा रूपात बघितले नव्हते. तिची सुंदरता अजूनच खुलून दिसत होती.

सुंदर दिसत आहेस जॉनने तिला कॉम्प्लीमेंट दिले.

काय म्हणत होतास ? ... आत असतांना हाक मारलीस ती अँजेनी लाजून गोट टाळत म्हणाली.

नाही मी विचारत होतो की हे मागचे तळे नॅचरल आहे की कृत्रिम जॉन खिडकीबाहेरचे तळे तिला दाखवित म्हणाला.

हे ना... नॅचरलच आहे... हजारो र्वाापूर्वी एक मोठी उल्का आकाशातून पडली आणि हे तळे तयार झाले असं म्हणतात. अँजेनी सांगत होती.

तरी मी म्हटलं ...हे तळं एकदम परफेक्ट गोल कसं काय? जॉन म्हणाला.

अरे हं... तर मग निघायचं जॉन आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला.

अँजेनीने डोळ्‌यांनीच होकार दिला आणि ते दोघं निघाले.

चित्र

रात्रीचा गडद अंधार आणि त्यात भर म्हणजे बोचणारी कडक थंडी. अशा थंडीत बरीच प्रेमी युगल जोडपे रस्त्याच्या कडेला फिरत होती. रस्त्याच्या कडेला पलिकडे एक आलीशान हॉटेल होतं. ही जागा शहराच्या इतर भागांपेक्षा उंच असल्यामुळे शहरातील लाईट्‌स्‌ एखाद्या टिमटिमणार्‌या चांदण्यांच्या समूहासारखे दिसत होते. रस्त्याच्या दुसर्‌या बाजूला खाली गोल तळ्‌याभोवतालचे लाईट्‌स्‌ तर एखाद्या राणीच्या गळ्‌यातल्या हिर्‌याच्या नेकलेसप्रमाणे जाणवत होते. आणि तळ्‌यात पडलेल्या काही लाईट्‌स्च्या प्रतिबिंबामुळे त्या नेकलेसला एक वेगळीच शोभा आलेली दिसत होती. या सगळ्‌या वातावरणात एक विजोड जोडपं होतं. ते कमांड आणि कमांड 2चं. तिकडे कोपर्‌यात एका बाजूला त्यांची काहीतरी चर्चा चालली होती. तेवढ्यात हॉटेलसमोर एक भलीमोठी आलीशान गाडी येऊन थांबली. गाडीतून जॉन आणि अँजेनी उतरले. त्यांना बघताच कमांड आणि कमांड 2 ची चर्चा बंद झाली. ते दोघंही चोरून जॉन आणि अँजेनीकडे बघायला लागले.

अँजेनी आणि जॉन हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये एका कोपर्‌यात बसले.

बसल्यावर जॉन म्हणाला काय घेणार? ... ड्रिंक्स?

नाही ... तुला घ्यायचं असेल तर तू घे अँजेनी म्हणाली.

नाही मग ... मी पण नाही घेणार ... बरं मग जेवणासाठी काय प्रीफर करणार जॉन ने विचारले.

काहीही ... तू म्हणशील ते अँजेनी म्हणाली.

चायनीज? जॉन ने विचारले.

अँजेनीने मानेनेच होकार दिला.

आधी सूप मागवू या ... कार्न सूप ? जॉनने पुन्हा तिला विचारले.

तिने पुन्हा मानेनेच होकार दर्शविला. जॉनने त्याच्या हातातला मोबाईल समोर टेबलवर ठेवला आणि त्याची नजर आर्डर देण्यासाठी वेटरला शोधू लागली.

असं दिसतं ...तू नेहमी इथे येत असतोस अँजेनी काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.

हो तसा नेहमीच येत असतो... पण एका स्त्रीसोबत पहिल्यांदाच आलो आहे तो खट्याळपणे म्हणाला.

अँजेनीपण गालातल्या गालात हसली. तेवढ्यात वेटर तिथे आला. जॉनने सूपची आर्डर दिली.

कशी आहे आता तुझी तब्येत ... एवढ्यात गेली होतीस का पुन्हा डॉक्टरकडे जॉनने तिची चौकशी करीत विचारले.

तशी तब्येत बरी आहे... कालच गेले होते डॉक्टरकडे ...पण ते तरी काय उपचार करणार... मला तर काहीच कळेनासं झालं आहे की या दुरूखातून कसं बाहेर पडावं अँजेनी म्हणाली.

तिच्या चेहर्‌यावर पुन्हा दुरूखाची काळीमा पसरली होती.

वेळ ... वेळ हेच दुरूखासाठी औाध असतं... सांगणारे कितीही सांगतील ... पण ज्याच्यावर बेतते त्यालाच कळते. जॉनने तिच्या हातावर आपला हात ठेवत तिला दिलासा देत म्हटले.

वेळ .... हो वेळ ... पण किती वेळ अँजेनी उसासा टाकत म्हणाली.

बरं तू कामावर जाणं सुरू केलंस की नाही अजून? जॉनने विचारले.

नाही, माझं कशातच लक्ष लागत नाही... अगदी कशातच नाही... मग तिथे जाऊन तरी काय करू? ती म्हणाली.

माझं ऐक... उद्यापासून कामावर जायला लाग ... कामात गुंतून राहाणं तुझ्यासाठी फार आवश्यक आहे...कामात गुंतून राहिलं की हळू हळू दुरूखाचा विसर पडत जातो जॉनने तिला सल्ला दिला.

बघू या ... तू म्हणतोस तर तसंही करून बघते ती म्हणाली.

जॉनने तिच्या हातावर ठेवलेला हात तिने आता हलकेच आपल्या हातात घेतला.

या वाईट दिवसांत खरोखर तुझा मला पुकळ आधार लाभला ती त्याचा हात अजून घट्ट पकडीत म्हणाली.

तेवढ्यात जॉनला खिडकीच्या काचेतून बाहेर रस्त्यावर एक गाडी जातांना दिसली. त्या गाडीच्या मागच्या काचेवर रक्ताने शून्य काढल्याचे चित्र चिकटविलेले होते. जॉन ताडकन उभा राहिला.

तू इथेच थांब मी आत्ता येतो... असं म्हणत जॉन धावतच हॉटेलच्या बाहेर पडला.

अँजेनी गोंधळून काय झालं ते बघायला लागली. ती खिडकीतून बाहेर बघेपयर्ंत बाहेरची गाडी तिच्या नजरेआड झाली होती. ती पण उठून जॉनच्या मागे घाईघाईने जायला लागली. पण तोपयर्ंत जॉनने आपली गाडी पाकिर्ंगमधून काढून रस्त्यावर एका दिशेने भरधाव वेगात दौडविली होती. अँजेनी हॉटेलच्या पायर्‌यांवरच असमंजसपणे इकडे तिकडे पाहत उभी राहिली.

पाठलाग ...

जॉनची गाडी भरधाव वेगाने धावायला लागली. थोड्याच वेळात ज्या गाडीच्या मागच्या काचेवर रक्ताने काढलेल्या शून्याचं चित्र होतं ती गाडी जॉनच्या दृटीक्षेपात आली. ती गाडी दिसताच जॉनच्या अंगात अजूनच स्फूर्ती संचारल्यासारखे झाले. त्याने त्याच्या गाडीची गती अजूनच वाढविली. थोड्या वेळातच त्याने त्या गाडीला जवळ जवळ गाठले. पण हे काय? त्याची गाडी जवळ जाताच समोरच्या गाडीने अचानक वेग वाढविला आणि ती जॉनच्या गाडीपासून दूर दूर जाऊ लागली. जॉनने पण अजून वेग वाढविला. दोन्हीही गाड्यांची जणू शर्यत लागली होती. रस्त्यावर दुसरी अशी रहदारी नसल्यातच जमा होती. या दोनच गाड्या एकामागे एक अशा बेफाम वेगाने धावायला लागल्या. जॉनला पुन्हा जाणवले की आपण समोरच्या गाडीला गाठू शकतो. जॉनने अजून त्याच्या गाडीचा वेग वाढविला. थोड्या वेळातच जॉनची गाडी समोरच्या गाडीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली. जॉनने खिशातून रिव्हॉल्वर काढले आणि तो समोरच्या गाडीच्या दिशेने फायर करणार एवढ्यात अचानक समोरच्या गाडीचे कर्रऽऽ कर्रऽऽ असा आवाज करीत ब्रेक लागले. जॉनची गाडी त्या गाडीच्या अगदी मागे अनियंत्रित आणि बेकाबू वेगाने धावत होती. समोरच्या गाडीचे ब्रेक लागल्याबरोबर जॉनला ब्रेक दाबणे भाग पडले. त्याच्या गाडीचे टायर किंचाळायला लागले आणि समोरच्या गाडीसोबतची धडक वाचविता वाचविता त्याची गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका जागी थांबली. अपघात थोडक्यात वाचला होता! अपघात वाचला हे बघून जॉनला थोडं हायसं वाटलं. पण हे काय? ती दुसरी गाडी पुन्हा सुरू झाली आणि अगदी जोरात जॉनच्या गाडीच्या दिशेने येऊ लागली. जॉन घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच ती गाडी त्याच्या गाडीला डॅश करूनसुध्दा गेली. जॉन या धक्यातून सावरतो न सावरतो तोच त्याने बघितले की त्या गाडीतून त्याच्या दिशेने रिव्हॉल्वरच्या गोळ्‌या येऊ लागल्या. थोड्या वेळात ती गाडी भरधाव वेगात समोर धावू लागली आणि मग दिसेनाशी झाली. जॉन त्याची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याची गाडी सुरू होण्याचं नाव घेत नव्हती. शेवटी लंगडत लंगडत तो गाडीच्या बाहेर आला आणि समोरची गाडी त्याच्या तावडीतून सुटत आहे हे पाहून चिडून त्याने आपली आवळलेली मूठ गाडीवर जोरात आपटली.

काय झालं ?...

इकडे अँजेनी जॉनची वाट बघून बघून थकली.

काय झाले असावे? ...

जॉन कुठे गेला असावा?...

इतका वेळ झाला तरी तो परत का आला नसावा?...

तिला काळजी वाटू लागली.

बरं फोन करावं म्हटलं...

तर तो त्याचा मोबाईल इथेच ठेवून गेला होता....

तिला काहीच सुचत नव्हते. घटकेतच ती हॉटेलच्या आत जाऊन बसायची आणि बाहेर काही चाहूल लागताच पुन्हा बाहेर येऊन बघायची. तिला त्याची इतकी का काळजी वाटावी?...

तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात पुन्हा बाहेर कोणती तरी गाडी आल्याची चाहूल लागली. ती उठून पुन्हा बाहेर आली. गाडी हॉटेलच्या समोर थांबली होती. पण ती जॉनची गाडी नव्हती. ती एक प्रायव्हेट टॅक्सी होती. ती पुन्हा आत जायला लागली तर तिला मागून आवाज आला,

अँजेनी

तिने वळून बघितले तर टॅक्सीतून जॉन उतरला होता. त्याचे केस सगळे विस्कटलेले, शर्ट एका जागी फाटलेला आणि शर्टवर काळे मळके डाग पडले होते.

काय झालं असावं?...

तिला काळजी वाटून ती जॉनकडे जायला लागली. जॉनपण लंगडत लंगडत तिच्याकडे यायला लागला.

काय झालं? घाईघाईने ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली.

काही न बोलता जॉन तिच्याकडे लंगडत लंगडत चालू लागला. तिने पटकन जाऊन त्याला आधार दिला.

आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे अँजेनी त्याला कुठं कुठं लागलं ते पाहत म्हणाली.

नाही ... तेवढा काही विशेा मार नाही ... फक्त मुका मार लागलेला आहे तो कसाबसा बोलला.

तरीपण चेकअप करायला काय हरकत आहे? ती जाणार्‌या टॅक्सीला थांबण्यासाठी हात दाखवित म्हणाली.

तिने त्याला आधार देत टॅक्सीत बसविले आणि ती पण त्याच्या शेजारी त्याच्याजवळ सरकून बसली.

थ्री कौंटीज हॉस्पिटल तिने टॅक्सीवाल्याला आदेश दिला.

नको खरंच नको ... तशी काही गरज नाही आहे तो म्हणाला.

तुझी गाडी कुठाय? तिने विचारले.

आहे ... तिकडे ... मागे... रस्त्याच्या कडेला... मोठा ॲक्सीडेंट होता होता वाचला तो सांगू लागला.

ड्रायव्हर ... गाडी पोलीस क्वार्टर्सला घे मध्येच त्याने ड्रायव्हर ला आदेश दिला.

ड्रायव्हरने गाडी स्लो करून एकदा अँजेनी आणि मग जॉनकडे बघितले. अँजेनीने श्ठीक आहे तो म्हणतो तिकडेच गाडी घेश् असे ड्रायव्हरला इशार्‌यानेच सांगितले.

मधुर मिलन ...

अँजेनी त्याला आधार देत देत त्याच्या क्वार्टरकडे नेऊ लागली.

अच्छा, म्हणजे ...त्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता... तू असं एकटं फिरणं आता धोकादायक आहे... तू स्वतरूची काळजी घ्यायला पाहिजे आणि नेहमी स्वतरू बरोबर प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे अँजेनी त्याची सगळी हकिकत ऐकून निर्कााप्रत पोहोचली.

नाही... हल्ला नाही केला त्यांनी... जर त्यांनी ठरविलं असतं तर ते आज मला जीवे मारू शकले असते... पण त्यांनी नाही मारलं तो तिचा आधार घेत म्हणाला.

तुझ्यावर गोळ्‌या झाडल्या नं त्यांनी? अँजेनीने त्याला पुन्हा विचारले.

हो ... पण सगळ्‌या आजूबाजूला ... एकही गोळी माझ्या जवळून सुध्दा गेली नाही... ते त्यांच्या गाडीच्या खाली उतरूनसुध्दा माझ्यावर गोळ्‌या झाडू शकले असते जॉन आपला तर्क सांगत होता.

बरं जाऊ दे... तुला काही सिरीयस इजा तर झाली नाही ना... हे सगळ्‌यात महत्वाचं ती त्याला दिलासा देत म्हणाली.

त्यांनी फक्त मला चिथाविण्याचा प्रयत्न केला... असं दिसतं की ते या सिरीयल किलींगला जास्तीत जास्त प्रसिध्दी देवू इच्छितात... जॉनने आपला अंदाज वर्तविला.

पण त्याने काय होणार आहे? अँजेनीने आश्चर्याने विचारले.

तेच तर कोडं मला उलगडत नाही आहे.. जॉन चाबीने त्याचा फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

अँजेनीने त्याच्या हातातून चाबी घेतली आणि ती स्वतरू त्याचा फ्लॅट उघडायला लागली.

जॉन उघडा बेडवर पडला होता. वरून वरून जरी वाटत नसले तरी त्याच्या शरीरावर बर्‌याच जागी मुक्या माराचे लाल व्रण होते. अँजेनीने त्याला जिथे जिथे लागले होते तिथे मलम लावून दिले आणि शेकण्यासाठी त्याला शेकायची रबराची पिशवी गरम पाण्याने भरून दिली.

बराय आता मी निघते... तू आराम कर ... बराच उशीर झाला आहे अँजेनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले.

ती जाण्यासाठी वळायला लागली तेव्हा जॉनने त्याच्या खांद्यावर ठेवलेला तिचा हात पकडला. तिने वळून त्याच्याकडे बघितले. तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. जॉन तिच्या डोळ्‌यास डोळे भिडवून बघायला लागला. तिचे पण डोळे त्याच्या डोळ्‌यातून हटायला तयार नव्हते. दोघांच्याही हृदयाची स्पंदनं वाढायला लागली. जॉनने तिला जवळ ओढून घेतले. आता दोघंही इतके जवळ आले होते की दोघांनाही एकमेकांचे गरम श्वास आणि हृदयाचे वाढलेले ठोके जाणवायला लागले होते. जॉनने हळूच तिच्या थरथरत्या ओठांवर आपले गरम ओठ टेकविले आणि करकचून तिला आपल्या बाहूपाशात बंद केले. जॉनला आठविले की तिला कृत्रिम श्वासोच्छवास देतांना त्याने असेच तिच्या ओठांवर ओठ टेकवीले होते. पण त्यावेळी आणि आता किती फरक होता. कृती तीच होती पण भावनेने तिला किती वेगळा अर्थ दिला होता. आवेगानं ते एकमेकांच्या चेहर्‌याचे, ओठांचे, मानेचे चुंबनं घ्यायला लागले. जॉन हळूवार तिच्या मोठमोठया श्वासांमुळे खालीवर होणार्‌या उरोजांना स्पर्श करु लागला.

अँजेनी... आय लव्ह यू सो मच अनायास त्याच्या तोंडून निघाले.

आय टू म्हणत ती त्याला एखाद्या वेलीसारखी करकचून बिलगली.

आं..ऊं जॉन जोरात ओरडला.

काय झालं? पटकन ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली.

अगं काही नाही ... पाठीवर जिथं लागलं आहे तिथं थोडं दुखलं तो म्हणाला.

आय ॲम सॉरी ती लाजून म्हणाली.

त्याने हसून तिला पुन्हा आपल्या बाहूपाशात ओढून घेतले. ती पण हसायला लागली. आणि मग केव्हा ते आपल्या प्रेममिश्रीत हळूवार प्रणयात मग्न झाले त्यांना कळलंच नाही.

बॉसचा फोन...

कमांड काम्प्यूटरवर काहीतरी करीत होता. कमांड 2 त्याच्या बाजूला हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन ऐटीत बसला होता.

साल्याला कुचलायलाच पाहिजे होतं कमांड 2 आपला व्हिस्कीचा ग्लास रिचवित म्हणाला.

अरे नाही. त्याला जिवंत ठेवणं फार आवश्यक आहे कमांड काम्प्यूटरवरच्या की बोर्डवर पटापट कमांड स्‌ टाईप करीत म्हणाला.

तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या फोनची घंटी वाजली.

कमांड ने फोन उचलला.

काम्प्यूटरवरचे आपले काम सुरू ठेवीतच तो फोनवर म्हणाला ,

हॅलो

तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही.

हॅलो ... कोण बोलतय?

कमांड ने फोनच्या डिस्प्लेवर तिकडच्या फोनचा नंबर पाहण्यासाठी बघितले. डिस्प्लेवर काहीच नंबर नव्हता. आता मात्र कमांड चे धाबे दणाणले.

तो आपले काम्प्यूटरवरचे काम सोडून पुन्हा फोनमध्ये म्हणाला,

हॅलो...

मी बॉस बोलतोय कमांड चे बोलणे तोडीत तिकडून आवाज आला.

ब.. ब... बबॉस ? ... यस बॉस कमांड च्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.

कमांड ताडकन खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याचे हात थरथरायला लागले. त्याच्या पूर्ण चेहर्‌यावर घाम फुटला होता. एक घामाचा ओघळ त्याच्या कानामागून घरंगळत खाली आला.

कमांड 2 अचंब्यात पडला

कमांड 2ने कमांड ला इतकं घाबरलेल्या स्थितीत पूर्वी कधीच पाहिले नव्हते...

कमांड ची ही स्थिती पाहून कमांड 2ने आपला व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवला आणि तो सुध्दा खुर्चीवरून उठून उभा राहिला.

बॉसने यापूर्वी कधी फोन केल्याचं त्याच्या ऐकीवात नव्हतं...

बॉस त्याचे पूर्ण आदेश इंटरनेटद्वाराच द्यायचा...

मग त्याला आज अचानक फोन करण्याची काय गरज पडली?...

तुम्हाला जॉनला धडकावण्याचा शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? तिकडून कणखर आणि गंभीर आवाज आला.

आवाज इलेक्ट्रॉनिक उपकरणातून फिल्टर केल्यासारखा जाणवत होता.

बबबॉस ... आम्ही त्याच्या गाडीला त्याला मारण्याच्या उद्देशाने धडक दिली नव्हती कमांड कसाबसा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागला.

चूप. मूर्ख.... तुम्हाला माहित आहे ... स्वतरूचा शहाणपणा करणार्‌यांसाठी या संघटनेत काही स्थान नाही तिकडून बॉसचा रागीट स्वर ऐकायला आला.

स सॉरी बॉस... चुकलो.... पुन्हा नाही होणार अशी चूक कमांड पुन्हा क्षमायाचना करू लागला.

तुम्हाला माहित आहे?... ती घडी सुदैवाने तुमच्यासाठी चांगली होती म्हणून तुम्ही वाचलात... तुम्ही 45 मिनिट अलिकडे किंवा पलिकडे असतात तर त्यावेळी तुम्हाला कोणीही वाचवू शकले नसते बॉसचा करडा स्वर कमांड च्या कानात घुमत होता.

एव्हाना कमांड 2 कमाड 1 च्या जवळ येऊन फोनच्या स्पीकरजवळ आपलं डोकं घुसवून बॉस काय बोलतो आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करीत होता.

आय ॲम रिअली सॉरी बॉस कमांड पुन्हा गयावया करू लागला.

ही तुमची पहिली चूक आहे... आणि ही चूक तुमची शेवटची राहिली पाहिजे.... समजलं? तिकडून बॉसने इशारा दिला.

हो सरय यस....

कमांड ने आपले बोलणे पूर्ण करण्याच्या आतच तिकडून खाडकन फोन आपटण्याचा आवाज आला.

कमांड ने आपल्या चेहर्‌यावरचा घाम पुसत फोन क्रेडलवर ठेवून दिला. तो आपल्या चेहर्‌यावरचे भीतीचे भाव व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू लागला.

बॉसला आवडलेलं दिसत नाही कमांड 2 म्हणाला.

आपण आपल्या मनाचा कारभार करायला नको होता कमांड म्हणाला.

जे झालं ते झालं. पुन्हा आपण काळजी घेवू कमांड 2 त्याला दिलासा देत म्हणाला.

हा पहिल्यांदा बॉसने फोन केला.... त्याचा फोन आला तेव्हाच मला वाटलं काहीतरी सिरीयस झालं आहे म्हणून. कमांड ने त्याचा व्हिस्कीचा ग्लास भरीत म्हटले.

कमांड 2नेसुध्दा आपला बाजूला ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास उचलला आणि तो कमांड च्या समोर बसला. कमांड गटागट व्हिस्कीच्या ग्लाससोबत आपला अपमान गिळण्याचा प्रयत्न करीत होता.

कमांड 2चा डाव ...

कमांड 2ने ओळखले की हीच योग्य वेळ आहे.....

...की कमांड ला बोलतं करून त्याच्याकडून बर्‌याच गोटी काढता येतील...

तो एकेका घोटाने त्याला साथ देत त्याला चांगली नशा चढण्याची वाट बघायला लागला. थोड्या वेळाने कमांड ला बर्‌यापैकी नशा चढली आणि ही संधी साधून कमांड 2ने आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

कमांड , मला एक सांग ...

कमांड 2 ने विचारण्याच्या आधी मुद्दाम थांबून कमांड ला चढलेल्या नशेचा अंदाज घेतला.

कमांड 2ला थांबलेलं पाहून कमांड बरळल्यासारखा म्हणाला, बोल काय सांगायचं तुला ... एक का? दोन विचार... तीन विचार ... तुला पाहिजे तेवढं विचार

त्याचे ते हाल बघून कमांड 2 त्याला न दिसण्याची खबरदारी घेत कुत्सीतपणे हसला.

नाही म्हणजे......ती घडी सुदैवाने तुमच्यासाठी चांगली होती आणि 45 मिनिटं अलिकडे किंवा पलिकडे असतात तर तुम्हाला कोणीही वाचवू शकले नसते असं बॉस का म्हणाला? मला तर काहीच कळत नाही आहे कमांड 2ने कमांड ला विचारलं.

कमांड ला आता चांगलीच चढली होती.

ते तुला नाही कळणार. ती एक लंबी स्टोरी आहे कमांड म्हणाला.

कमांड 2 विचार करू लागला

आता याला बोलतं कसं करावं...

त्याने काम्प्यूटरवर बसून बॉसने मागे एकदा दिलेला मेसेज उघडला.

आणि हे बघं मागे बॉसने पाठविलेल्या संदेशातसुध्दा 11 तारखेचा रात्री 3 ते 4 चा काळ तुमच्यासाठी योग्य आहे आणि 4 ते 7 चा काळ अतिशय धोकादायक आहे असं बॉसने लिहिलं होतं. त्याचा भवियावर जरा जास्तच विश्वास दिसतो. कमांड 2 कमांड ला अजून खुलविण्याचा प्रयत्न करू लागला.

भवियावर विश्वास नाही. पक्की खात्री असते त्याची. आत्तापयर्ंत त्याने सांगितलेल्या वेळेत कधीच दगा फटका झालेला नाही कमांड म्हणाला.

तो एक केवळ योगायोग असू शकतो कमांड 2 अजून त्याला डीवचण्याच्या उद्देशाने म्हणाला.

योगायोग नाही. बॉसजवळ अशी एक गोट आहे की जिच्यामुळे कोणती गोट कोणत्या वेळी लाभदायक होईल हे तो आधीच वर्तवू शकतो

कमांड च्या तोंडून आता बर्‌याच त्याच्या पोटातल्या गोटी बाहेर येऊ पाहत होत्या.

मला नाही खरं वाटत कमांड 2 ने असहमती दर्शवित आपले शेवटचे हत्यार वापरले.

तुलाच काय कुणालाही खरं वाटणार नाही

या एकाच गोटीवरून तू निर्का काढतो आहेस की अजूनही काही पुरावे आहेत? कमांड 2ने मधेच विचारले.

ही एकच गोट नाही ... अजूनही बर्‌याच गोटी आहेत...बॉसजवळचा पैसा बघ ... बॉसजवळ एवढा पैसा कुठून आला? ही पूर्ण संघटना चालविणं काही सोपं नाही आणि तो त्याच्या एकट्याच्या पैश्यावर ही पूर्ण संघटना चालवितो कमांड 2 म्हणाला.

कशी काय?

त्याच्याजवळ असलेल्या विद्येच्या सहाय्याने. कोणत्या वेळी कोणता शेअर लाभदायी ठरू शकतो हे त्याला आधीच कळतं आणि असं म्हणतात की आत्तापयर्ंत त्यात तो कधीच तोट्यात राहिला नाही कमांड आता चांगलाच मोकळा बोलू लागला होता.

विद्या? अशी कोणती विद्या आहे त्याच्याजवळ? कमांड 2ने उत्सुकतेने विचारले.

सांगतो कमांड आपला व्हिस्कीचा ग्लास पुन्हा भरीत म्हणाला.

अन बॉसनं ही विद्या मिळविली तरी कुठून ? कमांड 2 आतुरतेने प्रश्नावर प्रश्न विचारायला लागला.

कमांड 2 कान टवकारून कमांड काय सांगतो ते ऐकण्यासाठी उतावीळ झाला होता.

सांगतो बाबा, सगळं सांगतो म्हणत कमांड उभा राहिला.

आपल्या उजव्या हाताची करंगळी दाखवत कमांड म्हणाला,

एक मिनिट थांब मी जरा इकडून येतो

कमांड झोकांड्या देत बेडरूमकडे जायला लागला.

डाव फसला? ...

कमांड 2 कमांड काय सांगतो ते ऐकण्यासाठी अगदी उतावीळ होऊन गेला होता. तो त्याची वाट पाहत कॉम्प्यूटरपाशी येरझारा घालायला लागला.

किती वेळ झाला कमांड बेडरूमकडे गेला पण अजून बाहेर आला नाही. इतका वेळ?..

तिकडून परस्पर तो बाहेर तर नाही निघून गेला?...

कमांड 2ला आता काळजी वाटायला लागली होती. कमांड 2 त्याला बघण्यासाठी उठला आणि तो जिकडे गेला होता तिकडे जायला लागला. बेडरूमच्या समोर येऊन त्याने बघितले तर बेडरूमचे दार आतून ओढून घेतलेले होते. त्याने हळूच दार ढकलून आत डोकावून बघितले तर समोर कमांड बेडवर ढाराढूर अवस्थेत झोपला होता. कमांड 2ला तोंडापयर्ंत आलेला घास गेल्यासारखे वाटले. कसातरी तो सगळं सांगायला तयार झाला होता. शुध्दीवर आल्यावर तो त्याला काहीएक सांगणार नाही याची त्याला खात्री होती. तो त्याच्याजवळ गेला आणि त्याला हलवून उठविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने त्याला जोरजोराने हलवून बघितले पण तो झोपेतच नाही तर नशेत चूर झालेला होता. कमांड 2ने थोडा वेळ प्रयत्न करून मग त्याला उठविण्याचा विचार सोडून दिला. त्याने विचार केला की

हा जरी झोपला तरी आपण दुसरं काही करू शकतो का? ..

कमांड ने तो जी माहिती सांगणार होता ती नक्कीच कुठेतरी दडवून ठेवली असणार...

ती जर आपण धुंडाळायचा प्रयत्न केला तर?...

आतापयर्ंत या घरात नेहमी त्याच्यासोबत कमांड असायचा. आत्ता त्याला संपूर्णपणे एकांत लाभला होता.

त्या एकांताचा जर आपण फायदा करून घेतला तर?...

त्याने ठरविले की आत्ता हे घर पूर्णपणे धुंडाळायला पाहिजे.

नक्कीच काहीतरी आपल्याला सापडेल...

त्याने बेडरूमपासूनच सुरूवात केली. तो आवाज न करता बेडरूममध्ये इकडे तिकडे धुंडाळू लागला. बेडरूममध्ये विशेा असे काहीच सापडले नाही. मग तो घराचा इतर भाग शोधायला लागला. दुसरीकडेही त्याला उपयोगी असे काहीच सापडले नाही.

त्याच्या अचानक लक्षात आले की, अरे कमांड ने तर कॉम्प्यूटर सुरूच ठेवले होते.

तो घाईघाईने काम्प्यूटर पाशी गेला. बघितले तर काम्प्यूटर सुरूच नाही तर कमांड चा मेलबॉक्ससुध्दा उघडा होता. कमांड 2च्या चेहर्‌यावर एक विजयी हास्य तरळले. तो काम्प्यूटरसमोरच्या खुर्चीवर पटकन जावून बसला. आणि थोडीही उसंत न घेता कमांड च्या मेल्स चेक करू लागला. भरपूर मेल्स होत्या. तो एक एक उघडून त्यावरून भराभर आपली नजर फिरवीत होता. विशेा असं काही सापडत नव्हतं. अचानक एक मेल उघडल्यावर त्याच्या चेहर्‌यावर पुन्हा हास्य पसरलं. त्या मेलमध्ये अशी काही माहिती होती की जी कमांड कदाचित आज त्याला सांगणार होता. त्याने एकदा वरवर ती मेल आपल्या नजरेखालून घातली. मग आपल्या खिशातला युएसबी ड्राईव्ह काढून कॉम्प्यूटरला लावला आणि ती मेल अटॅचमेंटसहित पूर्ण त्याच्या युएसबी ड्राईव्हमध्ये कॉपी केली. कॉपी झाल्यावर त्याने युएसबी ड्राईव्ह काढून आपल्या खिशात ठेवला. जिकडे कमांड झोपला होता त्या बेडरूमकडे एकदा बघितले आणि मग निवांत ती मेल तो वाचायला लागला. कधी त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते तर कधी मध्ये मध्ये त्याच्या चेहर्‌यावर हास्य तरळत होतं.

बॉसचा मेसेज ...

ती मेल आणि तिचे अटॅचमेंट्‌स पूर्णपणे वाचल्यावर कमांड 2 कॉम्प्यूटरवरून उठला. त्याच्या चेहर्‌यावर एक समाधान दिसत होते. ती पूर्ण माहिती त्याने त्याच्या डोक्यात, हृदयात आणि मनातच नाही तर त्याच्या जवळ असलेल्या थंब ड्राईव्हमध्येसुध्दा साठवून ठेवली होती. तो तिथून जाण्यासाठी वळणार एवढ्यात काम्प्यूटरचा बझर वाजला. त्याने बघितले की कमांड ला मेल आली होती. त्याने कमांड च्या उघड्या मेलबॉक्समध्ये जाऊन बघितले तर मेल बॉसची होती. तो पुन्हा कॉम्प्यूटरसमोर बसला. त्याने मेल उघडली. मेलमध्ये एक अटॅचमेंट होती. त्याने अटॅचमेंट उघडली. ते एक मॅडोनाचे सुंदर सेक्सी चित्र होते. बॉस मॅडोनाचा भलताच फॅन दिसतो...

त्याने विचार केला. एव्हाना कमांड 2 कमांड चं पाहून पाहून चित्रातला मेसेज कसा उघडायचा हे शिकला होता. त्याने चित्रातला मेसेज उघडला. त्यात पुढच्या कारवाईवद्दल माहिती होती. पुढचा खून कधी, कुणाचा करायचा ते सविस्तर लिहिलं होतं. आज 15 तारीख होती आणि पुढच्या खुनासाठी 17 तारीख नेमलेली होती. त्या मेलमध्ये 17 तारखेच्या रात्री 1 ते 3 च्या दरम्यानचा काळ अगदी योग्य आहे असे लिहिलेले होते. आणि 16 तारखेचा संपूर्ण दिवस आणि रात्र हा अतिधोकादायक काळ आहे असे नमूद केले होते. कमांड 2 ने तो संपूर्ण मेसेज एका जागी कॉपी करून घेतला कारण तो मेसेज एकदा उघडल्यानंतर नट होत असे. त्याला बॉसने तशा प्रकारे प्रोग्रॅमच केले होते. कमांड 2ने ती मेल बंद केली. मेसेज आता नट झाला होता. अचानक कमांड 2 आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि काहीतरी तुफान त्याच्या डोक्यात उठल्यासारखा तो त्या खोलीत कॉम्प्यूटरभोवती चकरा मारायला लागला. त्याच्या डोक्यात काहीतरी द्वंद्व चाललेलं स्पट जाणवत होतं. शेवटी तो आपल्या येरझारा थांबवून कॉम्प्यूटरच्या समोर खुर्चीवर बसला. तो काहीतरी निर्णयाप्रत येऊन पोहोचला होता.

त्याने बॉसचा आलेला मेसेज बदलविण्याचे ठरविले होते...

त्याने तो मेसेच श्इडीटश् करण्यासाठी ओपन केला. पुन्हा इकडे तिकडे पाहत त्याने आपला निर्णय पक्का केला आणि मग तो तो मेसेज श्इडीटश् करायला लागला. खुनासाठी जी योग्य वेळ दिली होती ती 17 तारीख रात्री 1 ते 3 अशी दिलेली होती ती त्याने बदलून 16 तारीख रात्री 1 ते 3 अशी केली. त्या मेसेजमध्ये 16 तारखेची संपूर्ण रात्र आणि दिवस अतिधोकादायक आहे असे नमूद केले होते. तो त्याने बदलून 17 तारीख असा केला. म्हणजे जो खूनासाठी योग्य काळ होता तो धोकादायक आहे असा आणि जो धोकादायक आहे तो योग्य आहे असा बदल त्याने मेसेजमध्ये केला होता.

असे त्याने का केले होते?

त्याच्या डोक्यात काय शिजत होते हे सांगणं फार कठीण होतं.

कदाचित त्याचा त्याच्या बॉसच्या भवियकथनावर विश्वास नसावा. कदाचित त्याला त्याच्या बॉसने जे भविय वर्तविले होते ते बरोबर आहे का हे आजमायचे असावे.

पण जर त्याच्या बॉसने वर्तविलेले भविय खरे झाले तर?..

अशा परिस्थितीत कमांड च्या आणि स्वतरू त्याच्या जीवाला धोका होता. मग यातून काहीतरी मार्ग काढायला हवा...

तो विचार करू लागला.

शेवटी त्याने ठरविले की यावेळेस तो कमांड च्या सोबत जाणार नाही. काहीतरी बहाणा करून तो कमांड ला एकटेच जाण्यास भाग पाडणार होता.

जॉनच्या बॉसची व्हीजीट ...

अॉफिसमध्ये अजून कुणीच आलं नव्हतं. जॉन सकाळी सकाळी एकटाच येऊन टेबलसमोर आपल्या खुर्चीवर बसला. तो थकल्यासारखा वाटत होता. त्याने मग एक फाईल काढून तो ती चाळायला लागला. त्याचं त्या फाईलमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. तरी तो एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत ती फाईल चाळत होता. थोड्या वेळाने एक एक करीत अॉफिसचा दुसरा स्टाफ यायला लागला.

आता अॉफीसमध्ये चहलपहल आणि कुजबूज त्याला ऐकायला येत होती. तेवढ्यात जॉनजवळ एक मेसेंजर आला.

सर, बॉस आले आहेत... मेसेंजरने जॉनला निरोप दिला.

बॉस ?...

सर ... शहर पोलीस शाखाप्रमुख

काय? इतक्या सकाळी सकाळी? जॉन आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाला.

शहर पोलीस शाखाप्रमुख आला म्हणजे काहीतरी नक्कीच गंभीर असणार...

विचार करीतच जॉन त्यांना रिसीव्ह करण्यासाठी बाहेर गेला. शहर पोलीस शाखाप्रमुख जॉनला रस्त्यातच भेटले.

गुड मॉनिर्ंग सर जॉनने अभिवादन केले.

जॉन आय निड टू टॉक टू यू. इट्‌स व्हेरी इम्पॉटर्ंट शहर पोलीस शाखाप्रमुख न थांबता सिरीयस मूडमध्ये म्हणाले.

जॉन तसाच वळून त्यांच्या मागे यायला लागला. दोघेजण येऊन जॉनच्या कॅबिनमध्ये बसले.

काय ? खुनाचा काही थांगपत्ता लागला का?

बसल्या बसल्या शहर पोलीस शाखाप्रमुखांनी जॉनला प्रश्न केला.

नाही सर, अजून काहीच माहिती हाती लागत नाही. अन त्यातच भर म्हणजे ...तुम्हाला माहित आहेच. आपलाच कुणीतरी माणूस त्या खुन्याला फितूर झाला आहे जॉन म्हणाला.

अजून किती खून व्हायची वाट पाहवी लागणार आहे आपल्याला?

शहर पोलीस शाखाप्रमुखांनी तिरसट प्रश्न विचारला.

सर, मला वाटते तुम्हाला आत्तापयंर्ंत केलेल्या तपासाबद्दल थोडक्यात माहिती देतो...म्हणजे तुम्हाला आम्ही करीत असलेल्या तपासाबद्दल कल्पना येईल...

जॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या बॉसला त्यांनी या केसवर आत्तापयंर्ंतच्या केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती देवू लागला

जसे मी तुम्हाला आधी सांगितले होते...पहिल्या खुनाच्या वेळी आम्हाला एक श्झीरोश् असं लिहिलेला टी शर्ट घातलेला माणूस लिफ्टमध्ये चढतांना दिसला होता... तसाच टी शर्ट घातलेला एक माणूस मला जिथे अँजेनीला ॲडमीट केले होते त्या हॉस्पिटलमध्येसुध्दा आढळला होता...दोघंही आमच्या तावडीतून थोडक्यात सुटले होते... म्हणून मग आम्ही दोघांचीही स्केचेस काढून सर्व मिडीयाद्वारे लोकांत जारी केली... त्या दोघांनाही आम्ही पकडलं सुध्दा पण शेवटी असं कळलं की त्या दोघांचाही या खुनांशी कसलाही संबंध नाही.... इन फॅक्ट तसे श्झीरोश् लिहिलेले टी शर्ट घालण्याची हल्ली फॅशन आहे... पण हा खुनीही भिंतीवर रक्ताने झीरो काढतो त्यामुळे आम्ही हे खून आणि ते दोन टीशर्टवाले या घटना एकमेकांना जोडल्या होत्या... त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच आम्ही खुनी पकडण्याच्या दृटीने निश्चित केलेली दिशा पूर्णपणे चुकली.... त्यात वेळ वाया गेला तो गेलाच, आमची मेहनतही वाया गेली... आणि शेवटी निराशाच पदरी पडली.... आता पुन्हा आम्ही नव्या जोमाने कंबर कसून तयार झालो आहोत... आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत अगदी जिवाचीसुध्दा पर्वा न करता... जॉन म्हणाला.

त्याचा इशारा एवढ्यातच त्याच्यावर झालेल्या हल्याकडे होता.

पूर्ण प्रयत्न करीत आहा. तर मग खुनी का सापडत नाही? तुम्हाला वाटत असेल एवढ्या सकाळी येऊन तुम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी मी माझ्या अॉफिसमध्ये जाऊन शांत खुर्चीवर बसून आराम का करत नाही? माझ्या खुर्चीला किती काटे आहेत काही कल्पना आहे तुम्हाला? सारखं वरून दडपण असतं. सगळ्‌या शहरात दहशत पसरली आहे. रात्री आठ वाजायच्या आत सगळे रस्ते सुनसान होतात. प्रत्येक माणसाला वाटते की पुढचा नंबर त्याचाच आहे. इतके दिवस लोक चूप होते. आता ते त्या मेयरला जाऊन जाब विचारीत आहेत आणि तो मेयर माझ्या बोकांडीवर बसला आहे अन त्यात भर म्हणजे हे प्रेसवाले पोलिसांच्या बाबतीत उलटं सुलटं छापून आपली बदनामी करीत आहेत. अक्षरशरू लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडण्याची वेळ आली आहे. आता खूप झालं आहे. डोक्यावरून पाणी जात आहे. प्रकरण अगदी मिनीस्ट्री पयर्ंत गेलं आहे. अशा परिस्थितीत मी शांत राहू शकत नाही. तुम्हाला मी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो. तिकडे काहीही करा आणि चार दिवसात त्या खुन्याला माझ्यासमोर हजर करा लाईव्ह अॉर डेड

सर आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोच आहोत

मला मेहनत नाही, रिझल्ट पाहिजे शहर पोलीस शाखाप्रमुख खुर्चीवरून ताडकन उठत म्हणाले.

जॉनपण त्याच्या खुर्चीवरून उठला. शहर पोलीस शाखाप्रमुख आता जायला लागले. जाता जाता ते दारात थांबून वळले आणि म्हणाले,

...आणि तुमच्याच्याने जर केस सुटत नसेल तर राजीनामा द्या. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करीन

शहर पोलीस शाखाप्रमुख टकटक बुटांचा आवाज करीत निघून गेले. जॉन दरवाज्यापयर्ंत गेला आणि त्यांच्या पाठमोर्‌या आकृतीला जातांना बघत राहिला.

डिटेक्टीव्ह...

रात्रीच्या गर्द अंधारात वसाहतीपासून दूर एका निर्जन, निर्मनुय ठिकाणी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून ओवरकोट घातलेली एक आकृती बाहेर आली. आपल्या गाडीच्या शेजारी अंगाला झोंबणार्‌या थंडीत ती आकृती गाडीच्या बाजूला उभी राहिली. बेचौन होऊन ती इकडे तिकडे बघत येरझारा घालत होती. मधून मधून आपल्या घड्याळाकडेसुध्दा पाहत होती. स्पट होते की ती कुणाची तरी वाट पाहत होती. तेवढ्यात समोर अंधारात दोन दिवे तिला तिच्या दिशेने येतांना दिसले. तिचे येरझारा घालणे थांबले. एक गाडी जवळ आली. त्या गाडीच्या हेडलाईटस्चा प्रकाश त्या आकृतीच्या चेहर्‌यावर पडला. ती आकृती म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून जॉन होता. ती गाडी त्याच्या गाडीच्या शेजारी येऊन उभी राहिली. जॉन त्या गाडीजवळ गेला. त्या गाडीतून एक काळा कोट आणि काळी हॅट घातलेली एक उंचपुरी व्यक्ती उतरली.

उतरताच तिने जॉनशी हस्तांदोलन केले हाय जॉन

हाय अलेक्स जॉनने त्याचा हात आपल्या हातात घेत म्हटले.

बोल काय म्हणतोस? इतक्या निर्जन जागी, इतक्या रात्री तू मला कशाला बोलावलेस? अलेक्सने विचारले.

गोटच तशी आहे. तुला माहित असेलच की डिपार्टमेंटचाच एक आमचा साथीदार खुन्याला फितुर झाला आहे अशी आम्हाला शंका आहे. आता अशी परिस्थिती झाली आहे की मी कोणत्याही माझ्या सहकार्‌यावर जरासुध्दा विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे मी तुला इथे इतक्या रात्री बोलावले आहे जॉन म्हणाला.

अच्छा तर त्या कल्प्रीटला शोधायचे आहे अलेक्स म्हणाला.

मला माहित आहे की या कामासाठी तुझ्यापेक्षा दुसरा कोणी सक्षम डिटेक्टीव असूच शकत नाही जॉन त्याची स्तुती करीत म्हणाला.

एकदा का काम तू माझ्यावर सोपविलेस की ते माझे झाले. तू काही काळजी करू नकोस. लवकरात लवकर मी त्याचा शोध लावीन अलेक्स विश्वासाने म्हणाला.

या खुन्यापयर्ंत पोहोचायला आम्हाला दुसरा तरी काही मार्ग दिसत नाही. बघूया अशा तर्‌हेने काही फायदा होतो का ते जॉन म्हणाला.

म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचा म्हण ना! अलेक्स गमतीने म्हणाला.

स्वर्ग कसला... नर्क म्हण जॉन ने दुरूस्ती केली.

हो नर्कच म्हणावं लागेल अलेक्स म्हणाला.

हॅपी बर्थ डे ...

अँजेनी गाढ झोपेत होती. झोपेत तिचा निपाप सुंदर चेहरा अजूनच खुलून दिसत होता. झोपेतच तिने कूस बदलली. कूस बदलतांना झालेल्या तिच्या रेखीव शरीराच्या हालचाली टिपण्यासारख्या होत्या. तेवढ्यात तिच्या फ्लॅटच्या दाराची बेल वाजली. तिने पुन्हा कूस बदलली. पुन्हा दाराची बेल वाजली. आता तिला जाग आली होती. तिने डोळे चोळत खिडकीच्या बाहेर बघितले. काळा कुट्ट अंधार आणि शहरातील तार्‌यांप्रमाणे टिमटिमणारे लाइट्‌स दिसत होते. तिने आळस देत घड्याळाकडे बघितले. घड्याळात बारा वाजायला एकदोन मिनिटं कमी होती. पुन्हा दाराची बेल वाजली. रात्रीचे बारा वाजत आले होते. एवढ्या रात्री कोण आले असावे?..

ती आपले केस आवरीत बेडवरून खाली उतरली. आपले कपडे व्यवस्थित करीत आणि कोण आले असावे असा विचार करीत ती समोरच्या दाराकडे जाऊ लागली. तिने दाराच्या होलमधून बघितले. व्हरांड्यात अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. तिने दाराची चेन लावून कडी उघडली आणि दार तिरपे करून फटीतून बाहेर बघू लागली. बाहेर जॉन उभा होता.

एवढ्या रात्री कशासाठी आला असावा हा ?...

जॉन! एवढ्या रात्री? ती दार उघडत म्हणाली.

जॉन गालातल्या गालात हसतच आत आला. त्याचे दोन्ही हात मागे होते. कदाचित तो काहीतरी लपवित असावा. त्याने आत येताच फुलाचा एक मोठा गुच्छ त्याच्या पाठीमागून काढला आणि तिच्या समोर धरीत दुसर्‌या हाताने तिला उचलत म्हणाला,

हॅपी बर्थ डे टू यू...

हॅपी बर्थ डे टू यू अँजेनी...

हॅपी बर्थ डे टू यू

अँजेनीने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितले. बरोबर बारा वाजून एक मिनट झाले होते आणि घड्याळात तारीख होती 16 अॉगटय तिचा वाढदिवस ! अँजेनीच्या डोळ्‌यात अश्रू तरळले.

तुला कसे कळले? ती त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली.

मॅडम हे विसरू नका की आमच्याकडे तुमचे सगळे रेकॉर्डस्‌ आहेत. जॉन हसत म्हणाला.

ओ जॉन थँक यू ती जॉनच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली.

जॉनने तिला घट्ट मिठीत घेत खाली उतरविले. मग दोघांनी एकमेकांच्या ओठांचे एक आवेशयुक्त चुंबन घेतले.

झोपली होतीस? जॉनने तिला विचारले.

हो ती म्हणाली.

हे आपलं तुझं बरं. तिकडे आमची झोप उडविलीस आणि तू मात्र इकडे गाढ झोपा काढत जा जॉन गमतीने म्हणाला.

मी? ती हसत म्हणाली.

हो ना. अर्धी झोप तू उडविलीस आणि अर्धी झोप त्या खुन्याने जॉन म्हणाला.

जॉन खळखळून हसला आणि अँजेनी नुसती गालातल्या गालात हसली. प्रयत्नपुर्वक कदाचित खोटे खोटे. खुन्याचा उल्लेख जरी झाला तरी तिला सानीची आठवण यायची.

एव्हाना दोघं एकमेकांच्या कंबरेत हात घालून बेडरूममध्ये आले होते.

काय, काही घेतोस? चहा कॉफी? तिने विचारले.

हो घेईन की. पण चहा कॉफी नको.

मग ? तिने विचारले.

बेडवर बसत त्याने तिच्या ओठाचे एक करकचून चुंबन घेतले. मग दोघं एकमेकांना अलिंगनात घेऊन बेडवर लोळू लागले. अचानक अँजेनीला काय वाटले कुणास ठाऊक ती जॉनचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन न्याहाळू लागली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

काय झालं? जॉनने तिच्या पाठीवरून हात फिरवीत विचारले.

ती काहीच बोलली नाही.

सानीची आठवण येत आहे? जॉनने तिचे चेहर्‌यावर आलेले केस नीट करीत विचारले.

खरंच तू कोण , कुठला, कसा माझ्या आयुयात येतास आणि माझं उध्वस्त होणारं आयुय सांभाळून घेतोस. सगळं कसं विधीलिखित असल्यासारखं ती पाणावलेल्या डोळ्‌याने बोलत होती.

जॉनने आवेगाने तिला घट्ट मिठीत धरले.

तू काळजी करू नकोस. हळू हळू सगळं व्यवस्थित होईल तो तिच्या पाठीवर हात फिरवीत तिला धीर देत म्हणाला.

अँजेनी जॉनच्या छातीवर आपलं डोकं ठेवून त्याच्या छातीवरच्या केसांशी खेळत त्याच्याकडे एकटक पाहू लागली. जॉनसुध्दा तिच्याकडे एकटक बघायला लागला. त्यांच्या नजरा जणू एकमेकांत गुंतून खिळल्या होत्याय त्या हटायला तयार नव्हत्या. जॉनचा हात जो आत्तापयर्ंत तिच्या पाठीवरून फिरत होता आणि तिच्या केसांशी खेळत होता, हळू हळू तिच्या मुलायम अंगाशी खेळायला लागला. तिनेसुध्दा त्याच्यावर चुंबनाचा र्वााव सुरू केला. जॉनने तिला छातीवरून त्याच्या मजबूत हातांनी वर ओढून घेतले. ती त्याच्या शर्टची बटणं काढायला लागली. जॉनसुध्दा तिचे कपडे काढायला लागला. थोड्याच वेळात दोघंही एकमेकांसमोर निर्वस्त्र अवस्थेत होती. जॉन तिच्या नितळ कांतीकडे आणि तिच्या निर्वस्त्र शरीराकडे डोळे फाडून बघत होता. तो तिच्यात एकरूप होण्यास आतुर होऊन हळू हळू तिच्यावर झुकू लागला. तेवढ्यात बाजूला ठेवलेला जॉनच्या मोबाईलची बेल वाजली. दोघंही एकदम जसेच्या तसे एखाद्या पुतळ्‌यासारखे स्तब्ध झाले. जॉनने आपला हात लांबवून मोबाईल घेतला. मोबाईलच्या डिस्प्लेवर बघितले. फोन सॅमचा होता. त्याने फोनचे बटण दाबून तो फोन बंद केला आणि बाजूला ठेवला. पुन्हा दोघंही मूड बनविण्याचा प्रयत्न करू लागले. मोबाईल पुन्हा वाजयला लागला. चिडून त्याने बटन दाबून फोन कानाला लावला.

हं सॅम, काय काम काढलंस एवढ्या रात्री? जॉन जरा नाराजीनेच म्हणाला.

सर, तिसरा खून झालेला आहे तिकडून सॅमचा आवाज आला.

काय? जॉन एकदम ताडकन उठत म्हणाला.

जॉन आपले कपडे शोधू लागला.

आम्ही सध्या रस्त्यातच आहोत, कुणीतरी फोन करून पोलीस स्टेशनवर माहिती दिली आहे सॅमचा आवाज आला.

कुठला पत्ता सांगितला? जॉनने कपडे घालण्याचा प्रयत्न करीत विचारले.

एव्हाना अँजेनी उठून आपले कपडे घालायला लागली होती.

साऊथ एव्हेन्यू, प्रिन्स अपार्टमेंटस्‌ 1004 ... उटीना हॉपर तिकडून आवाज आला.

काय? यावेळेससुध्दा एक स्त्रीच! ठीक आहे यू प्रोसीड विथ द टीम. मी लवकरच तुम्हाला जॉईन होतो जॉनने आपले कपडे घालत फोन बंद केला.

मिस उटीन हॉपर ...

बेडरूम मध्ये मंद मंद उजेड होता. बेडवर कुणीतरी झोपलेले दिसत होते. एक काळी आकृती हळू हळू बेडरूममध्ये शिरली. प्रथम बेडरूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवीत ती आकृती दरवाजाच्या बाजूला भिंतीवर काहीतरी शोधायला लागली. कदाचित लाईटचे बटन शोधत असावी. भिंतीवर चाचपडल्यानंतर त्या आकृतीला एका जागी बरीचशी इलेक्ट्रीकची बटनं सापडली. ती आकृती एक एक बटन दाबून बघत होती. शेवटी एक बटन दाबल्यावर बेडरूममध्ये लख्ख प्रकाश झाला. आकृतीचे शरीरसुध्दा उजेडाने न्हावून निघाले. एक आनंदाची पुसटशी भावना त्या आकृतीच्या चेहर्‌यावर उमटली. लाईटचे बटन सापडल्याचा आनंद.

वास्तविक पाहता लाईटचे बटन सापडणे ही ती आकृती जे कार्य करण्यासाठी आली होती त्याच्या तुलनेत एक किरकोळ गोट...

पण माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो...

आनंद मानायाचा एकही प्रसंग तो सोडायला तयार नसतो...

हं, त्याच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्‌या असू शकतात...

चांगल्या कृत्यातच त्याला आनंद मिळतो...

पण पुन्हा त्याची चांगल्याची परिभााा आपाआपली...

त्याचं चांगलं काम हे दुसर्‌यांच्या दृटीने वाईटही असू शकतं..

ती बेडरूममधली आकृती म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून कमांड होता. बेडरूममध्ये उजेड होताच बेडवर झोपलेली स्त्री दचकून खडबडून जागी झाली. कदाचित ती गाढ झोपेत नसावीच मुळी. समोर हातात पिस्तूल घेतलेल्या कमांड ला पाहून ती घाबरून गेली. ती भीतीने थरथर कापायला लागली. ती आता एक मोठी किंकाळी फोडणार एवढ्यात कमांड ने त्याच्या हातातील पिस्तूलाचा ट्रीगर दाबला. पिस्तूलाला सायलेंसर लावलेले असणार कारण धप्प असा आवाज झाला आणि समोरची स्त्री बेडवर अचेतन होऊन पडली. तिचे किंकाळण्यासाठीचे तोंड उघडे ते उघडेच राहिले.

आता मात्र त्याचा चेहरा आनंदाने अगदी उजळून निघाला.

मिस उटीन हॉपर ... आय ॲम सॉरी. मरणे हे तुझ्या नशीबात विधीनेच लिहिलेले होते... मी कोण?...मी फक्त विधीच्या हातातलं एक खेळणं. कमांड स्वतरूशीच बोलत होता.

चटि्‌दशी कमांड ने त्याच्या कोटाच्या उजव्या खिशातून एक धारदार चाकू काढला आणि खचाखच तिच्या निश्चल पडलेल्या शरीरावर चाकूचे वार केले. जेव्हा तो चाकू पूर्णपणे उटीनाच्या गरम ताज्या रक्ताने माखला तेव्हाच तो थांबला. मग तो पुढे जाऊन समोरच्या भिंतीवर त्या रक्ताने लिहायला लागला. भिंतीवर एक मोठे शून्य काढून तो पुढचे लिहिणार एवढ्यात दूर कुठेतरी पोलिसांच्या जीपचा सायरनचा आवाज त्याला यायला लागला. कमांड ने खिडकीतून बाहेर पाहिले. आवाज अजूनही दूरवर होता. त्याने घाईघाईने पुन्हा चाकू उटीनाच्या रक्ताने माखला आणि भिंतीवर पुढचे लिहायला लागला.

वेळेचा घात? ...

घाईघाईने सर्व सोपस्कार आटोपून धावतच कमांड फ्लॅटच्या दरवाज्यातून लिफ्टजवळ आला. थोड्या वेळापूर्वीच त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज बिल्डींगच्या खाली येऊन मग बंद झाल्यासारखा वाटला होता. त्याने लिफ्टच्या डिस्प्लेवर पाहिले. लिफ्ट वर येत होती. तो घाबरून गेला.

म्हणजे पोलीस बिल्डींगमध्ये तर नव्हते आले?..

आणि कदाचित पोलीसच वर येत असावेत ...

त्याच्या पोटात एकदम भीतीचा गोळा उठला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याने अशा घाबरलेल्या अवस्थेतही पटकन निर्णय घेतला आणि तो पायर्‌यांनी वर धावायला लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की पायर्‌यांवर धावतांना त्याच्या बुटांचा आवाज होतोय. त्याने पायातले बूट काढून तिथेच टाकून दिले आणि मग तो अनवाणी पायानेच वर जोरात धावायला लागला. धावता धावता तो खाली काय होत असेल याचा कानोसाही घेत होता. शेवटी तो बिल्डींगच्या टेरेसवर येऊन पोहोचला. टेरेसवर त्याने इकडे तिकडे बघितले. वरती टिमटिमत्या चांदण्यांनी भरलेले आकाश आणि आजूबाजूला टिमटिमत्या लाइटस्ने भरलेले शहर. धावत आल्यामुळे त्याला दम लागला होता आणि घाम आला होता. वर थंड हवा वाहत होती. घामेजल्या अंगाला ती अजूनच थंड वाटत होती. त्याला हायसं वाटलं. पण त्याला थांबायला वेळ नव्हता. बिल्डींगच्या समोरच्या बाजूला येऊन त्याने खाली डोकावून बघितले. बिल्डींगच्या अगदी समोर पोलिसांची व्हॅन उभी होती. व्हॅनजवळ तीन सशस्त्र पोलीस उभे होते. त्याला एक कळत नव्हतं की—

खुनाची माहिती पोलिसांना कळली तरी कशी?...

असंही होवू शकतं की ते दुसर्‌याच एखाद्या अपराधाच्या संदर्भात इथे आले असावेत ...

दुसर्‌या अपराधासाठी जर ते इथे आले असतील आणि आपण जर पकडले गेलो तर तो एक भयंकर योगायोगच म्हणावा लागेल...

तशी त्याला खात्री होती की बॉसने दिलेल्या वेळात कधीही दगाफटका होणार नाही. आत्तापयंर्ंत तरी तसा त्याचा अनुभव होता.

आता इथून निसटायचे कसे?...

तो विचार करू लागला.

एक गोट मात्र पक्की होती की बिल्डींगच्या समोरच्या बाजूने निसटनं शक्य नव्हतं....

दुसरा काहीतरी पर्याय शोधण्यासाठी तो इकडे तिकडे बघायला लागला. बिल्डींगच्या दोन्हीही बाजूने निसटणं शक्य नव्हतं. एक तर उतरायला काही नव्हतं आणि कसंबसं उतरलं तरी त्या पोलिसांच्या समोरूनच जाणं हा एकमेव पर्याय होता. मग कमांड हळू हळू बिल्डींगच्या मागच्या बाजूने जाऊन तेथील पाहणी करू लागला. त्याने मागील बाजूस डोकावून खाली बघितले. मागच्या बाजूने उतरण्यासाठी पाईप होते. ते बघून त्याला थोडं हायसं वाटलं. पण मागच्या बाजूने दुसर्‌या एका बिल्डींगवर लावलेल्या सोडीयम लँपचा उजेड पडत होता. त्यामुळं उतरतांना कुणाच्या तरी नजरेत येणं शक्य होतं. तो अजून काही पर्याय शोधण्यासाठी विचार करू लागला. त्याच्याजवळ जास्त वेळ नव्हता.

जर चुकून पोलीस इथे टेरेसवर आले तर...

तर तो आयताच त्यांच्या हातात सापडणार होता....

त्याने बिल्डींगच्या मागच्या बाजूची एकदा व्यवस्थित पाहणी करण्याचे ठरविले. त्यासाठी तो मागच्या बाजूला असलेल्या कठड्यावर चढला. पाईप वरपासून जमिनीपयर्ंत गेले होते. कदाचित ड्रेनेज पाईप असले पाहिजेत. पाईपवर जागोजागी खिळे लावलेले असल्यामुळे उतरतांना पकडण्यासाठी सोईचे होते. अचानक त्याच्या लक्षात आले की त्याच्या मागे टेरेसवर काहीतरी हालचाल झाली आहे. तो वळून पाहीपयंर्ंत एक काळी आकृती त्याच्यावर झेपावली आणि तिने आपला पूर्ण जोर लावून कमांड ला टेरेसवरून खाली ढकलले. या अचानक झालेल्या हल्यामुळे कमांड गोंधळून गेला. त्याला सावरण्यासाठीसुध्दा वेळ मिळाला नाही. तो बिल्डींगवरून खाली कोसळू लागला. पडतांना त्याचा चेहरा वरती टेरेसकडेच होता. ती काळी आकृती टेरेसवरून वाकून त्याला खाली पडतांना पाहत होती. मागच्या बिल्डींगवरून येणार्‌या सोडीयम लाईटच्या प्रकाशात त्याला त्या काळ्‌या आकृतीचा चेहरा दिसला. तो त्या चेहर्‌याकडे डोळे फाडून पाहू लागला. इकडे खाली पडून मरणाची भीती आणि समोरचा चेहरा पाहून त्याच्या भीतीत आणि आश्चर्यात अजूनच भर पडली होती.

तो चेहरा कमांड 2चा होता...

त्याचा विश्वासच बसत नव्हता....

त्याने पुन्हा शाश्वती करून घेतली.

हो तो चेहरा, त्याचा मित्र ज्याच्यावर त्याने अतिशय विश्वास ठेवला होता त्या कमांड 2चाच होता...

पण त्याने असे का करावे?...

तो त्या प्रश्नावर विचार करून काही निर्काापयंर्ंत पोहोचण्याच्या आतच धाडकन खाली जमिनीवर लावलेल्या फरशीवर आदळला. जवळपास 15ध्16 मजले वरून पडून त्याच्या डोक्याची शकलं शकलं झाली होती आणि पडल्याबरोबर त्याचा जीव गेला होता. इकडे वर त्याला पडतांना पाहणार्‌या कमांड 2च्या चेहर्‌यावर एक छद्‌मी हास्य तरळले होते .

ऋषी ...

हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी वाहणार्‌या नदीच्या काठावर असलेल्या गुहेत अजूनही तो ऋषी ध्यानमग्न अवस्थेत होता. अचानक त्याने आपले डोळे उघडले. त्याचे डोळे एखाद्या ज्वालेप्रमाणे आग ओकीत होते. हळू हळू त्याच्या डोळ्‌यातली लाली नाहीशी होऊन आपसूकच ते पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या सर्व मर्यादा ओलांडून मुक्त विचरण करू लागल्या.

एका जंगलात एक पर्णकुटी होती. पर्णकुटीसमोर अंगणात तिघेजण बसलेले होते. ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांनी त्यांच्यासमोर छोट्या छोट्या काड्यांचे छोटे छोटे ढीग केले होते. एका ढिगातल्या काड्या काढून दुसर्‌या ढिगात टाकायच्या किंवा एका ढिगातल्या काड्या काढून त्याचा दुसरा एक छोटा ढीग बनवायचा. असे करीत असतांनाच ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेवरून तरी असे जाणवत होते की ते काहीतरी त्यांच्या अडचणीबाबत बोलत असावेत. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते तिघेही मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.

ऋषीने आपली नजर तिघांवरून फिरवीली.

मला माहित आहे तुम्ही कुठे अडला आहात ऋषी गूढपणे त्यांना म्हणाला.

तिघांच्याही चेहर्‌यावर आश्चर्याच्या छटा पसरल्या.

आपण कुठे अडलो आहोत हे या ऋषीला कसे कळले?...

ते काही बोलणार त्याच्या आधीच तो ऋषी पुन्हा मार्गक्रमण करीत त्यांच्या जवळून पुढे निघून गेला. ते त्या ऋषीच्या पाठमोर्‌या आकृतीकडे बघू लागले.

ऋषी एकदम थबकला आणि त्यांच्याकडे वळून म्हणाला, काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन

तो ऋषी पुन्हा वळून आपले मार्गक्रमण करू लागला. ते तिघेही आ वासून आश्चर्याने त्या ऋषीच्या पाठमोर्‌या आकृतीकडे ती नाहीशी होईपयंर्ंत पाहत राहिले ...

खुनाचा तपास...

घाईघाईने जॉन लिफ्टमधून बाहेर पडला. ऐनवेळी आलेल्या फोनने तो अजूनही वैतागलेला दिसत होता.

पण काय करणार ही ड्यूटीच अशी होती...

कोणत्या क्षणी कुठे जायला लागणार काही सांगता येत नव्हते...

बिचार्‌या अँजेनीला काय वाटले असेल?..

तो विचार करीतच तडक उटीन हॉपरच्या फ्लॅटमध्ये घुसला. तो यायच्या आधीच सॅम त्याच्या टीमला घेऊन तिथे हजर झाला होता. तो सरळ फ्लॅटच्या बेडरूममध्ये गेला. त्याच्या मागे मागे सॅमसुध्दा बेडरूममध्ये गेला. समोर बेडवर भीतीने तोंड उघडलेल्या आणि डोळे मोठे केलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्‌यात उटीनाचा मृत देह पडला होता. आणि समोर भिंतीवर उटीनाच्या रक्ताने खुन्याने एक मोठा शून्य काढला होता.

त्या शून्याच्या आत लिहिले होते जर शून्य नसता तर ?

जॉन तो संदेश पुन्हा पुन्हा वाचू लागला.

खुन्याला काय म्हणायचे होते?... खरंच काही मतितार्थ त्या संदेशात दडला होता का?...

तो विचार करू लागला.

खुनाची माहिती कुणी दिली? जॉनने सॅमला विचारले.

सर फोनवर कुणीतरी अज्ञात इसम होता. त्याने नाव नाही सांगितले. आम्ही कॉलसुध्दा ट्रेस करून बघितला तो याच एरियातल्या एका पब्लीक बूथचा होता सॅमने माहिती पुरविली.

सॅम आपल्या कामात नेहमीच प्रॉम्प्ट होता.

खून होऊन जास्त वेळ झालेला दिसत नाही जॉनने आपला अंदाज वर्तवला.

हो सर, आम्ही आलो तेव्हा रक्त वाहतच होतं म्हणून आम्ही जवळपास सगळीकडे शोध घेतला सॅम सांगत होता.

काही सापडले? जॉनने पुढे विचारले.

या दोघांना तर काही सापडले नाही सॅम खोलीतल्या दोघांकडे निर्देश करीत म्हणाला.

अजून तिघेजण बघायला गेले आहेत ते अजून परत आले नाहीत सॅमने पुढे सांगितले.

जॉनने तिथे उपस्थित सगळ्‌यांना बजावले,

हे बघा, हा ओळीने तिसरा खून. अजून आपल्या हाती काहीच लागत नाही आहे. जर असंच चालत राहिल तर कसं व्हायचं? काहीही करा या वेळी खुनी सापडलाच पाहिजे.

तेवढ्यात धावतच दम लागलेल्या स्थितीत त्यांचे दोन साथीदार फ्लॅटमध्ये दाखल झाले.

सगळे जण आशेने त्यांच्याकडे बघायला लागले.

सर, बिल्डींगच्या मागे खाली जमिनीवर एक डेड बॉडी पडलेली आहे एकाने मोठ मोठे श्वास घेत सांगितले.

सर, कुणीतरी वरून पडलेला दिसतो.... मला वाटते तोच खुनी असावा दुसरा म्हणाला.

सॅम, तू इथेच थांबून इन्व्हेस्टीगेशन कंटीन्यू कर... मी यांच्या सोबत खाली जाऊन येतो जॉन त्या दोघांसमवेत फ्लॅटच्या बाहेर निघत सॅमला म्हणाला.

धाड ...

पोलिसांची गाडी कमांड च्या घरासमोर येऊन थांबली. गाडी थांबताच गाडीतून पोलिसांची एक तुकडी उतरली. त्या तुकडीने धावतच कमांड च्या कंपाऊंडच्या आत जावून घराला गराडा घातला. जॉन आपल्या वॉकी टॉकीवरून सगळ्‌यांशी संपर्क साधून होता. मधेच तो त्यांना आदेश देत होता. सगळ्‌याजणांनी आपाआपली पोजीशन घेतलेली आहे याची खात्री होताच जॉन आणि सॅम हळू हळू कमांड च्या घराच्या मुख्य दरवाज्याकडे जायला लागले. दरवाजा उघडाच होता.

म्हणजे नक्की कुणीतरी आत असलं पाहिजे....

ते दोघेजण एकमेकांना गार्ड करीत घरात शिरले. त्यांची तल्लख नजर चहूवार फिरत होती. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. त्याने वॉकी टॉकीवरून आदेश देत अजून दोन जणांना घरात बोलाविले. दोन जण आत येताच चौघेहीजण घरात इकडे तिकडे विखरून सगळ्‌या खोल्या शोधू लागले. कुठेच कुणीही दिसत नव्हते. जॉन बेडरूमच्या बाजूला असलेल्या जिन्याजवळ गेला. जिन्याने वर जाण्याचा विचार करीत असतांनाच त्याचं लक्ष जिन्याच्या खाली गेलं. तिथे त्याला जिन्याखालून तळघरात जाणारा रस्ता दिसला.

सॅम, जरा इकडे ये. बघ इथे एक रस्ता आहे. जॉनने सॅमला बोलावले.

आणि तुम्ही घरातले हाताचे ठसे गोळा करा. याचा संबंध कुणा कुणाशी होता ते तरी आपल्याला कळेल जॉनने जिन्याने खाली जाता जाता फिंगरप्रिन्टस एक्सपर्टला आदेश दिला.

जॉनने जिन्याखालचा तळघराचा दरवाजा उघडून तिरपा करून आत डोकावून बघितले. आत गडद अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते.

जॉनने हळूच सॅमला श्टॉर्चश् आणण्यासाठी खुणावले.

सॅमने जिन्याखालून हळूच निघून मग धावत जाऊन टॉर्च आणला. टॉर्च सुरू करून त्याने जॉनच्या हातात दिला. जॉन एका हातात टॉर्च आणि दुसर्‌या हातात बंदूक घेऊन कानोसा घेत तळघरात जायला लागला. त्याच्या मागे मागे सॅम बंदूक घेऊन त्याला गार्ड करीत आत जाऊ लागला. जॉन टार्चचा झोत तळघरात इकडे तिकडे फिरवायला लागला. आत कुणीच नव्हते. तळघरात विशेा सामान नव्हते. लपण्यासाठीसुध्दा काही आडोसा दिसत नव्हता. शेवटी त्यांचे लक्ष तळघरात मध्यभागी ठेवलेल्या कॉम्प्यूटरवर गेले.

इतक्या अडचणीच्या जागी कॉम्प्यूटर? जॉन आश्चर्याने म्हणाला.

काहीतरी गोलमाल दिसतो सॅमने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोघंही कॉम्प्यूटर जवळ येऊन त्याला निरखून पाहू लागले.

जरा ते स्वीच अॉन कर बरं जॉनने सॅमला कॉम्प्यूटरचे पावर स्वीच अॉन करायला सांगितले.

सॅमने पावर स्वीच अॉन केले आणि जॉनने काम्प्यूटर अॉन केले. दोघेजण काम्प्यूटर सुरू होण्याची वाट पाहत मॉनिटरच्या स्क्रीनकडे बघायला लागले. आधी काळ्‌या मॉनिटरवर वर डाव्या कोपर्‌यात काही पांढरी अक्षरे आली. कॉम्पूटरच्या मेमरी टेस्टचा रिझल्ट मॉनिटरवर आला.

आणि अचानक कॉम्प्यूटरवर मेसेज आला—

नो बूट डिस्क फाऊंडश्

आता या काम्प्यूटरला काय झालं? सॅम म्हणाला.

तोपयर्ंत जॉनचे अजून दोन साथीदार तिथे आले.

काय झाल? हॅरीने विचारले.

हॅरी, बघ बरं हा काम्प्यूटर का सुरू होत नाही? जॉनने हॅरीला कॉम्प्यूटर तपासायला सांगितले.

हॅरी कॉम्प्यूटर टेक्नीशियन होता. त्याने पुन्हा कॉम्प्यूटरचे बटन बंद चालू करून बघितले. पुन्हा मॉनिटरच्या काळ्‌या स्क्रीनच्या डाव्या कोपर्‌यात पांढरी अक्षरं दिसू लागली. मग मेमरी टेस्ट झाली. आणि शेवटी तोच मेसेज—

नो बूट डिस्क फाऊंडश्

हॅरीने कॉम्प्यूटरचा स्वीच अॉफ केला आणि त्याच्या खिशातला स्क्रू ड्रायव्हर काढून तो सी.पी.यू. उघडू लागला.

काय झालं? सॅमने हॅरीला आतूरतेने विचारलं.

सर, कॉम्प्यूटर उघडल्याशिवाय काही कळणार नाही हॅरी म्हणाला.

हॅरीने जेव्हा सी.पी.यू.चे कॅबिनेट उघडून बघितले, तो आश्चर्याने आतल्या हार्डवेअरकडे बघायला लागला.

काय प्रॉब्लेम झाला ? जॉनने हॅरीला विचारलं.

सर यातली तर हार्डडिस्कच गायब झालेली दिसते हॅरी आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.

काय? हार्डडिस्क गायब झाली? जॉन आणि सॅमच्या तोंडून एकदम निघाले.

कुणी नेली असावी? सॅमने जसे स्वतरूलाच विचारले.

याचा अर्थ त्या हार्ड डिस्कमध्ये काहीतही महत्वाची माहिती स्टोअर केलेली असावी जॉनने डोळे बारीक करून सॅमला आपला तर्क सांगितला.

जॉनने एकदा पुन्हा तळघरात टॉर्चच्या प्रकाशात एक चक्कर मारून पाहणी केली.

बरं, त्या फिंगरप्रींट टेक्नीशीयनला इकडे बोलवा. कदाचित या कॉम्प्यूटरच्या आत ज्याने कुणी हार्डडिस्क काढली त्याच्या बोटांचे ठसे उमटले असतील जॉनने सॅमला निर्देश दिला.

बॉसचा पुन्हा फोन ...

कमांड 2 ने आपला तळ हलविला होता. तो आपल्या नव्या अड्‌ड्याच्या तळघरात कॉम्प्यूटरच्या समोर बसला होता. त्याचा चेहरा अजूनही प्रफुल्लित दिसत होता.

कमांड ला मारल्यानंतरचा आपला पुढचा मार्ग मोकळा झाला...

तो विचार करीत होता. तो कॉम्प्यूटरवर मेल चेक करीत होता खरा पण त्याच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र सुरू होतं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईलवर नंबर बघितला. पण मोबाईलच्या डिस्प्लेवर काहीच नंबर आला नव्हता.

कुणाचा फोन असावा?...

पोलीस तर नसावेत?...

त्याने मोबाईलचे एक बटन दाबून मोबाईल कानाला लावला,

हॅलो उध्दटपणे तो म्हणाला.

तिकडून काहीच आवाज येत नव्हता. फक्त कशाची तरी घरघर ऐकु येत होती.

हॅलो... कोण बोलतय? त्याचा आवाज आता नरमला होता.

बॉस, मी बॉस बोलतोय तिकडून आवाज आला.

बॉस? यस बॉस कमांड 2 स्वतरूला नार्मल ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

कमांड चं कळलं मला बॉस म्हणाला.

हो सर, फार वाईट झालं कमांड 2 अंदाज घेत म्हणाला.

कोणी मारलं त्याला? बॉसने विचारले.

मारलं ? मला तर वाटलं की तो वरून खाली पडला असावा कमांड 2 निरागसपणे म्हणाला.

वाटलं ? म्हणजे ? तू नव्हतास का त्याच्यासोबत ? बॉसने आश्चर्याने विचारले.

नाही सर, मी नव्हतो. तुम्ही दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधी आणि ते सुध्दा धोकादायक वेळेत तो जात होता म्हणून मी गेलो नाही त्याच्यासोबत. तो म्हणत होता एकदा मला आजमावून बघायचं आहे की बॉसचं भविय कितपत बरोबर येतं ते कमांड 2 सांगत होता.

मग बघितलं? बघायला जिवंत असावं लागतं. मूर्ख! फुकट आपला जीव गमावून बसला. विााची परीक्षा घ्यायला गेला होता मूर्ख बॉस रागाने बोलत होता.

मग पोलिसांना कोणी सांगितलं? अन इतक्या लवकर कसे काय पोलीस तिथे हजर झाले? बॉसने पुढे विचारले.

बॉस त्यानंच सांगितलं असावं त्याने मागच्या वेळेससुध्दा पोलिसांना सांगायची फार घाई केली होती कमांड 2 म्हणाला.

थोडा वेळ तिकडून काहीच आवाज आला नाही. फक्त घरघर कशाची तरी घरघर.

तू आपला तळ हलविलास ते बरं केलंस बॉस म्हणाला.

हो सर, मला कल्पना होती की कमांड ची ओळख पटल्यावर पोलीस त्याच्या घरी धाड घालतील म्हणून

आता तरी याच्यावरून धडा घे आणि पुढे असा मूर्खपणा करू नकोस. अजून आपलं बरंच काम बाकी आहे बॉस समज देत म्हणाला.

हो सर कमांड 2 अदबीने म्हणाला

तिकडून फोन कट झाला.

प्रेस कॉन्फरन्स

मोकळ्‌या मैदानात एका उंच जागी एक टेबल ठेवलेले होते. टेबलवर वेगवेगळ्‌या टि व्ही चॅनल्सची नावं असलेले मायक्रोफोन ठेवलेले होते. टेबलच्या समोर मोकळ्‌या जागेत काही खुर्च्‌या ठेवलेल्या होत्या. तिथे प्रेसवाल्यांनी गर्दी केलेली होती. काही प्रेसवाले खुर्चीवर बसून प्रेसकॉन्फरन्समध्ये शहराचे पोलीस शाखाप्रमुख येण्याची वाट पाहत होते. काही वार्ताहर छोटे छोटे समूह करून काहीतरी चर्चा करीत होते. चर्चा तीच. सध्या शहरात सुरू असलेल्या खुनांची.

पुकळ दिवसांपासून त्याच त्याच बातम्या. एक मरगळ आली होती. ह्या खुनांमुळे ती मरगळ दूर झाल्यासारखी वाटते. एकजण म्हणाला.

म्हणजे तुला असं तर नाही ना म्हणायचं की हे खून होत आहेत ते चांगलंच होत आहे दुसरा खोचकपणे म्हणाला.

अरे तसं नाही पहिला गोंधळून म्हणाला.

अरे म्हणजे तसंच आहे. पण उघड उघड कबुलही करू शकत नाही दुसरा हसून म्हणाला.

मग दोघेही हसायला लागले.

साला, काय करणार आपलं कामच तसं आहे. दुसर्‌यांच्या जिवावर आपल्याला बातम्या बनवाव्या लागतात तिसरा एकजण म्हणाला.

हो ना. आणि बातम्या नसतील तर आपलं पोट कसं भरणार?

अरे जेव्हा मी नवीन नवीन या क्षेत्रात आलो तेव्हा रोज सकाळी देवाला प्रार्थना करायचो ... की देवा, आज तरी एखादी बातमी मिळू दे

म्हणजे थोडक्यात देवा आज तरी एखादा ॲक्सीडेंट, खून किंवा काहीतरी खरमरीत घडू दे

पहिल्याने तिसर्‌याची टाळी घेत त्याचं वाक्य पूर्ण केलं.

दुसरीकडे टी व्ही चॅनल्सवाले आपाआपले कॅमेरे घेऊन तयार होते. त्यांच्यातही चर्चा सुरू होती.

अरे रोज किती वाईट वाइट घडतं या जगात एकजण म्हणाला.

ते तरी बरं... आपल्याला हे सगळ उघड्या डोळ्‌यांनी बघावं लागत नाही दुसरा म्हणाला.

उघड्या डोळ्‌यांनी नाही तर कसे बघतो आपण ? दुसर्‌याने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले.

अरे म्हणजे या कॅमेराची झापड असते की आपल्या डोळ्‌यांवर

दोघे जण खळखळून हसू लागले.

आता प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त शहर पोलीस शाखाप्रमुखांच्या येण्याची वाट होती. तेवढ्यात टेबलच्या पलिकडच्या बाजूला थोडी हालचाल झाली. इकडे टेबलच्या अलिकडे बसलेल्या प्रेसच्या लोकांमध्ये कुजबूज आणि चहलपहल सुरू झाली. प्रेसच्या लोकांना शहर पोलीस शाखाप्रमुख येतांना दिसले होते. आपल्या बॉसच्या मागे जॉन आपल्या जड पावलांनी चालत होता. शेवटी टेबलच्या त्या बाजूला शहर पोलीस शाखाप्रमुख आणि जॉन असे दोघेजण उभे राहिले . टेबलाच्या या बाजूला प्रेसवाल्यांची झुंबड उडाली होती. कितीतरी दिवसांपासून चिघळत असलेल्या सिरियल किलरच्या केसबद्दल प्रश्न विचारण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती.

प्रेसवाल्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

खुनी कोण आहे?

त्याला जिवंत का पकडू शकले नाही?

खुनी शोधण्यासाठी इतका वेळ का लागला ?

शहर पोलीस प्रमुखाने एक नजर पूर्ण प्रेसवाल्यांवर फिरविली.

वन बाय वन शहर पोलीस प्रमुख आपल्या करड्या स्वरात म्हणाला.

यस यू मग शहर पोलीस प्रमुखाने एका गरीब दिसणार्‌या प्रेसवाल्याला इशारा केला.

सर, कशावरून जो माणूस बिल्डींगवरून पडून मेलेला सापडला तोच खुनी आहे? एका टीव्ही चॅनलवाल्याने प्रश्न विचारला.

आतापयर्ंत झालेल्या खुनाच्या तिन्ही डेड बॉडीत ज्या बंदुकीच्या गोळ्‌या सापडल्या होत्या त्या त्याच्याच बंदुकीतून झाडल्या गेलेल्या होत्या. हे आमच्या टेक्नीकल टीमने सिध्द केलं आहे आणि खुन्याच्या कोटाच्या खिशात एक चाकू सापडला त्या खिशाच्या कापडावर तिन्ही मृतकांच्या रक्ताचे डाग सापडलेले आहेत. शहर पोलीस प्रमुखाने सविस्तर माहिती पुरविली.

पोलीस त्या खुन्याला जिवंत का पकडू शकले नाहीत?... जर जिवंत पकडू शकले असते तर अजून काही माहिती मिळाली असती. जसे खुनाचा उद्देश वगैरे दुसर्‌या एका प्रेसवाल्याने पटकन आपले तोंड घुसवून प्रश्न विचारला.

खुनाच्या बाबतीत माहिती मिळताच आम्ही तडकाफडकी घटनास्थळी पोहोचलो... जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा खून झालेला होता पण खुनी बिल्डींगमधून बाहेर पडला नव्हता... मग आम्ही इमारतीला चारही बाजूने घेरले. त्यामुळे खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते आणि त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही शहर पोलीस प्रमुखाने विस्ताराने सांगितले.

जॉनने आपल्या बॉसकडे आश्चर्याने बघितले. बॉस खोटं बोलत आहे याचे नाही तर तो किती सफाईनं खोटं बोलतो आहे याचं जॉनला आश्चर्य वाटत होतं.

काय ? खुन्याने आत्महत्या केली? पण काही लोकांच म्हणणं आहे की तो वरून पडला असावा एका जणाने प्रतिप्रश्न केला.

टेरेसला साडेतीन फूट उंच भिंत असतांना तो तिथून पडला असे म्हणणे चुकीचे ठरेल शहर पोलीस प्रमुखाने आपला तर्क लढवित उत्तर दिले.

खुनाबद्दल पोलिसांना कुणी माहिती दिली होती? एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टरने विचारले.

आता या सगळ्‌या गोटी सांगणं जरा कठीण आहे. आमचे तळागाळात हेर आणि खबरी विखुरलेले असतात. त्यांच्याच एकाने आम्हाला ही माहिती पुरविली. काही जण आपलं नाव गुप्त ठेवू इच्छितात. तर काही जणांची त्यांचं नाव जाहिर करण्याला परवानगी असते. काहीही असो शेवटी खुनी, मृत का होईना पकडला गेला हे महत्वाचे. त्यामुळे कदाचित अजून कितीतरी होवू घातलेले खून टळले आणि या गोटीचे श्रेय मी आमच्या सक्षम पोलीस डिपार्टमेंटच्या अथक परिश्रमाला देतो. त्यांना त्यांच्या मजबूत नेटवर्कमुळे माहिती मिळाली. नुसती माहितीच नाही तर ते तिथे वेळेवर पोहोचले आणि खुन्याला तिथून निसटण्याचे सर्व मार्ग बंद झाले शहर पोलीस प्रमुख आता तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत समारोपाचे शब्द बोलले.

ते तिथून निघण्यासाठी वळणार येवढ्यात अजून एकाने प्रश्न विचारला,

सर, त्या खुन्याचा उद्देश काय असावा?

सिरीयल किलर म्हणजे एक प्रकारचे माथेफिरूच. नाही का? त्यांना खून करण्यासाठी उद्देश वगैरे कशाची गरज लागत नाही. आता ते डोक्यानेच वेडे म्हटल्यावर त्यांचा उद्देश काय असावा हे सांगणे तसे कठीणच. गालातल्या गालात हसत पोलीस शाखाप्रमुख म्हणाले. ते पाहून बरेच इतर आजूबाजूचे पत्रकार ज्याने प्रश्न विचारला त्याच्याकडे कुत्सीतपणे पाहून हसू लागले.

बिचारा प्रश्न विचारणारा गोरा मोरा झाला.

आता शहर पोलीस प्रमुख टोलवाटोलवीची उत्तरे देवू लागले.

सर , खुन्याच्या घरातील काम्प्यूटरची हार्डडिस्क कुणीतरी पळविली हे खरं आहे का? एकाजणाने शहर पोलीस प्रमुखाचे लक्ष आकर्िात करण्याचा प्रयत्न करीत विचारले.

शहर पोलीस प्रमुख त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत म्हणाले,

मला वाटते मी सर्व प्रकरणावरून पूर्णतरू पडदा हटेल अशा प्रकारे यथायोग्य माहिती आपल्याला पुरविली आहे आणि तुमच्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास ही माहिती पुरेशी आहे.... थँक यू

शहर पोलीस प्रमुख जे एकदाचे पाठ फिरवून निघाले ते तिथून बाहेर जाईपयर्ंत थांबलेच नाहीत. त्यांच्या मागे खाली मान घालून जॉन मुकाट्याने चालत होता.

पॉलीटीक्स

जॉन ड्रॉइंग रूममध्ये बसून हळू हळू व्हिस्कीचे घोट घेत होता. त्याच्या चेहर्‌यावरून स्पट दिसत होते की तो डिस्टर्ब होता. तेवढ्यात त्याची डोअर बेल वाजली. तो व्हिस्कीचा ग्लास टीपॉयवर ठेवून उठला. समोर जाऊन त्याने दार उघडले. दारात त्याच्या समोर अँजेनी उभी होती.

मी किती वेळपासून तुझा मोबाईल ट्राय करीत आहे. तुझा मोबाईल बंद आहे की काय? अँजेनी दारातून आत येत म्हणाली.

प्रेसवाल्यांचे फोनवर फोन येत आहेत... म्हणून बंद करून ठेवला आहे जॉन समोरचे दार बंद करीत म्हणाला.

अँजेनीने ड्रॉइंग रूममध्ये आल्यावर टीपॉयवर ठेवलेला व्हिस्कीचा ग्लास बघितला आणि मग जॉनच्या चेहर्‌याकडे निरखून बघू लागली.

काय झालं? अपसेट दिसतोस अँजेनीने त्याला विचारले.

बस... सांगतो त्याने स्वतरू एका खुर्चीवर बसत आणि अँजेनीला समोरच्या खुर्चीकडे बसण्याचा इशारा करीत म्हटले.

तिने समोरची खुर्ची त्याच्या बाजूला ओढली आणि ती अगदी जवळ त्याच्या शेजारी बसली. त्याने व्हिस्कीचा ग्लास पुन्हा उचलला आणि ओठाला लावला.

असं कुढत राहण्यापेक्षा आपले प्रॉब्लेम्स कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला पाहिजेत अँजेनी त्याचा हात हातात घेत म्हणाली.

त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला.

काय डिपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम झाला? अँजेनीने त्याचा हात थोपटत विचारले.

सांगतो... सगळं सांगतो व्हिस्कीचा ग्लास बाजूला ठेवत तो म्हणाला.

जॉनने एक दीर्र्‌घ उसासा टाकला आणि तिला सांगायला लागला...

जॉन त्याच्या बॉसच्या, म्हणजे शहर पोलीस शाखा प्रमुखाच्या समोर बसलेला होता.

सर, त्या बिल्डींगच्या खाली सापडलेल्या मृतदेहाची शहानिशा करून आम्ही ही काही माहिती मिळविलेली आहे जॉन आपल्या समोरच्या फाईलमधले कागद चाळत म्हणाला.

हं बॉसने नुसता हूंकार भरला.

जॉनच्या बॉसने त्याच्या तोंडातल्या सिगारचा एक मोठा झुरका घेतला.

त्या मृतदेहाच्या खिशात एक बंदूक सापडली... आतापयंर्ंत झालेले तिन्हीही खून त्याच बंदुकीचा वापर करून झालेले आहेत.

बॉसने तोंडातल्या सिगारची राख समोर टेबलवर ठेवलेल्या ॲश ट्रेमध्ये झटकून टाकत म्हटले,

म्हणजे आपण ज्या खुन्याचा शोध घेत होतो, तो आयताच, मेलेला का असेना आपल्याला सापडला.

सर, मला वाटते तसा निर्का काढणे म्हणजे जरा घाईचे होईल जॉन म्हणाला.

हे बघ जॉन, आता पोलिसांच्या गळ्‌यापयंर्ंत पाणी आलेलं आहे. आता ही शब्दांशी खेळण्याची वेळ नव्हे. सध्या तरी परिस्थिती निवळण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे आणि आपला निर्का चुकीचा असावा असं तुला का वाटतं? बॉसने जॉनच्या डोळ्‌यात रोखून पाहत विचारले.

तशा पुकळ गोटी आहेत. जॉनने फाईलची काही पानं उलटवित म्हटलं.

उदाहरणार्थ? बॉसने सिगार विझवत सरळ बसत त्याला विचारले.

नंबर एक — खर्‌या खुन्याने कुणाला तरी मारून त्याच्या खिशात आपली बंदूक टाकली असू शकते. आणि हे सगळं तो त्याच्यावरचं केंद्रित असलेलं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी करू शकतो.

नंबर दोन — जेव्हा आम्ही त्या मेलेल्या इसमाच्या घरात धाड टाकली तेव्हा त्याच्या कॉम्प्यूटरमधली हार्डडिस्क गायब होती. याच्यामागे बरीच कारणं असू शकतात. खुनी हा एकटा नसून अजून बरेचजण त्याला सामील असू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे खुनी कुणीतरी दुसराच असून तो हे सगळं आपल्यावरचं लक्ष हटविण्यासाठी करू शकतो किंवा ती एक साधी चोरीसुध्दा असू शकते

जॉन बॉसची प्रतिक्रिया आजमवण्यासाठी थांबला.

हं, अजून काही बॉसनं त्याला अजून काही बोलायचे आहे का हे सूचित करीत म्हटले.

नंबर तीन — या वेळेस खुनाची माहिती खुन्याने न देता कुणीतरी त्रयस्थ इसमाने दिली होती कारण जिथून फोन आला होता तिथून खुन्याला खुनाच्या वेळेपयंर्ंत खुनाच्या जागी पोहचणंं जवळ जवळ अशक्य होतं. हा आताचा अपवाद वगळता यापूर्वी खून झाला तिथूनच खुन्याने फोन केले होते. कुणीतरी त्यांच्या टोळीतला माणूस फुटला असावा किंवा कुणाला तरी ही माहिती कळली जो आपली ओळख लपवू इच्छितो

जॉनने उरलेलं सगळं जवळ जवळ एका श्वासात सांगितलं आणि तो त्याच्या बॉसच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला.

जॉनचा बॉस त्याच्या खुर्चीवरून हळूच उठला. खिडकीच्या बाहेर पाहत त्याने नवीन सिगार शिलगावली. मग सिगारचे झुरके घेत त्याने जॉनच्या भोवती खोलीत एक चक्कर मारली.

झालं तुझं ? बॉस त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

जॉनने नुसती मान हलविली.

हे बघ जॉन, तुला माहित आहेच या घटनेमुळे आपल्या पोलिसांची प्रतिमा किती मलीन झाली आहे आणि तू जे सांगतो आहेस या सगळ्‌या शक्यता आहेत. त्यांचा आपल्याजवळ अजून असा ठोस पुरावा नाहीये

जॉनचा बॉस खोलीत हळू हळू चकरा मारत बोलत होता.

पण सर.. जॉनने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याला अडवीत जॉनचा बॉस म्हणाला,

मला वाटतं या केसवर काम करून आणि सारख्या दडपणामुळे तू शारिरीकरित्या आणि मानसिकरित्याही थकला आहेस आणि थकलं की असं होतं पुकळ वेळा. माणसाचा गोंधळ उडतो आणि मग तो भलतेसे निर्का काढायला लागतो.

नाही सर, तसं काही नाही . जॉनने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

हे बघ, मी काय म्हणतो ते नीट ऐक जॉनचा बॉस करड्या आवाजात म्हणाला.

आता एक प्रेस कॉन्फरंस घ्यावी लागेल. त्यात एकाच वेळी केसची संपूर्ण माहिती देऊन आपल्या पोलीस डिपार्टमेंटची उरली सुरली लाज राखावी लागेल आणि मग ..... आणि मग तू एका महिन्याच्या सुट्टीवर जा... मी तुझी सुट्टी आताच सँक्शन करतो ... मग तू तुझी मैत्रिण अँजेनीला घेऊन एखाद्या हिलस्टेशनला जा. तू काळजी करू नकोस. मी सगळी व्यवस्था करतो

जॉनने एकदम चमकून त्याच्या बॉसकडे पाहिले. आपल्या बॉसला आपल्याबद्दल आणि अँजेनीबद्दल कसे कळले? त्याच्या नजरेत अजूनही आश्चर्य आणि अविश्वास तरळत होता.

आय ॲम सॉरी... इट्‌स यूवर पर्सनल मॅटर... बट इटस्‌ माय प्रोफेशनल वे अॉफ वकींर्ंग .... मला सगळ्‌यांवर बारीक नजर ठेवावी लागते

जॉन काही बोलण्याच्या आधीच त्याच्या बॉसने खुर्चीच्या मागे टांगलेला त्याचा ओव्हरकोट उचलला आणि दरवाज्याकडे जायला लागला.

दरवाज्याजवळ थांबून जॉनकडे वळून बघत तो म्हणाला , उद्या सकाळी दहा वाजता मी प्रेस कॉन्फरंस बोलावली आहे. काय बोलायचे ते मी बोलतो. यू जस्ट बी देअर.

जॉनच्या उत्तराची वाट न पाहता त्याचा बॉस टाक टाक बुटांचा आवाज करीत तिथून निघून गेला. जॉन गोंधळून कधी त्याच्या बॉसच्या जाणार्‌या पाठमोर्‌या आकृतीकडे तर कधी त्याच्या हातातल्या फाईलमधल्या कागदांकडे बघत उभा राहिला.

व्हॅकेशन

जॉनची कार जशी भरधाव वेगाने धावत होती तसे त्याचे विचारसुध्दा भरधाव वेगाने धावत होते. त्याच्या शेजारी उजवीकडे अँजेनी बसलेली होती. जॉन गाडी ड्राईव्ह करीत होता. ती जरी जॉनच्या शेजारी बसली होती तरी तिला एकटेपणाची जाणीव होत होती. कारण जॉन जरी भौतिकरित्या कारमध्ये बसलेला होता तरीही मानसिकरित्या तो दुसरीकडे कुठेतरी होता. हळूहळू गाडीने मुख्य शहराचा भाग मागे सोडला. आता फक्त तुरळक घरेच खिडकीतून रस्त्याच्या बाजूला दिसत होती. हळू हळू तीही नाहीशी झाली. काही वेळाने गाडी चारही बाजूने हिरव्या कुरणाने , हिरव्या झाडांनी , हिरव्या आच्छादलेल्या डोंगरांनी वेढलेल्या स्वर्गतुल्य प्रदेशातून धावू लागली. रस्त्याच्या दोनही बाजूने डोळ्‌यांना सुखावेल अशी नुसती हिरवळ वेढून होती. अँजेनीने जॉनकडे बघितले. तो अजूनही आपल्याच विचारात मग्न होता.

तू बसला आहेस माझ्या शेजारी खरा पण तू अजूनही त्या खुनाच्या केसमध्ये अडकलेला दिसतोस. अँजेनी त्याच्याकडे बघून म्हणाली.

अँजेनीच्या बोलण्याने तो भानावर आला.

हो,... नाही , तसं नाही तो गोंधळून म्हणाला.

मला कळतंय. तुझ्या बॉसने तुझ्या बाबतीत जे केलं ते काही बरोबर केलं नाही. पण काही वेळा आपला इलाज नसतो बघ नंंय माझ्या बाबतीत तरी नियतीनं कुठं बरोबर केलं आहे तिला सानीची आठवण येऊन ती बोलली.

त्याला काय बोलावे काही कळेना. गाडी चालविता चालविता त्याने फक्त तिच्याकडे एक प्रेमळ दृटीक्षेप टाकला.

तेवढ्यात आसमंतात पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.

इथे कुठेतरी धबधबा वाहत असावा असं दिसतंया तो विाय बदलण्याच्या उद्देशाने म्हणाला.

तो बघ तिकडे. किती सुंदर! दुरूखाच्या छटेतून बाहेर येत अँजेनी उत्साहाने म्हणाली.

तिच्या चेहर्‌यावर एखाद्या छोट्या निरागस गोंडस मुलाचे भाव तरळत होते.

स्वच्छ शुभ्र खळखळणारे पाणी खडकांच्या खडबडीतून धावत सुटले होते.

वाव, किती सुंदर! तिने निर्देश केलेल्या दृयाकडे बघून जॉनच्या तोंडून निघाले.

किती साम्य आहे माणसाच्या जीवनात आणि त्या पाण्यात ती पुन्हा आपल्या पूर्वीच्या दुरूखद छटेत प्रवेश करीत म्हणाली.

कसे काय? जॉनने विचारले.

जॉनला उगीच अपराध्यासारखे वाटू लागले. आपण विचारात गढून गेलो नसतो तर ती तिच्या दुरूखाच्या गर्तेत ओढली गेली नसती. तिला त्या दुरूखाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तो तिच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करू लागला.

बघ ना. ते पाणी एकदा वरून पावसाच्या स्वरूपात पडले की त्याची जीवनयात्रा सुरू होते मग त्या यात्रेला शेवट नाही. ते पाणी शेवटी समुद्राला जावून मिळेपयंर्ंत त्याने थांबायचं म्हटलं तरी थांबण्याचं त्याच्या हाती नसतं अँजेनी भावूक होऊन बोलत होती.

ते तिकडे बघ, हरणं कशी टणाटण उड्या मारत धावताहेत जॉन अचानक एकीकडे निर्देश करीत म्हणाला.

जॉनच्या बाजूने खिडकीतून स्प्रींग बग्जचा एक मोठाच्या मोठा थवा गाडीच्या चाहूलीने उड्या मारीत सैरावरा धावायला लागलेला दिसत होता.

किती गोड! किती गोंडस! अँजेनीच्या तोंडून निघाले.

तिचे डोळे आनंदाने चमकायला लागले होते.

एव्हाना गाडी पुढे गेली होती आणि तो थवा मागे पडला होता. ती गाडीतून परत परत वळून त्या हरणांच्या कळपाकडे ती दिसेनाशी होईपयंर्ंत पाहत होती.

आपलं कॉटेजसुध्दा पुढे कुठेतरी याच प्रवाहाच्या काठावर असावं जॉन म्हणाला.

काय तिथेसुध्दा हा प्रवाह आहे ! तिने आनंदाने विचारले.

हो असं तो सांगत तर होता जॉन म्हणाला.

सुगावा

कमांड 2 फॅशन स्ट्रीटवर गर्दीतून रस्ता काढीत समोर चालला होता. त्याला जाण्याची घाई होती पण रस्त्यात मधे येणार्‌या माणसांमुळे त्याला वेगाने चालता येत नव्हते. तो लोकांना जवळ जवळ बाजूला ढकलूनच मार्गक्रमण करीत होता. त्याच गर्दीत दुसरीकडे उभे असलेल्या डिटेक्टीव्ह ॲलेक्सने कमांड 2च्या शंकास्पद हालचालींना हेरले. तो सावधतेने एखादा चित्ता जसा आपल्या बेसावध सावजाला हेरतो त्याप्रमाणे कमांड 2चा पाठलाग करायला लागला. कमांड 2चे आपले घाईघाईने गर्दीतून रस्ता काढीत समोर जाणे चालूच होते. तो डिटेक्टीव्ह ॲलक्सच्या हालचालींबाबत अगदीच अनभिज्ञ दिसत होता.

एकदाचा कमांड 2 गर्दीतून बाहेर आला. गर्दीतून बाहेर येताच थांबून त्याने इकडे तिकडे आपली नजर फिरविली. डिटेक्टीव्ह ॲलेक्स त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून जवळच्याच एका दुकानात घुसला. काही भीती नाही याची खात्री होताच कमांड 2 बाजूच्या एका अंधार्‌या बोळात घुसला. डिटेक्टीव्ह ॲलेक्ससुध्दा त्याच्या मागे त्या अंधार्‌या बोळात घुसला.

एका इमारतीच्या आडोश्याला उभे राहून डिटेक्टीव्ह ॲलेक्सने रस्त्याच्या पलिकडे कमांड 2ला एका बंगल्याच्या आवारात सावधतेने जातांना बघितले. डिटेक्टीव्ह ॲलेक्सने सभोवार नजर फिरवून आपण कुणाच्या दृटीक्षेपात तर नाही आहोत ना याची खात्री केली. मग पुन्हा कमांड 2 गेला होता त्या बंगल्याकडे बघितले. तो आतापयंर्ंत त्या बंगल्याच्या अंधार्‌या विश्वात गुडूप झाला होता.

फिशींग

खळखळत्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला टुमदार कॉटेजेसचा समूह होता. त्या कॉटेजेसच्या पलिकडे उत्तुंग डोंगर आपल्या कुशीत हिरव्यागार झाडांच्या मखमलीला घेऊन ऐटीत उभे होते. वर आकाशात त्या डोंगराच्या शिखराशी शिवाशिवीचा खेळ खेळणारे शुभ्र ढग. आणि ते संपूर्ण वातावरण खळखळत्या प्रवाहाच्या मंजुळ आवाजाने भरून गेले होते. त्यातच मधे मधे बाजूच्या उंच झाडांत लपलले पक्षी साद घालीत होते.

प्रवाहाच्या पाण्यात पाय सोडून जॉन आणि अँजेनी एका खडकावर बसले होते. दोघांच्याही हातात एक एक मासे पकडण्यासाठी पाण्यात सोडलेला गळ होता. दोघंही आनंदी दिसत होते. अँजेनीला जॉनची गंमत करण्याचा मूड झाला. तिने त्याला एक कोडं विचारलं.

एकदा नंबर बारा बार मध्ये गेला आणि त्याने बारटेंन्डरला व्हिस्की मागतली. पण बार टेन्डरने त्याला तिथून हाकलून लावले... काय कारण असेल हाकलण्याचे?

अँजेनीने गळ एकदा हलवून बघितला आणि मग प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले.

आता हे नंबर्स केव्हापासनं बारमध्ये जायला लागले? जॉनने तिची छेड काढीत म्हटले.

सांगना... अँजेनी त्याच्याकडे लाडात येऊन पाहत म्हणाली.

मला वाटते ही हत्ती आणि मुंगीच्या जोक्ससारखी भानगड दिसते जॉन हसून म्हणाला.

मग सांग की ... बार टेन्डरने नंबर बाराला का हाकलून लावले? अँजेनी तकादा लावत म्हणाली.

नाही बुवा ...मला तर काही सांगता येत नाही...का हाकलून लावले... तूच सांग? जॉनने आपली हार कबूल करीत म्हटले.

इतक्या लवकर हरलास ... अँजेनीने त्याला चिडविण्याच्या सुरात म्हटले.

नाही ... मला तर काही सुचत नाही आहे... हरलो ... मी हरलो... आता तर सांगशील का हाकलून लावले? जॉन उत्तर ऐकण्याच्या उत्सुकतेने म्हणाला.

अरे ... कारण नंबर बारा हा अंडरएज होता... अठरा र्वाापेक्षा कमी अँजेनी हसत म्हणाली.

असं होय... अरे ... खरंच की... जॉन सुध्दा हसायला लागला.

आता अजून एक सांग... अँजेनी पाण्यातला गळ हलवून बघत म्हणाली.

हं...बोल जॉनने तिला उत्साह दाखवित म्हटले.

नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल? अँजेनीने विचारले.

आता हे नंबरर्स एकमेकांना बोलायला सुध्दा लागले? जॉनने पुन्हा तिची छेड काढीत म्हटले.

बोलायचं काय ... काही वेळाने ते एकमेकांवर प्रेम सुध्दा करू लागतील...आपल्यासारखं अँजेनी त्याला टिच्चून प्रतिउत्तर देत म्हणाली.

शक्य आहे...म्हणूनच कदाचित 99, 66, 63, 69 हे कोडवर्ड पडले असतील जॉन एक डोळा मारत म्हणाला.

अँजेनीने लाजेनं मान खाली घेतली.

थोड्या वेळाने मान वर करीत ती त्याच्याकडे लाजेने पाहत म्हणाली,

चांगलाच बदमाश आहेस ...

जॉन नुसता तिच्या डोळ्‌याला डोळे भिडवून गालातल्या गालात अर्थपूर्ण हसला.

सांगना... नंबर एट नंबर थ्री ला काय म्हणेल? अँजेनी त्याच्या छातीवर खोटं खोटं मारून लाडात येत म्हणाली.

नाही बुवा ... हे सुध्दा मी हारलो... तूच सांग जॉन लाडे लाडे म्हणाला.

अरे ...नंबर एट नंबर थ्रीला म्हणेल ...वील यू शट अप यूवर माऊथ प्लीज

अरे वा छानच आहे जॉनने आपला गळ हलवून बघत म्हटले.

बर अजून एक ... नंबर एटने नंबर सिक्स ला नंबर नाईन कडे बोट दाखवून समजाविले ... काय समजाविले असेल? अँजेनीने विचारले.

बघ तुझे नंबर एक एक स्टेप पुढे जात आहेत... प्रथम बार मध्ये गेले ... नंतर बोलायला लागले ... अन आता एकमेकांना समजावयाला लागले... आता पुढची स्टेप ...

जॉन पुढे काही बोलण्याच्या आधी अँजेनीने गमतीने एक मुक्का त्याच्यावर उगारला.

हं सांगतो .. सांगतो... जॉन तिला भ्यायल्यासारखं दाखवित म्हणाला, ... काय समजावले असेल... काय समजावले असेल... हं तो म्हणाला असेल हा काय नेहमी उलटा उभा राहतोस ... बघ तो नंबर नाईन किती शहाणा आहे... कसा सरळ उभा राहतो... जॉनने गमतीने म्हटले.

अरे वा... यू आर राईट... अँजेनी आश्चर्याने म्हणाली

काय ! मी बरोबर आहे ! जॉन आश्चर्याने आणि अविश्वासाने उदगारला.

यस ...यू आर अब्सल्यूटली राईट... आधी कधी तू एकले असशील हे अँजेनीने शंका काढली.

अगं नाही ... खरचं नाही ... मी आपला सहजच अंदाज बांधला जॉन म्हणाला.

थोडा वेळ दोघंही शांत होते.

मग जॉन म्हणाला आता मी एक विचारतो

अँजेनीने डोळ्‌यानेच होकार दिला.

नंबर शून्य नंबर एट ला काय म्हणाला असेल? जॉन ने विचारले.

शून्य ... शून्याचा उल्लेख एकून अँजेनीच्या चेहर्‌यावर एक उदासी पसरली. तिच्या चेहर्‌यावरचे ते अवखळ हास्य तो अल्लडपणा अचानक मावळला. जॉनच्या लक्षात आले की त्याने शून्याचा उल्लेख करायला नको होता.

आय ॲम सॉरी... तो तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला.

ती काही न बोलता पाण्यातला गळ हलवू लागली.

आय ॲम सॉरी ... अगं माझ्या लक्षातच नाही आलं तो पुन्हा म्हणाला.

इट्‌स अॉलराईट ... ती स्वतरूला सावरत म्हणाली तूच सांग... मला नाही जमत

काय? जॉनने विचारले.

अरे शून्य नंबर एट ला काय म्हणाला ते सांग ती पुन्हा अवखळ होण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

जॉन काहीच बोलला नाही.

सांग ना ती त्याचा चेहरा आपल्याकडे करत म्हणाली.

जॉन तिच्याकडे बघून हसत म्हणाला हरलीस ... इतक्या लवकर

हो ... सांग ना ती उत्सुकतेने म्हणाली.

शून्य नंबर एट ला काय म्हणाला ... नाईस बेल्ट जॉन हसत म्हणाला.

अरे वा...नाईस

तीसुध्दा त्याच्यासोबत हसायला लागली.

बराच वेळ पुन्हा शांततेत गेला. दोघंही आपाआपले गळ हलवून बघण्यात मग्न होते.

तुला मासे बनविता येतात का? अँजेनीने जॉनच्या जवळ सरकत विचारले.

आपला जड लागलेला गळ ओढून पाहत जॉन म्हणाला नाही

मग आपण मासे का पकडत आहोत? अँजेनीने विचारले.

अरे ... कशाला म्हणजे खाण्यासाठी जॉन तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.

मग याचा काही एक उपयोग होणार नाही अँजेनी म्हणाली

म्हणजे?

मलासुध्दा मासे बनविता येत नाहीत

काय? तो आश्चर्याने म्हणाला.

हं, तुला कच्चे खायचे असतील तर काही हरकत नाही ती गमतीने म्हणाली.

तुलासुध्दा बनविता येत नाहीत? काही हरकत नाही आपण बनवून तर बघूया... ट्राय करायला काय हरकत आहे? त्याने सुचविले.

अन्‌ जर नाही जमले तर

जसे बनतील तसे खावू. कमीत कमी कच्चे खायची तर वेळ येणार नाही तो हसत म्हणाला.

तेवढ्यात अँजेनीला जाणवले की तिचा गळ जड लागतो आहे. तिने गळ हलवून बघितला. बहुतेक तिच्या गळाला मासा लागला होता. तिने गळ गुंडाळाण्यास सुरवात केली. एक तपकीरी शेड असलेला पांढरा मासा तडफडत गळासोबत तिच्या जवळ जवळ येऊ लागला. तिने हळूच त्याला गळातून काढून बाजूला खडकावर ठेवलेल्या वेताच्या टोपलीत टाकले आणि ती पुन्हा गळ पाण्यात सोडायला लागली. तेवढ्यात फुलपाखरासारखे काहीतरी तिच्या नाकाला लागून तिला पाण्यात पडलेले जाणवले. तिने नाकाला हात लावून पुसलं आणि मग त्याच हाताने आपल्या डोळ्‌यावरचे केस बाजूला करीत गळ पाण्यात सोडण्यात ती मग्न झाली.

जॉन अचानक तिच्याकडे बघून जोरजोराने हसायला लागला.

तिने जॉनकडे बघत विचारले, काय झालं ?

तुझा मासा कुठाय ? त्याने विचारले.

तिने मागे ठेवलेल्या टोपलीत बघितले तर तिथे मासा नव्हता.

कुठाय? ती इकडे तिकडे बघायला लागली.

खरंच कुठाय? ती गालातल्या गालात हसत म्हणाली.

तिला गंमत वाटत होती.

गेला तो पाण्यात उडी मारून तुझ्या नाकावर टीच्चू देऊन तो पुन्हा जोरजोराने हसत म्हणाला.

अच्छा तो मासा होता होय ती लक्षात येऊन नाकाला हात लावत म्हणाली आणि तीसुध्दा त्याच्या सोबत जोरजोराने हसायला लागली.

चार तासांचा अवधी

रात्र झाली होती. दोघांनी मिळून स्वयंपाक केला. जेवणाच्या टेबलवर सगळे पदार्थ सजवून ठेवले. जॉनने खोलीत अंधार करून टेबलवर कॅन्डल्स लावून पेटविल्या. दोघं जण जेवणाच्या टेबलवर मेणबत्यांच्या अंधूक प्रकाशात समोरासमोर एकमेकांना प्रेमाने न्याहाळत बसले. जेवणाचे पदार्थ तसेच पडून होते. त्यांना भूक तहानेचे भान होतेच कुठें! त्यांची भूक तहान हरविली होती. अचानक तिला जाणवले की जॉनचा चेहरा पुन्हा काळजीत पडून विचारमग्न झाला आहे.

हॅलो तिने चुटकी वाजवून त्याला विचारातून बाहेर आणले.

काय विचार करतोस? तिने विचारले.

इथून जर गाडीने शहरात जायचे असेल तर किती वेळ लागेल? त्याने विचाराच्या तंद्रीतून बाहेर येत विचारले.

लागतील दोन एक तास. का? का विचारतोस? तिने त्याला विचारले.

प्लीज तू मला चार तासांचा अवधी देशील?

कशाला? तिने विचारले.

एक अजंर्ंट काम निघालं आहे. दोन तास जाण्यासाठी आणि दोन तास येण्यासाठी. बस चार तासात मी जाऊन आलोच. तो तिच्याकडे बघत म्हणाला.

तिचा चेहरा पडल्यासारखा झाला.

प्लीज तो तिची विनवणी करीत म्हणाला.

जाणे आवश्यक आहे का? ती र्नव्हस होत त्याला म्हणाली.

हो, फार आवश्यक आहे तो तिला म्हणाला.

पण असं काय काम आहे? तिने विचारले.

ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही. तिकडून आल्यावर नक्की सांगेन तो तिचा मूड व्यवस्थित करण्यासाठी खुर्चीवरून उठत हसत म्हणाला.

ती काही बोलण्याच्या आधीच तो घाईघाईने बाहेरसुध्दा गेला. श्ठक..ठकश् पायर्‌या उतरण्याचा आवाज येऊ लागला. ती उठून खिडकीजवळ गेली. खिडकीतून ती त्याला गाडीपयंर्ंत जात असलेला पाहत राहिली. गाडीजवळ जावून त्याने वळून वर खिडकीकडे बघितले.

तू काळजी करू नकोस. बरोबर चार तासात मी परत येईन खालून मोठयाने सांगत तो गाडीत बसला.

खाटश् गाडीचे दार त्याने जोरात ओढून घेतले. तिचे हृदय धडधडू लागले. त्याने गाडी सुरू करून गाडीच्या खिडकीतून तिला श्बायश् केले आणि तो निघून गेला. तिच्या चेहर्‌यावर पुन्हा म्लानता दिसायला लागली. चार तासांसाठी का होईना तो तिला हुरहूर लावून गेला होता.

तो कशासाठी गेला असेल?...

तो नक्की परत येईल ना?...

की सानीसारखा तोसुध्दा आपल्याला अर्ध्‌या वाटेतच सोडून जाईल?...

तिचं विचारचक्र सुरू झालं होतं.

प्रपोज

अजूनही अँजेनी जेवणाच्या टेबलसमोर बसलेली होती. टेबलवर लावलेल्या मेणबत्या शेवटी विझून गेल्या होत्या. टेबलवर फक्त शिल्लक राहिलं होतं इकडे तिकडे पसरलेलं मेण. तिच्या हृदयाचीसुध्दा अवस्था काहीशी त्या मेणासारखीच होती. जळून जळून थिजल्यासारखी. टेबलवर जेवण जसंच्या तसं ठेवलेलं होतं. वाट पाहून पाहून कंटाळल्यानंतर ती खुर्चीवरून उठली. तेवढ्यात घड्याळाचा गजर वाजला. बारा ठोके. तिला ते तिच्या हृदयावर कुणीतर घणाघण घाव घातल्यासारखे वाटले. रात्रीचे बारा वाजले होते.

तो बरोबर आठ वाजता इथून निघाला होता...

म्हणजे बरोबर चार तास झाले होते...

तो कदाचित कॉटेजजवळ आला असेल...

ती खिडकीजवळ जाऊन खिडकीतून डोकावून बाहेर बघू लागली. कॉटेजकडे येणारा रस्ता एकदम शांत होता. एकदम निर्मनुय. ना कुणाची चाहूल ना कोणत्या वाहनाचे दिवे. ती बराच वेळ त्या रस्त्याकडे डोळे लावून बसली. अचानक तिला दोन दिवे रस्त्यावर पुढे येतांना दिसले. ते तिच्याकडेच येत होते. तिचा चेहरा आनंदाने उजळला.

तोच असावा...

नक्कीच जॉन असावा...

ती दूर रस्त्यावर समोर समोर सरकत्या गाडीच्या दिव्यांकडे पहायला लागली. जसे जसे गाडीचे दिवे जवळ जवळ यायला लागले तिच्या हृदयात उचंबळून यायला लागले.

जॉनबद्दल आपण उगीच शंका घेतली...

तिला अपराध्यासारखे वाटायला लागले होते. गाडी आता समोरच्या फाट्याजवळ आली होती.

गाडी एक वळण घेईल आणि मग आपल्या कॉटेजकडे यायला लागेल. वळणाच्या नंतर रस्ता समोर पुढे कुठेतरी जात असावा...

पण हे काय?...

गाडी वळणावर कॉटेजकडे न वळता सरळ समोर निघून गेली...

पुन्हा निराशा तिच्या चेहर्‌यावर पसरली. आपल्या मनाची विाण्णता घालविण्यासाठी ती आता खोलीत येरझारा घालायला लागली. अधून मधून ती खिडकीतून बाहेर डोकावत होती. समोरचा रस्ता पुन्हा पूर्ववत रिता दिसायला लागला होता. येरझारा मारता मारता पुन्हा तिने एकदा भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिले. साडे बारा वाजून गेले होते. अजून जॉनचा पत्ता नव्हता. तिला आता एकांताची भीती वाटायला लागली होती. तिने पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर बघितले. तिची आशा पुन्हा बळावू लागली. पुन्हा गाडीचे दोन दिवे तिला रस्त्यावरून सरकतांना दिसले.

आता नक्की तोच असावा...

ती पुन्हा खिडकीजवळ उभी राहून त्या दिव्यांकडे एकटक बघायला लागली.

ही गाडी जॉनची असूही शकते आणि नसूही शकते...

पण आशा किती खूळी असते...

अचानक वळणाजवळ आल्यानंतर गाडीचे दिवे दिसेनासे झाले.

काय झाले?..

गाडी तिथे थांबली की काय?...

की गाडी येत आहे हा नुसता आपल्याला झालेला भास होता?...

ती खिडकीतून बाजूला होऊन पुन्हा खोलीत येरझारा मारू लागली. अचानक तिला खाली गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. ती खिडकीकडे धावली. तिने बाहेर डोकावून बघितले. जॉन गाडीतून उतरत होता. तिच्या जिवात जीव आला. ती दरवाज्याकडे धावत गेली. दरवाजा उघडून जॉनकडे जवळ जवळ धावतच गेली. समोरून जॉनसुध्दा धावत येत होता. ती धावतच जॉनच्या मिठीत शिरली.

किती वेळ लावलास ? ... ती जॉनच्या छातीवर हलकेच गुद्दे मारत म्हणाली.

किती घाबरले होते मी ... मला वाटलं तू मला आता इथेच सोडून जाणार त्याच्या डोळ्‌यात बघत ती म्हणाली.

वेडी आहेस ... असे कधी होणे शक्य आहे का ? तो तिच्या खांद्यावर हात टाकून तिला कॉटेजमध्ये आणत म्हणाला.

दोघेही एकमेकांच्या कंबरेत हात घालून पायर्‌या चढू लागले.

आता सांग ... कुठे गेला होतास? तिने विचारले.

सांगतो ... सांगतो ... जरा धीर धरशील तो म्हणाला.

एव्हाना दोघेही कॉटेजमध्ये शिरले होते. अँजेनीने आत येताच समोरचे दार लावून घेतले. आणि तो काय सांगतो या उत्सुकतेने ती त्याच्या मागे मागे घोटाळू लागली. तो सरळ आत जाऊन जेवणाच्या टेबलजवळ गेला. ती पण त्याच्या मागे मागे त्याच्यासोबत गेली. त्याने पुन्हा जेवणाच्या टेबलवर मेणबत्या लावल्या. घरातले सगळे लाईट घालविले. अँजेनी गोंधळून फक्त त्याच्या मागे मागे फिरत होती. त्याने तिच्या खांद्याला धरून तिला त्याच्या समोर खुर्चीवर बसविले.

बस बस ... तुला सांगतो मी कुठे गेलो होतो ते तो तिला म्हणाला.

तोसुध्दा तिच्या समोर बसला. थोडा वेळ दोघंही स्तब्धच होती. मग जॉनने तिच्या डोळ्‌यात बघत तिचे मुलायम हात आपल्या हातात घेतले. मेणबत्यांच्या उजेडात तिची कांती अजूनच उजळून दिसत होती. जॉनचा आल्या आल्या हा चाललेला प्रकार पाहून तिने गोंधळून त्याच्याकडे बघितले.

अँजेनी तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने तिच्या डोळ्‌यात रोखून पाहत तिला प्रपोज केले.

अँजेनीला एकदम गहिवरून आले.

पण स्वतरूला सावरून ती म्हणाली, इज धीस सम काईंंड अॉफ जोक?

नाही नाही ... मी सिरीयस आहे तो म्हणाला.

हे बघ जॉन आधीच तू इतका वेळ नव्हतास तर मला हुरहूर वाटत होती... कमीत कमी अशा वेळी तरी अशा फालतू गमती करू नकोस ती त्याला म्हणाली

नाही अँजी ... मी गंमत करीत नाहीये तो तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करू लागला.

जॉनने तिला प्रथमच श्अँजीश् अशा प्रेमळ नावाने हाक मारली होती. ती त्याच्या डोळ्‌यांना डोळे भिडवीत त्याच्या डोळ्‌यातले भाव समजण्याचा प्रयत्न करू लागली.

तुला खरं नाही वाटत नं ...

त्याने त्याच्या कोटाच्या खिशातून एक लाल डबी काढीत म्हटले,

हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे...

काय आहे? तिने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

त्याने डबी उघडून तिच्यासमोर धरीत म्हटले,

एंंगेजमेंट रिंग ... अॉफ कोर्स इफ यू ॲग्री..

त्याने पुन्हा तिला एकदा विचारले, विल यू मॅरी मी प्लीज

अँजेनीच्या डोळ्‌यात अश्रू तरळले.

याच्यासाठी गेला होतास का तू शहरात? तिने दाटल्या गळ्‌याने विचारले.

त्याने तिच्या डोळ्‌यात प्रेमाने बघत होकारार्थी मान हलविली.

ती खुर्चीवरून उठून उभी राहिली. तोही त्याच्या खुर्चीवरून उठला. ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली.

यस आय विल तिच्या दाटल्या गळ्‌यातून शब्द फुटले.

त्याच्या चेहर्‌यावर आनंदाच्या छटा पसरल्या. तो अत्यानंदाने तिला उचलून तिचे चुंबनं घेवू लागला. त्याने मग हळूच तिला खाली उतरवून डबीतली अंगठी काढून हातात घेतली आणि हळूच तिच्या अनामिकेत सरकवली.

चांदन्या रात्री

मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर पौर्णिमेच्या चंद्राचा स्वच्छ उजेड पडला होता. वाहत्या जलप्रवाहाचा खळखळणारा आवाज आणि चंद्राचा प्रकाश कॉटेजमध्ये येत होता. बेडवर पडल्या पडल्या जॉनची बोटं अँजेनीच्या शरीराशी खेळत होती. त्याचा हात तिच्या शरीराशी खेळता खेळता हळू हळू खाली सरकायला लागला.

रिंग आणायची एवढी काय घाई होती? अँजेनीने एक मंद स्मित देत त्याच्या खाली सरकणार्‌या हाताला आपल्या हातात पकडून विचारले.

जाण्यार्‌या वेळेला मी थांबवू शकत तर नाही. पण तो वेळ वाया जाऊ नये याची खबरदारी मी घेतलीच पाहिजे तिला जवळ ओढून करकचून आवळत तो म्हणाला.

अच्छा तिने खट्याळपणे हसत त्याला दूर ढकलले.

तो तिला पुन्हा पकडण्यासाठी सरसावला. ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी बेडवरून उतरली तसा जॉन तिला पकडण्यासाठी अजूनच धडपडू लागला. ती इकडे तिकडे धावत त्याच्या पोहोचण्याच्या आवाक्यापासून दूर दूर जात होती. आता जॉनसुध्दा जिद्दीला पेटला. तो बेडवरून खाली उतरून तिच्याकडे सरसावला. ती हसत खिदळत जिन्याकडे धावली. तोसुध्दा तिचा पाठलाग करू लागला.

जिन्यातून धावत धावत शेवटी अँजेनी टेरेसवर येऊन पोहोचली. जॉनसुध्दा तिच्या मागे मागे टेरेसवर येऊन पोहोचला. वर टेरेसवर खुले आकाश, आकाशात चमकणार्‌या चांदण्या आणि चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश जास्तच लोभनीय दिसत होता. त्यातच भर म्हणजे वरून वाहते खळखळणारे आणि चंद्रप्रकाशात चमकणारे पाणी विशेा विलोभनीय दिसत होते. ती त्या वाहत्या जलौघाच्या सुंदरतेकडे पाहून मंत्रमुग्ध झाली.

बघ बघ किती सुंदर दिसते ते चमकणारे पाणी ती म्हणाली.

एव्हाना जॉनने मागून येऊन तिला आपल्या मिठीत ओढले होते.

पण या चंद्रप्रकाशात चमकणार्‌या तुझ्या चेहर्‌यापेक्षा नक्कीच सुंदर नाही तो म्हणाला.

तो भावनाविवश होऊन तिच्या उघड्या बाकदार मानेशी आपल्या व्याकुळ ओठांनी खेळायला लागला.

तिच्या अंगातसुध्दा आता शिरशिरी संचारू लागली.

त्याने तिला फिरवून तिचा चेहरा आपल्या चेहर्‌यासमोर आणला. आणि आपली पकड अजूनच घट्ट करीत त्याने आपले गरम ओठ तिच्या ओठांवर ठेवले.

तीही त्याच्या चुंबनास आवेगाने प्रतिसाद देवू लागली.

त्याने तिच्या पाठीवर रूळणार्‌या लांब तांबुस काळसर केसांना एका हाताने बाजूला केले. आणि तो तिच्या टॉपची पाठीवर बांधलेली लेस सोडू लागला.

अँजेनी त्याच्या छातीवरच्या केसांशी खेळत खेळत त्याच्या शर्टची बटनं काढू लागली.

एव्हाना त्यांना एकमेकांच्या श्वासातील आर्द्रता आणि उणता जाणवत होती.

जॉन आय लव्ह यू व्हेरी मच तिच्या तोंडातून आपसूकच निघाले.

आय टू म्हणत त्याने टेरेसच्या उघड्या फ्लोवरवर आपले आणि तिचे काढलेले कपडे टाकून त्यावर तिला अलगद फुलासारखे आडवे झोपवले.

आता दोघेही उघड्या गच्चीवर अगदी विवस्त्र होऊन भावनावेगाने एकमेकांना बिलगले होते.

चंद्राच्या शुभ्र प्रकाशात, खळखळत्या जलाच्या मधुर धुंद संगीतात एकमेकांच्या उत्कट भावनांना साद घालीत त्या अंधार्‌या रात्रीत ते आपल्या प्रणयाचे रंग हळूवारपणे भरू लागले.

डिटेक्टव्हचा फोन

थंडीपासून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी अगदी घट्ट बिलगून जॉन आणि अँजेनी टेरेसवरच झोपले होते. सकाळच्या पक्षांच्या किलकिलाटामुळे अँजेनीला जाग आली. तिने अतीव समाधानाने गाढ झोप लागलेल्या स्थितीतून आपले जड डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तिला डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तिला तसेच जॉनच्या मिठीत जन्मभर पडून राहावे असे वाटत होते . तशाच अवस्थेत तिने हलकेच डोळे उघडून पाहिले. पूर्वेकडे तांबडे फुटले होते. सकाळ झाली तेव्हा उठायलाच हवे होते. तिने आपले कपडे घालीत जॉनला हळुवारपणे हलविले.

जॉन ऊठ, बघ सकाळ झाली.

उं... जॉनने आळस दिला आणि तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढून घेतले.

तिने स्वतरूला सोडवित आपले कपडे घातले आणि पुन्हा जॉनला हलविले. तो उठला. बारीक डोळ्‌यांनी इकडे तिकडे बघितले. आणि पुन्हा तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच्या केसांतून हात फिरवीत ती गालातल्या गालात हसू लागली. तेवढ्यात त्यांना जाणवले की खाली रूममध्ये कदाचित जॉनचा मोबाईल वाजत आहे.

जॉन बघ बरं, तुझा मोबाईल वाजत आहे

इथे आल्यानंतर प्रथमच जॉनचा मोबाईल वाजला होता. तो खाडकन उठला. तो आपले कपडे घालीत घाईघाईने खाली जाऊ लागला. तीही त्याच्यासोबत खाली जाऊ लागली.

हो जॉनचाच मोबाईल वाजत होता...

मोबाईल उचलून जॉनने डिस्प्लेकडे बघितले. डिटेक्टीव्ह ॲलेक्सचा फोन होता.

इतक्या सकाळी ॲलेक्सचा फोन ?...

नक्कीच काहीतरी महत्वाचे असावे...

पटकन जॉनने बटन दाबून मोबाईल कानाला लावला.

हं बोल ॲलेक्स जॉन म्हणाला.

जॉन एक महत्वाची बातमी आहे तिकडून आवाज आला.

अचानक मोबाईलच्या सिग्नलमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येऊ लागला. काहीच एकू येत नव्हते.

हॅलो हॅलो जॉन ट्राय करू लागला.

हॅलो तिकडून प्रतिसाद आला.

हं, बोल काय बातमी आहे ? जॉन म्हणाला.

खुन्याच्या ठिकाणाचा पत्ता लागलेला आहे. तू लवकरात लवकर... तिकडून वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच काहीतरी न समजणारे बोलण्यासारखा आवाज आला आणि पुन्हा आवाज पूर्णपणे गेला.

हॅलो हॅलो जॉनने बोलण्याचा प्रयत्न केला.

त्याने त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. त्याच्या मोबाईलचा सिग्नल गेला होता.

कदाचित शहरापासून दूर अशा निर्गम डोंगराळ भागात सिग्नल व्यवस्थित येत नसावा...

काय झालं ? कुणाचा फोन आहे? अँजेनीने विचारले.

तो फोन घेऊन बाल्कनीत गेला. पण त्याच्या मोबाईलचा सिग्नल यायला तयार नव्हता.

अँजी लवकर तयारी कर. आपल्याला आता इथून ताबडतोब निघायला पाहिजे म्हणत जॉन बाल्कनीतून जिन्याकडे घाईघाईने गेला.

जिन्यावरून धावतच तो टेरेसवर गेला. काही न समजून अँजेनीसुध्दा त्याच्या मागे मागे टेरेसवर गेली. टेरेसवर सुध्दा त्याच्या मोबाईलचा सिग्नल आला नव्हता.

ॲलेक्सचा फोन होता... खुन्याबद्द्‌ल काहीतरी महत्वाची माहिती मिळाली आहे त्याला बहुतेक.... पण मध्येच सिग्नल गेला मोबाईलचा डिस्प्ले अँजेनीला दाखवित जॉन म्हणाला.

सुटीत व्यत्यय

जॉन गाडी चालवित होता आणि त्याच्या शेजारी अँजेनी बसलेली होती. दोघंही समोर सरळ रस्त्यावर बघत होती. अगदी शांत.

बर्‌याच वेळची त्यांच्यामध्ये असलेली एक अनैसर्गिक शांतता तोडत जॉन म्हणाला,

मी म्हटलं नाही तुला, हे खुनाचं प्रकरण अजूनही मिटलेलं नाही

अँजेनीने त्याच्याकडे बघितले.

खुनी अजूनही मोकळा फिरतो आहे जॉन पुढे म्हणाला.

मग जो मेला तो कोण असावा? अँजेनीने विचारले.

बर्‌याच शक्यता आहेत जॉन अँजेनीकडे बघत म्हणाला.

अँजेनीने त्याच्याकडे फक्त प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.

एक तर त्याचा खुनाशी काहीही संबंध नसावा ... किंवा तो खुन्याचा साथीदार असावा ... किंवा खुनांशी संबंधित असलेल्या टोळीचा तो एक क्षुद्र मेंबर असावा जॉन म्हणाला.

पण ॲलेक्सला असं काय महत्वाचं सांगायचं असावं? अँजेनीने प्रश्न उपस्थित केला.

जॉन काहीतरी लक्षात आल्यासारखा तिला म्हणाला,

बघ बरं ...माझ्या मोबाईलचा सिग्नल आला का?

तुझा मोबाईल? प्रश्नार्थक मुद्रेने अँजेनीने विचारले.

जॉनने डोळ्‌याने इशारा करून अँजेनीच्या पलिकडे सिटवर ठेवलेला त्याचा ओवरकोट दाखविला. अँजेनीने ओवरकोट उचलून आपल्या हातात घेतला. ओवरकोटच्या खिशातला मोबाईल काढून तिने त्याचा डिस्प्ले बघितला. मोबाईलचा सिग्नल अगदी पूर्णपणे आला होता.

सिग्नल तर आला आहे... थांब मी त्याला ट्राय करते

अँजेनी ॲलेक्सचा फोन ट्राय करू लागली. तिने आपल्या चवळीच्या शेंगासारख्या नाजूक बोटांनी काही बटनं दाबून मोबाईल आपल्या कानाला लावला. जॉन उत्कंठतेने मधेच एखादी नजर तिच्यावर फिरवीत होता.

तिने कानाला लावलेला मोबाईल काढून रिडायल केले.

काय झालं? जॉनने उत्कंठतेने विचारले.

मोबाईल स्वीच अॉफ केलेला आहे असा मेसेज येतोय तिने पुन्हा मोबाईल कानाला लावत म्हटले.

थोड्या वेळाने तिने पुन्हा रिडायल केले पण तोच मेसेज पुन्हा पुन्हा येत होता.

त्याने मोबाईल बंद केलेला दिसतो मोबाईल जॉनजवळ देत ती म्हणाली.

जॉननेसुध्दा एकदादोनदा प्रयत्न करून बघितला. पण व्यर्थ.

मला वाटते त्याने मोबाईल मुद्दामच बंद करून ठेवला असावा जॉन मोबाईल त्याच्या खिशात ठेवत म्हणाला.

मुद्दाम, पण का? अँजेनीने उत्सुकतेने विचारले.

मोबाईल संभााण टॅप होण्याची कदाचित त्याला भीती असावी जॉनने शक्यता वर्तवली.

आता त्याला भेटल्याशिवाय खरं काय ते कळणार नाही असं दिसतं अँजेनी म्हणाली.

जॉन काहीही न बोलता पुन्हा सरळ समोर रस्त्यावर बघून ड्रायव्हींग करू लागला. अँजेनीसुध्दा समोर बघता बघता तिच्या विचारात पुन्हा गढून गेली.

ठोका चूकला

जॉनने डिटेक्टीव ॲलेक्सच्या दाराची बेल वाजवली. आतून पुसटसा आवाज आला—

डिंग डाँग

जॉन दार उघडण्याची वाट पाहत उभा राहिला. जॉनने वेळ घालविण्यासाठी सभोवार एक नजर फिरविली.

....ॲलेक्स घरी एकटाच राहत होता. जॉनची आणि ॲलेक्सची मैत्री बरीच जुनी होती. घरासमोरील बागेची ॲलेक्स विशेा काळजी घेत नसावा असं जाणवत होतं. जेव्हा ॲलेक्सची बायको हयात होती तेव्हा तिनेच ही बाग मोठया हौसेने आणि मेहनीतीने जोपासली होती. जवळपास पाच र्वाापूर्वी ॲलेक्सच्या बायकोचा मृत्यू एका दुर्घटनेत झाला होता. तेव्हापासून समोरच्या बागेची काळजी कुणीही घेत नव्हतं. अधून मधून तिथला चौकीदारच मजूरांना लावून त्या बागेला थोडंफार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते काही नियमित होत नसे. त्यामुळे ती बाग भयाण आणि रूक्ष अशी दिसत होती. अगदी ॲलेक्ससारखी...

बेल वाजवून बराच वेळ झाला होता. तरी अजूनही ॲलेक्सनं दार कसं उघडलं नाही ?...

जॉननं पुन्हा एकदा दोनदा बेल वाजवली. दार जोरजोराने ठोठावलं आणि पुन्हा दार उघडण्याची वाट पाहू लागला.

...ॲलेक्सच्या पत्नीच्या मृत्यूनंतर याच्या व्यक्तीमत्वातसुध्दा खूपच बदल झाला होता. तेव्हापासून ॲलेक्सचं मित्रांसोबत हसणं खिदळणं जवळजवळ एकदम बंदच झालं होतं. अचानक त्याच्यात प्रौढत्व आणि पोक्तपणा आल्यासारखा वाटत होता. स्वभावानेसुध्दा तो एकलकोंडा झाला होता. त्यातच आई वडील आणि मूलबाळही नसल्यामुळे तो अजूनच बेफिकीर झाला होता. त्याची बायको होती तीच त्याची सर्वस्व होती आणि ती गेल्यापासून तो जो एकटा झाला तो अजूनही एकटंच राहणं त्याला आवडत होतं. त्याचं कामही तसं रात्रीच्या अंधाराशी जास्तीत जास्त संबंधित होतं. पण आता त्याची त्या अंधाराशी घट्ट मैत्री झाली होती. त्याचं जीवन तेव्हापासून जे नीरस झालं होतं ते त्याच्या जीवनात कुण्याही स्त्रीला येण्यासाठी त्याने काही वावच ठेवला नव्हता...

अजूनही ॲलेक्सच्या घराचं दार उघडलं नव्हतं...

आता मात्र जॉनला काळजी वाटायला लागली होती. त्याने पुन्हा जोरजोराने दार ठोठावलं.

ॲलेक्स जॉनने जोरात हाक दिली.

आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती.

जॉन आता ॲलेक्सच्या घराच्या बाजूने मागे जायला लागला. मागे जाता जाता त्याने बाजूच्या खिडकीतूनही डोकावून आणि ठोठावून पाहिले. पण काहीच प्रतिसाद नव्हता. तो घराच्या मागे जावून पोहोचला. मागचं दार सताड उघडं होतं. जॉननं पुन्हा ॲलेक्सला उघड्या दारातून हाक दिली. तरीही काहीच प्रतिसाद नव्हता. आवज फक्त घरात घुमला. आत पूर्णपणे अंधार होता. जॉन हळू हळू आत जायला लागला. आता मात्र जॉनच्या डोक्यात वेगवेगळ्‌या शंका घर करायला लागल्या होत्या.

काय झालं असेल?...

काही दगा फटका तर नाही झाला ना?...

त्याच्या श्वासांची गती विचलित व्हायला लागली होती. नकळत त्याचा हात त्याच्या कंबरेला लावलेल्या बंदुकीकडे गेला. त्याने बंदूक काढली. बंदूक इकडे तिकडे रोखत तो परिस्थितीचा कानोसा घेत आत जाऊ लागला. घरात सगळीकडे वस्तू इतस्ततरू पडलेल्या होत्या.

तशीही ॲलेक्सला वस्तू व्यवस्थित ठेवण्याची सवय नव्हती...

कशीतरी त्याला रागावून, दाटून त्याची बायको त्याला व्यवस्थितपणा शिकविण्याचा प्रयत्न करायची...

पण ॲलेक्सची बायको गेल्यापासून घराची रयाच गेली होती...

बेडरूमध्ये जाताच जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला. बेडरूममध्ये ॲलेक्स बेडवर आडवा पडलेला होता. घाईघाईने जॉन त्याच्या जवळ गेला.

अलेक्स... त्याने त्याला हलवून बघितले.

शरीरात काहीच हालचाल नव्हती. त्याने त्याची नाडी तपासून बघितली. त्याची नाडी केव्हाच बंद पडलेली होती. जॉनने घाईघाईने आपला मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घातला. पण व्हायब्रेट होणारा मोबाईल त्याच्या हातात आला. त्याने मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. त्याला त्याचा सहकारी सॅमचा फोन आला होता. त्याने मोबाईलचे एक बटन दाबून तो अटेंड केला.

हं सॅम

सर एक वाईट बातमी आहे ...सर खुन्याने चौथासुध्दा खून केलेला आहे... तिकडून सॅम म्हणाला.

काय ? अनायसेच जॉनच्या तोंडून निघाले.

नियोल वॅग्नर .. नॉर्थ स्ट्रीट, 2024.... याचा पण तशाच तर्‌हेने खून झाला आहे सॅमने माहिती दिली.

अचानक मेडीयाशी सामना

जॉन नार्थ स्ट्रीटला नियोलच्या अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी आपल्या गाडीतून उतरला, तोच त्याला चारही बाजूने प्रेसने घेरले.

मि. जॉन.... तुम्ही तर म्हणाला होता की खुनी मेला आहे ...आणि केस संपलेली आहे.

एक पत्रकार गर्दीतून आपला कॅमेरा सांभाळत अचानक जॉनच्या पुढे येऊन ठाकला. गर्दीतून वाट काढून जॉनच्या समोर पोहोचेपयंर्ंत त्याचे सगळे कपडे आणि केस विस्कटलेले होते.

जॉनच्या मागे आणि बाजूला बाकीचे पत्रकार घेराव करून उभे होते. तो एकदम समोर येऊन ठाकल्यामुळे जॉनला समोर जाण्याचा रस्ता सुध्दा बंद झाला होता. आता त्या पत्रकाराला काहीतरी उत्तर देऊन त्याची कशीतरी बोळवण करणे भाग होते. काय बोलावे जॉनला काही सुचत नव्हते.

लेट मी र्फस्ट इनव्हेस्टीगेट द केस ... असं म्हणज जॉनने त्याला बाजूला सारले आणि पुढे जाऊ लागला.

मागून तो पत्रकार ओरडला —

सर यू कान्ट जस्ट इग्नोर अस धिस वे

यू हॅव टू ॲन्सर अस दुसरा एकजण ओरडला.

यस ... यस बाकीचे पत्रकारसुध्दा ओरडून साथ देत होते.

त्याच्या मागे सर्व पत्रकार संतापाने ओरडून गोंधळ घालत होते. जॉन ब्रेक लागल्यागत थांबला. त्याने वळून बघितले. त्याला सगळे पत्रकार जणू खायला टपले होते असे वाटत होते. जॉनचा चेहरा पडला. त्याला कळत होते की चूक पोलीसांची होती.

आता यांना काहीतरी बोलून समजावणे आवश्यक आहे...

कॅमेर्‌यांचे फ्लॅश त्याच्यावर चमकत होते. कॅमेर्‌यांच्या फ्लॅशमुळे तो अजूनच गोंधळला. बाकीचे पोलीस मोठया मुश्कीलीने त्या पत्रकारांना मागे थोपवून साखळी करून उभे होते.

या इनव्हेस्टीगेशननंतर संध्याकाळी मी प्रेस कॉन्फरंस घेणार आहे ... त्यात मी सविस्तर सगळं काही सांगेन जॉन कसाबसा बोलला आणि वळून वेगाने चालत अपार्टमेंटमध्ये शिरला.

पत्रकार तेवढ्या वेळेपुरते तरी शांत झाले होते. जॉनला स्वतरूचेच आश्चर्य वाटत होते.

तो कसा बोलला त्याचे त्यालाच कळत नव्हते...

तो प्रेस कॉन्फरंसबद्दल बोलला खरा पण प्रेस कॉन्फरंसमध्ये तो काय बोलणार होता?...

चला आता तर ब्यॅद टळली. संध्याकाळचे संध्याकाळी बघू...

असा विचार करून तो लिफ्टमध्ये चढला. लिफ्ट बंद झाली. त्याने लिफ्टमध्ये रांगेत असलेल्या बटनांपैकी शोधून 10 नंबरचे बटन दाबले.

शून्याचा शोध कुणी लावला?

लिफ्टमधून बाहेर येऊन जॉन फ्लॅट क्रमांक 3 कडे जाऊ लागला. फ्लॅटच्या उघड्या दाराभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. काही रिपोर्टरसुध्दा तिथे मधे मधे करत होते. तिथे बाहेर दरवाजाजवळ उभे असलेले पोलीस आळसावलेले दिसत होते. जॉनला बघताच ते आळसावलेले पोलीस सतर्क झाले. ते उगीच बघ्यांच्या गर्दीला आणि तिथे घुसलेल्या रिपोर्टरांना रागावून तिथून हाकलून देवू लागले. जॉनला बघताच ते रिपोर्टर जॉनला सामोरे येऊन त्याला अडवून उभे राहिले. तिथे उभ्या असलेल्या आणि जॉनच्या मागे मागे आलेल्या पोलिसांनी त्यांना जवळजवळ पकडूनच बाजूला केले. जॉन तडक आत गेला.

आत हॉलमध्ये तपासपथक आपल्या कामात मग्न होतं. जॉन त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत बेडरूमकडे वळला. बेडरूममध्ये सॅम होता. जॉनला बघताच तो जॉनच्या पुढ्यात आला.

साला काहीच पत्ता लागत नाहीये सॅम जॉनला काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

आपल्या डिपार्टमध्येच तडा गेलेला असेल तर काय पत्ता लागणार आहे जॉनने रागाने टोमणा हाणला.

जॉनचा मूड पाहून सॅमने चूप राहणेच योग्य समजले.

बेडरूममध्ये फरशीवर रक्ताच्या थारोळ्‌यात नियोल वॅग्नरचा देह पडलेला होता. नियोल पंचविशीतला चांगला भारदस्त व्यक्तीमत्व असलेला तरुण होता. तो फ्लॅटमध्ये एकटाच राहत असावा. म्हणजे फ्लॅटमधल्या सामानावरून आणि अजून त्याची दखल घ्यायला कोणी आले नव्हते, त्यावरून तरी तसेच वाटत होते. नियोलच्या पोटावरून ओघळून फरशीवर रक्ताचा डोह साचून थिजला होता. पलीकडून पाठीखालून एक रक्ताचा ओघळ बाहेर आला होता. नियोलच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीची निशाणी तर होतीच सोबत त्याला चाकूने चांगलेच जबर जागोजागी भोसकलेले होते. नियोलचे तोंड अर्धवट उघड्या स्थितीत, मान एकीकडे वाकडी झालेल्या स्थितीत पडलेले होते. जीव जाण्याच्या आधी त्याने प्राणांतिक तडफड केली असावी. त्याच्या अंगात नेहमीचेच बाहेर किंवा अॉफीसमध्ये जायचेच कपडे होते.

खुनी त्याच्या मागोमाग घरात घुसला असावा...

असावा म्हणजे ह्या सगळ्‌या शक्यताच!...

खोलीतलं, नियोलच्या अंगावरचं, खिशातलं सगळं सामान जसंच्या तसं होतं.

सगळं म्हणजे जे किमती होतं ते तरी....

बाकीचं काही खुन्यानं नेलं असावं की नसावं याचा काहीच पत्ता लागत नव्हता. जॉनला आत्तापयंर्ंतच्या अनुभवावरून समजलं होतं की काही काही खुनी सगळ्‌याच किमती वस्तू नेत नाहीत. काही किमती वस्तू मुद्दाम पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून तशाच ठेवतात. त्यातल्या त्यात नियोल एकटाच असल्यामुळं खुन्याने काय नेलं अन काय ठेवलं समजायला काही मार्ग नव्हता.

नियोलवरून हटून जॉनची नजर समोर रक्ताने भरलेल्या ...नव्हे भरविलेल्या भिंतीकडे गेली.

पुन्हा तेच...

रक्ताने काढलेले एक मोठे शून्य... शून्यच ते...

आणि त्या शून्यात तो खुनी दडलेला होता...

पण शून्य म्हणजे तर काहीच नाही ...

मग त्यात तो कसा दडलेला असेल?...

शून्याच्या मध्ये रक्ताने लिहिलेले होते

शून्याचा शोध कुणी लावला?

मग या प्रश्नात नक्कीच खुनी दडलेला असावा...

जॉन विचार करू लागला.

जॉनला आता हा गुंता सोडवण्याची फारच निकड भासू लागली.

तो बोलून तर बसला होता की श्संध्याकाळी प्रेस कॉन्फरंसमध्ये तो सगळं सांगेनश् म्हणून.

पण सध्यातरी त्याच्याजवळ सांगण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे संध्याकाळपयंर्ंत तरी खुन्याचा शोध लागायलाच हवा होता.

पुन्हा प्रेस कॉन्फरन्स

जॉन त्याच्या बॉसच्या कॅबिनमध्ये त्याच्या समोर बसला होता. कॅबिनमध्ये ते दोघेच होते. बराच वेळ दोघांच्या मध्ये एक अनैसर्गिक शांतता पसरली होती.

अलेक्सचा पण पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे जॉन एका फाईलमधले काही कागद काढत म्हणाला.

जॉनचा बॉस मागे खुर्चीवर रेलून सिगार पीत शांतपणे जॉनचं म्हणणं ऐकून घेत होता.

मृत्यूचं काहीही कारण दिसत नाही जॉन म्हणाला.

त्याच्या बॉसनं तोंडातली सिगार काढून तिची राख ॲश ट्रे मध्ये झटकली.

पण मला खात्री आहे की त्याला इन्शुलिनचा ओवरडोज देऊन मारलं असावं... इन्शुलीनच्या ओवरडोजनं असंच होतं. पोस्टमार्टममध्ये मृत्यूचं काहीच कारण सापडत नाही आणि सिध्दही करता येत नाही... कधी कधी तर तो खून आहे की नैसर्गिक मृत्यू अशीही शंका यायला लागते जॉन म्हणाला.

जॉनचा बॉस खुर्चीवरून उठला आणि पाठमोरा सिगार पीत खिडकीतून बाहेर पाहू लागला. मग मागं वळून तो जॉनला म्हणाला,

हे बघ जॉन आपण इथे नियोलच्या खुनासंदर्भात चर्चा करायला बसलो आहोत. तू मधेच हे उपटसुंभ अलेक्सचं काय घेऊन बसलास

कारण त्याचासुध्दा या खुनाशी संबंध आहे जॉन खंबीरतेने म्हणाला.

त्याचा या खुनाशी संबंध? तुला वेडबिड लागलं की काय? तो ॲलेक्स साला कशानं मेला काहीच पत्ता नाही... अन तू याचा अन त्याचा संबंध जोडतोस बॉस चिडून म्हणाला.

संबंध आहे म्हणून जोडतो आहे जॉन आवाज चढवून म्हणाला

ॲलेक्सला बहुतेक त्या खुन्याचा पत्ता लागला होता... म्हणून त्या खुन्यानं अलेक्सलाच खतम करून टाकलं

तेवढ्यात आत एक शिपाई आला. शिपायाच्या चाहूलीने दोघांमधील संवाद भंग पावला. दोघांनीही त्या शिपायाकडे बघितलं. शिपायाने बॉसच्या कानाशी वाकून सांगितलं,

साहेब , बाहेर पत्रकारांनी गर्दी केली आहे

शिपायानं निरोप दिला आणि तो बाहेर निघून गेला.

पत्रकार यावेळी ? यांचं काय डोकं बिकं फिरलं की काय?.. जॉनचा बॉस आश्चर्यानं म्हणाला.

साले जिथं पहा तिथं जमा होतात...यांना फक्त बातम्या हव्या असतात...कोण मेलं कशानं मेलं ... कशाचं काही सोयरसुतक नसतं यांना बॉस चिडून म्हणाला.

मीच संध्याकाळी पत्रकार परिाद आहे असं जाहिर केलं होतं जॉन म्हणाला.

पत्रकार परिाद? तू जाहिर केलंस ?...आता हे म्हणजे स्वतरूच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आधीच सगळे लोक आणि सगळी मिडीया खवळलेली आहे. आता ते आपल्याला कच्चे चावून खातील. तुला कुणी सांगितलं होतं हा शहाणपणा करायला?

आता मात्र बॉस जॉनवर जाम भडकला होता.

सर सकाळी त्यांना टाळण्यासाठी माझ्या तोंडून निघालं जॉन कसाबसा सावरत म्हणाला.

तोंडून निघालं? म्हणजे चुका तुम्ही करत जा आणि निस्तरत मात्र आम्ही बसायचं बॉस कडाडला.

सर ...मागे मी म्हणालो होतो तसं जर तुम्ही ऐकलं असतंत तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती... आता मात्र जॉनचं धैर्य सुटायला लागलं होतं.

तुला काय वाटतं? मागे तुझं जर ऐकलं असतं तर...तर ही वेळ जी आता आली आहे ती तेव्हाच आली असती. तू तपासात ऐवढा विलंब लावला होतास त्यावर मी पांघरूण घालायचा प्रयत्न केला. तुला मी अॉप्शन दिलं होतं. लवकरात लवकर तपास लावा किंवा होत नाही असं सांगून दुसर्‌याला तरी करू द्या.

जॉनला काय बोलावं काही सुचेनासं झालं.

जॉन थोडा नरम होऊन म्हणाला पण आता यांना काय सांगायचं?

त्याची तू काळजी करू नकोस. सगळं मी सांभाळून घेईन बॉसनं सुध्दा सरड्यासारखं रंग बदलून जॉनला धीर देण्याच्या आविर्भावात म्हटले.

जॉनला त्यातल्या त्यात बरं वाटलं.

बॉसने सिगार समोरच्या ॲश ट्रेमध्ये चुरगाळून विझवली आणि खुर्चीवरून उठत म्हणाला चल

बॉस उठून उघड्या दरवाज्यातून श्खाट खाटश् बुटाचे आवाज करीत बाहेर पडला आणि त्याच्या मागे जॉन चूपचाप चालायला लागला.

क्रमशरू

एका दगडात दोन पक्षी

जॉनचा बॉस आणि जॉन पत्रकारांना सामोरे गेले, तोच पत्रकारांची झुंबड च्या झुंबड त्यांच्या दिशेनं आली.

विजा चमकल्यासारखे कॅमेर्‌यांचे फ्लॅश त्यांच्या चेहर्‌यावर पडू लागले. तिथे तैनात असलेल्या पोलिसांना हाताचं कड करून पत्रकारांना थोपविण्याचं काम करावं लागत होतं. तरीही मागे सगळीकडे गोंधळ चालू होता.

क्वायट प्लीज बॉसचा करडा आवाज घुमला.

सगळीकडे शांतता पसरली. तरीही काही पत्रकारांची समोर घुसण्यासाठी चुळबूळ सुरू होतीच. बॉसने आत्मविश्वासाने सभोवार एक नजर फिरविली.

यस्स बासने पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी इशारा केला.

समोर असलेल्या पत्रकारांची एकच झुंबड उडाली. बॉसला नुसता गोंगाट झाल्यासारखा आवाज आला. कोण काय विचारत होतं काहीच कळत नव्हतं.

आय वुईल इन्शोर दॅट दी लास्ट पर्सन इज अॉल्सो ॲन्सर्ड... वन बाय वन प्लीज बॉस शांततेने म्हणाला.

जॉनने आश्चर्याने बॉसकडे पाहिले. त्याला त्याच्या निर्धास्ततेचं आश्चर्य वाटत होतं.

तुमचा तो खुनी मेला होता ना, मग आता काय पुन्हा जिवंत झाला? एक पत्रकाराने आवेशाने आणि तिरस्काराने विचारले.

पोलीस खातं इतकी घोर जनतेची दिशाभूल करील अशी अपेक्षा नव्हती दुसरा म्हणाला.

एवढं होऊनही बेशरमासारखी जनतेला तोंड देण्याची बरी तुमची हिम्मत होते तिसरा अगदीच चिडून म्हणाला.

माईंंड यूवर लँगवेज बॉस कडाडला.

बॉसनं एकदम पावित्रा बदलला होता. जॉनसुध्दा एक क्षण दचकलाच. पोलिसांची पडती बाजू असूनही बॉस असा कसा वागू शकतो याचं जॉनला आश्चर्य वाटत होतं.

सगळीकडे शांतता पसरली.

हे बघा, मागे आमची चूक झाली मी मान्य करतो. खुनी एकापेक्षा जास्त असू शकतात हे आम्ही गृहीतच धरलं नाही बॉस एकदमच हीन दीन होऊन बोलू लागला.

बॉसची ही स्टाईलच होती. प्रथम एकदमच अंगावर चढायचं आणि दुसर्‌याच क्षणी एकदम शेळी होऊन मान टाकायची. त्यामुळं आधी तर समोरचा माणूस हादरून जातो आणि नंतर गोंधळून जातो. तसंच झालं. सुरवातीला सगळे पत्रकार हादरून एकदम शांत झाले आणि दुसर्‌या क्षणीच गोंधळून गेले. इतके की त्यांना बॉसची दया आणि कीव यायला लागली. पण ते शेवटी हाडाचे पत्रकार होते. बॉसच्या डिपार्टमेंटचे कुणी त्यांच्या हाताखालचे मिंधे पदाधिकारी नव्हते. लवकरच ते सावरले आणि त्यांनी बॉसवर पुन्हा हल्ला चढवला.

तुम्ही जनतेचे रक्षक, जनतेचे कैवारी. तुमच्यावर जनतेची जबाबदारी. तुम्ही माफी मागून असे हात झटकून मोकळे होवू शकत नाही

आणि आता तरी केसची काय प्रगती आहे? की जिथून सुरू झाली होती तिथंच कुणीतरी बोललं.

शून्य गोल असल्यासारखी कुणीतरी शेपूट जोडली.

थोडी टवाळी टिंगल केल्यासारखी खसखस पिकली.

तुम्हाला असं माफी मागून गप्प बसता येणार नाही. तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यायलाच पाहिजे

बॉसला बोलण्यासाठी कुणी चान्सच देत नव्हता.

ती पण आत्ता या सगळ्‌यांच्या समोर तुम्हाला जाहिर करायला पाहिजे

हो हो आत्ता या सगळ्‌यांसमोर बरेचजण एकसुरात बोलले.

आता मात्र बॉसला घाम फुटला. समोरचे पत्रकार हातघाईवर आले होते. बॉसची ट्रीक काही चालली नव्हती. किंबहुना तितक्याच जोरात त्यांच्या अंगावर बूमरँगसारखी उलटली होती.

जस्ट अ मिनिट प्लीज बॉसनं हात वर करून लोकांना शांत व्हायला सांगितलं.

पत्रकार थोडे शांत झाले.

मी माझा ॲक्शन प्लॅन तुमच्या समोर जाहिर करणार आहे

बॉसला अर्ध्‌यात तोडून काही जण ओरडले.

आत्ता इथे आधीसारखी चालढकल चालणार नाही

बॉसची आता चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी गत झाली होती.

हो... हो आत्ता इथेच मी माझा ॲक्शन प्लॅन सांगणार आहे बॉस नरमलेल्या आवाजात आपल्या चेहर्‌यावरचा घाम पुसत म्हणाला.

मग मात्र समोरचे पत्रकार एकदम शांत झाले — बॉसचा ॲक्शन प्लॅन आहे तरी काय हे ऐकण्यासाठी. सगळ्‌या पत्रकारांनी आपले मायक्रोफोन्स शक्य होतील तेवढे समोर घुसविले.

नंबर एक. पोलीस हे जनतेचे कैवारी असतात आणि जनतेचा त्यांच्यावर पूर्णतरू विश्वास असतो. जनतेच्या त्यांच्यावरच्या विश्वासावर तडा जाता कामा नये म्हणून पोलिसांना नुसती चूक झाली असं कबूल करून चालणार नाही. त्यासाठी त्यांना मोठयात मोठी सजा ही मिळालीच पाहिजे की जेणेकरून ते अशी चूक पुन्हा करण्याची गफलत आणि हिम्मत करणार नाहीत

जॉनने गोंधळून बॉसकडे पाहिले. बॉस पोलिसांच्याच विरोधात बोलत होता.

आपली ऐकण्यात काही चूक तर होत नाही ना...

किंवा बॉसची बोलण्यात काहीतरी चूक होत असली पाहिजे...

आणि म्हणूनच मी या क्षणी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे

आपला निर्णय सांगण्यापूर्वी बॉसने मुद्दाम एक मोठा पॉज घेतला की जेणेकरून त्याच्या निर्णयाने त्याला जो परिणाम साधायचा होता तो साधला गेला पाहिजे. सगळीकडे शांतता पसरली.

आणि माझा निर्णय हा आहे की ज्यांच्यामुळे चूक झाली आहे त्यांना ताबडतोब सजा देण्यात यावी. त्यासाठी प्रथम एक समिती बसविण्यात येणार आहे. ती समिती या सगळ्‌या गफलतींचा कसून तपास करील आणि ज्यांच्यामुळे ही चूक झाली त्या अॉफीसरला या समितीचा निकाल येईयंर्ंत बडतर्फ केल्याचं मी जाहिर करीत आहे

जॉनला उभ्या उभ्या धरणीकंपाचा धक्का बसल्यासारखं झालं. जॉन आश्चर्याने त्याच्या बॉसकडे पाहू लागला. पण बॉसचं लक्ष त्याच्याकडे नव्हतंच!

आणि त्या अॉफीसरच्या जागी तोपयंर्ंत तपासासाठी ताबडतोब मी दुसरा योग्य अधिकारी नेमत आहे

जॉन त्याच्या बॉसचं हे रूप प्रथमच पाहत होता. तो अजूनही आश्चर्याने बॉसकडेच बघत होता. अचानक जॉनच्या आश्चर्याने बॉसकडे पाहणार्‌या चेहर्‌यावर कॅमेर्‌यांचे फ्लॅश चमकायला लागले. आता पत्रकारांचा मोर्चा जॉनकडे वळला होता. बॉसने या संधीचा फायदा घेतला. पत्रकारांचं लक्ष जॉनवर केंद्रीत झाल्याचं पाहून त्याने हळूच तिथून काढता पाय घेतला.

आय एम सॉरी बॉस

पत्रकारांच्या गोतावळ्‌यातून जो सुटला तो खाड खाड बुटांचा आवाज करीत आपल्या कॅबीनकडे निघाला. जॉनही पत्रकारांना टाळत गर्दीतून बाहेर आला आणि बॉसच्या मागे निघाला.

बॉस असा कसा विश्वासघात करू शकतो...

मागेसुध्दा एकदा सगळं बॉसनंच पत्रकारांसमोर जाहिर केलं होतं. त्यात जॉनचा काडीचाही हात नव्हता...

किंबहुना बॉसनंच जॉनला जवळ जवळ जबरदस्ती सुटीवर पाठविलं होतं...

जॉनला बॉसचा राग आला होता.

प्रत्येक वेळी बॉसनं डिक्टेटरशीपने वागायचं आणि काही चुकलंच तर कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं...

जॉनलाच काय हे कुणालाही पटण्यासारखं नव्हतं. जॉन घाईघाईने बॉसच्या मागे जायला लागला. त्याला बॉसला जाब विचारायचा होता.

बॉस त्याच्या कॅबिनजवळ येऊन पोहोचला. जॉन बॉसच्या मागेच होता. बॉसला जॉनची चाहूल लागली असावी किंवा त्याने जॉन त्याच्या मागे येईल हे गृहीत धरले असावे. कॅबिनमध्ये घुसायच्या आधी अचानक ब्रेक लागल्यागत बॉस एकदम थांबला. त्याच्या मागे जॉनसुध्दा थांबला. बॉस मागे वळून हळू हळू जॉनजवळ येऊ लागला. जॉनच्या अगदी पुढ्यात येऊन तो थांबला. आता तो जॉनसमोर कडकपणे उभा राहून त्याच्या डोळ्‌यांशी डोळे भिडवून पाहू लागला. जॉन अजूनही रागातच होता. तो सुध्दा रागाने बॉसच्या डोळ्‌यांशी डोळे भिडवीत उभा राहिला.

असा काय उध्दटपणे पाहतोस? मला काय खाणार आहेस की काय? बॉस जॉनवर ओरडला.

बॉस आपली नेहमीची ट्रीक आजमावत होता. पण यावेळी जॉन हादरला नव्हता.

मग अगदीच शेळी होऊन बॉसनं जॉनच्या खांद्यावर आपला धीराचा हात ठेवला.

आय ॲम सॉरी जॉन. वेळच अशी होती की माझा काहीच इलाज चालला नाही

यावेळी जॉन गोंधळलासुध्दा नाही. तो अजूनही बॉसच्या डोळ्‌यांशी डोळे भिडवून एकटक पाहत होता. बॉसला आपली ट्रीक वाया गेलेली दिसत होती.

आय ॲम रिअली सॉरी बासॅनं जॉनच्या खांद्यावर थोपटत हात मागे घेतला.

बॉस एकदम गर्रकन वळून पुन्हा खाट खाट असा बुटांचा आवाज करीत कॅबिनमध्ये घुसला. बॉसनं एका दगडात दोन पक्षी मारले होते. पोलीस खात्याची पत वाचविली होती आणि जॉनचा काटाही काढला होता.

गुगल सर्च

एकदम हताश, निराश, म्लान चेहर्‌याने जॉन ॲँजेलीच्या समोर बसला होता.

साला ब्लडी बॉस. त्यानं मला दगा दिला जॉन रागाने टेबलावर आपली आवळलेली बंद मूठ आपटत म्हणाला.

ॲँजेली उठून जॉनच्या जवळ गेली आणि प्रेमाने ती त्याच्या केसातून आपला हात फिरवू लागली.

असं वाटलं बंदूक सरेंडर करण्याच्या अगोदर बंदुकीची नळी त्याच्या कानशिलात ठेवावी आणि सगळ्‌याच्या सगळ्‌या गोळ्‌या द्याव्या उतरवून त्याच्या मस्तकात जॉन पुन्हा रागाने म्हणाला.

ॲँजेलीने त्याच्या डोक्यातून आपला हात काढून घेतला.

ती त्याच्या समोर उभी राहून समजावण्याच्या सुरात म्हणाली,

हे बघ जॉन, बॉसवर चिडून काही उपयोग होणार आहे का? बॉसनं जे काही केलं ते आपली चमडी वाचवण्यासाठी. त्याच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी कदाचित त्यानंही असंच काहीतरी केलं असतं

नाही ... त्याचा आधीपासूनच माझ्यावर राग होता. तो कधी ना कधी मला असा दगा देणारच होता जॉन तिचे बोलणे तोडत म्हणाला.

पण बॉसनं आपल्याला दगा दिला आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हा मुद्दा आता तितकासा महत्वाचा नाहीये

जॉननं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.

तू तुझ्यावर लादलेले आरोप कसे धूवून काढू शकतोस हे सध्या जास्त महत्वाचं आहे

माझ्यावर लादलेले आरोप मी कसे धूवून काढणार ? जॉन निराशेने म्हणाला.

तुझ्यावर लादलेलेे आरोप खोडून काढण्याचा एकच मार्ग आहे

जॉननं पुन्हा तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.

... आणि तो म्हणजे त्या खुन्याला पकडणे तिने त्याला आशेचा किरण दाखविण्याचा प्रयत्न करीत म्हटले.

पण ते आता कसं शक्य आहे ? माझ्याकडचे सगळे अधिकार , शस्त्र त्यांनी काढून घेतलेले आहेत. आता जरी मी प्रयत्न केला तरीही तो एखाद्या पंख कापलेल्या पक्षाने आकाशांत उंच भरारी घेण्याच्या निरर्थक प्रयत्नासारखे होईल

नाही. असं एकदम हताश होऊन चालणार नाही. आता काम मोठं जोखमीचं झालं आहे खरं पण तुझ्याजवळही जोखिम पत्करण्यावाचून दुसरा मार्ग नाही

जॉन खुर्चीतून उठला. तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याला खिडकीबाहेरचे रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या लाईट्‌समुळे चमकणारे गोल तळ्‌यातले पाणी दिसले.

अगदी शांत. ना प्रवाह ना खळखळ...

अगदी गुदमरल्यासारखे वाटत होते ते पाणी...

कसे त्या पाण्याला तळ्‌याने चहू बाजूने बंदिस्त केले होते...

त्याला जाणवत होते की कदाचित त्याचीही अवस्था त्या तळ्‌यातल्या पाण्यासारखीच झाली होती...

तो गोल तळ्‌याचा बंदिस्त काठ पाहून पुन्हा त्याला झीरोची आठवण आली. तो स्तब्ध बराच वेळ त्या तळ्‌याकडे निरखून पाहत उभा राहिला. मग शांतपणे वळून हळूच तो अँजेनीजवळ येऊन उभा राहिला. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेल्यावर त्याने अँजेनीला एक प्रश्न विचारला,

झीरोचा शोध कुणी लावला हे तुला माहित आहे का?

या असंबंध अचानक प्रश्नाने अँजेनी गोंधळून म्हणाली नाही... पण का?

जॉन परत खिडकीच्या जवळ गेला. विचारात गढून जावून पुन्हा तो खिडकीच्या बाहेर बघू लागला. मग बेचौन होऊन तो खोलीत येरझारा घालू लागला.

अँजेनी त्याच्या डोक्यात काय चालले असावे हे समजण्याचा प्रयत्न करीत त्याच्याकडे पाहू लागली. पण अँजेनीला त्याच्या विचाराचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता.

अचानक थांबून कॉम्प्यूटरकडे निर्देश करीत तो म्हणाला,

अँजी, जरा तो कॉम्प्यूटर सुरू करतेस का?

कॉम्प्यूटर कशाला? अँजेनीने विचारले.

तो काहीच बोलला नाही. पुन्हा बेचौनीने खोलीत येरझारा घालायला लागला. अँजेनी कॉम्प्यूटरपाशी गेली आणि तिने कॉम्प्यूटर सुरू केला.

जॉन आपल्या येरझारा थांबवून तिच्याजवळ येऊन कॉम्प्यूटरसमोर बसला आणि कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहू लागला. अँजेनी मॉनिटरकडे पाहत कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहू लागली.

कॉम्प्यूटर बूट होताच एकदम शांत असलेला जॉन अचानक क्रियाशील झाला. जॉन पटापट कीबोर्डची बटनं आणि माऊसची बटनं दाबू लागला. अँजेनी त्याच्याशी काहीही न बोलता शांत राहणंच योग्य आहे हे समजली. ती कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर तो काय करीत आहे हे पहायला लागली.

जॉनने आधी इंटरनेट कनेक्ट केलं. मग ब्राऊजरवर डबल क्लीक केलं.

ब्राऊजर ओपन होताच त्याने ब्राऊजरच्या श्ॲडेसश् च्या जागी टाईप केले

गुगल डॉट कॉम

गुगल सर्च इंजीनची साईट ओपन झाली.

गुगलला त्याने सर्च स्ट्रींग टाईप केली

झीरो इन्व्हेन्शन

अँजेनीला जॉनच्या डोक्यात काय चालले होते त्याची आता पुरेपूर कल्पना यायला लागली होती.

हं, मलाही वाटते.... शून्याचा शोध कुणी लावला? या प्रश्नातच खुनी कोण आहे? आणि तो खून का करतो आहे? याचं उत्तर दडलं असावं ं अँजेनी उत्साहानं म्हणाली.

जॉनचं भराभर की बोर्ड आणि माऊसची बटनं दाबणं सुरूच होतं. की बोर्डच्या आणि माऊसच्या बटनांच्या आवाजानं तिला उचंबळून आलं. नेहमी सानी असा कॉम्प्यूटरवर बसून काम करत असला आणि असाच की बोर्डचा आणि माऊसचा आवाज येत असला तर तिचं ऊर प्रेमाने भरून यायचं...

तशाच भावना तिला जॉनबद्दलसुध्दा वाटायला लागल्या होत्या...

चला एक तरी बरं झालं. जॉन नवीन उत्साहानं कामाला लागला...

तिला फार बरं वाटत होतं.

तू तुझं चालू दे. मी मस्तपैकी गरमागरम कॉफी घेऊन येते असं म्हणत अँजेनी किचनमध्ये गेली.

यस्स

अँजेनी कॉफी घेऊन आली. जॉन अजूनही काम्प्यूटरवर गढून गेलेला होता. तिने एक कॉफीचा कप हळूच त्याला डिस्टर्ब न करता त्याच्या पुढ्यात ठेवला.

तिच्या हातातल्या कपातून एक घोट घेत ती म्हणाली , काय काही मिळतय का?

तिचा त्याला बोलण्यात दुहेरी उद्देश होता. एक तर त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या कॉफीच्या कपाकडे त्याचं लक्ष आकर्िात करणे आणि दुसरा खरोखरच त्याला काही मिळालं का हे विचारणे.

जॉनने अँजेनीकडे आणि मग कॉफीच्या कपाकडे एक ओझरता दृटीक्षेप टाकला. आणि आजूबाजूला काहीतरी शोधल्यासारखं बघू लागला.

काय पाहिजे? अँजेनीने विचारले.

एखादा कागद, वही किंवा काहीतरी लिहायला आहे का?

अँजेनी हॉलमध्ये गेली. जॉनने त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या कॉफीचा एक घोट घेतला आणि कॉफीचा कप पुन्हा तिथेच परत ठेवून दिला. तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. तेवढ्यात अँजेनी एक डायरी घेऊन आली. तिने ती डायरी उघडून जॉनच्या पुढ्यात ठेवली आणि पेन त्याच्या पुढ्यात धरला. डायरी ठेवण्याची चाहूल लागताच तो पुन्हा कामातून भानावर आला. अँजेनीजवळचे पेन घेऊन तो डायरीवर काहीतरी आकडेमोड केल्यासारखी असंबंधित अक्षरं लिहू लागला.

अँजेनी कॉफीचे घोट घेत आश्चर्याने त्याच्या खांद्यावरून वाकून तो काय करतो आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली.

अचानक जॉनने आपल्या उजव्या हाताची मूठ आवळून विजयोद्‌गार काढले—

यस्स

तो ताडकन खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. त्याला कदाचित खुनाबद्‌्‌दल किंवा खुन्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली असावी.

काय? काही समजलं?

अँजेनीचा चेहरा उजळला होता.

हे बघ, त्या सिरीयल किलरने प्रथम सानीचा खून केला

सानीचं नाव एकून अँजेनीचा उत्साहाने उजळलेला चेहरा दुरूखाने म्लान झाल्यासारखा झाला.

दुसरा त्यानं खून केला तिचं नाव होतं हुयाना

अँजेनी त्याला काय म्हणायचे ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी कधी तो काय म्हणतो ते ऐकत होती तर कधी त्याच्या समोर ठेवलेल्या डायरीवर काय लिहिले आहे हे वाचायचा प्रयत्न करीत होती.

तिसरा खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं उटीना आणि आता हल्ली चौथा ज्याचा खून झाला त्याचं नाव होतं नियोल

मग? प्रश्नार्थक मुद्रा करीत अँजेनीच्या उघड्या तोंडून निघाले.

आणि आता पाचवा खून ज्याचा होणार आहे त्याचं नाव श्वायश् (ल्) या अक्षराने सुरू होणारं आहे.

हे तू कसं काय सांगू शकतोस?

मग जॉन समोरची डायरी आणि इंटरनेटवरची माहिती अँजेनीला दाखवून तिच्यासमोर खुनाचं एक एक रहस्य उलगडायला लागला. जसं जसं एक एक रहस्य उलगडत होतं तसे तसे तिचे डोळे आश्चर्याने विस्फारत होते.

ओ के देन कॉल द मिटींग

बॉसच्या समोर सॅम बसला होता. तो केसबद्द्‌ल बॉसला ब्रीफींग देत होता. बॉसने जॉनकडील सर्व जबाबदारी त्याला दिली होती. बॉस नेहमीप्रमाणे खुर्चीवर शांतपणे सिगारचे झुरके घेत होता.

तेवढ्यात शिपाई आत आला.

बॉसच्या पुढ्यात एक चिठ्‌ठी ठेवत म्हणाला,

साहेब, जॉनसाहेब आलेले आहेत

जॉन....साहेब ...

साहेब या शब्दावर वाजवीपक्षा जरा जास्तच जोर दिल्यामुळे बॉसच्या शब्दातला उपरोधकपणा स्पट जाणवत होता.

बॉसने चिठ्‌ठी उघडली.

चिठ्‌ठीत लिहिले होते —

खुनाच्या केसची अंत्यत महत्वाची माहिती माझ्या हाती लागली आहे त्यासाठी तुम्हाला तातडीने भेटायचे आहे

बॉसने चिठ्‌ठीवरून निर्वीकारपणे एक नजर फिरविली.

सॅमपुढे चिठ्‌ठी सरकवित बॉस म्हणाले,

जेव्हा दिवे लावायचे होते तेव्हा नाही लावले ... आता हे काय उजेड पाडणार आहेत ते देव जाणे?

सॅमने चिठ्‌ठीवरून एक नजर फिरविली.

अचानक खुर्चीवर सरळ बसत बॉसने शिपायाला फर्मान सोडले ,

सेंड हिम इन

शिपाई लगबगीने बाहेर गेला आणि त्यापाठोपाठ जॉन आत आला.

हॅलो जॉन, हाऊ आर यू? बॉस त्याला समोर खुर्चीवर बसण्याचा निर्देश देत म्हणाला.

जॉन काहीच न बोलता समोरच्या खुर्चीवर बसला.

हॅलो जॉन

हॅलो सॅम

जॉन आणि सॅममधे अगदी मोजकाच संवाद झाला. दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं.

यस ... व्हाट कॅन वुई डू फॉर यू?

बॉस एकदमच तिर्‌हाइतासारखे त्याच्या सोबत बोलत होते.

सर, आय हॅव ॲन इंपॉटंर्ंट इनफॉरमेशन रिगाडींर्ंग नेक्स्ट पॉसिबल मर्डर

बट ॲज अॉल नो यू आर राईट नाऊ डिस्मीस्ड

जॉन काहीच बोलला नाही.

देन व्हाय शुड यू शेअर द इंन्फारमेशन विथ अस

हे बघा सर, ही जी माहिती आहे याचा तुमच्या डिपार्टमेंटल पॉलिटीक्सशी काहीही संबंध नाही. इथे पब्लीकच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. मी जर या माहितीच्या आधारे एकटा काही करू शकलो असतो तर तुमच्याकडे तोंड वेंगाडायला कधीच आलो नसतो

जॉनच्या शब्दात त्याचा बॉसवरचा राग स्पट जाणवत होता.

बॉसने समोरच्या ॲश ट्रेमध्ये सिगार चुरगाळली आणि हसत म्हणाले , याला म्हणतात दोर जळाला पण पीळ नाही गेला. ऐनीवे काय माहिती आहे तुझ्याजवळ?

पुढचा खून कोणाचा होणार याची पॉसीब्लीटी आहे माझ्याजवळ जॉन म्हणाला.

सॅम गप्पच होता कधी तो जॉनच्या तर कधी बॉसच्या तोंडाकडे बघत होता.

बॉस जोरजोराने हसायला लागला.

पॉसीब्लीटी!

सर धीस इज नॉट सम काइन्ड अॉफ अ जोक

बॉस हसायचं थांबला.

हे बघ, या शहरात जवळपास 75 हजार घरं आहेत त्यातल्याच कुठल्यातरी एका घरात पुढचा खून होणार आहे ही पॉसीब्लीटी सांगायला एखादा मूर्ख मनुयसुध्दा पुरेसा आहे

पुढचा ज्याचा खून होणार आहे त्याचं नाव श्वायश् (ल्) या अक्षराने सुरू होणार आहे

बॉस पुन्हा हसायला लागला.

इज धीस सम काईन्ड अॉफ वर्ड पझल

इतक्या वेळचा गप्प असलेला सॅम कशीतरी हिम्मत करून बोलला.

सर मला वाटते... वुई शुड लिसन थरोली व्हाट हि वांट टू से

सॅम मधे बोललेला बॉसला आवडलेलं दिसत नव्हतं.

ओ... हो... सॉरी ... मी तर पुर्णपणे विसरलोच की आता ही केस तू हॅन्डल करीत आहेस... बॉस सॅमला टोमणा मारत म्हणाला.

सर, तसं नाही ... शेवटी तुम्हीच आमचे बॉस आहात... मी फक्त तसं सुचविलं ...शेवटी काय डीसीजन घ्यायचं आहे तो अधिकार तुमचाच आहे... सॅम ओशाळल्यागत म्हणाला.

बॉसचा श्इगोश् सॅटिसफाय झालेला दिसत होता.

बॉस एकदम सिरीयस झाला. कॅबीनमध्ये शांतता पसरली. बॉसने नवीन सिगार पेटविली आणि खुर्चीला मागे शांतपणे रेलून म्हणाला ,

ओ के देन कॉल द मिटींग

मिटींग

बोर्ड रूममध्ये बॉस, सॅम, डॅन आणि इतर बरेच पोलीस अधिकारी जमले होते. जॉन सगळ्‌यांच्या समोर एका जागी बसला होता. सगळे जण आता तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. बॉसला तो काय सांगतो ते एकण्यात विशेा स्वारस्य दिसत नव्हते.

जॉनने सुरवात केली.

हा जो खुनी आहे तो सिरीयल किलर आहे यात कुणालाच शंका नसावी

जॉनने सवांर्ंवर एक नजर फिरविली.

मला वाटतं आपण सरळ मूळ मुद्द्‌यालाच हात घातल्यास बरं होईल बॉसने टोमणा मारला.

जॉनला बॉसचं असं मध्ये बोलणं आवडलेलं नव्हतं. त्याला त्याचा राग आला होता. पण आपला राग गिळून चेहर्‌यावर तसे काहीही न दाखविता जॉनने फक्त एक नेत्रकटाक्ष बॉसकडे टाकला.

हे बघा, खुन्यानं पहिला खून केला त्या इसमाचं नाव होतं सानी , दुसरीच हुयाना, तिसरीचं उटीना आणि आता चवथा ज्याचा खून झाला त्याचं नाव होतं नियोल

जॉनने पुन्हा एकवार बॉसला टाळून सवांर्ंवर नजर फिरविली.

आणि आता पाचवा खून ज्याचा होणार आहे त्याचं नाव वाय या अक्षराने सुरू होणारं आहे. जॉन एखादा सस्पेन्स उघड करावा या आविर्भावाने म्हणाला.

बॉसची उत्सुकता चाळवली गेली होती पण त्याने उघड आपल्या चेहर्‌यावर कोणताही भाव येऊ दिला नाही.

हे तू कसं काय सांगू शकतोस? कुणीतरी मुद्दा उपस्थित केला.

सांगतो जॉन एक दीर्र्‌घ श्वास घेत म्हणाला.

आता सर्व जण अजून एकाग्र होऊन लक्ष एकवटून एकू लागले.

प्रत्येक खुनाच्या वेळी खुन्यानं आपल्याला क्लू देण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्‌या क्लू मध्ये एक कॉमन मुद्दा होता तो म्हणजे झीरो आणि आता चवथ्या खुनाच्या वेळी त्याने भिंतीवर लिहिलेले होते

झीरोचा शोध कुणी लावला?

...आणि यातच पुढच्या खुनाचं रहस्य दडलेलं आहे तसा झीरोचा शोध कुणी लावला हा वादग्रस्त मुद्दा आहे...

जॉन झीरोच्या शोधाबद्दल बोर्डरूममध्ये जमलेल्या सवांर्ंना यथोचित माहिती देत होता. आणि सर्वजण लक्ष देऊन एकत होते. त्यातच डॅनची चुळबूळ सुरू झाली होती. तो बोर्डरूममधून बाहेर जाण्याच्या संधीची वाट पाहू लागला...

...जगाच्या इतिहासात शून्याच्या शोधाला फार महत्व आहे. शून्याच्या शोधाने गणिताला एक परिपूर्णता दिली होती. शून्याला एक आकडा म्हणूनच नाही तर एक कॉन्सेप्ट म्हणूनही फार महत्व आहे. आताही विज्ञानात अशी बरीच कोडी आहेत की ती शून्याच्या अभावी आणि परिणामी श्अगणितश् (पदपिदपजल) या संज्ञेच्या अभावी सोडवली गेलीच नसती. शून्याचा शोध कुणी लावला यावर बराच संभ्रम आणि वाद अस्तित्वात आहे. पण हेही तेवढेच सत्य आहे की अमेरिका आणि युरोप सारख्या ज्या भागाला आजच्या परिस्थितीत जगात सर्वात प्रगत भाग समजले जाते तिथे शून्याच्या शोध लागला नव्हता. तिथे बाकीच्या शोधांप्रमाणेच शून्याला सुध्दा सोईस्कररित्या श्इंम्पोर्टश् केले गेले होते. एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेमध्ये जी रोमन अंकपध्दती सुरवातीला वापरली जात होती ती फारच अपरिपूर्ण आणि तोकडी होती. कारण त्या पध्दतीमध्ये अंकाला त्याच्या जागेप्रमाणे महत्व किंवा व्हॅल्यू नसल्यामुळे त्या अंक पध्दतीमध्ये गणितातले बेसीक बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार सुध्दा व्यवस्थित आणि जलद केले जाऊ शकत नाहीत.

आता शून्याच्याच बाबतीत बोलायचे झाल्यास एक मान्यता अशी आहे की शून्याचा शोध सर्वप्रथम भारतामध्ये लागला. 1 ही प्राकृतिक पहिली संख्या आहे. 1 नंतर क्रमाने येणार्‌या प्राकृतिक संख्या या.. 2, 3, 4, 5, 6 ... इत्यादि आहेत. या संख्यांना काही अंत नाही. 1 मध्ये 1 चा योग केल्यास 2 येते. 2 मध्ये 1 चा योग केल्यास 3 येते. 3 मध्ये 1 चा आणि 4 मध्ये 1 चा योग केल्यास क्रमशरू 4 आणि 5 येते. अशाच प्रकारे 6, 7, 8... इत्यादि संख्या येतील. योग या क्रियेच्या विरुध्द क्रियेस व्यवकलन म्हणतात. 5 मधून 1 चे व्यवकलन केल्यास 4 प्राप्त होतो, 4 मधून 1, 3 मधून 1 आणि 2 मधून 1 चे व्यवकलन केल्यास 3, 2, 1 असे क्रमशरू प्राप्त होतात. पण आता प्रश्न पडतो की 1 मधून 1 चे व्यवलोकन केल्यास काय प्राप्त होईल? हा प्रश्न सर्व प्रथम भारतीय ऋषींच्या डोक्यात आला. 1 मधून 1 चे व्यवलोकन केल्यास रिक्तता उत्पन्न होते, आणि त्याला 0 च्या स्वरूपात लिहिले जाते. शून्याचा संख्येच्या स्वरूपात कोणी उपयोग केला हे सांगणे जरी कठीण असले तरी एवढी माहिती मिळते की ई.पू. दुसर्‌या शताब्दीत यूनानचे जोतिाी शून्यासाठी 0 चा उपयोग करायचे. परंतू ते लोकसुध्दा त्याच अर्थाने त्याचा उपयोग करायचे ज्या अर्थाने बॅबीलॉनीयन लोक उपयोग करायचे. 200 ई.पू. आचार्य पिंगल यांच्या छन्दरू सूत्रात शून्याचा वापर सापडतो. भक्षाली पाण्डूलिपित (300 ई.) शून्य चिन्हाचा (0) प्रयोग करून संख्या लिहिलेल्या सापडतात. या ग्रंथाच्या 22व्या पानावर शून्य चिन्ह (0) आढळते. शून्याचे सर्वात प्राचीन चिन्ह आहे (.).

शून्याचा शोधच नाही तर एकूण बीजगणित, भूमिती या सगळ्‌यांवर आर्यभट्ट्‌ नावाच्या गणितशास्त्रज्ञाच्या काळामध्ये बरंच कार्य झालं. पण ते सर्व कार्य संस्कृतात सूत्राच्या स्वरूपात लेखनबध्द झाल्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना ते कळू शकलं नाही. कालांतराने भारतातच ते पाठांतराद्वारे पिढ्या दर पिढ्या जोपासलं गेलं. शून्याच्या शोधाचं मूळ भारतीय इतिहासातल्या वैदिक काळात वेगवेगळ्‌या स्वरूपात आढळतं. सगळ्‌यात पहिला कुणीही नाकारू शकणार नाही असा पुरावा म्हणजे ग्वाल्हेरला एका जागी संवत 933 मध्ये कोरलेल्या काही संख्या सापडल्या. तिथे एका जागी 50 हारांचा उल्लेख आहे आणि 270 ही संख्या हिंदी अंकाचा उपयोग करून लिहिलेली आहे. इथे शून्याचा संख्याच नाही तर प्लेस होल्डर म्हणून सुध्दा उपयोग केला आहे.

जगाच्या इतिहासात बह्मगुप्त हे पहिले गणिततज्ञ आहेत की ज्यांनी नॅचरल नंबर्स आणि झीरोवर वेगवेगळ्‌या गणित प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी काही संस्कृतींनी उदा. बॅबीलॉनीयन लोकांनीसुध्दा एक चिन्ह शून्यासाठी प्लेसहोल्डर आणि एक संख्या म्हणून वापरले होते. पण एका विचारप्रवाहाच्या मानण्याप्रमाणे जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीमध्येच सर्वात प्रथम झीरोचा एक संख्या, एक प्लेस होल्डर आणि एक संकल्पना म्हणून वापर झालेला होता. त्या अंकाचा , त्या प्लेस होल्डरचा आणि संकल्पनेचा उल्लेख भारतीय वेदीक साहित्यात शून्य असा आढळतो...

....जॉनने बोर्डरूममधल्या सगळ्‌यांना झीरोच्या शोधाचा थोडक्यात आढावा आणि इतिहास सांगितला.

आणि या झीरोतच खुनाचं रहस्य दडलेलं आहे. भारतीय इतिहासात जागोजागी झीरोचा उल्लेख शून्य असा केलेला आढळतो

जॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलायला लागला.

पहिला खून झाला त्याचं नाव सानी म्हणजे ते एस या अक्षराने सुरू होते. दुसरा खून झाला तिचं नाव हूयाना म्हणजे ते एच या अक्षराने सुरू होते. तिसरा खून झाला तिचं नाव उटीना जे यू या अक्षराने सुरू होते आणि शेवटचा ज्याचा खून झाला त्याचं नाव नियोल जे एन या अक्षराने सुरू होते म्हणजे एस्‌ एच्‌ यू एन वाय ए शून्य म्हणजे आता जो खून होणार आहे त्याचं नाव वाय या अक्षरानेच सुरू होणार यात वादच नाही

जॉनने केलेल्या अचूक विश्लेाणामूळे सगळे जण त्याच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अगदी बॉस सुध्दा.

पण या शहरात ज्यांचं नाव वाय या अक्षराने सुरू होते असे हजारो किंबहुना लाखो लोक असतील. आता काय आपण त्या सगळ्‌यांना प्रोटेक्शन देणार? बॉसने आपली शंका व्यक्त केली.

इतक्या लोकांना संरक्षण देणे म्हणजे जवळ जवळ अशक्य ! सॅम म्हणाला.

नाही अजून एक गोट मला या सगळ्‌या प्रकरणात प्रर्कााने जाणवली आहे... त्यामुळं आपला लोकांचा आवाका नॅरो डाऊन होणार आहे जॉन म्हणाला.

अजून एक आशेचा किरण दिसल्यासारखे सगळे जण उत्सुकतेने जॉनकडे बघायला लागले. मग जॉन आपल्या खुर्चीवरून उठला आणि समोर भिंतीवर टांगलेल्या शहराच्या नकाशाजवळ गेला. त्याने आपल्यासमोरील काही कागद सुध्दा सोबत नेले होते. मग जवळच्या कागदाकडे बघत त्याने समोरच्या नकाशावर लाल स्केच पेनने एक फुली मारली.

पहिला खून झालेल्या सानीचे घर शहरात जवळपास इथे आहे

सगळे जण जॉनला काय म्हणायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

जॉनने आपल्याजवळच्या कागदाचा आणि समोरच्या नकाशाचा ताळमेळ बसवीत अजून एक लाल फुली नकाशावर मारली.

दुसरा खून झालेल्या हूयानेचे घर हे इथे कुठेतरी आहे

त्याने अजून एक लाल फुली नकाशावर मारीत म्हटले,

तिसरा खून उटिनाचा झाला आणि तिचे घर या इथे आहे

आणि शेवटचा खून नियोल त्याचं घर

जॉनने पुन्हा एकदा आपल्याजवळच्या कागदांचा आणि नकाशाचा तालमेळ बसवित अजून एक लाल फुली मारली आणि म्हटले, हे इथं आहे सगळ्‌यांच्या चेहर्‌यांवर अजूनही प्रश्नचिन्हच होती.

पण याने काय सिध्द होणार? सॅमने प्रश्न उपस्थित केला.

म्हणजे .....तुला काय म्हणायचे आहे हे एकतर तुलाच कळत नाही ... किंवा आमच्या पूर्णपणे डोक्यावरून जात आहे बॉस म्हणाला.

जरा लक्षपूर्वक बघा .... विचार करा... तुमच्या काही लक्षात येते का ते ?

जॉनने एकदा बोर्डरूममधल्या सगळ्‌यांकडे एक दृटीक्षेप टाकला.

बराच वेळ शांतता होती. सगळे जण त्यातून काही सिध्द होते का ते पाहू लागले.

मग जॉनने समोरच्या नकाशावर हिरवे ठिपके ठिपके देत सगळ्‌या लाल फुल्यावरून जाणारी एक वक्र रेाा काढली. ती वक्र रेा जिथून काढली होती मग तिथे नेवून पुन्हा जोडली. मग त्या ठिपक्यांवरून त्याने एक व्यवस्थित हिरवी ठळक रेाा काढली. आणि काय आश्चर्य त्या नकाशावर तंतोतंत एक वर्तुळ दिसू लागले.

हे बघा हे काय निघाले

वर्तुळ एकजण म्हणाला.

वर्तुळ नाही... हे शून्य आहे जॉन गूढार्थाने म्हणाला.

समोरच्या सगळ्‌याजणांच्या चेहर्‌यावर सगळं काही उलगडल्याचे आनंदयुक्त आणि उत्साहपूर्ण भाव पसरले.

यस्स... यू आर जिनीयस जॉन सॅमच्या तोंडातून उत्साहाने निघाले.

बॉसने नाराजीने सॅमकडे बघितले.

पहिली फुली इथे , दुसरी इथे , तिसरी ही आणि चौथी ही .

जॉन नकाशावरच्या फुल्यांकडे निर्देश करीत म्हणाला.

म्हणजे पाचवी फुली जवळपास इथे कुठंतरी असायला पाहिजे

जॉनने वर्तूळावर चौथ्या आणि पहिल्या फुलीच्या मध्ये जी रिकामी जागा होती तिथेे एक पाचवी लाल फुली काढली.

या पाचव्या फुलीच्या एरियातच खुन्याचा पुढचा व्हीक्टीम दडलेला आहे आणि त्याचे नाव श्वायश्(ल्) या अक्षरापासून सुरू होते. या दोन माहिती तंतोतंत जुळणारे साधारण तीन किंवा चार घरं असतील आणि ती सुध्दा पॉसीब्ली दहाव्या माळ्‌यावर ... कारण प्रत्येक खुनाच्या वेळी खुन्याने दहावा माळाच निवडला आहे

यस ....या घरांवर जर पाळत ठेवली तर खुन्याला आपण निश्चित पकडू शकू उत्साहाने सॅम म्हणाला.

तेवढ्यात शिपाई आत येऊन बॉसच्या कानाशी म्हणाला,

साहेब, तुमचा अजंर्ंट फोन आहे

बॉस खुर्चीवरून उठला.

यू कॅरी अॉन. आय वील बॅक सून बॉस जॉनला आणि बाकी जणांना म्हणत खाड खाड बुटांचा आवाज करीत बोर्डरूममधून बाहेर निघून गेला.

अॉडीओ

जॉन, सॅम आणि बाकीचे पोलीस अधिकारी पाचव्या खुनाच्यावेळी कसा फास लावून खुन्याला पकडायचे याची चर्चा करू लागले. जॉनने प्रथम प्रत्येकाची आयडीया नीट ऐकून घेतली. आणि मग सर्व आयडीयांचा सारांश एक आयडीया ठरवून ती चर्चेसाठी घेतली. चर्चेसाठीही त्याने सगळ्‌यांना सारखे प्राधान्य दिले होते. ही चर्चेची तर्‌हा प्रत्येकासाठी जरा नवीनच होती. कारण बॉसची तर्‌हा वेगळीच असायची. तो डिक्टेटरशीप ने वागायचा. ही डेमोक्रॅटीक तर्‌हा सवांर्ंना आवडत होती असं दिसत होतं. प्रत्येकाचा सहभाग आणि यामुळे प्रत्येकाच्या डोक्याला चालना मिळत होती. पण त्यांना काळजी होती की नेमका बॉस तिथे यायचा आणि सर्व विचका करून टाकायचा. आणि नेमके तसेच झाले. त्यांची चर्चा अर्ध्‌यावर असतांना अचानक घाईघाईने बॉस तिथे आला. त्याच्या चेहर्‌यावर घाम फुटला होता. त्याची ती दशा पाहून सर्वजण शांत झाले. नक्कीच काहीतरी अघटित झाले होते. त्याच्या मागोमाग एक शिपाई लॅपटॉप घेऊन आला.

एक गडबड झाली आहे बॉस आत आल्या आल्या म्हणाला.

सर्वजण स्तब्ध होऊन बॉस काय म्हणतो ते ऐकू लागले.

हा खुनी कोणी एकटा दुकटा नसावा. ती एक मोठी संघटना असावी ...कदाचित अतिरेकी संघटना

अतिरेकी संघटना? बरेच आश्चर्योद्‌गार निघाले.

कारण ही तेथील प्रत्येकांसाठी नवीन माहिती होती. कुणीही या घटनेचा त्या अंगाने विचारच केला नव्हता.

प्रेसचा फोन होता सगळीकडे धुमाकूळ माजला आहे या लोकांनी इंटरनेटवर एक अॉडीओ रिलीज केली आहे बॉसने एका श्वासात सांगितले.

नंतर बॉसने डॅनला लॅपटॉप सुरू करण्याचा आदेश दिला. डॅन लॅपटॉप सुरू करू लागला तसा बॉस पुढे बोलू लागला,

मी अजून अॉडीओ ऐकला नाही. मला वाटते प्रथम तो आपल्याला ऐकला पाहिजे बास लॅपटॉपच्या समोर बसत म्हणाला.

तोपयंर्ंत डॅनने लॅपटॉप सुरू करून गुगल सर्च इंजीन सुरू केलं होतं. डॅनला बॉसच्या बोलण्यावरून कल्पना आली होती की प्रथम ती अॉडीओ फाईल इंटरनेटवर शोधावी लागेल.

डॅनने सर्च स्ट्रींग टाईप करण्याच्या आधी श्काय सर्च स्ट्रींग देवूश् या आविर्भावाने बॉसकडे पाहिले.

तसं बॉसचं आणि डॅनचं टयूनिंग चांगलं होतं. कोणाच्या मनात काय घोळत आहे हे त्यांना एकमेकांसोबतच्या अनुभवावरून आधीच कळायचे.

झीरो मिस्ट्री बॉस म्हणाला.

डॅन ने श् झीरो मिस्ट्रीश् सर्च स्ट्रींग देऊन सर्च बटन क्लीक केलं. क्षणार्धात शंभर एक निळ्‌या रंगाच्या लिंक्स कॉम्पूटरच्या ब्राउजरवर अवतरल्या.

सगळे जण आपलं डोकं शक्य होईल तितकं घुसवून मॉनिटरकडे पहायला लागले.

ती चौथी लिंक बॉस म्हणाला.

सॅमने ती चौथी लिंक क्लीक केली. एक साईट ओपन झाली. त्यावर एक अॉडीओ फाईलची लिंक होती. प्ले आणि डाऊनलोड असे दोन अॉप्शन्स होते.

प्ले इट डायरेक्टली बॉस ने आदेश दिला.

सॅमने प्ले बटनवर क्लीक केले. सुरवातीला अॉडीओवर एखाद्या वादळापूर्वी जशी शांतता असावी तशी शांतता होती. नंतर एक धीरगंभीर आवाज घुमायला लागला. सगळे जण एकदम शांत होऊन स्तब्धतेन ऐकायला लागले.

मेरे हिंदूस्थानी भाईयों और बहनो...

मधे एक लांब पॉज होता.

बोर्डरूममधल्या सवांर्ंनी एकमेकांकडे एका प्रश्नार्थक नेत्रकटाक्षाची अदलाबदल केली.

अॉडीओमधला आवाज पुन्हा बोर्डरूममध्ये घुमायला लागला.

किसी ना किसी तरह कोई हमपर आजतक राज करते आया है. हमे जैसे गुलामी की आदत सी हो गई है. इससे पहले 150 साल तक हमपर ब्रिटीश लोगोंने राज किया ... और बुरी तरह... किसी जानवरो की तरह हमसे बर्ताव किया. यह लोगोंका हमपर राज करने का सिलसिला अभीभी जारी है. अभीभी हमपर कोई राज कर रहा है. यह सुनकर आपको आश्चर्य हो रहा होगा. लेकिन यह सच है और यह आश्चर्य की नही शर्म की बात है. हमारे गुजरे हूए कल पर थोडी नजर डाली जाएँ तो यह जो आजका प्रगत विज्ञान है. इसकी नींव हमने रची हुई है. लेकिन उसे कोई मानने को तैयार नही. वह विज्ञान इन प्रगत देशोंने या तो हमसे चुराया है या अपने ताकद की जोर पर जबरदस्ती हमसे हथीया लिया है. उदाहरण के तौरपर है शून्य. शून्य का शोध हमने लगाया है. लेकिन यह कोई मानने के लिए तैयार नही. पायथॅगोरस थेरम उसका शोध हमारे पूर्वज वैज्ञानिक आर्यभट्टने लगाया. लेकिन आज वह किसी और के नाम से प्रचलित है ज्या (ेपदम) का शोधभी आर्यभटने लगाया है. ये होगए गणिती क्षेत्र के शोध और संशोधन. स्वास्थविज्ञानमें विविध जडीबूटीयाँ, उनके औाधीय उपयोग. इन सबको अनदेखा करते हूए अमेरिकाका हल्दीका पेटेंट अपने झोलीमें डालनेका प्रयास किसीको नागवार गुजरा नही क्योंकी वह एक शक्तीशाली देश है. अपने शक्तीके जोर पर वे कुछ भी करने की क्षमता रखते है. अपने शक्ती के जोर पर वे किसी झूठ को सच का सुनहरी मुलामा देकर मिडीया का सहारा लेकर सारे विश्वपर थोपते है. एैसे बहुत सारे शोध है जो हमने लगाये हूए है लेकिन वह आज कोई दुसरे लोगोंने चुराकर अपने नाम पर कर लिए है या फिर वे अपने ताकत के जोरो पर उसको वे अपना संशोधन या शोध बताते है. इससे एक बात साबीत होती है की हम दिमागी तौर पर ना कभी कीसी देशसे कम थे ना है. हाँ आज भी नही है. आज इस वक्त अमेरिका, युरोप मे हमारा ब्रेन ड्रेन हो चूका है. यह बात यह साबीत करती है की आज भी दिमागी तौर पर हम किसीसे कम नही है. हमारे पास दिमाग होते हूए भी यह सब क्यो हो रहा है? उसके लिये हमारी सोई हूई राट्रीयता और इन प्रगत देशोंकी हमारे प्रति नीतीयाँ और उनका हमारे अंदरूनी मामलेमें हस्तक्षेप है.

उन लोगोंका हमारे प्रती ध्यान खिंचकर उन्हे झिंजोरने के लिए और अपने हिंदू लोगोंका सोया हूवा धर्माभीमान , अभिमान और राट्रीयता जगाने के लिए हमने यह श्झीरो मिस्ट्रीश् हत्या श्रृंखला अभियान चलाया है. क्योंकी सोये को जगाया जा सकता है लेकीन सोनेका ढोंग करने वाले को जगाने के लिए किसी बडे धमाको की जरूरत होती है. हाँ इस वक्त हमें बडे धमाके की जरूरत है. क्योंकी हमेशा हमारे अहिंसा और शांतीप्रीय भाव को लोगोंने गलत तरीके से लिया है और उसकी वजहसे वे हमे कमजोर समझते है. यह तो सिर्फ पहला कदम है. हमें अपना खोया हूवा वैभव पाने के लिए और बहुत कुछ करना बाकी है. मुझे आशाही नही बल्की विश्वास है की आप सब हिंदू लोग इस अभियान मे हमारा तहे दिलसे साथ देंगे. हिंदूज आर मच मोर कॅपॅबल बी रेडी फॉर रूलींग द र्वल्ड ...

... जय हिंद!

मेसेज हिंदीत होता. बोर्डरूमधल्या कुणालाच हिंन्दी येत नव्हती. पण बोर्डरुमधे भारतीय मूळ असलेल्या एका पोलीस अधिकार्‌यामुळे बाकींच्यांना समजण्यास ते कठीण गेले नाही. मेसेज ऐकत असतांनाच मधे मधे तो त्याच्या सहकार्‌यांना इंग्लीशमधे भााांतर करून सांगत होता.

बोर्डरूममध्ये एक गूढ शांतता पसरली होती.

माय गॉड बॉसच्या तोंडून निघाले.

इट इज अ टेररीझम सॅम म्हणाला.

नो. नॉट सिप्ली टेररीझम इट्‌स हिंदू टेररीझम... अर्लीयर वुई वेअर व्हीक्टीम अॉफ मुस्लीम टेररीझम. नाऊ इटस्‌ हिंदू टेररीझम आल्सो इन द लिस्ट बॉस म्हणाला.

सर मला वाटते आपण आता पुढचा खून टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे जॉन म्हणाला.

मि. जॉन आता हे प्रकरण निव्वळ एक सिरीयल मर्डर केस राहिलेलं नाही ... नाऊ इट हॅज बिकम अ फेनॉमेनॉन बॉस म्हणाला.

पण हा पुढचा खून जर आपण टाळू शकलो... आणि खुन्याला जर पकडू शकलो ... तर यावर नक्कीच काही तरी नियंत्रण येईल जॉनने आपले मत व्यक्त केले.

आता काय काय टाळणार आहोत आपण... अॉलरेडी संपूर्ण अमेरिकेत भारतीय अमेरिकन आणि अमेरिकन लोकांत दंगे सुरू झालेले आहेत . आणि खुनी हा एक नसून ती एक आतंकवादी संघटना आहे. हिंदू आतंकवादी संघटना

पण दंगे इतक्या लवकर आणि एकदम असे कसे सुरू झाले? सॅमने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले..

9 ध् 11 च्या दरम्यान लोकांचा राग एका सीमेपयंर्ंत म्हणजे त्याच्या थ्रेशोल्ड लेव्हलपयंर्ंत पोहोचला होता... आणि आता हे अजून एक टेररीझम ऐकून त्यांचा राग आऊट र्बस्ट झालेला आहे. बॉसने लोकांच्या वागण्याचे विश्लेशण करून सांगितले. तसा मॉब बिहेवीयर आणि मॉब टेन्डंसीबद्दलचा बॉसचा अभ्यास दांडगा होता.

पुन्हा शिपाई आत आला.

साहेब, मेयरचा फोन शिपाई बॉसच्या कानाजवळ अदबीने वाकून म्हणाला.

बॉस उठून उभा राहिला.

चला उठा. आता आपल्याला हे दंगे हाताळायला पाहिजेत.

बॉस बाहेर जाऊ लागला. जॉन सोडून सगळे जण उठून बॉसच्या मागे मागे जाऊ लागले. निराशेने जॉन जाणार्‌या सगळ्‌यांच्या पाठमोर्‌या आकृतींकडे पाहत उभा राहिला.

क्रमशरू..

वनवा

बॉस आणि इतर पोलीस टीव्हीच्या समोर उभे राहून संपूर्ण अमेरिकेत एखाद्या वणव्यासारख्या पसरलेल्या दंग्याच्या बातम्या पाहत होते. मधून मधून फोन वाजत होता. तो एक पोलीस अधिकारी मदतनीस अटेंड करीत होती. बॉसने दुसरा न्यूज चॅनल लावला. तिथेही तेच. सगळ्‌या न्यूज चॅनल्सवरती त्याच जाळपोळ, लाठीचार्ज, अश्रूधूर सगळ्‌या दंग्याच्याच बातम्या.

तेवढ्यात जॉन आवेशानं आत आला. त्याच्याकडे सॅमने सहानुभूतीपूर्वक पाहिले. बॉसने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि बाकीचे आपण आपापल्या कामात मग्न आहोत असा आव आणित होते. बॉसने असं दुर्लक्ष करावं हे त्याला आवडलं नाही. तो न राहवून जवळजवळ ओरडूनच म्हणाला,

सर, पाचवा खून जर आपण रोखू शकलो नाही तर हेच जाळपोळ करणारे लोक हिंसक होतील. मग मात्र त्यांना रोखणं कठीणच नाही तर जवळ जवळ अशक्य होऊन जाईल ... कसंही करून आपल्याला हा खून रोखलाच पाहिजे.

बॉसनं एक कटाक्ष जॉनकडे टाकला. मग काहीतरी विचार केल्यासारखे केले. आणि सॅमकडे बघत तो म्हणाला,

सॅम मला वाटतं जॉनचं म्हणणं बरोबर आहे. तू आणि अजून दोघं त्याच्यासोबत जा आणि काही करण्यासारखं असेल तर बघा.

मग बॉस जॉनकडे वळला.

आय ॲम सॉरी जॉन पण मी एवढंच करू शकतो

जॉनला बॉसच्या बोलण्यातली खोच लक्षात आली. तो त्याचे साधे कपडे पाहून चेटेने म्हणाला होता.

जॉन काही बोलणार त्याआधीच सावरुन घेत बॉस म्हणाला,

कारण कॅनॉट प्लेसला जाळपोळ सुरू झाली आहे... मला तिकडे सुध्दा लोक लागतील आणि अजून बर्‌याच जागी दंगे भडकू शकतात

जॉन बॉॅसला काही म्हणणार एवढ्यात बॉससाठी अजून एक फोन आला.

बॉस फोन अटेंड करण्याच्या आधी जॉन आणि सॅमला म्हणाला,

तुम्ही जा लवकर. वेळ वाया घालवू नका

जॉन आणि सॅम लगबगीने बाहेर पडले.

ब्रम्ह हे परीपूर्ण

हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या काठावर असलेल्या गुहेत ध्यानमग्न बसलेला ऋषी, अचानक दचकून उठला. त्याचे डोळे लाल होते आणि चेहर्‌यावर काहीतरी सापडल्याचा गूढ आनंद ओसंडत होता. त्याच्या चेहर्‌यावर एक रहस्यमय स्मित पसरले. हळू हळू आपसूकच त्याचे डोळे पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून मुक्तपणे विचरण करू लागल्या.

जंगलात पर्णकुटीच्या जवळ तिघेजण आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते सर्वजण मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.

हा तर तोच ऋषी....

जो त्यांना पूर्वी एकदा होता....

त्यांना त्याचे शब्द आठवले—

काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन

ते मोठ्या आशेने त्याच्याकडे पहायला लागले.

ऋषीच्या चेहर्‌यावर एक गूढ हास्य तरळले.

तुमची विवंचना संपलीच म्हणून समजा ऋषी गूढपणे म्हणाला.

काय ? ... आमची विवंचना संपली? तिघांच्याही तोंडातून आनंदोद्‌गार निघाले.

ऋषीने गूढपणे एका संस्कृत श्लोकाचे मोठयाने उच्चारण केले ।

पूणर्ं अदरू पूणर्ं इदं, पूर्णात्‌ पूणर्ं उदच्यते ।

पूर्णस्य पूणर्ं आदाय, पूणर्ं एवाव शियते।

अर्थात जेव्हा पूर्ण पूर्णाशी मिळविले असता किंवा पूर्णातून पूर्ण काढले असता शेवटी शिल्लक पूर्णच राहते. ब्रह्म हे परिपूर्ण आहे. म्हणून ब्रह्म बह्मात मिळविले असता किंवा ब्रह्मातून ब्रह्म काढले असता शेवटी शिल्लक ब्रह्मच राहते.

इथे पूर्ण आणि ब्रह्म म्हणजे अगणित असू शकते...जसा दिवस असतो तिथे रात्र ही आलीच, उजेड आला तिथे त्याच्या विरुध्द अंधार आलाच तसं जिथे पूर्ण म्हणजे अगणित असेल तिथे पूर्णाच्या विरुध्द रिक्तता म्हणजे शून्य हा आलाच.

समोरच्या नदीकडे बोट दाखवून ऋषी पुढे म्हणाला, त्या पाण्यातल्या बुडबुड्यांकडे पहा ते कसे तयार होतात आणि नट होतात

अशी एक गोट आहे की ती कधी काहीच नाही आणि कधी कधी ती सर्व काही आहे. ती जिथून सुरू होते तिथेच संपते. ती अशी गोट आहे की जिच्यापासून हे ब्रह्मांड, तुम्ही आणि मी तयार झालो आहोत. ती अशी गोट आहे की ज्यात आपल्या सवांर्ंना एक दिवस विलीन व्हायचे आहे बोलता बोलता ऋषी त्या तिघांच्या भोवती गोल गोल फिरत होता.

ऋषीवर, आम्ही गणितावर संशोधन करीत आहोत आणि आम्हाला आमच्या कोड्याचे गणिती उत्तर हवे आहेय आध्यात्मिक नाही त्यातला एकजण म्हणाला.

हो, तुमचे संशोधन तुम्हाला अपूर्ण ज्याच्यामुळे वाटत आहे ते तुमच्या कोड्याचे उत्तर गणिती तर आहेच आणि तेवढेच आध्यात्मिकसुध्दा आहे मग ऋषीने सगळ्‌यांना उठवून एका बाजूला यायला सांगितले आणि गोल गोल चालून त्याच्या पावलांच्या ठश्यांमुळे जे वर्तुळ झाले होते त्याकडे निर्देश करीत तो म्हणाला,

तुम्हाला तुमचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ज्या गोटीची गरज आहे ते आहे शून्य

तिघांच्या चेहर्‌यावर आनंद ओसंडून वाहत होता.

ऋषी म्हणाला शून्य हा जिथे सुरू होते तिथेच संपते

एका जणाने एक वर्तुळ काढले.

ऋषी म्हणाला कधी शून्य हे काहीच नाही

एका जणाने 0 अधिक 6 बरोबर 6 असे लिहिले.

ऋषी पुढे म्हणाला कधी शून्य हे सर्वकाही म्हणजे सर्वसमावेशक आहे

दुसर्‌याने 0 वेळा 6 बरोबर 0 असे लिहिले.

त्या तिघांच्याही संशोधन कार्याला आता गती लाभली होती. ते तिघेही त्यांच्या कार्यात मग्न झाले. जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांनी आजूबाजूला बघितले. तो ऋषी तिथे नव्हता.

त्यांच्या चेहर्‌यावर आश्चर्य दिसत होते.

कुठे गेला होता ऋषी?...

कदाचित तो शून्यात विलीन झाला होता...

वाय स्टार

जॉन आणि सॅम कॉर्पोरेशन अॉफीसमध्ये बसले होते. जॉनने आपल्या हातातल्या नकाशाची पुंगळी एका अॉफिसरच्या पुढ्यात उघडून नकाशा टेबलवर पसरविला. तो शहराचा नकाशा होता आणि त्यावर पाच फुल्या काढून त्यातून एक वर्तुळ काढलेले होते. जॉन पाचव्या फुलीकडे निर्देश करून अॉफीसरला म्हणाला,

मि. पिटरसन आम्हाला या एरियात राहणार्‌या आणि ज्यांची नावं वाय या अक्षरानं सुरू होतात अशा लोकांची यादी हवी आहे

या एरियातले आणि वाय या अक्षराने सुरू होणारे रहिवासी? मला वाटतं आपल्याला त्यासाठी कॉम्प्यूटरची मदत घ्यावी लागेल

मग पीटरसन उभा राहत म्हणाला,

चला या माझ्यासोबत

पिटरसनने त्यांना एका कॉम्प्यूटर सेंटरमध्ये नेले. आत चार पाच क्यूबीकल्स होते. आणि क्यूबीकल्समध्ये कॉम्प्यूटरवर काम करीत मग्न असलेला स्टाफ बसलेला होता. कॉम्प्यूटरवर काम करीत असलेला स्टाफ म्हणजे मुख्यत्वे मुलीच होत्या. पिटरसनने त्यांना एका क्यूबीकलजवळ नेले. तिथे एक बॉबकट असलेली तरुण मुलगी कॉम्प्यूटरवर बसलेली होती. ती आपल्या कामात मग्न होती. तिच्या डोळ्‌यावर चमा होता.

पिटरसन त्या मुलीला उद्देशून म्हणाला,

मेरी, या लोकांना काही रहिवाश्यांची यादी पाहिजे आहे

जॉनने आपल्या हातातल्या नकाशाची पुंगळी पुन्हा उलगडून तिच्या पुढ्यात ठेवली आणि म्हणाला,

या एरियात राहणारे... जॉन नकाशावरच्या फुल्यांकडे निर्देश करीत म्हणाला.

... आणि ज्यांची नावं श्वायश् या अक्षराने सुरू होतात अशी

त्या मुलीने आधी जॉन आणि मग सॅमकडे एक दृटीक्षेप टाकला. नकाशात निर्देशीत केलेल्या जागी पाहत ती म्हणाली,

शुअर सर... जस्ट अ मिनट

तिने त्या फुल्यांकडे बघत तिनचार कॉलनीज्ची नावं तिच्या समोर असलेल्या कागदावर लिहिली. मग तिने कॉम्प्यूटरच्या डेस्कटॉपवर एक आयकॉन डबल क्लीक केला.

समोर एक सॉफ्टवेअर ओपन झाले. त्यात वेगवेगळे मेनू आणि त्या मेनूत वेगवेगळी आप्शन्स दिसत होती. डोळे बारीक करीत तिने एका मेनूच्या खाली असलेला एक अॉप्शन सिलेक्ट केला.

समोर टेक्स्ट बॉक्समध्ये तिने वाय स्टार टाईप केले आणि दुसर्‌या सिलेक्शन बॉक्समध्ये तिने कागदावर लिहिलेल्या सगळ्‌या कॉलनी आणि एरियाची नावं मध्ये कॉमा देऊन एकामागे एक अशी ओळीने लिहिली.

ती काय टाईप करीत आहे किंवा कुठे कुठे माऊस क्लीक करीत आहे हे पाहण्यापेक्षा तिच्या सफाईदार हातांच्या आणि बोटांच्या हालचाली मजेदार वाटत होत्या...

बस आता एक बटण क्लीक करण्याचाच अवकाश!..

शेवटी तिने फाईन्ड बटणवर माऊस क्लीक केला.

मॉनिटरवर फाईन्डीग असा मेसेज अवतरला.

जर कॉम्प्यूटरची सोय नसती तर ही सगळी माहिती शोधणंं म्हणजे फार अवघड काम होतं....

जॉन विचार करीत होता.

आणि कॉम्प्यूटर म्हणजे तरी काय सगळा शून्य आणि एक चा खेळ. हा शून्य इथेही आलाच!...

एकदम मॉनिटरवर 29 रहिवाश्यांची नावं त्यांच्या पत्यांसकट अवतरली.

एकोणतीस नावं! सॅमच्या तोंडातून निघाले.

बरं यातले कोण कोण दहाव्या मजल्यावर राहतात ते कळेल काय? जॉनने मेरीला विचारले.

दहाव्या मजल्यावरचे? कॉम्प्यूटरच्या साहय्याने कळू शकते... पण मला वाटतं त्यापेक्षा आपण त्यांचे ॲड्रेस वाचून माहित केलेलं सोपं राहील. मेरी म्हणाली.

तिनं तिच्या बोटांच्या आणि हाताच्या सफाईदार हालचालीने प्रिंट कमांड देऊन त्या एकोणतीस जणांचा नाव, पत्यासहित बाजूच्याच प्रिंटरवर एक प्रिंट घेतला.

मेरीने तो प्रिंट हातात घेताच सॅम आणि जॉन आपलं डोकं खुपसून त्या प्रिंटकडे पाहत होते. ते त्या प्रिंटमधील त्या रहिवाश्यांच्या ॲड्रेसच्या रकान्यातून आपली नजर फिरवू लागले. ॲड्रेसमध्ये कुठे मजल्याचा उल्लेख फ्लॅटच्या नंबर मध्ये होता तर कुठे वेगळा आणि कुठे कुठे तर रोमन आकड्यात उल्लेख केलेला होता. त्यांच्या लक्षात आलं होतं की दहाव्या मजल्यावरचे रहिवासी कॉम्प्यूटरच्या सहाय्याने शोधणंं खरोखर कठीण गेलं असतं.

जॉनने ती प्रिंट आपल्या हातात घेऊन त्यातल्या तीन नावांवर टीक केले.

जॉनने मेरीशी आणि पिटरसनशी हात मिळविला

थँक यू मेरी... थँक यू पिटरसन... यू हॅव रिअली मेड अवर जॉब इझी... थँकस

यू आर वेलकम

जॉन आणि सॅम प्रिंट घेऊन तिथून घाईघाईने निघून गेले.

हिलव्ह्यू अपार्टमेंट

जॉन आणि सॅम कार्पोरेशन आफिसमधून बाहेर येत होते. बाहेर येतांना लोकांची गर्दी, इकडून तिकडे फाईल्स घेऊन जाण्यार्‌या अॉफीस बॉयची वर्दळ त्यांना मधे येत होती. त्या गर्दीतून वाट काढत ते अॉफिसच्या बाहेर पटांगणात आले. पटांगणात आल्यावर कुठे त्यांना हायसं वाटलं.

सर , आता काय करायचं ? सॅमने जॉनसोबत चालता चालता म्हटले.

तसे पाहिले तर आता केसचा पूर्णपणे चार्ज अॉफीशियली सॅमच्या हातात होता. तरीेपण तो त्याच्या बडतर्फ बॉस जॉनचा मोठेपणा विसरला नव्हता.

मला वाटते बॉसने आपल्यासोबत जे दोनजण दिले आहेत त्यांना आपण आधी या दोन पत्यावर तैनात करूया ...

हं ... मला वाटतं यू आर राईट सॅम आपल्या खिशातला मोबाईल काढत म्हणाला.

सॅमने एक नंबर डायल केला.

हॅलो ... अँथानी ... हे बघ ... आम्ही पाचव्या खुनाचे तीन पॉसीबल ॲड्रेसेस मिळविले आहेत ... त्यातला एक ॲड्रेस मी तुला सांगतो ... तिथे तू लगेच तैनात व्हायचं आहे ...हं ॲड्रेस लिहून घे...

सॅमने एका रहिवाश्याचे नाव आणि ॲड्रेस अँथनीला व्यवस्थित सांगितला.

तो पुढे म्हणाला, ... आणि ताबडतोब तिकडे जा ... त्याच्या जिवाला धोका आहे..

सॅमने फोन कट केला. मग त्याने अजून एक नंबर डायल केला. त्याच्यासोबत दिलेल्या दुसर्‌या पोलिसालासुध्दा दुसर्‌या एका ॲड्रेसवर ताबडतोब तैनात होण्यास सांगितले.

आता या तिसर्‌या ॲड्रेसचं काय करायचं?...बॉसनं तर आपल्यासोबत दोघंच दिले होते... जॉननं सॅमला विचारलं.

आपण बॉसला फोन करून आपला आतापयंर्ंतचा प्रोग्रेस कळवू आणि अजून एका जणाला मागून घेवू ...म्हणजे त्याला आपण या तिसर्‌या पत्यावर तैनात करू शकतो

बॉस अजून एकाला आपल्याबरोबर देईल? ... मला तर शंका वाटते जॉनने आपली शंका व्यक्त केली.

बघूया तर खरं...

सॅम बॉसचा फोन डायल करू लागला. तेवढ्यात सॅमचा फोन वाजला. जॉनने त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले. फोन बॉसचाच होता. सॅमने ताबडतोब फोन अटेंड केला.

एक ॲड्रेस सांगतो लिहून घ्या... तिकडून बॉस म्हणाला.

यस सर ....प्लीज प्रथम बॉस काय म्हणतो ते ऐकून घ्यावं आणि मग आपली प्रगति त्याला सांगावी असा विचार करीत सॅम म्हणाला.

सॅमने जॉनच्या खिशातलाच पेन आणि एक कागद ॲड्रेस लिहिण्यासाठी घेतला.

याहोता क्राफ्ट, बी—1011 हिलव्ह्यू अपार्टमेंटस, केटी लेन—3 तिकडून बॉसने एक ॲड्रेस सांगितला.

हा तर त्यांच्याजवळ असलेला तिसरा ॲड्रेस होता...

पण बॉसला कसा काय कळला हा ॲड्रेस?...

आपण तर सांगितलेला नाही....

...तिथे तुम्ही ताबडतोब जा... पाचवा खूनसुध्दा झालेला आहे बॉस पुढे म्हणाला.

तिकडून फोन कट झाला. बॉसला हा ॲड्रेस कसा कळला हे कोडे सॅमला उलगडले होते.

आपल्याला उशीर झाला हताश होऊन सॅम जॉनला म्हणाला.

काय झालं? जॉननं आश्चर्याने विचारले.

पाचवा खूनसुध्दा झालेला आहे ... याहोता क्राफ्टचा

भिंतीवरचा शेवटचा

मेसेज सायरन वाजणारी पोलिसांची गाडी एका अपार्टमेंटच्या समोर रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. गाडीतून घाईघाईने जॉन आणि सॅम उतरले. अजून प्रेसवाले लोक घटनास्थळी येऊन थडकले नव्हते. तेवढंच जॉनला बरं वाटलं. उतरल्याबरोबर जवळजवळ धावतच ते लिफ्टजवळ पोहोचले. दोन्हीही लिफ्ट एंंगेज पाहून जॉनने लिफ्टचं बटन दोन तीन वेळा दाबून रागाने लिफ्टच्या दरवाज्याला एक लाथ मारली. यावेळीसुध्दा खून दहाव्या मजल्यावरच झाला होता. एका क्षणापुरता जॉनने जिन्याने जाण्याचा विचार केला. पण दहाव्या मजल्यावर जिन्याने जाण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहणं केव्हाही शहाणपणाचं होतं. वारंवार आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटून जॉन लिफ्टची वाट पाहू लागला. सॅमसुध्दा अधीर होऊन येरझारा घालू लागला. मधूनच तो कधी एका लिफ्टसमोर उभा राहत होता तर कधी दुसर्‌या लिफ्टसमोर उभा राहून उगीचच लिफ्टचं बटण दाबत होता. तेवढ्यात एकदाची डाव्या बाजूची पहिली लिफ्ट उघडली. दोघंही घाईघाईने आत घुसले. आत जाताच सॅमनं 10 नंबरचं बटन दाबलं. लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्टच्या डिस्प्लेवर फ्लोअर दर्शविणारा नंबर 1... 2... 3... 4... असा दिसू लागला.

लिफ्टचे दार उघडता क्षणीच दोघंही बाहेर येऊन इकडे तिकडे गोंधळून बघू लागले. इमारतीचा नकाशा जरा किचकटच होता. जॉनने लिफ्टमधे घुसणार्‌या एका माणसाला विचारले,

फ्लॅट नं. 15 कुठे आहे

तो माणूस नुसताच उजवीकडे हाताने इशारा करीत लिफ्टमध्ये घुसला. सॅम अजून काही विचारणार तेवढ्यात लिफ्टचे दार बंदसुध्दा झाले. तो माणूस लिफ्टमध्ये गुडूप झाला होता. दोघांनी अजून कुणी विचारण्यासाठी सापडतो का ते बघितले. जवळपास कुणीच दिसत नव्हतं. त्यांनी एक क्षण विचार केला आणि ते दोघंही उजवीकडे निघाले.

जॉनने फ्लॅटच्या दारावर बघितले. 1015 नंबर लिहिलेला होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहून संमतीदर्शक इशारा केला. दोघंही सतर्क झाले. सॅमने आपली बंदूक काढली आणि समोर जावून हळूच दार ढकलले. दार उघडेच होते. सॅम आणि जॉन सावधपणे आत घुसले. आत सर्वत्र पसारा पडलेला होता. आणि सर्व पसार्‌याच्या मध्ये हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्‌यात एक शरीर पडलेले होते.

माय गॉड सॅमच्या तोंडून निघाले.

लेट मी चेक हिज बीट

जॉनने खाली पडलेल्या शरीराची नाडी बघितली.

जॉनने सॅमकडे बघितले.

सॅमने जॉनला इशार्‌यानेच विचारले.

ही ईज डेड जॉन निराशेने म्हणाला.

सॅमने निराशेने एक सुस्कारा सोडला. आणि मग तो सर्व फ्लॅट धुंडाळू लागला.

जॉनने अपेक्षेप्रमाणे समोर भिंतीवर बघितले. यावेळीही रक्ताचे शून्य काढण्यास खुनी चुकला नव्हता. शून्याच्या मधे रक्ताने लिहिण्यासही तो विसरला नव्हता. दुरून खुन्याने काय लिहिले होते ते ओळखू येत नव्हते. म्हणून जॉन भिंतीच्या जवळ जावून बघू लागला.

शून्य जिथून सुरू होते तिथेच ते संपते भिंतीवर लिहिलेले होते.

भिंतीवरच्या त्या मेसेजकडे बघून जॉन विचार करू लागला. तिकडे आत सॅमच्या हुडकण्याचा आवाज येत होता.

विचार करता करता अचानक जॉनच्या चेहर्‌यावर भीतीची सावली पसरली.

सॅम... जॉनने सॅमला थरथरतच मोठयाने आवाज दिला.

सॅम चटकन आपलं काम सोडून धावतच बाहेर आला.

काय झालं? सॅम जॉनच्या भीतीने काळवंडलेल्या चेहर्‌याकडे पाहत म्हणाला.

एव्हाना जॉनने दरवाज्याकडे धाव घेतली होती आणि सॅम काही समजण्याच्या आतच जॉन दरवाज्याच्या बाहेर सॅमच्या नजरेआड झाला होता.

दरवाज्याच्या बाहेरून जॉनचा आवाज आला,

चल लवकर चल आपल्याला घाई केली पाहिजे

कुठे? सॅमने दरवाजाच्या बाहेर जात विचारले.

बाहेर व्हरंड्यात जॉन लिफ्टकडे धावत सुटला होता. सॅमला जॉन का धावतो आहे, काहीच कळत नव्हते. फक्त त्याला जॉनच्या हालचालींवरून काहीतरी विपरीत घडल्याची किंवा घडण्याची शक्यता असल्याची चाहूल लागली होती.

गोंधळून सॅमसुध्दा त्याच्या मागे धावायला लागला.

लिफ्टजवळ पोहचून जॉनने लिफ्टचं बटण दाबलं. संयोगाने लिफ्ट जवळच होती. लिफ्टचं दार उघडलं.

जॉनने सॅमकडे बघत म्हटले, चल लवकर ... आपल्याला ताबडतोब निघालं पाहिजे

जॉन सॅमसाठी न थांबता लिफ्टमध्ये घुसला. सॅमने अजून जोराने धावत लिफ्टचा दरवाजा बंद व्हायच्या आत लिफ्ट गाठली. तोसुध्दा त्याच्या मागे लिफ्टमध्ये घुसायला लागला.

आत जाता जाता सॅमने पुन्हा विचारले, पण ... कुठं जायचं आहे आपल्याला?

सांगतो जॉन आपल्याला लागलेली धाप व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात म्हणाला.

सॅम लिफ्टमध्ये घुसून जॉनकडे आश्चर्याने पाहत त्याच्या शेजारी जावून उभा राहिला आणि हळू हळू लिफ्टचा दरवाजा बंद झाला.

शेवटचे सावज

जॉनने धडधडत्या हृदयाने फ्लॅटचा दरवाजा ढकलला. दार उघडंच होतं. आतलं दृय पाहून जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याच्या समोर हॉलमध्ये त्याची प्रिय अँजेनी रक्ताच्या थारोळ्‌यात पडलेली होती. आणि समोर भिंतीवर रक्ताने एक मोठे शून्य काढलेले होते. जॉन तिच्याजवळ गेला. त्याला जाणवले की त्याच्या पायातली पूर्ण शक्ती क्षीण झालेली आहे. तो मटकन खालीच बसला. कसेबसे सावरून त्याने अँजेनीची नाडी बघितली आणि तो तिच्या हातांत आपले तोंड खुपसून ओक्साबोक्शी रडू लागला.

अँजेनीचे प्राणपाखरू उडून गेले होते...

सॅमला काय करावे काही सुचत नव्हते. त्याने धीराचा एक हात जॉनच्या खांद्यावर ठेवला. त्याच्या हाताला जॉनच्या हुंदक्याचे धक्के एखाद्या धरणीकंपाच्या भयानक धक्याप्रमाणे जाणवत होते. सॅम जॉनच्या शेजारी गुडघ्यावर बसला.

खुन्याने आपले शेवटचे सावजसुध्दा बरोबर हेरले होते.

सॅमला शून्य जिथून सुरू होते तिथेच संपते या गूढ वाक्याचा अर्थ लागला होता.

आणि शून्य या शब्दाच्या शेवटच्या अक्षराची महतीसुध्दा त्याला कळली होती.

अँजेनी — अँजेनीचे नावसुध्दा श्एश् या अक्षरानेच सुरू होत होते...

जॉनला आपले कर्तव्य पुकारत होते.

खुनी एवढ्यातच खून करून पसार झालेला होता...

म्हणजे तो एवढ्यातच कुठेतरी असला पाहिजे....

काहीतरी करायला पाहिजे....

पण जॉनचे हातपाय पूर्णपणे गळून गेले होते. त्याच्यात उठण्याची शक्तीच शिल्लक राहिली नव्हती.

खुनी अजून जास्त दूर गेलेला नसावा कसाबसा जॉन सॅमला म्हणाला.

सॅमने स्वतरूला सावरले आणि खाडकन उभा राहून तो आपल्या कामाला लागला.

जशास तसे

रात्रीची वेळ होती. डॅनने आपल्या घराचा दरवाजा तिरका करून बाहेर डोकावून बघितले. चहूकडे गडद अंधार होता. तो हळूच घरातून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याने सभोवार नजर फिरवून आपणास कोणी बघत तर नाही ना याची खात्री केली. कुणी बघत नसल्याची खात्री होताच तो घराच्या कंपाऊंडच्या बाहेर आला. पुन्हा रस्त्यावर त्याने चहूकदे एकदा आपली नजर फिरविली. रस्त्यावर सामसूम होती. आता तो उजवीकडे वळून चालू लागला. अंधारात झपाझप पाऊले टाकीत. त्याच्या चालण्याच्या वेगाबरोबरच त्याच्या विचारांनीही वेग धरला. मागच्या वेळी आपल्याला खुन्याने भरपूर बक्षिसी देऊन खुश केले होते. याही वेळी जॉन, सॅम आणि बॉसला पुढचा खून कुणाचा होणार आहे याची माहिती मिळाल्याचे त्याने खुन्याला ताबडतोब कळविले होते. खुनी त्याच्यावर खूप खुश झाला होता. फिदाच झाला होता. खुन्याने त्याला एक जागा सांगून तिथे तो कल्पनाही करू शकणार नाही एवढी रक्कम ठेवण्याचे कबूल केले होते. आता तो तिथे ते पैसेच घेण्यासाठी निघाला होता. पैशाचा विचार येताच त्याचे मन हुरळून गेले. मागच्या वेळी मिळालेले पैसे दहा पटीने त्याच्या डोळ्‌यासमोर तरळू लागले. आनंदाने त्याचे अंग शहारून गेले. चालण्याचा वेग मंदावला आणि त्याच्या चालण्यात आता एक प्रकारची मस्ती जाणवू लागली होती.

झालं आता हे शेवटचं...

यानंतर अशी बेइमानी करायची नाही...

किंबहुना येवढे पैसे मिळाल्यावर आपल्याला अशी बेइमानी करण्याची पुन्हा वेळसुध्दा येणार नाही....

पैसे मिळाल्याबरोबर नोकरी एकदम सोडायची नाही. नाहीतर कुणाला शंका येईल....

नोकरी टाईमपास म्हणून करायची आणि योग्य वेळ येताच नोकरी सोडून एखादा धंदा टाकायचा....

नाहीतर प्रथम धंदा टाकायचा आणि त्यात जम बसल्यावर नोकरी सोडायची....

डॅनचे विचारचक्र सुरू होते. अचानक त्याला जाणवले की ज्या जागी खुन्याने पैसे ठेवल्याचे आपल्याला सांगितले होते ते ठिकाण आता जवळ आले होते. तो एक क्षण थांबला. पुन्हा सभोवार पाहून तो जिथे पैसे ठेवले होते त्या ठिकाणाकडे निघाला. त्याच्या चेहर्‌यावर आता स्मित तरळत होते. स्थान एकदम निर्जन होते. सगळीकडे अंधार पसरलेला होता. अधून मधून कुत्यार्ंचा विचित्र आवाज येत होता. स्थान कुणालाही भीती वाटण्यासारखेच होते. पण पैशाच्या लालचीने डॅनची सगळी भीती जणू पळून गेली होती. समोर एक मोठे झाड होते.

हेच ते झाड ज्याच्या बुंध्याशी खुन्याने पैसे ठेवले होते...

आता डॅनला त्याच्या शरीरात एकप्रकारची शिरशिरी भरल्यासारखी जाणवत होती. आता काही क्षणच! काही क्षणातच आपण एका मोठया संपत्तीचे मालक होणार. तो उतावीळपणे झाडाच्या बुंध्याशी गेला. तिथे एक मोठा दगड ठेवलेला होता. डॅनने एका क्षणाचीही उसंत न घेता तो दगड तिथून हलविला. जसा डॅनने तो दगड तिथून हलविला एक मोठा स्फोट झाला आणि डॅनचा हात छिन्नविच्छिन्न झाला. त्याच्या शरीरातसुध्दा दगडाचे अणकुचीदार तुकडे घुसले आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो मृत्यूमुखी पडला. त्याला पटले होते की त्याने ठरविल्याप्रमाणे ही त्याची शेवटचीच बेइमानी होती.

आठवणी

रात्रीचा 1 वाजला होता. आज किमान तीनचार दिवस तरी झाले असतील जॉनने स्वतरूला घरात कोंडून घेतले होते. वेळेचं, दिवसाचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. आज पण त्याला भान आलं होतं ते त्याच्याजवळचा मद्याचा स्टॉक संपल्यामुळे. जसं भान आलं तशा त्याच्या सर्व संवेदना जागृत व्हायला लागल्या. त्याला अँजनीबरोबरचा एक एक प्रसंग आठवायला लागला.

तिला त्याने कृत्रिम श्वास देऊन जणू तिच्या श्वासांशी जुळलेले त्याचे नाते...

तिच्या भेटीसाठी नेहमी अधीर असलेले त्याचे मन...

कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करूनही आपसूकच तिच्या घराकडे वळणारी त्याची पावले...

तिच्याशी त्याची प्रथम डेट....

त्याचा तिच्याशी तो उत्स्फूर्त, पवित्र प्रथम प्रणय...

तिच्या श्वासांची उब...

तिच्या प्रेमाचा र्वााव आणि ओलावा...

तिच्यासोबत घालविलेले ते सुटीचे दिवस...

तिच्या चेहर्‌याच्या त्या अवखळ, खट्याळ छटा...

रातोरात एंगेजमेंट रिंग आणून तिला त्याने प्रपोज केले तो क्षण ...

तिचा तो एखाद्या वेलीप्रमाणे बिलगून दिलेला होकार ...

त्याला निराशेच्या गर्तेतून काढणारे तिचे ते प्रोत्साहन...

आणि...

आणि ... तिचा तो निर्घृण खून....

त्याचे डोळे आसवांनी डबडबले...

अश्रू ओघळून गालावरून घरंगळायला लागले...

त्याला स्वतरूचीच चीड यायला लागली होती.

जेव्हा खुनाचे रहस्य उलगडले होते, तेव्हाच त्याच्या का लक्षात आले नाही की पाचव्या खुनानंतर सहावा खून त्याच्या आवडत्या अँजीचाच होणार होता....

त्याच्या ते लक्षात यायला हवे होते...

पण पाचवा खून टाळण्याच्या नादात तो पाचव्या खुनाच्या शोधातच एवढा गुरफटून गेला की त्याला सहाव्या खुनाचा विचारसुध्दा शिवला नाही....

त्याने मनगटाने दोन्ही डोळ्‌यातले अश्रू पुसले. त्याला अजूनही विश्वासच होत नव्हता की ती अशी त्याला एकाकी टाकून गेली आहे. त्याने घरात चहूकडे एक नजर फिरविली.

घर कसं भयाण वाटत होतं....

घर भयाण झालं होतं की त्याचे विचार तसे झाले होते....

त्याने समोरच्या दाराकडे बघितलं. पेपरवाल्याने दाराखालून ढकललेले तीन चार न्यूज पेपर जसेच्या तसे पडले होते. त्याला असं वाटत होतं की ते न्यूजपेपरसुध्दा दाराच्या खालून डोकावून जणू त्याला चिडवित आहेत. तो उठला. दरवाज्याजवळ गेला. एक क्षण त्याला दरवाजा उघडून थोडी बाहेरची मोकळी हवा घ्यावी असं वाटलं. पण नको, आता या एकांतातच बरं वाटायला लागलं होतं. त्याने दरवाज्याखालचे न्यूज पेपर आत ओढले. तिथेच उभं राहून त्याने ते चाळले. सगळीकडे दंगा, जाळपोळ, लाठीमार याच्याच बातम्या होत्या. एवढंच नाही तर भारतातही प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. बर्‌याच ठिकाणी भारतातही दंगे पेटले होते. म्हणजे वातावरण अजूनही निवळलं नव्हतं. अमेरिकन लोकांनी तर जसा भारतीयच नाही तर जे कुणी इतर दुसर्‌या कोणत्याही देशातील असतील त्यांना हाकलून लावण्याचा चंगच बांधला होता. आणि भारतात भारतीय लोकांनी मल्टीनॅशनल कंपन्या तिथून हाकलून लावण्यासाठी धरणे धरायला सुरवात केली होती. त्याने न राहवून ते न्यूज पेपर कोपर्‌यात एका जागी टाकले आणि पुन्हा जिथून उठून गेला होता तिथे जावून बसला. समोर टी पॉयवर मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग जमा झाला होता आणि बाजूला त्याचा रिकामा ग्लास निवांत पहुडला होता. त्याने मग समोरच्या टी पॉयवरून रिमोट घेऊन टी. व्ही. सुरू केला. एक एक चॅनल तो समोर जाऊ लागला. कोणत्याही एका चॅनलवर थांबण्याची त्याला इच्छा होईनाशी झाली. सगळीकडे त्याच त्या बातम्या जाळपोळ, दंगे लाठीमार, अश्रूधूर. त्याला कंटाळा आला. त्याने रिमोटचे बटण कचकन दाबून टिव्ही बंद केला. आणि रिमोट बाजूच्या सोफ्यावर फेकून दिला.

त्याला जाणवत होते की आपल्याला या नैराश्यातून आता बाहेर पडायला हवे...

पण कसे ?...

तेच त्याला कळत नव्हते...

जर आपण आपल्याला एखाद्या कामात गुंतवून घेतले तर?...

हो हा यातून निघण्याचा मार्ग चांगला आहे...

पण डिपार्टमेंटनेही त्याच्याकडे पाठ फिरवली होती. अजूनही त्याला कामावर रूजू होण्याची परवानगी नव्हती ...

आणि ती हे सगळं निवळल्याशिवाय मिळण्याची शक्यताही नव्हती...

तो उठून उभा राहिला. आणि हॉलमध्ये येरझारा घालू लागला.

अजूनही जर आपण खुन्याला पकडू शकलो तर?...

कमीत कमी हे बाहेर बिघडलेलं वातावरण निवळण्यास तरी मदत होईल. पण खुनी हा एक नसून एक संघटनाच असण्याची जास्त शक्यता होती. संघटना असली म्हणून काय झालं?...

त्या संघटनेतला एक जरी सदस्य आपल्या हातात आला तर एक महत्वाचा दुवा मिळविल्यासारखे होईल...

नाही, आपल्याला काही तरी केलेच पाहिजे...

तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर अंधारात पाहू लागला. नुसता शून्यात. त्याच्या मुठी आवळू लागल्या.

अँजेनीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी तरी आपल्याला काहीतरी केलेच पाहिजे...

पण कुठून सुरवात करायची?..

जंगलातलं एखादं झाड जर पेटलं तर ते विझवणं सोपं असतं पण इथं तर हा वणवाच लागलेला आहे...

मग त्याने पुन्हा येरझारा मारत केस पहिल्यापासून पुन्हा आठवणं सुरू केलं.

न जाणो कुठे एखादा मुद्दा सुटला असला तर?...

पहिला खून ...

दुसरा खून ....

तिसरा खून ....

एकदम त्याच्या डोक्यात आले की—

तिसर्‌या खुनाच्या वेळी जे प्रेत आपल्याला बिल्डींगच्या खाली सापडले, त्याचा नक्कीच खुनाशी काहीतरी गहन संबंध असावा...

नंतर आपण ज्याचे प्रेत सापडले त्याच्या घरावर धाड घातली होती... तिथे एकही फिंगरप्रिन्ट आढळू नये!...

तिथल्या कॉम्प्यूटरची हार्ड डिस्कसुध्दा गायब झाली होती...

याचा अर्थ त्याचा खुनाशी नक्कीच काहीतरी दाट संबंध होता...

तो बंगला अजूनही पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्यावर कुणीच आपला हक्क सांगितलेला नव्हता.

इथेच आपल्याला काहीतरी साखळीतील एखादी सुटलेली कडी सापडू शकते...

जॉनला एकदम उत्साह वाटू लागला. करण्यासारखे काहीतरी त्याला सापडले होते.

त्या बंगल्याची पुन्हा एकदा व्यवस्थित पाहणी केली तर?...

पण चाव्या तर पोलिसांजवळ होत्या...

चला आता प्रथम इथून बाहेर पडायला पाहिजे...

तिथे गेल्यावर पुढे काय करायचे ते बघू...

त्याने स्वतरूचे सर्व निराशायुक्त विचार झटकून टाकले आणि एका मजबूत निश्चयाने तो घराच्या बाहेर पडला.

आर्यभट्ट

कमांड 2 निश्चिंत होऊन खुर्चीवर रेलून बसला होता. त्याच्यासमार टीव्ही सुरू होता. पण त्याचे लक्ष टीव्हीकडे कुठे होते? तो तर आपल्याच तंद्रीत होता. बॉसने आत्तापयंर्ंत सांगितलेली सर्व कामे त्याने चोख बजावली होती. एकंदरीत बॉसही त्याच्यावर खुा वाटत होता. सगळ्‌यात महत्वाचे म्हणजे कमांड च्या खुनाची शंका बॉसला आली नव्हती. मजा म्हणून अधूून मधून तो टिव्हीवरचे चॅनल्स बदलून बातम्यांचे चॅनल्स बघत होता. त्या जाळपोळीच्या , लाठीमार, दगडफेक दंग्याच्या बातम्या पाहून त्याचे मन मोहरून जात होते. त्याच्या चेहर्‌यावर एक वेगळेच स्मित पसरले होते. तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. आणि अचानक तो उठून खुर्चीवर ताठ बसला.

असं सुस्त राहून चालणार नाही...

आपल्याला आता पुढच्या कारवाईच्या मागे लागले पाहिजे...

तो खुर्चीवरून उठला. त्याने तिथेच दोनचार येरझारा घातल्या आणि मग काहीतरी मनाशी निश्चित करून त्या खोलीत कोपर्‌यात ठेवलेल्या कपाटाजवळ गेला. कपाट उघडून त्याने कपाटाचे सगळ्‌यात खालचे ड्रावर उघडले. ड्रावरचा बॉक्स पूर्णपणे बाहेर काढून खाली त्याच्या पायाशेजारी ठेवला. ड्रावर काढल्यानंतर झालेल्या पोकळीत मग त्याने आतला चोरकप्पा उघडला. त्या कप्प्यातून चाचपडून त्याने काहीतरी काढून आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशात कोंबले. नंतर त्याने तो चोरकप्पा व्यवस्थित बंद केला. पायाजवळचा ड्रावर उचलून त्याच्या पहिल्या जागी व्यवस्थित ठेवला आणि कपाट बंद करून तो कॉम्प्यूटरजवळ जावून उभा राहिला. कॉम्प्यूटर सुरू केले आणि कॉम्प्यूटर बूट होण्याची वाट पाहत तो खोलीत येरझारा घालू लागला.

पुढची कारवाई करण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित पूर्वतयारी केली पाहिजे...

आपलं उद्दिट अजूनही अपूर्ण आहे...

ज्या उद्दिटासाठी आपण कमांड चा खून करण्याची रिस्क घेतली होती, ते अजून तरी आपल्या दृटीक्षेपात आलेलं दिसत नव्हतं...

त्याने उजव्या पॅन्टच्या खिशातून आताच कपाटातून काढलेलं पेन ड्राईव्ह काढलं. पेनड्राईव्हकडे पाहत तो विचार करू लागला.

पूर्वतयारी म्हणून आपल्याला बॉसच्या बाबतीत जे मटेरीयल कमांड च्या कॉम्प्यूटरवर मिळालंं त्याची पुन्हा एकदा व्यवस्थित उजळणी करायला पाहिजे...

अचानक कमांड 2 येरझारा घालता घालता थांबला. त्याने कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितले. कॉम्प्यूटर बूट झाला होता. कॉम्प्यूटरच्या जवळ जावून प्रथम त्याने पेन ड्राईव्ह कॉम्प्यूटरला लावले. खुर्ची ओढून कॉम्प्यूटरच्या समोर बसत एखाद्या जादूगाराने हातसफाई करून जादू करावी तसे तो कॉम्प्यूटरला कीबोर्ड आणि माऊसच्या द्वारे वेगवेगळे कमांड द्यायला लागला. त्याने पूर्वी कमांड च्या मेलबॉक्समधून जी महत्वाची फाईल आपल्या पेन ड्राईव्हवर कॉपी करून घेतली होती ती उघडली. तो एक रिसर्च पेपर होता. पेपरचं टायटल होतं.

आर्यभट्ट्‌ाचे साहित्य.

त्याचा अंदाज होता की या पेपरमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला भवियात अशी काही गोट मिळणार होती की ज्याद्वारे त्याचा फायदाच फायदा होणार होता. कमांड 2च्या ओठांवर एक स्मित तरळलं. कदाचित त्याला भवियामध्ये जो फायदा होणार होता त्याच्या नुसत्या कल्पनेने तो हुरळून गेला असावा. तो त्या पेपरमधले महत्वाचे मुद्दे्‌ वाचू लागला...

...भारतीय गणित आणि खगोलशास्त्राची सुरवात कोणी केली हे सांगणं जरी कठीण असलं तरी भारतीय वेदात गणित आणि खगोलशास्त्राची सर्व माहिती उपलब्ध आहे. अनेक ऋषींनी पंचांगाचे नियम, नक्षत्र विभाजन वैदिक कार्यासाठी आवश्यक तिथी आणि मुहूर्त निर्धारित करणे, ग्रहण, अमावस्या इत्यादि माहिती देण्यासाठी सर्व पध्दती विकसित केल्या होत्या. काळाबरोबर पैतामह सिध्दांत, वासिठ सिध्दांत, रोमक सिध्दांत, पौलिक सिध्दांत इत्यादि विकसित झाले. पण ते हळू हळू जुने होऊन त्यांचे अचूक परिणाम येत नव्हते. त्यामुळे त्याकाळी लोकांचा त्यावरचा विश्वास उडत चालला होता. पण कालांतराने आर्यभट नावाच्या एका विद्वानाने गणित आणि खगोलशास्त्राविायीच्या ज्ञानातील त्रुटी दूर करून त्या ज्ञानाला नव्याने प्रस्तुत केले.

भारताच्या इतिहासात ज्याला श्गुप्तकालश् किंवा श्सुवर्णयुगश् म्हणतात, त्या काळात भारताने साहित्य, कला आणि विज्ञान या क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती केली. विज्ञानाच्या क्षेत्रात गणित, रसायनशास्त्र आणि जोतियशास्त्र या विायात विशेा प्रगती झाली. त्या काळात आर्यभट नावाचे एक प्रसिध्द गणितज्ञ आणि जोतियकार होऊन गेले. ते सध्याच्या बिहारराज्याची राजधानी पटना (त्यावेळचे पाटलीपुत्र) च्या जवळ कुसुमपुर या गावी राहत होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल सन्‌ 476 ला आणि मृत्यू सन्‌ 520 ला झाला होता. त्यावेळी बौध्द धर्म आणि जैन धर्म खूप प्रचलित होता. पण ते सनातन धर्माचे अनुयायी होते. त्यांनी गणित आणि जोतिय या विायात बरेच महत्वपूर्ण आणि त्या काळाच्या दृटीने विस्मयकारी संशोधन केले. त्यांनी आपले संशोधन ग्रंथरूपात शब्दबध्द करून पुढच्या पिढ्यांना ते प्राप्त व्हावे याची व्यवस्था करून ठेवली होती. त्यावेळी मगध स्थित नालंदा विश्वविद्याल हे ज्ञानदानाचे प्रमुख आणि प्रसिध्द केंद्र होते. तिथे देशातून आणि परदेशातून विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. तिथे खगोलशास्त्राच्या अध्ययनासाठी एक विशेा विभाग होता. एका प्राचीन श्लोकानुसार आर्यभटांनी नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपतीपदसुध्दा भूाविले होते.

आर्यभटांनी लिहिलेल्या तीन ग्रंथाची माहिती सद्यरूस्थितीत उपलब्ध आहे. दशगीतिका, आर्यभट्टीय आणि तंत्र. पण जाणकारांच्या मते त्यांनी अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे. श्आर्यभट्ट सिध्दांतश् पण त्याचे फक्त 34च श्लोक सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या या ग्रंथाचा सातव्या शतकात जास्त वापर होता. पण हा ग्रंथ बाकीच्या ग्रंथाप्रमाणेच वापरात असतांना त्याचाच फक्त असा का लोप पावावा? हे एक अनाकलनीय कोडे आहे.

आर्यभट हे पहिले आचार्य होते की ज्यांनी ज्योतिा गणितात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचा सामावेश केला आहे. श्आर्यभट्टीयश् ग्रंथात त्यांनी ज्योतियशास्त्राच्या मूलभूत सिध्दांताची ओळख करून दिली आहे. या ग्रंथात 121 श्लोक आहेत जे त्यांनी चार खंडात विभागित केले आहेत.

गीतपादीका नावाच्या पहिल्या खंडात ग्रहांचा परिभ्रमण काळ, राशी , आकाशातील ग्रहांच्या कक्षा या विायांवर प्रकाश टाकला आहे.

गीतपाद नावाच्या दुसर्‌या खंडात त्यांनी गणिताचे

वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ज्या (ेपदम) इत्यादिंचे

विश्लेान केले आहे.

त्यांनी वृताचे व्यास आणि परिधी यातील संबंध ज्याला आपण

पाई(च्प) म्हणतो त्यांनी तो 3.1416 एवढा, म्हणजे जवळ जवळ बरोबर असा काढला होता.

या ग्रंथात त्यांनी बीजगणितातले

(अ़ब)2 = (अ2़2अब़ब2)

चे सुध्दा विस्तृत विलेशण केले आहे.

या ग्रंथाच्या श्कालक्रियाश् या तिसर्‌या खंडात

काळाचे वेगवेगळे भाग, ग्रहांचे परिभ्रमण , संवत्सर, अधिक मास, क्षय तिथी, वार ,सप्ताह

यांची गणना याचे विवेचन दिले आहे.

याच ग्रंथाच्या एका जागी त्यांनी संक्षिप्त स्वरूपात संख्या लिहिण्याची पध्दत सांगितलेली आहे.

तिसरा खंड गोलपाद नावाने प्रचलित असून त्यात खगोल विज्ञानाची माहिती आहे.

सूर्य, चंद्र, राहू ,केतू आणि इतर ग्रहांची दृयादृय परिस्थिती , दिवस आणि रात्रीची कारणे, राशींचा उदय, ग्रहणाची कारणे इत्यादि विवरणही या खंडात आढळते.

आजच्या काळातले मोठमोठे वैज्ञानिक अजूनही अचंब्याने तोंडात बोट घालतात की त्या काळात आर्यभटाने पाई (च्प) ची किंमत, वृत्ताचे क्षेत्रफळ , ज्या (ेपदम) इत्यादिंचे विश्लेान कसे केले असावे.

आर्यभट हे युगप्रवर्तक होते. त्यांनी आपल्या वेळच्या प्रचलित अंधश्रध्दांना खतपाणी न घालता खोडून काढले. त्यांनी जगाला सांगितले की पृथ्वी चंद्र आणि अन्य ग्रहांना स्वतरूचा प्रकाश नसतो आणि ते सूर्यामुळे प्रकाशित होतात. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तिथे दिवस आणि जिथे सूर्यप्रकाश पडत नाही तिथे रात्र असेही त्यांनी सांगितले होते. पृथ्वीवरील वेगवेगळ्‌या शहरातील सूर्य उगविण्याची आणि सूर्य मावळण्याची वेळ यात का फरक असतो याच्या कारणांचे विश्लेानही त्यांनी विस्तृतरित्या केले आहे. त्यांनी हे पण जाहिर केले की पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतरूच्या आसाभोवती फिरते. त्यांनी या मान्यतेला तोडले की पृथ्वी ही ब्रह्मांडाचा केंद्र आहे आणि सूर्य आणि अन्य ग्रह त्याला प्रदक्षिणा घालतात. त्यांनी पृथ्वीचा आकार, गती, आणि परिधीचा अंदाज बांधला होता आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या बाबतीत संशोधन केले होते.

त्यांनी त्रेचाळीस लाख वीस हजार र्वााचे एक महायुग सांगितले आणि एका महायुगाला चार भागात

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग

असे विभागले. या चारही युगाचा काळ त्यांनी दहा लाख ऐंशी हजार र्वा एवढा सांगितला आहे.

भवियात चंद्र आणि सूर्य ग्रहणे केव्हा केव्हा होतील हे काढण्यासाठी त्यांनी एका सूत्राचा विकास केला आणि त्या सूत्रानुसार त्यांची भवियवाणी कधीच चुकीची ठरली नाही.

ज्योतियाच्या व्यतिरिक्त गणितशास्त्रातसुध्दा आर्यभटांनी नवीन नवीन सिंध्दांतांचा शोध लावला. भारतात सर्वप्रथम त्यांनी बीजगणिताच्या ज्ञानाचा विस्ताराने प्रचार केला. शून्य सिध्दांत आणि दशमलव संख्याप्रणालीचा आविश्कार भारतात सर्वप्रथम कोणी केला हे सांगणे जरी कठीण असले तरी आर्यभटांनी त्यांचा प्रयोग आपल्या ग्रंथात कुशलतेने केलेला आढळतो. त्यांचे यश भारतातच नव्हे तर बाहेर विदेशातसुध्दा पसरले होते. अरब विद्वानांना त्यांच्या जोतिय ज्ञानाचा खूप अभिमान होता आणि ते त्यांना श्अरजभटश् नावाने ओळखीत.

तर असे हे आर्यभट ज्यांनी बीजगणिताचा विकास केला होता आणि ज्योतिा गणितात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचा सामावेश केला आहे, त्यांना भारतीय गणितात आणि जोतियशास्त्रात मैलाचा दगड म्हणून उल्लेखले तर वावगे होवू नये . त्या काळी जवळ जवळ सर्व ग्रंथ श्लोकांच्या स्वरूपात असत आणि त्यांना मुख्यत्वे पाठांतर करून एका पिढीतून दुसर्‌या पिढीकडे सोपविले जात असे. त्यांचा श्आर्यभट्ट सिंध्दांतश् हा ग्रंथ सातव्या शतकात मोठया प्रमाणात उपयोगात असूनही तो पुढे लोप पावावा ही गोट त्या ग्रंथातल्या विद्येविायी एक गूढ कुतूहल जागृत करते. त्यांचा अचूक निका असलेल्या गणित या विायाशी आणि त्यांनी जे ज्ञान त्यांच्या ग्रंथात दिले ते अचूक असल्याची ग्वाही पाहता त्यांचा जो ग्रंथ लोप पावला त्यात जोतियविद्येविायी असे काही ज्ञान असावे की जे गुप्त ठेवण्याचा कुणालाही मोह व्हावा असे वाटते. असेही असू शकते की ते ज्ञान चुकीच्या हातात सापडल्यास विघातक होवू शकले असते...

कमांड 2ने जरी हा रिसर्च पेपर आधीही वाचला होता. तरीही कमांड 2चं रक्त सळसळायला लागलं. बॉसची शून्याची, वेदकालीन गणिताची आणि जोतियाशास्त्राची आवड पाहता आणि त्यांचं अचूक योग्य वेळ ठरविण्याचं कौशल्य पाहता त्याला जवळजवळ खात्रीच झाली होती की बॉसला श्आर्यभट्ट सिंध्दांतश् हा ग्रंथ सापडला असला पाहिजे. कमांड 2चं आता जवळ जवळ अर्ध , काम झालं होतं पण अर्ध, जे अत्यंत महत्वाचं होतं तेच राहिलं होतं. त्याला सगळ्‌यात प्रथम बॉसचा पत्ता लागणं फार आवश्यक वाटत होतं. मागे एकदा बॉसचा फोन आला होता तेव्हा त्याचा नंबर त्याच्या फोनवर आला नव्हता. बॉसने ही करामत कशी केली होती कोण जाणे. पण तरीही त्याने बॉसला शोधण्याचा चंगच बांधला होता. त्याने टेलीफोन कंपनीत जावून बॉसला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला होता. टेलिफोन कंपनीवाले त्याला विशेा काही मदत करू शकले नव्हते पण टेलिफोन कंपनीला एक वेगळाच शोध लागला होता. त्यांची फ्रिक्वेन्सी कोणीतरी चोरून वापरीत आहे याचा. त्याच्या व्यतिरिक्त फोन ढोबळमानाने कोणत्या भागातून आला होता ते एवढच सांगू शकले होते. जो एरिया त्यांनी सांगितला होता तो बराच मोठा होता. आणि बॉसचं न नाव न चेहरा कमांड 2ला काहीच माहित नसल्याने बॉसला शोधणंं कठीण होऊन बसलं होतं. तरीही जवळपास रोजच कमांड 2 त्या एरियात वेड्यासारखा फिरायचा. आणि जेव्हा फिरून फिरून थकून जायचा तेव्हाच घरी परत यायचा. पण बॉसचा पत्ता लागण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. कदाचित इतके वेळा तो त्या एरियात वेड्यासारखा फिरला, न जानो बॉस त्याच्या समोरूनसुध्दा गेला असावा. पण त्याला तो ओळखणार तरी कसा होता?

रात्री बेरात्री

रात्रीचे अडीच वाजले होते. शहराच्या भयाण शांततेतून एकटाच जॉन गाडीतून भरधाव वेगाने फिरत होता. आजकाल दंगे सुरू असल्याने रस्ते लवकरच स्मशानवत होत. अन आता तर रात्रीचे अडीच वाजल्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. आपल्याच धुंदीत एका चौकातून आपली गाडी भरधाव वेगाने नेत असता जॉनला मागून सायरनचा आवाज ऐकू आला. त्याने मिरर मध्ये बघितले. एक पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करीत होती. जॉनने —

गाडी थांबवावी की नाही?...

एक क्षण विचार केला आणि मग गाडीचा ब्रेक दाबला. त्याने आपली गाडी रस्त्याच्या एका कडेला लावली. मागून पोलिसांची गाडी येऊन त्याच्या गाडीच्या पुढे येऊन थांबली. प्रथम पोलिसांनी जॉनच्या गाडीकडे त्यांच्या गाडीतूनच डोकावून पाहिले. एव्हाना जॉन उतरून त्याच्या गाडीच्या बाहेर आला होता. दोन पोलीस उतरून त्याच्या जवळ चालत आले.

इतक्या रात्री कुठे जात आहात आपण? एक पोलिसाने जवळ येता येता दुरूनच विचारले.

जॉन काहीच बोलला नाही. दोघंही त्याच्या जवळ येऊन थांबले. त्यातला दुसरा जॉनकडे निरखून पाहू लागला.

जॉन सर तुम्ही! दुसरा एकदम जॉनला ओळखत म्हणाला.

जॉन त्याला ओळखत नव्हता पण कदाचित तो त्याला ओळखत असावा. नाही तरी शहरात सुरू असलेल्या खुनाच्या केसमुळे जॉन चांगलाच प्रकाश झोतात आला होता. तो बडतर्फ व्हायच्या आधी जवळ जवळ रोज त्याचा फोटो एकतर वर्तमान पत्रात यायचा किंवा टिव्हिवर त्याच्याबद्दल काहीतरी यायचेच.

हो मी जॉन... झोप येत नव्हती म्हणून शहरात सहजच एक चक्कर मारत आहे जॉन म्हणाला.

नो प्रॉब्लेम सर... यू कॅरी अॉन प्लीज तो विनम्रता दाखवित म्हणाला.

जॉन गाडीमध्ये बसला. ते दोघं तिथेच जॉनच्या गाडीची सुरू होण्याची वाट पाहत उभे राहिले . जॉनने गाडी सुरू केली आणि त्यांना हात दाखवून तो पुन्हा भरधाव वेगाने तिथून निघून गेला.

जॉनची गाडी एका निर्मनुय परिसरात एका घराजवळ येऊन थांबली. ते कमांड चे घर होते. तिसर्‌या खुनाच्या वेळी जेव्हा कमांड चे बिल्डींगखाली पडलेले प्रेत सापडले होते तेव्हा त्यांनी या घरावरच धाड घालून कसून तलाशी घेतली होती. गाडी रस्त्याच्या कडेला लावून तो गाडीतून उतरला. प्रथम त्याने चहूबाजूंनी एक नजर फिरविली. चहूकडे एक भयाण शांतता पसरलेली होती. रात्रीची ती वेळ आणि शहरात दंग्यांचा हैदोस. तो चालत जावून बंगल्याच्या फाटकाजवळ गेला. गेटला कुलूप होतं आणि कुलुपावर पोलीस डिपार्टमेंटचं सिल लावलेलं होतं. त्याने एक चक्कर मारून बंगल्याच्या आवाराच्या भिंतीवरुने कुठून घुसण्याची शक्यता आहे का ते पडताळून पाहिले. आवाराच्या भिंतीवर काटेरी कुंपणासारखी एक तार लावलेली होती. त्याने बघितले की फाटकाच्या उजव्या बाजूला एका जागी वरचं काटेरी कुंपण तुटलेलं होतं. जॉनला तिथून आत जाणं शक्य वाटत होतं.

पण आत जावं का?...

आधीच आपल्याला बडतर्फ केलेलं. आणि अशा परिस्थितीत पोलिसांचं सिल असतांना आपण असे चोरून बंगल्यात गेल्याचं जर कळलं तर पोलिसांना वेगळीच शंका यायची...

काहीही झालं तरी चालेल...

अँजेनी गेल्यापासून तसंही जॉन स्वतरूच्या जिवाबद्दल बेफिकीरच झाला होता. त्याचं विचारचक्र सुरू असतांनाच जॉन कंपाऊंड वॉलवर चढायला देखील लागला. चढणे कठीण जात होते. भिंत उंच होती आणि धरण्यासाठीसुध्दा काहीही नव्हते. जॉनने उडी मारून भिंतीच्या वर चाचपून बघितले — धरण्यासाठी काही सापडते का ते. त्याला भिंतीवर पकडण्यासाठी काहीतरी हातात आलं. त्यानं ते करकचून पकडून तो भिंतीवर चढला. पण चढत असतांनाच त्याला त्याच्या हातात तीव्र वेदना जाणवायला लागली. चढल्यानंतर त्यानं बघितलं तर त्यानं भिंतीच्यावर तुटलेली काटेरी तारच हातात पकडली होती . त्यानं पटकन ती तार हातातून सोडली. हाताकडे पाहिले तर हातातून घळाघळा रक्त वहायला लागलं होतं. तसाच हात पकडून त्याने भिंतीच्या दुसर्‌या बाजूला, कंपाऊंडच्या आतील बाजूस उडी मारली.

कंपाऊंडच्या आत

दुसर्‌या हाताने रक्ताळलेला हात धरीत तो उठून उभा राहिला. रक्त जरा जास्तच वाहत होतं म्हणून त्याने खिशातून रुमाल काढून हाताला घट्ट बांधला. दुखर्‌या हाताला सांभाळत मग तो बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ गेला. तिथेही एक मोठ्‌ठ कुलूप लावलेलं होतं आणि त्या कुलूपालासुध्दा पोलिसांचं सिल लावलेलं होतं. त्याने तिथे उभं राहूनच बंगल्याच्या चहूकडे एक नजर फिरविली. बंगल्याच्या आत जाणं, कमीत कमी इथून तरी, शक्य वाटत नव्हतं. पूर्वी बंगल्याचा तपास करतांना आत तो इतरांच्या सोबतच होता. आणि त्याला माहित होतं की आतली तपासणी त्यांनी फार काळजीपूर्वक केली होती. पण त्याला आठवलं की बाहेरच्या तपासणीला तेवढं महत्व न देता त्याने ती जबाबदारी कुण्या एका नवीन पोलिसावर सोपविली होती. त्याने ठरविलं की प्रथम आपण बंगल्याचा बाहेरचा भाग न्याहाळून पाहू. तसं काही सापडण्याची शक्यता अंधुकच होती कारण बरेच दिवस उलटलेले होते हा बंगला असाच ओसाड पडलेला होता. आणि बंगल्याच्या आतल्या पुराव्यापेक्षा बाहेरचे पुरावे नट होण्याचीच जास्त शक्यता होती.

तरीही एक चान्स घ्यायला काय हरकत आहे....

कदाचित बंगल्याच्या बाजूने किंवा मागून आत जाण्याचा एखादा मार्गसुध्दा मिळू शकतो...

त्याने खिशातून टॉर्च काढला आणि टार्चचा प्रकाश इकडे तिकडे मारत तो बंगल्याच्या उजव्या बाजूने मागे जायला लागला. मधून मधून तो बंगल्यावरही प्रकाशाचा झोत मारून आत जाण्यासाठी एखादी खिडकी दिसते का ते पाहू लागला. खिडक्या होत्या पण खिडक्यांना जाड लोखंडी जाळी लावलेली होती.

तरीही एखाद्या खिडकीची जाळी तुटलेली असू शकते, जसं कंपाऊंडचं कुंपण एका जागी तुटलेलं होतं...

बंगल्याभोवती प्रशस्त मोकळी जागा होती. मोकळ्‌या जागेत गार्डन होतं. पण त्याची आधीही कधी काळजी घेतलेली दिसत नव्हती. गार्डनमध्ये गवत आणि इतर झुडुपे चांगली कंबरेपयंर्ंत उंच दाटीवाटीने वाढलेली होती. जॉन अंधारात टॉर्चच्या सहाय्याने जपूनच त्या गवतातून आणि झुडुपातून रस्ता काढत समोर जात होता. या उंच वाढलेल्या झुडुपांमूळे काही पुरावा जरी असेल तरी सापडणं जरा कठीणच वाटत होतं. पण एक फायदाही होता की जर पुरावा असेलच तर तो नट होण्याचा कालावधी या झुडुपांमूळे वाढण्याची शक्यता होती. इकडे तिकडे टार्चचा झोत मारत आता तो घराच्या मागच्या बाजूला येऊन पोहोचला होता. मागच्या तर दरवाजालाही जाळी लावली होती. त्यामुळे इथूनही आत जाण्याची शक्यता मावळली होती. मग त्याने टार्चच्या प्रकाशात मागची बाजूही पिंजून काढली. काहीही विशेा सापडत नव्हते. हळूहळू गवताच्या आणि झुडपांच्या बुंध्याशी टार्चच्या प्रकाशात शोधत त्याने घराला एक संपूर्ण चक्कर मारली. मोकळ्‌या जागेत तर काही सापडत नव्हतंच. एकाही खिडकीची जाळी तुटलेली दिसत नव्हती.

चला म्हणजे आता तरी आत जाणं शक्य दिसत नाही...

आत जाण्यासाठी पुन्हा कधीतरी आपल्याला सॅमची मदत घ्यायला पाहिजे...

आणि बाहेरही दिवसाच उजेडात काही सापडते का ते पुन्हा एकदा व्यवस्थित शोधणं योग्य राहिल...

असा विचार करून तो कंपाऊंडच्या बाहेर येण्यासाठी वळला. एवढ्यात त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. तो एकदम थांबला. वळून घाईघाईने मग तो बंगल्याच्या डाव्या बाजूने मागे जायला लागला.

बहरलेली वेल

बंगल्याच्या डाव्या बाजूला एका जागी एक फुलांची वेल बहरलेली होती. फुलांचा सुगंधही छान येत होता. ती वेल घराच्या भिंतीचा, खिडकीचा आणि पाईपचा आधार घेत घेत वर टेरेसपयंर्ंत गेली होती. त्याने टॉर्चचा झोत पाडून त्या वेलीकडे खालून वरपयंर्ंत निरखून पाहिले. वेल फुलांनी बहरुन अंगभर झालेली होती. मग पुन्हा त्याने वरून खालपयंर्ंत निरखून पाहिले. वेलीच्या बुडाशी बराच कचरा पडलेला होता. प्लास्टीकच्या रिकाम्या पिशव्या, कागदांचे चूरगळलेले बोळे असा बराच कचरा होता. जॉन उकीडवा बसून तो कचरा हुडकायला लागला. त्याने आपल्या खिशातून एक प्लास्टीकची पिशवी काढली आणि त्यात तो तिथला त्याला जो महत्वाचा वाटला असा कचरा भरू लागला. तिथला कचरा हुडकल्यानंतर त्याने वेलीला बुंध्याला धरून जोरजोराने हलविले. त्याच्या अंगावर फुलांची बरसात होवू लागली. आणि अजूनही धप धप असा काहीतरी पडल्याचा आवाज येऊ लागला. त्याने टॉर्च लावून निरखून बघितले. वेलीच्या गुंत्यातून अजून काही कचरा खाली पडला होता. त्यातला पण काही त्याने थेट आपल्या थैलीत भरला. त्याला प्लास्टीकची एक तोंडाला गाठ मारलेली पिशवी सापडली. पिशवी त्याने हलवून बघितली. आत काहीतरी वाजण्याचा आवाज येत होता.

काय आहे ते नंतर बघूया...

असा विचार करून त्याने ती पिशवीसुध्दा आपल्या थैलीत टाकली.

चला आता बास झालं....

आता आपल्याला निघायला पाहिजे...

जॉनने थैली उचलली आणि परत कुंपणाकडे निघाला.

घरी येता येता जॉनला चार वाजले होते. तो पूर्णपणे थकला होता. प्लॅस्टीकची ती कचर्‌याची बॅग खाली ठेवून दुखर्‌या हाताला सांभाळत त्याने त्याच्या क्वार्टरचे दार उघडले. त्याला आठविले एकदा असेच त्याचा ॲक्सीडेंट झाला असतांना त्याला अँजेनीने सांभाळत घरी आणले होते. आणि क्वार्टरचे कुलूप तिनेच उघडले होते. तिची आठवण येताच त्याचे मन पुन्हा दुरूखाने भरून गेले. त्याला आत्ता आठवले की—

अरे आपण व्हिस्कीची बॉटल तर आणायची विसरूनच गेलो...

आपल्या बाहेर पडण्यामागे व्हिस्कीच्या बॉटल्स संपणे हे एक कारण होते आणि तेच आपण विसरून गेलो...

दार उघडून खाली ठेवलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीकडे पाहून त्याला बरे वाटले.

चला म्हणजे दुरूख विसरण्यासाठी आपल्याजवळ अजून एक काम आहे तर...

या कचर्‌यात काही महत्वाचे सापडते का ते बघणे...

प्लॅस्टीकची पिशवी उचलून तो आत घरात गेला. आतून दार लावून घेतले. आणि सोफ्यावर बसून तो त्या थैलीतला एक एक चुरगाळलेला कागद बाहेर काढून व्यवस्थित करून त्यात काही मिळते का ते बघू लागला.

सगळे कागदाचे चुरगाळलेले बोळे व्यवस्थित करून झाले पण त्याला विशेा असे काहीच मिळाले नाही. मग तो एक एक पॉलीथीनच्या पिशव्या आणि गुंडाळ्‌या काढू लागला. काही पिशव्यात उरलेले आणि कुजलेले शेंगदाणे होते. काहींचा तर घाण वास येत होता. शेवटी त्याला एक गाठ मारलेली पॉलीथीनची पिशवी सापडली. त्याने त्या पिशवीची व्यवस्थित काळजी पूर्वक गाठ सोडली. आतून वास येईल या अंदाजाने तोंड बाजूला केले. पण आतून कसलाही वास आला नाही. त्याने पिशवीत डोकवून बघितले. आत काचेचे तुकडे दिसत होते.

ग्लासचे असावेत...

तो सोफ्यावरून उठून खाली मॅटवर उकीडवा बसला. त्याने ते तुकडे काळजीपूर्वक पिशवीतून खाली मॅटवर ओतले. दोन तीन तुकड्यांवर त्याला रक्ताचे पुसटसे डाग दिसत होते.

अरे वा हे तर खुन्याचं किंवा त्याच्या साथीदाराचं रक्त दिसतय...

त्याने एक रक्ताने भरलेला तुकडा अलगद उचलून हातात घेतला. आपल्याला आता सुतावरून स्वर्ग गाठायला पाहिजे...

पण या रक्तावरून आपण खुन्याबद्दल काही माहिती मिळवू शकतो का? तो सगळ्‌या शक्यता पडताळून पाहू लागला. आणि मग त्याचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. त्या काचेच्या तुकड्यावर त्याला रक्ताने माखलेल्या हातांच्या बोटांचे ठसे उमटलेले दिसले.

यस्स तो आनंदाने ओरडला.

दुसरे रक्ताने माखलेले तुकडेसुध्दा त्याने अलगद उचलून निरखून बघितले. त्यावरसुध्दा हाताच्या बोटांचे ठसे दिसत होते. तसेच ते काचेचे तुकडे हातात घेऊन उठून तो फोनजवळ गेला. काचेचे तुकडे बाजूला टेबलवर ठेवून त्याने एक नंबर डायल केला.

सॅम... मी तुझ्याकडे येतोय... आत्ता लगेच... एक महत्वाचा दुवा हाती लागलेला आहे तो आनंदयुक्त उत्साहाने फोनवर बोलत होता.

रेकॉर्ड डिटेल्स

सॅम आणि जॉन एका कॉम्प्यूटरसमोर बसले होते. कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर रन होत होतं. त्या साफ्टवेअरच्या सहाय्याने ते त्यांना काचेच्या तुकड्यावर सापडलेले हातांचे ठसे त्यांच्याजवळ असलेल्या गुन्हेगारांच्या डाटाबेसमध्ये पडताळून पाहत होते. डाटाबेसमध्ये गुन्हेगारांचे लाखो किंबहुना करोडो हातांचे ठसे साठवून ठेवलेले असतील. त्या प्रत्येकासोबत त्यांच्याजवळ असलेल्या हाताच्या ठश्यांची तुलना करणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम होते. पण आजकाल ते काम्प्यूटरमुळं अगदी सोपं झालेलं होतं. कॉम्प्यूटर एका सेकंदाला कमीतकमी हजारो ठश्यांची तुलना करीत होता. आणि तीही अगदी बारकाईने, एक छोटीशी महत्वाची माहितीही न सोडता. म्हणजे सगळ्‌या ठश्यांसोबत तुलना करायची झाल्यास काही मिनिटांचाच अवधी लागणार होता. ते दोघंही अधीर होऊन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पाहू लागले. मॉनिटरवर किती जणांचे ठसे तपासून झाले हे दाखविणारा एक काऊंटर वेगाने पुढे पुढे सरकत होता. तो काऊंटर शून्यपासून सुरू होऊन एव्हाना सात लाखाच्या वर पोहोचला होता. शेवटी अचानक तो काऊंटर 757092 वर थांबला.

मॉनिटरवर एक मेसेज झळकला मॅच फाऊंन्ड.

दोघांचे चेहरे आनंदाने चमकू लागले. त्यांनी एकमेकांकडे पाहून एक विजयी स्मित केले आणि पुन्हा मॉनिटरकडे कुणाचा रेकॉर्ड आहे ते बघू लागले.

।। रेकॉर्ड डिटेल्स ।।

नांव — विनय जोशी

वय — 30

गुन्हा — फोर्जरी

जन्मखूण — डाव्या हातला सहा बोटं

नागरीकत्व — अमेरिकन

दोघंही गुन्हेगाराची संपूर्ण माहिती वाचू लागले. त्यात गुन्हेगाराचे तीन फोटोसुध्दा होते. एक उजव्या बाजूने घेतलेला, दुसरा डाव्या बाजूने घेतलेला आणि तिसरा समोरून घेतलेला.

ही संपूर्ण माहिती आपल्याला शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर ताबडतोब पाठवायला पाहिजे. सॅम म्हणाला.

हो बरोबर ...पण मला एक भीती वाटते जॉन म्हणाला.

सॅमने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

की यावेळीसुध्दा ही माहिती खुन्यापयंर्ंत पोहोचली तर? जॉनने आपली शंका व्यक्त केली.

यावेळी नाही पोहोचणार. त्या डॅनला त्याच्या करणीची शिक्षा मिळालेली आहे. सॅम म्हणाला.

मग त्यांनी त्या गुन्हेगाराची फोटोसहित सगळी माहिती शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांवर पाठविली आणि तसा कोणी इसम नजरेस पडताच त्यावर फक्त वॉच ठेवून सॅमला कळविण्यास सांगितले. कारण तो फक्त एक दुवा असू शकतो. तो त्यांच्या हातातले फक्त एक खेळणं असू शकतो. खरा गुन्हेगार दुसराच कोणी असू शकतो. सगळ्‌या प्रकरणाच्या तळाशी पोहोचून खर्‌या गुन्हेगारापयंर्ंत पोहोचणे सगळ्‌यात महत्वाचे होते.

डॉ. कयूम खान

कमांड 2ची म्हणजे विनयची बॉसला शोधण्यासाठी या एरियात ही नेहमीची चक्कर होती. तो जवळपास रोजच नेमाने या एरियात येऊन बॉसला शोधण्यासाठी फिरत असे. स्वतरू बॉसला ओळखू न येण्याची तो पुरेपूर खबरदारी घेत असे. त्याच्या जवळजवळ शंभरच्या वर या एरियात चकरा झाल्या असतील. पण त्याने प्रयत्न सोडला नव्हता. चिकाटी तसा त्याच्या स्वभावाचा एक पैलू होता. आज दिवसभर फिरून तो थकला होता. संध्याकाळ झाली होती. शहरातलं वातावरण आता बर्‌यापैकी निवळलं होतं. अलीकडेच बॉसचा त्याला इंटरनेटवर मेसेज आला होता. आता खुनी सत्र दुसर्‌या एका शहरात सुरू करायचं होतं. बॉसला वातावरण निवळू द्यायचं नव्हतं. तसा दुसर्‌या शहरात खुनी सत्र सुरू करण्याला अजून वेळ होता. पण विनयला दुसर्‌या खुनी सत्रात बिलकुल रस नव्हता. त्याआधीच त्याला त्याने सुरू केलेल्या खेळाचा पडदा पाडायचा होता. पण अजून एकही धागा दोरा हाती येत नव्हता. तो विचार करीत करीत एका इमारतीचं काम सुरू होतं तिथल्या मोकळ्‌या जागेत जाऊन थांबला. त्याला थकल्यामुळे कुठेतरी बसावसं वाटत होतं. त्याने आजूबाजूला काही बसण्यासाठी सापडतं का ते बघितलं. एका जागी वाळूचा एक मोठा ढीग होता. कुणी आपल्याला बघेल किंवा कुणी ओळखेल याची पर्वा न करता त्याने स्वतरूला त्या ढिगावर जवळजवळ झोकून दिलं.

जिथे विनय बसला होता तिथून जवळपास 200 मीटरच्या अंतरावर एक काळी कार रस्त्याच्या कडेला उभी होती. गाडीच्या काळ्‌या काचा चढवलेल्या होत्या. त्यामुळे आतलं काहीच दिसत नव्हतं. पण आतून जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या सगळ्‌या बारीकसारीक हालचालींचे निरीक्षण करीत होते.

आज जवळ जवळ 5 दिवस झाले आपण याच्या मागावर आहोत साला या एरियात काय शोधतो काही कळत नाही सॅम जॉनला म्हणाला.

मला वाटतं त्यातच या सार्‌या खुनांच रहस्य दडलेलं असावं जॉन म्हणाला.

पण असं किती दिवस आपण याच्यावर पाळत ठेवणार? सॅमने विचारले.

जोपयंर्ंत त्याला जे पाहिजे ते सापडत नाही तोपयंर्ंत जॉन म्हणाला.

तो आपले पुढचे खुनाचे लक्ष्य तर हेरत नसावा तेच तर आपल्याला शोधायचे आहे पण मला नाही तसे वाटत जॉन म्हणाला.

विनयचं बसल्या बसल्या समोरच्या बंगल्याकडे लक्ष गेलं. समोर दाराच्या एका खांबावर दगडामध्ये कोरलेलं बंगल्याच्या मालकाचं नाव होतं. आणि तिथे दगडाच्या चारही बाजूने प्रकाश येण्यासाठी बल्बची व्यवस्था केली होती. विनयने सहजच ते नाव वाचले.

डॉ. कयूम खान

विनयने ते नाव पुन्हा वाचलं.

डॉ. कयूम खान

नाव ओळखीचं वाटत होतं. हे नाव आपण कुठंतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे. विनय डोक्यावर ताण देत आठविण्याचा प्रयत्न करीत होता. तशी त्याला सगळी मुस्लीम नावं सारखीच वाटत होती. कदाचित त्यामुळे त्याला ते नाव ओळखीचे वाटत असावे. तो विचार करीत होता. अचानक तो बसला होता त्याच्या मागे श्घरऽऽ घरऽऽश् असा जोराने आवाज यायला लागला. विनय अनपेक्षितपणे आलेल्या या आवाजाने दचकून जवळ जवळ उठूनच उभा राहिला. त्याने मागे वळून बघितले. मागे बिल्डींचे बांधकाम सुरू होते आणि रेडीमीक्स काँक्रीट मशीन नुकतीच सुरू झाली होती. तो कसाबसा सावरून तिथून बाजूला जायला लागला. अचानक त्याच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला.

माय गॉड त्याच्या तोंडून निघाले.

त्याने एकदा समोरच्या बंगल्याच्या दरवाज्याच्या खांबावरचे नाव वाचले. आणि परत त्या रेडीमीक्स काँक्रीट मशीनकडे बघितले. त्याच्या डोक्यात खडाखड सर्व कोडी उलगडायला लागली होती.

डॉ. कयूम खानश् हा तर आपण वाचलेल्या आर्यभटावरच्या रिसर्च पेपरचा कोअॉथर होता...

आणि ही रेडीमीक्स काँक्रीट मशीनची घरघर त्याला एकदा बॉसच्या फोनवरून ऐकायला आली होती....

म्हणजे डॉ. कयूम खान हाच बॉस आहे !

त्याच्या शरीरात एकदम स्फूर्ती संचारली. तो डॉ. कयूम खानच्या घराकडे झेपावला. मग तो ब्रेक लागल्यागत थांबला.

नाही आता नको...

आपल्याला योग्य वेळ पाहून आणि योग्य प्लॅनींग करून आत प्रवेश करावा लागेल...

त्याने कसेबसे स्वतरूला आवरले.

कागदाची पुंगळी

विनय पूर्ण तयारीनिशी मध्यरात्र उलटल्यानंतर डॉ. कयूम खानच्या बंगल्याजवळ आला. बंगला बाकीच्या घरापासून अलिप्त असल्यासारखा होता. त्यामुळे बंगल्याच्या मागून आत प्रवेश करणे कदाचित शक्य होते. विनयने अंदाज बांधला. एकदा आजूबाजूला नजर टाकत तो बंगल्याच्या मागच्या बाजूने जाऊ लागला.

विनयची नजर पोहोचणार नाही अशा जागी एक काळी कार पार्क केलेली होती. आत जॉन आणि सॅम दुर्बिणीतून विनयच्या हालचाली बारकाईने टिपत होते.

मला वाटतं आता त्याला जावून पकडण्यास काहीच हरकत नाही... नाहीतर उशीर झालेला असेल सॅम म्हणाला.

नाही अजून नाही... मला पक्की खात्री आहे तो आत खुनाची श्रृंखला पुढे नेण्यासाठी जात नसावा जॉन म्हणाला.

मग कशाला जात असावा सॅमने विचारले.

तेच तर आपल्याला माहित करायचे आहे जॉन म्हणाला.

विनय बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागताच आत बसलेले जॉन आणि सॅम एकदम अलर्ट झाले. विनय नजरेआड होताच ते कारमधून बाहेर आले.

विनय बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होता. हॉलमध्ये अंधार होता. समोर एक खोली उघडी दिसत होती आणि त्या खोलीतून धूसर प्रकाश बाहेर येत होता. बंदूक रोखून हळू हळू विनय त्या खोलीच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. आता त्याच्या दृटीपथात एक खुर्चीवर बसलेली पाठमोरी आकृती आली. आकृती अंधारात असल्यामुळे कुणाची आहे हे ओळखणं शक्य नव्हतं. ती आकृती खुर्चीवर रेलून शांतपणे बसली होती. विनय त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात अचानक

हॅन्ड्‌स अप... थ्रो द गन असा करडा आवाज हॉलमध्ये घुमला.

जॉन आणि सॅम विनयच्या मागे बंदूक रोखून उभे होते. त्यांच्या दृटीपथात ती खुर्चीवर रेलून बसलेली आकृती पण होती. या अनपेक्षित घटनेने विनय घाबरला आणि गोंधळून गेला. त्याने आपली बंदूक जमिनीवर फेकली आणि आपले दोन्ही हात हवेत वर केले. समोर धूसर प्रकाशात बसलेल्या इसमाने आपली चाकाची खुर्ची आवाजाच्या दिशेने वळविली. थोडाफार सावरल्यानंतर विनय हळू हळू मागे वळायला लागला. समोर धूसर प्रकाशात खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली.

डोन्ट मूव्ह जॉनचा करडा आवाज घुमला.

विनय जागच्या जागीच एखाद्या पुतळ्‌यासारखा स्थिर उभा राहिला. ती खुर्चीवर बसलेली आकृतीसुध्दा जागच्या जागी बसून राहिली.

पण हे काय?...

त्या आकृतीच्या हातात कदाचित बंदूक होती....

त्याच्या हातातली बंदूक दिसता क्षणीच सॅमने बंदुकीच्या गोळ्‌यांचा भडीमार त्या आकृतीवर सुरू केला.

नो.... जॉनने सॅमच्या हातातली बंदूक बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यासमोर धप धप असे दोन आवाज झाले. एक ती आकृती खाली पडण्याचा आणि दुसरा विनय खाली पडण्याचा. सॅमची बंदूक बाजूला सारण्याच्या प्रयत्नात विनयच्या मस्तकात गोळी घुसली होती.

व्हॉट हॅपन्ड टू यू जॉन चिडून सॅमला म्हणाला.

मी नसती मारली तर त्यानं आपल्याला गोळी मारली असती सॅम म्हणाला.

सॅम त्या काळ्‌या आकृतीच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. आणि जॉन विनयच्या खाली पडलेल्या शरीराकडे धावला. सॅमने स्टडी रूममधला मोठा बल्ब लावला. खाली एक वयस्कर पांढरी दाढी ठेवलेला आणि मिशी पूर्णपणे कापलेला माणूस पडलेला होता. डॉ. कयूमचं शरीर एका राखेच्या ढिगार्‌यावर पडून राख इकडे तिकडे पसरलेली होती. ती राख कदाचित काहीतरी कागदपत्रे किंवा एखादे पुस्तक जाळलेली असावी. डॉ. कयूमच्या हातात कागदाची एक पुंगळी होती. त्या पुंगळीलाच अंधारात बंदूक समजून सॅमने बंदुकीच्या गोळ्‌या झाडल्या होत्या.

त्याच्या हातातली कागदाची पुंगळी पाहून स्वतरूवर चिडून सॅमच्या तोंडून निघाले, शिट ... व्हाट अ फूल आय ॲम ... ही तर साधी कागदाची पुंगळी आहे

सॅमने खाली उकीडवे बसून त्या खाली पडलेल्या माणसाच्या हाताची नाडी तपासली. त्याची नाडी पूर्णपणे थांबली होती.

हि इज डेड सॅमच्या तोंडून निघाले.

जॉनने खाली पडलेल्या विनयच्या शरीराकडे बघितले. तो अजूनही वेदनेने विव्हळत होता. त्याने खाली उकीडवे बसून त्याला कुठे गोळी लागली हे बघितले आणि तो त्याची वाचण्याची शक्यता पडताळून पाहू लागला.

याला काहीही करून आपल्याला वाचवायला पाहिजे जॉन म्हणाला.

त्याने तसेच उकीडवे बसून खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल करायला लागला.

तिकडे सॅमने त्या डॉ. कयूम खानच्या हातातली कागदाची पुंगळी ओढून आपल्या हातात घेतली. तो कागद त्याने उकलून बघितला. त्या कागदावर वेगवेगळ्‌या तारखा आणि वेळ लिहिलेली होती. कुठे लाभदायक काळ तर कुठे अति लाभदायक काळ असे नमूद केलेले होते. कुठे कुठे धोकादायक काळ असेही नमूद केलेले होते. त्यात डॉ. कयूमची जवळजवळ सर्व कुंडलीच लिहिलेली होती. वाचता वाचता सॅमचे लक्ष कागदाच्या अगदी शेवटी गेले.

माय गॉड ! सॅमच्या तोंडून निघाले.

जॉन सॅम आवाज देत जॉनकडे गेला.

जॉनने नुकताच हॉस्पिटलला फोन लावून इथे ताबडतोब ॲम्बुलन्स घेऊन येण्यास सांगितले होते.

जॉन हे तर बघ सॅमने तो कागद जॉनसमोर धरला.

जॉनने त्या कागदाकडे एक नजर फिरविली आणि तो कागद खाली फेकून देत म्हणाला—

अरे आजकाल ज्योतिय ही फॅशनच झालेली आहे

सॅमने तो कागद उचलला आणि त्या कागदाच्या अगदी शेवटी लिहिलेले दाखवत म्हणाला

अरे हे बघ ... इथे ... तारीख 17 रात्री बारा ते पुढे 3 दिवस श्धोकादायक काळश् आणि हे बघ इथे रात्री 12 ते 2 अति धोकादायक काळश्

जॉनने तो कागद हातात घेऊन व्यवस्थित बघितले. त्याने घड्याळ्‌याकडे बघितले 1 वाजून 5 मिनिटे झाली होती आणि आज तारीख होती बरोबर 17. जॉन स्तब्ध होऊन त्या कागदाकडे पाहू लागला. त्याच्या चेहर्‌यावर एक गूढमिश्रीत आश्चर्य पसरलेले होते. जॉन जिथे उभा राहिला होता तिथे खाली जमिनीवर पडून विनय विव्हळत होता. त्याने सॅमने जॉनला वाचून दाखविलेले ऐकले होते. त्याला बॉसजवळ असलेल्या विद्येची अगदी पुरेपूर खात्री पटली होती. शेवटी एक दीर्घ श्वास घेत विनयची मान एका बाजूकडे लटकली. त्याची ती विद्या हस्तगत करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली होती...

झीरो मिस्ट्री

दुसर्‌या दिवशी वेगवेगळ्‌या मथळ्‌यांखाली वेगवेगळ्‌या वर्तमानपत्रांत बातम्या झळकल्या

झीरो मिस्ट्री सॉल्व्ड ॲट लास्ट

झीरो मिस्ट्री ही दुमनांची आगळी वेगळी चाल

झीरो मिस्ट्री हे दुमनांनी पुकारलेले युध्दच. फक्त प्रकार वेगळा

झीरो मिस्ट्री च्या निमित्ताने पोलिसांतील राजकारण चव्हाट्यावर

झीरो मिस्ट्री ही घटना की फेनॉमेनॉ

झीरो मिस्ट्री ची गुत्थी सोडविण्यात बडतर्फ केलेलाच पोलीस अधिकारी शेवटी सफल

झीरो मिस्ट्री चा जनक डॉ. कयूम खान

विनय जोशी आणि डॉ. कयूम खान यांच्यातील संबंध काय?

टीव्ही चॅनल्सवर सुध्दा आज दिवसभर श्झीरो मिस्ट्रीश्शी संबंधित बातम्यांशिवाय दुसर्‌या कोणत्याच बातम्या नव्हत्या. एकीकडे श्झीरो मिस्ट्रीश्ची गुत्थी सोडविल्यामुळे जनतेत समाधान होते तर दुसरीकडे त्या प्रकरणाचे गांभीर्य आणि होवू घातलेले परिणाम लोकांच्या चेहर्‌यांवर वेगवेगळ्‌या स्वरूपात उमटत होते. या सगळ्‌या खर्‌या खोट्यांच्या गोंधळात निरनिराळ्‌या अफवांना ऊत येता होता. अशावेळी लोकांना एका मार्गदर्शनाची आणि श्झीरो मिस्ट्रीश् या घटनेचे तथ्य जसेच्या तसे त्यांच्यासमोर ठेवण्याची गरज होती.

शहरात दंगे आता मंदावले होते. पण अधूनमधून आत धुमसत असलेली आग घात प्रतिघाताच्या स्वरूपात बाहेर येतच होती. अशावेळी एक स्पेशल प्रेस कॉन्फरंस घेऊन जनतेला झीरो मिस्ट्री आणि त्यामागे असलेल्या खर्‌या उद्देशाची माहिती देणं आवश्यक होतं. झीरो मिस्ट्रीश्चे कोडे उलगडून सत्य बाहेर आणण्याचे संपूर्णपणे श्रेय जॉनला जात होते यात वादच नव्हता. पोलीस डिपार्टमेंटनेही जसे गाजावाजा करून त्याला बडतर्फ केले होते, तसेच गाजावाजा करून अगदी डोक्यावर घेऊनच विजयश्रीची माळ त्याच्या गळ्‌यात घातली होती. प्रेस कॉन्फरंस मध्ये शहराच्याच नव्हे तर अमेरिकेतल्या आणि जगाच्या पातळीवर बातम्या देणार्‌या सर्व चॅनल्स आणि वर्तमान पत्रांच्या वार्ताहरांनी गर्दी केली होती. प्रेस कॉन्फरंन्समध्ये जॉनचे आगमन होताच एकच जल्लोा उसळला. जॉनच्या चेहर्‌यावर कॅमेर्‌याच्या फ्लॅश लाईटची जणू चढाओढ लागली होती. इतक्या गर्दीतही समोरून पडणार्‌या फ्लॅशच्या प्रकाशाप्रमाणे एक विचार जॉनच्या मनात चमकून गेला.

अँजेनीला गमावल्यापासून जॉनने स्वतरूला पूर्णपणे या केसमध्ये गुंतवून केस तडीस लावली होती...

पण आता नंतर काय?...

हीच केस थंड पडल्यानंतर ही जी गर्दी त्याच्याभोवती जमली आहे ती राहणार नव्हती...

पुन्हा तो एकटा पडणार होता...

आणि एकटा पडल्यावर पुन्हा ते नैराश्य, पुन्हा ते अँजेनीला गमावल्याचं दुरूख...

विचारांच्या तंद्रीत चालता चालता जिथे मायक्रोफोन्स एखाद्या पुपगुच्छाप्रमाणे एकत्र ठेवलेले दिसत होते तिथे जॉन येऊन पोहोचला. तो केस सोडविल्याचा मान आणि अँजनीला गमावल्याचं शल्य घेऊनच सर्व वार्ताहरांसमोर उभा राहिला. आज प्रथमच पूर्ण आत्मविश्वासाने तो वार्ताहरांसमोर उभा होता.

पत्रकारांनी प्रश्नाचा भडिमार सुरू केला

हा डॉ. कयूम कोण?

विनय जोशीचा आणि त्याचा काय संबंध?

ते कोणत्या संघटनेचे मेंबर होते?

दोघंही कसे काय मारले गेले? एकतरी जिवंत सापडायला पाहिजे होता

पोलीस काही लपविण्याचा किंवा दाबण्याचा तर प्रयत्न करीत नाहीत ना?

दोंघांना मारून हे प्रकरण संपणार का?

हा आतंकवाद आता कोणत्या स्तराला जाणार?

हिंदू आतंकवाद हे काय अजून नवीन धूड?

वन ॲट अ टाईम प्लीज जॉनचा आत्मविश्वासपूर्ण आवाज घुमला.

त्याच्या आवाजाने थोडी शांतता पसरली.

आज माझ्याजवळ या केसशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत त्यामुळं अगदी सावकाश आणि आता केस संपल्यामुळे मी अगदी रिकामाच आहे... मलाही काही घाई नाही. आज प्रथमच जॉन पत्रकारांसमोर मोकळा बोलत होता.

पत्रकारांत थोडी खसखस पिकली. वातावरण थोडं मोकळं झालं.

एकजण प्रश्न विचारण्यासाठी समोर आला.

मला वाटतं हिंदू आतंकवादाला अमेरिका प्रथमच सामोरी जात असावी याला आपण किती गांभीर्याने घेतलं पाहिजे?

ही जी झीरो मिस्ट्रीची घटना आहे ती साधीसुधी घटना नसून अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच दुमनांनी इतकी विचारपूर्वक आणि चलाखीने रचलेली एक चाल आहे. या घटनेच्या तळाशी जाऊन आम्ही ज्या तथ्यांचा शोध लावला ती सर्व तथ्ये जनतेसमोर मांडल्यानंतर त्यांना ही गोट मनोमनी पटेल.

तथ्य क्रमांक 1 — या झीरो मिस्ट्री शी हिंदू आतंकवाद किंवा हिंदू सनातन धर्माचा किंवा हिंदू पुरातन साहित्याचा दुरूनसुध्दा काही संबंध नसून तसा जाणूनबूजून भास निर्माण करण्यात आलेला आहे.

तथ्य क्रमांक 2 — श्झीरो मिस्ट्रीश् चा जनक श्डॉ. कयूम खानश् हा कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंधित नसून त्यांचा सरळसरळ संबंध श्लकरे कायदाश् या आतंकवादी संघटनेशी येतो. ही संघटना लश्करे तोयबा किंवा अल कायदा या आतंकवादी आणि बंदी घातलेल्या संघटनेचा आयसोटोप असू शकते किंवा त्यांचे ते हस्तक असू शकतात. त्यांच्या कार्य करण्याच्या पध्दती आणि त्या संघटनेचा उगम पाहता हे लक्षात येते.

तथ्य क्रमांक 3 — श्झीरो मिस्ट्रीश् हे प्रकरण प्रॉक्सी आतंकवाद या प्रकारात मोडू शकते. त्यांचा उद्देश भारत आणि अमेरिका यांच्यातले सुधारते संबंध, त्यांच्यातला अण्वस्त्र करार, त्यांची एकमेकावर विसंबलेली आर्थिक परिस्थिती पाहता या दोन्ही देशांत फूट निर्माण करून दोन्हीही देशांना आर्थिक हानी पोहोचविण्याचा होता.

जॉन एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलायला लागला

त्यामुळे मी सर्व जगाला तुमच्या मार्फत पुन्हा एकदा सांगू इच्छितो की श्झीरो मिस्ट्री हा हिंदू आतंकवाद नसून तसा भास निर्माण केला गेलेला आहे ... आपण कुणीही मग ते अमेरिकन असोत,... भारतीय मूळ असलेले अमेरिकन असोत ..की भारतीय असोत,... या भासास बळी पडता कामा नये... यात नुकसान दोघांचेही आहे... जेवढे अमेरिकेचे ....तेवढेच भारताचेसुध्दा

पण ती इंटरनेटवर एक अॉडीओ रिलीज करण्यात आली होती त्याचं काय?... त्यातून तर वेगळाच मेसेज मिळतो दुसर्‌या वार्ताहराने विचारले.

पुन्हा जॉन बोलू लागला

तो एक भारतीय लोकांना अमेरिकन लोकांच्या विरुध्द आणि अमेरिकन लोकांना भारतीय लोकांच्या विरुध्द चिथविण्याचा प्रयत्न होता आणि दुर्दैवाने त्यात ते लोक यशस्वी झाले होते

पण या झीरो मिस्ट्री ने अमेरिकेला कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचणार होते?...मला नाही वाटत अमेरिकेला यातून जीवांची हानी वगळल्यास काही विशेा नुकसान पोहोचू शकते

त्या लोकांनी आपल्या शहरात जशी श्झीरो मिस्ट्रीश् खुनी शृंखला पूर्ण करून सर्व अराजकता माजवली होती.... तशीच अमेरिकेतल्या इतरही मोठया मोठया शहरात श्झीरो मिस्ट्रीश् खुनी शृंखला राबविण्याचा त्या लोकांचा मनसुबा होता.... सुदैवाने तो आपण हाणून पाडलेला आहे.... या सगळ्‌या घटनेत वरकरणी पाहता असं वाटत नाही की अमेरिकेचे त्यात काही नुकसान होणार होते.... पण विचारपूर्वक बघितल्यास ....आजच्या परिस्थितीत भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचे मोठया प्रमाणावर लोक इथे नोकरीसाठी येऊन स्थायी झालेले आहेत.... त्यात बहुतांश लोकांना अमेरिकन नाकरीकत्वसुध्दा लाभलेले आहे..... या लोकांना जर एकाच वेळी चिथावून त्यांना नुकसान पोहोचविले किंवा त्यांना जर साधे निक्रीय जरी केले तरी अमेरिकेतील मोठया प्रमाणावर काम बंद पडेल आणि परिणामतरू अमेरिकेच्या इकॉनॉमीवर त्याचा निश्चितच वाईट परिणाम होईल.... तसेच आज अमेरिकेच्या पुकळ मोठमोठया कंपन्यांनी भारतात विनिवेश केलेला आहे.... तिथे भारतातही जर या कंपन्यांविरुध्द प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका मोठया प्रमाणावर त्या कंपन्यांना ....आणि परीणामतरू अमेरिकेच्या इकॉनॉमीला बसणार आहे

आणि या झीरो मिस्ट्रीने भारताला कोणत्या प्रकारचे नुकसान होणार होते? एका भारतीय मूळ असलेल्या पत्रकारने प्रश्न विचारला.

बर्‌याच लोकांच्या माहितीत किंवा ऐकीवात असेल ....की 90 च्या दशकात एक वेळ अशी आली होती की भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.... परकीय चलनासांठी रिजर्व बॅकेला शेवटचा उपाय म्हणून मोठया प्रमाणावर ठेवणीतलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं.... पण त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली होती ती एनआरआय लोकांच्या भारतातील गुंतवणुकीमुळे.... आणि परिणामतरू परकीय चलनाचा जो तुटवडा निर्माण झाला होता तो भरून निघाला....त्यावेळी एक चांगली गोटसुध्दा घडली... हळू हळू भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्री भरभराटीला आली.... पुढे पुढे भारत अमेरिका आणि तेथील सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी आऊट सोर्सीग करू लागला.... आजही अशी परिस्थिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था आऊट सोर्सीगवर मोठया प्रमाणावर विसंबून आहे.... हे श्झीरो मिस्ट्रीश् प्रकरण जर अजून चिघळले तर भारताचे आऊटसोर्सीग आणि विदेशी कंपन्यांचा भारतातील निवेश थांबेल.... परीणामतरू भारतीय अर्थव्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही..... कुणी कितीही नाकारो ....आज स्थितीला भारत आणि अमेरिकेचे श्एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथश् चे नाते आहे..... या नात्याला तडा गेल्यास ....नुकसान दोघांनाही भोगावे लागणार आहे...

जॉनने एखाद्या अर्थतज्ञाप्रमाणे भारतीय आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मुद्देसूद विश्लेाण केले.

पण एकट्या डॉ. कयूम किंवा विनय जोशी यासारख्यांना मारून किंवा पकडून समस्येचे समाधान होणार आहे का?

वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

नाही ... दुर्दैवाने याचं उत्तर श्नाहीश् असं आहे...कारण भारत आणि अमेरिकेत वितुट निर्माण करण्याचा त्या संघटनेचा हा एक प्रयत्न होता ...आणि डॉ. कयूम काय किंवा विनय जोशी काय हे त्यांच्या हातातले फक्त एक बाहुले होते ... भवियात असे अजूनही प्रयत्न होवू शकतात... फरक एवढाच राहील की त्यावेळी डॉ. कयूम किंवा विनय जोशीच्या जागी दुसरं कुणीतरी राहील ...

मग आता यातून मार्ग काय? एका वार्ताहराने पुढचा प्रश्न विचारला.

यातून मार्ग एकच ... की अमेरिकन , भारतीय अमेरिकन आणि भारतीय लोकांनी आपली सद्विवेक बुध्दी शाबुत ठेवून या घटनेतील डाव आणि तीव्रता समजून घ्यावी ...आणि ताबडतोब दंगे थांबवावेत.... जर तसे झाले नाही तर आपले दुश्मन त्यांच्या योजलेल्या कार्यात पूर्णपणे यश्वस्वी होतील.... आपण आपापसात दंगे केले तर ते आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल ....आणि मग मात्र आपल्याला आपल्या अंधरूपतनापासून मग कोणीही रोखू शकणार नाही ... आता वेळ आली आहे की जनतेने शहाणं आणि सावध व्हावे... कुणाच्याही चिथावणीला किंवा भडकविण्याला थारा न देता, डोळे उघडे ठेवून सद्विवेक बुध्दीने वागावे

आता वार्ताहरांचे प्रश्न त्या एका घटनेशी संबंधित न राहता आतंकवाद या जागतिक विायाकडे वळले. त्यामुळे जॉनने आता आटोपतं घेऊन इथून काढता पाय घेणेच योग्य आहे असे समजले. कारण आतंकवादावर बोलणे हा या पत्रकार परिदोचा विाय आणि उद्देश नव्हता. आणि त्या विायावर भाय करणे जॉनला तरी योग्य वाटत नव्हते. ज्या घटनेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिाद बोलावली होती त्याची जवळपास संपूर्ण माहिती जॉनने दिली होती.

सगळं जनतेवर सोपवून असे पोलीस कसं काय यातून अंग काढून घेवू शकतात?... त्यांचंही काही कर्तव्य असतेच की एका पत्रकाराने खोचकपणे विचारले.

निघण्याच्या तयारीत असलेला जॉन म्हणाला,

मी असं कधीच म्हणालो नाही... पोलिसांनाही त्यांचं कर्तव्य आहेच...आणि ते ते पार पाडतीलच...पण आतंकवाद ही एक घटना नसून एक फेनॉमेनॉ आहे... त्यामध्ये जनतेवर जास्त जबाबदारी आणि कर्तव्य असतात...ती त्यांनी पार पाडावीत एवढीच अपेक्षा...

जॉन थोडा वेळ थांबला आणि म्हणाला,

आता मला वाटते.... या घटनेशी संबंधित सर्वकाही माहिती मी आपल्याला मुद्देसूद स्वरूपात दिलेली आहे... थँक यू

जॉन वळून पत्रकार परिादेतून बाहेर जायला निघाला. जातांनासुध्दा पत्रकारांचा गराडा त्याला सुचू देत नव्हता. त्याच्या सोबतच्या पोलिसांनी त्याला त्या गराड्यातून मार्ग काढून देत त्याला त्याच्या वाहनापयंर्ंत पोहोचण्यास मदत केली.

शुन्यातून शुन्याकडे

जॉनची कार भरधाव वेगाने रस्त्यावरून धावू लागली. कार जशी जशी शहराच्या बाहेर जाऊ लागली तशी रस्त्यावरची रहदारीही कमी होत होती. जॉनला एकटेपणा जास्तच जाणवायला लागला. जॉन रस्त्याच्या कडेला बघायला लागला. रस्त्याच्या कडेलासुध्दा घरांची गर्दी आता तुरळक व्हायला लागली होती. थोडं समोर जाऊन जॉनची कार डाव्या बाजूला वळून एका कच्च्या रस्त्यावर धावायला लागली. गाडी चालवितांना रस्त्यावर धुळीचा डोंब उठत होता. त्यामुळे आणि रस्ताही कच्चा असल्यामुळे जॉनच्या कारचा वेग कमी झाला होता. शेवटी जॉनची गाडी एका कुंपण घातलेल्या भयाण अशा मोकळ्‌या आवाराजवळ थांबली. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून जॉन गाडीतून उतरला. गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेला तारेत गुंफलेला मोठा हार त्याने हातात घेतला. त्याने समोर बघितले. कुंपणाच्या दाराच्यावर एक मोठा सिमेटरीचा जुनाट आणि जंगलेला बोर्ड लागलेला होता. जॉन तो फुलांचा तारेत गुंफलेला गोल हार (रीथ) घेऊन सिमेटरीत शिरला. आत शिरल्याबरोबर त्याचे पाय जास्तच जड झाले. त्याची गती मंदावली. तो तशाच जड पावलांनी चालत जावून एका समाधीपुढे उभा राहिला. त्याने समाधीच्या कोरलेल्या अक्षरांवर एक नजर फिरविली. ती अँजेनीची समाधी होती. थोडा वेळ स्तब्ध उभे राहून त्याने वाकून तो गोल हार तिच्या समाधीवर ठेवला व गुढघे टेकून तो शांतपणे डोळे मिटून तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करू लागला. त्याला तिच्या त्या गंभीर, अवखळ, लोभस, गोंडस मुद्रा आठवायला लागल्या. त्याचा ऊर भरून यायला लागला.

त्यानं तिच्यासोबत पूर्ण आयूय व्यतित करण्याचा निश्चय केला होता. पण नियतीसमोर त्याच्या निश्चयाला काय किंमत होती?..

शून्य...

त्याच्या पाणावलेल्या डोळ्‌यातून अश्रू ओघळायला लागले. एक टपोरा अश्रू त्याच्या गालावरून ओघळून अँजेनीच्या समाधीवर ठेवलेल्या गोल हाराच्या अगदी मध्ये पडला. थोड्या वेळाने त्याने कडांना अश्रू लागलेल्या पापण्या उघडल्या. त्याची नजर समोरच्या गोल हाराकडे गेली.

खरंच किती विचित्र आहे माणसाचं जीवनश् तो विचार करू लागला श्... शून्यातून यायचं आणि शेवटी शून्यातच विलीन व्हायचं शहर पोलीस शाखाप्रमुख बाहेर बाल्कनीत सकाळच्या चहाचा स्वाद घेत बसले होते. ते आता रिटायर झाले होते. किंबहुना ते रिटायर झाल्यामुळेच जॉन केसवर व्यवस्थित काम करू शकला होता. आणि तपासाचं संपूर्ण श्रेय आपल्या पदरात पाडून घेवू शकला होता. शहर पोलीस शाखाप्रमुख एका आतंकवादी संघटनेचा मेंबर होता. त्याच आतंकवादी संघटनेच्या वरच्या अधिकार्‌यांकडून जॉन ज्या केसवर काम करीत होता त्यात अडथळे निर्माण करण्याचे त्याला आदेश होते. डॉ. कयूम खान आणि शहर पोलीस शाखाप्रमुख यांचा प्रत्यक्ष तसा काहीच संबंध नव्हता पण ज्या संघटनेचा डॉ. कयूम खान मेंबर होता त्याच आतंकवादी संघटनेचा शहर पोलीस शाखाप्रमुखसुध्दा मेंबर होता. जेव्हा डॉ. कयूम खानला आपला भवियातला धोका कळला होता त्याने त्याचे कार्य दुसर्‌या कुणाला तरी सोपविण्याची विनंती वरच्या अधिकार्‌यांकडे केली होती. आणि वरील अधिकार्‌यांनी त्याला रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाचे नाव सुचविले होते.

चहाचा एक एक घोट घेत रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख एक एक गोट आठवत होता. मरण्याच्या एक दिवस अगोदर डॉ. कयूम खान त्याला भेटायला आला होता. तो आला तेव्हा त्याने फक्त एवढीच ओळख करून दिली होती की त्याला संघटनेच्या वरच्या अधिकार्‌याने त्याच्याकडे पाठविले आहे. तसा तो जास्त काही बोलला नव्हता. फक्त एक प्लास्टीकमध्ये गुंडाळलेलं पुडकं त्याने रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाच्या हवाली करून त्याला त्याच्या कार्याच्या यशस्वी होण्याच्या श्बेस्ट वीशेस्श् देऊन तो तिथून निघून गेला होता. जेव्हा डॉ. कयूम खान मारला गेला आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात झळकले तेव्हाच रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाला कळले होते की तो डॉ. कयूम खान होता.

चहा संपवून रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाने आपल्या मांडीवर ठेवलेले प्लास्टीकचे पुडके उघडले. त्यात सूचनावजा काही कागदपत्रं होती. त्यांनी ती कागदपत्रं चाळून बघितली. त्यांच्या श्वासोश्वासाची गती वाढू लागली. त्यांच्यात एक नवचौतन्य संचारायला लागलं होतं. ते जरी शहर पोलीस शाखाप्रमुख पदावरून रिटायर झाले होते तरी संघटनेने डॉ. कयूम खानच्या वतीने झीरो मिस्ट्रीची पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती कागदपत्रं बाजूला ठेवून त्या प्लास्टीकच्या पुडक्यात अजून डोकावून बघितले. त्यात एक जुने अगदी झिजून गेलेले एक पुस्तक ठेवलेले होते. त्यांनी ते पुस्तक आपल्या हातात घेतले आणि त्यालासुध्दा ते चाळू लागले. त्या पुस्तकाच्या बाबतीत इंग्रजीत नोट्‌स सुध्दा त्याच्या पानांत ठेवलेल्या होत्या. ते त्या नोट्‌स वाचू लागले. डॉ. कयूम खानने आपल्याकडे असलेली जोतिय विद्या रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुखाकडे हस्तांतरीत केली होती. रिटायर्ड शहर पोलीस शाखाप्रमुख आनंदाने अगदी मोहरुन गेले होते. ते विचार करू लागले...

की हे त्यांच्या संघटनेवरच्या निठेचे फळ आहे की विधीलिखीत...

त्या ग्रंथातल्या नोट्‌स वाचता वाचता त्यांचा विश्वास दृढ होत होता की ते सगळं कदाचित विधीलिखीतच असावं...

स्वच्छ आणि नितळ पाण्याचा खळखळ असा मधुर आवाज सगळीकडे पसरला होता. त्या खळखळ वाहणार्‌या पाण्यासोबत प्रवाहाच्या काठा काठाने तो ऋषी चालू लागला. थोड्या वेळाने चालत चालत तो आपल्या गुहेजवळ येऊन पोहोचला. गुहेजवळ येताच तो थांबला आणि सभोवार त्याने एक नजर फिरविली. जणू निसर्गातले सौंदर्य त्याने आपल्या तेजस्वी डोळ्‌यांनी पिऊन घेतले. मग हळू हळू मंद गतीने तो आपल्या गुहेकडे चालायला लागला. गुहेच्या दारात थांबून त्याने एकदा पुन्हा वळून नदीकडे पाहिले. मग तो आपल्या गुहेत शिरला. गुहेत धूसर प्रकाश होता. धूसर प्रकाशात तो आपल्या आसनाकडे चालत गेला. आपलं आसन नीट करून पुन्हा ध्यानासाठी तो आपल्या आसनावर बसला. धूसर प्रकाशातही त्याच्या चेहर्‌यावर एक तेज दिसत होतं. त्याच्या डोक्याभोवती एक गोल आभा पसरलेली जाणवत होती.

गोल मोठया शून्यासारखी...

मग त्याची नजर हळू हळू स्थिर झाली... शून्यात...

डोळे हळू हळू मिटले. आणि तो ध्यानस्थ झाला. काळ जागा आणि शरीराच्या पलिकडे त्याच्या जाणीवा झेपावू लागल्या.

मग मात्र काहीच नाही....

शून्य विचार, शून्य अस्तित्व...

अगदी शून्य!

सगळं काही शून्यच शून्य!

— समाप्त —

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED